परतणा-यांबद्दल

Submitted by उद्दाम हसेन on 22 August, 2013 - 00:28

मी सर्वप्रथम हे स्पष्ट करतो कि हा बाफ भारतात परतणा-यांचे जे अनुभव इथल्या लोकांना येतात त्यांच्यासाठी आहे. इथल्या लोकांचे काय अनुभव आहेत हे जाणून घेण्यासाठी हा बाफ आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा यात प्रयत्न नाही.

भारतातून परदेशात जाण्याची अनेक कारणे असू शकतात. कुणी कुठे जावे याबद्दल कुणाला आक्षेप असण्याचं कारण नाही. देशप्रेम वगैरे गोष्टी बाजूला ठेवल्या कि संधीच्या शोधात जाणे हे आपण समजू शकतो. पण याच लोकांनी आपलं तिथलं काम संपल्यानंतर भारतात परतताना भारतियांना नावे ठेवणे हे कितपत योग्य आहे ? गावाकडच्या एखाद्या कुटुंबातल्या एखादा सदस्य शहरात जाऊन राहतो तेव्हां त्याचं बरं चाललय ना म्हणून कुणी त्याला रोखत नाही. हा सदस्य हुषार, चुणचुणीत असतो. शहरात राहून पुन्हा गावाची ओढ लागल्यावर तो गावाकडे परतायचा निर्णय घेतो आणि आल्यानंतर गावातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींबद्दल तक्रारी करू लागतो. सुरुवात अर्थातच संडास बाथरूमची सोय नसण्याने होते. गावाकडचे लोक भांबावतात. सुरुवातीला नवं काहीतरी ऐकायला मिळतंय म्हणून भक्तिभावाने ऐकतातही. पण दुस-या गावातल्या अशाच कुटुंबात असाच अनुभव आल्याच लक्षात येतं. गावात सुविधा मिळत नाहीत म्हणून बसता उठता चीडचीड करणारा हा सदस्य चांगली तीन चार वर्षे झाली तरी रूळतही नाही, प्रतही जात नाही आणि बदल व्हावेत म्हणून स्वतःही काही करत नाही आणि कसे करावे याबद्दल सांगतही नाही यामुळे नाही म्हटलं तरी घरचे इतर लोक हळूहळू चिडू लागतात. शेवटी कुणीतरी विचारतचं तू इथून जाण्यापूर्वी तुला गावात काय असतं याबद्दल कल्पना नव्हती का ? मग आता आल्यावर का स्वतःला आणि इतरांना त्रास देतोस ? तू आल्याबरोबर अचानक गाव कसं बदलेल ? तुला शहरातल्या सुधारणा इथे आणायच्या असतील तर तू पुढाकार घे , आम्ही आहोत तुझ्यासोबत..

गावोगावी असे परतणारे लोक असतात. त्यातले काही गाववाल्यांच्या आवाहनाचा अर्थ समजावून घेवून आपणही काही देणं लागतो या भावनेने यथाशक्य काम करतात. ज्यांना शक्य नाही त्यांची चीडचीड कमी होते. पण काहीं यातलं काहीच न करता गावाला कर देतोय ना मी मग मला शहरातल्या सुविधा इथं मिळायला काय हरकत आहे ? तुम्ही नागरीक म्हणून कधी सुधारणार हे पालुपद चालूच ठेवतो.

परदेशातून भारतात परतणा-यांचेही असे वेगवेगळे अनुभव येतात. त्यात मुख्यत्वे आम्हाला इथे आल्यावर किती त्रास होतो हा आरोप असतो. तेव्हां आपल्याला असेच प्रश्न पडतात. परतण्याच्या आधी या लोकांना काहीच कल्पना नव्हती का ? याच देशातून गेलेले असल्याने इथल्या अडचणींबद्दल अनभिज्ञ असल्याच्या थाटात काहिंचे चिडणे, आदळआपट करणे हे समजण्याप्लिकडे असते. यातले काही लवकरच रूळतात. अ‍ॅडजस्ट करून घेतात. पण तीन चार वर्षे झाल्यानंतरही नकारात्मक अनुभवांचा पाढा वाचणा-यांबद्दल इथल्यांना आश्चर्य का वाटू नये ? इथे लोकांना सिव्हीक सेन्स नाही हे कुणीच अमान्य करत नाही. पण तो बदलण्यासाठी काहीही न करता निव्वळ टीका करण्याच्या वृत्तीबद्दल भारतियांना काय वाटतं ? मुळात सगळेच भारतिय समाजाच्या बदलण्यासाठी काही झपाटून कार्य करताहेत असं अजिबात नाही. पण रहदारी सुधारण्यासाठी काम करणारी संस्था आहे, हे लोक टॅक्सपेयरही आहेत आणि तरीही सामाजिक बांधिलकी म्हणून बदल होण्यासाठी काम करतात. पर्यावरणाच्या -हासासाठी काम करणारे लोक आहेत. अंधश्रद्धा कमी व्हाव्यात म्हणून काम करणारे लोक आहेत. शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून काम करणारे लोक आहेत. जातीयतेच्या विरुद्ध काम करणारे लोक आहेत. कष्टक-यांसाठी लढे देणारे लोक आहेत. आपापले काम सांभाळून, कर भरूनही असे काम करणारी लोक जगात सर्वत्र आहेत. त्यातूनच देश घडतात. युरोप अमेरिकेतल्या सुविधांचे गोडवे गाणा-यांनी ते नक्कीच गावेत. पण हे देश या स्टेजला पोहोचण्यासाठी त्यांच्याकडे जे काही बदल झाले असतील, संक्रमणे झाले असतील त्यात आपल्या या भारतियांचं योगदान किती ? ते तिथं गेले तेव्हा ऑलरेडी या सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध होत्या, एक प्रगत समाज त्यांना दिसत होता.

आता भारतात परतल्यावर यांना ठळक बदल जाणवायला लागले म्हणून बदल कसे होणार ? या बदलायच्या प्रोसेसबद्दल त्यांना काही एक ऐकून घ्यायचं नसतं (अपवाद अर्थात आहेत). फक्त चिडचिड करायची असते. याट रस्त्यावर थुंकणे, रहदारीचा बट्ट्याबोळ, वेळ न पाळणे, रस्त्यावरचे खड्डे आदी बाबींचा समावेश असतो. सरकारी भ्रष्टाचाराबद्दल तर इथलेही लोक हैराण आहेत. पण तुम्ही कसे काय राहता बुवा या घाणीत हा सूर ब-याच जणांमधे आढळतो. मग हा परत का जात नाही हा प्रश्न मनात उभा राहतो. पण त्याच्याचसारखं स्पष्ट विचारलं कि तुम्ही न बदलणारे, टीका सहन न होणारे ठरता.

थोडक्यात हे अंगाला तेल लावून आलेले पहिलवान असतात. हे कुस्तीचा आव आणणार पण कुठेच तावडीत सापडणार नाहीत. याउलट कधीही असुविधा न पाहीलेले अमेरिकन्स / युरोपियन्स कसलीही कुरकुर न करता इथल्या अनुभवांना सामोरे जाताना दिसतात. प्रसंगी त्यात बदल घडवून आणतात. उत्तरांचल मध्ये झालेल्या अभूतपूर्व संकटानंतर भारतियांनी केलेला कचरा साफ करण्यासाठी एक ब्रीटीश मुलगी तिथे येऊन कचरा स्वतः साफ करू लागली. तिला असं काम करताना पाहून स्थानिकांना योग्य संदेश गेला. ते देखील तिच्या कार्यात सहभागी झाले. सरतेशेवटी हे आपलं काम ती करतीये या जाणिवेने रिलीफ कँप आणि लगतचा परीसर स्वच्छ झाला. नुसत्या टीका करणा-या सोकॉल्ड फॉरिन रिटर्न्र्ड मंडळींच्या पार्श्वभूमीवर हा अनुभव आश्वासक नाही का ? त्या मुलीला तिच्या देशात आणि आपल्या देशात असलेला फरक जाणवला नसेल का ? कि ती टीका करत बसली.

ते देश प्रगत असण्याचं कारण म्हणजे परिस्थिती कशी बद्लावी याचं त्यांना असलेलं भान हे होय. स्वतःपासून सुरुवात केल्याशिवाय बदलाला सुरूवात होत नाही हे तिला माहीत आहे.

- इराणमधे गेलेल्या एका अमेरिकन महीलेने तिथल्या अस्वच्छतेबद्दल तक्रार न करता स्वतः झाडू आणि पोछा घेऊन संडास बाथरूम साफ करण्यापासून स्वच्छतेला सुरुवात केली.

- इथे काही ऑटोमोबाईल कंपन्यांमधे काम करणारे अधिकारी आहेत. यायच्या जायच्या रत्स्यावर लागण-या जामचे कारण शोधून काढून एका चौकातल्या व्यावसायिकांना थोडे मागे हटून चौक मोकळा करण्यासाठी त्यांनी आर्थिक आणि इतर मदत केली.

- माझ्या मित्राने शिरूर तालुक्यातल्या स्वच्छ पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्यासाठी रिक्षावर पाणी स्वच्छ करण्याची यंत्रणा उभारली. या उपक्रमाचं ट्रेनिंगही ते केंद्र सरकारच्या सहाय्याने देत असतो. त्याच्या या पायलट प्रकल्पाचा मी देखील एक हिस्सा आहे. अशा काही उपक्रमामधे अनेक भारतीय असतात जे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करीत असतात. स्वतःबद्दल खरं तर लिहू नये या मताचा मी आहे.

- याच मित्राचं आणखी एक मोठं काम आहे. कारखान्यालगतच्या गावांमधे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देऊन रोजगार दिला. वैशिष्ट्य म्हणजे बचत गटाच्या सर्व महिलांना संधी मिळावी म्हणून आठ तासांची शिफ्ट स्पेशल केस म्हणून चार चार तासांच्या दोन टप्प्यात केली आणि पहिल्या शिफ्टमधे काहींना आणि दुस-या शिफ्टमधे काहिंना सामावून घेतले.

- अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यात सक्रीय सहभाग. त्याची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला होता, पण एकंदरीतच या प्रसिद्धीच्या प्रकाराला त्याचा नकार आहे.

- सातारा तालुक्यातल्या एका निवृत्त शिक्षकाने आपली ग्रॅच्युइटीची रक्कम आणि पेन्शन विकून येणारी रक्कम खर्चून अनाथ आणि अतिमागास मुलांसाठी वसतीगृहे बांधली. रयतच्या परंपरेत बसणारं हे काम आहे.

- नगर जिल्ह्यात एका शेतक-याने ३३ वर्षे राबून डोंगर फोडून एकट्याने रस्ता केला. या रस्त्यामुळे गावक-यांचा तेवीस किमीचा वेढा वाचला. शासनाला बोल लावून अनेक ठिकाणी प्रश्न प्रलंबित असताना या ग्रामस्थाला बोल लावले नाहीत म्हणून दोष द्यायचा कि एव्हढे मोठे काम करूनही लोकांना तो फ्री वापरावयास दिल्यावद्दल सत्कार करायचा ? अशाच प्रकारे अनेक ठिकाणी श्रमदानातून पाणतळी, रस्ते अशी कामं झाल्याची अनेक उदाहरणं आहेत.

- आठवतील तशी उदाहरणं इथे अपडेट करीनच.

ही गोष्ट ऐकूनही न घेणा-या, आपला देश काय आहे आणि कुठे आहे याचं भान विसरलेल्या आणि पैसे फेकतोय ना मग या सुविधा का मिळत नाहीत असा सूर अस्णा-या भारतियांबद्दल काय वाटते ? ज्यांना काँट्रीब्यूट करायची इच्छा नाही त्यांच्या येण्याने इतरांना काही फरक पडणार आहे असं वाटतं का ? किमान आपल्याला ज्या देशात परतायचं आहे तिथे मिळून मिसळून राहून चांगले बदल घडवूयात हा बेसिक विचार करता न येणा-यांच्या स्वागतासाठी कुणी उत्सुक असेल का ?

( सकारात्मक रित्या भारतात परतणारे लोक आहेत. त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मनापासून माफी मागतो).

लोकहो, कृपया खालील मुद्यांचा विचार करावा.

१. धागा परतोनि पाहे मधून कोतबो ग्रुपमधे हलवण्यात आलेला आहे.
२. पूर्ण वाचल्याशिवाय प्रतिसाद देऊ नयेत. द्विरुक्ती होण्याची शक्यता आहे.
३. दुस-या कुठयाही धाग्याचा विचार या धाग्यावर करण्याची आवश्यकता नाही. हा विषय स्वतंत्र आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा किरण .... उत्तम लेख. अत्ता घाईत आहे .. थोड्या वेळात माझे मत मांडायला परत येतो.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यात सक्रीय सहभाग. त्याची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला होता, पण एकंदरीतच या प्रसिद्धीच्या प्रकाराला त्याचा नकार आहे.>>>>> भलेही त्याला प्रसिद्धी नको असेल तरी इतरांना प्रेरणा मिळावी म्हणुन किंवा चांगलही काही घडतय, किमान इतकं काही कळावं म्हणुन तरी लिहाच/ मुलाखत घ्या.

खुप चांगलं लिहिलय. दुसर्‍या बाफवरीलही तुमची मते आवडली. पुढे लिहितोच थोड्या वेळाने.

उत्तम लेख किरण. मुळात आपण इथे आमंत्रण पत्र देउन बोलवितो आहे का ह्यांना परत. तिथे जमले नाही कि इकडे. तिथे काय त्रास होतो ते खरे थोडेच सांगतात बरे ति थे ही समाज परिवर्तन वगैरे थोडेच करतात. कायम नाक वाकडे हेच खरे. डोंट गिव्ह अ डॅम. बरे इथे आपले देशी लोकांचे ठीक चालले असले तरही ह्यांना मनातून वाइट वाट्ते. का? जोपरेन्त कौतूक होते आहे तोपरेन्त कुठेही चांगले. अशी मानसिकता आहे. खरे तर असे लोक्स कुठेच बिलाँग करत नाहीत. मग अश्या साइट वर व्यक्त होत राहतात.

मला विषयच कळला नाही! Sad
देशा वा परदेशात जाऊन आल्यानंतर तिथले अनेकविध चांगले अनुभव इकडे सामान्यस्थळीही मिळत नाहीत म्हणून तक्रार करणार्‍यांबद्दलची ही तक्रार आहे? किंवा
या देशात तशाच प्रतिकुल परिस्थितीतही काही समाजपयोगी कामे करत रहाणार्‍यांचे कौतुक आहे? किंवा
अप्रत्यक्षपणे, जी कामे खरेतर "व्यवस्थेतुन्/प्रशासनामार्फत" व्हायला हवित ती ६० वर्षांनंतरही होत नसल्याबद्दलची रुखरुख आहे?
की गाव सोडून देश/परदेशात जाणारे ते ते सर्व देशद्रोहीच अस्तात्/त्यांना देशाबद्दल प्रेम नस्ते/जातात ते केवळ स्वार्थाकरता/पैका कमवायला जातात, असे गृहित धरुन, अन तरीही परत आल्यावर मात्र इथल्या "व्यवस्थे" बद्दल नाके मुरडतात या बद्दलची चीड आहे?

स्थलांतर हे बहुतांशी त्रासदायकच असतं. पण त्याचं कारण जर फायद्याचं असेल तर ते त्रास झेलायला मनोबल मिळतं. आणि नुकसानाचीच बाजू जड होत असेल तर मनाची समजूत काढण्यात बरीच शक्ती खर्च होते.मग आणखीच त्रास होतो. इथून तिथे अन तिथून इथे यात हाच फरक आहे.
वरचा लेख चांगला आहे.

किरण, लेख खुप आवडला.

जग ( ज्यापैकी ९९ टक्के हे पुणे आणि अमेरिका यांच्याबाहेर आहे. ) अनुभवताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवला
तर कुठेही राहणे अवघड नाही. अडचणी कुणाला नसतात आणि कुठे नसतात ? त्या अडचणींना तुम्ही कसे सामोरे गेलात हे महत्वाचे. यालाच मिलिंद बोकील "शिक्षण" म्हणतात.

त्यांच्या मते ज्ञान म्हणजे ज्ञान मिळवण्याचे अनुभव. प्रत्यक्ष ज्ञान हे महत्वाचे नाही. त्यांचेच उदाहरण द्यायचे तर रव्याचा लाडु कसा करायचा ते माहीत होणे महत्वाचे. प्रत्यक्ष रव्याचा लाडू हा नुसता रव्यासाखरेचा गोळा असतो. ( संदर्भ, "गवत्या" )

अफगाणिस्तान ( प्रतिभा रानडे ) नायजेरिया ( शोभा बोंद्रे ) सौदी अरेबिया ( डॉ. उज्ज्वला दळवी ) अशी अनेक पुस्तके मराठीत उपलब्ध आहेत. हे अनुभव कुठलीही कटूता न ठेवता लिहिलेले आहेत. आणि त्या लेखिकांचे लेखन पुरेसे प्रेरणादायी आहे. यापेक्षा कठीण अनुभवातून गेलेल्यांचे किस्से माझ्या मित्रमैत्रिणींचे आहेत.
एखादी व्यक्ती आपल्या सवयीचा प्रदेश सोडून जाते त्यावेळी बदल हे जाणवणारच. ते माहीत करून घेणे महत्वाचे. आणि आपल्याला होणार्‍या फायद्यांपुढे त्यांचे (उपद्रव) मूल्य ठरवणे हे तर त्याहून महत्वाचे.

आजकालच्या जमान्यात जगात कुठेही जाणे, उत्पन्न मिळवणे तितकेसे अवघड राहिलेले नाही ( म्हणजे आजकाल कुणी कोलंबस / सिंदबाद / मार्को पोलो वगैरे नाही. ) आणि त्या जागेची माहिती मिळवून तयारी
करणेही अवघड नाही.

आणि एवढे करूनही प्रत्येकाला तेच अनुभव येतील असेही नाहीत. शेवटी अनुभव हे वैयक्तीक आणि त्यांचा
सामना करणे हेही वैयक्तीकच.

हे थोडेसे परदेशी जाणार्‍यांच्या बाजूने लिहिल्यासारखे झालेय खरे. पण ते तसेच आहे.

मी कायम भारतात येत जात असतो. प्रत्येकवेळी झालेले सकारात्मक बदल मला आनंददायीच वाटतात.
पण त्यांची तुलना मी भारतातली पुर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती अशीच करतो. परदेशातल्या
परिस्थितीशी नक्कीच नाही.

किरण,
उत्तम लेख, अतिशय आवड्ला... आपण वर नमुद केलेली उदाहरण खरच स्तुत्य आहेत.
आशुतोश गोवारिकर च्या स्वदेस ची आठवण झालि.

या गोष्टी कळतात.. माहित पण असतात, पण आचरणात आणणे महा कठिण आहे..

परत येण्याचा निर्णय तुमचा आहे, हा देश तुमचाही आहेच.
भारतात परत येऊन प्रत्येकाने आल्याबरोबर लोकोपयोगी कामेच करावीत असेही माझे म्हणणे नाही.
फक्त,
'स्वातंत्र्य मिळून साठ वर्षे झाली तरी इथे हीच रड!' किंवा 'इतका टॅक्स भरतो तरी इथे सुधारणाच नाही' असल्या स्टाईलची बोलणी वाचली की जरा चिडचिड होते.

स्वातंत्र्यानंतरची साठ वर्षेच पहायची, तर अमेरिकेला July 4, 1776 रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतरच्या साठ वर्षांत अमेरिकेकडे काय होते? त्याची तुलना, सगळे रिसोर्सेस ब्रिटिशांनी लुटून नेल्यानंतर उरलेल्या भारताच्या स्वातंत्र्याच्या साठीशी करायचा जरा प्रयत्न करावा, असे सुचवू इच्छितो.

टॅक्स भरण्याबद्दल इतरत्र लिहिले आहेच.

जग ( ज्यापैकी ९९ टक्के हे पुणे आणि अमेरिका यांच्याबाहेर आहे. ) अनुभवताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवला
तर कुठेही राहणे अवघड नाही. अडचणी कुणाला नसतात आणि कुठे नसतात ? त्या अडचणींना तुम्ही कसे सामोरे गेलात हे महत्वाचे.>>> हे आवडले.

किरण मलाही लेख खूप आवडला... Happy
दिनेश पोस्ट मस्त. खास करून...
मी कायम भारतात येत जात असतो. प्रत्येकवेळी झालेले सकारात्मक बदल मला आनंददायीच वाटतात.
पण त्यांची तुलना मी भारतातली पुर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती अशीच करतो. परदेशातल्या परिस्थितीशी नक्कीच नाही. >> हा पॅरा जास्ती आवडला.. Happy

मंजू, मन्स्मिंचा लेख आता 'ग्रूप' पुरता मर्यादित आहे. परतोनि पाहे ग्रूपची मेम्बर होऊन वाचावा लागेल. तुझ्या पोस्टवरही तिथे प्रतिसाद आलाय.

त्यांची तुलना मी भारतातली पुर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती अशीच करतो. परदेशातल्या परिस्थितीशी नक्कीच नाही. --+१००

थँक्यू वरदा! मी ग्रूपची सदस्य होते तरीही दिसत नव्हता. मग नेहमीप्रमाणे ग्रूपातून बाहेर पडून पुन्हा सामील झाले, मग लेख दिसू लागला.

मूळचा जर्मनीतील मिशीगन विद्यालयात शिकणारा मोर्तिझ एहार्ट हा तरुण स्टुडन्ट एक्स्चेंजअंतर्गत लंडनमधील बॅंकिंग ऑफ अमेरिका अँड मर्लिन लिंच या अमेरिकी बॅंकमध्ये इंटर्नशिप करीत होता. इंटरनेटवरील 'वॉलस्ट्रीट टू एसीस' या वेबसाईटने शेअर केलेल्या माहितीनुसार, हा विद्यार्थी त्याच्या वसतिगृहातील शॉवरखाली त्याच्या सहकाऱ्यांना मृतावस्थेत आढळून आला. सलग तीन दिवस काम केल्यानंतर काल पहाटे सहा वाजता तो स्वत:च्या रुमवर गेला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. सात दिवसांतच इंटर्नशिप संपणार असल्याने हा मुलगा मागील तीन दिवसापासून तो सतत काम करत होता. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

पाश्चिमात्य देशांमध्ये बॅंकींग क्षेत्रात काम करणाऱ्या नवख्या मुलांना अमानुष वागणूक दिली जाते. अनेकदा नवीन मुलांना काम करण्यासाठी रात्र रात्रभर ऑफिसात थांबविण्यात येते. याविषयी एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'अनेकदा शंभरहून अधिक तास ऑफीसमध्ये थांबवून ठेवले जाते. बॅंकिंग क्षेत्रात जास्त कामाच्या तणावाचा लोकांना अंदाज असतो तरी ते या क्षेत्रात येतात. मात्र, एखाद्याचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे.

एक प्रतिष्ठित बॅंकेत काम करणाऱ्या इंटर्नने आपला भयंकर अनुभव सांगितला. 'आमच्या कंपनीत मॅजिक राऊंड अबाऊट सिस्टीम आहे. म्हणजेच आम्हाला सकाळी सात वाजता घरी जाण्यासाठी टॅक्सीचे भाडे दिले जाते. सकाळी सात वाजता वसतिगृहात गेल्यावर आपण घरी जाऊन अंघोळ करेपर्यंत टॅक्सी घराखाली उभी असते. पंधरा मिनिटांत अंघोळ करून खाली उभ्या असणाऱ्या टॅक्सीतून पुन्हा ऑफीसमध्ये सोडले जाते. याला बॅंकेत मॅजिक राऊंड म्हणतात,' असे त्याने सांगितले.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>

धन्य ते परदेश........... Happy

मला पण डींचे तिथले प्रतिसाद आवडले आहेत. खरे तर देश सोडला त्याच परिस्थितीत तो अजूनही आहे सारे लोक तसेच प्रेमळ वगैरे आहेत अशी अपेक्षा, एंटायटलमेंट चे फीलिन्ग का असावी? दोन्ही कडचे फक्त चांगले तेच हवे असे कसे असू शकते? मला तर पॅथेटिक वाट्ते ही मानसिकता. तिथे जाओन इथले सर्व करत राहतात. उपास तापास, गणपती बसवणे अन काय काय ह्याला तिथे काय अर्थ आहे खरेतर पण मनाची समजूत एवढेच. इमिग्रंट लोकांची मानसिकता आहे ही. ना घरका न घाटका.

दिनेशदा >>>एखादी व्यक्ती आपल्या सवयीचा प्रदेश सोडून जाते त्यावेळी बदल हे जाणवणार>>>>>>>सौ टका सच्.....आम्ही india सोडून europe मधे आलो...इथे कितिही प्रगत देश असले तरी आम्हाला अवघडच गेलं..... so i think its not about being just प्रगत or अप्रगत्.....its about being with unknown or new variables...

Pages