Submitted by अदिति on 22 July, 2013 - 19:38
'आज व्यायाम केला?' हा धागा सुरु झाल्यापासुन त्याच्याकडे बघुनच व्यायामाची आठवण येते आणि येरवी केला गेला नसता तरी आठवणीने व्यायाम केला जातोय. ह्या धाग्याला बघुन जर पौष्टीक खायची आठवण / ईच्छा झाली तर फायदाच होइल अशी अपेक्श्या करते. मला तरी नक्कीच होइल 
हा धागा पौष्टीक आहारासाठीच(डायट) आहे. माझ्या मते आहार पौष्टीक असला, योग्यप्रमाणात असला आणि ह्याला व्यायामाची जोड असली की वजन अपोआपच अवाक्यात राहाते. तर मित्रांनो ह्या धाग्यावर आज काय खाल्लं अन ते तुम्हाला बॅलन्स्ड वाटल का , नसेल तर तसे होण्यासाठी काय बदल करता आले असते हे लिहुयात. आणिहो इतरांच्या मेन्युवर तुमची मतही मांडा .. त्या निम्मीत्याने हेल्दी पाककृतींची चर्चाही करता येइल. 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बॉसचं डोस्क. >>> म्हणजे
बॉसचं डोस्क. >>> म्हणजे उपाशीच राहणार
सायो, हा धागा आज काय खाल्ल
सायो,
हा धागा आज काय खाल्ल असा आहे, डायट काय केलं असा नाही आहे ना... मग खजूर खाल्ल्याने इतकं काय वाईट नाही.. नुसती साखर खाण्यापेक्षा जरासे बरे.
अहो झंपी, मी कुठे म्हटलं हा
अहो झंपी, मी कुठे म्हटलं हा धागा डाएटवाला आहे म्हणून? त्याकडे झुकणारा वाटतोय म्हटलं.
भरपूर खजूर म्हणालात म्हणून जास्तीची साखर नाही का असं विचारलं.
रात्री बायकोशी भांडण झालय..
रात्री बायकोशी भांडण झालय.. आज सकाळी त्याच रागाच्या भरात काही न खाता बाहेर पडलोय.. पण हापिसात आल्यावर भुक चाळवली.. एक चिकन, चिज, होलमिल ब्रेड सॅंडविच हादडलं... वर एक कॉफी
शुकीरवारी नो टीफीन नो जेवण
शुकीरवारी नो टीफीन नो जेवण पकाना
सो आज ब्रेफा पासुन इव्ह. खाणं सगळं बाहेरचंच


९.०० ब्रेफा - वडा सांबार + कॉफी
११.०० हापिसात - चहा + २ डायजेस्टीव बिस्किट
लंच - एग बिर्याणी + चिकन पॉपकॉर्न ( लेकीला टीफीन साठी तळले होते त्यातले थोडे आणलेत)
इव्ह. खाणं - सेव पुरी
रात्री घरी - खिचडी (मुगडाळ + तांदुळ + गाजर + मटार + फरसबी + पालक)
माझं फळं खाणं होतच नाही जास्त
आज माझा आहार हेवीवेट! नाश्ता
आज माझा आहार हेवीवेट!
नाश्ता - मटार उपमा
दुपारी - पिझ्झ्याची भाजी, १ उकडलेलं अंडं आणि दीड पोळी
रात्री जेवणाला फाटा द्यावा लागेल.
<<<रात्री जेवणाला फाटा द्यावा
<<<रात्री जेवणाला फाटा द्यावा लागेल.>>>>
रात्री जमलं तर फक्त सॅलेड खा. २ काकड्या , २ टोमॅटो , १ गाजर.
किंवा थोडीशी पपई , १ सफरचंद , १ मोसंबी.
पिझ्झ्याची भाजी कशी करतात???
पिझ्झ्याची भाजी कशी करतात???
नाश्ता - साबूदाणा वडे
नाश्ता - साबूदाणा वडे (लेकाला टीफीन साठी दिले होते )
टीफीनमध्ये पोळी + छोले + अळुवडी
नाश्ता - सकाळी गरम गरम वरण
नाश्ता - सकाळी गरम गरम वरण भात आणी मेतकुट भात (साजुक तुप २ ही वेळेस).
दुपारी- बर्गर + कोक + फ्रेन्च फ्राईज.
सध्या लवंग चघळत बसलोय...
सॅलड / फळं रात्री कितपत खाऊ
सॅलड / फळं रात्री कितपत खाऊ शकेन शंका आहे. त्यापेक्षा ग्लासभर गरम दूध घेणे ठीक राहील. हवेत खुप गारवा आहे त्यामुळे संध्याकाळी भूक लागण्याची शक्यताही आहे.
@ सस्मित - ढबू मिरच्या, टोमॅटो, कांदा, कॉर्नचे दाणे, चीझ हे सगळं नुसतं परतून केलेली भाजी. म्हणून पिझ्झ्याची भाजी. थोडक्यात लिहिल्यामुळे कळलं नाही तुला. जड होते ती जरा.
साई, पिझ्झाची भाजी
साई, पिझ्झाची भाजी इन्टरेस्टींग दिसते आहे, चीझ कमी प्रमाणात वापरुन कधीतरी बनवायला आवडेल.
<<<रात्री जेवणाला फाटा द्यावा लागेल.>>>> टकाटक म्हणतेय तसा सालड + वाटीभर दही खाल्लंतर चांगल लाईट जेवण होइल.
काल सात वाजता अर्धं ग्रिल्ड
काल सात वाजता अर्धं ग्रिल्ड व्हेज सँडविच खाल्लं, नंतर काही नाही.
आज नाश्ता २ पोळ्या आणि दोश्याची भाजी. बटाटा!
११.०० - चहा आणि दोन छोटे टोस्ट.
दुपार-संध्याकाळबद्दल अजून काही ठरवलं नाही.
बाकी सगळे कुठे गेले? कुणीच लिहीत नाहीये! का बरं?
काल बायकोने दिले ते खाल्लं...
काल बायकोने दिले ते खाल्लं... काय होत बर ?
आज रसमलाई आणि अंगूरमलाई. आणि साधा वरणभात.
सकाळी कांदापोहे +
सकाळी कांदापोहे + दुध.....दुपारी- पोळी + भेंडीचि भाजी..
ओट मिल चा वापर [रेसिपी]
ओट मिल चा वापर [रेसिपी] कळवाल का ? मी फक्त दुधात शिजवुनच वापरते.
प्रभा, ओट्मिल चा दोसा बनवता
प्रभा, ओट्मिल चा दोसा बनवता येईल. कृती मायबोलीवर आहे. कुकीस्, केक्स मधेही टाकता येते.
प्रभा, मी पीठ पेरून आपण
प्रभा, मी पीठ पेरून आपण भाज्या करतोना त्यात चण्याच्या किंवा तांदुळाच्या पिठाबरोबर ओटमील घालते. बाकी धिरडी, थालीपीठ वगैरे करतानापण टाकते थोडे ओटमील.
काल सकाळी पोहे, चहा दुपारी
काल सकाळी पोहे, चहा
दुपारी बाहेर जेवण झाल त्यामुळे जरा जस्तच झालं. श्रीम्प करी राईस.
रात्री केल ची भाजी, उडदाची डाळ पोळी बरोबर.
अन्जू ओट्मिल तसेच टाकतेस की
अन्जू ओट्मिल तसेच टाकतेस की त्याचे पिठ करुन?
आता मीच confuse झालेय. ओटमील
आता मीच confuse झालेय. ओटमील म्हणजे ते प्लेन ओट्स ब्रान म्हणून येतात तेचना? ते मी पीठ न करता तसेच टाकते इतर पिठांबरोबर. कोथिंबीर वडी किंवा त्या प्रकारच्या वड्या करतोना त्यातपण थोडे टाकते, मला नुसते खायला आवडत नाही दुधात घालून म्हणून असा वापर करते.
पिझ्झ्याची भाजी मेरेको सिमला
पिझ्झ्याची भाजी
मेरेको सिमला मिर्ची आज्याबात आवडता नही.
आज ८.३० ब्रेफा - शिरा + १ कप दुध
लंच टीफीन - २ चपात्या + कोबी चणाडाळ भाजी + का.गा.बी सलाड
ईव्ह स्नॅक्स - पेर + अॅपल
रात्री जेवण काही ठरलेलं नाहीये. घरी गेल्यावर बघु.
ओटमील/ओट्स दुधात शिजवुन मला
ओटमील/ओट्स दुधात शिजवुन मला गिळवतच नाही
सस्मित, मुलांना आवडते ती
सस्मित, मुलांना आवडते ती भाजी. डबा चाटून पुसून साफ होतो. असो.
दोन दिवस काही पण आणि कसं पण खाणं झालं...
९.०० - एक पोळी आणि बेसनाचं धिरडं.
११.०० - अर्धा कप चहा आणि २ टोस्ट
१.३० - पुलाव आणि ग्रेव्ही
रात्री बघू काय करता येईल.
सस्मित ओट्स मध्ये शिजवताना
सस्मित ओट्स मध्ये शिजवताना थोडी वेलची पुड आणी मधून मधून ड्रायफ्रुट्स घालायला हरकत नाही.:स्मित: तसेही ते जात नाहीतच्,त्यात अर्धा ते १ चमचा साखर लागेलच.
आज लंचला चवळी शेंगांची भाजी, टॉ. कोशिंबीर्,फुलके,आमटी,भात.
प्रभा खाली आहे बघा ओटसचे धिरडे.
http://www.maayboli.com/node/17912?page=1
आणी अजून एक शोध मध्ये बघा,
आणी अजून एक शोध मध्ये बघा, बर्याच रेसेपीज आहेत.
http://www.maayboli.com/taxonomy/term/11687
सकाळी १ अॅप्पल , १
सकाळी १ अॅप्पल , १ आलुबुखार
दुपारी घेवड्याची भाजी आणि २ रोट्या (मैद्याच्या ) कारण चपाती आणली नव्हती आणि बाहेर पण नाही मिळु शकली.
२ मेथी पुर्या
आता रात्री साठी २ आलुबुखार,१ पेअर , ३-४ ओले खजुर ( बाजारात आलेले )
काल सकाळी कारण नसताना सिनेमन
काल सकाळी कारण नसताना सिनेमन रोल खाल्ला.
दुपारी फ्लॉवर भाजी पोळी, भात आणि उडदाची डाळ.
मधल्यावेळात बरच खाण झाल. गार्लिक फेस्टिवल मधे,गार्लीक फ्राईज्, ब्रेड, मशरुम स्टर फ्राय वर गार्लीक आईसक्रीम! म्हणुन संध्याकाळी सालड , टोमॅटो सुप.
आज सकाळी चहा, नस्त्याला ओट्मील दुध.
शनिवार/ रवीवार खाण्याचे वार असतात. आज थोडा जीभेवर ताबा ठेवावा लागेल असा विचार केला होता पण भरलेला डब्बा विसरुन आल्यामुळे दुपारी बाहेरच खाण होणार. सबवेत खायला हवा.
अन्जू ओट्मील पोह्याच्या आकाराचे असते.
रात्री पास्ता खाल्ला
रात्री पास्ता खाल्ला भाज्या,चीज घालून केला होता.
आदिती धन्यवाद. मी ओटस आणते ते बारीक असते, पोह्याच्या आकारापेक्षा लहान असते त्यामुळे मी तसेच टाकते, पोह्याच्या आकाराचे असेल तर थोडे भाजून कुस्करता येईल अगदी पीठ नाही केले तरी चालेल असे वाटते.
अजुन तरी सकाळी दुध आणि मुसेली
अजुन तरी सकाळी दुध आणि मुसेली खाल्ली...आता थोडं फरसाण.....दुपारी गवार भाजी चपाती.......संध्याकाळी काहीच नाही....आणि रात्री चं ठरलं नाही,....:)
Pages