मायबोली गणेशोत्सव २०१३: उपक्रम एस टी वाय : कथा ३. सेव्ह द अर्थ

Submitted by संयोजक on 31 August, 2013 - 08:11

एस टी वाय म्हणजे स्पिन द यार्न!
धागा गुंडाळा.
थोडक्यात,एक सुरूवात देऊन मग बाकीच्यांनी आपापल्या कल्पनाशक्तीने एखादी गोष्ट थोडी थोडी पुरी करावी.
एकेक सीन देत.

STY-KaCha-Chaitanya.jpg

लेखकः कवठीचाफा

कथा: सेव्ह द अर्थ

साल : ३०२२

स्थळ : सर्व्हाइवल आयलंड

तात्पुरत्या उभारलेल्या त्या तळावरची सगळी तयारी पूर्ण झालेली होती. काही तासांनीच ती टीम एका अतिमहत्वाकांक्षी मोहिमेवर निघणार होती. योजना होती `सेव्ह द अर्थ'. २०२५ च्या जागतिक महायुध्दानंतर एकवटलेल्या उर्वरीत पृथ्वीवरच्या समस्त मानव जमातीनं घेतलेला एक धाडसी निर्णय. शेवटी त्यांनाही काहीच पर्याय दिसत नव्हता. प्रमाणाबाहेर खनिजांचा उपसा, कारखान्यांनी केलेलं प्रदूषण आणि गेल्या शतकांतली अणुयुध्दे यांच्यामुळे रहाण्यासाठी कशीबशी सापडलेली ही सर्व्हाइवल आयलंड सोडली तर पृथ्वीवर कुठेच जमीन म्हणून शिल्लक राहिलेली नव्हती. या बेटांवरचं संख्याबळही घटत घटत काही हजारांवर येऊन ठेपलेलं होतं. वातावरण विरळ होत चाललेलं, जमिनीतून हिकमतीनं काढलेल्या खाण्यायोग्य पिकांचं प्रमाण कमी होत चाललेलं.

सगळ्या परिस्थितीतून एकच आशेचा किरण दिसत होता तो म्हणजे काळजीपूर्वक आखलेली समस्त मानवजातीची ही शेवटची मोहीम. मोहिमेवरच्या लोकांची निवडही तशीच काळजीपूर्वक करण्यात आलेली होती. एसइव्ही असं अर्थहीन नाव धारण करणारे अणुशास्त्रातले महारथी, काली हे प्राणीशास्त्रातले शास्त्रज्ञ, वैशयन रसायन शास्त्रातले, एस्-यू हे पदार्थ विज्ञानातले, वेद हा भूशास्त्रातला, मांडील्य हे खगोलशास्त्रातले, मनू हे उत्क्रांती विज्ञानातले, नील हे स्थापत्यशास्त्रातले आणि डेव्ह हा त्यांचा मार्गदर्शक, संरक्षक अशा भूमिका निभावणारा अंतराळवीर असे निवडक लोक आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर यंत्रसामुग्री यांच्यासह काही तासांनी मोहीम सुरू होणार होती. `सेव्ह द अर्थ'- एक महत्त्वाकांक्षी कालप्रवासाची मोहीम.

तिसर्‍या महायुद्धानंतर कित्येक वर्षांपासून ही कल्पना चर्चेत होती. मानवाला होणार्‍या भविष्यातल्या विनाशाची पूर्वकल्पना देऊन सावध करणं, त्यासाठी उलट्या दिशेने कालप्रवास करून त्याच्या अप्रगत काळात जाऊन त्याला प्रशिक्षित करणं. याकरिता कालावधीची निवडही झालेली होती.

सगळीच यंत्रणा एका भल्यामोठ्या यानावर बसवण्यात आलेली होती आणि अर्थात त्यासह कित्येक कोटी वर्षाचा कालप्रवास करण्यासाठी लागणारी प्रचंड ऊर्जा एसइव्ही यांच्या प्रयोगांतून अणूंचे विभक्तीकरण करून मिळवण्यात येणार होती.प्राथमिक गरज भागवण्यासाठी शिल्लक राहीलेल्या अण्वस्त्रांच्या वॉरहेडमधल्या प्लुटोनीयमचा वापर करण्यात येणार होता. कदाचित त्यामुळे ही शिल्लक राहीलेली मानवजात धोक्यात येण्याची शक्यताही होतीच पण यश मिळालं तर .... कल्पनातीत समृध्दी.

डेव्हनं यथायोग्य सेटींगवर शेवटची नजर टाकली आणि उरलेल्यांना इशारा केला. सगळ्यांनीच आपापल्या जागा घेतल्या, कालींनी त्यांनी प्रयोगशाळा पुन्हा तपासून घेतली अणि सिध्द असल्याचा इशारा केला.

प्रचंड थरथराट.. जमिनीवर कित्येक मैल लांब उभे राहून आपापल्या संरक्षित घुमटातून पहाणार्‍या उर्वरित लोकसंख्येलाही थरकाप भरवणारा प्रचंड थरथराट, क्षणोक्षणी वाढत जाणारा. लगेच काही मिनिटांनंतर समोरच्या तळावरून अकस्मात एक ऊर्जेची लाट सरसरत निघून गेली आणि त्यातून सावरेपर्यंत तळ रिकामा झालेला.

'सेव्ह द अर्थ' ची टीम तिच्या कार्यावर निघून गेली होती.

------------------------------------------------------------------------------------------------------------------

काय झालं पुढे ? ते त्यांच्या कार्यात यशस्वी झाले का ?

-------------------------------------
नियमावली :
१) कथेचा शेवट अतिरंजित चालेल, पण पटेल असा असावा. शेवट १८ सप्टेंबर २०१३ला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ पर्यंत व्हावा.
२) आपले शास्त्रज्ञ समंजस आहेत, त्यांना उगीच भांडायला लावून अपघात घडवू नये, इतर कारणानं घडलाच तर सगळ्यांना एकदम मारून शास्त्रज्ञांचा आणि पर्यायानं कथेचा शेवट करू नये. स्मित
३) शास्त्रज्ञ किमान एकदा तरी परत त्यांच्या वर्तमानकाळात आले पाहिजेत, मग परत भूतकाळात गेले तरी चालतील.
४) कथेत मानवी इतिहासाचा वापर केला तर उत्तम
५) आपण लिहिलेला प्रसंग आधीच्या प्रसंगाला पुढे नेणारा आणि सुसंगत असावा.
६) आधीच्याने लिहिलेला प्रसंग, 'हे सगळं स्वप्नात झालं' असं पुढच्याने म्हणून त्याची मेहनत वाया घालवू नये. थोडक्यात, स्वप्न पडणार असतील, तर ती अधिकृत ज्याची त्याने स्वतःच्या प्रसंगातच रंगवावी.
७) चारपेक्षा जास्त नवीन पात्रांचा एका प्रसंगात नव्याने परिचय करून देऊ नये.
८) स्थळ, काळ, वेळेचं भान ठेवावं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Rofl हे प्रोजेक्ट जोरदार सुरू आहे. आणि इतक्या काटेकोरपणे ब्लूप्रिंटस तर त्या स्फिंक्सवाल्या इंजिनिअरांनीपण नसतील बनवल्या.... चालू द्या, चालू द्या....... Proud

मै ची पोरं लै भारीयेत. Biggrin

मैत्रेयी, छान लिहीताएत की सगळे.
अग, केल त्यांनी काहीतरी पण ते मांडिल्य, का ली तेच लोक फेलीयर होते. >> हम्म. अच्छा..

हे मस्त चाललय एसटीवाय....आणि आता लगेच संपवायचं पण?.....
यावेळी नेहेमीच्या दिवसपाळीच्या मंडळींनी कुणीच नाही केली सुतकताई.

हा मुद्दा अजुन आला नाहिये

शास्त्रज्ञ किमान एकदा तरी परत त्यांच्या वर्तमानकाळात आले पाहिजेत, मग परत भूतकाळात गेले तरी चालतील.

हो स्वाती - "पण कदाचित ही मुळात ह्या लोकांची मिशन असेल. त्यांनी आपल्याला भविष्यात जाऊन संहार थांबवायला पाठवले असेल आणि आपण फेलीयर आहोत. आपण लूजर आहोत." म्हणूनच हे लिहील मी. कारण का ली ला समजल कुठे काय प्लान फेल गेला तर फिक्स करायला तिला परत जावे लागेल तिच्या वर्तमानात. बघू आता कोण काय पुडी सोडताय

जपान वाल्यांनी आधी लिही
मग वेळ अँडजेस्ट करून भारताची करा मग परत लिहा
परत वेळ अँडजेस्ट करा अमेरिकाची ठेवा ,,, परत लिहा
असेच इचर देशांतल्या लोकांनी करा,,, जो पर्यंत अमेरिकेत 11 वाजत नाहीत
झाले तुमचे टाईम ट्राँव्हेलिंग

Wink

दिमित्री भविष्यातून आलो असे म्हणणाऱ्या लोकांचे बोलणे ऐकून आधी तर चक्रावून गेला होता. पण त्याच्या आणि त्यांच्या तेराशे वर्षांच्या कालखंडादरम्यानच्या विश्वास बासण्यासारख्या गोष्टी ऐकल्यानंतर त्याचा नाईलाज होता. त्या छोट्याश्या भेटीमधील संभाषणाचे तुकडे तो पुन्हा-पुन्हा चघळत होता. त्या चकाकत्या लाल बटनावरून पुन्हा-पुन्हा हात फिरवत, पण त्यावर प्रेशर न देता.

दि: विश्वास का ठेवावा मी?
काली: तु कुणालाही न दाखवलेली डायरी तुझ्या मृत्युनंतर प्रकाशीत झाली, खऱ्या अर्थी प्रसिद्ध झाली - त्यातील काही उतारे मला तोँडपाठ आहेत, ऐक…
दि: हायला! पण मीच का?
डेव्ह: तुमचे विचार, विचारपद्धत आमच्या कार्यभागाशी मिळत्या-जुळत्या आहेत. पण खरे सांगायचे झाले तर योग्य स्पेसटाईम कर्व्हज् याच भागातून जात होते.
दि: कशासाठी योग्य?
मांडिल्य: काळ अतिशय लवचीक असतो. स्थळांचे मात्र तसे नाही. एकप्रकारे स्थळ आणि काळ हे एकसंध असतात, पण त्याचप्रमाणे स्थळ-काळातील वक्रतेमुळे काळाची लवचिकता बदलते.
मनु: अरे भलत्या तपशीलात नको जाऊ. थोडक्यात सांगायचे तर विश्वांच्या समांतर कालक्रमाणात असे फार थोडे क्षण असतात जेंव्हा त्यांची भवितव्ये एकमेकांना छेदतात. आजचा दिवस असाच एक.
दि: पण म्हणजे तुमची पृथ्वी आणि माझी पृथ्वी एक नाही?
मांडिल्य: एका क्षणापुर्वीची आणि आत्ताचीही पृथ्वी एक नसते. आपण तर अनेक शतकांची गोष्ट करतो आहोत!
मनु: मांडिल्य, पुरे! दिमित्री, एका मितीवर सगळ्या पृथ्व्या एकच. या पृथ्वीला वाचवणे म्हणजे जवळजवळ सगळ्या पृथ्व्यांना वाचवणे.
दि: जवळजवळ म्हणजे?
SEV: अर्ध्या समज. ग्रॅंडफादर पॅरॅडॉक्समध्ये ज्याप्रमाणे आपण भूतकाळात जाऊन आपल्या वडिलांच्या जन्माआधी आजोबांचा खून केला तर आपला जन्मच होणार नाही आणि पर्यायाने आपण भूतकाळात जाऊ शकणार नाही आणि आजोबांचा खून करु शकणार नाही, त्याचप्रमाणे तुम्हाला आम्ही पृथ्वीचे भविष्य बदलायला लावले, तर तसे करायला उद्युक्त करायला आम्ही आलो तसे येऊच शकणार नाही.
दि: हो, पण या पॅरॅडॉक्सवरचा उतारा तुम्हाला समजला आहे का?
S.U.: हो, पण उत्तर जरा कृष्णवर्णी आहे.
दि: आता हे काय?
S.U.: निती आणि अनिती बद्दलचे वाद सततच सुरु असतात. पण निरपेक्ष सत्य असं काही नसतं. तरीही तुमच्या दृष्टीने चांगले ते करायचे असते. शेवटी जगाचा अंत होणार आहेच, पण जेवढा कालावधी तुमचा आहे, तुमच्या हातात आहे तेवढ्यात जितक्या जास्त लोकांकरता चांगलं करु शकु तितकं प्रत्येकानी करावं.
दि: मी खरंच काही करावं असं वाटत असेल तर प्लीज मला समजेल अशा भाषेत आणि तत्वज्ञानात न शिरता काय ते बोला.
SEV: S.U. ला असं बोलायची सवयच आहे - स्पेशल युनिटरी ग्रुपच्या अद्याक्षरांचे नाव उगीचच नाही घेतले त्याने. साध्या शब्दात बोलायचे तर जेंव्हा कोणीही कालप्रवासाला निघतं तेंव्हा त्यांचे दोन अंश बनतात - भौतीक पातळीवरचा एक आणि पराभौतीक पातळीवरचा एक. भौतिक पातळीवरच्यांना आम्हा पराभौतिकांचे ज्ञान नसते. आमच्या गणितानुसार ते एका ईजिप्तमध्ये पोचले असणार. त्यांची रेशा त्यांना पुन्हा आमच्या वर्तमानात नेईल. तुटलेल्या रेकॉर्ड प्रमाणे पुन्हा-पुन्हा एका वार्तुळात फिरत. तु मात्र आम्ही सांगु त्याप्रमाणे केलेस तर या पृथ्वीला वाचवशील.

"थांबा ! तुम्ही काहीच करू नका" तिथे पोहोचलेला फदिल ठासून सर्वांना म्हणाला. त्याच्याबरोबर मेनका किंवा हबिबी होती. सगळ्यांच्या प्रश्नार्थक नजरा त्याच्याकडे वळल्या.
"तुम्हा मानवांना सगळे आपल्या हाती घ्यायची घाई असते. खर तर 'आपला हात जगन्नाथ' हे खरच उत्तम धोरण आहे. पण हे करताना मागचा पुढचा काही विचार न करता घिसडघाई करायची तुमची खोड सगळ्यांना महागात पडते. पुरेशा विचार नि माहिती अभावी घेतलेले निर्णय तुम्हाला तुमच्या इतिहासात जिथे तिथे खोड्यात टाकत आले आहेत. अगदी आज तुमचे इथे येण्याचे कारण त्याचाच परीणाम आहे." त्याचा सूर चढला होता. चढत्या आवाजाबरोबर त्याचे नि हबिबी चे रुप बदलत होते. त्यांचा चेहरा तेजःपूंज दिसू लागला होता. त्यांच्या मागे एक झळाळी उमटू लागली होती. मनाला हेलकावे बसल्यासारखे वाटायला लागले होते.
वैशयन, मांडील्य, मनू ला एकदम आपण महाभारतामधले 'संभवामी युगे युगे' म्हणणारे श्री कॄष्ण रुप पाहतोय असे वाटले. कालीला वज्रायन बोधिसत्वाचा भास होत होता. इतरांना तिथे Holy Trinity दिसत होती. कोणाला डोळ्यासमोर सहाचे तीन आकडे चमकल्याचाही भास झाला.
आजूबाजूच्या अवकाशाला एक भोवंड बसली असे वाटले नि परत सगळे normal झाले. फदिल तिथेच शांतपणे उभा होता.
"आत्ता नक्की काय झाले इथे ?" डेव्ह त्याच्या military training मूळे सगळ्यामधून पटकन सावरला होता.
"इथे ? इथे काहीच झाले नाही." इथे वर जोर देत फदिल म्हणाला. "जे काही झाले, वाटले ते,सर्वच तुमच्या मनात होते." त्याचा स्वर मिस्किल झाला होता.
सगळ्यांच्या प्रश्नार्थक चेहर्‍याकडे पाहत मेनका फदिलच्या कानात काहितरी पुटपुटली.
"ठिक आहे, तुझा आग्रहच आहे म्हणून त्यांना सांगतो.
खर तर ह्या गोष्टीची सुरूवात कधी झाली, कशी झाली किंवा कोणी केली हे कोणालाच माहित नाही. कदाचित हे विश्वाच्या सुरूवातीपासून असेच असेल किंवा श्रोंडींजरच्या मांजरीप्रमाणे कोणी तरी निरिक्षणातून सुरू केले असेल. पण हे कसे सुरू झाले हे मह्त्वाचे नाही तर कसे संपणार हे मह्त्वाचे आहे, तुमच्याच नाही तर आमच्याही.
तुमचा ग्रह् उतारावरून घरंगळत जाणार्‍या दगडासारखा विनाशाच्या दिशेने गडगडत सुटला आहे हे तुम्हाला लक्षात आलेलेच आहे. आम्ही बरेचदा वेगवेगळ्या रुपात तुमच्या इतिहासात हस्तक्षेप हे थांबवायचा प्रयत्न केला. मघाशी तुम्हाला जे काहि जाणवले ते त्याच मानवी वारशाचे प्रतिबिंब होते असे समजा.
आम्हाला क्षणीक यश ही मिळाले. पण हा हस्तक्षेप का केला हे समजून न घेताच तुम्ही आम्हाला देव बनवून आमची पूजा सुरू केली. मूळ हेतू बाजूलाच राहिला नि तुमचा उतारावरचा प्रवास सुरूच राहिला. आमची चूक हीच झाली कि मधे मिळालेल्या छोट्याशा यशामूळे आम्ही गाफिल राहिलो नि तुम्ही सावराल असे धरून मधल्या उन्मादाकडे दुर्लक्ष केले. पण तसे होणे नव्हते. आणि आज प्रुथ्वी वाचवण्यासाठी तुम्ही इथे आलात. आम्हीही त्याच कारणासाठी इथे आहोत."
सर्व जण फदिल काय सांगतोय ते समजून घ्यायचा प्रय्त्न करत होते.
"ह्या सर्वांचे आम्हाला काय देणे घेणे म्हणता ? well, तुमचा प्रुथ्वी ग्रह नि आमची सिरियस A ची तारकामाला ह्या quantum entanglement मधे आहेत. तुमच्या विनाशामधे आम्हीही अडकलो आहोत. 'आमचा विनाश होईल' कि 'आमचे अस्तित्व आहे त्या स्वरुपात नष्ट होईल' कि 'काहीच होणार नाही' कि 'एक नवे विश्व तिथून सुरू होईल' हे ती घटना होईतो ठरणार नाही. ह्यातून बाहेर पडण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे आपली quantum entanglement नष्ट करणे. आमची तत्वे आम्हाला तसे करू देत नाहित. तुमचे तारणहार म्हणून एकदा सूत्र हाती घेतल्यावर तुम्हाला वार्‍यावर सोडता येत नाही. आमच्यात असे काही जण आहेत ज्यांना खरे तर तसेच करायचे आहे. पण आमच्यात बर्‍याच जणांची हि धारणा आहे कि आमच्या अस्तित्वाचा एक अंश तुमच्या श्रद्धेचाच भाग आहे. कदाचित ती quantum entanglement अशीच असेल. कोणी सांगावे ?
मग अर्थात एकच उपाय उरतोय, तो हाच कि, ह्या संपूर्ण घटनाक्रमाला असे वळण द्यायचे कि तुम्ही ज्या वर्तमानातून आला आहात तो अस्तित्वातच येता कामा नये. space time curvature चा वापर करून "

===
आशिष, तुझ्या आवडत्या विषयाचा झब्बू Happy

सिमन्तिनी, मला वाटतं, आश्चिग काळात पुढे मागे करतोय.. नवीन पात्र...

रुमाल कढलाअ... लॅक ऑफ टाईम 4 typing 4 now...
सेल्फ डिस्ट्रकिव बदल कसा करणार पास्ट मधे , asaamee?
parallel universe?

सेल्फ डिस्ट्रकिव बदल कसा करणार पास्ट मधे , asaamee? parallel universe? >> मी तरी तसाच करणार होतो. one more fork. किंवा असेच वार्‍यावर सोडुन द्या. असे कुठे लिहिलय कि अर्थ वाचवायलाच हवी असे ? Fadil breaks quantum entangelement and humans are still waiting for their Gods.

८) स्थळ, काळ, वेळेचं भान ठेवावं. >> Time Travel STY मधे हा नियम काय करतोय ? Happy

सगळ्यांना रजनीकांत आठवतात,,,, Wink
कथा इतकी फिरली आहे की आता यातून थलैवा रजनीकांत च मार्ग दाखवू शकतात,,,
इंन्नोले बोट्टी बौट्टी कार मुत्तुले
पौर हौसी नारी ईंजूक्ले ,,, मारी तुट्टा क्वारी वूक्ता,, अप्पोडीइंजी वरील्लींगे,,, थलैवा,,,,,

दिमित्रीला कोण्या एका गोष्टीने जर जिंकले असेल तर ती होती त्यांचा साधेपणा. त्यांच्या या उपद्व्यापी प्रकारामुळे ते परतु शकणार होते त्यांच्या मृत्युशय्येवर असणाऱ्या पृथ्वीकडे, पण दिमित्रीला मात्र जावे लागणार होते पार ३५०० भूतकाळात. डेव्हनी त्याला सगळे समजावले होते. कालप्रवास, त्यासाठी लागणारी प्रचंड उर्जा, कालप्रवाहाला जााणारा तडा, भौतिकींना भेटण्याची entangled आवश्यकता, तिथे होणारे ईजिप्शीयन महाभारत, आणि त्या रामायणातून होणारी सितामाईच्या माईची अखंड जिवनगाथा.

dimitri2.png

Successively Evolved Visualizer, अर्थात SEV नी बनवलेल्या ३D printer सदृष्य यंत्राने दिमित्रीच्या तुंगस्कास्थीत घराच्या मागच्या अंगणात बनवलेल्या कालयंत्राभोवती नील आणि वेद यांनी अनेक खनीज रचून ठेवली होती. केवळ अशनींमध्ये आढळणारे हे प्रकार हेच कालयंत्राचे इंधन. डेंजर असे लिहीले नसले तरी डेंजरस वाटणारे ते लाल बटन दाबताच भयानक स्फोट होऊन एकाच वेळी वैशयन आदी ३०२२ कडे रवाना होणार होते तर दिमित्री पिरॅमिड्स कडे. त्यांनी सांगीतलेले खरे असेल तर. पृथ्वी योग्य स्थितीत येताच डोळे गच्च मिटून दिमित्रीने ते बटन जनरल रिलेटीव्हिटीचे फॉर्म्युले म्हणत दाबले.

button.jpg

दिमित्रीने बटण दाबले खरे, पण काहीच झाले नाही. दिमित्री थोडा दचकला, पण तसेच डोळे मिटलेले ठेवत त्याने पुन्हा बटण दाबले! तरी काहीच नाही.. एक दोनदा जोर लावला, मग घट्ट मिटलेले डोळे टक्क उघडले आणि बटणावर हाताचे तळवे आपटू लागला. डँबिस SEV ने गंडवले का काय असा संशय येत असताना त्याच्या हाताच्या तळव्याने बटण उजवीकडे फिरले...
क्षणार्धात आजूबाजूचे तपमान वाढल्याचे जाणवून त्याने पुन्हा घट्ट डोळे मिटून घेतले आणि स्फोटाची प्रतिक्षा करत बसून राहिला.

---

पुन्हा आपले फदिल आणि हबिबी..
त्यांचा चेहरा तेजःपूंज दिसू लागला होता. त्यांच्या मागे एक झळाळी उमटू लागली होती. मनाला हेलकावे बसल्यासारखे वाटायला लागले होते. वैशयन, मांडील्य, मनू ला एकदम आपण महाभारतामधले 'संभवामी युगे युगे' म्हणणारे श्री कॄष्ण रुप पाहतोय असे वाटले. कालीला वज्रायन बोधिसत्वाचा भास होत होता. इतरांना तिथे Holy Trinity दिसत होती. कोणाला डोळ्यासमोर सहाचे तीन आकडे चमकल्याचाही भास झाला.
आजूबाजूच्या अवकाशाला एक भोवंड बसली असे वाटले नि परत सगळे normal झाले. फदिल तिथेच शांतपणे उभा होता.
"आत्ता नक्की काय झाले इथे ?"
"काही समजत नाही, आजूबाजूला नॉर्मल तर दिसतंय सगळं.." मनू म्हणाली.
फदिल आणि हबीबा एकमेकांकडे बघून मिश्किल हसले.

---

दिमित्रीला हळूहळू जाणीव होऊ लागली.. त्याला थकल्यासारखं वाटत होतं. त्यानं कष्टानं डोळे उघडायचा प्रयत्न केला. एका मऊशार आणि थंड सरफेसवर आपण पडलो आहोत अशी त्याला जाणीव झाली. आजूबाजूला वातावरणात हलकी हवा वाहतेय, डोळे उघडल्यावर समोर सूर्य उगवताना असतो तसा मंद प्रकाश पसरला आहे हे त्यानं पाहिलं आकाश निळंशार, निरभ्र होतं. हवा सुखद होती, त्याने दीर्घ श्वास घेतला. मग तो हळूहळू उठून बसला.

गवताच्या एका तुकड्यावर आपण येऊन पडलो आहोत हे त्याला कळलं. ३०२२ मधे जिथे आपण पोहचायला हवं होतं तशी तर ही जागा दिसत नव्हती.

छूमछुम.. मागून आवाज आला म्हणून त्यानं मागं वळून पाहिलं.

"ओ पावणं, कोन तुमी? हिथं काय करतायसा?" एक तरुण स्त्री डोक्यावर बास्केटसारखं काहीतरी आणि कमरेत एक पितळी भांडं घेऊन उभी असलेली त्याला दिसली. दिमित्रीला पाहून तिनंच हा प्रश्न विचारला होता.

Pages