परतणा-यांबद्दल

Submitted by उद्दाम हसेन on 22 August, 2013 - 00:28

मी सर्वप्रथम हे स्पष्ट करतो कि हा बाफ भारतात परतणा-यांचे जे अनुभव इथल्या लोकांना येतात त्यांच्यासाठी आहे. इथल्या लोकांचे काय अनुभव आहेत हे जाणून घेण्यासाठी हा बाफ आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा यात प्रयत्न नाही.

भारतातून परदेशात जाण्याची अनेक कारणे असू शकतात. कुणी कुठे जावे याबद्दल कुणाला आक्षेप असण्याचं कारण नाही. देशप्रेम वगैरे गोष्टी बाजूला ठेवल्या कि संधीच्या शोधात जाणे हे आपण समजू शकतो. पण याच लोकांनी आपलं तिथलं काम संपल्यानंतर भारतात परतताना भारतियांना नावे ठेवणे हे कितपत योग्य आहे ? गावाकडच्या एखाद्या कुटुंबातल्या एखादा सदस्य शहरात जाऊन राहतो तेव्हां त्याचं बरं चाललय ना म्हणून कुणी त्याला रोखत नाही. हा सदस्य हुषार, चुणचुणीत असतो. शहरात राहून पुन्हा गावाची ओढ लागल्यावर तो गावाकडे परतायचा निर्णय घेतो आणि आल्यानंतर गावातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींबद्दल तक्रारी करू लागतो. सुरुवात अर्थातच संडास बाथरूमची सोय नसण्याने होते. गावाकडचे लोक भांबावतात. सुरुवातीला नवं काहीतरी ऐकायला मिळतंय म्हणून भक्तिभावाने ऐकतातही. पण दुस-या गावातल्या अशाच कुटुंबात असाच अनुभव आल्याच लक्षात येतं. गावात सुविधा मिळत नाहीत म्हणून बसता उठता चीडचीड करणारा हा सदस्य चांगली तीन चार वर्षे झाली तरी रूळतही नाही, प्रतही जात नाही आणि बदल व्हावेत म्हणून स्वतःही काही करत नाही आणि कसे करावे याबद्दल सांगतही नाही यामुळे नाही म्हटलं तरी घरचे इतर लोक हळूहळू चिडू लागतात. शेवटी कुणीतरी विचारतचं तू इथून जाण्यापूर्वी तुला गावात काय असतं याबद्दल कल्पना नव्हती का ? मग आता आल्यावर का स्वतःला आणि इतरांना त्रास देतोस ? तू आल्याबरोबर अचानक गाव कसं बदलेल ? तुला शहरातल्या सुधारणा इथे आणायच्या असतील तर तू पुढाकार घे , आम्ही आहोत तुझ्यासोबत..

गावोगावी असे परतणारे लोक असतात. त्यातले काही गाववाल्यांच्या आवाहनाचा अर्थ समजावून घेवून आपणही काही देणं लागतो या भावनेने यथाशक्य काम करतात. ज्यांना शक्य नाही त्यांची चीडचीड कमी होते. पण काहीं यातलं काहीच न करता गावाला कर देतोय ना मी मग मला शहरातल्या सुविधा इथं मिळायला काय हरकत आहे ? तुम्ही नागरीक म्हणून कधी सुधारणार हे पालुपद चालूच ठेवतो.

परदेशातून भारतात परतणा-यांचेही असे वेगवेगळे अनुभव येतात. त्यात मुख्यत्वे आम्हाला इथे आल्यावर किती त्रास होतो हा आरोप असतो. तेव्हां आपल्याला असेच प्रश्न पडतात. परतण्याच्या आधी या लोकांना काहीच कल्पना नव्हती का ? याच देशातून गेलेले असल्याने इथल्या अडचणींबद्दल अनभिज्ञ असल्याच्या थाटात काहिंचे चिडणे, आदळआपट करणे हे समजण्याप्लिकडे असते. यातले काही लवकरच रूळतात. अ‍ॅडजस्ट करून घेतात. पण तीन चार वर्षे झाल्यानंतरही नकारात्मक अनुभवांचा पाढा वाचणा-यांबद्दल इथल्यांना आश्चर्य का वाटू नये ? इथे लोकांना सिव्हीक सेन्स नाही हे कुणीच अमान्य करत नाही. पण तो बदलण्यासाठी काहीही न करता निव्वळ टीका करण्याच्या वृत्तीबद्दल भारतियांना काय वाटतं ? मुळात सगळेच भारतिय समाजाच्या बदलण्यासाठी काही झपाटून कार्य करताहेत असं अजिबात नाही. पण रहदारी सुधारण्यासाठी काम करणारी संस्था आहे, हे लोक टॅक्सपेयरही आहेत आणि तरीही सामाजिक बांधिलकी म्हणून बदल होण्यासाठी काम करतात. पर्यावरणाच्या -हासासाठी काम करणारे लोक आहेत. अंधश्रद्धा कमी व्हाव्यात म्हणून काम करणारे लोक आहेत. शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून काम करणारे लोक आहेत. जातीयतेच्या विरुद्ध काम करणारे लोक आहेत. कष्टक-यांसाठी लढे देणारे लोक आहेत. आपापले काम सांभाळून, कर भरूनही असे काम करणारी लोक जगात सर्वत्र आहेत. त्यातूनच देश घडतात. युरोप अमेरिकेतल्या सुविधांचे गोडवे गाणा-यांनी ते नक्कीच गावेत. पण हे देश या स्टेजला पोहोचण्यासाठी त्यांच्याकडे जे काही बदल झाले असतील, संक्रमणे झाले असतील त्यात आपल्या या भारतियांचं योगदान किती ? ते तिथं गेले तेव्हा ऑलरेडी या सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध होत्या, एक प्रगत समाज त्यांना दिसत होता.

आता भारतात परतल्यावर यांना ठळक बदल जाणवायला लागले म्हणून बदल कसे होणार ? या बदलायच्या प्रोसेसबद्दल त्यांना काही एक ऐकून घ्यायचं नसतं (अपवाद अर्थात आहेत). फक्त चिडचिड करायची असते. याट रस्त्यावर थुंकणे, रहदारीचा बट्ट्याबोळ, वेळ न पाळणे, रस्त्यावरचे खड्डे आदी बाबींचा समावेश असतो. सरकारी भ्रष्टाचाराबद्दल तर इथलेही लोक हैराण आहेत. पण तुम्ही कसे काय राहता बुवा या घाणीत हा सूर ब-याच जणांमधे आढळतो. मग हा परत का जात नाही हा प्रश्न मनात उभा राहतो. पण त्याच्याचसारखं स्पष्ट विचारलं कि तुम्ही न बदलणारे, टीका सहन न होणारे ठरता.

थोडक्यात हे अंगाला तेल लावून आलेले पहिलवान असतात. हे कुस्तीचा आव आणणार पण कुठेच तावडीत सापडणार नाहीत. याउलट कधीही असुविधा न पाहीलेले अमेरिकन्स / युरोपियन्स कसलीही कुरकुर न करता इथल्या अनुभवांना सामोरे जाताना दिसतात. प्रसंगी त्यात बदल घडवून आणतात. उत्तरांचल मध्ये झालेल्या अभूतपूर्व संकटानंतर भारतियांनी केलेला कचरा साफ करण्यासाठी एक ब्रीटीश मुलगी तिथे येऊन कचरा स्वतः साफ करू लागली. तिला असं काम करताना पाहून स्थानिकांना योग्य संदेश गेला. ते देखील तिच्या कार्यात सहभागी झाले. सरतेशेवटी हे आपलं काम ती करतीये या जाणिवेने रिलीफ कँप आणि लगतचा परीसर स्वच्छ झाला. नुसत्या टीका करणा-या सोकॉल्ड फॉरिन रिटर्न्र्ड मंडळींच्या पार्श्वभूमीवर हा अनुभव आश्वासक नाही का ? त्या मुलीला तिच्या देशात आणि आपल्या देशात असलेला फरक जाणवला नसेल का ? कि ती टीका करत बसली.

ते देश प्रगत असण्याचं कारण म्हणजे परिस्थिती कशी बद्लावी याचं त्यांना असलेलं भान हे होय. स्वतःपासून सुरुवात केल्याशिवाय बदलाला सुरूवात होत नाही हे तिला माहीत आहे.

- इराणमधे गेलेल्या एका अमेरिकन महीलेने तिथल्या अस्वच्छतेबद्दल तक्रार न करता स्वतः झाडू आणि पोछा घेऊन संडास बाथरूम साफ करण्यापासून स्वच्छतेला सुरुवात केली.

- इथे काही ऑटोमोबाईल कंपन्यांमधे काम करणारे अधिकारी आहेत. यायच्या जायच्या रत्स्यावर लागण-या जामचे कारण शोधून काढून एका चौकातल्या व्यावसायिकांना थोडे मागे हटून चौक मोकळा करण्यासाठी त्यांनी आर्थिक आणि इतर मदत केली.

- माझ्या मित्राने शिरूर तालुक्यातल्या स्वच्छ पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्यासाठी रिक्षावर पाणी स्वच्छ करण्याची यंत्रणा उभारली. या उपक्रमाचं ट्रेनिंगही ते केंद्र सरकारच्या सहाय्याने देत असतो. त्याच्या या पायलट प्रकल्पाचा मी देखील एक हिस्सा आहे. अशा काही उपक्रमामधे अनेक भारतीय असतात जे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करीत असतात. स्वतःबद्दल खरं तर लिहू नये या मताचा मी आहे.

- याच मित्राचं आणखी एक मोठं काम आहे. कारखान्यालगतच्या गावांमधे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देऊन रोजगार दिला. वैशिष्ट्य म्हणजे बचत गटाच्या सर्व महिलांना संधी मिळावी म्हणून आठ तासांची शिफ्ट स्पेशल केस म्हणून चार चार तासांच्या दोन टप्प्यात केली आणि पहिल्या शिफ्टमधे काहींना आणि दुस-या शिफ्टमधे काहिंना सामावून घेतले.

- अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यात सक्रीय सहभाग. त्याची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला होता, पण एकंदरीतच या प्रसिद्धीच्या प्रकाराला त्याचा नकार आहे.

- सातारा तालुक्यातल्या एका निवृत्त शिक्षकाने आपली ग्रॅच्युइटीची रक्कम आणि पेन्शन विकून येणारी रक्कम खर्चून अनाथ आणि अतिमागास मुलांसाठी वसतीगृहे बांधली. रयतच्या परंपरेत बसणारं हे काम आहे.

- नगर जिल्ह्यात एका शेतक-याने ३३ वर्षे राबून डोंगर फोडून एकट्याने रस्ता केला. या रस्त्यामुळे गावक-यांचा तेवीस किमीचा वेढा वाचला. शासनाला बोल लावून अनेक ठिकाणी प्रश्न प्रलंबित असताना या ग्रामस्थाला बोल लावले नाहीत म्हणून दोष द्यायचा कि एव्हढे मोठे काम करूनही लोकांना तो फ्री वापरावयास दिल्यावद्दल सत्कार करायचा ? अशाच प्रकारे अनेक ठिकाणी श्रमदानातून पाणतळी, रस्ते अशी कामं झाल्याची अनेक उदाहरणं आहेत.

- आठवतील तशी उदाहरणं इथे अपडेट करीनच.

ही गोष्ट ऐकूनही न घेणा-या, आपला देश काय आहे आणि कुठे आहे याचं भान विसरलेल्या आणि पैसे फेकतोय ना मग या सुविधा का मिळत नाहीत असा सूर अस्णा-या भारतियांबद्दल काय वाटते ? ज्यांना काँट्रीब्यूट करायची इच्छा नाही त्यांच्या येण्याने इतरांना काही फरक पडणार आहे असं वाटतं का ? किमान आपल्याला ज्या देशात परतायचं आहे तिथे मिळून मिसळून राहून चांगले बदल घडवूयात हा बेसिक विचार करता न येणा-यांच्या स्वागतासाठी कुणी उत्सुक असेल का ?

( सकारात्मक रित्या भारतात परतणारे लोक आहेत. त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मनापासून माफी मागतो).

लोकहो, कृपया खालील मुद्यांचा विचार करावा.

१. धागा परतोनि पाहे मधून कोतबो ग्रुपमधे हलवण्यात आलेला आहे.
२. पूर्ण वाचल्याशिवाय प्रतिसाद देऊ नयेत. द्विरुक्ती होण्याची शक्यता आहे.
३. दुस-या कुठयाही धाग्याचा विचार या धाग्यावर करण्याची आवश्यकता नाही. हा विषय स्वतंत्र आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Kiranu, tumhee bhartat aahat he gruhit dharate. tikaDe bareech ratr zalee asel. ya aantarjaleey vadat paDun tumachya zopeche khobre karu naka! Gele don divas tumachya posts baghata tumhee zopalat kee nAhee asa prashna padala. krupaya hee post changalya hetune liheeli aahe he dhyanat theva!

पहिल्यांदा किरण तुमचे अभिनंदन. ज्या सफाइने व राष्ट्रभक्तीने तुम्ही हा स्ट्रॉ मॅन क्रिअट केलात त्यासाठी व तो आम जनतेसमोर जाळायला उभा केलात त्याबद्दलही.

( सकारात्मक रित्या भारतात परतणारे लोक आहेत. त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मनापासून माफी मागतो) >>>>

नकारात्मक लोकांनी भारतात परतायचे नाही का? परतले तर ते केवळ नकारात्म्क आहेत म्हणुन त्यांच्या बद्दल कहीही बोलायची/लिहायची मुक्तता आहे का? ते नकारत्मक आहेत म्हणुन असे बोलणे त्यांना दुखावत नाही का? आणि ते नकारत्मक आहेत म्हणुन ते माफी मागायच्या योग्यतेचे नाहीत का?

उत्तरांचल मधला कचरा गोळा करायला ब्रीटिश मुलगी आली? मग आपले इब्लीस झोपले होते काय? असतील तर त्यांना उठवून बरोबर घेऊन जायचे ना. का इब्लीस कचरा गोळा करताहेत हे बघुन उत्तरांचल मधील लोकांनी 'अहो माझ्या घराच्या मगच्या बाजुला पण एक ढिग आहे. तो कधी नेताय' असे विचारले असते? Proud

पण ह्या आख्या पोस्टचा व परतून येणार्‍यांचा संबंधच काय आहे? नकारात्मक लोक भारतात नाहीत असे म्हणायचे आहे का? प्रदेशात असलेला प्रत्येक जण पोटेंशियल परतून येणारा आहे. व ते सर्व कुठल्या ना कुठल्या मध्यमातुन भारतातील सकारात्मक कामात गुंतले आहेत. तेंव्हा ....

ज्या सफाइने व राष्ट्रभक्तीने तुम्ही हा स्ट्रॉ मॅन क्रिअट केलात त्यासाठी व तो आम जनतेसमोर जाळायला उभा केलात >>>>>> Rofl जबरी पेशवे!

आता तुमची पोस्ट वाचून पुढे एखाद्या परग्रहावरचा घास वापरुन ते कोणता नवीन स्ट्रॉमॅन बनवतील ह्याचा काही नेम नाही .

किरण, वरच्या मला उद्देशून असलेल्या पोस्टबद्दलः

जरूर लिही माझ्या पोस्टमधे काय आक्षेपार्ह वाटले ते. आणि माफी वगैरे काय? २-३ तास आपण सगळेच इतक्या पोस्ट लिहीत होतो की त्यातील काही 'लूज' लिहील्या गेल्या असण्याची शक्यता आहे. थेट्/स्पष्ट मते दिलेली मलाही आवडतील. तुझे इतर अनेक विषयांवरचे मुद्दे (इतर बाफवरचे) मलाही आवडलेले, बरेच पटलेलेही आहेत. १-२ वर्षांपूर्वी रिक्षावाल्यांबद्दलच्या बाफवर २-३ दिवस सलग एकदाही मुद्दा न सोडता, एकदाही वैयक्तिक पातळीवर न जाता झालेला आपला वाद आठवतो Happy

आता तुझ्या मुद्द्यांबद्दल:
राजू हगवणे व इतर ज्या लोकांचा उल्लेख तेथे केलेला आहे त्यांच्याबद्दल Total respect! पण त्यांच्यावर टीका करायचा संबंधच येत नाही येथे. एखादी व्यक्ती जेव्हा लोकांनी रस्त्यावर पार्किंग केल्याने पुढे जाता आले नाही म्हणून सांगते, तेव्हा 'हेच लोक एरव्ही स्वतः तसे पार्किंग करतात' असे घाऊक आपण कसे म्हणून शकतो? तसे करणारे अनेक असतात हे मान्यच आहे, पण हे तक्रार करणारे तेच आहेत असे म्हणणे मला अनावश्यक 'जजिंग' वाटते.

रविवारी पुण्यातले सगळे कार ओनर्स इकडे हजेरी लावतात. वरपर्यंत चढल्यावर पार्किंगला जागा नसते. मग घाटातल्या रस्त्यावर वाहने लागतात. हेच लोक खडकवासल्यालाही जाम करून ठेवतात आणि हेच लोक कुठेही गाड्या पार्क करून इतरांची गैरसोय करतात.>>> बरोबर. पण मग मनस्मिनेही हेच नाही का लिहीले?

तिथल्या लोकांना एम्प्लॉयमेंट देणं हे महाग पडत असल्याने भारत आणि आशियायी देशातील सॉफ्टवेअर इंजिनियर्स कडून ते बनवलं जातं.>>> मुळात नोकरीत, धंद्यांत अनेक सामजिक, आर्थिक कारणाने संधी मिळत असतात, हे पिनपॉईंट करण्याचे कारण कळत नाही.

दुस-याच्या मालमत्तेचं नुकसान करू नये हे शिक्षणाने आणि संस्काराने समजतं. >>>> किरण हे खुप आवडलेलं वाक्य.
मुंबईत काही वर्षांपुर्वी चालत्या लोकलवर दगडफेकीचे प्रकार वाढले होते, त्यावेळी तिथल्या पोलिस अधिकार्‍याने जवळच्या वस्तीत जाउन चौकशी केली. तिथल्या तरुण मुलांना विश्वासात घेउन जनजागृती केली. त्यामुळे हे प्रकार कमी झाले/ संपले.
ऑनलाईन लिहायला आणि टिका करायला काहीच लागत नाही. वेळ आहे म्हणुन लिहिणे आणि त्यातही नकारात्मक ! ते करायला चॅनेलवाले आहेतच की. मागे एका अस्वच्छ देवळांच्या पोस्टवर शेगावचे मंदीर, आणि इतर चांगल्या मंदीराम्ची माहिती मिळाली, तसच इथही होऊ देत.

माझ्या मते, गेल्या ६० वर्षात आपण अजुनही गांधीजींचं तत्वज्ञान समजलो नाही आणि मार्ग सोडला नाही. बहिष्कार, संप ही ब्रिटिश सरकारविरुद्ध वापरण्याची साधनं होती. त्याने ब्रिटीशांचे नुकसान होत होते. पण स्वातंत्रानंतरही नवी साधने (उदा. आता PIL) उपलब्ध असुनही लोकं लगेच रस्त्यावर उतरतात. माझ्या अनुभवानुसार परदेशात गेल्यावर लोकं अधिक टीव्ही (भारतीय चॅनेल्स) बघत असावे, त्यामुळे अधिकच नकारात्मक चित्र मनात रंगवल्या जाते. तसेच ज्याला कोणाला फोन करावा तो आपलं रडगाणं गातो, जसं काही आम्ही (परदेशात) खुपच ऐशाआरामात राहतोय.
काल आपल्याच मायबोलीवरचा चंपक जे काम करतोय, ते बघुन आनंद वाटला. मलाही असच काहीतरी करायच आहे.
राहिला प्रश्न लोकं बदलण्याचा, ते एका दिवसात होणार नाहीच. पण त्यात बदल होतोय हे नक्कीच.
"दुनिया मे अच्चे लोग है, इसिलिए दुनिया चल रही है". नाही का?

@ फारेण्ड : बरोबर. पण मग मनस्मिनेही हेच नाही का लिहीले? >> मनस्मिला सकारात्मक बाबी का नजरेला पडल्या नाहीत हा मुद्दा आहे. एखाद्या व्यक्तीला फक्त नकारात्मक गोष्टीच का अनुभवायला याव्यात याचे रहस्य त्यात आहे. अशा अनुभवांवर कुणी आपले मत बनवणार असेल तर....:)
फक्त एकाने कार व्यवस्थित पार्क केली नाही म्हणून भारतियांना सिव्हीक सेन्सच नाही हे जनरलाइज्ड विधान तुझ्या मते बरोबर आहे का ? मी दाखले देऊन लिहीतोय कालपासून. आताही सिंहगडावर झालेल्या कामांबद्दल लिहीतोय. ही कामं हा धडधडीत पुरावा आहे लोकांच्या सिव्हीक सेन्सचा. ज्या लोकांनी सिंहगडावर काम केले त्याच्या कामाचा सरंळसरळ खोटारड्या शेरेबाजीने अपमानच होतो. ही वृत्ती आहे. ती इथेही आहे आणि परतणा-यांमध्येही आहे. या वृत्तीला चांगले नजरेला पडतच नाही. याबद्दल तू देखील काहीच म्हणायला तयार नाहीस. मग इतरांकडून अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. कालपासून तू ज्याच्या पोस्टचा संदर्भ घेऊन बाजू लावून धरू पाहतोहेस तो पायाच शंकास्पद आणि डळमळीत आहे. ती बाजू पटली पाहीजे हा आग्रह कशासाठी फारेण्डा ? ज्यांना त्याच्या अनुभवावर विश्वास ठेवायचा असेल ते ठेवतील आणि निर्णय घेतील. ज्यांना ते शंकास्पद वाटतात ते दाखले देऊन सांगताहेत का पटत नाही.

नकारात्मक लोकांनी भारतात परतायचे नाही का? परतले तर ते केवळ नकारात्म्क आहेत म्हणुन त्यांच्या बद्दल कहीही बोलायची/लिहायची मुक्तता आहे का? ते नकारत्मक आहेत म्हणुन असे बोलणे त्यांना दुखावत नाही का? आणि ते नकारत्मक आहेत म्हणुन ते माफी मागायच्या योग्यतेचे नाहीत का? >>>

त्यांच्या चांगल्या गोष्टींकडे डोळेझाक करून निव्वळ नकारात्मक बोलण्याने इथल्या लोकांचे मन दुखवत नाही का ? कि ऐकून घेतात म्हणून ट्रेण्डच पाडायचा ? बरं या निव्वळ शेरेबाजीने कसा काय बदल होणार हे तुम्ही सांगत नाही, ना ती आपली जबाबदारी आहे असं तुम्हाला वाटतंय. स्थानिकांची मनं काय दुखावली तरी चालतील. आपण देश सोडून पळालो म्हणून उरलेल्यांनी ही टीका फुलासारखी झेलली पाहीजे. पण त्यांनी आपल्याला आपली जागा दाखवता कामा नये या अपेक्षा आहेत का तुमच्या ? कि जोपर्यंत आम्ही तिथे नव्हतो तोपर्यंत आम्हाला काहीही प्रॉब्लेम नव्हता, पण आता परतणार आहोत तर आमच्या सवयी लक्षात घेऊन बेसिक बदल घडवा या अपेक्षा आहेत. तसं असेल तर येऊच नका ना. कुणाचं काय अडलंय ? जे काम करताहेत ते का थांबणार आहेत ? त्यांनी कसं काम करायचं हे ते ठरवतील. तुम्हाला त्यात काही काँट्रीब्युट करायचं असेल तर जरूर तुमचं ऐकू, नाहीतर बडबड करणा-यांमध्ये आणखी एकाची भर पडली म्हणून दुर्लक्ष करू किंवा जागा दाखवू...

आमचा पहिल्यापासून एकच प्रश्न आहे. परतणार आहात, या. फक्त टीका करू नका. त्यासाठी अक्कल लागत नाही. ना परदेशातील अनुभव. ती टीका इथलेही लोक छान करू शकतात. प्रश्न आहे तो हे कसं बदलणार याचा ? तुम्हाला फक्त हक्कांची जाणीव असेल आणि कर्तव्याची जबाबदारी शून्य असेल तर असे नकारात्मक लोक आले काय किंवा न आले काय कुणालाच फरक पडत नाही. सार्वजनिक ठिकाणी भोंगे लावून नावं ठेवण्यापेक्षा केवळ आपल्याला ऐकू येईल अशा शब्दात आपले आपण ठरवावे हे उत्तम.

ज्यांना थोडाफार सेन्स आहे, त्यांना कमी शब्दातही समजू शकते, कालपासून आपलं अज्ञान प्रदर्शित करून सहानुभूती गमावणा-यांबद्दल काहीही म्हणायचे नाही.

वत्सलाजी--- Happy

उत्तरांचल मधला कचरा गोळा करायला ब्रीटिश मुलगी आली? मग आपले इब्लीस झोपले होते काय? असतील तर त्यांना उठवून बरोबर घेऊन जायचे ना. का इब्लीस कचरा गोळा करताहेत हे बघुन उत्तरांचल मधील लोकांनी 'अहो माझ्या घराच्या मगच्या बाजुला पण एक ढिग आहे. तो कधी नेताय' असे विचारले असते? >>

तिथे पेशवा का आले नाहीत हा मुख्य प्रश्न आहे. पेशव्यांना फक्त त्रास होतो, त्यांनी ज्यांच्याकडून सिव्हीक सेन्स शिकला त्या ब्रिटीशांना तसे वाटत नाही म्हणून ते कृतीने शिकवतात. कदाचित पेशव्यांनाही असेच ट्रेन केले गेले असावे हे सांगायचे होते. Lol

पेशवे कालपासून त्या बाफवरच्या पाट्या दाखवून इथे कुणी लिहायचे हे सांगत होते ना ? मग तुमच्यासारख्या उच्च सिव्हीक सेन्स असलेल्य व्यक्तीला या बाफवरच्या पाट्या पाहून काय करावं हे सांगायची गरज पडू नये. इथ परतू पाहणा-या निष्क्रीय , नकारात्मक आणि टीकाखोर लोकांबद्दल स्थानिकांना काय अनुभव येतात हे अपेक्षित आहे. इतरांचं त्यात कामच नाही. यात सवलत अशी आहे कि, जबाबदारी समजून उमजून सकारात्मक लिहायचं असेल तर लिहू शकता आणि टीकाही करू शकता Wink सूज्ञास अधिक सांगणे न लगे.

चलो. इग्नोरमाडी.

विजय देशमुख धन्यवाद.

परदेशात गेलेल्यांना फक्त टीव्हीवरूनच भारतातली परिस्थिती कळत असेल असं वाटत नाही. विशेषतः परतण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचे भारतात संपर्कच नसतील यावर विश्वास बसत नाही. इथूनच गेलेल्यांच्या बाबतीत हे कसं संभवतं ? इथून जाताना भारत ही काय चीज आहे हे चांगलंच माहीत असताना, परतल्यावर त्रास होतो, येऊन फसलो म्हणून रडगाणं गात रहाण्याने नेमका कुणाचा आणि कसा फायदा होतो हे कधीही न उलगडलेलं कोडं आहे. तीन तीन वर्ष झाली तरी हेच रडगाणं कायम असेल तर परत का जात नाही हे ही समजत नाही.

यावर कुणीही विचार करायला तयार नाही Lol

काय ???? "स्लीप ऑन इट" इतका गोंधळ , अरे जरा अर्थ तरी समजुन घ्या एखाद्याला बुकलुन काढण्याआधी.

इब्लीस यांनी म्हटल्याप्रमाणे गडाच्या पर्यटनाला कार कशाला हवी ? खाली प्रशस्त पार्किंग आहे. खालून चढून जाण्यात वेगळाच आनंद आहे.>>> तुमच्या गाडीत लहान मुल असल्यावर तुम्ही काय करता ? अरे विचार करा रे बाबांनो थोडा तरी.

किरण यांच्या वरच्या पोस्टला सुद्धा +१
मनस्मी यांच्या लेखाची सुरुवात " लिगल प्रॉब्लेम्स, नोकरीतील समस्या किंवा घरगुती कारणामुळे भारतात परतणे भाग असेल तरच भारतात यावे" अशी काहीशी आहे. (आता तो लेख सार्वजनिक वाचनासाठी राहिलेला नाही, त्यामुळे त्या ग्रुपचे सदस्यत्व घेऊन पुन्हा वाचण्यात मला काहीही रस नाही.) म्हणजे भारत हा काही 'आपल्यासारख्यांनी' राहायची जागा नाही(?). इथे, " परदेशात राहून आल्यावर मला काही भारत सोसत नाही" असाच सूर असेल तर माझी काही हरकत नाही. पण काही प्रतिसादांत तो तसाच आहे का याबद्दल शंका आहे.
नानबा यांचा अ‍ॅप्रोच, की भारतात गेल्यावर समोर येणार्‍या गोष्टींना स्वीकारायची आपली तयारी आहे की नाही हे तपासून बघणे, हा मला पटला, आवडला.

बाकी काही लोकांच्या पोस्ट्स : आम्ही जग जिंकून परत यायचं म्हणतोय पण हा देश होता तसाच आहे...अशा आहेत.

परदेशात गेल्याशिवाय आणि परदेशातून परत आलेल्या लोकांनी दाखविल्याशिवाय इथल्या लोकांना भारतातल्या त्रुटी जाणवत नाहीत या म्हणण्याला उत्तरही देण्याची मला गरज वाटत नाही.

आमचा पहिल्यापासून एकच प्रश्न आहे. परतणार आहात, या. फक्त टीका करू नका. त्यासाठी अक्कल लागत नाही. ना परदेशातील अनुभव. ती टीका इथलेही लोक छान करू शकतात. प्रश्न आहे तो हे कसं बदलणार याचा ? तुम्हाला फक्त हक्कांची जाणीव असेल आणि कर्तव्याची जबाबदारी शून्य असेल तर असे नकारात्मक लोक आले काय किंवा न आले काय कुणालाच फरक पडत नाही. सार्वजनिक ठिकाणी भोंगे लावून नावं ठेवण्यापेक्षा केवळ आपल्याला ऐकू येईल अशा शब्दात आपले आपण ठरवावे हे उत्तम.>>>>>>>> Lol तुम्हाला विचारलय का कोणी टीका करु की नको? आणि तुम्हाला फरक पडावा म्हणून कोणी यायचं की नाही ते ठरवत नाहीये. उगाच आपलं दुसर्याला शहाण्पण शिकवायची जवाबदारी घ्यायची अन बसायचे फुक्याचे लेख लिहीत वाफ दवडत.
खरं तुम्ही काय सकारात्मक करताय ते एकायला आवडेल असं म्हण्णार होतो पण त्याच्याशी तरी मला काय घेणं आहे? लोकं कंसें ण्कारात्मकं बोलतात ह्याच्या चांभार चौकशा करणं, जज करणे हे कुठल्याही भरीव/ सकारात्मक कामाच्या व्याख्येत बसत नाही.
भारताचे नागरिकत्व जो पर्यंत शाबूत आहे तो पर्यंत ज्याला जे भारताविषयी वाटतं ते ती व्यक्ती बोलायला मोकळी आहे.

श्री
रविवारी जाण्यात आणि अडचण करून घेण्यात अर्थ नाही हे मनापासून सांगताहेत सगळे. जाऊ दे. इतर दिवशी गेल्यास सिंहगडावर पार्किंगही मिळते आणि लहान, वृद्ध मुलांना फिरवूनही आणता येते. अर्थात पार्किंगपासूनचा चढ देखील इतका आहे कि लहान मुलांना आनि वृद्धांना झेपतोच असं नाही.

वैद्यबुवा
तुम्ही महामूर्ख आहात असं मी जाहीरपणे म्हणू शकत नाही. पण जितकं लिहाल तितकं तुमच्याबद्दल लोकांचं काही नकाही मत बनत जाईल हा धोका वाटतो. Lol कदाचित तुमच्यासारख्यांमुळे परदेशात भारतियांबद्दल काय मतं झाली असतील असंही वाटू शकतं. Happy

हे बघा मी भारताविषयी ण्कारत्मकं बोलणार्यांमधल्या अनेक महामुर्खांमधला एक आहे. तुम्हाला खुप सकारत्मकं कामं करायची आहेत ना? मग इथे झीट येऊन पौष्टिक झोकांड्या खाऊस्तोवर कशाला दिवसरात्र बसता वाचमन सारखी काठी ठोकत? येवढा तुमचा वेळ वाया जातोय हे कळत नाही तुम्हाला?

'जगा आणी जगु द्या' हे कधी कळणार लोकांना. हा बाफ काही परतायची इच्छा असलेल्या लोकांनी वाचला तर विचार बदलतील की काय असे वाटायला लागले आहे मला. Happy

किरण इतर दिवशी गाडी नेता येऊ शकते पण आपण शक्यतो असा दिवस निवडतो त्यादिवशी मुलांना सुट्टी असते. नाहीतर अ‍ॅब्सेंट असण्याचं कारण लिहुन द्यावं लागतं शाळेत.
आणि टीका करायची म्हणत असशील तर ती प्रत्येक नागरीक करत असतो मग तो भारताचा असो नाहीतर इतर कुठलाही. आणि टीका थांबवायची असेल तर चीनसारखी दडपशाही आणावी लागेल , चालणार आहे का तुम्हाला अशी दडपशाही. इंदिराजींनी आणीबाणी जाहीर केली होती म्हणुन आपणच शंख करतो अजुनही.
असा एकतरी माणुस दाखवुन द्या ज्याने कधी टीका / तक्रार केली नाही ( कोमात गेलेला माणूस नाही).

बुवा नंतर पोस्ट वाचली Rofl
इथ परतू पाहणा-या निष्क्रीय , नकारात्मक आणि टीकाखोर लोकांबद्दल स्थानिकांना काय अनुभव येतात हे अपेक्षित आहे. इतरांचं त्यात कामच नाही. >>> तुम्हाला माझ्या अपरोक्ष माझ्या सारख्या परतू पहाणर्या, निष्क्रीय, नकारात्मक आणि टिकेखोर लोकांबद्दल बोलायचे असल्यास वेगळा गृप काढा आणि तिकडे आत जाऊन धूणी धुवा!

चव्हाट्यावर बसुन माझ्यासारख्यांबद्दल बोलणार असाल तर त्या पाट्या निरप्योगी आहेत. मनस्मीने निर्देशीत केलेल्या काम्चुकार, निष्क्रिय, आयद्या, लोकांची फिकिर न करणार्‍या, आणि भ्रष्ट अशा भारतीयात अथावा त्यांना पाठिशी घालणार्या लोकात तुम्ही स्वतःची गणना करत असाल तर तसे सांगा. तसे असेल तर तुमची बाजू ऐकुन घेईन अन्यथा अशा लोकांबद्दल बोलायचे तुम्हास काय कारण?

पहेले नक्कि करो तुम्हारी समस्या क्या है!

बुवा, असामी, पेशवे,
अहो,
काल मी दुसर्‍या एका सार्वजनिक बाफची लि़ंक देऊन विचारलं, कि हा अन तो, दोघांत फरक काय? व दोघांपैकी इथेच 'स्ट्रॉमॅन' कसा काय उत्पन्न झाला?
याला काही उत्तर आहे का?
की चुकीच्या शब्दांवर स्ट्रेस देत तेच तेच चालू ठेवणार आहात?
*
स्लीप ऑन इट चा अर्थ मला समजला नाही, हे माझ्या 'डोळे मिटण्याच्या' पोस्टीवरून बुवांना वाटले, तिथून अजूनही चालूच आहे? माझा मुद्दा स्लीप ऑन इट नव्हता. त्या पाठीचे कारण हा होता.
पण ते असो.
ज्यांना समजायला हवे त्यांना सम्जले आहे मी काय म्हणतो आहे ते. इतरांना मुलांच्या सुटीच्याच दिवशी सिहंगडालाच जायचे असते, ते ही गाडी घेऊन.

रच्याकने, श्री.
सिंहगडावरचा रस्ता तिथल्या टीव्ही व रेडिओ सेंटरसाठी बांधला गेला. वर जाऊन साईट सीइंगसाठी नाही. त्या काळी मी काही दिवस खालच्या खडकवासल्यात रहात असे. सीडब्लूपीआरेस कँपस जवळ. Happy

अन हो,
आता पुरे. मी तरी इथे लिहिन असे वाटत नाही.

मनस्मी यांच्या लेखाची सुरुवात " लिगल प्रॉब्लेम्स, नोकरीतील समस्या किंवा घरगुती कारणामुळे भारतात परतणे भाग असेल तरच भारतात यावे" अशी काहीशी आहे.>>> भरत, हे पुन्हा एक स्ट्रॉमॅन आर्ग्युमेण्ट. अजिबात तसे नाही. हे बघा पटते का:

"तुमच्या हातात निर्णय असेल तरी एकदा वाटल्यावर लगेच धाडकन निर्णय घेऊ नये. स्लीप ऑन इट". हा मुद्दा

तो उगाचच
"लिगल प्रॉब्लेम्स, नोकरीतील समस्या किंवा घरगुती कारणामुळे भारतात परतणे भाग असेल तरच भारतात यावे"

असा आहे असा भासवायचा. मुद्दाम भासवायलाय असे मला म्हणायचे नाही, पण उगाचच अंगावर घेतलाय असे वाटते.

मग तो मुद्दा कसा चुकीचा आहे हे सांगायचे, म्हणजे मूळ मुद्दाच चुकीचा कसा आहे असे वाटते.

अरेरे, उपहासात्मक पोस्टी लिहीण्यापूर्वी माझी परवानगी घ्या लोकहो. अमिताभ बच्चन यांचा किस्सा वाचला नाही का ? गेली काही वर्षे नेटवर उपहास हा माझा पेटंटेड आयटेम आहे. इथं कुणी झक्की म्हणून आहेत असं ऐकलं. पण ते आम्ही आपसात सेटल करून घेऊ Proud

एक बाफ अनुभव / नकारात्मक पोस्टस लिहीण्यासाठी असताना इथे येऊन तिथे लिहीणे सोडलेल्यांना महत्व देणं म्हणजे आपला आपल्यावर विश्वास नाही ही कबुली देण्यासारखं होत नाही का ? तो बाफ जर परतणा=यांसाठी अनुभव सांगत असेल तर ते खूप एकांगी आहेत असं कुणी सांगू पहात असेलं तर परतणा-यांच्या पथ्यावरच पडणारं नाही का ?

नकारात्मक अनुभवांबरोबर तोडगा लिहा या अपेक्षेमुळे खूपच पंचाईत झालीये का ? तसं नसेल तर एका व्यक्तीला सर्वांनी मिळून इतकं महत्व देण्याचं कारण काय असावं बरं ? Lol

फक्त एकाने कार व्यवस्थित पार्क केली नाही म्हणून भारतियांना सिव्हीक सेन्सच नाही हे जनरलाइज्ड विधान तुझ्या मते बरोबर आहे का ?>>> नाही. पण हीच तर गोची आहे - ते त्याने केलेलेच नाही!

कालपासून तू ज्याच्या पोस्टचा संदर्भ घेऊन बाजू लावून धरू पाहतोहेस तो पायाच शंकास्पद आणि डळमळीत आहे. ती बाजू पटली पाहीजे हा आग्रह कशासाठी फारेण्डा ?>>> पटली पाहिजे असा आग्रह मी कोठे धरलाय? पटली नाही तर जरूर तेथे विरोध करावा. पण जे लिहीले आहे त्याला, जे त्याच्या मागे/मनात आहे असे तुम्हाला वाटते त्याला नव्हे!

मनस्मी यांच्या पोस्टमुळे भारतियांना सिव्हीक सेन्स नाही यावर शिक्कामोर्तब असल्यासारख्या पोस्टी त्या बाफवर आहेत असा सर्वांना भास झालाय का ?

पटली पाहिजे असा आग्रह मी कोठे धरलाय? पटली नाही तर जरूर तेथे विरोध करावा. पण जे लिहीले आहे त्याला, जे त्याच्या मागे/मनात आहे असे तुम्हाला वाटते त्याला नव्हे! >>> आपलं एकमत होउ शकत नाही यावर सहमत व्ह्यायला हरकत नसावी. पुन्हा लिहीण्यात अर्थ नाही तरीही शेवटचा प्रयत्न. त्याच सिंहगडावर नजरेत भरतील इतक्या सकारात्मक अनुभवांची खाण असताना एक गाडी चुकीची लागली हाच अनुभव देणं हा दृष्टीकोण नकारात्मक असल्याचं दाखवून देतं. शितावरून भाताची परीक्षा !

@श्री - रागवू नकोस गड्या. तुझा राग समजू शकतो. पण तुझ्या प्रश्नांना ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे. माझ्या त्या बाफवरच्या आणि या बाफवरच्या पोस्टी वाचूनही टीका करण्याला सरसकट विरोध आहे असं मत झालंय का ? कि केवळ टीका आणि ती ही जबाबदारी न घेता करण्याच्या वृत्तीला विरोध आहे असं तुला वाटतं ? काल पैसे फेकून सुविधा हव्यात अशी भाषा करणा-यांना काही ऐकूनच घ्यायचं नव्हतं. आज थोडे निवळलेत असं वाटतं. तसं असेल तर चांगलं आहे. परतल्यावर त्रास कमी होईल. हा त्यांचाच फायदा आहे.

वैद्यबुवा - माकडचाळे चालूच ठेवा प्लीज. अधून मधून करमणुकीसाठी कॉमेडीयन हवाच. नाहीतर बोअर होईल लोकांना.

भरत मयेकर - संयत आणि उत्तम पोस्ट.

इब्लीस - दांभिकतेचा पडदा फाडल्याबद्दल अभिनंदन. तुमच्या भाषेत सांगितल्यामुळे शॉक ट्रीटमेंटचा इफेक्ट झाला असावा Lol

त्याच सिंहगडावर नजरेत भरतील इतक्या सकारात्मक अनुभवांची खाण असताना एक गाडी चुकीची लागली हाच अनुभव देणं हा दृष्टीकोण नकारात्मक असल्याचं दाखवून देतं.>>> पुन्हा एकदा - दृष्टीकोण नकारात्मक असल्याचं म्हंटलेस तर ते का वाटले हे समजू शकतो. पण सगळ्या भारतीयांना सिव्हिक सेन्स नाही हे कोठून आले? मला पटले नाही ते हे.

भरत, ते ही वाचले. त्याबद्दल वाद नाहीच. वाद आहे तो तुमच्या पोस्टचा बेस
मनस्मी यांच्या लेखाची सुरुवात " लिगल प्रॉब्लेम्स, नोकरीतील समस्या किंवा घरगुती कारणामुळे भारतात परतणे भाग असेल तरच भारतात यावे" अशी काहीशी आहे. हा आहे, जो मुळात मुद्दा नाही.

Pages