मी सर्वप्रथम हे स्पष्ट करतो कि हा बाफ भारतात परतणा-यांचे जे अनुभव इथल्या लोकांना येतात त्यांच्यासाठी आहे. इथल्या लोकांचे काय अनुभव आहेत हे जाणून घेण्यासाठी हा बाफ आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा यात प्रयत्न नाही.
भारतातून परदेशात जाण्याची अनेक कारणे असू शकतात. कुणी कुठे जावे याबद्दल कुणाला आक्षेप असण्याचं कारण नाही. देशप्रेम वगैरे गोष्टी बाजूला ठेवल्या कि संधीच्या शोधात जाणे हे आपण समजू शकतो. पण याच लोकांनी आपलं तिथलं काम संपल्यानंतर भारतात परतताना भारतियांना नावे ठेवणे हे कितपत योग्य आहे ? गावाकडच्या एखाद्या कुटुंबातल्या एखादा सदस्य शहरात जाऊन राहतो तेव्हां त्याचं बरं चाललय ना म्हणून कुणी त्याला रोखत नाही. हा सदस्य हुषार, चुणचुणीत असतो. शहरात राहून पुन्हा गावाची ओढ लागल्यावर तो गावाकडे परतायचा निर्णय घेतो आणि आल्यानंतर गावातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींबद्दल तक्रारी करू लागतो. सुरुवात अर्थातच संडास बाथरूमची सोय नसण्याने होते. गावाकडचे लोक भांबावतात. सुरुवातीला नवं काहीतरी ऐकायला मिळतंय म्हणून भक्तिभावाने ऐकतातही. पण दुस-या गावातल्या अशाच कुटुंबात असाच अनुभव आल्याच लक्षात येतं. गावात सुविधा मिळत नाहीत म्हणून बसता उठता चीडचीड करणारा हा सदस्य चांगली तीन चार वर्षे झाली तरी रूळतही नाही, प्रतही जात नाही आणि बदल व्हावेत म्हणून स्वतःही काही करत नाही आणि कसे करावे याबद्दल सांगतही नाही यामुळे नाही म्हटलं तरी घरचे इतर लोक हळूहळू चिडू लागतात. शेवटी कुणीतरी विचारतचं तू इथून जाण्यापूर्वी तुला गावात काय असतं याबद्दल कल्पना नव्हती का ? मग आता आल्यावर का स्वतःला आणि इतरांना त्रास देतोस ? तू आल्याबरोबर अचानक गाव कसं बदलेल ? तुला शहरातल्या सुधारणा इथे आणायच्या असतील तर तू पुढाकार घे , आम्ही आहोत तुझ्यासोबत..
गावोगावी असे परतणारे लोक असतात. त्यातले काही गाववाल्यांच्या आवाहनाचा अर्थ समजावून घेवून आपणही काही देणं लागतो या भावनेने यथाशक्य काम करतात. ज्यांना शक्य नाही त्यांची चीडचीड कमी होते. पण काहीं यातलं काहीच न करता गावाला कर देतोय ना मी मग मला शहरातल्या सुविधा इथं मिळायला काय हरकत आहे ? तुम्ही नागरीक म्हणून कधी सुधारणार हे पालुपद चालूच ठेवतो.
परदेशातून भारतात परतणा-यांचेही असे वेगवेगळे अनुभव येतात. त्यात मुख्यत्वे आम्हाला इथे आल्यावर किती त्रास होतो हा आरोप असतो. तेव्हां आपल्याला असेच प्रश्न पडतात. परतण्याच्या आधी या लोकांना काहीच कल्पना नव्हती का ? याच देशातून गेलेले असल्याने इथल्या अडचणींबद्दल अनभिज्ञ असल्याच्या थाटात काहिंचे चिडणे, आदळआपट करणे हे समजण्याप्लिकडे असते. यातले काही लवकरच रूळतात. अॅडजस्ट करून घेतात. पण तीन चार वर्षे झाल्यानंतरही नकारात्मक अनुभवांचा पाढा वाचणा-यांबद्दल इथल्यांना आश्चर्य का वाटू नये ? इथे लोकांना सिव्हीक सेन्स नाही हे कुणीच अमान्य करत नाही. पण तो बदलण्यासाठी काहीही न करता निव्वळ टीका करण्याच्या वृत्तीबद्दल भारतियांना काय वाटतं ? मुळात सगळेच भारतिय समाजाच्या बदलण्यासाठी काही झपाटून कार्य करताहेत असं अजिबात नाही. पण रहदारी सुधारण्यासाठी काम करणारी संस्था आहे, हे लोक टॅक्सपेयरही आहेत आणि तरीही सामाजिक बांधिलकी म्हणून बदल होण्यासाठी काम करतात. पर्यावरणाच्या -हासासाठी काम करणारे लोक आहेत. अंधश्रद्धा कमी व्हाव्यात म्हणून काम करणारे लोक आहेत. शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून काम करणारे लोक आहेत. जातीयतेच्या विरुद्ध काम करणारे लोक आहेत. कष्टक-यांसाठी लढे देणारे लोक आहेत. आपापले काम सांभाळून, कर भरूनही असे काम करणारी लोक जगात सर्वत्र आहेत. त्यातूनच देश घडतात. युरोप अमेरिकेतल्या सुविधांचे गोडवे गाणा-यांनी ते नक्कीच गावेत. पण हे देश या स्टेजला पोहोचण्यासाठी त्यांच्याकडे जे काही बदल झाले असतील, संक्रमणे झाले असतील त्यात आपल्या या भारतियांचं योगदान किती ? ते तिथं गेले तेव्हा ऑलरेडी या सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध होत्या, एक प्रगत समाज त्यांना दिसत होता.
आता भारतात परतल्यावर यांना ठळक बदल जाणवायला लागले म्हणून बदल कसे होणार ? या बदलायच्या प्रोसेसबद्दल त्यांना काही एक ऐकून घ्यायचं नसतं (अपवाद अर्थात आहेत). फक्त चिडचिड करायची असते. याट रस्त्यावर थुंकणे, रहदारीचा बट्ट्याबोळ, वेळ न पाळणे, रस्त्यावरचे खड्डे आदी बाबींचा समावेश असतो. सरकारी भ्रष्टाचाराबद्दल तर इथलेही लोक हैराण आहेत. पण तुम्ही कसे काय राहता बुवा या घाणीत हा सूर ब-याच जणांमधे आढळतो. मग हा परत का जात नाही हा प्रश्न मनात उभा राहतो. पण त्याच्याचसारखं स्पष्ट विचारलं कि तुम्ही न बदलणारे, टीका सहन न होणारे ठरता.
थोडक्यात हे अंगाला तेल लावून आलेले पहिलवान असतात. हे कुस्तीचा आव आणणार पण कुठेच तावडीत सापडणार नाहीत. याउलट कधीही असुविधा न पाहीलेले अमेरिकन्स / युरोपियन्स कसलीही कुरकुर न करता इथल्या अनुभवांना सामोरे जाताना दिसतात. प्रसंगी त्यात बदल घडवून आणतात. उत्तरांचल मध्ये झालेल्या अभूतपूर्व संकटानंतर भारतियांनी केलेला कचरा साफ करण्यासाठी एक ब्रीटीश मुलगी तिथे येऊन कचरा स्वतः साफ करू लागली. तिला असं काम करताना पाहून स्थानिकांना योग्य संदेश गेला. ते देखील तिच्या कार्यात सहभागी झाले. सरतेशेवटी हे आपलं काम ती करतीये या जाणिवेने रिलीफ कँप आणि लगतचा परीसर स्वच्छ झाला. नुसत्या टीका करणा-या सोकॉल्ड फॉरिन रिटर्न्र्ड मंडळींच्या पार्श्वभूमीवर हा अनुभव आश्वासक नाही का ? त्या मुलीला तिच्या देशात आणि आपल्या देशात असलेला फरक जाणवला नसेल का ? कि ती टीका करत बसली.
ते देश प्रगत असण्याचं कारण म्हणजे परिस्थिती कशी बद्लावी याचं त्यांना असलेलं भान हे होय. स्वतःपासून सुरुवात केल्याशिवाय बदलाला सुरूवात होत नाही हे तिला माहीत आहे.
- इराणमधे गेलेल्या एका अमेरिकन महीलेने तिथल्या अस्वच्छतेबद्दल तक्रार न करता स्वतः झाडू आणि पोछा घेऊन संडास बाथरूम साफ करण्यापासून स्वच्छतेला सुरुवात केली.
- इथे काही ऑटोमोबाईल कंपन्यांमधे काम करणारे अधिकारी आहेत. यायच्या जायच्या रत्स्यावर लागण-या जामचे कारण शोधून काढून एका चौकातल्या व्यावसायिकांना थोडे मागे हटून चौक मोकळा करण्यासाठी त्यांनी आर्थिक आणि इतर मदत केली.
- माझ्या मित्राने शिरूर तालुक्यातल्या स्वच्छ पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्यासाठी रिक्षावर पाणी स्वच्छ करण्याची यंत्रणा उभारली. या उपक्रमाचं ट्रेनिंगही ते केंद्र सरकारच्या सहाय्याने देत असतो. त्याच्या या पायलट प्रकल्पाचा मी देखील एक हिस्सा आहे. अशा काही उपक्रमामधे अनेक भारतीय असतात जे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करीत असतात. स्वतःबद्दल खरं तर लिहू नये या मताचा मी आहे.
- याच मित्राचं आणखी एक मोठं काम आहे. कारखान्यालगतच्या गावांमधे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देऊन रोजगार दिला. वैशिष्ट्य म्हणजे बचत गटाच्या सर्व महिलांना संधी मिळावी म्हणून आठ तासांची शिफ्ट स्पेशल केस म्हणून चार चार तासांच्या दोन टप्प्यात केली आणि पहिल्या शिफ्टमधे काहींना आणि दुस-या शिफ्टमधे काहिंना सामावून घेतले.
- अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यात सक्रीय सहभाग. त्याची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला होता, पण एकंदरीतच या प्रसिद्धीच्या प्रकाराला त्याचा नकार आहे.
- सातारा तालुक्यातल्या एका निवृत्त शिक्षकाने आपली ग्रॅच्युइटीची रक्कम आणि पेन्शन विकून येणारी रक्कम खर्चून अनाथ आणि अतिमागास मुलांसाठी वसतीगृहे बांधली. रयतच्या परंपरेत बसणारं हे काम आहे.
- नगर जिल्ह्यात एका शेतक-याने ३३ वर्षे राबून डोंगर फोडून एकट्याने रस्ता केला. या रस्त्यामुळे गावक-यांचा तेवीस किमीचा वेढा वाचला. शासनाला बोल लावून अनेक ठिकाणी प्रश्न प्रलंबित असताना या ग्रामस्थाला बोल लावले नाहीत म्हणून दोष द्यायचा कि एव्हढे मोठे काम करूनही लोकांना तो फ्री वापरावयास दिल्यावद्दल सत्कार करायचा ? अशाच प्रकारे अनेक ठिकाणी श्रमदानातून पाणतळी, रस्ते अशी कामं झाल्याची अनेक उदाहरणं आहेत.
- आठवतील तशी उदाहरणं इथे अपडेट करीनच.
ही गोष्ट ऐकूनही न घेणा-या, आपला देश काय आहे आणि कुठे आहे याचं भान विसरलेल्या आणि पैसे फेकतोय ना मग या सुविधा का मिळत नाहीत असा सूर अस्णा-या भारतियांबद्दल काय वाटते ? ज्यांना काँट्रीब्यूट करायची इच्छा नाही त्यांच्या येण्याने इतरांना काही फरक पडणार आहे असं वाटतं का ? किमान आपल्याला ज्या देशात परतायचं आहे तिथे मिळून मिसळून राहून चांगले बदल घडवूयात हा बेसिक विचार करता न येणा-यांच्या स्वागतासाठी कुणी उत्सुक असेल का ?
( सकारात्मक रित्या भारतात परतणारे लोक आहेत. त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मनापासून माफी मागतो).
लोकहो, कृपया खालील मुद्यांचा विचार करावा.
१. धागा परतोनि पाहे मधून कोतबो ग्रुपमधे हलवण्यात आलेला आहे.
२. पूर्ण वाचल्याशिवाय प्रतिसाद देऊ नयेत. द्विरुक्ती होण्याची शक्यता आहे.
३. दुस-या कुठयाही धाग्याचा विचार या धाग्यावर करण्याची आवश्यकता नाही. हा विषय स्वतंत्र आहे.
किरणु, मनस्मि यांच्या बाफ़वर
किरणु,
मनस्मि यांच्या बाफ़वर लिहिलेलाच मुद्दा परत इथे वेगळ्या ऍंगलने लिहिते. तुम्ही कोण लागून गेलात अख्ख्या भारताच्या वतीने बोलणारे? तुमचे जे काय अनुभव असतील ते मांडा; त्याला कुणाचा काय विरोध असायची गरज नाही. पण दरवेळेला हा जनरलायझेशनचा हट्ट कशाला? तुम्हाला भेटलेल्या दोन की तीन फ़ॅमिलीवरून अख्ख्या “परतणार्या” (यात ते अमेरिकेचेच आहेत हे गृहित धरून) कम्युनिटीला का विनाकारण झोडपत सुटलाय? त्यांचे अनुभव त्यांच्यापाशी, जसे तुमचे अनुभव तुमच्यापाशी. तुम्ही कधी अमेरिकेत गेलात का? नाही ना!! मग त्या लोकांच्या अनुभवांशी बरोबरी करण्याची काय गरज? हे म्हणजे एकही तमिळ सिनेमा न बघता “तमिळ सिनेमा म्हणजे मारामारी” असं सगळीकडे ठोकत सुटायचं. बघा आधी २०-२५ सिनेमा, त्याचे जॉनर बघा आणि मग द्या की अशी विधाने लिहून. ते चिन्मय, फ़ारेन्ड आणि इतरांनी लिहिलं ना त्याला म्हणूनच लोकांनी “योग्य पोस्ट” असा रीप्लाय दिला. तुमच्यासारखा आक्रस्ताळेपणा नाही केला त्यांनी.
एवढाच जनरलायझेशनचा सोस असेल तर करा एखादा सर्वे. बघू या काय निष्कर्ष निघतोय ते. उगाचच या त्या बाफ़वर बोलत सुटायचं, कुणी काही तुम्हाला विरोधी लिहिलं की हास्यास्पद डुआयडी घ्यायचे आणि मायबोलीभर बोंबलत सुटायचं. काही सुचलं नाही की नवीन धागा काढायचा. आणि तिथे एकच पीटपीटपीट लावून ठेवायची. आहात ना फ़ार मोठे देशप्रेमी, मग तो वेळ लावाकी देशाच्या कार्यासाठी. कशाला या फ़ालतू मायबोलीसाईटवर येता? अमेरिकेतल्या माणसानेच ही साईट चालू केली आहे.
आता यानंतर आक्रस्ताळेपना गुणिले हजार चालू होइलच तुमचे. त्यासाठी शुभेच्छा.
एवढाच जनरलायझेशनचा सोस असेल
एवढाच जनरलायझेशनचा सोस असेल तर करा एखादा सर्वे. बघू या काय निष्कर्ष निघतोय ते.>> अगदी अगदी!! त्या सर्वे मधल्या लोकांचा मानसशास्त्रीय सर्वे पण करा. कम्प्लेन करणारे सगळीकडे कम्प्लेनच करतात भारतात काय अमेरिकेत काय फ्रांस काय घाना काय!! हा विषय भौगोलिक सीमारेषांचा कमी आणि मानसिक कक्षांचा जास्त आहे. एरवी कम्प्लेन न करणारे पण भारताविषयी कम्प्लेन करणारे जन्माने भारतीय पण परदेशात राहून गेलेले चौकोनी कुटुंबातील लोक किती आणि त्यांची कम्प्लेन इतरांना जाचक व्हावी इतका काय तो कम्प्लेनचा विषय हा खरेच मला प्रश्न आहे.
नंदिनीच्या पोस्टला
नंदिनीच्या पोस्टला +१
आक्रस्ताळेपना गुणिले हजार चालू होइलच >> चालेल. तसाही वीकेंडचा काही वेगळा प्लान नाहीये!
तुम्ही कोण लागून गेलात
तुम्ही कोण लागून गेलात अख्ख्या भारताच्या वतीने बोलणारे? >> असं कुठं म्हटलय दाखवा.
पण दरवेळेला हा जनरलायझेशनचा हट्ट कशाला? >> कुठे केलाय जनरालझेशनचा हट्ट ? तो तुमचा समज आहे. मी तर हा क्लेम केलाच नाही. पण त्या धाग्यावर पन्नासावी पोस्ट माझी असेल तोपर्यंत कुणीही त्याच्याशी सहमत नव्हतं. ते काय माझे ड्युआय आहेत का ?
तुम्हाला भेटलेल्या दोन की तीन फ़ॅमिलीवरून अख्ख्या “परतणार्या” (यात ते अमेरिकेचेच आहेत हे गृहित धरून) कम्युनिटीला का विनाकारण झोडपत सुटलाय? >> तुम्हाला वाचता येत असेल असं गृहीत धरतो. आधी सकारात्मक अनुभव लिहीला. सुनिधींनी विचारलं म्हणून नकारात्मक अनुभव लिहीला. यात जनरलायझेशन कसं ? तुम्ही काहीही न वाचता बीपी वाढला म्हणून काहीही प्रतिसाद दिलाय. तुमच्या बाफवर मात्र कुणी सर्वच प्रतिक्रिया वाचलेल्या नाहीत, लेखावरची ही प्रतिक्रिया असं प्रामाणिकपणे सांगून प्रतिक्रिया दिली तर तिथे का नाही वाचल्या ? निघा इथून आणि आम्हाला एकटं सोडा या छापाची उत्तरं देता. बाफावरचे नियम बदलत बसता. बरेचदा तुम्ही जोरजोरात ओरडून टंकता कि काय असं वाटतं अशा प्रतिकिया वाचताना.
तुम्ही कधी अमेरिकेत गेलात का? नाही ना!! >> परदेशात गेलेलो नाही हे कशावरून ठरवलंय ? मायबोलीवर सांगितलं नाही म्हणून? प्रवासवर्णन टाकायला हवं असा नियमबियम आहे कि तुम्हाला कळवायला हवं असा ?
हे म्हणजे एकही तमिळ सिनेमा न बघता “तमिळ सिनेमा म्हणजे मारामारी” असं सगळीकडे ठोकत सुटायचं. बघा आधी २०-२५ सिनेमा, त्याचे जॉनर बघा >> साउथ स्पेशल नॉन सेन्स अॅक्शनचा अर्थ प्रत्येक तमिळ सिनेमात मारामारी असा होतो का ? तसं असल्यास तुमच्या आकलनशक्तीला पुन्हा एकदा दाद देतो. ( नाहीतरी हल्ली टीव्हीवर फक्त डब झालेले तमिळ सिनेमेच चालू असतात. आज का गुंडा, गुंडा नं वन, असली राऊडी, सिंघम नं १, मुंबईकी गुंडी, किरण बेदी कि कहानी, फिर वही डर, डॉन नं. १, सूर्या, सूर्या नं. १ इ. इ. शंभरेक तरी असतील. इतके पुरेसे ना ? )
चिन्मय, फ़ारेन्ड आणि इतरांनी लिहिलं ना त्याला म्हणूनच लोकांनी “योग्य पोस्ट” असा रीप्लाय दिला. >> त्यांच्या पोस्टी नेहमीच संतुलित असतात.
तुमच्यासारखा आक्रस्ताळेपणा नाही केला त्यांनी. >>> हे तुम्ही सांगताय ? अहो भाग्यं. ओसामा बिन लादेनने मौजे तक्रारवाडीतल्या एका किरकोळ भांडणात अटक झालेल्या तरुणाचं कौतुक करावं तसं वाटलं. गहिवरून आलं.
एवढाच जनरलायझेशनचा सोस असेल तर करा एखादा सर्वे. >> पुन्हा एकदा तुम्ही वाचत नाही ते नाही, वर आकलनश्क्तीच्या मर्यादा.! जनरलायझेशनचा सोस कुठं केलाय हे जरा दाखवून द्या. मग सर्वे का करायचा हे पाहू ना ! (उपहास तुम्हाला समजावून सांगावा लागतो हा अनुभव नवीन नाही).
काही सुचलं नाही की नवीन धागा काढायचा. >> मायबोलीवर सवात जास्त धागे तुमचे आहेत आणि न आवडलेल्या पोस्टना आक्रस्ताळेपनाने उत्तर देण्यात क्रमांक एक असा तुमचा लौकिक आहे. बेताल, बेछूट विधानं आणि अंगावर आल्यासारखं भांडणार व्यक्तीमत्व हा तुमचा लौकिक झालेला आहे. इतरांना झापायचं लायसेन्स मिळाल्यासारखं तुम्ही गावभर बोंबलत फिरत असता. तुम्हाला कुणी प्रत्त्युत्तर दिलं तर मात्र अहो अॅडमिन, अहो अॅडमिन, अहो अॅडमिन, अहो अॅडमिन, अहो अॅडमिन, अहो अॅडमिन, अहो अॅडमिन, अहो अॅडमिन, अहो अॅडमिन, अहो अॅडमिन म्हणून करुण टाहो फोडता. यावरून तुमचं टोपणनाव अहो अॅडमिन पडलेलं आहे (मी नाही, प्लीज नोट). उर्मटाशी उर्मट हा बाणा असल्याने कधीतरी जशास तसं उत्तर देणार हा विश्वास ठेवा. अनेकदा चुप बसलो तर अनुल्लेख करतो म्हणून ओरडता, तर कुठे काही लिहीलं तर आयडी बघितल्याबरोबर तुमच्या तळपायाची शीर मस्तकात जाते. हा तुमचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही.
नाईलाजाने लिहीतो. तुमच्या एका पोस्टमधे झक मारली आणि ...अशी भाषा चक्क आहे. आणि तरीही तुम्ही स्वतःला आक्रस्ताळ्या या कॅटॅगरीत समजत नाहीत. ज्याला उद्देशून तुम्ही ती भाषा (माझ्या मते असभ्यच) वापरलेली आहे तो मनुष्य शांत आणि संतुलित लिखाणासाठी प्रसिद्ध आहे. त्याने बिचा-याने त्याच्या सगळ्या पोस्टस डिलीट केल्या. तुम्ही त्याची माफी देखील मागायचं सौजन्य दाखवलेलं नाही अद्याप. कारण स्वतःचं चुकतं हे तुम्हाला कधीही समजणार नाही. तुम्ही फक्त आणि फक्त योग्य असता. शांत आणि संतुलित लिखाणाला तशीच ट्रीटमेंट मिळेल ही गॅरण्टी तुमच्याकडे नाही. सिनेमा या विषयावर जगातले सगळे राईटस तुमच्याकडे आहेत असं तुमचं वागणं असतं. तुमच्याशी असहमत होताना कितीही सभ्यपणे एखादी ओळ जरी प्रतिवादात लिहीली तरी आग्यामोहोळ उठल्याप्रमाणे दंश करत सुटता. हे नेहमी कसं चालेल हो ?
आताही तुमचंच योग्य असं मी म्हणतो. तरीदेखील तुमची पुढची पोस्ट येणार नाही याची खात्री नाही. आणि ती तुमच्या मते संतुलित असेल.
आहात ना फ़ार मोठे देशप्रेमी, मग तो वेळ लावाकी देशाच्या कार्यासाठी. >>> तुम्ही देशप्रेमी नाहीत का ? असल्यास तुमच्या कार्याचा आदर्श घेईन. नसल्यास तुमचा सल्ला द्यायची लायकी नाही.
कशाला या फ़ालतू मायबोलीसाईटवर येता? >>> ही वेबसाईट फालतू आहे असं या लेखात कुठं म्हटलंय हे दाखवून द्या. नाहीतर माफी मागा. तुम्ही इतरांना ज्या पद्धतीने बोलता त्याहून अधिक गंभीर चुका तुम्ही केल्या तर त्या क्षम्य ठरतात का ? या विषयावर माफी मागितली नाहीत तर एक स्वतंत्र बाफ सुरू करेन. स्वतःला पत्रकार म्हणवून घ्यायचा इतकाच सोस असेल तर माध्यमात व्यक्त झालेल्या मतांशी कुणी सहमत नसेल तर त्याने येऊ नये असं तुमचं म्हणणं असल्याचं वाटतंय. आम्ही इथे बसून वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकाच्या वेबसाईटवर न पटलेल्या लिखाणावर प्रतिक्रिया देतो. तुमच्या पोटात दुखायचं कारण काय ? आधी आपण काय बोलतो, काय बोलायचंय हे तर लिहीता आलं पाहीजे. एव्हढ्या भारी पत्रकार असता तर आज इथे वेळ घालवत बसला नसता. बरखा दत्तच्या बाजूला दिसला असता.
अमेरिकेतल्या माणसानेच ही साईट चालू केली आहे. > बरं बरं. तुम्हाला हे त्या अमेरिकेतल्या माणसाने लिहायला सांगितलंय का ? मला तरी वाटत नाही.
आता यानंतर आक्रस्ताळेपना गुणिले हजार चालू होइलच तुमचे. त्यासाठी शुभेच्छा. >> कोण बोलतंय
सिमन्तिनी बोधकथा तुम्ही कशी
सिमन्तिनी बोधकथा तुम्ही कशी समजून घेता हे महत्वाचं वाटतं मला. वडापाव विकणा-याची कथा ही एक केस स्टडी म्हणून शिकवतात. तिथे दोन उदाहरणांची सरमिसळ करून चालेल असं तुम्हाला वाटतं का ? बघा विचार करून.
मी तर कबुली देऊन टाकलीये. आता नेमका काय प्रॉब्लेम आहे लोकांना ? काहीही समजत नाहीये. बरं कुणी स्वतःहूनही पर्याय सांगत नाहीये.
या बाफवर नक्की काय लिहिणं
या बाफवर नक्की काय लिहिणं अपेक्षित आहे, याबाबत माझा गोंधळ उडाला आहे. माझा प्रतिसाद अयोग्य वाटल्यास कृपया अनुल्लेख करा.
स्वातंत्र्यानंतर भारतानं अनेक क्षेत्रांत प्रगती केली. खुल्या आर्थिक धोरणाच्या अवलंबानंतर भारतीयांकडे भरपूर पैसाही आला. अनेक राज्यांमधले तरुण परदेशी गेले, त्यांच्या आईवडलांकडेही मग पैसा आला. आपण प्रगती पैशात मोजतो, त्यामुळे आपली प्रगती झाली, असं आपण समजू. पण आपल्या वागण्याचं काय? आपली जीवनशैली वर्तनवादी आहे. म्हणजे 'अमूक एक करा', 'अमूक एक बना' असं आपल्याला सांगितलं जातं, आणि आपण तसं करतो किंवा बनतो. हे अगदी लहानपणापासून घडतं. 'विचार करा' हे वर्तनवादी जीवनशैलीत बसत नसल्यामुळे आपण विचार मात्र करत नाही.
या विचार न करण्याच्या सवयीमुळे आपल्याकडे आलेला पैसा हाताळायचा कसा, हे आपण शिकलो नाही. आपल्या आधीच्या पिढीकडे इतका पैसा नसल्यामुळे नंतरच्या पिढ्यांना आपण हे शिकवावं, हे काही त्यांच्या ध्यानी आलं नाही. आणि स्वतःहूनतर आपण काही शिकत नाही, कारण आपल्याला तशी सवयच नाही.
आपली प्रगती झाल्यामुळे सगळं चकचकीतझगमगीत झालं. आपण चंद्रावर पोहोचलो. रोज नारळ फुटत असल्यामुळे लवकरच मंगळावरही नक्की पोहोचू. पण या चंद्रामंगळावरच्या मोहिमांचा, मुंबईहून पुण्याला लवकरात लवकर पोहोचवणार्या रस्त्यापुलांचा उपयोग काय, जर रस्त्यावर पडलेल्या माणसाला बघणारी गर्दी त्याला दवाखान्यात नेत नसेल? 'रिक्शाचालकाचा मुलगा सीए झाला', 'भाजीविक्रेतीची मुलगी डॉक्टर झाली' या बातम्या अभिमानास्पद आहेतच, पण याच वेळी जर उत्तर भारतात घरकामासाठी मुलींची विक्री होत असेल, तर अशा दोनचार उदाहरणांचं कौतुक का वाटावं? देशाच्या महत्त्वाच्या खुर्च्यांवर आज महिला आहेत. पण गेले चार महिने मी 'लोकसत्ता' (पुणे आवृत्ती) आणि 'डीएनए (पुणे आवृत्ती) या दोन वृत्तपत्रांमधल्या बलात्कारांच्या बातम्यांची आकडेवारी ठेवतोय. १ मे, २०१३पासून आजच्या दिवसापर्यंत या दोन्ही वृत्तपत्रांमध्ये बलात्कारांच्या एकूण ११७३ बातम्या छापून आल्या.
रस्त्यावर न थुंकणे, कचरा न टाकणे, सिग्नल पाळणे या फार लहान बाबी आहेत. आपल्याला अनेक मोठ्या गोष्टी अगोदर दुरुस्त करायच्या आहेत. सर्वांत मोठी गोष्ट कुठली? तर माणसाची आणि पैशाची किंमत करणे. माणसाची किंमत करता आली, तर बर्याच गोष्टी सोप्या होतील. 'शिकवणं' हे पुन्हा वर्तनवादी झालं. त्यामुळे ही जाणीव प्रत्येकाला व्हायला हवी, असं मला वाटतं.
पैशाचं हिडीस प्रदर्शन ही अजून एक गंभीर बाब. आपण 'देणारे' असतो, तेव्हा आपल्याला भ्रष्ट व्यवहार खुपतो. पलीकडच्या बाजूला असताना आपण तो आपला हक्क समजतो. काय 'चांगलं' आणि काय 'वाईट' याचा त्यामुळे विचार केला जावा. सोन्याचे साखळदंड, कडी घालून मिरवणारे पूर्वी एखाददोन होते. आता एकदोन हजार आहेत. 'त्यांच्यासारखंच मलाही व्हायचंय' ही भावनाही रुजत चालली आहे. कारण या सोन्याच्या साखळदंडांना मिळणारा सन्मान सर्वांसमोर आहे. या सन्मानातूनच माज आला आहे. हा माज मग रोजच्या वागण्यातून समोर येतो. आपण सारेच हा माज करतो. माज किती यात उन्नीसबीस असतं, इतकंच. या माजापोटीच मग आपण वाहतुकीचे नियम पाळत नाही, रस्त्यावर पचक्कन थुंकतो, सिनेमेनाटकं बघताना इतरांचा रसभंग करतो, अधिक पैसा आणि पर्यायानं अधिक मान कसा मिळवता येईल हे पाहतो. अधिक पैसेवाल्याला अधिक मान देतो.
मला रस्त्यांवर खड्डे असले तरी चालतील. पण माझ्या मैत्रिणीला, मुलीला रात्रीअपरात्री घरी सुरक्षित परतता यायला हवं. मला पार्किंगला जागा मिळाली नाही तरी चालेल, पण माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीला काही दुखलंखुपलं तर रुग्णवाहिकेला लोकांनी मोकळी वाट करून द्यायला हवी.
ज्या देशात माणसांना आणि पैशाला किंमत असेल, त्याच देशात कोणीही आनंदात राहू शकतो. चारदोन तथाकथित प्रगतीच्या उदाहरणांनी जरा फुशारल्यासारखं वाटेल, पण रोजच्या पेपरात आठदहा बलात्काराच्या, कुपोषणामुळे मृत्यूच्या, मंत्र्यांच्या बेमूर्वतखोरीच्या, सामान्यांच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या असतीलच. त्या बातम्यांमध्ये कधीतरी आपणही असू शकतो, ही जाणीव भीतीदायक आहे.
चिनूक्स आपल्याला बरेच अनुभव
चिनूक्स
आपल्याला बरेच अनुभव येत असतात. बरेचदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. नकारात्मक विचारांचा आदर करावा. पण अती तिथं माती या न्यायाने वडापाव वाल्याचं उदाहरण इथं दिलय. आपल्यासारख्या देशात पहायला गेलं तर सकारात्मक खूप आहे आणि तिथं तिथं त्या प्रत्येकाने काँट्रिब्युट केलं असल्याने. यातल्या कित्येकांना परदेशातून परत न येता जीवन सुसह्य करता आलं असतं. भारतातल्या असुविधांना घाबरून इतरांना आपले नकारात्मक अनुभव सांगता आले असते. ते जर असा विचार करून परतलेच नसते तर ?
मी आता पुन्हा एकदा डॉ नरेंद्र दाभोळकरांची मुलाखत पाहिली. तुझा तर व्यक्तिगत संपर्क आहे. जाहीरातीचा मुद्दा सांगताना त्यांनी माझ्या मासिकात जाहीरात देऊन तुम्हाला काही फायदा नाही हे सांगूनही त्यांना जाहीराती मिळतात हे सकारात्मकतेचं उदाहरण दिलं. पहायला गेलं तर चांगलं दिसतं. सिंहगडाचा कायापालट साध्या लोकांनी केला हे दिसतच दिसतं. पण ते सोडून कार पार्किंग मिळत नाही हे उदाहरण देऊन परतू नका असा सल्ला देणं हे एकांगी, निराशात्मक आणि नकारात्मक असं वाटत असेल तर ते देखील एक मत आहे हे का नाही अॅ़सेप्ट व्हावं ? सिंहगडावरची विकासकामं ही लपून राहीलेली गोष्ट नाही तेव्हां त्यामुळे शितावरून भाताची परीक्षा नाही होणार ? कुणाला यायचं कि नाही हा त्याचा वैयक्तिक भाग आहे. पण हे चित्र एकांगी वाटते आहे असं नोंदवणं एखाद्याला गरजेचं वाटतं.
आता इथल्या गैरसोयींबद्दल जे बोल लावले जातात ते प्रत्यक्ष आयुष्यात देखील अनुभवायला मिळतात. पण बोल लावल्याने चिडचिड केल्याने परिस्थिती कशी सुधारेल हेच मी आणि अनेक जण पहिल्यापासून विचारत आहेत. हे विचारलं तर टीका झोंबते का असा प्रश्न विचारता येऊ शकतो का ? आणि तसं विचारणं हे आक्रस्ताळेपणामधे मोडत नाही का ? आधी कळत नव्हतं का असं विचारणं म्हणजे या गोष्टी चुटकीसरशी करण्यासारख्या असताना लोक जाणूनबुजून ते करत नाहीत असं वाटतं. टीका करण्याआधी मार्गदर्शन करता यावं हे आपल्यापेक्षा जास्त हुषार लोकांकडून अपेक्षित असतं.
मी आधीच म्हटलय केवळ परदेशात आहे म्हणून आपल्याकडे हवं हा अट्टाहासही नको. मला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम नेहमीच प्रेरणादायी वाटलेलं आहे. निरंतर प्रबोधन आणि जागृती हा बदलाचा पाया आहे. तो बदल कसा हवा हे आपलं आपण ठरवायचं. माझ्या मते तू जे सांगतो आहेस तेच मी सांगितलं असतं. पण वेळ मिळाल्यावर संदर्भ देऊन सांगितलं असतं.
निव्वळ चिडचिड करणे आणि दर पंधरा दिवसाला भारतियांवर टीका करणा-या बाफांवर उपहासात्मक पोस्टस लिहीत रहाणे हे देखील कुठेतरी थांबायला हवं यासाठी थेट लिहीलं नाही. उर्मटाशी उर्मट हा माझ्या व्यक्तिमत्त्वातला दोष आहे हे मी मान्य करतो. उगाचच कुणालाही तसं ऐकवत नाही. नुकत्याच एका बाफावर झालेल्या रणकंदनात मी दोन्ही बाजुंनी वाद थांबवावा असं आवाहन केलं होतं. त्यानंतरही तो वाद हिरीरीने चालूच राहीला. इतकी टीका करून देखील पुन्हा पुन्हा भारतातल्या परिस्थितीवर टीका कराविशी का वाटावी ? बरं आपण काही देणं लागतो असं आजवर कुणाच्याही कुठल्याच पोस्टमधून दिसून आलेलं नाही. मग हे कुणी करायचं हा प्रश्न उभा राहतो.
हे जे कुणी आहे त्यांना या नकारात्मक विचारांऐवजी सकारात्मक पोस्टस आवडल्या असं मला वाटतं.
बदल घडवून आणण्यासंदर्भात वर आलंच आहे.
चिनूक्स महिलांवरचे अत्याचार -
चिनूक्स
महिलांवरचे अत्याचार - शरम वाटतेच. कारण या देशाशी बिलाँगिग आहे. पण ही परिस्थिती सुधारावी म्हणून निषेध मोर्चे काढणारे, सरकारला धारेवर धरणारे, आख्ख्या देशभर रान उठवणारे, खैरलांजीच्या घटनेत सहा महीने घरदार, धंदा बाजूला ठेवून प्रश्न लावून धरणारे (नाईलाजाने सांगतो यात माझाही सहभाग होता) हे लोक कुठून येतात ? कुणाच्या प्रयत्नाने बदल होतात ?
निव्वळ कडेला बसून एखाद्या गोष्टीचं भांडवल करून बोल लावण्याने हे बदलेल असं वाटतं ?
माझा या बाफवरचा सहभाग संपला.
<निव्वळ कडेला बसून एखाद्या
<निव्वळ कडेला बसून एखाद्या गोष्टीचं भांडवल करून बोल लावण्याने हे बदलेल असं वाटतं ?>
नाही बदलणार. पण बदलासाठी आधी आपल्याला काय बदलायचं आहे, हे माहीत नको का? चेहर्यावर पुटकुळ्या असतील, तर चेहर्यावर मेकअपची पुटं चढवायची की पुटकुळ्यांचं कारण शोधून त्यावर उपचार करायचे? दीर्घकालीन फायदा कशात? उद्या सिंहगडाशेजारी दहा मजली पार्किंग लॉट उभा केला, तरी त्यामुळे समस्या सुटणार आहे का? नाही. कारण आपण कधी, कुठे गाडी न्यायची, हे आधी कळायला हवं. 'विकास' म्हणजे काय, हे बघायला हवं. कशाचा 'विकास' करायचा, याचा सारासार विचार व्हायला हवा. डोंगरावर जायला चकचकीत रस्ते बांधले, पार्किंगला भरपूर जागा उपलब्ध करून दिली, हॉटेलं बांधली म्हणजे विकास झाला, असं नाही. गावोगावी संत गाडगेबाबा अभियान राबवलं, तरी कचरा दिसतोच. नगरपालिकेनं कचरा उचलणार्या कितीही गाड्या फिरवल्या, तरी जोपर्यंत आपण रस्त्यावर कचरा करू नये, ही जाणीव होत नाही, तोपर्यंत फायदा नाही. माझं म्हणणं इतकंच की वरवरची मलमपट्टी उपयोगाची नाही. चुका दुरुस्त करायच्या असतील, तर आधी काय, का आणि कसं चुकतं ते शोधायला हवं. वर आलेली अनेक उदाहरणं ही मला अशा मलमपट्ट्यांची वाटतात. हा माझ्या विचारसरणीचा दोषही असू शकतो.
एखाद्या मुद्द्यासाठी लढणार्यांबद्दल माझ्या मनात अतीव आदर आहे. आयुष्यभर असा संघर्ष करणार्यांच्या निष्ठांबद्दलही मला शंका नाही. पण मोर्चे, निदर्शनं यांचा आता उपयोग होईल, असं मला वाटत नाही. नाहीतर दिल्लीच्या घटनेनंतर बलात्काराच्या घटना कमी झाल्या असत्या. पण तसं झालं नाही. दलितांना अजूनही नग्न केलं जातं. जाय पंचायती अजूनही निष्पापांना फासावर लटकवतात.
बाकी, या चुका शोधणं, त्या दुरुस्त करण्याचा उपाय शोधणं, उपाय सापडल्यावर कार्यवाही करणं, ही जबाबदारीही या देशाचा एक नागरिक म्हणून माझीच आहे. मी केवळ तक्रार करून उपयोग नाही.
चेहर्यावर पुटकुळ्या असतील,
चेहर्यावर पुटकुळ्या असतील, तर चेहर्यावर मेकअपची पुटं चढवायची की पुटकुळ्यांचं कारण शोधून त्यावर उपचार करायचे? >> दोन्ही
उद्देश वेगळा आहे दोन्हीचा. सोप्प म्हणून एक उपाय करून थांबायचं नाही आणि दुसर अवघड आहे, गुणकारी आहे पण वेळ लागतो म्हणून दीर्घकाळ सोसत राहायचं नाही. इन्फ्रास्ट्रक्चरशी निगडीत गोष्टीना वेळ लागतो पण म्हणून सत्यनारायणाला आलेल्या लोकांनी ओळीत चपला काढू नये का? त्याला कितीसा वेळ आणि श्रम लागतात? पण इथे काय तिथे काय कुठेही भारतीय फार कमी वेळा चपला ओळीत काढतात... (माझी २ आण्याची कम्प्लेन)
<इन्फ्रास्ट्रक्चरशी निगडीत
<इन्फ्रास्ट्रक्चरशी निगडीत गोष्टीना वेळ लागतो पण म्हणून सत्यनारायणाला आलेल्या लोकांनी ओळीत चपला काढू नये का? >
सध्याच्या परिस्थितीत मला सत्यनारायणाला आलेल्या लोकांनी ओळीत चपला काढणे, हे तितकंसं महत्त्वाचं नाही वाटत. आपण करतोय त्या चुका यापेक्षा फार्फार मोठ्या आहेत. सुतारप्लमरपार्किंगच्याजागाअस्वच्छहॉटेलं हे मला खूप किरकोळ वाटतं. माझ्या कुटुंबाला नीट जगता येणं माझ्यासाठी सध्या महत्त्वाचं आहे. आज त्यासाठी खरंच फार कष्ट घ्यावे लागतात.
सिमन्तिनी, मुद्द्याला धरून
सिमन्तिनी, मुद्द्याला धरून बोला, इथे 'परतणार्यांबद्दल' लिहिणं अपेक्षित असावं, फक्त भारतियांबद्दल नाही
सद्ध्या वाचतोय, पण फक्त परतणार्यांबद्दल केल्या जाणार्या कंप्लेंट्स/ काँप्लिमेंट्स अशा वेगळ्या काही सांगता येणं तसं कठिण आहे, कारण त्या समस्या जाणीवा सुधारलेल्या विशेषतः आधीच्या पिढीतल्या अनुभवी व्यक्तिकडून सुद्धा कळतातच (आमच्यावेळ असं नव्हतं अशा प्रकारे..
).
भारतात (पर्यायाने पुण्या-मुंबईत) सद्ध्या काय चाल्ल्लेय ते मी २-३ पोस्ट्स मधून मनस्मिच्या बाफ वर लिहिलं आहेच, त्यामुळे परत लिहित नाही.
ह्या बाफच्या अनुषंगाने लिहायचं तर आणि सरसकटीकरणाचा दोष पत्करून इतकच म्हणेन की, काही काळ भारताबाहेर राहून आलं की -
१. भारतातिल लोकांना मुळातच हा बाहेरुन आला म्हणजे रग्गड पैसा घेऊन आला असणार आणि
डोक्यात हवा गेली असणार असं त्या व्यक्तिबद्दल गृहित धरलं जातं, अगदी बेल्टवरची बॅग काढून देणारा (गरीब बिच्चारा) पोर्टर सुद्धा! त्यात हातात मूल असलेलि एकटी बाई प्रवास करत असेल तर 'कस्ट्म करुन देतो' 'बाहेरपर्यंत सामान आणुन देतो' अशी (निर्लज्ज) सुरुवात.
२. भारताबाहेर राहून आलेलि व्यक्ती ही भारतात आलेय कारण तिला परदेशातून हाकलून लावलेय, नोकरी नाहिये वगैरे (मला स्वतःला बरच सामोरं जायला लागलं ह्या प्रश्नाला, अगदी संबंध नसलेल्या त्रयस्थांकरुन) असे गैरसमज त्या व्यक्तिविषयी!
३. भारताबहेर राहिल्यामुळे भारतातिल समाज, वाढलेला वेग, स्थानिक समस्या, राजकीय समिकरणं ह्या सगळ्या बाबतित ती अनभिज्ञ आहे, थोडक्यात काय तू बाहेरुन आलायस तुला ह्यातलं कळणार नाही, त्यामुळे गप्प बैस, आमचं आम्ही बघून घेऊ!
४. बाहेरुन आलेली माणसं जरा स्वच्छता, वेळ पाळणे ह्याबाबतीत जरा जास्तच काटेकोर गरजेपे़क्षा..
अर्थात तुम्ही आलात परत बरं वाटलं किंवा खरच काही मदत हवी असेल इथे स्थिरावताना तर सांग असं म्हणणारेही भेटले पण शेवटी प्रत्येकाला कसा अनुभव येईल त्यावरुन सर्वसकटीकरण करता येण कठीणच!
आता इतकी चर्चा झालि मग पुढे काय, ह्यावर तुरन्त उपाय काय?
बर्याच समस्या आहेत, पहेले नक्की करो वगैरे बरोबर, पण ते होत असताना वैयक्तिक पातळीवर मी काय करतो आणि करायला सांगतो ह्याचा माझ्यापुरता आचार आणि विचार झालाय.
बाहेर राहाणार्या व्यक्तिला 'व्हॅल्यू फॉर मनि' ची रोजच्या व्यवहारात सवय झालेली असते हे समजून न घेणे, हे म्हणजे जागतिक स्पर्धेच्या रेट्यात मागे पडणे असा आहे असं माझं मत आहे.
एकंदरच, आपण सेवा देतोय तेव्हा ती चोख असायला हवी आणि समोरच्याने तशी अपेक्षा ठेवली तर ते चूक नाही आणि म्हणून आपण ज्या सेवा पुरवतो त्यात सचोटी हवी अशी समज ज्यादिवशी भारतातल्या सर्व स्तरातल्या व्यवसायात येईल त्या दिवशी आपला ग्लोबल अॅप्रोच होईल, त्यामुळे इतक्या चर्चेनंतर मी एकच उपाय सुचवू शकेन, बाबांनो, सचोटीने प्रामाणिकपणे, इमानदारीने तुम्ही काम करा, दुसर्याकडून तशी अपेक्षा ठेवा तेव्हाच मग, अवघे धरु सुपंथ...!
परिस्तिथी बदलावी ह्या करता
परिस्तिथी बदलावी ह्या करता आधी काय बदलायला पाहिजे हे समजलं पाहिजे हे बरोबर आहे पण ती तर पुढची पायरी आहे. काही लोकं खरच काहीतरी करत असतात परिस्थिती बदलायला ही बाब स्तुत्यच आहे पण सगळेच तसं करतील असं नाही. बरीच लोकं दररोज सगळे नियम पाळूम आपण भले आणि आपलं काम भलं ह्या क्याटेगरीतले असतात (नोकरी करणारे किंवा छोटे उद्योजक). ते फार काही स्पेशल करत नसले तरी त्यांच काम नेटाने पाडून देशाच्या प्रगतीला हातभारच लावत असतात. ह्या क्याटेगरीतले परतून आलेले काय किंवा कधीच भारताबाहेर न गेलेले काय सगळेच येतात. आता त्यांच्या पैकी कोणी तक्रार केली किंवा उणीवा सांगितल्यावर लगेच ह्या सकारत्मके भारता वाल्या मॉरल हवालदारांनी लगेच पोलिसींग करायची का?
उत्तम पोस्ट उपास!
विषय काय लिहीतात
विषय काय लिहीतात काय..
उपास,
>>हा बाफ भारतात परतणा-यांचे जे अनुभव इथल्या लोकांना येतात त्यांच्यासाठी आहे.
तिथल्या लोकांनी लिहायचं, तू नाही.
>>भारतियांवर टीका करणा-या बाफांवर
कुठे आहेत हे बाफ?
>> म्हणून एखाद्याला फक्त आणि फक्त नकारात्मक अनुभव आले असतील हे मान्य करायचं.
कोणाला आले हे "फक्त आणि फक्त नकारात्मक" अनुभव? मनस्मि? पण त्यांचा उल्लेख करायचा नाही ना इथे? पण त्यांनाही फक्त नकारात्मक नाही आले, मग कोण?
>>परदेशात गेलेलो नाही हे कशावरून ठरवलंय ?
गेलेला? कुठे?
मला संशय येतो की हे भारत-अमेरिका यांचा कॉमन शत्रू असलेल्या कुठल्यातरी देशात गेले आणि त्यांच्यासाठी काम करतायत की काय.. म्हणजे इतकं लोकांनी समजावून कळत नाही असा मठ्ठ माणूस असेल यावर माझा विश्वास नाही. म्हणजे हे मुद्दाम करत असणार. दोन्ही देशातल्या लोकांचा फुकट वेळ खातायत!
इथं लिहीणारे लोकच बिनडोक.
>>माझा या बाफवरचा सहभाग संपला.
अर्र, आता उत्तरं कशी मिळणार..?
ते फार काही स्पेशल करत नसले
ते फार काही स्पेशल करत नसले तरी त्यांच काम नेटाने पाडून देशाच्या प्रगतीला हातभारच लावत असतात. ह्या क्याटेगरीतले परतून आलेले काय किंवा कधीच भारताबाहेर न गेलेले काय सगळेच येतात. >> +१ म्हणूनच चपला ओळीत काढा परत आलेले, न गेलेले इ इ
असो अस्थानी विनोद नको.
चपला+सुतारप्लमरपार्किंगच्याजागाअस्वच्छहॉटेलं अशा अनेक छोट्या गोष्टींची बेरीज आयुष्य आहे. रोजची किरकिर, छोट्या छोट्या गोष्टीत लढाई कुणालाही नकोशी वाटते. 'रोडगा वाहीन तुला' म्हणणाऱ्या बाई सारखी प्रत्येकाचीच अवस्था. मोठ्या कार्यासाठी लढायचं म्हणल तरी ह्या चाकोरीतून बाहेर पडणे कठीण. बोल लावून मन तर मोकळ करतात बस एवढच (परतलेले, न परतलेले इ इ सर्व)
नंदीनी यांना दिलेल्या
नंदीनी यांना दिलेल्या उत्तराला अनुमोदन.
जागृती आणि निरंतर प्रबोधन >>>>> गेलं ना वाया ?
हा यज्ञकुंड पेटवण्याऐवजी इतर देशात निघून जा हे सांगतोय ते का नाही ऐकत ? टीका करण्याने सगळे प्रश्न सुटतील. तोडगे सुचवण्याने नाही हे आता तरी कळलं असेल.
विषय काय लिहीतात काय..>>
विषय काय लिहीतात काय..>>
लोला, जरा दाखवा हो त्यांना तुमच्या विषयाला धरून असलेल्या पोस्टी !!!
या पोस्टस ब-या चालतात तुम्हाला >>> असं विषयाला धरून लिहायला पाहीजे होतं हे ठणकावून सांगा. पार कोमात जातील सोदाहरण स्पष्टीकरणाने. है के नै ?
बोल लावून मन तर मोकळ करतात
बोल लावून मन तर मोकळ करतात >>
हे मन मोकळं करायला परतल्यावर कितीही वर्षे का लागेनात. मनच मोकळं करत रहावं. भरीस भर म्हणून मायबोलीचे विषय मन मोकळं करण्यासाठी पुरत नाहीत हे काय कमी आहे ?
अर्रर्र. इथे काही लिहावं तर देशभक्त असल्याचा घृणास्पद आरोप होईल. भारताचा शत्रू असल्याचा आरोप होईल. हे सगळं एकाच वेळी खरं असू शकतं हे ही बरोबर असू शकेल.
म्हणून सत्यनारायणाला आलेल्या
म्हणून सत्यनारायणाला आलेल्या लोकांनी ओळीत चपला काढू नये का? त्याला कितीसा वेळ आणि श्रम लागतात? >>> नाहीच काढत लोक. हे सांगायला इथेही तज्ञ आहेत असंच म्हणताहेत इथे सगळे पहिल्यापासून. त्याने लोक चपला रांगेत कसे काढतील हे लोकांना समजून घ्यायचय.
चपला रांगेत काढणं ही तुमची समस्या आहे आणि ते हवं असेल तर कसं हे पहले नक्की करो. इथल्या लोकांना काय हवं तसे प्रयत्न ते करीत रहाणं हे त्यांचं प्रॉब्लेम नक्की काय झालेलं आहे म्हणून आहे. ते तुम्हाला पटत नाही हा तुमचा प्रॉब्लेम पहले नक्की करो.
@ चिनूक्स केवळ तुझ्यासाठी
@ चिनूक्स
केवळ तुझ्यासाठी पुन्हा एकदा लिहीतो.
चुका दुरुस्त करायच्या असतील, तर आधी काय, का आणि कसं चुकतं ते शोधायला हवं. >>> पहिल्यापासून काय आणि कसं चुकतं हे शोधायला हवं हेच सांगायचा प्रयत्न करतोय. काय करायला हवं हा दृष्टीकोणातला फरक आहे हे पहिल्यापासून माहीत आहे. म्हणूनच ज्यांना जे बदल अपेक्षित आहेत ते कसे करणार हे विचारून पाहीलं. उदाहरणार्थ, दारात अँब्युलन्स क्षणात उभी रहायची असेल तर ती कशी उभी राहणार हे सांगा हा प्रश्न विचारण्यामागे इथे नेमकं काय चुकीचं आहे यावर नेमकी चर्चा होईल. रहदारीचे नियम पाळून असं मोघम उत्तर दिल्याने प्रश्न सुटेल का ? ती अँब्युलन्स येण्यासाठी रहदारी सुरळीत हवी. अँब्युलन्सच जाळं व्हायला हवं आणि वाहतुकीला शिस्त हवी हे उपप्रश्न समोर उभे राहतात.
त्यातला एकेक उपप्रश्न सोडवायला जाणे हे समस्येच्या मुळाशी खोल जात रहाणे. ही एकच केस स्टडी घ्या. अँब्युलन्सचं जाळं निर्माण होणे आणि रहदारी वेगवान होणे यासाठी इण्फ्रास्ट्रक्चरचा देखील मुद्दा आला. तुमचं नशीब जोरावर असेल तर अँब्युलन्स तुमच्या जवळ असणे हे काही समस्येचं उत्तर नाही, बोल लावणे हे ही नाही. हे प्रश्न विचारणे म्हणजे मॉरल पोलिसिंगही नाही. पण जर असं मुळाशी जाणं हा भाग समजावून घ्यायचा नसेल तर लोकांना फक्त बोल लावण्यात रस आहे हा मुद्दा उरतो. मग कशाला वेळ घालवत बसायचं. इथे लोला, नंदिनी सारखे असंबद्ध प्रतिसाद +१ मिळवत असतील तर ज्यांना ते आवडतंय त्यांनीच दोन्हींकडे गोंधळ घालावा आणि समाधान करून घ्यावं.
आता वर दिलेली केस स्टडी ही निव्वळ मलमपट्टी आहे यालाहजारो अनुमोदक. मला हेच कुणीतरी सांगायला हवं होतं. इथल्या लोकांचे प्रश्न निराळे आहेत. किमान आपली प्रगती झाली तर त्याचं भान असणं हे त्या प्रगतीचं निदर्शन आहे. ज्या लोकांचे प्रश्न आहेत त्यांना बोल लावून परिस्थिती कशी बदलते हे समजलेलं नाही.
थुंकू नका हे एकाला ओरडून सांगणं हे समस्येचं उत्तर नाही. त्याने फक्त एकाचं प्रबोधन होईल. पण असं प्रबोधन करणं ही माझी देखील जबाबदारी आहे असं वाटणा-या स्वयंसेवकांची फौज निर्माण करणे आणि संघटीतपणे प्रयत्न करणे हे समस्या सोडवण्याचं कायमचं उत्तर आहे. या बदलाला किती वेळ लागेल याची फिकीर न करता काम करीत राहणे हे महत्वाचं. मी पुन्हा एकदा अंनिस चं उदाहरण देतो. अंधश्रद्धा ही एक समस्या आहे. तू सुटणारच नाही असा विचार करणं हे नकारात्मक. पण मला काहीतरी करायला पाहीजे असा विचार करून समस्येच्या मुळाशी जात रहाणे आणि जाळं उभारणे हे सकारात्मक. आज डॉ नरेंद्र दाभोळकर गेले तरी ते काम थांबणार नाही हे महत्वाचं. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचंदेखील उदाहरण देईन. बदल कसा घडवून आणायचा हे त्यांच्याकडून शिकावं. तो त्यांना हवा तसाच ते घडवणार. तुम्हाला ते मान्य नसेल तर बोल लावून तुम्हाला हवं ते कधीच घडणार नाही. केवळ प्रॉब्लेम नक्की केल्यानेही गोष्टी आपोआप घडत नाहीत.
खैरलांजी सारख्या घटनांच्या निषेधमोर्चात भाग घेणं ही मलमपट्टी आहे ? ज्या घटना रोज घडतात त्या पटलावरच न येणं हे जास्त गंभीर नाही का ? या गरीब लोकांचं निरंतर प्रबोधन करताना आज ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतं त्यासाठी आधारच दिला नाही तर कोण तुमच्या भाषणाला किंमत देणार ? त्या एका घटनेने लोक संघटीत झाले. या संघटीत शक्तीचा वापर करून घेता येईल. हे काम व्हायला हवं असं वाटणारे लोक या प्रबोधनात उतरणे हे समस्येचं उत्तर. बोल लावणा-या प्रत्येकाकडे चार बोटं वळलेली असतात. समस्या कोण सोडवू शकतं हे ती बोटं रोखलेल्या बोटापेक्षा चौपटीने योग्य उत्तराचा मार्ग सांगत असतात. आपण स्वतः हे ते उत्तर असतं. पण आपल्याला दुस-यावर रोखलेल्या बोटावर विश्वास असतो.
समस्या नक्की करणं हे म्हणणं वगैरे ठीकच. पन तुमचा अॅप्रोच हा सर्वात जास्त महत्वाचा. आणि तो कळीचा मुद्दा आहे. नाहीतर एकीकडे एकाने समस्या नक्की करो म्हणायचं आणि एकाने आता ते जगाच्या अंतापर्यंत जातील अशी शेरेबाजी करण्याने प्रश्न सुटत असेल तर तसा सोडवणं हे सोपं नाही का ? नसल्यास वेळ पडल्यास जगाच्या अंतापर्यंत जावं लागत असेल तरी चालेल असा पवित्रा घेणं हे चुकीचं कसं हे देखील पटवून सांगायला हवं.
दाभोळकर जगाच्या अंतापर्यंत गेले आणि कार्यक्रमातून संघटन घडवत राहीले.या संघटनेचं प्रबोधन करत राहीले. त्यातून एक शक्ती उभी राहिली ही बदल घडवण्यासाठी सक्षम आहे हा आजच विश्वास केवळ बारा वर्षात आला. केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहीजे हे या बाफावर सुरुवातीपासून सांगितलय. कुठेही त्यात सूत्र हरवलेलं नाही. भारत हा एक विशेष देश आहे. कुठेही नसलेली जातीव्यवस्था , अंतर्विरोध असलेली सामाजिक व्यवस्था आणि त्याने झालेले बुरसटलेपणाचे दूरगामी परिणाम सोडवण्यासाठी एक माणूस पुरेसा नाही, वेळेचं लिमिटही पुरेसं नाही आणि शेरेबाजीही. हे आम्हालाच सोडवायचं आहे हे समजून त्यात शेकडो कार्यकर्ते उतरले आहेत हे आश्वासक. हे शेकडो कार्यकर्ते हजारो कसे होतील, हजारोंचे लाखो होतील आणि लाखोंचे करोडो होतील तेव्हां समस्या राहणार नाही. या कार्यकर्त्यांमधे आपण असावं असं वाटणं हे समस्येच उत्तर. केवळ कर देण्याने आणि सरकारला बोल लावण्याने प्रश्न सुटत असते तर या लोकांची गरज नाही. शेवटी राजकारणी, सरकारी अधिकारी हे आभाळातून टपकत नाहीत. ते याच समाजातून येत असतात. राजकारण हे समाजकारणाचा आरसा आहे. तुम्ही ज्यासाठी लायक आहात ते तुम्हाला मिळतं. तुम्हाला काय हवं यासाठी लायक होणं हे महत्वाचं. त्यासाठी विचारात बदल घडायला हवं जे केवळ प्रबोधनातून येतं. प्रबोधनाला पर्याय नाही. महाराष्ट्राला तर दीर्घ परंपरा असताना त्याकडे पाठ फिरवून मी माझं काम केलं कि ते पुरेसं आहे असा समज करून घेणं हीच समस्या आहे. हाच प्रॉब्लेम आहे. ( झाला का नक्की प्रॉब्लेम? )
हाच विषय आहे.आणि हे माझ्या मर्यादेत केलेलं त्याचं विश्लेषण. ते चुकीचं असेल तर दोष माझा. पण तिस-या टप्प्यात हेच हवं होतं. आंतरजालावर सविस्तर लिहिणं शक्य नाही याची कल्पना आहेच.
जाउ दे किरण, अरे आपल्या
जाउ दे किरण, अरे आपल्या चष्यातुन पाहणारे, तो चष्मा नसुन वस्तूस्थिती आहे, असे मानणारे आणि त्यापलिकडे बघुच न शकणारे, असतातच. तेही कधीतरी आपला चष्मा उतरवतील. किंवा आपल्याला आपली दृष्टी म्हणजे एक चष्मा आहे, हे कळेल.
काय परिस्थिती आहे हे समजुन त्यावर आपण काय करु शकतो, हा माझा दृष्टीकोन आहे. जेव्हा जसे जमेल तसे करत जावे, प्रगती होतेय, त्यावर बोलुया. समस्या होत्या, आहेत पण त्या आहेत म्हणुन नुसतेच का ओरडावे, तर त्यावर आपण काय करु शकतो, हे ही लिहिता येईल, किंवा कोणी काही करतेय का, हे तरी विचारता येईल ना?
भारताचा विचार केला, तर आताकुठे आर्थिक प्रगतीला सुरुवात झालीय. पोट भरलं की मगच बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देणे, सामन्य माणसाला शक्य होते. या संक्रमणात काही चांगल्या तर काही वाईट गोष्टी घडनारच, ज्या इतर देशातही झाल्याच की. का एका दिवसात कोणता देश प्रगत झाला?
खैर विचारमंथन चाललय, ते चालु द्याव.
शेवटी रेप स्टॅटिस्टिकप्रमाणे फक्त भारतातच बलात्कार होतात असे नाही, तर इतर काही देशात हे प्रमाण याहुन अधिक आहे. आपण अजुनही सुरक्षित समाजाच्या दिशेने वाटचाल करतोय, हे महत्त्वाचे. मग त्यासाठी स्त्री-सुरक्षेवरील उपाययोजना असो किंवा मिडियाची अशी प्रकरणे उचलुन या ना त्या प्रकारे जागरुकता निर्माण करणे असो.
शेवटी एका दिवसात काही बदलणार नाही.
तुमचे विचार जरी चांगले असले
तुमचे विचार जरी चांगले असले तरी ते मनस्मिंच्या लेखा संदर्भात अप्रस्तुत आहेत. एक परतून आलेला माणूस तुमच्यावर ओरडला म्हणून तुम्ही दुसर्या परतून आलेल्या माणसाला त्याच तराजूत तोलत पुढे हा सगळा भाषणबाजीचा पोस्ट्पसारा मांडत, एकानंतर एक स्ट्रॉमॅन बांधत असंबद्ध विधाने करत आहात.
वैद्यबुवा इतरांचं सोडा. पयले
वैद्यबुवा
इतरांचं सोडा. पयले तुम्हारा प्रॉब्लेम नक्की करो. तुम्हाला भारतात परतायचंय कि नाही ? परतायचं असल्यास सुविधा नाही मिळाल्या तर चिडचिड करणे हा तुमचा प्रॉब्लेम आहे का ? चिडचिड करण्याने तुम्हाला सुविधा मिळतील का समाधान होईल ? नईलाजाने परतायचंच असेल तर इथं अॅडजस्ट करून जीवन सुसह्य करून घेणं हे तुम्हाला सांगणा-याला पुंगाटबाजी, ढोंग, देशद्रोहीपणा. मॉरल पोलिसिंग, कांगावाखोरपणा असे लेबल्स लावणं हा तुमचा प्रॉब्लेम असेल तर तुमच्यापुरता प्रश्न सुटलाच. मग इथे पुन्हा पुन्हा का हजेरी लावाविशी वाटते आणि अशा मठ्ठ माणसाला का मह्त्व द्यावंसं वाटतं हा प्रश्न स्वतःलाच विचारा.
पयले ते नक्की करो ना.
शेवटी रेप स्टॅटिस्टिकप्रमाणे
शेवटी रेप स्टॅटिस्टिकप्रमाणे फक्त भारतातच बलात्कार होतात असे नाही >>
विजय पहिल्यांदा धन्यवाद. रेपचा विषय आलाच म्हणून. या धाग्यावर तसा तो असंबद्ध असला तरी अॅप्रोच महत्वाचा असल्याने.
इथे विरोधकांचा मुद्दा महत्वाचा. ही केस उजेडात येत नव्हती तोवर मुंबई सुरक्षित आहे हा समज होता. या समजाने कित्येक महिला, मुली निर्धास्त फिरत होत्या. एकाच घटनेने संदर्भ बदलले. याकडे दोन दृष्टीकोणातून पाहता येईल. पहिलं म्हणजे आधीची परिस्थिती बरीच होती. अज्ञानात सुख असतं वगैरे.
पण दुस-या अँगलने पाहीलं तर जिच्यावर प्रसंग आला तिच्यासारख्या अनेकांना अनेक अनुभव येत असतील, पण ते पटलावरच येत नसतील तर केवळ मुंबई सुरक्षित आहे म्हणून पाठ थोपटून घेणं धोकादायक नाही का ? सगळेच पुरूष वाईट नसतात. पण एका घटनेने सुरक्षित वातावरणाचं कवच गळून पडलं ते पडलंच. या विश्वासाला तडा गेला. हा विश्वास पुन्हा कमावणं ही प्रत्येक पुरुषाची जबाबदारी आहे. सरकार, पोलिसांना दोष देण्याने प्रश्न सुटणार नाही. प्रत्येक महिलेचा आणि तिच्या इच्छेचा आदर करणे हा संस्कार शेवटच्या पुरुषावर होत नाही, हा संस्कार आपल्या मुलावर व्हावा असं प्रत्येक आईला वाटत नाही तोपर्यंत धोका कायमच राहील. प्रत्येक समस्येचं उत्तर शेवटी प्रबोधन, जागृती यात आहे. त्याला पर्याय नाही. अतिशय खडतर मार्ग आहे. शॉर्टकटने काही होणार नाही.
शेवटी रेप स्टॅटिस्टिकप्रमाणे
शेवटी रेप स्टॅटिस्टिकप्रमाणे फक्त भारतातच बलात्कार होतात असे नाही, तर इतर काही देशात हे प्रमाण याहुन अधिक आहे. >>> मग?! तिकडे अधिक प्रमाणात आहेत म्हणून काय झालं? इथे कमी व्हायला हवेत हा मुद्दा आहे. काही देशांमध्ये बुरख्याशिवाय बाईला बाहेर फिरता येत नाही, आपल्याकडे येतं. त्याचीसुद्धा टिमकी वाजवाल कधीतरी.
चिनूक्स १००+ . आपल्यासारख्या
चिनूक्स १००+
. आपल्यासारख्या देशात पहायला गेलं तर सकारात्मक खूप आहे >> किरण , हे तुम्हाला भारतीयांनाच पटवून द्यायची वेळ येतीये यावरूनच 'सकारात्मक' गोष्टी कीती आणि नकारत्मक गोष्टी कीती ते लक्षात येतेय. ९९% नकारत्मक गोष्टीनंतर १% सकारात्मक गोष्टीचे कौतुक जरी वाटले , तरी त्या 'अपवाद' याच कॅटेगरीत मोडतात.
उत्तरं १) माहित नाही २)
उत्तरं
१) माहित नाही
२) चिडचिड होईल की नाही हे आताच सांगता येत नाही, तशा काही बाबी दिसल्या, घटना घडल्या तर कदाचित होईल सुद्धा.
३) चिडचिड ही एक इमोशनल रियॅकशन आहे. आपण चिडचिड करुन काही होणार नाही हे बर्याच वेळा माहित असून सुद्धा माणूस वैतागून चिडचिड करतो. सहसा माणूस परिस्थितीपुढे हतबल असला चिडचिड करतो. आता असं बघा, तुम्हाला माहित होतं की आपण चिडल्यामुळे त्या कुरकुरीत परतलेल्या कुटूंबाचा स्वभाव काही बदलणार नाही. हे माहित असून सुद्ध्या तुमच्या पत्नींना त्यांचा केवढा राग आला? सहाजिक आहे ओ, वैताग येतो कधी कधी अशी कोणी बिन कामाची पिकपिक केली की. आता समजा तुम्ही जर तुमच्या बायकोला त्या रागाच्या सपाट्यातच हे समजवायला गेलात की चिडचिड करण्यापेक्षा तू काही सकारात्मक विचार का नाही करत, जसं की कदाचित त्यांची असं रस्त्यात पचापचा थुंकलेलं बघायची सवय गेली असेल अमेरिकेत राहून वगैरे वगैरे तर तुम्हाला त्या रात्री जेवायला मिळालं असतं का घरात? तसच काहीसं इतरांचे पण आहे. चिडचिड होते, त्यात काही गैर नाही आणि त्याला इलाज ही नसतो.
४) अॅड्जस्ट करुन घ्यावे लागेल हे सगळ्यांना माहित असते "जुगाड" हे शेवटी अंतिम सत्य आहे. आता काही काही लोकं कण्हत कुथत किंवा कुरकुरत अॅड्जस्ट करतात काही लोकं आता आलय ना अंगावर तर घेऊ शिंगावर अशा मेंटॅलिटीनी अॅडजस्ट करतात. मुद्दा असा आहे की मनस्मिंच्या लेखात कुरकुर नव्हती, त्यात सुचना होत्या. परतून फुफाट्यात येणार्यांकरता. तुम्ही आधीच परतलेल्या एका कांद्याशी झालेल्या भेटीमुळे जरा तापलेले होतात आणि त्याचं पर्यवसन कशात झालं हे सगळं आपण जाणतोच.
सरतेशेवटी परत एकदा, तुमचे विचार नक्कीच चांगले आहेत पण ते ह्या संदर्भात एकदम ट्यांजेट मारून भलभलतीकडे जात आहेत येवढे २५० शब्द बोलून मी माझं थोबाड गप करतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अमेरिका!
पालथ्या घड्यावर पाणी.
पालथ्या घड्यावर पाणी.
अस्वच्छता, बेशिस्तपणा इ. इथले
अस्वच्छता, बेशिस्तपणा इ. इथले दोष प्रत्येक संवेदनशील माणसाला खटकतातच, मग तो इथला स्थायिक असो किंवा 'परतणार्यां'पैकीं असो. पण ' मीं याच समाजाचा घटक आहे ' याचं तीव्र दु:ख होणं व ' कसं रहायचं ह्या लोकांत' अशी तिर्हाईतासारखी तिरस्काराची प्रतिक्रिया येणं, यांतला फरक समजून घेतला तर मला वाटतं ह्या बाफवरच्या वादाची चौकट स्पष्ट होईल.
भाऊ, तुम्ही एकदा लेख आणि
भाऊ, तुम्ही एकदा लेख आणि प्रतिक्रिया वाचून बघा. तिरस्कार जाणवला तर बघा.
Pages