मी सर्वप्रथम हे स्पष्ट करतो कि हा बाफ भारतात परतणा-यांचे जे अनुभव इथल्या लोकांना येतात त्यांच्यासाठी आहे. इथल्या लोकांचे काय अनुभव आहेत हे जाणून घेण्यासाठी हा बाफ आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा यात प्रयत्न नाही.
भारतातून परदेशात जाण्याची अनेक कारणे असू शकतात. कुणी कुठे जावे याबद्दल कुणाला आक्षेप असण्याचं कारण नाही. देशप्रेम वगैरे गोष्टी बाजूला ठेवल्या कि संधीच्या शोधात जाणे हे आपण समजू शकतो. पण याच लोकांनी आपलं तिथलं काम संपल्यानंतर भारतात परतताना भारतियांना नावे ठेवणे हे कितपत योग्य आहे ? गावाकडच्या एखाद्या कुटुंबातल्या एखादा सदस्य शहरात जाऊन राहतो तेव्हां त्याचं बरं चाललय ना म्हणून कुणी त्याला रोखत नाही. हा सदस्य हुषार, चुणचुणीत असतो. शहरात राहून पुन्हा गावाची ओढ लागल्यावर तो गावाकडे परतायचा निर्णय घेतो आणि आल्यानंतर गावातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींबद्दल तक्रारी करू लागतो. सुरुवात अर्थातच संडास बाथरूमची सोय नसण्याने होते. गावाकडचे लोक भांबावतात. सुरुवातीला नवं काहीतरी ऐकायला मिळतंय म्हणून भक्तिभावाने ऐकतातही. पण दुस-या गावातल्या अशाच कुटुंबात असाच अनुभव आल्याच लक्षात येतं. गावात सुविधा मिळत नाहीत म्हणून बसता उठता चीडचीड करणारा हा सदस्य चांगली तीन चार वर्षे झाली तरी रूळतही नाही, प्रतही जात नाही आणि बदल व्हावेत म्हणून स्वतःही काही करत नाही आणि कसे करावे याबद्दल सांगतही नाही यामुळे नाही म्हटलं तरी घरचे इतर लोक हळूहळू चिडू लागतात. शेवटी कुणीतरी विचारतचं तू इथून जाण्यापूर्वी तुला गावात काय असतं याबद्दल कल्पना नव्हती का ? मग आता आल्यावर का स्वतःला आणि इतरांना त्रास देतोस ? तू आल्याबरोबर अचानक गाव कसं बदलेल ? तुला शहरातल्या सुधारणा इथे आणायच्या असतील तर तू पुढाकार घे , आम्ही आहोत तुझ्यासोबत..
गावोगावी असे परतणारे लोक असतात. त्यातले काही गाववाल्यांच्या आवाहनाचा अर्थ समजावून घेवून आपणही काही देणं लागतो या भावनेने यथाशक्य काम करतात. ज्यांना शक्य नाही त्यांची चीडचीड कमी होते. पण काहीं यातलं काहीच न करता गावाला कर देतोय ना मी मग मला शहरातल्या सुविधा इथं मिळायला काय हरकत आहे ? तुम्ही नागरीक म्हणून कधी सुधारणार हे पालुपद चालूच ठेवतो.
परदेशातून भारतात परतणा-यांचेही असे वेगवेगळे अनुभव येतात. त्यात मुख्यत्वे आम्हाला इथे आल्यावर किती त्रास होतो हा आरोप असतो. तेव्हां आपल्याला असेच प्रश्न पडतात. परतण्याच्या आधी या लोकांना काहीच कल्पना नव्हती का ? याच देशातून गेलेले असल्याने इथल्या अडचणींबद्दल अनभिज्ञ असल्याच्या थाटात काहिंचे चिडणे, आदळआपट करणे हे समजण्याप्लिकडे असते. यातले काही लवकरच रूळतात. अॅडजस्ट करून घेतात. पण तीन चार वर्षे झाल्यानंतरही नकारात्मक अनुभवांचा पाढा वाचणा-यांबद्दल इथल्यांना आश्चर्य का वाटू नये ? इथे लोकांना सिव्हीक सेन्स नाही हे कुणीच अमान्य करत नाही. पण तो बदलण्यासाठी काहीही न करता निव्वळ टीका करण्याच्या वृत्तीबद्दल भारतियांना काय वाटतं ? मुळात सगळेच भारतिय समाजाच्या बदलण्यासाठी काही झपाटून कार्य करताहेत असं अजिबात नाही. पण रहदारी सुधारण्यासाठी काम करणारी संस्था आहे, हे लोक टॅक्सपेयरही आहेत आणि तरीही सामाजिक बांधिलकी म्हणून बदल होण्यासाठी काम करतात. पर्यावरणाच्या -हासासाठी काम करणारे लोक आहेत. अंधश्रद्धा कमी व्हाव्यात म्हणून काम करणारे लोक आहेत. शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून काम करणारे लोक आहेत. जातीयतेच्या विरुद्ध काम करणारे लोक आहेत. कष्टक-यांसाठी लढे देणारे लोक आहेत. आपापले काम सांभाळून, कर भरूनही असे काम करणारी लोक जगात सर्वत्र आहेत. त्यातूनच देश घडतात. युरोप अमेरिकेतल्या सुविधांचे गोडवे गाणा-यांनी ते नक्कीच गावेत. पण हे देश या स्टेजला पोहोचण्यासाठी त्यांच्याकडे जे काही बदल झाले असतील, संक्रमणे झाले असतील त्यात आपल्या या भारतियांचं योगदान किती ? ते तिथं गेले तेव्हा ऑलरेडी या सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध होत्या, एक प्रगत समाज त्यांना दिसत होता.
आता भारतात परतल्यावर यांना ठळक बदल जाणवायला लागले म्हणून बदल कसे होणार ? या बदलायच्या प्रोसेसबद्दल त्यांना काही एक ऐकून घ्यायचं नसतं (अपवाद अर्थात आहेत). फक्त चिडचिड करायची असते. याट रस्त्यावर थुंकणे, रहदारीचा बट्ट्याबोळ, वेळ न पाळणे, रस्त्यावरचे खड्डे आदी बाबींचा समावेश असतो. सरकारी भ्रष्टाचाराबद्दल तर इथलेही लोक हैराण आहेत. पण तुम्ही कसे काय राहता बुवा या घाणीत हा सूर ब-याच जणांमधे आढळतो. मग हा परत का जात नाही हा प्रश्न मनात उभा राहतो. पण त्याच्याचसारखं स्पष्ट विचारलं कि तुम्ही न बदलणारे, टीका सहन न होणारे ठरता.
थोडक्यात हे अंगाला तेल लावून आलेले पहिलवान असतात. हे कुस्तीचा आव आणणार पण कुठेच तावडीत सापडणार नाहीत. याउलट कधीही असुविधा न पाहीलेले अमेरिकन्स / युरोपियन्स कसलीही कुरकुर न करता इथल्या अनुभवांना सामोरे जाताना दिसतात. प्रसंगी त्यात बदल घडवून आणतात. उत्तरांचल मध्ये झालेल्या अभूतपूर्व संकटानंतर भारतियांनी केलेला कचरा साफ करण्यासाठी एक ब्रीटीश मुलगी तिथे येऊन कचरा स्वतः साफ करू लागली. तिला असं काम करताना पाहून स्थानिकांना योग्य संदेश गेला. ते देखील तिच्या कार्यात सहभागी झाले. सरतेशेवटी हे आपलं काम ती करतीये या जाणिवेने रिलीफ कँप आणि लगतचा परीसर स्वच्छ झाला. नुसत्या टीका करणा-या सोकॉल्ड फॉरिन रिटर्न्र्ड मंडळींच्या पार्श्वभूमीवर हा अनुभव आश्वासक नाही का ? त्या मुलीला तिच्या देशात आणि आपल्या देशात असलेला फरक जाणवला नसेल का ? कि ती टीका करत बसली.
ते देश प्रगत असण्याचं कारण म्हणजे परिस्थिती कशी बद्लावी याचं त्यांना असलेलं भान हे होय. स्वतःपासून सुरुवात केल्याशिवाय बदलाला सुरूवात होत नाही हे तिला माहीत आहे.
- इराणमधे गेलेल्या एका अमेरिकन महीलेने तिथल्या अस्वच्छतेबद्दल तक्रार न करता स्वतः झाडू आणि पोछा घेऊन संडास बाथरूम साफ करण्यापासून स्वच्छतेला सुरुवात केली.
- इथे काही ऑटोमोबाईल कंपन्यांमधे काम करणारे अधिकारी आहेत. यायच्या जायच्या रत्स्यावर लागण-या जामचे कारण शोधून काढून एका चौकातल्या व्यावसायिकांना थोडे मागे हटून चौक मोकळा करण्यासाठी त्यांनी आर्थिक आणि इतर मदत केली.
- माझ्या मित्राने शिरूर तालुक्यातल्या स्वच्छ पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्यासाठी रिक्षावर पाणी स्वच्छ करण्याची यंत्रणा उभारली. या उपक्रमाचं ट्रेनिंगही ते केंद्र सरकारच्या सहाय्याने देत असतो. त्याच्या या पायलट प्रकल्पाचा मी देखील एक हिस्सा आहे. अशा काही उपक्रमामधे अनेक भारतीय असतात जे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करीत असतात. स्वतःबद्दल खरं तर लिहू नये या मताचा मी आहे.
- याच मित्राचं आणखी एक मोठं काम आहे. कारखान्यालगतच्या गावांमधे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देऊन रोजगार दिला. वैशिष्ट्य म्हणजे बचत गटाच्या सर्व महिलांना संधी मिळावी म्हणून आठ तासांची शिफ्ट स्पेशल केस म्हणून चार चार तासांच्या दोन टप्प्यात केली आणि पहिल्या शिफ्टमधे काहींना आणि दुस-या शिफ्टमधे काहिंना सामावून घेतले.
- अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यात सक्रीय सहभाग. त्याची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला होता, पण एकंदरीतच या प्रसिद्धीच्या प्रकाराला त्याचा नकार आहे.
- सातारा तालुक्यातल्या एका निवृत्त शिक्षकाने आपली ग्रॅच्युइटीची रक्कम आणि पेन्शन विकून येणारी रक्कम खर्चून अनाथ आणि अतिमागास मुलांसाठी वसतीगृहे बांधली. रयतच्या परंपरेत बसणारं हे काम आहे.
- नगर जिल्ह्यात एका शेतक-याने ३३ वर्षे राबून डोंगर फोडून एकट्याने रस्ता केला. या रस्त्यामुळे गावक-यांचा तेवीस किमीचा वेढा वाचला. शासनाला बोल लावून अनेक ठिकाणी प्रश्न प्रलंबित असताना या ग्रामस्थाला बोल लावले नाहीत म्हणून दोष द्यायचा कि एव्हढे मोठे काम करूनही लोकांना तो फ्री वापरावयास दिल्यावद्दल सत्कार करायचा ? अशाच प्रकारे अनेक ठिकाणी श्रमदानातून पाणतळी, रस्ते अशी कामं झाल्याची अनेक उदाहरणं आहेत.
- आठवतील तशी उदाहरणं इथे अपडेट करीनच.
ही गोष्ट ऐकूनही न घेणा-या, आपला देश काय आहे आणि कुठे आहे याचं भान विसरलेल्या आणि पैसे फेकतोय ना मग या सुविधा का मिळत नाहीत असा सूर अस्णा-या भारतियांबद्दल काय वाटते ? ज्यांना काँट्रीब्यूट करायची इच्छा नाही त्यांच्या येण्याने इतरांना काही फरक पडणार आहे असं वाटतं का ? किमान आपल्याला ज्या देशात परतायचं आहे तिथे मिळून मिसळून राहून चांगले बदल घडवूयात हा बेसिक विचार करता न येणा-यांच्या स्वागतासाठी कुणी उत्सुक असेल का ?
( सकारात्मक रित्या भारतात परतणारे लोक आहेत. त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मनापासून माफी मागतो).
लोकहो, कृपया खालील मुद्यांचा विचार करावा.
१. धागा परतोनि पाहे मधून कोतबो ग्रुपमधे हलवण्यात आलेला आहे.
२. पूर्ण वाचल्याशिवाय प्रतिसाद देऊ नयेत. द्विरुक्ती होण्याची शक्यता आहे.
३. दुस-या कुठयाही धाग्याचा विचार या धाग्यावर करण्याची आवश्यकता नाही. हा विषय स्वतंत्र आहे.
पण सगळ्या भारतीयांना सिव्हिक
पण सगळ्या भारतीयांना सिव्हिक सेन्स नाही हे कोठून आले? मला पटले नाही ते हे. >>>
त्या बाफवर पहाशील का पुन्हा पहिल्यापासून ? खटासि खट यांनी म्हटल्याप्रमाणे मनस्मी यांच्या पोस्टसमुळे निगेटीव्ह मत तयार झालेलं आहे. आणि सिव्हीक सेन्स नाही असं शिक्कामोर्तब झालेलं आहे. त्याचा पाया ही मनस्मी यांची पोस्ट आहे. ते त्यानी लिहीलं असेल किंवा इतरांनी लिहील असेल... एकूणात परिणाम तोच आहे. महत्वाचं म्हणजे दृष्टीकोण अत्यंत नकारात्मक आहे हे कालपासून कुणालाच पटत नव्हतं. आम्ही इथेच राहतो. परदेशातल्या सिव्हीक सेन्सबद्दलही जाणून आहोत. दोन्हीची तुलना करूनही तीन वर्षात फक्त हे आणि हेच अनुभव एखाद्याला का यावेत याचं रहस्य जाणतो. एखाद्या व्यक्तीच्या इतर लिखाणातही कुठला दृष्टीकोण डोकावतो यावरून परीक्षा होतेच ना ?
कालपासून जे सांगतोय ते आज पटलेलं आहे याबद्दल आभार, आता हे पटवताना इतरांनीही लिहीलेल्या वाक्यांची मिसळ झाली असेल तर ते सोडून देऊन दृष्टीकोण अत्यंत नकारात्मक का आहे यावर लक्ष केंद्रीत करावं ही नम्र विनंती.
मनस्मी १८ यांचं एका बाबतीत
मनस्मी १८ यांचं एका बाबतीत कौतुक करावं लागेल. बाफ लिहील्यानंतर ते पुन्हा फिरकलेले नाहीत.
पुढच्या टप्प्यात आधीच
पुढच्या टप्प्यात आधीच लिहील्याप्रमाणे भारतियांमधे जी कमी आहे ती कशी भरून काढता येईल याबद्दल यथाशक्ती चर्चा करूयात. मनस्मी यांच्या लेख आणि मुद्दे यावरची चर्चा थांबवूयात आता.
फारेण्ड, श्री - तुमचा सहभाग स्वागतार्ह आहे.
भरत मयेकर, इब्लीस, शापीत गंधर्व आणि इतर सर्व लिहू पाहणा-यांना विनंती आहे आपला सहभाग नोंदवावा.
कालपासून जे सांगतोय ते आज
कालपासून जे सांगतोय ते आज पटलेलं आहे याबद्दल आभार, आता हे पटवताना इतरांनीही लिहीलेल्या वाक्यांची मिसळ झाली असेल तर ते सोडून देऊन दृष्टीकोण अत्यंत नकारात्मक का आहे यावर लक्ष केंद्रीत करावं ही नम्र विनंती.>>>
??? मला असे काही "आज" पटलेले नाही जे आधी पटलेले नव्हते. लेखाच्या नकारात्मक पणा वर मी माझ्या तेथील पहिल्या पोस्टवर आधीच लिहीले आहे. अजूनही आहे ते तेथे.
त्या मूळ पोस्टचा अर्थ बर्याच जणांनी जो लावलेला आहे तो तसा नाही हे माझे मत मी या वादात उतरलो तेव्हाही होते व अजूनही आहे. "कोणाही भारतीयांना सिव्हिक सेन्स नाही", "आम्ही येथून परतलो की लोकांनी आमच्यासाठी पायघड्या घालाव्यात" असे मनस्मीने तरी म्हंटलेले नाही. इतरांनीही कोणी म्हंटल्याचे मला तरी वाचल्याचे आठवत नाही. त्यातून जर म्हंटले असेल तर त्याला जरूर तुम्ही म्हणता ते सांगावे. पण त्याचा दोष मनस्मीकडे जात नाही.
मनस्मीने ज्या उद्देशाने तो लेख लिहीलेला आहे त्या उद्देशासाठी तो चपखल आहे, जरा नकारात्मक असला तरी, असे माझे मत अजूनही आहे.
सॉरी. येथे गुडी गुडी समारोप करू शकलो असतो. पण माझा वाद मुद्द्यांवर आहे, आणि त्याबद्दल माझे मत जे काल होते ते आजही आहे.
वाचतोय चर्चा, एक अनुभव
वाचतोय चर्चा,
एक अनुभव सांगतो.
टाटा स्कायचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता म्हणून एकाला बोलावले होते. तो येणार म्हणून मी घरी थांबलो होतो. तर त्याला यायला तब्बल ३ तास उशीर झाला. आला त्यावेळी मी जेवायलाच बसलो होतो. त्यालाही थोडे खाऊ घातले.
त्याच्याशी गप्पा मारताना, असे कळले...
अशा माणसांकडे क्वचितच बाईक्स वगैरे असतात. त्यांनाही सार्वजनिक वाहनानेच प्रवास करावा लागतो. घर शोधण्यातही वेळ जातो. त्यामूळे दिलेली वेळ पाळणे नेहमीच शक्य होते असे नाही. तरी ते आजकाल मोबाईलवरुन संपर्कात राहतात.
तीदेखील माणसेच असतात. मुंबईच्या हवामानात त्यांनाही पाणी प्यायची वगैरे गरज असते. त्यांना माणूस म्हणून वागणूक किती घरात मिळते ? त्यांच्या परीने ते बिघाड दुरुस्त करायचा प्रामाणिक प्रयत्न करतात. तो नेमका किती वेळात होईल, हे सांगता येईल का ? ज्या कामासाठी ते आलेत त्या व्यतीरिक्त काम त्यांना
का सांगण्यात येते ? त्यांनी काम केल्यावर बक्षिसाची अपेक्षा नसते पण आभाराची अपेक्षा ठेवली तर काय
बिघडले ?
अशा माणसांवर कंपनी नव्या उत्पादनाच्या विक्रीची जबाबदारी टाकतात. त्यांनी तसा प्रयत्न केल्यास त्यांना
हाड हाड ( हो हाच शब्द वापरला त्याने ) का केली जाते ?
यालाच सिविक सेन्स म्हणायचे का ?
असो हा माझा अनुभव आणि माझे विचार !
<मनस्मी यांच्या लेखाची
<मनस्मी यांच्या लेखाची सुरुवात " लिगल प्रॉब्लेम्स, नोकरीतील समस्या किंवा घरगुती कारणामुळे भारतात परतणे भाग असेल तरच भारतात यावे" अशी काहीशी आहे. हा आहे, जो मुळात मुद्दा नाही.>
फारेण्ड, जसे हे वाक्य तुम्हाला माझ्या पोस्टचे बेस वाटले, तसेच मनस्मिंच्या लेखाचा बेस मलाही कोणतेतरी वाक्य वाटू शकते. यात दोष माझ्या आकलनाचा असू शकतो, तसाच त्यांच्या लेखाचाही असू शकतो.
मुळात एखादे वाक्य मूळ मुद्दा आहे की नाही हे मला माझ्या समजुतीनुसारच कळणार. त्यातूनही ते वाक्य लेखाच्या सुरुवातीलाच आहे. तुम्ही किंवा नानबा म्हणतात त्या शब्दांत ते लिहिले असते तर मला काही लिहावे लागले नसते.
परतून येताना किंवा इथून जातानाही आपण फायदा-नुकसान, सोयी-अडचणी अशा दोन्ही गोष्टींचा विचार करतो.
हे लाभ-हानी, सोयी-अडचणी सगळे सापेक्षच असते. त्याच धाग्यावरच्या परतून आलेल्यांच्या काही पोस्ट्समधून तसे दिसतेही आहे.
आता नंतर हे कळतेय की तो लेख माझ्यासारख्यांसाठी नव्हताच मुळी. म्हणजे कदाचित विशिष्ट अनुभवांतून गेलेल्या लोकांसाठीच होता. पण मला माझ्या अनुभवांतून त्याचे जे चित्र दिसले त्यावरच मी प्रतिक्रिया देणार.
भरत, मला ते 'वाटले' नाही - ते
भरत, मला ते 'वाटले' नाही - ते तुम्ही लिहीलेले आहे ना? तसेच मनस्मिने जे लिहीले आहे त्याबद्दल तुम्ही जरूर लिहा.
फारएण्ड मनस्मीच्या लेखाबद्दल
फारएण्ड
मनस्मीच्या लेखाबद्दल अजूनही चर्चा चालू आहे ? माझं म्हणणं होतं इथे ती नकोच. कारण इथे ती अजिबातच चपखल नाही. तरीदेखील तुला ती कराविशी वाटली, तसंच तो लेख वाचून काहींना प्रतिक्रिया द्याव्याश्या वाटल्या. लेख वाचताना तीन वर्षे झाली तरी या माणसाचं भारताबद्दलचं हेच मत कायम आहे आणि त्याला कुठलाच अनुभव सकारात्मक आलेला नाही हे अविश्वसनीय आहे असं मत झालं. त्या निराशेतून हा परतणा-यांना येऊ नका असा इशारा देतोय असा ग्रह होणे स्वाभाविकच होते. त्याच मानसिकतेतून उपहासात्मक प्रतिक्रिया दिल्या गेल्या. परतून पाहणा-यांच्या विनंतीवरून हा लेख लिहीला आहे हे कसं कळणार ? त्यावर इथे लिहू नका असं ब-याच जणांनी सांगितलं. म्हणजे जी टीका खूपच निगेटीव्ह आहे तिच्यावर टीका करायची नाही का ? तरीही तो बाफ सोडून दिला. गंमत म्हणजे इथे तुमचं काम नाही असं सांगणारे इथल्या आवाहनाचा मान ठेवायला तयार नाहीत. ते असोच.
मला त्या बाफवर जायचेच नाही. आता तिथली प्रत्येक पोस्ट ही मनस्मीच्या लेखालाच धरून आहे का ? पायघड्या वगैरे पोस्टचा उल्लेख तू केला आहेस तर त्या पोस्टच्या आगेमागे त्याचे संदर्भ सापडतील. त्या सगळ्या पोस्टस मनस्मीच्या लेखाला उद्देशून आहेत असा दावा कुठे केल्याचं आढळलंय का ? मग प्रत्येक पोस्टचा उल्लेख करून मनस्मीने असं कुठे म्हटलंय असा प्रश्न विचारण्यामागचं प्रयोजन लक्षात येत नाहीये. तुझा काही गैस झाला असेल तर त्यालाही ना मनस्मी जबाबदार आहे ना मी.
आणि जरा नकारात्मक आहे म्हणून हे काय ? त्या लेखातले अनुभव नकारात्मक दृष्टीतून आलेले आहेत हे चपखल दाखले देऊन सांगितल्यानंतर त्याबद्दल अधिक काही बोलायची गरज उरलेली नाही असं वाटतं.
माझ्या कालच्या पहिल्या पोस्टपासून इथे ब-याच गोष्टींची कमी आहे, त्या निव्वळ टीका करण्याने संपणार नाहीत हा सूर आहे. टीका कुणीही करू शकतं याकडे लक्ष वेधलेलं आहे. याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होतंय का ? नाहीतर ब-याच गोष्टी सोप्या झाल्या असत्या. दोन्ही बाफवर लिहीलेलं न वाचता, समजून न घेता प्रश्न विचारण्याने उर्जा वाया जातेय. आताही इतका खुलासा केल्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या होणार नाही याची शक्यता नाहीच. तिथे इतकी गंमत चालली होती कि एखाद्याच्या मुद्याला उत्तर दिलं कि हे मी कुठं लिहीलय असं दुसराच कुणी विचारत होता, त्याला उत्तर दिलं कि मनस्मीने कुठं असं म्हटलंय हे तिसरा म्हणत होता. बाफवर ज्या पोस्ट येऊन गेलेल्या आहेत त्या ही वाचण्याचे कष्ट घेण्याची तयारी नसणा-यांकडून काय अपेक्षा ठेवायच्या ?
आता बाफचा मुख्य मुद्दा. नाईलाजाने परतावं लागतंय ना ? दुसरा ऑप्शनच नाही ना ? मग जीवन सुसह्य होईल असा दृष्टीकोण बाळगणे शहाणपणाचे कि असं काही सांगू पहाणा-याला आम्ही पैसे टाकतोय ना हे कुणीही एक्सवायझेड ने सांगणे हे शहाणपणाचे ? अशा पोस्टींना तुझे मूक समर्थन आहे का ? नसल्यास पायघड्यांच्या पोस्टचा मनस्मीच्या लेखाशी संबंध जोडण्याचं कारण कळालं नाही. कालांतराने अशा पोस्टी कुणाच्या आहेत हे मी विसरून जाईनच. माझ्या दृष्टीने ते ही सकारात्मक आहे. मला फक्त नानबा यांचा दृष्टीकोण पटला. इतरांचंही तेच म्हणणं आहे. म्हणूनच तिथून रजा घेतली.
पण वारंवार आवाहन करूनही तिथे चर्चा करण्याऐवजी इथं चर्चा करण्याने तिथे चर्चा करण्याचा खराच हेतू होता का ही शंका येतेय. तसं नसेल तर तिथे न लिहीणा-यांना समजावं म्हणून तिथली चर्चा इथे आणणं यावरून काहींचा हेतू काय असावा ? इथं लिहू नका असं सुचवल्यावर नको असलेल्या लोकांनी चर्चा सोडली आहे तर हवी तशी चर्चा आपसात करायला तिथेच करायला काय हरकत आहे ?
मी आता शेवटची विनंती करतो. या बाफच्या उद्देशाशी तिथली चर्चा बिल्कुलच संयुक्तीक नाही. तिथल्या आवाहनाचा मान ठेवून मी आणि इतरांनी जसा तो बाफ सोडून दिला तसंच तिथली चर्चा इथे आणण्यात काहीच हंशील नाही. इथे चाललेल्या चर्चेत चपखल वाटेल असं योगदान द्यायचं असल्यास मनापासून स्वागत आहे.
गैस नसावा.
का कुणास ठाऊक, पण दिनेश
का कुणास ठाऊक, पण दिनेश तुमच्या लेखाने डोळ्यात पाणी आणलं. बहुदा कधीकाळी मीही सेल्सचा अनुभव घेतल्याने असेल.
कदाचित खुप जवळचा संबंध नसेलही पण https://www.youtube.com/watch?v=8kobG40CPYw हा ऐकावाच असा व्हीडीओ.
यावर नंतर कधीतरी लिहेनच.
दिनेशदा अगदी अचूक सांगताहात
दिनेशदा
अगदी अचूक सांगताहात तुम्ही. इथे रहायचं असल्यास दृष्टीकोण बदलल्यास जीवन खूपच सुसह्य होतं. चीडचीड करणा-यांना सर्व्हिसही चांगली मिळत नाही आणि त्यांची मतं अधिकच निगेटीव्ह होत जातात. काम करून घ्यायचं भारतातलं तंत्र आत्मसात करून घेणं हा इथे यशस्वी होण्याचा मंत्र आहे. काही काही गोष्टी तर केवळ परदेशात आहेत म्हणून इथे असल्याच पाहीजेत असंही नको वाटतं.
नॉर्वेच्या त्या मुलं हिसकावून घेतलेल्या दांपत्याचा अनुभव वाचल्यानंतर नियम माणसासाठी असतात हा देशातला सूर बराच सुसह्य वाटतो. यावर मतभेद अर्थातच असू शकतात. तसंच इथलं सगळंच चांगलं आहे असा दावा केल्याचंही आठवत नाही. त्यावर टीका केलीच पाहीजे. फक्त ती टीका प्रश्नाच्या मुळाशी जाणारी आणि अभ्यासू असावी ही अपेक्षा जरा जास्तच होते का ?
विजय, व्यवस्था चालवणारी आणि
विजय, व्यवस्था चालवणारी आणि व्यवस्था बिघडवणारीदेखील माणसेच असतात. खुपदा त्या व्यक्तीच्या बाजूने विचार केल्यास बरेच प्रश्न सुटतात. आणि सुधारणा त्याच्यात करायची का आपल्यात करायची, हे पण कळतेच.
थोडे विषयांतर करतो.
गीतेत श्रीकृष्ण म्हणतो, दुष्टांचे निर्दालन करावे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो.. केवळ त्यांचे खलत्व गळावे, त्याने मात्र रहावे.. ( संदर्भ : प्रा शेवाळकरांचे निरुपण. ) आपण कुठल्या कॅटेगरीतले ?
धागा भरकटवण्याच्या प्रयत्नाला
धागा भरकटवण्याच्या प्रयत्नाला प्रतिसाद देऊन मदत केल्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो.
त्या निव्वळ टीका करण्याने
त्या निव्वळ टीका करण्याने संपणार नाहीत हा सूर आहे. टीका कुणीही करू शकतं याकडे लक्ष वेधलेलं आहे. याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होतंय का ? नाहीतर ब-याच गोष्टी सोप्या झाल्या असत्या.>>>>>> १) टीका त्यांनी केलीच नाही, तो निष्कर्ष तुम्ही काढला आहे, कारण बळच खटकलेल्या गोष्टी दाखवल्या की तुमचं देशप्रेम उफाळून येऊन पोष्टी पादायला... आपलं पाडायला लागतं.
२) दाखवलेल्या त्रुटी, चुका ह्याचा दोष त्यांनी कोणाला लावला नाही, ते फक्त उदाहरण देत होते.
हे सगळं इतकं स्वच्छ असल्यावर तुम्ही किंवा इतर कोणी जाऊन, बरं मग! तुम्ही ह्या त्रुटी घालवायला काय करत आहात? काय नाकं मुरडताय, कशाला आलात मग इथे परत? हे असले शेरे मारायचा काय संबंध?
मुळात दररोज एक देशाचा नागरिक म्हणून खरच किती लोकं देश सुधारायच्या दृष्टिने काहीतरी करत असतात? की फक्त तुम्ही भारत सोडून कुठे गेला नाही म्हणून तुम्हाला एक्स्प्रेस हक्क मिळाले लोकांना जाब विचारायचे? हजारो नाही तर लाखो, करोडो लोकं आपण आणि आपलं काम हे बघत आयुष्य घालवत असतात. आपल्याकडे राजकीय लोक कसे, कोणी त्यांच्या विरोधात काही बोललं की लगेच धाकदपटशा दाखवतात त्यातलच आहे हे सुद्धा.
इग्नोरमाडी.
इग्नोरमाडी.
१. शिकागो या शहरात संध्याकाळी
१. शिकागो या शहरात संध्याकाळी लुटालुटीचे अनेक अनुभव येतात.
२. अमेरिकेतल्या शाळांमधे लहान मुलांनी गन घेऊन येऊन इतर मुलांची शिक्षंकांची हत्या करण्याच्या ब-याच घटना घडल्यात.
सबब, अमेरिकेत कुणी रहायला जाऊ नये
आता असोच. आपल्याला एका कॉमेडीयनची आवश्यकता आहे. काय म्हणता लोक्स ?
किरणु, अहो असं समजू नका की
किरणु, अहो असं समजू नका की तुमच्या सारखे बिन्डोक लोकं फक्त भारतातच असतात. अमेरिकेतही त्यांची कमी नाही. तुम्ही हे दोन उदाहरणं दिलेत ना, त्या विषयी जर एखाद्या भारतीय किंवा कुठल्याही इमिग्रंट नी तक्रार केली ना, की तेही लगेच तुमच्या सारखेच " कशाला आलात मग इथे" " जा परत निघून तुमच्या गावी" असलं शेंडाबुडखा नसलेलं बोलतात.
प्रत्येक प्रांताच्या आपापल्या
प्रत्येक प्रांताच्या आपापल्या उणे अधिक गोष्टी असतात. इथे परतल्यावर ३ वर्षात एखाद्या परतणार्या व्यक्तिला इथल्या उण्याच गोष्टींबद्दल लिहावेसे वाटणे हे खटकले ( मलाही) उण्याबरोबर थोडं अधिक लिहिलं असतं तरी बरं झालं असतं.
दक्षिणा, मला या बाफच्या वादात
दक्षिणा, मला या बाफच्या वादात अजिबातच उतरायचं नाहीये म्हणून मी इथे अवाक्षरही लिहायचं नाही असं ठरवलं होतं. पण ही पोस्ट तुझ्यासाठी - तू मन्स्मि यांच्या लेखाचा पहिला अर्धा/एक तृतियांश भाग वाच प्लीज परत. आणि मी तिकडे एक पोस्ट टाकली आहे, आणि चिनूक्सची शेवटची पोस्ट या दोन्ही वाच.
तिथे इतकी गंमत चालली होती कि
तिथे इतकी गंमत चालली होती कि एखाद्याच्या मुद्याला उत्तर दिलं कि हे मी कुठं लिहीलय असं दुसराच कुणी विचारत होता, त्याला उत्तर दिलं कि मनस्मीने कुठं असं म्हटलंय हे तिसरा म्हणत होता. बाफवर ज्या पोस्ट येऊन गेलेल्या आहेत त्या ही वाचण्याचे कष्ट घेण्याची तयारी नसणा-यांकडून काय अपेक्षा ठेवायच्या ?>>>
किरण पायघड्यांचा पहिला उल्लेख तुझ्या पोस्टमधेच आहे. त्या पोस्टपर्यंत दुसर्या कोणीही तसे मत तेथे दिलेले नसताना, नसलेल्या आर्ग्युमेण्ट्स उभ्या करून त्याला झोडपणे पुढे झालेले आहे.
अमेरिकेत पैसे भरल्याशिवाय
अमेरिकेत पैसे भरल्याशिवाय तिथे येउच देत नाहीत. किती लोकांना येऊ द्यायचं हा त्यांचा चॉईस आहे. आणि अमेरिकाविरोधी वाटला कि हाकलण्याचाही. शाहरूखखान, जॉर्ज फर्नांडीस, अब्दुल कलाम यांची अपमानस्पद तपासणी करणारा देश आहे हा. विसरू नका
या बाफचा विषय आहे. १.
या बाफचा विषय आहे.
१. परदेशातून परतणा-यांचे भारतियांना येणारे अनुभव.
२. निंदा करणा-यांच्या निंदेतून सकारात्मक काय करता येईल हा विचार करणे.
३. देशाबद्दल अतिशय निराशाजनक वातावरण उभं होताना सकारात्मक घटनांचा आढावा घेणे.
कुणाला या विषयावर लिहायचे असल्यास कृपया लिहावे.
फारेण्डा पुन्हा तेच
फारेण्डा पुन्हा तेच ?
पायघड्या या शब्दावरून शाब्दीक कुस्ती खेळू नको. पैसे फेकू आणि सुविधा मिळायला हव्यात असा उल्लेख झाल्याचं आठवतं (कुणी केला हे लक्षात नाही). तिथे बाजू मांडायचा प्रयत्न केला असता टीका झोंबते का ही शेरेबाजी तुझ्या नजरेतून सुटली कि तुला ती मान्य आहे याबद्दल तू काहीही बोलायला तयार नाहीस. मला तर आता त्याटही रस राहीलेला नाही. वर सांगितल्याप्रमाणे आमच्या बाफ सोडण्याच्या निर्णयाचा आदर करून तिथला विषय तिथेच ठेव आणि इथे विषयावर चर्चा कर.
(फारेण्ड या आयडीविषयी आदर असल्याने उत्तर दिलं. )
वैद्यबुवा. तुमची नेमणूक
वैद्यबुवा.
तुमची नेमणूक विदूषक म्हणून झालेली आहे हे मी जाहीरपणे सांगू शकत नाही. पण तुम्ही आपलं काम इमाने इतबारे चालू ठेवा. सकाळी येऊन पाहतो किती नीट केलंय ते. फक्त बिन्डोक नाही, पुढची पातळी गाठा. लोकांच्या मनोरंजनात खंड पडू देऊ नका.
इथले विषय गंभीर / रूक्ष आहेत. टीआरपी वाढवण्यासाठी तुमच्यासारख्या स्वयंसेवकांची अत्यंत गरज आहे. शुभेच्छा !!
पायघड्या या शब्दावरून शाब्दीक
पायघड्या या शब्दावरून शाब्दीक कुस्ती खेळू नको. पैसे फेकू आणि सुविधा मिळायला हव्यात असा उल्लेख झाल्याचं आठवतं (कुणी केला हे लक्षात नाही).>>> हीच तर गोची आहे. कोणीही तसे म्हंटलेले नाही. कोणत्यातरी वाक्याचा विपर्यास आहे तो.
दोन्ही धाग्यावरील भांडणे/वाद
दोन्ही धाग्यावरील भांडणे/वाद वाचले. त्या धाग्यावरील मत येथे न लिहायचा प्रयत्न करते पण एखादा छोटासा मुद्दा आला तर दुर्लक्ष करा कारण किरण ह्यांच्या मते ह्या धाग्याचा उद्देश वेगळा असला तरी, मला जाणवलेली गोष्ट म्हणजे ह्या धाग्याचा निदान पायातरी मनस्मी ह्यांचा धागा आहे.
किरण ह्यांनी लिहिल्याप्रमाणे परदेशातून परतणा-यांचे भारतियांना येणारे अनुभव >> ह्याबद्दलचे अनुभव वाचायला आवडेल. अजुन कोणीही ह्याविषयी एकही अनुभव लिहिला नाहिये. कदाचीत एखाद्याच्या वागण्याने गैरसमजा झालेले असतील तर ते पण दुर व्हायला मदत होईल त्याने.
किरण, तुम्ही पण परिस्थिती सुधवण्यासाठी काय करायला हवे यावर का बोलत नाहीये? एकसारखेच मुद्दे येत आहेत तुमच्या प्रतिसादात. त्यामुळे तुमचे मत वाचायला आवडेल. नाहीतर फक्त दुसर्यानेच 'काहीतरी करायला हवे' हे तुमचे मत आहे असे हळुहळु माझे वैयक्तीक मत होईल.
भारत देश "अजुन" चांगला झालेला पहायची इथल्या सर्वांनाच इच्छा असणार, खटकणारे अनुभव लिहिलेल्यांना सुद्धा, कारण म्हणुनच ते अनुभव लिहीत आहेत नाहीतर 'त्यांचे ते पाहिनात, मला काय पडलय त्याचं' हे म्हणुन दुर्लक्ष करणे दुर्लक्ष करणे खुप सोपे असते.
खरेच लिहा आता, "परिस्थिती अजुन चांगली कशी करता येईल?"
मी पण परतणार्या मार्गावरील व्यक्ती आहे..... नसते तरी भारत "अजुन" चांगला ह्याकरता व्हावा अशी इच्छा/प्रयत्न केलेच असते.
किरण, तुम्ही पण परिस्थिती
किरण, तुम्ही पण परिस्थिती सुधवण्यासाठी काय करायला हवे यावर का बोलत नाहीये? >>
सुनिधी. हा बाफ नीट वाचलात तर या विषयावर आपण बोलूयात. पुढच्या टप्प्यात आपण यथाशक्ती या विषयावर चर्चा करूयात अशा दोन पोस्टी आढळतील. तिथला विषय इथे आल्याने अडथळा होतोय आणि पोस्टस न वाचताच प्रश्न विचारल्याने पुन्हा पुन्हा तीच उत्तर देताना उर्जा आणि वेळ जातोय. असो.
पुन्हा ज्या वेळी वेळ होईल त्या वेळी यावर चर्चा चालूच राहील. तोपर्यंत सुनिधी तुम्ही सुद्धा परिस्थिती सुधारण्यासाठी काय करटा येईल यावर आपला सहभाग नोंदवू शकता.
पोस्टस न वाचताच प्रश्न
पोस्टस न वाचताच प्रश्न विचारल्याने पुन्हा पुन्हा तीच उत्तर देताना उर्जा आणि वेळ जातोय. असो.>>> थोडा खुलासा, किरण. हे कोणाबद्दल आहे?
किरण, मग कशाला प्रत्येकवेळी
किरण, मग कशाला प्रत्येकवेळी उत्तरे देत बसला आहात? तुम्हीपण कशाला तिथेच अडला आहात? ज्यासाठी धागा आहे तो विषय पुढे सुरु ठेवा न आपोआप रस्ता मिळेल.
मी काय करते? - लिहिते. जरा ब्रेक्फास्ट करुन येते.
नको. त्यांनाच लिहूदे. बाकी
नको. त्यांनाच लिहूदे. बाकी कोणी बाफच्या विषयाला धरुन लिहीत नाही आहे.
>>हा बाफ भारतात परतणा-यांचे जे अनुभव इथल्या लोकांना येतात त्यांच्यासाठी आहे.
ओके.
तुम्हाला असे प्रत्यक्ष किती जणांचे अनुभव आले ते सांगणार काय? किती तेल लावलेले आव आणणारे पैलवान पाहिले?
मी आयडी शाबूत आहे का हे
मी आयडी शाबूत आहे का हे पहायला आलो होतो. कालपासूनचा वाद वाचला. त्यासाठी ग्रुपची मेंबरशीप घ्यावी लागली. धागा वाचून झाल्यानंतर गुपचं सदस्यत्व ठेवण्यात काहीच अर्थ नसल्याने बाहेर पडलो. किरण, माझी एव्हढी पोस्ट चालवून घ्यावी ही नम्र विनंती. वाटल्यास उत्तर देउ नये.
भारतात अनेक कमी आहेत हे जगजाहीर आहे. मनस्मि यांचा बाफ पाहिला तर त्यांना असे अनुभव आले असतील यातही दुमत नाही. पण किरण, भरत मयेकर, दक्षिणा, इब्लीस यांचं तीन वर्षात हेच अनुभव आले असतील याबद्दल शंका घेणं रास्त वाटल. या अनुभवांवर कुणी आपलं मत बनवणार असेल तर दुसरी बाजू वाचून त्यांना फेरविचार करता येईल. दिनेशदा यांची पोस्ट मला फार आवडली. विजय देशमुख यांचंही म्हणणं आवडलं. भारतातून जाण्यापूर्वी देशाबद्दल थोडीतरी कल्पना असतेच हा मुद्दा शंभर टक्के मान्य. तसंच भारतात सध्या काय परिस्थिती चालू आहे याबद्दल मित्रमंडळी, नातेवाईक, आईवडील यांना विचारून घेऊन मत बनवणं शक्य का होऊ नये ? असं न करता सर्वांना वाचता येईल असा धागा गुंफल्याने प्रतिक्रिया आल्या. मनस्मि यांनी दुसरीही बाजू लिहीली असती तर वाद झाला नसता. भारतात येऊन रहायचंच आहे तर मानसिक तयारी काय करावी यामधे आपला दृष्टीकोण बदलावा हे साध्या शब्दात लिहीता येणं सहज शक्य होतं ते दिनेशदा यांना खूप छान जमलय. त्यांच्याही पोस्टमधे वेळ न पाळण्याच उदाहरण आहे. पण सर्व बाजू विचारात घेऊन उदाहरण देण्याची कला त्यांच्यापाशी आहे. हा दृष्टीकोण ठेवला तर त्रास होणार नाही यात वाद नसावा.
भारतात फोन कॉल वर पोलीस, अँब्युलन्स क्षणात दारात येते असं होत नाही. लोकसंख्येच्या मानाने पोलीस बल खूपच कमी आहे, जागतिक बँकेच्या प्रेशरखाली प्रशासनाचा आकार कमी करताना पहिला फटका या खात्याला बसतो. कारण सैन्य, दूरसंचार, रेल्वे यात कपात करता येत नाही. त्याचे दुष्परिणाम आहेत. ही परिस्थिती एका रात्रीत बदलणारी नाही. या अपेक्षा घेऊन कुणी परतत असेल तर निराशा हाती लागेल. पण या अपेक्षा भारतातून गेलेल्यांच्या कशा काय असू शकतील ? दुस-या तिस-या पिढीला भारत या देशाबद्दल काहीच माहीत नसणं हे समजू शकतं.
कर भरण्याने लगेच नसलेल्या सुविधा कशा मिळणार हे मात्र समजलं नाही. देशातले लोक कर भरत नाहीत का असा प्रश्न पडतो. परदेशात राहून आल्याने त्रास होतो हे म्हणणं ठीक आहे. पण तो आपला प्रॉब्लेम आहे, तो दुस-याला समजावून सांगून त्रास कमी होणार नाही किंवा परिस्थितीत फरक पडणार नाही. विशेषतः ज्यांना परतावंच लागणार आहे त्यांनी हे समजावून घेतलं तर फायदा त्यांचाच होईल.
किरण, इब्लीस यांचा तोल जात असेल पण मुद्दे रास्त आहेत. परदेशातून परतू पाहण्या-यांना राग येऊ शकेल किंवा ते यावर विचार करत असतील. पण दुस-या बाजूचा विचार करणे हे त्यांच्याच फायद्याचं आहे.
माझी मतं एकांगी असू शकतात याची जाणिव आहे. धन्यवाद.
Pages