मी सर्वप्रथम हे स्पष्ट करतो कि हा बाफ भारतात परतणा-यांचे जे अनुभव इथल्या लोकांना येतात त्यांच्यासाठी आहे. इथल्या लोकांचे काय अनुभव आहेत हे जाणून घेण्यासाठी हा बाफ आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा यात प्रयत्न नाही.
भारतातून परदेशात जाण्याची अनेक कारणे असू शकतात. कुणी कुठे जावे याबद्दल कुणाला आक्षेप असण्याचं कारण नाही. देशप्रेम वगैरे गोष्टी बाजूला ठेवल्या कि संधीच्या शोधात जाणे हे आपण समजू शकतो. पण याच लोकांनी आपलं तिथलं काम संपल्यानंतर भारतात परतताना भारतियांना नावे ठेवणे हे कितपत योग्य आहे ? गावाकडच्या एखाद्या कुटुंबातल्या एखादा सदस्य शहरात जाऊन राहतो तेव्हां त्याचं बरं चाललय ना म्हणून कुणी त्याला रोखत नाही. हा सदस्य हुषार, चुणचुणीत असतो. शहरात राहून पुन्हा गावाची ओढ लागल्यावर तो गावाकडे परतायचा निर्णय घेतो आणि आल्यानंतर गावातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींबद्दल तक्रारी करू लागतो. सुरुवात अर्थातच संडास बाथरूमची सोय नसण्याने होते. गावाकडचे लोक भांबावतात. सुरुवातीला नवं काहीतरी ऐकायला मिळतंय म्हणून भक्तिभावाने ऐकतातही. पण दुस-या गावातल्या अशाच कुटुंबात असाच अनुभव आल्याच लक्षात येतं. गावात सुविधा मिळत नाहीत म्हणून बसता उठता चीडचीड करणारा हा सदस्य चांगली तीन चार वर्षे झाली तरी रूळतही नाही, प्रतही जात नाही आणि बदल व्हावेत म्हणून स्वतःही काही करत नाही आणि कसे करावे याबद्दल सांगतही नाही यामुळे नाही म्हटलं तरी घरचे इतर लोक हळूहळू चिडू लागतात. शेवटी कुणीतरी विचारतचं तू इथून जाण्यापूर्वी तुला गावात काय असतं याबद्दल कल्पना नव्हती का ? मग आता आल्यावर का स्वतःला आणि इतरांना त्रास देतोस ? तू आल्याबरोबर अचानक गाव कसं बदलेल ? तुला शहरातल्या सुधारणा इथे आणायच्या असतील तर तू पुढाकार घे , आम्ही आहोत तुझ्यासोबत..
गावोगावी असे परतणारे लोक असतात. त्यातले काही गाववाल्यांच्या आवाहनाचा अर्थ समजावून घेवून आपणही काही देणं लागतो या भावनेने यथाशक्य काम करतात. ज्यांना शक्य नाही त्यांची चीडचीड कमी होते. पण काहीं यातलं काहीच न करता गावाला कर देतोय ना मी मग मला शहरातल्या सुविधा इथं मिळायला काय हरकत आहे ? तुम्ही नागरीक म्हणून कधी सुधारणार हे पालुपद चालूच ठेवतो.
परदेशातून भारतात परतणा-यांचेही असे वेगवेगळे अनुभव येतात. त्यात मुख्यत्वे आम्हाला इथे आल्यावर किती त्रास होतो हा आरोप असतो. तेव्हां आपल्याला असेच प्रश्न पडतात. परतण्याच्या आधी या लोकांना काहीच कल्पना नव्हती का ? याच देशातून गेलेले असल्याने इथल्या अडचणींबद्दल अनभिज्ञ असल्याच्या थाटात काहिंचे चिडणे, आदळआपट करणे हे समजण्याप्लिकडे असते. यातले काही लवकरच रूळतात. अॅडजस्ट करून घेतात. पण तीन चार वर्षे झाल्यानंतरही नकारात्मक अनुभवांचा पाढा वाचणा-यांबद्दल इथल्यांना आश्चर्य का वाटू नये ? इथे लोकांना सिव्हीक सेन्स नाही हे कुणीच अमान्य करत नाही. पण तो बदलण्यासाठी काहीही न करता निव्वळ टीका करण्याच्या वृत्तीबद्दल भारतियांना काय वाटतं ? मुळात सगळेच भारतिय समाजाच्या बदलण्यासाठी काही झपाटून कार्य करताहेत असं अजिबात नाही. पण रहदारी सुधारण्यासाठी काम करणारी संस्था आहे, हे लोक टॅक्सपेयरही आहेत आणि तरीही सामाजिक बांधिलकी म्हणून बदल होण्यासाठी काम करतात. पर्यावरणाच्या -हासासाठी काम करणारे लोक आहेत. अंधश्रद्धा कमी व्हाव्यात म्हणून काम करणारे लोक आहेत. शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून काम करणारे लोक आहेत. जातीयतेच्या विरुद्ध काम करणारे लोक आहेत. कष्टक-यांसाठी लढे देणारे लोक आहेत. आपापले काम सांभाळून, कर भरूनही असे काम करणारी लोक जगात सर्वत्र आहेत. त्यातूनच देश घडतात. युरोप अमेरिकेतल्या सुविधांचे गोडवे गाणा-यांनी ते नक्कीच गावेत. पण हे देश या स्टेजला पोहोचण्यासाठी त्यांच्याकडे जे काही बदल झाले असतील, संक्रमणे झाले असतील त्यात आपल्या या भारतियांचं योगदान किती ? ते तिथं गेले तेव्हा ऑलरेडी या सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध होत्या, एक प्रगत समाज त्यांना दिसत होता.
आता भारतात परतल्यावर यांना ठळक बदल जाणवायला लागले म्हणून बदल कसे होणार ? या बदलायच्या प्रोसेसबद्दल त्यांना काही एक ऐकून घ्यायचं नसतं (अपवाद अर्थात आहेत). फक्त चिडचिड करायची असते. याट रस्त्यावर थुंकणे, रहदारीचा बट्ट्याबोळ, वेळ न पाळणे, रस्त्यावरचे खड्डे आदी बाबींचा समावेश असतो. सरकारी भ्रष्टाचाराबद्दल तर इथलेही लोक हैराण आहेत. पण तुम्ही कसे काय राहता बुवा या घाणीत हा सूर ब-याच जणांमधे आढळतो. मग हा परत का जात नाही हा प्रश्न मनात उभा राहतो. पण त्याच्याचसारखं स्पष्ट विचारलं कि तुम्ही न बदलणारे, टीका सहन न होणारे ठरता.
थोडक्यात हे अंगाला तेल लावून आलेले पहिलवान असतात. हे कुस्तीचा आव आणणार पण कुठेच तावडीत सापडणार नाहीत. याउलट कधीही असुविधा न पाहीलेले अमेरिकन्स / युरोपियन्स कसलीही कुरकुर न करता इथल्या अनुभवांना सामोरे जाताना दिसतात. प्रसंगी त्यात बदल घडवून आणतात. उत्तरांचल मध्ये झालेल्या अभूतपूर्व संकटानंतर भारतियांनी केलेला कचरा साफ करण्यासाठी एक ब्रीटीश मुलगी तिथे येऊन कचरा स्वतः साफ करू लागली. तिला असं काम करताना पाहून स्थानिकांना योग्य संदेश गेला. ते देखील तिच्या कार्यात सहभागी झाले. सरतेशेवटी हे आपलं काम ती करतीये या जाणिवेने रिलीफ कँप आणि लगतचा परीसर स्वच्छ झाला. नुसत्या टीका करणा-या सोकॉल्ड फॉरिन रिटर्न्र्ड मंडळींच्या पार्श्वभूमीवर हा अनुभव आश्वासक नाही का ? त्या मुलीला तिच्या देशात आणि आपल्या देशात असलेला फरक जाणवला नसेल का ? कि ती टीका करत बसली.
ते देश प्रगत असण्याचं कारण म्हणजे परिस्थिती कशी बद्लावी याचं त्यांना असलेलं भान हे होय. स्वतःपासून सुरुवात केल्याशिवाय बदलाला सुरूवात होत नाही हे तिला माहीत आहे.
- इराणमधे गेलेल्या एका अमेरिकन महीलेने तिथल्या अस्वच्छतेबद्दल तक्रार न करता स्वतः झाडू आणि पोछा घेऊन संडास बाथरूम साफ करण्यापासून स्वच्छतेला सुरुवात केली.
- इथे काही ऑटोमोबाईल कंपन्यांमधे काम करणारे अधिकारी आहेत. यायच्या जायच्या रत्स्यावर लागण-या जामचे कारण शोधून काढून एका चौकातल्या व्यावसायिकांना थोडे मागे हटून चौक मोकळा करण्यासाठी त्यांनी आर्थिक आणि इतर मदत केली.
- माझ्या मित्राने शिरूर तालुक्यातल्या स्वच्छ पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्यासाठी रिक्षावर पाणी स्वच्छ करण्याची यंत्रणा उभारली. या उपक्रमाचं ट्रेनिंगही ते केंद्र सरकारच्या सहाय्याने देत असतो. त्याच्या या पायलट प्रकल्पाचा मी देखील एक हिस्सा आहे. अशा काही उपक्रमामधे अनेक भारतीय असतात जे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करीत असतात. स्वतःबद्दल खरं तर लिहू नये या मताचा मी आहे.
- याच मित्राचं आणखी एक मोठं काम आहे. कारखान्यालगतच्या गावांमधे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देऊन रोजगार दिला. वैशिष्ट्य म्हणजे बचत गटाच्या सर्व महिलांना संधी मिळावी म्हणून आठ तासांची शिफ्ट स्पेशल केस म्हणून चार चार तासांच्या दोन टप्प्यात केली आणि पहिल्या शिफ्टमधे काहींना आणि दुस-या शिफ्टमधे काहिंना सामावून घेतले.
- अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यात सक्रीय सहभाग. त्याची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला होता, पण एकंदरीतच या प्रसिद्धीच्या प्रकाराला त्याचा नकार आहे.
- सातारा तालुक्यातल्या एका निवृत्त शिक्षकाने आपली ग्रॅच्युइटीची रक्कम आणि पेन्शन विकून येणारी रक्कम खर्चून अनाथ आणि अतिमागास मुलांसाठी वसतीगृहे बांधली. रयतच्या परंपरेत बसणारं हे काम आहे.
- नगर जिल्ह्यात एका शेतक-याने ३३ वर्षे राबून डोंगर फोडून एकट्याने रस्ता केला. या रस्त्यामुळे गावक-यांचा तेवीस किमीचा वेढा वाचला. शासनाला बोल लावून अनेक ठिकाणी प्रश्न प्रलंबित असताना या ग्रामस्थाला बोल लावले नाहीत म्हणून दोष द्यायचा कि एव्हढे मोठे काम करूनही लोकांना तो फ्री वापरावयास दिल्यावद्दल सत्कार करायचा ? अशाच प्रकारे अनेक ठिकाणी श्रमदानातून पाणतळी, रस्ते अशी कामं झाल्याची अनेक उदाहरणं आहेत.
- आठवतील तशी उदाहरणं इथे अपडेट करीनच.
ही गोष्ट ऐकूनही न घेणा-या, आपला देश काय आहे आणि कुठे आहे याचं भान विसरलेल्या आणि पैसे फेकतोय ना मग या सुविधा का मिळत नाहीत असा सूर अस्णा-या भारतियांबद्दल काय वाटते ? ज्यांना काँट्रीब्यूट करायची इच्छा नाही त्यांच्या येण्याने इतरांना काही फरक पडणार आहे असं वाटतं का ? किमान आपल्याला ज्या देशात परतायचं आहे तिथे मिळून मिसळून राहून चांगले बदल घडवूयात हा बेसिक विचार करता न येणा-यांच्या स्वागतासाठी कुणी उत्सुक असेल का ?
( सकारात्मक रित्या भारतात परतणारे लोक आहेत. त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मनापासून माफी मागतो).
लोकहो, कृपया खालील मुद्यांचा विचार करावा.
१. धागा परतोनि पाहे मधून कोतबो ग्रुपमधे हलवण्यात आलेला आहे.
२. पूर्ण वाचल्याशिवाय प्रतिसाद देऊ नयेत. द्विरुक्ती होण्याची शक्यता आहे.
३. दुस-या कुठयाही धाग्याचा विचार या धाग्यावर करण्याची आवश्यकता नाही. हा विषय स्वतंत्र आहे.
गाडीवरचे स्क्रॅचेस. भरपूर
गाडीवरचे स्क्रॅचेस.
भरपूर वर्षांपूर्वी एक नवी कोरी मारूती विकत घेतली होती.
नोव्हेंबरचा महिना. गुलाबी थंडी.
पहिली गाडी.
किती कौतुक असते हे सगळ्यांना ठाऊक आहे. असा मस्त डार्क हीना कलर.
संध्याकाळी गाडी आणली.
सकाळी उठून पहातो तो बॉनेटवर अनेक ओरखडे!
समोर!!
दुसर्या संध्याकाळी कारण दिसले.
बॉनेट गरम असते. कॉलनीतली भटकी कुत्री त्यावर चढून उब मिळवण्याचा प्रयत्न करीत होती. त्यांच्या नखांचे ते ओरखडे होते.
त्यांना बंदूकीने गोळ्या घालाव्यात का?
'स्लीप ऑन इट'>> म्हणजे जाब
'स्लीप ऑन इट'>> म्हणजे जाब विचारणे? त्याला सल्ला म्हणतात्(ओपिनिअन...)
इब्लिस मस्त पोस्ट. कारणांचा
इब्लिस
मस्त पोस्ट. कारणांचा शोध घेतला कि उपाय सापडतात, नाही का ?
माझा देश आहे, मी परतेन नाहीतर
माझा देश आहे, मी परतेन नाहीतर काहीही करेन, कोणाच्या आमंत्रणत्रिकेची काय गरज? असो. गुड नाइट.
<<
परत सहमत.
पण 'ते' तसे बोलत नाहियेत.
तो 'स्लीप ऑन इट' काय सांगतो?
डोळेच बंद करायचे असतील तर करा
कोणी एकाने पार्किंगमध्ये गाडी
कोणी एकाने पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आहे- टू विलरचे टायर पंक्चर करुन ठेवलेले आहे. एकदा रिपेअर करून आणले, दोनदा आणले, तिसर्यांदा परत तेच.
>>>
हे असे 'पंक्चर' करायला कोणाकडे एवढा वेळ आहे? मला खरच प्रश्न पडला आहे. कधीतरी कुठेतरी झाले असेल, त्याची पार्श्वभूमीही वेगळी असेल, काही वैयक्तिक कारणे. एवढे जनरलाईज्ड करायला नको.
आणि ह्या गोष्टी डील करायला खूप सोप्या आहेत माझ्या मते!
भारतात परतण्याचा
भारतात परतण्याचा आमंत्रणपत्रिका वाटत फिरलोय का मी? किंवा आणिक कुणीही?>>>>> आता खरं सणकून लिहायला आलो होतो इब्लिस पण पुढे तुमच्या १४:१३ च्या पोस्टीमुळे प्राबलेम लक्षात आला.
sleep on it चा तुम्हाला नेमका काय अर्थ अभिप्रेत आहे ते सांगा. काहीतरी घोळ होतोय तुमचा.
मिना, स्लिप ऑन इट. अँड अॅज
मिना,
स्लिप ऑन इट. अँड अॅज फार अॅज पॉसिबल डोन्ट रिटर्न. इथे फार बेक्कार आहे हो. सिंहगडाच्या घाटावर पार्किंग मिळत नाही...
च्या*$~!! इथे किल्ले चढायला कार लागते? अहो, किल्ला आऊटिंगला जायचे ठिकाण नव्हे!
कम ऑन!
इंडिया. रिमेंबर??
बुवा, नुसता पुनर्विचार करा
बुवा,
नुसता पुनर्विचार करा इतके सांगणे वेगळे.
हा देश माझी एकट्याची जहागिर नाहिये हो. कधीच नव्हती.
पण पुनर्विचार करा सांगण्याची कारणे?
चुकत असेल तर सांगा परत.
माधवी सहमत. दुर्मिळ अनुभवांना
माधवी सहमत. दुर्मिळ अनुभवांना जनराइल्ज्ड करणे आणि आक्रस्ताळेपणाने टीका करत राहणे यालाच विरोध आहे. त्या दुस-या बाफचा संदर्भ दिलाच आहे तर तिथेही हेच म्हटले आहे कि हे काम इथलेही लोक छानपणे करू शकतात आणि परतून आलेलेही.
दोन्हीकडच्या सकारात्मक लोकांना बदडण्याचा काहीच संबंध नाही. ज्यांना बदलायचे नाही. समजून घ्यायचे नाही, झापडे बंद करून घ्यायची आहेत त्यांच्याशी चर्चा करण्याने खूप काही हाती लागेल, किवा ते बदलतील असं नाही. थोडक्यात सांगण्याने समजलं तर ठीक. काही काळाने समजलं तरी ठीक. अनेक वर्षांनी पण समजलं तरी ठीक. पण नाहीच समजलं तर नुकसान कुणाचं आहे ?
कोणी एकाने पार्किंगमध्ये गाडी
कोणी एकाने पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आहे- टू विलरचे टायर पंक्चर करुन ठेवलेले आहे. एकदा रिपेअर करून आणले, दोनदा आणले, तिसर्यांदा परत तेच.
>>>>
असाच सिमिलर अमेरिकेतला अनुभव! एका परिचयातील व्यक्तीने नवी कोरी गाडी घेतली, घरी पार्किंग नसल्यामुळे रात्री घरासमोरच्या रस्त्यावर पार्क केली. दुसर्या दिवशी सकाळी गाडीचे चारही टायर गायब! नंतर त्यांना कळले की इथे अशा प्रकारच्या चोर्या करणार्या काही गँग आहेत! पण असे सांगितले तर अमेरिकेत असे होते असे सरसकट विधान कोणी करत नाही, करू नये
बरोबर स्लीप ऑन इट म्हणजे एकदा
बरोबर स्लीप ऑन इट म्हणजे एकदा फेरविचार करा. ह्यात आम्ही (म्हणजे भारतीयांनी) आमंत्रणपत्रिका छापल्यात का हा प्रश्न आलाच कुठे? अन आपापल्या देशात परत यायचे की नाही हे सांगणारे तुम्ही/आम्ही कोण? त्यांचे अनुभव त्यांनी लिहिले आणि ते म्हंटले की बघा बॉ तुम्हाला वाटेल की सोपं आहे सगळं, ह्या या अशा काही गोष्टी मला खटकल्या, कदाचित तुम्हालाही खटकतील (हे सायलेंट होतं) तर जमल्यास फेरविचार करा. असा साधा मुद्दा आहे. एका भारताबाहेर राहुन आलेल्यानी दुसर्या येण्याबाबत विचार करत असणार्या लोकांकरता लिहिलेला सुचनावजा लेख आहे तो. ह्यात भारत सोडुन न गेलेल्यांनी मध्ये तोंड घालायची काय गरज आहे? मी परत परत तेच सांगतोय, एखाद्या माणसाला खटकल्या असतील भारतातल्या गोष्टी तर त्यात तुम्ही पर्सनली घ्यायचे काय कारण आहे? ह्याउपर त्या गोष्टी काही खोट्या आहेत असंही नाही. तुम्हाला नसतील आले तसे अनुभव, शक्य आहे पण म्हणून दुसर्यांच्या अनुभवांवर किंवा त्या परसेप्शन वर लगेच शंका घ्यायची? अन लगेच त्यांना मुर्ख ठरवायचे, घर के ना घाटके अशी लेबलं लावायची?
नीट फरक लक्षात घ्या, माणूस, त्याचे लिखाण नीट बघून बोला जरा. कुठल्याही एका कंपनीत काम करणार्या नोकरदार माणसाला येतील अशा अनुभवांबाबत लिहिलय मनस्मी ह्यांनी. हे ते विमानातून उतरल्यावर "काय घाण सुटलीये..." म्हणून नाक मुरडणार्या क्याटेगरीतले नाहीयेत, त्यांच्या समस्या सुद्धा मुतारीचे घाण येते टाईपच्या नाहीयेत. बाहेरुन पबलिक आलं म्हणजे सगळेच हे असे नाक मुरडणारे असतात असा पक्का समज बर्याच जणांनी करुन घेतलेला दिसतो.
माधवी पुन्हा एकदा सहमत.
माधवी पुन्हा एकदा सहमत. शिकागो शहरात संध्याकाळी बाहेर फिरायची सोय नाही म्हणून अमेरिकेतल्या लोकांना सिव्हीक सेन्स नाही अस विधान देखील असंच हास्यास्पद होईल. केप टाऊन मध्ये संध्याकाळी तुम्हाला लुटले जाते म्हणून दक्षिण आफ्रिका राहण्याच्या लायकीचा देश नाही असं जनराइल्ज्ड विधान हे शेरेबाजी मध्ये मोडतं. आफ्रिकेत येणा-या या अनुभवांबद्दल तिथल्या स्थानिकांनी बराच बदल घडवून आणला.
भारताच्या बदलासाठी चीन आणि जपान यांच्या संक्रमण अवस्थेचा विचार केला तर योग्य होईल का ? युरोपात सामाजिक बदलांना अनेक वर्षांपूर्वी सुरुवात झाली होती. त्यांच्याकडे औद्योगिक क्रांती झाली तेव्हां आपल्याकडे जातीयता, विषमता, परकीय आक्रमणे, निरक्षरता यांचं साम्राज्य होतं. ही परिस्थिती अतिशय भयंकर होती. महात्मा फुले, आगरकर, न्यायमूर्ती रानडे, सावरकर, डॉ आंबेडकर अशा अनेकांनी हातपाय न गाळता परिस्थिती बदलण्यासाठी पाया घातला. त्याला आताशी फळं येताहेत. ही गती वाढल्याशिवाय समाज सुशिक्षित आणि सुसंकृत बनणार नाही. सुशिक्षित बनल्याशिवाय जागृत बनणार नाही. जागृतीशिवाय व्यवस्था बदलणार नाही. तोपर्यंत संघटीत किंवा असंघटीत स्वरूपात यथाशक्ती काम करत राहणे हा सकारात्मक विचार वाटतो. माना डोलवत राहण्याने ना स्वतःला शांती मिळणार आहे, ना बदल होणार आहेत ना इतरांना आपलं अस्तित्त्व आवडणार आहे..
बघा पटतंय का ?
बुवा, मला तो कधीच आक्षेप
बुवा,
मला तो कधीच आक्षेप नव्हता व नसेलही.
माझी औकात कधीच तशा आमंत्रणपत्रिका छापण्याची नाही व नसेलही. देशाच्या वतीने कुणीच त्या छापू वा वाटू शकत नाही, हा उपहास लोकांना समजावा अशी माझी अपेक्षा असते.
पण,
>>
एका भारताबाहेर राहुन आलेल्यानी दुसर्या येण्याबाबत विचार करत असणार्या लोकांकरता लिहिलेला सुचनावजा लेख आहे तो. ह्यात भारत सोडुन न गेलेल्यांनी मध्ये तोंड घालायची काय गरज आहे?
<<
हा लेख, ग्रूपबाहेर का लिहिला?
ग्रूपमधे गेल्यावर मी तिथे फिरकलेलोही नाहिये.
गरज देखिल नाही.
मी राहून आलो की नाही, हा विषय देखिल नाहिये.
पण, येऊन ३ वर्षे झाल्यानंतर,
सिंहगडावरील पार्किंग,
बुशी डॅमची गर्दी,
फोन केल्यानंतर ८ दिवसांनी मिळणारी सर्विस.
म्हणून, स्लीप ऑन इट>>
ते देखिल लेख सार्वजनिक करुन??
व्हाय?
तरीही,
ओके.
हे सगळे मी वाचून, बरोब्बरेय म्हणून टाळ्या पिटाव्या असे तुम्हाला वाटते का?
मी तिकडेच लिहिले आहे.
'सिव्हिक सेन्स ची शिकवणीच घ्यायची तर ती फक्त परतून 'न' आलेल्यांना लागू होते का?
आलेले काय स्वर्गातून धाडलेले देवदूत आहेत?? टोन बदलायला हवा.
तुम्ही विचारता तेव्हा वाईट वाटत नाही, रागही येत नाही. पण तो टोन डोक्यात जातो.
त्या बाफचा संदर्भ देउ नका ही
त्या बाफचा संदर्भ देउ नका ही विनंती पुन्हा एकदा. आता आलाच आहे तर नानबा यांचं स्पष्टीकरण येईपर्यंत तो लेख अतिशय नकारात्मक उर्जेने ठासून भरलेला वाटल्याने तिथं लिहीलं. तीन वर्षात केवळ असेच अनुभव कुणाला आले असतील आणि प्रचंड निराशा दाटली असेल तर माझ्यासारख्याने सामान पॅक करून जिथे या सुविधा मिळतील तिथे जाणं पसंत केलं असतं. मुळातच फक्त असेच अनुभव आले हे न पटणारं आणि दांभिक वाटलं हा विचार का अॅक्सेप्ट होत नाही ? याला टीका झोंबणं वगैरे विशेषणं लावून खास फरक पडणारा नाही. तिथे पहिल्या पोस्टपासून बदल करायचा असल्यास कसा करणार या प्रश्नाला कुणीच उत्तर देत नाही. ती आमची जबाबदारी नाही या छापाची उत्तरं आली त्यानंतर अनेक पोस्टनंतर नानबांचा खुलासा आला.
पुढे तिथं लिहीणं बंद केलं. आता इथे इतरांनी तोंड घालू नये हे ज्यांना चांगलं समजतंय त्यांनी या बाफचा विषय नीट लक्षात घेऊन इथे तोंड घालू नये. शुभरात्री !
स्लीप्न ऑन ईट चा मला समजलेला
स्लीप्न ऑन ईट चा मला समजलेला एवढाच अर्थ की 'होमसिक झाले, स्वदेस पाहिला, निघाले सगळे बंद करून...' असे करू नका. तुम्हाला काय जाणवेल हे लिहीलेले असेल ते वाचा, विचार करा, काही दिवस हा विचार डोक्यात मुरवा आणि मग ठरवा. स्लीप्न ऑन ईट हे साधारण अशाच अर्थाने वापरलेले पाहिले आहे.
भारतातील गरिबीवर, रस्त्यातील भिकार्यांवर कोणी टीका केली व त्याचा राग आला तर समजू शकतो पण मनस्मिच्या लेखात त्याचा कोठेच उल्लेख नाही. सुतार, गवंडी वेळेवर न येणे, कामे नीट न करणे, लोकांनी वाट्टेल तसे पार्किंग करणे यावर टीका करण्याचा इतरांना का राग यावा?
हा लेख, ग्रूपबाहेर का
हा लेख, ग्रूपबाहेर का लिहिला?>>>>>>
अहो साधी चुक झाली त्यांची! कमाल आहे! पण गृप असो वा नसो, लेखाचे काँटेट तर बघा. तुम्ही टाळ्या पिटा किंवा नाक मुरडण्याचा संबंधच येत नाही.
आता टोन बाबतीत म्हणाल तर ते पार्टली बरोबर आहे. तो टोन गृप मधल्या लोकांनाच कळेल कदाचित पण एक लक्षात घ्या त्या टोन मध्ये भारताची अवहेलना करण्याचा प्रयत्न नाहीये.
एकदा इथे जन्म घेतला, शिकून मोठे झालो, अर्धा काय सगळाच गोतावळा इकडे असताना आम्ही काय डोंबलाची अवहेलना करु शकू भारताची?
त्या टोन मध्ये आहे तो फक्त माणसाला आलेला वैताग जो कोणाला ही येऊ शकतो. It was more of अ personal problem than a universal problem about India he was talking about.
मुळातच फक्त असेच अनुभव आले हे न पटणारं आणि दांभिक वाटलं हा विचार का अॅक्सेप्ट होत नाही ?>>>>> घातलत ना परत लोकांच्या वैयक्तिक म्याटर मध्ये तोंड? अन म्हणे न्यायधिश होऊ नका. त्यांचा अनुभव वाईट की चांगला आता हे तुम्ही ठरवणार का? हगल्या मुतल्यात तुम्ही लोकांना "जज" करता उर्फ न्यायधिश बनता हे लक्षातच येत नाही बर्याच वेळा.
ओके फारेण्डा. तुम्ही
ओके फारेण्डा.
तुम्ही म्हणताहात ते बरोबर आहे.
"सुटीच्या दिवशी सिंहगडावर मी कार घेऊन जाणारच, व तिथे मला पार्किंग मिळवून देण्याची जबाबदारी कुणा क्ष ची आहे"
या वाक्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे?
सुतार, गवंडी वेळेवर न येणे,
सुतार, गवंडी वेळेवर न येणे, कामे नीट न करणे, लोकांनी वाट्टेल तसे पार्किंग करणे यावर टीका करण्याचा इतरांना का राग यावा? >>
फारेण्डा. त्या गोष्टीबद्दल लिहायचा प्रयत्न केला होता. कुणी ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हतंच. मुळात तिथे चर्चाच होत नव्हती. लोक वेळेवर येत नाहीत यात बदल व्हायला हवं असं मी म्हटलं होतं. सिव्हीक सेन्स नाही तर तो बदलायला हवा असंही म्हटलं होतं. इथंही तेच म्हणणं आहे. त्यात किंचितही बदल झालेला नाही. इथं जी काही कमी आहे ती लोकांना माहीत नाही असं काहीच नाही. फक्त त्यासाठी काय करायला हवं हे इथं मागच्या दोन तीन पोस्टीत मांडलं आहे. पुढेही ती चर्चा चालूच राहील. त्या बाफवर ती चर्चा नको असं निक्षून सांगितल्याने बदलासाठी काय करायला हवं ही चर्चा इथे चालू आहे.
आता इथे त्या बाफसंदरभात चर्चा अजिबातच नक्को हे निक्षून सांगावं लागतंय.
अहो साधी चुक झाली त्यांची!
अहो साधी चुक झाली त्यांची! कमाल आहे!
<<
याच न्यायाने बुवा,
नाक खुपसणार्यांचीही साधीच चूक झालेली आहे
जौ द्या.
@ मुळातच फक्त असेच अनुभव आले
@ मुळातच फक्त असेच अनुभव आले हे न पटणारं आणि दांभिक वाटलं हा विचार का अॅक्सेप्ट होत नाही ?>>>>> घातलत ना परत लोकांच्या वैयक्तिक म्याटर मध्ये तोंड? अन म्हणे न्यायधिश होऊ नका. त्यांचा अनुभव वाईट की चांगला आता हे तुम्ही ठरवणार का? हगल्या मुतल्यात तुम्ही लोकांना "जज" करता उर्फ न्यायधिश बनता हे लक्षातच येत नाही बर्याच वेळा.>>>
वैद्यबुवा. तुम्हाला घाण भाषेत उत्तर देऊ ? तुमच्यापेक्षा घाण उत्तर देता येतं यावर विश्वास ठेवा. तुम्हाला नीट सांगितलेलं समजणार नाही हे लक्षात आलेलं आहे. इथे फक्त थोडक्यात लिहीतो. समजलं तर ठीक.
सार्वजनिक ठिकाणी नंगानाच केल्यावर लोक बोलणारच. पुढे हा वैयक्तिक मामला होता म्हणून माफी मागितली तरी त्याने लोकांनी तो नंगानाच पाहिला हे कसं बदलता येईल ?
हा लेख, ग्रूपबाहेर का
हा लेख, ग्रूपबाहेर का लिहिला?>>>>>> हाहा अहो साधी चुक झाली त्यांची! >>>
मला मुळात तो लेख ग्रूपबाहेर लिहीला हे चूक आहे हेच मान्य नाही. तो ओपन लेख होता, प्रतिक्रिया सर्वांनी जरूर द्याव्यात. मला आक्षेप आहे त्याने न लिहीलेल्या गोष्टी त्याला चिकटवून दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल.
मग त्यात भंपकपणा, दांभिकपणा चे आरोप. अमेरिकेत योगदान नसणे, एका ठिकाणी तर पूवर्जांचा अत्यंत खटकणारा उल्लेख. तो "आपल्या" पूर्वजांचा असा संदिग्ध आहे पण कोणाच्याही पूर्वजांचा मुळात कशाला.
या भारतीयांचे अमेरिकाच्या जडणघडणीत योगदान नसते ही एक आवडती थिअरी आहे. याच बाफवर नव्हे, इतरही अशा ठिकाणी हमखास हे वाक्य येते. हे योगदान कसे ठरवणार? १८०० साली जे मिसिसीपी ओलांडून निघाले त्यानंतर ५०-६० वर्षे जे झाले त्यांचेच फक्त योगदान होते का? जे भारतीय लोक पब्लिक वर्क्स मधे आहेत - रस्ते, पूल बांधायच्या कामात आहेत, जे लोक संशोधनात आहेत, जे लोक संशोधन करणार्या कंपन्यांसाठी सॉफ्टवेअर बनवतात त्यांचे 'योगदान' होत नाही का? मग हे तक्रार करणारे लोक यातील काहीही करत नसतील हे कशावरून?
लेखाचे काँटेंट तर बघा <<<
लेखाचे काँटेंट तर बघा <<<
तुम्हाला आणखी थोबाड फोडून
तुम्हाला आणखी थोबाड फोडून घ्यायचं असल्यास माझी काहीच हरकत नाही. चॉईस तुमचा आहे.
वैद्यबुवा. तुम्हाला घाण भाषेत
वैद्यबुवा. तुम्हाला घाण भाषेत उत्तर देऊ ? तुमच्यापेक्षा घाण उत्तर देता येतं यावर विश्वास ठेवा.>>> तुमची धाव तिथ पर्यंतच असावी. तुम्ही द्या हवं तर घाण भाषेत उत्तर, तुमचं डोकं किती सटकलेलं आहे ह्याचा अंदाज येइल लोकांना मग. पुढचे चार वाक्य काहीच कळले नाही, परत, तुमच्या डोक्यातलया सुसंगतीचा अभाव आड आला.
इब्लिस
फारेण्डा, तुम्ही लिहित आहात
फारेण्डा,
तुम्ही लिहित आहात त्यात माझ्या प्रतिसादांचा काही संबंध आहे का? असल्यस कृपया सांगावा ही विनंती.
@ फारएण्ड प्लीज मनस्मीच्या
@ फारएण्ड प्लीज मनस्मीच्या लेखाबद्दल इथे चर्चा नको. प्लीजच. तो विषय तिथेच बरा. धन्यवाद.
इब्लिस, तो लेख आवडलाच आहे
इब्लिस, तो लेख आवडलाच आहे मला. काय करु आता? अन तुम्ही काय करणार? त्यांना हार तुरे घालणार का?
बुवा, टोन छान असला तर
बुवा,
टोन छान असला तर 'परतण्याचा' प्रतिशब्द 'चवताळणे' हा होत नाही, इतकेच त्या लेखातून स्पष्ट होते. कंटेण्ट पहायचेच म्हणून ते देखिल आहे असे सुचवले
हार तुम्ही घाला.
तुरे आम्ही घालतो.
वैद्यबुवा अनेक वेळा
वैद्यबुवा
अनेक वेळा तुमच्याकडे वैचारीक खोलीचा अभाव असल्याचा अंदाज आलेला आहे. पुंगाटबाजी आणि चायला मायला करून पोस्टी टाकण्याने आपण समाचार घेतो हा तुमचा ग्रह झालेला आहे. तुम्हाला यापेक्षा घाणेरड्या भाषेत उत्तर देणं काहीच जड नाही. तुमच्याशी चर्चेचा हाच स्तर असेल तर तो सही. इतरांशी वेगळा राहील. जसा ग्राहक तसा माल. तुमच्यासारख्या लोकांच्या डोक्यात बदल झाला काय नि बंद पडलं काय इथे कुणालाच फरक पडत नाही. तुम्हाला इथे तोंड खुपसायचं कारण नाही तेव्हां निघा आता.
"सुटीच्या दिवशी सिंहगडावर मी
"सुटीच्या दिवशी सिंहगडावर मी कार घेऊन जाणारच, व तिथे मला पार्किंग मिळवून देण्याची जबाबदारी कुणा क्ष ची आहे" >> असा अजिबात सूर नाहिये..नीट वाचा...
वर जी वाहने गेली होती त्यानी वरच्या अरुंद रस्त्यावर पार्क करुन ते निसर्गसौंदर्याचा आस्वाद घ्यायला निघुन गेले आणि आमची बोंब झाली. वरच्या अरुंद रस्त्यावरुन मला U Turn घेउन खाली परत यायला लागले.
रस्त्यावर पार्क करुन लोकन्न्चि गैरसोय करणार्या बद्दल बोलत होते ते...
Pages