स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बीडाचे अप्पेपात्र नीट सीझन केले असेल तर फार तेल लागत नाही. १/२ टीस्पून प्रत्येक खळग्यात सुरुवातीला टाकले की तेवढ्या तेलात दोन बॅचेस होतात.

मी अखेर एक जाड उभा डबा - ज्याचं झाकण वरच्यावर सहज उचलता येईल आणि पुन्हा डब्यावर ठेवता येईल आणि त्यात उभ्या दांड्याचा खोल चमचा राहिल (आणि तरीही डब्याचं झाकण लागेल) - चमच्याचा टोकाशी आकार उलट्या U चा आहे - अश्या व्यवस्थेशी जुळवून घेतलम आहे. +111
हीच आदर्श व्यवस्था आहे माझ्यामते. एकतर तेल मोजून वापरता येते. आणि डबा असल्यामुळे सरळ सरळ घासायला टाकता येतो

अमेरिकेत कुठला वॉटर प्युरीफायर वापरावा? मी सध्या प्युरचा पीचर वापरत आहे. पण तो BPA-free नाही असे कळले.
एका मैत्रीणीने मावे सांगितलेय. डॉ. ओझच्या साईट्वर जाऊनही फारसे लक्शात येत नाहिये.

एक हार्ड अ‍ॅनोडाईझ तवा गिफ्ट दिलाय. भाकरी चपाती पण खुप चिकटते त्यावर. तो कसा वापरावा?
मला प्रेशर कुकर घ्यायचाय. फ्युचुराच्या प्रेशर कुकर मध्ये हार्ड अ‍ॅनोडाईझ , स्टेनलेस स्टील यापैकी कुठला घ्यावा सांगु शकाल का?
हार्ड अ‍ॅनोडाईझ म्हणजे अ‍ॅल्युमिनीयमवर नॉनस्टीक कोटींग केले जाते का?
Hawkins Ventura आणी Ekobase मध्ये काय फरक आहे ... कोणी वापरलेय का?

स्लो कुकरबद्दल माहिती हवी आहे.
आतले भांडे स्टोव्ह्वरही ठेवता येते अशा प्रकारचे स्लो कुकर बाजारात बघितले आहेत. त्यांची किंमत जास्त असली तरी आपल्या पद्धतीचे पदार्थ करताना फोडण्या करणे, मसाला/ कांदा / कडधान्ये/ तांदूळ / मांस आधी परतून मग शिजवणे यासाठी ते उपयुक्त ठरेल असे वाटते.
कोणी वापरले आहेत का? कितपत उपयोग होतो?

नवीन पॉप अप टोस्टर घ्यायचा आहे?
कोणत्या कंपनीचा आणि कोणते मॉडेल चांगले आहे?
ब्रेड एकदम कुरकुरीत टोस्ट झालेला आवडतो मला.
सध्या माझ्याकडे जो आहे त्यात टोस्ट चिवट आणि कडा कडक असे काहीतरी विचित्र होते.

electric stove वर फुलके किवा चपात्या होतिल का?>> होतात.मात्र त्यासाठी इं ग्रो किवा टार्गेट मध्ये मेटल रॅक मिळते ते वापरावे लागते

मला डक्ट नसलेल्या चिमनी बद्दल माहिती हवी आहे... कुणी सांगेल का?( kitchen chimney /kitchen hood). दुकानात इतके ब्रँड आहेत आहेत की कन्फ्युज व्हायला झालय.कृपया कोणी माहिती देऊ शकेल का?

hindalium, aluminium ani german silver he tin prakar kase olkhayache? hyapaiki changale kay aste? mala kadhai ghyayachiye rojachya vaparasathi..pan konati ghyayachi he mahit nahi....koni mahiti dyal ka?

अल्डा नावाच्या ब्रँडची उ त्तम उत्पादने सर्व प्रकारची भांडी, बेकवेअर इत्यादी आता भारतात उपलब्ध आहे.


Happy तेलचे ओघळ येत नाही. फक्त तेल त्यात ओतणे थोड वेळ खाऊ आहे त्यासाठी चाडी वापरता येईल. माझ्या बहिणीने सगळ्या प्रकारचे कावळे वापरून झाल्यावर तिला सापडलेली ही युक्ती तुम्हा आम्हा सर्वांच्या उपयोगी पडो Happy

मंजू, तेलासाठी वापरलेले कंटेनर/बाटली फुड सेफ आहे का? याची नक्की खात्री करुन घ्या.>>> ते बहितेक डिटर्जंट चे आहे. काय राव तुम्ही Uhoh

मागच्या महिण्यात एक विषबाधा झालेले प्रकरण एक पेपरमध्ये वाचले होते. एका डॉ. लिहले होते. एका लग्नसमारंभात जेवण झाल्या झाल्या लोकांना उलट्या सुरु झाल्या. डॉ. कॉमन गोष्टी शोधण्याचा प्रयत्न केल्यावर तुप ही गोष्ट कॉमन निघाली. शेवटी तुपाचा डब्बा आणायला सांगितला. तर तुप हे एका किटकनाशकाच्या ड्ब्यात ठेवले होते. आचार्‍याने सांगितले कि तो डबा स्वच्छ धुवुन घेतला होता. पण ही किटकनाशके तेलात विद्राव्य असतात. आणि त्यामुळे विषबाधा झाली होती.

वाचल्यावर वाटले होते कि असे कसे काय कोनताही ड्ब्बा कशासाठीही वापरत असेल ?

रच्याकने किटकनाशके ही खुप विषारी असतात त्यामुळे त्या बाटल्यांची तोंडे देखिल हल्ली ओघळ येउ नये अशिच डिझाइन केली जातात.

फ्रूट कार्व्हिंग टुल किट कुठलं घ्यावं ? ऑनलाइन बरीच व्हरायटी आहे. कुणी स्वतः वापरलेलं असल्यास सांगा प्लीज.

सिंडी पम्पकीनसाठी पाहात असशील आणि आधी कार्व्हिंग केलं नसशील तर आमच्यासारखं डॉलरशॉप सारखं सस्तावाला वापरून पाहू शकतेस... Wink
लाँग टर्म आणि नेहमीच पार्टी सजावटीसाठी असेल तर मग तुला इकडच्या प्रो.चं मार्गदर्शन मिळेलच...

धनश्रीने मागच्या वर्षी कार्व्हिंग केलं होतं असं वाटतंय. तिला पण विचारून बघ. Happy

भोपळे झालेत कोरून Happy हे एका आर्टि-क्राफ्टि मैत्रिणीला द्यायचंय. म्हणून जरा विचारून द्यावं म्हंटलं.

Pages