मी सर्वप्रथम हे स्पष्ट करतो कि हा बाफ भारतात परतणा-यांचे जे अनुभव इथल्या लोकांना येतात त्यांच्यासाठी आहे. इथल्या लोकांचे काय अनुभव आहेत हे जाणून घेण्यासाठी हा बाफ आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा यात प्रयत्न नाही.
भारतातून परदेशात जाण्याची अनेक कारणे असू शकतात. कुणी कुठे जावे याबद्दल कुणाला आक्षेप असण्याचं कारण नाही. देशप्रेम वगैरे गोष्टी बाजूला ठेवल्या कि संधीच्या शोधात जाणे हे आपण समजू शकतो. पण याच लोकांनी आपलं तिथलं काम संपल्यानंतर भारतात परतताना भारतियांना नावे ठेवणे हे कितपत योग्य आहे ? गावाकडच्या एखाद्या कुटुंबातल्या एखादा सदस्य शहरात जाऊन राहतो तेव्हां त्याचं बरं चाललय ना म्हणून कुणी त्याला रोखत नाही. हा सदस्य हुषार, चुणचुणीत असतो. शहरात राहून पुन्हा गावाची ओढ लागल्यावर तो गावाकडे परतायचा निर्णय घेतो आणि आल्यानंतर गावातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींबद्दल तक्रारी करू लागतो. सुरुवात अर्थातच संडास बाथरूमची सोय नसण्याने होते. गावाकडचे लोक भांबावतात. सुरुवातीला नवं काहीतरी ऐकायला मिळतंय म्हणून भक्तिभावाने ऐकतातही. पण दुस-या गावातल्या अशाच कुटुंबात असाच अनुभव आल्याच लक्षात येतं. गावात सुविधा मिळत नाहीत म्हणून बसता उठता चीडचीड करणारा हा सदस्य चांगली तीन चार वर्षे झाली तरी रूळतही नाही, प्रतही जात नाही आणि बदल व्हावेत म्हणून स्वतःही काही करत नाही आणि कसे करावे याबद्दल सांगतही नाही यामुळे नाही म्हटलं तरी घरचे इतर लोक हळूहळू चिडू लागतात. शेवटी कुणीतरी विचारतचं तू इथून जाण्यापूर्वी तुला गावात काय असतं याबद्दल कल्पना नव्हती का ? मग आता आल्यावर का स्वतःला आणि इतरांना त्रास देतोस ? तू आल्याबरोबर अचानक गाव कसं बदलेल ? तुला शहरातल्या सुधारणा इथे आणायच्या असतील तर तू पुढाकार घे , आम्ही आहोत तुझ्यासोबत..
गावोगावी असे परतणारे लोक असतात. त्यातले काही गाववाल्यांच्या आवाहनाचा अर्थ समजावून घेवून आपणही काही देणं लागतो या भावनेने यथाशक्य काम करतात. ज्यांना शक्य नाही त्यांची चीडचीड कमी होते. पण काहीं यातलं काहीच न करता गावाला कर देतोय ना मी मग मला शहरातल्या सुविधा इथं मिळायला काय हरकत आहे ? तुम्ही नागरीक म्हणून कधी सुधारणार हे पालुपद चालूच ठेवतो.
परदेशातून भारतात परतणा-यांचेही असे वेगवेगळे अनुभव येतात. त्यात मुख्यत्वे आम्हाला इथे आल्यावर किती त्रास होतो हा आरोप असतो. तेव्हां आपल्याला असेच प्रश्न पडतात. परतण्याच्या आधी या लोकांना काहीच कल्पना नव्हती का ? याच देशातून गेलेले असल्याने इथल्या अडचणींबद्दल अनभिज्ञ असल्याच्या थाटात काहिंचे चिडणे, आदळआपट करणे हे समजण्याप्लिकडे असते. यातले काही लवकरच रूळतात. अॅडजस्ट करून घेतात. पण तीन चार वर्षे झाल्यानंतरही नकारात्मक अनुभवांचा पाढा वाचणा-यांबद्दल इथल्यांना आश्चर्य का वाटू नये ? इथे लोकांना सिव्हीक सेन्स नाही हे कुणीच अमान्य करत नाही. पण तो बदलण्यासाठी काहीही न करता निव्वळ टीका करण्याच्या वृत्तीबद्दल भारतियांना काय वाटतं ? मुळात सगळेच भारतिय समाजाच्या बदलण्यासाठी काही झपाटून कार्य करताहेत असं अजिबात नाही. पण रहदारी सुधारण्यासाठी काम करणारी संस्था आहे, हे लोक टॅक्सपेयरही आहेत आणि तरीही सामाजिक बांधिलकी म्हणून बदल होण्यासाठी काम करतात. पर्यावरणाच्या -हासासाठी काम करणारे लोक आहेत. अंधश्रद्धा कमी व्हाव्यात म्हणून काम करणारे लोक आहेत. शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून काम करणारे लोक आहेत. जातीयतेच्या विरुद्ध काम करणारे लोक आहेत. कष्टक-यांसाठी लढे देणारे लोक आहेत. आपापले काम सांभाळून, कर भरूनही असे काम करणारी लोक जगात सर्वत्र आहेत. त्यातूनच देश घडतात. युरोप अमेरिकेतल्या सुविधांचे गोडवे गाणा-यांनी ते नक्कीच गावेत. पण हे देश या स्टेजला पोहोचण्यासाठी त्यांच्याकडे जे काही बदल झाले असतील, संक्रमणे झाले असतील त्यात आपल्या या भारतियांचं योगदान किती ? ते तिथं गेले तेव्हा ऑलरेडी या सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध होत्या, एक प्रगत समाज त्यांना दिसत होता.
आता भारतात परतल्यावर यांना ठळक बदल जाणवायला लागले म्हणून बदल कसे होणार ? या बदलायच्या प्रोसेसबद्दल त्यांना काही एक ऐकून घ्यायचं नसतं (अपवाद अर्थात आहेत). फक्त चिडचिड करायची असते. याट रस्त्यावर थुंकणे, रहदारीचा बट्ट्याबोळ, वेळ न पाळणे, रस्त्यावरचे खड्डे आदी बाबींचा समावेश असतो. सरकारी भ्रष्टाचाराबद्दल तर इथलेही लोक हैराण आहेत. पण तुम्ही कसे काय राहता बुवा या घाणीत हा सूर ब-याच जणांमधे आढळतो. मग हा परत का जात नाही हा प्रश्न मनात उभा राहतो. पण त्याच्याचसारखं स्पष्ट विचारलं कि तुम्ही न बदलणारे, टीका सहन न होणारे ठरता.
थोडक्यात हे अंगाला तेल लावून आलेले पहिलवान असतात. हे कुस्तीचा आव आणणार पण कुठेच तावडीत सापडणार नाहीत. याउलट कधीही असुविधा न पाहीलेले अमेरिकन्स / युरोपियन्स कसलीही कुरकुर न करता इथल्या अनुभवांना सामोरे जाताना दिसतात. प्रसंगी त्यात बदल घडवून आणतात. उत्तरांचल मध्ये झालेल्या अभूतपूर्व संकटानंतर भारतियांनी केलेला कचरा साफ करण्यासाठी एक ब्रीटीश मुलगी तिथे येऊन कचरा स्वतः साफ करू लागली. तिला असं काम करताना पाहून स्थानिकांना योग्य संदेश गेला. ते देखील तिच्या कार्यात सहभागी झाले. सरतेशेवटी हे आपलं काम ती करतीये या जाणिवेने रिलीफ कँप आणि लगतचा परीसर स्वच्छ झाला. नुसत्या टीका करणा-या सोकॉल्ड फॉरिन रिटर्न्र्ड मंडळींच्या पार्श्वभूमीवर हा अनुभव आश्वासक नाही का ? त्या मुलीला तिच्या देशात आणि आपल्या देशात असलेला फरक जाणवला नसेल का ? कि ती टीका करत बसली.
ते देश प्रगत असण्याचं कारण म्हणजे परिस्थिती कशी बद्लावी याचं त्यांना असलेलं भान हे होय. स्वतःपासून सुरुवात केल्याशिवाय बदलाला सुरूवात होत नाही हे तिला माहीत आहे.
- इराणमधे गेलेल्या एका अमेरिकन महीलेने तिथल्या अस्वच्छतेबद्दल तक्रार न करता स्वतः झाडू आणि पोछा घेऊन संडास बाथरूम साफ करण्यापासून स्वच्छतेला सुरुवात केली.
- इथे काही ऑटोमोबाईल कंपन्यांमधे काम करणारे अधिकारी आहेत. यायच्या जायच्या रत्स्यावर लागण-या जामचे कारण शोधून काढून एका चौकातल्या व्यावसायिकांना थोडे मागे हटून चौक मोकळा करण्यासाठी त्यांनी आर्थिक आणि इतर मदत केली.
- माझ्या मित्राने शिरूर तालुक्यातल्या स्वच्छ पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्यासाठी रिक्षावर पाणी स्वच्छ करण्याची यंत्रणा उभारली. या उपक्रमाचं ट्रेनिंगही ते केंद्र सरकारच्या सहाय्याने देत असतो. त्याच्या या पायलट प्रकल्पाचा मी देखील एक हिस्सा आहे. अशा काही उपक्रमामधे अनेक भारतीय असतात जे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करीत असतात. स्वतःबद्दल खरं तर लिहू नये या मताचा मी आहे.
- याच मित्राचं आणखी एक मोठं काम आहे. कारखान्यालगतच्या गावांमधे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देऊन रोजगार दिला. वैशिष्ट्य म्हणजे बचत गटाच्या सर्व महिलांना संधी मिळावी म्हणून आठ तासांची शिफ्ट स्पेशल केस म्हणून चार चार तासांच्या दोन टप्प्यात केली आणि पहिल्या शिफ्टमधे काहींना आणि दुस-या शिफ्टमधे काहिंना सामावून घेतले.
- अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यात सक्रीय सहभाग. त्याची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला होता, पण एकंदरीतच या प्रसिद्धीच्या प्रकाराला त्याचा नकार आहे.
- सातारा तालुक्यातल्या एका निवृत्त शिक्षकाने आपली ग्रॅच्युइटीची रक्कम आणि पेन्शन विकून येणारी रक्कम खर्चून अनाथ आणि अतिमागास मुलांसाठी वसतीगृहे बांधली. रयतच्या परंपरेत बसणारं हे काम आहे.
- नगर जिल्ह्यात एका शेतक-याने ३३ वर्षे राबून डोंगर फोडून एकट्याने रस्ता केला. या रस्त्यामुळे गावक-यांचा तेवीस किमीचा वेढा वाचला. शासनाला बोल लावून अनेक ठिकाणी प्रश्न प्रलंबित असताना या ग्रामस्थाला बोल लावले नाहीत म्हणून दोष द्यायचा कि एव्हढे मोठे काम करूनही लोकांना तो फ्री वापरावयास दिल्यावद्दल सत्कार करायचा ? अशाच प्रकारे अनेक ठिकाणी श्रमदानातून पाणतळी, रस्ते अशी कामं झाल्याची अनेक उदाहरणं आहेत.
- आठवतील तशी उदाहरणं इथे अपडेट करीनच.
ही गोष्ट ऐकूनही न घेणा-या, आपला देश काय आहे आणि कुठे आहे याचं भान विसरलेल्या आणि पैसे फेकतोय ना मग या सुविधा का मिळत नाहीत असा सूर अस्णा-या भारतियांबद्दल काय वाटते ? ज्यांना काँट्रीब्यूट करायची इच्छा नाही त्यांच्या येण्याने इतरांना काही फरक पडणार आहे असं वाटतं का ? किमान आपल्याला ज्या देशात परतायचं आहे तिथे मिळून मिसळून राहून चांगले बदल घडवूयात हा बेसिक विचार करता न येणा-यांच्या स्वागतासाठी कुणी उत्सुक असेल का ?
( सकारात्मक रित्या भारतात परतणारे लोक आहेत. त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मनापासून माफी मागतो).
लोकहो, कृपया खालील मुद्यांचा विचार करावा.
१. धागा परतोनि पाहे मधून कोतबो ग्रुपमधे हलवण्यात आलेला आहे.
२. पूर्ण वाचल्याशिवाय प्रतिसाद देऊ नयेत. द्विरुक्ती होण्याची शक्यता आहे.
३. दुस-या कुठयाही धाग्याचा विचार या धाग्यावर करण्याची आवश्यकता नाही. हा विषय स्वतंत्र आहे.
किरण, तुमची तळमळ समजते आहे व
किरण, तुमची तळमळ समजते आहे व मुद्देही पटत आहेत. खूप चांगली चर्चा. मनातल्या बर्याच प्रश्नांचा गुंता थोडा आटोपशीर व सुटा झाल्यासारख वाटतोय.
हा विषय म्हणजे बरेच खोलवरचे व
हा विषय म्हणजे बरेच खोलवरचे व ठसठसते गळू आहे, व हे गळू, पुन्हा पुन्हा भरून वाहू लागते असे दिसते आहे.
असो.
*
चिनुक्स,
>>उद्या सिंहगडाशेजारी दहा मजली पार्किंग लॉट उभा केला, तरी त्यामुळे समस्या सुटणार आहे का? नाही. कारण आपण कधी, कुठे गाडी न्यायची, हे आधी कळायला हवं.<<
हे आपण लिहिलं म्हणून मला आनंद झाला.
सुटीच्याच दिवशी सिंहगडावरच गाडीच घेऊन जाण्याबद्दल मी बोललो ते तुम्ही अधिक सोप्या शब्दांत सांगितलेत याबद्दल धन्यवाद.
*
बुवा,
पुढील वाक्याबद्दल धन्यवाद!
>>
एक परतून आलेला माणूस तुमच्यावर ओरडला म्हणून तुम्ही दुसर्या परतून आलेल्या माणसाला त्याच तराजूत तोलत पुढे हा सगळा भाषणबाजीचा पोस्ट्पसारा मांडत,
<<
मनस्मींच्या लेखात खटकण्यासारखे काहीच नव्हते, असे सांगणार्या कित्येक पोस्टी हा एक स्ट्रॉमॅनच होता, असे म्हणावे काय?
*
रच्याकने, 'बोम्बलत फिरणे' 'पिटपिट लावणे' 'माझे थोबाड गप करतो' इ. भाषासुमने वाचून अंमळ करमणूक झाली. एकट्या इब्लिसालाच गावरान मराठी येत नाही, तर सग्ळ्यांना येते, हे समजले
- पुढील भळभळीच्या प्रतिक्षेत.
आ.उ.
ह्या बाफच्या अनुषंगाने
ह्या बाफच्या अनुषंगाने लिहायचं तर आणि सरसकटीकरणाचा दोष पत्करून इतकच म्हणेन की, काही काळ भारताबाहेर राहून आलं की ->>>>>>>>>> सरसकट येणारे अनुभव!
१. भारतातील लोकांनी हा बाहेरुन आला म्हणजे आपापले उध्योग सोडून यांच्या स्वागतासाठी तयार असले पाहिजे. कारण ते हजारो मैलांवरून आलेले असतात.पण त्यांची सवड आणि आपली सवड जमतेच असे नाही.हे त्यांच्या गावी नसतेच.
२. भारतात येणार्या बर्याचजणानी 'तुमची मुलेपण रामरक्षा इ.म्हणत नसतील पण आमची मुले रोज म्हणतात.' अरे तुम्ही हुशार! तुमची मुलेपण हुशार! पण मुळातच ही तुलना कशाला? हे आणि असे अनेक किस्से! मग येतेच मनात इतकच ऐकवायला यायचे तरी कशाला?
३.परदेशातील मापदंड इकडच्या समस्यांना लावले की वैताग येतो.मान्य आहेच की इकड्ची सार्वजनिक सगळ्याच बाबतील अनास्था.उद्वेगजनक आहे.पण तिकडे असे आणि इकडे असे ही कॅसेट ऐकायला नको वाटते.सुधा मुर्तींच्या एका पुस्तकात म्हटल्याप्रमाणे लोकसंख्या + दारिद्र्य + शिक्षण नसणे याचा एकत्रित परिणाम आहे.
४.स्वित्झर्लंड्ला गेलेल्या नातलगाने सांगितले की(नेमके गाव माहीत नाही) तिथे देवनागरीत पाटी होती 'यहा पिशाब करना मना है' .आता ही पाटी फक्त टुरिस्टसाठीच असते का?
अमेरिकेतील नातलगाने सांगितलेला तिकडचाच किस्सा ..टनेलमधून कार जाताना गाडीतून एकाने डायपर भिरकावला.पाठच्या गाडीवाल्याने traffic वाल्याला फोन केला. तासाभरात त्यांचे लोक येऊन डायपर फेकण्यार्या गाडीवाल्याकडून दंड आकारला.ते भारतीय होते.
निर्मला देशपांडॅनी परदेशस्थ भार्तीयांवर तटस्थपणे एक सुरेख पुस्तक लिहिले आहे. नाव आठवत नाही. पण दिलीप
चित्रेंची प्रस्तावना आहे. (For here or to go? ) .बाकी इथला सहभाग संपला!
भलेही लेखासोबत खुप मिळतं
भलेही लेखासोबत खुप मिळतं जुळतं नसेल, पण हाही एक आमिर आणि इतरांचा हा प्रयोग, खुप चांगला होता.
http://www.satyamevjayate.in/regionalplayer/index.php?vid=14&opt=3
भलेही जाहीरातीसाठी का होईना, पण कार्यक्रमाद्वारे बराच फरक पडलाय.
मला वाटतं ह्या बाफचं नाव
मला वाटतं ह्या बाफचं नाव बदलून 'भारत कसा (आणि) का सुधारावा?' अस ठेवायला हवं. बर्याच पोस्टचा 'परतणार्यांशी' संबंध नाही किंवा तो ओढून ताणून लावला जातोय, तस्मात, अशा सबगोलंक्तार चर्चेला अंत नाही आणि अर्थही नाही.. शुभं भवतु!
वैद्यबुवा तुमचा प्रॉब्लेम
वैद्यबुवा
तुमचा प्रॉब्लेम समजावून सांगायच्या ऐवजी तुम्ही माझ्या पत्नीचा उल्लेख केलाय. तिथेही पत्नींचा असा शब्द वापरून मला जेलमध्ये पाठवण्याची तयारी केलीय. आता एकच प्रश्न विचारतो - तिथं काय चर्चा झाली हे तुम्हाला काय ठाऊक ? जे ऐकवायचं होत ते तिने व्यवस्थित ऐकवलं. उद्या तुम्हाला मी हेच सांगत असेन कि तुम्हाला रहायचंय आता. दुर्लक्ष करा तर सगळे सारखेच असं तुम्ही म्हणालात तर आणखी एकदा समजावून सांगू. परतून आल्यावर एक वर्षानंतर आणि जायचं नाही हे माहीत असल्यावर तुम्ही कधी सुधारणार नाही हे जर तुम्ही म्हणालात तर कुणीही तुम्हाला परत का जात नाही हे विचारणार.
एकतर तुम्ही इथलेच. आभाळातून पडलेले नाहीत. इथं यायच्या आधी माहिती नव्हतं हा कांगावा करायचा. वर त्रास होतो म्हणायचं. तुम्हाला यायचंच आहे तर मनाची तयारी करून यायचं. त्यासाठी असे सार्वजनिक ठिकाणी बाफ काढून अनुभव वगैरे विचारण्याचीही गरज नसावी. तुमचा त्रास तुमच्यापाशी. थोडा सहन केलात तर तुम्हाला काही मदत हवी का असे विचारणारे हजारो लोक भेटतील. तुमचा अनुभव त्यांना कसा येतो यावर देखील ते अवलंबून आहे.
एकदा सहानुभूती गमावून बसलात कि कुणीही विचारत नाही. वरून परत जायचं नाहीये म्हटल्यावर अजून हसं होतं. एखादा नाही पटलं तर बॅग पॅक करून माघारी गेला असता. सो सिंपल !!!
या प्रश्नाशी फटकून निराशाजनक परिस्थितीवर विचार म्हणून हा बाफ काढला असताना इथं येऊन गोंधळ घालण्यामागे स्वतःच्याच स्ट्रॉमॅन कि कँडीमॅन कि ठोमॅन ओर्ग्युमेण्टच्या युक्तीवादावा स्वतःचाच विश्वास नसल्याने आपण जातोय हे आपलं आपल्यालाच कळत नसावं. मी मुळीसुद्धा फिरकलो नाही त्या धाग्यावर. कारण मी तेव्हापासून ठाम आहे तो आताही.
कौतुक फक्त मनस्मीचं करेन कि त्याने बाफचा विषय टाकल्यावर तो एकदासुद्धा इकडे किंवा तिकडे फिरकला नाही. हे असतं ठाम मत. अभिनंदन मनस्मी. काही अधिक उणं ऐकवलं गेलं असल्यास क्षमस्व मित्रा !
सुमेधाजी, भाऊ, इब्लीस.
खूप खूप धन्यवाद.
"सहभाग संपला" म्हणून गेलेले
"सहभाग संपला" म्हणून गेलेले परत आले होय हे? ठाम मताचे दिसत नाहीत..
माझ्याशी बोलायला ते ख ख का येतात कळत नाही. एकामागोमाग पोश्टी टाकून गेले.. माझ्या मागच्या दोन पोस्टबद्दल सांगूनही कळलेले दिसत नाही. "चिडलात का?" असा प्रश्न मला किरणुंनीच एकदा विचारला होता. तसाच यांनीही विचारला. एकाच माळेचे मणी दिसतात..
>>पालथ्या घड्यावर पाणी
हे तर मी केव्हापासून सांगतेय.
रन लोला रन
रन लोला रन
यू रन, अँड गेट ख ख! "मी
यू रन, अँड गेट ख ख!
"मी सोयिस्कर भूमिका घेते" हे ठामपणे म्हणण्याइतका माझा दांडगा अनुभव असेल तर 'लोला डजन्ट रन' हे पण माहीत असायला हरकत नाही.
तुम्ही इतरांबद्दल लिहीलेले अनुभवही याच प्रकारात मोडत असतील तर ते मोडीत काढायला हरकत नाही.
[<< रन लोला रन >>
[<< रन लोला रन >> विषयाशीं/व्यक्तीशीं कांहीही संबध नाही पण मला खूपच आवडलेला सिनेमा म्हणून हा प्रतिसाद ! ]
भाऊ मलाही आवडलेला. तुमचं
भाऊ
मलाही आवडलेला.
तुमचं व्यंगचित्रं मिसिन्ग हं. येऊद्या एक.
किरणु, आपण बर्याच ठिकाणी
किरणु, आपण बर्याच ठिकाणी समाजाभिमुख केलेल्या कामांचा उल्लेख केला आहे. अशी कामं सातत्यानी होत असतात व तुमचाही त्यात सहभाग असतो असेही सांगितले आहे. मला अशा लोकांबद्द्ल व आपल्याबद्द्ल आणि आपण करत असलेल्या कामाप्रति आदर आहे. पण मग प्रश्न पडतो की इतकी वर्षे लोकं झटत आहेत तर प्रश्नांची व्याप्ति कमी का होत नाही? हा प्रश्न कामं करणार्या तुम्हा लोकांना कधी पडलाच नाही का? पडलाच असेल तर त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न झाला का? तोही झाला असेल तर कोणत्या त्रुटी आढळल्या? कामातलं सातत्य आणि ते टिकवण्यासाठी मनुष्य व आर्थिक बळ यांची गरज ह्या महत्वाच्या त्रुटी सर्वसाधारणपणे असतात.
असं असताना तुम्ही मनस्मिंना झोडपायच्या ऐवजी त्यांच्याकडे मदतीचा हात मागितला असता तर ते जास्त सयुक्तिक नव्हतं का? मनस्मि परत येऊन स्थिरस्थावर होताहेत, त्यांना प्रश्न दिसताहेत, अनुभवास येताहेत.( अनुभव आणि मतं यात फार फरक आहे हे लक्षात असेलच.)हे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करायला त्यांना प्रवृत्त करणं हे वास्तविक तुमच्यासारख्या सामाजिक कार्यातल्या अनुभवी व्यक्तिनी करायला पाहिजे, तर तुम्ही झोडपशाहीचं धोरण अवलंबलं. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून हे बरोबर आहे?
कौतुक फक्त मनस्मीचं करेन कि
कौतुक फक्त मनस्मीचं करेन कि त्याने बाफचा विषय टाकल्यावर तो एकदासुद्धा इकडे किंवा तिकडे फिरकला नाही. हे असतं ठाम मत. अभिनंदन मनस्मी. काही अधिक उणं ऐकवलं गेलं असल्यास क्षमस्व मित्रा ! >> किरण्युजी, मनस्मीजीने ज्या अनुषंगाने लेख लिहिला आणि ज्या अनुषंगाने त्याला विरोध झाला त्यात जमीन अस्मानचा फरक आहे. इकडे एक बाफ - परतोनि पाहे (परदेशातून परतलेल्या, परतू इच्छिणा-यांचे अनुभव)आहे तो अथपासून इतिपर्यत वाचा म्हणजे तुम्हाला मनस्मीजीच्या लेखाचा सदर्भ (अमेरिकेतून भारतात कायम परतणे आणि पुन्हा अमेरिकेत जाणे - यात येणार्या वेगवेगळ्या समस्या/ त्रास - अमेरिकेचे कायदे, नोकरी, पैसा, मुलाचे शिक्षण...) कळेल.
मलातरी मनस्मी त्यांचा लेखाविषयी प्रामाणिक वाटतात. हा पण त्यांना दिनेशजीसारखे समस्येचे निराकरण करणे जमत नसावे.
या विषयाशी हे निगडीत आहे असे
या विषयाशी हे निगडीत आहे असे वाटते .
http://www.loksatta.com/lokrang-news/help-yourself-180739/
राखी: आजच वाचला हा लेख. शब्द
राखी: आजच वाचला हा लेख. शब्द न शब्द पटला!
मग मी सांगितला नव्हता हा चोख
मग मी सांगितला नव्हता हा चोख आणि प्रामाणिक काम करायचा उपाय.. पण जंटलमन लोकांना कुठे समजायला
@ शुगोल्जी तुमच्यासारख्या
@ शुगोल्जी
तुमच्यासारख्या बुद्धीमान व्यक्तीला मी काय सांगणार? तुम्ही स्वत: जागृत आहात.
तुम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझा उल्लेख केला आहे. हे खरे नाही असं मी म्हणतो. मला ज्या प्रश्नाची तड लावाविशी वाटली त्या प्रश्नात माझा झोकून सहभाग दिला. हे देखील माझ्या अल्प बुद्धीप्रमाणे झालं. तीव्र बुद्धीच्या लोकांनी झोकून दिलं तर काम खूपच सोपं होईल असं माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे वाटतं. बुद्धीमान, जागृत मनुष्याला काम करा असं सांगायची गरज नसावी. ज्याअर्थी इतके दिवस तुम्ही सांगूनही मला समजत नाही असे तुम्हाला वाटत आहे त्याअर्थी मी जागृत नाही असं म्हणता येऊ शकेल. माझ्या अल्प मतीप्रमाणे मला तहान लागली तर दुस-याने विहीर खणावी ही अपेक्षा मला ठेवता येणार नाही इतकेच मला कळते. इतकेच माझे शिक्षण आणि प्रबोधन झाले आहे.
Pages