स्लो कुकरमधे करण्याच्या पाककृती

स्लो कुकरमधे करण्याच्या पाककृती

या अगोदरचे हितगुज इथे पहा.


(जुन्या विभागातला पूर्वा यांचा संदेश)
Poorva
Friday, July 11, 2008 - 9:10 pm:
Dinesh, Slow cooker madhye bhajya kashya karavya? Rassa bhajya ki koradya?
Mhanje sakali 5 vajata sandhyakalchi bhaji karun fridge madhye thevun jate sadhya, slow cooker madhye theun gele tar mulanna garamagaram khayala milel asa vichar kela.
Orchid, moogacha shira pan sanga.



काहि मर्यादीत प्रमाणात स्लो कूकरमधे तेल तापवून फोडणी वगैरे करता येते. मर्यादेपेक्षा तपमान वाढले, तर बहुतेक कुकर आपोआप बंद होतात.
मग त्यात रस्सा भाज्या करताना आधी भाज्या आणि मग ग्रेव्हीचा मसाला वगैरे टाकायचा. तेलाशिवाय केल्या तर फारच उत्तम आणि फोडणी त्यात न करता वेगळी करुन वरुन घातली तरी छान.
आधी भाज्या करुन ठेवल्या असतील तर त्या या कुकरमधे पाणी घालुन त्यात भाज्यांची भांडी ठेवुन गरमहि करता येतात. यावेळी दोन तीन पदार्थ गरम करता येतात.
या कुकरमधे आपोआप बंद व्हायची सोय असतेच.
भाज्यात डाळ वगैरे असेल तर ती आधी भिजवून घेतली तर छान. एरवीही कुठलीही डाळ शिजवायची आधी भिजवून ठेवली तर लवकर शिजते.