आज काय खाल्लं?

Submitted by अदिति on 22 July, 2013 - 19:38

'आज व्यायाम केला?' हा धागा सुरु झाल्यापासुन त्याच्याकडे बघुनच व्यायामाची आठवण येते आणि येरवी केला गेला नसता तरी आठवणीने व्यायाम केला जातोय. ह्या धाग्याला बघुन जर पौष्टीक खायची आठवण / ईच्छा झाली तर फायदाच होइल अशी अपेक्श्या करते. मला तरी नक्कीच होइल Happy
हा धागा पौष्टीक आहारासाठीच(डायट) आहे. माझ्या मते आहार पौष्टीक असला, योग्यप्रमाणात असला आणि ह्याला व्यायामाची जोड असली की वजन अपोआपच अवाक्यात राहाते. तर मित्रांनो ह्या धाग्यावर आज काय खाल्लं अन ते तुम्हाला बॅलन्स्ड वाटल का , नसेल तर तसे होण्यासाठी काय बदल करता आले असते हे लिहुयात. आणिहो इतरांच्या मेन्युवर तुमची मतही मांडा .. त्या निम्मीत्याने हेल्दी पाककृतींची चर्चाही करता येइल. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागा आवडला. आपसूकच हेल्दी गोष्टी निवडल्या जातील. Happy
सकाळी ७ वाजता - १ कप चहा, १ उकडलेलं अंडं, १ टोस्ट (खरंतर व्हिट टोस्ट हवा होता पण हे पाकीट संपलं की नवीन पाकीट व्हिट टोस्टचंच आणेन.)
९:३० वाजता - १ कप दही+मिक्स बेरीज.

आता लंच १२ ला - तेव्हा मूड असेल आणि कॅफे मधे जो मेनू असेल त्यावर अवलंबून आहे. Happy

जेवणाच्या मध्यम आकाराच्या ताटाचे ४ भाग करुन त्यातील १ भाग प्रोटीन, १ भाग कार्ब आणी २ भाग सालड/ग्रीन्स मुख्यता कच्चे अस एका वेळच जेवण असावं अस सांगीतल. हे कमी जास्त प्रमाणात सगळ्यांना लागु पडायल हरकत नाही.

क्या बात है. एकदम सोप्प...

आज सकाळी चहा मग दुध आणी ओट्मील. एक तासाने एक केळी
दुपारच्या जेवणासाठी - फ्लावरची भाजी आणी पोळी, काकडी, टोमॅटो, १ अवाकाडो
मधल्या वेळेत - १ पीच व द्राक्ष आणी भेळ
रात्रीच्या जेवणासाठी - आख्या मसुराची आमटी आणी ब्राउन राईस, लेटस

९.०० वाजता ब्रेफा - शेवया उपमा गाजर+मटार+टोमॅटो घालुन
११.०० चहा + दोन क्रीम क्रॅकर बिस्किट
आज लंच साठी अंडा मसाला + दोन चपाती

आज दुपारच्या जेवणात नंदिनीने दिलेल्या पद्धतीने कारल्याची भाजी, फुलके,आमटी,टॉमेटोची कोशिंबीर, भात, खोबरे+ शेंदाणे चटणी
http://www.maayboli.com/node/9520

कस्ला भारी धागा आहे. मस्तच अदिति.
मी आज सकाळी गरम पाणी मग चहा, मग म्युसली.
लंच ला कच्चे सलाड (काकडी, गाजर, टोमॅटो), कोर्न सलाड, सूप, डाळ, एक फुलका.
आत्ता कॉफी आणि बरेच चुरमुरे आणि थोडं फरसाण याचं मिक्स.
रात्री दोन फुलके, भाजी आणि डाळ खाणार.

आज सकाळी विनासाखरेचा चहा मग १.५एक तासाने ६-७आप्पे+ विनासाखरेचा चहा
दुपारच्या जेवणासाठी - भाजी आणी २ फुलके
मधल्या वेळेत - आधी icecream,थोड्या वेळाने विनासाखरेचा चहा
रात्रीच्या जेवणासाठी - बहुतेक डाळीची आमटी ,वीतभर भाकरी,उसळ,भात + सोलकढी जेवेन.

सकाळी कॉफी मग दुध आणी ओट्मील
आज दुपारी पिझ्झा खावा लागला आणी तो ही चीझ पिझ्झा. त्यात व्यायामाला वेळ्च मिळाला नाही Sad उद्या जास्तीचा करायला पाहीजे.
मधल्या वेळात पीच आणी कलिंगड
डिनरला केल चे भाजी , पोळी आणी सालड वर योगर्ट

आज उपवास.. सकाळी हापिसला निघताना १ मोठ्ठा ग्लास ऑरेंज ज्यूस.. हापिसात एक कप कॉफी.. लंच ला साबुदाणा खिचडी खाऊन झाली आताच.. सोबत दही होतं..
दुपारी सफरचंद आणि १ केळं..

वाव! मजा येतीये सगळ्यांचे मेनू वाचायला. सध्या मी काहीही व्यायाम करत नाहीये आणि सकाळचे चालणेही बंद आहे. इथे सगळ्यांचे वाचून निदान योग्य आहार आणि नियंत्रण हे तरी होईल. अदिती, तुझ्यामुळे. थँक्स Happy

नाष्ता - ज्वारीच्या पीठाचे अर्धे थालीपीठ
११.०० - चहा पाऊण कप आणि ४ चमचे फरसाण
दुपारी - दीड पोळी, वांग्याचे भरीत
५.०० - अर्धा कप चहा आणि रोस्टेड ज्वारी २ मुठी
रात्री भातच, बहुतेक आमटी किंवा पिठल्यासोबत.

सकाळी भरपूर खजूर टाकून ओटमील,
मग लंचला बाहेरचे एक हुमस सँडविच.
मग बाकरवडी (वड्या खरतर... चांगल्या लागल्या म्हणून बचकाभर खाल्ल्या). Proud
रात्री डाळ-भात, शिरा(प्रसाद म्हणून केला असणार घरी).. Proud

भरपूर खजूरातून जास्तीची साखर नाही का खाल्ली जाणार झंपी? (डाएट करताय्/नाही कल्पना नाही. हा धागा थोडा त्याकडे झुकणारा वाटला )

Pages