फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सारंगी, गोखले रोड. थॅन्क्स मीराधा.

अश्विनी- पूर्ण पाठ उघडी टाकणारे, बास, बास परफेक्ट Proud

शर्मिला, महेश्वरी उद्यानाच्या सर्कलवरून सेंट्रल माटुंगा स्टेशनकडे जाताना डावीकडे 'प्रामाणिक' नावाचं दुकान आहे. त्याच्या शेजारीच (बहुतेक त्याचंच) एक रेडीमेड ब्लाऊजचं दुकान आहे. प्रचंड व्हरायटी आहे. एकदा भेट देच.

असंच एक दादरलाही आहे. नक्की कुठे ते बहिणीला विचारून मग लिहिते. पण वर सांगितलेलं दुकान लै भारीये. आणि तिथपर्यंत गेलीस तर पुढे कोपर्‍यावरच्या रामाश्रयचा उपमा आणि फिल्टर कॉफी यांनाही उदार आश्रय दे.

अश्विनी- पूर्ण पाठ उघडी टाकणारे,>>> Happy मला आवडतात पण अजुन पर्यंत घातले नाहीत कधी.....ते पॅडेड अस्णारे आवडत नाहीत....

माटुंगा स्टेशनकडे जाताना डावीकडे 'प्रामाणिक' नावाचं दुकान आहे>>>>>>>> महागडं आहे ना ते???

>>>तो घ्यायचा. मॅक डोनल्ड वाला नव्हे,

अमा म्हणजे तो एम.जी.( महात्मा गांधी) रोड ना. रामाचे देऊळ आणि विश्व भारती आहेत एकमेकांच्या समोर तोच.
त्या रोडवरच गंगर आयनेशनचेही दुकान आहे बहुतेक. आणि सेवाराम म्हणून दुकान जिथे दुपट्टे घ्यायला जायचो आम्ही कायम तेही आहे.
हे तुम्ही म्हणताय ते दुकान लक्षात येत नाहीये मात्र.

हेय हाय दिवाज,
मी नवीन आहे मायबोली वर.... हा धागा मस्त आहे.
मला कोणी मदत करेल का वेशभुषापमाणे हेअर स्टाईल करायला....????
मी जीन्स- टीसटॅ, फॉमल वेयर, पंजाबी ड्रेस सगलळयांवर मी नेहमी केस बांधुन टेवते. Sad

वर्षा अग तोच रोड गंगर चा...पण एक्दम् पुढे चालत गेलीस ना की एक मारकेट रोड लागेल परत तिथे बॅग्ज वगैरे मिळतात तिथे कोपर्यावरच आहे.....मोठ्ठ दुकान. ब्लाउज पिस पण असतात.....

असंच एक दादरलाही आहे. नक्की कुठे ते बहिणीला विचारून मग लिहिते. >>>>>>>>>> प्रामाणिक चे दुकान प्रीतम हॉटेल च्या समोरच आहे. स्टेशनबाहेर निघाल्यावर स्वामिनारायाण मंदीराची गल्ली.

स्कॉर्ट खरच बेस्ट असतात. पण ईकडे जर्मनीत कुठेहि मिळत नाहित. मी इतके शोधले...पण नाहिच मीळाले.

स्कॉर्ट मस्तच. माझ्याकडे कोल्स मधलाच आहे. पण तेव्हा मी खाकी का घेतला कोणास ठाऊक. शाळेतल्या मुलीसारखा दिसतो. फक्त त्याला कॉर्नरला एम्ब्रॉयडरी आहे Proud

प्रामाणिक चे दुकान प्रीतम हॉटेल च्या समोरच आहे. स्टेशनबाहेर निघाल्यावर स्वामिनारायाण मंदीराची गल्ली. >>> ते अजून एक दुकान असेल. तिथेही रेडिमेड ब्लाऊज मिळतात का?

मुंबईत फॉरेव्हर यंग आणि हर (Her) या दोन ब्रॅन्ड्सच्या शोरुम्समधे मिळतात स्कॉर्ट्स. मालाडच्या इन्फिनिटीमध्य या दोन्हीपैकी एका शोरुममधून माझ्या मुलीने घेतल्या आहेत.

महेश्वरी उद्यानाच्या सर्कलवरून सेंट्रल माटुंगा स्टेशनकडे जाताना डावीकडे 'प्रामाणिक' नावाचं दुकान आहे. त्याच्या शेजारीच (बहुतेक त्याचंच) एक रेडीमेड ब्लाऊजचं दुकान आहे. प्रचंड व्हरायटी आहे. एकदा भेट देच. >>> "मिलाप". उत्तम रेडिमेड ब्लाउजेस आणि शिवून पण सांगितलेल्या वेळेतच मिळतात. ४ दिवसात सांगितले तर अक्षरशः ४ दिवसात मिळणार.

पुण्यात असले पाठ उघडी वाले ब्लाऊज कुठे मिळतात?
शनिपाराजवळचे इनामदार ओके वाटले पण सिनेमाटाईप चांगल्या फिटींगचे नव्हते.

शनिपार च्या तिथले इनामदार यां च्याबिलोज घालूनच आम्ही मोठ्याचे म्हातारे झालो .

कृपया सगळ्या फॅशनसाठी एकच धागा करण्यापेक्षा कपड्यांच्या फॅशन, केसांच्या फॅशन, पादत्राणांच्या फॅशन, दागीन्यांच्या फॅशन असे वेगवेगळे धागे करा. नंतर शोधायलाही सोपे जाईल.

या एकाच धाग्यावरचे प्रतिसाद वाढल्याने तसाही नवीन धागा करण्याची वेळ आली आहे.

Pages