फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

काजळ कसं लावायच? मला काजळ खुप आवडतं पण माझ खालच्या बाजुला पसरतं डोळ्याखाली काळी वर्तुळ आलयं अस वाटतयं. हौसेखातर घेतलय पण लावताच येत नाही. प्लिज सांगाल का? lakme eyeconic kajal आहे. Sad असंच पडुन आहे.

हाय Happy

माझ्याकडे एक काळ्या रंगाचा कुर्ता आहे. त्यावर नाजुक गोल्ड्न मणिवर्क आहे.त्याला साईड कट नाही आहे.फिटिंग आहे. त्याच्या खाली कोणत्या रंगाची लेगीज घालावी?

अर्रे वा...खुप दिवसांनी हा धागा वर आलाय.....:)
माझ्याकडे एक काळ्या रंगाचा कुर्ता आहे. त्यावर नाजुक गोल्ड्न मणिवर्क आहे.त्याला साईड कट नाही आहे.फिटिंग आहे>>>>>>>>>>. अविगा कुठलाही कॉन्ट्रास्ट चांगला दिसेल.....फक्त काळा आणि गोल्डन कुर्ता असेल तर खाली ब्राईट कलर मधे पिंक , ब्लु , मँगो येल्लो, ऑलिव ग्रीन , मजेंटा चांगला दिसेल.......पण तुझा कुर्त्याचा फोटो टाकु शकलीस तर बरं होइल.....माझ्या कडे पण सेम कॉम्बिनेशन चा कुर्ता आहे..मी स्किन कलर चा पटियाला विथ ओढणी असा कॉम्बो केलाय..मस्त दिसतो तो....स्किन कलर चा लेगिन भयाण दिसतो....कारण तो घातल्यावर काही घातलं नाही असं बघणार्याला वाटु शकतं.....

मृणाल १>>>> हा घे
New Image.JPG

माझा सर्वात आवडता आणि कम्फर्टेबल स्कर्ट.... Happy
तो पँट सारखा घालायचा आणि वरुन रॅप करायचा.....

अनिश्का, वर जे घातलं आहेस त्याला स्कॉर्ट म्हणतात इथे.>>>>>>>>>>>. हो का?? मला माहित नव्हतं.....पण मला हेच बरं वाटतं गं कुठेही पिकनिक ला गेलं तरी....कसही हुंदडा बागडा काही दिसत नाही,,, Wink सायो इथे म्हणजे कुठे??? इंडियात???

मुलुंड वेस्ट स्टेशन रोड वर एक दुकान आहे. मस्त फॉर्मल गोल्ड सिल्वर व इतर कलर्स चे रेडि. ब्लाउजेस मिळतात. शिरीअलीतल्या फॅशनीचे असतात.

ठाण्यात त्या एक इनामदार म्हणून आहेत त्यांच्याकडे असतात.
माझ्याकडे कार्ड वगैरे होतं त्यांचं आता सापडणं मुश्कील आहे. पार्ल्यात ग्राहक पेठेत स्टॉल पण असतो त्यांचा.

इनामदार.... जांभळी नाक्याला चिंतामणीच्या चौकात ( चिंतामणीला काटकोनात ) आहे हे दुकान.

मुलुंड वेस्ट स्टेशन रोड वर एक दुकान आहे.>>>>>>.. मुलुंड वेस्ट ला ते मोठं दुकान आहे त्यात नाईट ड्रेस. इनर वेअर, परकर , रेडिमेड ब्लाउज असं सर्व मिळतं तेच ना???? मी जरा विचारुन सांगते त्या दुकानाचं नाव....स्टेशन ला एक लाईन मधे सुरुवातीला चप्पल ची दुकानं आहेत...आशिकी, पादुका, बाटा वगैरे.....त्या लाईन ने पुढे थोडं चालत गेलं की कोपर्यावर आहे ते दुकान......मोठ्ठं दुकान आहे....

नेटवर हे पत्ते मिळालेत-

Raj Laxmi Sari Center
Location - Koparkhairane,Mumbai-400709
Also See - Sarees, Sarees Silk
Usha Sari & Matching Centre
Location - Naupada W Thane,Thane-400602

ओके. धनश्री. जांभळी नाका,चिंतांमणीचं दुकान माहीत आहे. थॅन्क्स.

अनिश्का, विचारुन सांगच. प्लिज. जरा झगरमगर टाइप्सच हवी आहेत म्हणजे बहुतेक ते सिरियलवाल्यांचंच बरं पडेल.

You can get readymade zagarmagar blouse in Saragi on gokhale road.

बघून सांगते. इतकी झगर मगर असतात की एकतर माझ्या मापाचे मिळालेच नाही आणि पूर्ण पाठ उघ्डी टाकणारी बिलोजें काही आपण ह्या जन्मात घालू शकणार नाही हे एकदम लक्षात आल्याने मी खुदकन हसून बाहेरच पडले सिल्वर गोल्ड व रंगीत टिकल्यां वाले असतात. अनिश्का म्हणते तेच आहे. वेस्ट ला स्टेशन हून बाहेर पडल्यावर जो रोड दिसतो तो घ्यायचा. मॅक डोनल्ड वाला नव्हे,
भाज्या बसतात तो नव्हे मधला. मला आज तिथेच आकडे पिना रब्बरे घ्यायला जायचे आहे.

समोर चौकात पाच प्रकारचे पाणी पुरीचे पाणी मिळते. ही खूण लक्षात ठेव. Wink

Pages