मायबोली गणेशोत्सव २०१३: उपक्रम एस टी वाय : कथा ३. सेव्ह द अर्थ

Submitted by संयोजक on 31 August, 2013 - 08:11

एस टी वाय म्हणजे स्पिन द यार्न!
धागा गुंडाळा.
थोडक्यात,एक सुरूवात देऊन मग बाकीच्यांनी आपापल्या कल्पनाशक्तीने एखादी गोष्ट थोडी थोडी पुरी करावी.
एकेक सीन देत.

STY-KaCha-Chaitanya.jpg

लेखकः कवठीचाफा

कथा: सेव्ह द अर्थ

साल : ३०२२

स्थळ : सर्व्हाइवल आयलंड

तात्पुरत्या उभारलेल्या त्या तळावरची सगळी तयारी पूर्ण झालेली होती. काही तासांनीच ती टीम एका अतिमहत्वाकांक्षी मोहिमेवर निघणार होती. योजना होती `सेव्ह द अर्थ'. २०२५ च्या जागतिक महायुध्दानंतर एकवटलेल्या उर्वरीत पृथ्वीवरच्या समस्त मानव जमातीनं घेतलेला एक धाडसी निर्णय. शेवटी त्यांनाही काहीच पर्याय दिसत नव्हता. प्रमाणाबाहेर खनिजांचा उपसा, कारखान्यांनी केलेलं प्रदूषण आणि गेल्या शतकांतली अणुयुध्दे यांच्यामुळे रहाण्यासाठी कशीबशी सापडलेली ही सर्व्हाइवल आयलंड सोडली तर पृथ्वीवर कुठेच जमीन म्हणून शिल्लक राहिलेली नव्हती. या बेटांवरचं संख्याबळही घटत घटत काही हजारांवर येऊन ठेपलेलं होतं. वातावरण विरळ होत चाललेलं, जमिनीतून हिकमतीनं काढलेल्या खाण्यायोग्य पिकांचं प्रमाण कमी होत चाललेलं.

सगळ्या परिस्थितीतून एकच आशेचा किरण दिसत होता तो म्हणजे काळजीपूर्वक आखलेली समस्त मानवजातीची ही शेवटची मोहीम. मोहिमेवरच्या लोकांची निवडही तशीच काळजीपूर्वक करण्यात आलेली होती. एसइव्ही असं अर्थहीन नाव धारण करणारे अणुशास्त्रातले महारथी, काली हे प्राणीशास्त्रातले शास्त्रज्ञ, वैशयन रसायन शास्त्रातले, एस्-यू हे पदार्थ विज्ञानातले, वेद हा भूशास्त्रातला, मांडील्य हे खगोलशास्त्रातले, मनू हे उत्क्रांती विज्ञानातले, नील हे स्थापत्यशास्त्रातले आणि डेव्ह हा त्यांचा मार्गदर्शक, संरक्षक अशा भूमिका निभावणारा अंतराळवीर असे निवडक लोक आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर यंत्रसामुग्री यांच्यासह काही तासांनी मोहीम सुरू होणार होती. `सेव्ह द अर्थ'- एक महत्त्वाकांक्षी कालप्रवासाची मोहीम.

तिसर्‍या महायुद्धानंतर कित्येक वर्षांपासून ही कल्पना चर्चेत होती. मानवाला होणार्‍या भविष्यातल्या विनाशाची पूर्वकल्पना देऊन सावध करणं, त्यासाठी उलट्या दिशेने कालप्रवास करून त्याच्या अप्रगत काळात जाऊन त्याला प्रशिक्षित करणं. याकरिता कालावधीची निवडही झालेली होती.

सगळीच यंत्रणा एका भल्यामोठ्या यानावर बसवण्यात आलेली होती आणि अर्थात त्यासह कित्येक कोटी वर्षाचा कालप्रवास करण्यासाठी लागणारी प्रचंड ऊर्जा एसइव्ही यांच्या प्रयोगांतून अणूंचे विभक्तीकरण करून मिळवण्यात येणार होती.प्राथमिक गरज भागवण्यासाठी शिल्लक राहीलेल्या अण्वस्त्रांच्या वॉरहेडमधल्या प्लुटोनीयमचा वापर करण्यात येणार होता. कदाचित त्यामुळे ही शिल्लक राहीलेली मानवजात धोक्यात येण्याची शक्यताही होतीच पण यश मिळालं तर .... कल्पनातीत समृध्दी.

डेव्हनं यथायोग्य सेटींगवर शेवटची नजर टाकली आणि उरलेल्यांना इशारा केला. सगळ्यांनीच आपापल्या जागा घेतल्या, कालींनी त्यांनी प्रयोगशाळा पुन्हा तपासून घेतली अणि सिध्द असल्याचा इशारा केला.

प्रचंड थरथराट.. जमिनीवर कित्येक मैल लांब उभे राहून आपापल्या संरक्षित घुमटातून पहाणार्‍या उर्वरित लोकसंख्येलाही थरकाप भरवणारा प्रचंड थरथराट, क्षणोक्षणी वाढत जाणारा. लगेच काही मिनिटांनंतर समोरच्या तळावरून अकस्मात एक ऊर्जेची लाट सरसरत निघून गेली आणि त्यातून सावरेपर्यंत तळ रिकामा झालेला.

'सेव्ह द अर्थ' ची टीम तिच्या कार्यावर निघून गेली होती.

------------------------------------------------------------------------------------------------------------------

काय झालं पुढे ? ते त्यांच्या कार्यात यशस्वी झाले का ?

-------------------------------------
नियमावली :
१) कथेचा शेवट अतिरंजित चालेल, पण पटेल असा असावा. शेवट १८ सप्टेंबर २०१३ला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ पर्यंत व्हावा.
२) आपले शास्त्रज्ञ समंजस आहेत, त्यांना उगीच भांडायला लावून अपघात घडवू नये, इतर कारणानं घडलाच तर सगळ्यांना एकदम मारून शास्त्रज्ञांचा आणि पर्यायानं कथेचा शेवट करू नये. स्मित
३) शास्त्रज्ञ किमान एकदा तरी परत त्यांच्या वर्तमानकाळात आले पाहिजेत, मग परत भूतकाळात गेले तरी चालतील.
४) कथेत मानवी इतिहासाचा वापर केला तर उत्तम
५) आपण लिहिलेला प्रसंग आधीच्या प्रसंगाला पुढे नेणारा आणि सुसंगत असावा.
६) आधीच्याने लिहिलेला प्रसंग, 'हे सगळं स्वप्नात झालं' असं पुढच्याने म्हणून त्याची मेहनत वाया घालवू नये. थोडक्यात, स्वप्न पडणार असतील, तर ती अधिकृत ज्याची त्याने स्वतःच्या प्रसंगातच रंगवावी.
७) चारपेक्षा जास्त नवीन पात्रांचा एका प्रसंगात नव्याने परिचय करून देऊ नये.
८) स्थळ, काळ, वेळेचं भान ठेवावं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ना .. घरात पिटुकला एकुलता एक उंदीर शिरला तर माबो धावून धावून पोस्टी टाकतात. आता अक्ख्या पृथ्वीत नौ फ्युचरवाले शिरले तर कुठे गेली हि रुमाल टाकून??

डेव्ह चे बोलणे पूर्ण होते न होते तो, सिक्स पॅक क्रमांक १ च्या दिशेने खणखणीत आवाज आला.
"Gods of Sirius A welcome residents of future Earth"

...

नील! What on earth..

खणखणीत आवाजाच्या दिशेनं बघून डेव्हनं चमकून उद्गार काढले.

सोन्यानं मढलेला लांडा शर्ट घातलेल्या पुरुष आणि ती सुंदरी यांच्यासोबत नील त्याच्या सहकार्‍यांचं हसून स्वागत करत होता. नील त्यांच्यातला सर्वात शांत, अभ्यासू, कोणाच्या अध्यात मध्यात नसणारा म्हणून परिचित होता. आपलं काम चोख करत असे. त्यामुळं त्यानं सर्वांचा विश्वास संपादन केला होता. त्यालाच अचानक अश्या खणखणीत आवाजात बोलताना बघून, तेही अश्या "अवेळी" अनोळखी ठिकाणी, सगळेचजण बावचळून गेले.

"आपण अर्थ वरच आहोत डियर डेव्ह."

नीलनं तश्याच खणखणीत स्वरात पुढं बोलायला सुरुवात केली..

"माझ्या सहकार्‍यांनो, तुम्ही गोंधळून गेला आहात. पण मी जे काही सांगणार आहे ते नीट लक्ष देऊन ऐका. मी पडलो एक स्थापत्य तज्ज्ञ! कालप्रवास वगैरे माझ्यासाठी अगदीच कल्पनेपलिकडची गोष्ट. पण पिरॅमिड्सचा अभ्यास करताना त्याकाळातील लोकांबद्दल, संस्कृतीबद्दल माहिती मिळवत गेलो. ते त्या काळीही भलतेच प्रगत होते याची माहिती मला मिळाली. एक ग्रंथ चाळत असताना त्यांना भविष्यात होणार्‍या गोष्टींबद्दल कल्पना असणे आणि चुकीच्या, धोकादायक गोष्टी टाळण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू असणे याबद्दल माहिती मिळाली."

बोलत असताना खिशातून एक कागदाची घडी काढून ती हळूच उलगडून त्याने सर्वांना दाखवली- कागदावर एक आकृती आणि त्यावर काही चित्रं तसंच अगम्य लिपीतली, तीच काय ती archaic egyptian वगैरे असेल, अक्षरं होती.

save.PNG

"हे पाहिलंत! एका जुन्या ग्रंथात हे सापडलं."

मनूनं लगेच त्याचा अर्थ लावला आणि तिचे डोळे विस्फारले! त्याचा अर्थ होता "Save The Earth".

नील पुढे बोलू लागला..
"मला विश्वास वाटत होता की हेच लोक आपल्याला योग्य मार्ग दाखवतील. म्हणून डेव्ह आणि सू चे लक्ष नसताना मी सेटिंग बदलले आणि तुम्हां सर्वांना इथे आणले. हबीबा आणि फदिल आपल्याला इथे पाहून आनंदित झाले आहेत, मी त्यांच्याशी बोललोय. ते आपल्याला मदत करतील. दरम्यान आपण त्यांच्या पाहुणचाराचा स्वीकार करुया!"

हबीबा आणि फदिल! सोन्याचे कपडे आणि दागिन्यातले ते दोघे! नाईस, नाईस.. का ली दोघांकडे कौतुकमिश्रित आदरानं पाहू लागली. "पाहुणचार" शब्द ऐकून ती आनंदली कारण जरी ती पदार्थ विज्ञानातली कुशल असली तरी "पदार्थ" विज्ञानातही तिला रस होता, वेगवेगळे एशियन फ्यूजन पदार्थ करुन पहायची तिला आवड होती पण पृथ्वीवरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळं तिला इच्छा मारावी लागत होती. नीलमुळं हे लोक आपल्याला मदत करतील आणि लवकरच काही मार्ग निघेल याचाही तिला आनंद झाला आणि छुपा रुस्तुम म्हणून "लब्बाड कुठला!" असा एक कटाक्ष तिने नीलकडे टाकला.

वेड मात्र नीलकडे कमालीच्या संशयानं पहात होता..
..

फदिल - हबीबाला फ्युचर मधून आलेल्या मानवांचे फारसे कौतुक दिसले नाही! पण ते पडले राजा- राणी, अतिथींचं स्वागत करणं आलंच. अतिथी कंपनीने "सेव्ह द अर्थ" मिशन चे तुणतुणे वाजवले पुन्हा.
फदील साक्षात मठ्ठ भाव घेऊन काहीतरी हातवार्‍यांच्या आडून जांभई लपवत होता

pharoh.jpg

तर हबीबाच्या चेहर्‍यावर सरळ सरळ "व्हॉटेव्हर.....!" असे भाव दिसत होते!
hbiba2.jpg

शेवटी अतिथींची रवानगी झाली गेस्ट महालात आणि हबीबा - फदिल निघूल गेले.
नील च्या म्हणण्याप्रमाणे या लोकांच्या लायब्ररीत सेव्ह द अर्थ मिशन ला उपयोगी काही क्लू मिळायला हवे होते!
सिक्स पॅक १ किंवा २ ला विनंती करून लायब्ररी चा अ‍ॅक्सेस मिळतो का पाहू म्हणून नील निघाला. वेड ला एकून्ण प्रकरणाबद्दल जरा संशय असल्याने तोही बरोबर निघाला !

काही कारणांनी त्यांना फदिल आणि हबीबापुढे पुन्हा हजर केलं गेलं.. हबीबा आणि फदिल नं त्यांचे मुखवटे काढले...
डेव्ह फदिलकडे पुन्हा पुन्हा पहात राहिला..
मान हलवत "इम्पॉसिबल, इप्मॉसिबल" असं काहीतरी पुटपुटू लागला.. सू च्या कानात तो हळूच काहीतरी बोलला... "डेविड चिल्ड्रेस????" ती ओरडली
फदिल हसला.. "यू आर राईट! तुम्ही मला ओळखलत तर!"
पण "तुम्ही इथे? म्हणजे ते सगळं खरं होतं?".
डेव्ह ला भयंकर धक्का बसला होता. त्याच्या वडिलांचं आख्खं आयुष्य "एन्शियन्ट एलियन्सच्या" थेअरीतले लूपहोल्स शोधण्यात आणि त्यातला फोलपणा दाखवण्यात गेलेलं. एन्शियन्ट एलियन्स म्हणजे डेव्हच्या मते एक मोठाच विनोद होता.
"मीच नाही तर तुमच्या ओळखीचं आणखीनही कुणीतरी इथे आहे" हबीबा कडे बघून हसत फदिल म्हणाला.
सगळ्यांनी एकमेकांकडे प्रश्नचिन्हांकित चेहर्‍यानं पाहिलं.
"मांडिल्य, तू तरी मला ओळखशील असं मला वाटलेलं. कधी लग्नच करायचं झालं तर तू माझ्याशी लग्न करशील असं नुकतच नाही का तू तुझ्या आईला म्हणालास. नुकतच म्हणजे, तुमच्या दृष्टीनं Happy "
२०५० उजाडूनही भारतीयांच्यात मुलाचं लग्न ही आईवडिलांची जवाबदारी होती. निदान मांडिल्य ज्या प्रांतातून आला तिथे तरी. हबीबाच्या ह्या वाक्यानंतर सगळ्यांची नजर मांडिल्यकडे लागली. खगोलशास्त्रात अखंड बुडलेल्या, मुलींकडे वळूनही न बघणार्‍या ह्या शास्त्रज्ञाला हबीबा माहिती असावी आणि त्यानं तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करावी हे कुणाच्या पचनी पडेना.

स्वतः मांडिल्य मात्र डोळे विस्फारून बघत राहिला.
भूतकाळात जाताना अनपेक्षित समोर येणार हे माहित असूनही हा ट्विस्ट त्याला अगदीच अपेक्षित होता! मेनका? परवाच तर नव्हता का तो (विषय हसून साजरा करण्यासाठी) आईला म्हणाला की जर प्रत्यक्ष मेनका समोर आली तरच कदाचित माझी
तपश्चर्या भंग पावेल - आणि मग कदाचित मी लग्नाचा विचार करेन. पण मेनका आली तरच (खगोलशास्त्रज्ञ असलेला मांडिल्य अशा घरात वाढलेला की जिथे आजही वेदाध्ययन होत असे, पुराणांचं वाचन होत असे).

फदिल म्हणजे डेविड? हबीबा म्हणजेच मेनका? इथे नक्की काय चाललय? मग त्यांचा मगासचा कंटाळा/ इन्डिफरन्स? त्याचा अर्थ काय? आपल्याला पुन्हा इथे का बोलावलय? एम आय लूझिंग माय माईंड?

वेड आता मांडिल्य कडेही संशयानं बघायला लागला..

.

अश्चिग, तुम्ही पण लिहा ना! मज्जा येईल आणि टेक्निकली बरच काही वाचायला मिळेल.

आयेम मिसिंग विशालदादा हिअर!

मांडिल्यला खरोखर मेनका आवडायची. इंद्राशी एकनिष्ठ, पतीची भक्त पण पती सोडून गेल्यावर उगीच स्वतःच करीयर न सोडणारी. मेनकेने समोर न राहता ही प्रत्येक क्षणी शकुंतलेच आयुष्य घडवल, मांडिल्यला कधी मुल हवीशी वाटली तर त्यांची आई मेनकेसारखी असावी अस वाटायचं. पण ती अशी हबीबाच्या रुपात भेटेल हे त्याला नव्हते वाटले. वेद मात्र मांडिल्यचे रक्षण केले पाहिजे ह्या भावाने त्याच्याकडे बघत होता - "मान, भानावर ये. जगाचा इतिहास लक्षात घेतला तर भांडणे फक्त ३ कारणांसाठी होतात हे दिसते - जड (हिंदीतले रे), म्हणजे मालमत्ता जसे पेट्रोल, जोरू - दुसर्याची बायको हवीशी वाटणे, अगदी रामायण सोडून दे पण इथेच क्लीयोपात्राचे आयुष्य बघ आणि जमीन - अलेक्झांदर ते हिटलर सगळे ह्यात बसतात. ही महामाया कुठल्या गणितात बसते ते आधी शोधले पाहिजे. हि श्रीमंत, सुंदर आणि महत्त्वाकांक्षी दिसतीये. हिच्यामध्येच पृथ्वीच्या विनाशाची बीजे असणार". का ली ला मात्र ते अजिबात पटले नाही. उगीच कुणावर अशा बिनबुडाच्या शंका केवळ स्वतःला इतिहासात चांगले मार्क होते म्हणून! तिने वेडकडे दुर्लक्ष केले आणि नीलला लायब्ररी शोधायला ती मदत करू लागली.
का ली नील ला म्हणाली "ते निळे चित्र मगाशी दाखवलेलं बघून मला फार विचित्र शंका येत आहेत. आपण इथे उलटा काल प्रवास करून आलो हे आपण म्हणतोय. पण कदाचित ही मुळात ह्या लोकांची मिशन असेल. त्यांनी आपल्याला भविष्यात जाऊन संहार थांबवायला पाठवले असेल आणि आपण फेलीयर आहोत. आपण लूजर आहोत." का ली च्या डोळ्यात एक घोर निराशा दाटली. नील मात्र म्हणाला "शक्य आहे पण म्हणून ह्यांच्याकडे आणि आपल्याकडे तसा वेगळा ऑप्शन काय आहे? भूतकाळ आणि भविष्यकाळ ह्यांना एकत्र एका पातळीवर आणून समान ध्येयासाठी काम करायचे असेल तर कसे करावे? ? बघ आपल्या हातात फक्त हा वर्तमान आहे जिथे आपण फेलीयर नाही आणि ते पोटेन्शियल नाही. आपण सगळे समान. का, आधुनिक ३ रे महायुद्ध पेटायला 'जड' मालमत्ता हे प्रमुख कारण होते. जर पुरेसे पेट्रोल/इंधन असते तर हे टाळता आले असते. का, ह्या वर्तमानात लक्ष दे आणि एखादा प्राणी, कीटक, अमिबा काही काही सापडतय का बघ की हे आपल्याला इंधन म्हणून अनेक वर्ष वापरता येईल". नीलचा हा आशावाद नेहमीच इन्फेक्शियस असायचा. का ली लायब्ररीची इमारत शोधू लागली.

मै, भाव बरोबर पकडलेत. Wink
नानबा, सिमन्तिनी Proud

आस्चिग, हो माहिताय. संयोजकांनी वर लिहिलेलं वाचलंय.
तू सूचना का देतोयस?

का ली , वेड अन नील आपापसात विचार विनिमय करात होते...
"हे हबीबा अन फदील डेव्हिड अन मेनका कसे असतील !! मगाशी तर बोर होत असल्यासारखा चेहरा करून गेले इथून!"
"अन डेविड आता या काळात कसा भेटेल इथे? मेनका तरी कशी इथे येणार ?"
लोक्स, मला समजलेय काय होतेय ते.... "मागून सेव चा आवाज आला...
" हे भूतकाळातले लोक जामच अ‍ॅडवान्स्ड निघाले! त्यांनी नुसतेच न विचारता आपण कोण कुठले ते ओळखलेय इतकेच नाही तर आपले वीक पॉइन्ट्स, व्यक्तिमत्त्व इ. पण रेझनेबली समजून घेतलेत!!"
"वॉत दु यु मीन अं?" - का ली
"का ली, सिंपल आहे, हॉलोग्राम!! मगाशी आपल्याशी पहिल्या भेटीतच त्यांनी आपले स्कॅनिंग करून आपण कुठल्या काळातून आलोय ते ओळखले. मला वाटते आपल्या सबकॉन्शस माइन्ड मधले विचार पण त्यांना कळतायत!! म्हणूनच डेव्ह चा मनात चाललेला एन्शन्ट एलियन थिअरीचा विचार अन त्यातून डेविद चिल्ड्रेस ची आठवण वापरून डेव्ह ला त्यांनी चिल्ड्रेस चा हॉलोग्राम दाखवला अन मांडिल्याला हबीबाला बघून मेनकेचे विचार मनात अले नसल्यास नवल! बरोब्बर मेनका दिसली त्याला!"
"ऑह माय गॉड! यु आर सो राइट" - डेव्ह उद्गारला!
"छ्या मी काय मेनकेचा विचार करत नव्हतो बर का.. .." - मांडिल्याने सारवा सारव केली पण सगळ्यांना काय ते कळलेच Happy

बर ते जाऊ देत , सो बॅक टु मिशन - पुढच्या विनाशाची बीजं नक्की कोणती? त्यातले आपल्याला काय बदलता , टाळता येईल ?

तेवढ्यात दोन लहान गोड मुले पळत आली.
kids.JPG
मनूने पुढे होउन बरोबरच्या सिक्स पॅक गार्ड ला त्यांची नावे विचारली
"हे युवराज रामसिस अन हा दुसरा मोझेस ! रामेसिस हा फदिल्साहेबांचा मुलगा आणि मोझेस बाबा ला दत्तक घेतलेय हबीबा मॅडम नी. इथे पिरॅमिड च्या कामावर असलेल्यांपैकी कुणाचा तरी पोरगा. हबीबा मॅडम फार दयाळू बघा"
"ओ माय गॉड! " सु उद्गारली !! "आपल्या समोर साक्षात मोझेस अन रामेसिस आहेत!! गेट इट ??? दि रामसिस आणि दि मोझेस !! यांच्यातल्या भांडणांमुळेच तर पुढे मोझेस 'आपल्या लोकांना' इथून घेऊन गेला अन इस्रायल वॉज बॉर्न , रिमेम्बर ???!!"
डेव्ह एक्साइट होऊन ओरडलाच ... " ओ माय गॉड! आर यु ऑल थिंकिंग व्हॉट आय अ‍ॅम थिंकिंग!!!"
सगळे स्ट्न्ड होउन एकमेकाकडे पहात होते! सगळ्यांनाच ते स्ट्राइक झाले होते ........

पळत आलेली लहान दोन मुले Lol (सुरुवात सोडता) कथाविस्तार कुठलेच वाचले नाहीयेत, त्यामुळे त्यावर भाष्य करत नाही..

मस्त चाललीये स्टोरी.
पण ते हबिबा आणि इतर लोक इतके अ‍ॅडव्हान्स असतात तर ते फ्युचर बदलायला काही करत नाहीत का? ते पण लिहा ना.

सावली, एवढे प्रचंड लॉजिकल एस्टिवाय वाल्यांना लिहायला जमत असते तर तेच कादंबरीकार झाले असते ना Happy Happy
बर आता ते इस्त्रायल अस्तित्वात येऊ द्यायचे का नाही ते ठरवा. दी एन्ड करायला बरा ऑप्शन वाटला तो Happy

पण ते हबिबा आणि इतर लोक इतके अ‍ॅडव्हान्स असतात तर ते फ्युचर बदलायला काही करत नाहीत का? ते पण लिहा ना. >> अग, केल त्यांनी काहीतरी पण ते मांडिल्य, का ली तेच लोक फेलीयर होते. हबीबा लोकांचा प्लान का ली लोकांना नाय धड जमला आता आलेत परत भूतकाळात. हबीबा लोकांचा प्लान काय होता - ते हह ला साकडे घालावे लागणार दिसतय...

मै दोन दिवस आहेत दि एंड करायला, आतापासून काय?? हे तर नोकरी लागल्या दिवशी रिटायरमेंट फंडात पैसे भरा सांगणाऱ्या लोकांसारख झाल. नोकरी लागली, आधी पार्टी करा. एसतीवाय आल, आधी कथा पार गोंधळ कर,, जरा मजा करा Wink Happy

अरे १८ ला दि एन्ड ... म्हणजे भारतात उद्या, म्हणजे अमेरिकेतल्या आजच !! >>> Happy हे काय, भारतात आधी १८ येते. चला मी कोफी करते....

अमेरिकन वेळेनुसार (सिएटल) अजून उद्या रात्रीपर्यंत लिहिता येईल - ३६ तास असावेत अजून...

शेवट १८ सप्टेंबर २०१३ला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ पर्यंत व्हावा.
असे वर लिहिले आहे. सो प्रॅक्टिकली आजचा दिवसच मिळणार ना? अनलेस, देशातल्या कुणी सक्काळी सक्काळी शेवट लिहिणार असेल तर....

हायला.... लागेल की मग इस्रायेल... मानल हा मैत्रेयी...
आज रात्री १०.३० पर्यंत लिहायचं पासिफिक अमेरिकन जनतेने ...

Pages