आज काय खाल्लं?

Submitted by अदिति on 22 July, 2013 - 19:38

'आज व्यायाम केला?' हा धागा सुरु झाल्यापासुन त्याच्याकडे बघुनच व्यायामाची आठवण येते आणि येरवी केला गेला नसता तरी आठवणीने व्यायाम केला जातोय. ह्या धाग्याला बघुन जर पौष्टीक खायची आठवण / ईच्छा झाली तर फायदाच होइल अशी अपेक्श्या करते. मला तरी नक्कीच होइल Happy
हा धागा पौष्टीक आहारासाठीच(डायट) आहे. माझ्या मते आहार पौष्टीक असला, योग्यप्रमाणात असला आणि ह्याला व्यायामाची जोड असली की वजन अपोआपच अवाक्यात राहाते. तर मित्रांनो ह्या धाग्यावर आज काय खाल्लं अन ते तुम्हाला बॅलन्स्ड वाटल का , नसेल तर तसे होण्यासाठी काय बदल करता आले असते हे लिहुयात. आणिहो इतरांच्या मेन्युवर तुमची मतही मांडा .. त्या निम्मीत्याने हेल्दी पाककृतींची चर्चाही करता येइल. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज डब्यात श्रावणघेवड्याची भाजी आणि एक पोळी. एक मुगाचा पराठा (मंजुडी फेम).
नाश्त्यालाही एक पराठाच.
संध्याकाळी साबुदाण्याची खिचडी करायची आहे, मुलाची फर्माइश. मीही थोडी तरी खाईनच. गरमागरम खिचडीचा मोह टाळणे केवळ सिद्धी प्राप्त झाल्यावरच शक्य होईल!

ब्रेफा - ९.०० - चिकन बर्गर Sad
लंच आणला नाही म्हणजे बाहेरच खाणं होणार Sad
इव्ह स्नॅक्स - बनाना वॉल्नट केकचा एक तुकडा - मोठ्ठासा Happy

रात्री मुगडाळ+तांदळाची खिचडी करावी म्हणते Happy

साबुदण्याची खिचडीच नाव काढलस. आता खावीच लागेल.
टकाटक, ज्वारीचे पीठ व मुगाचे पीठ मिक्स ईडली कशी करायची?

आज सकाळी ब्रेड ऑम्लेट, चहा. ऑफीस मधे गेल्या गेल्या परत कॉफी
११ ला ब्लुबेरी आणि वॉलनट्स
दुपारी मसुरची दाळ पोळी + काकडी
४ /४:३० ला चकली (खाण टाळायला पाहीजे होत)+ कॉफी
रात्री ८:३० ला ब्राउन राईस + तुर दाळ वागं + सोयाबीन्सच्या(edamame) उकडलेल्या शेंगा

लंचला वांग्याचं भरीत आणि ज्वारीच्या भाक-या.... स्वर्गसुख दुसरं काय..
अनायसे फोटोपण काढला.. चिकटवतो इथे....

ऑफीसमध्ये देशी हाटलातली पार्टी .. बेक्कार पणे हादडलं... नको असताना खाल्लं जाते बफे मध्ये.

जामून, खीर, केक... भजी, पकोडे.. अरारा.... आता लिहिताना कळले किती खाल्ले. Proud
आता गिल्ट मोड मध्ये. Sad

डीडी... इथे भाकरी नाहीच Sad ज्वारिच मिळत नाही हो...

बघुन बरं वाटलं पण.
मी काल मुगाची उसळ आणि खस्ता कचोरी खाल्ली...

आज नेहमी प्रमाणेच दुध आणि ओट्मील, चहा
कलींगड, कॉफी
दुपारी बिन्स ची भाजी, पोळी दही
परत कलींगड आणि ब्लुबेरी
संध्याकाळी शेवग्याच्या शेंगा घालुन मसुर आणि भात असा प्लान आहे

झंपी, एकदम बरोबर आहे. बफे मधे जरा जस्तच खाल्ल जात. अगदी चव असो नसो. एकतर ताटात वाढतांना चवी
साठी म्हणुन प्रत्येक भाजी घेतली जाते आणि गोड ही खाल्ल जात. पण ऑफीसच्या पार्टीमधे बफे शिवाय पर्याय नसतो. इतक्या लोकांच्या ऑरडरी देउन जेवानाची वाट पाहायला पेशन्स नसतात आणि वेळही.
आता लिहिताना कळले किती खाल्ले. फिदीफिदी<< एक्झाक्ट्ली!! ह्यासाठीच हा धागा आहे :))

सकाळी माती खाल्ली Proud

आय मीन आठवडा होउन गेला फक्त व्हीट फ्लेक्स आणि दुध घेत होतो.
आज मात्र चहा चपाती, आळु भजी, चपाती, बॉर्बॉन बिस्कीट.. Sad
असो.

बर .जीम जॉइन करुन जवळपास दोन महिने झालेत.
तिथेही माती खाल्ली आहे.. Sad
दोन महिन्यात फक्त तीस दिवसाच कार्ड भरलय..

फक्त एकच चांगली गोष्ट म्हणजे इतक्या अनियमित वेळापत्रकात सुद्धा शरीराने खुपच पॉजिटिव्ह फीडबॅक दिलाय.
वजन तीन किलो कमी झालं आहे.. Happy

अरे वा झकास, मग अजून काय पाहिजे? खरंतर आठवड्यातून एकदा मेनूत बदल करायला हवा.
मी आज पीठ पेरून पडवळाची भाजी आणि पोळी. नाश्ता आणि दुपारचे जेवण दोन्ही वेळा तेच.
१२ वाजता एक कप हॉट चॉकोलेट घेतलं.

अदिती, खाल्लीस का साबुदाण्याची खिचडी?

झकास मधुन मधुन माती खायला हरकत नाही :)) सई म्हणते तस जेवणात बदलही हवा.
जीमही २ महीन्यात ३० दिवस म्हणजे खुपच छान. म्हणजे आमच्या सारख्या पैसे भरुनही २ २ महीने जीम चे तोंडही न बघणार्‍यांपेक्ष्या कितीतरी छान. कीप इट अप!

सई नाही ग. ह्या वीक एन्ड ला खाईन उद्या संध्याकाळी भीजवायची अठवण राहीली तर.

सकाळी १ मेथी पराठा, शेंगदाणा चटणी दही आणी १ केळं.
आता अजीबात भुक नाहीये. \
दुपारी ४ ला इड्ली चटणी खाता येईल.

आज ११ वाजता पनीर ब्रेड रोल आणि चहा. सकाळी मग भरून दूध.
२ वाजता भाकरी, वरण्याच्या (पावट्याच्या) दाण्यांची रसभाजी आणी अर्धी बाकरवडी (चितळ्यांची नव्हे, कोल्हापूरची मोठी :-)) सकाळपासून पाणी फक्त अर्धा लि.!! ते अजून दिवसाला १ लि. पेक्षा वाढत नाहीये.

कधी कधी इथे उगाचच लिहितेय की काय असं वाटतं. पण पोर्शन कमी झालाय, भात कमी खाल्ला जातोय आणि संध्याकाळी ७.३० नंतर काहीही खात नाहीये. गेल्या पंधरा दिवसात फक्त दोनदाच उशीर झाला जेवायला. झोपताना लक्षात राहिलं तर दूध घेते. त्यामुळे बरं आणि हलकं वाटतंय. भात खाताना बोलमध्ये दोन चमचे भात आणि त्यात दोन वाट्या आमटी/कढी/सार जे असेल ते- असे खातेय. त्यामुळे भात कमी खाऊनही जाणवत नाहीये.

आज नाश्ता --टोस्ट sandwich .

डब्यात - भरलि कारलि आणी चपाती
( सध्या मि एकटीच खाते आहे ..... सगळे उपवास करत आहेत कि का य ? )

ते अजून दिवसाला १ लि. पेक्षा वाढत नाहीये.>> सई, प्रत्येक खाण्यानंतर एक भांडंभरून पाणी प्यायची सवय लाव. सकाळी उठल्यावर, रात्री झोपताना एक भांडं पाणी पीत जा. एक टारगेट ठरवायचं, एक मापाची बाटली (एक लिटर , दीड लिटर) सकाळीच भरून ठेवायची आणि आपली नजर सारखी सारखी जाईल अश्या ठिकाणी ठेवायची. लक्षात येईल तेव्हा तेव्हा पाणी पीत रहायचं.

अरे बर्‍याच दिवसांनी धागा वर आला. २ नंतर डायरेक्ट ३० ऑगष्ट ला पोस्ट. मध्ये कुणी जेवलेच नाहीत वाट्टं.:डोमा::फिदी:

निवा शिराळ्याची म्हणजे दोडक्याच्या सालाची चटणी. दोडक्याची साल किसुन घ्यायची. कढईत किंवा तव्यावर चमचाभर तेल घालुन हिर्व्या मिर्च्या घालुन त्यात ते साल परतायचे, मी फोडणी करुन मग मिर्च्या घालते आणी तीळ ही घालते. मग मीठ घालुन चांगली कुरकुरीत ब्राऊन रंगावर परतायची. हाणायची मग दणकुन. कुणी कुणी याला दोडक्याचा ठेचा पण म्हणतात.

मला खूप पेढे, बर्फी, गुलाबजाम, कतल्या,लाडु, शं.पाळे, करंज्या खाव्याश्या वाटतायत, पण डायबेटीस आणी वजनाच्या भितीने काही खाता येत नाही.:अरेरे::फिदी:

तर आज जेवणात मुळ्याचे थालीपीठ होते. बरोबर कैरी आणी ताजे ( ६ महिन्यापूर्वी केलेले) लिंबाचे चटकदार लोणचे. आता चहा हाणुन झालाय.

Pages