स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझ्या आसपास कोणाकडे ओटा किंवा खिडक्यांच्या चौकटी बसवण्याचं काम चालू आहे का याचा कसून शोध घे>> ही कल्पना दिल्याबद्दल धन्यवाद. कलकत्त्यात सुयोग्य पोळपाटाचा शोध ही एक दर्दभरी दास्ताँ आहे.. मी आपली दिल्लीतून पुढच्या वेळी ग्रॅनाईटचा पोळपाट कसा आणावा (भांडणं न करता) त्याचा सीरियसली विचार करत होते Happy

मामी, पुट्टू मेकर मला मागच्या महिन्यात गिफ्ट आलाय. नवर्‍याला ते प्रकरण अजिबात न आवडल्याने एक दोनदाच पुट्टू बनवलेत. Happy ऑल द बेस्ट!!

आमच्या पप्पांनी मरीन प्लायवूड आणि लाकडाचा एक दणकाटातिदणकट पोळपाट बनवून आणून दिलाय. वजनाला हलका आहे, पण मजबूत एकदम. फेका, पाण्यात भिजवून ठेवा काही होत नाही. Happy सुताराकडून तसा बनवून मिळत असेल तर अवश्य घ्या.

मी वापरते अ‍ॅल्युमिनमचा पोळपाट. पोळपाटाखाली वायनल टेबलमॅट असते. लॅमिनेटवाले काउंटर टॉप असल्याने लाकडी पोळपाट असतानाही मी मॅट वापरायचे.

स्टार सी जे वर संजीव कपूर करतो ते डायमंड पॅन्स कुणी वापरलेत का?
बरेच महिने ते माझ्या विशलिस्ट वर आहे. कुणाला अनुभव असेल तर जरूर लिहा. मी घ्यायचा विचार करतेय.

मी बरीच वर्षं वापरते आहे स्टीलचा पोळपाट. त्याच्या पायांना जाड रबरी प्लास्टीकचं आवरण आहे आणि ते खालच्या बाजूला थोडं फ्लॅट आहे. पोळपाट अजिबात सरकत किंवा हलत नाही. भरभर लाटतानाही नाही. पोळ्या लाटण्याचा पृष्ठभाग दणकट जाडीच्या स्टीलचा आहे. मी हा पार्ल्याच्याच मुरूगनमधून घेतला होता.

बेकिंग साठी चे प्रोफेशनल इ क्विपमें ट मुंबईत कुठे मि ळेल. मोठ्या कपॅसिटीचा अवन, चांगला फूड प्रोसेसर
इत्यादी? जॉय ऑफ बेकिंग मधील रेसीपी फार आवडल्या आहेत.

ग्रॅनाईटचा पोळपाट कुठेही मिळाला नाही- अगदी तुळशीबागेतही Sad संगमरवरी होते, पण भयंकर जड. अखेर, स्टीलचाच पोळपाट आणला. एकसंध आहे. पाय वेगळे चिकटवलेले नाहीत. पायांना खाली रबरी गट्टू आहे. पोळ्या लाटताना हलला नाही पोळपाट.

बीडाचे आप्पेपात्र कुठे मिळेल? ठाण्यात किंवा मुंबईत?
नाशिकला चौकशी केली तर दुकानदाराने सांगितले की बीडाचे आप्पेपात्र आता मिळत नाही त्यामुळे निर्लेपचेच घ्यावे लागेल. मला नॉनस्टिक आप्पेपात्र नको आहे कारण इथे मिनी पॅनकेक मेकर (इलेक्ट्रीक) आहे.
बीडाचे आप्पेपात्र खरच मिळत नाही का?

मीही परवा एका प्रदर्शनातून (अखेर) संगमरवरी पोळपाट घेतला. कैच्याकैच जड आहे. पण लाकडी पोळपाट इतके भंगार मिळतात इथे की तेवढेच दंडाचे स्नायू बळकट होतील अशी स्वतःची समजूत काढून घेतला. पण पोळ्या मस्त लाटल्या जातायत...

स्टील पोळपाट रॉक्स! नॉट लिटरली Proud

बिडाचं आप्पेपात्र मिळतं. माटुंगमला हमखास किंवा पार्ल्याच्या मुरुगनकडे चौकशी करा.

नाही, पोळपाट एकदोनदा उचलणं हेही शक्तीप्रदर्शनाचं काम आहे. नेहेमीसारखं एकीकडे भाजी परतताना दुसर्‍या हाताने पोळपाटाची मांडामांड केलीये वगैरे फारसं शक्य नाहीये Wink

.

वत्सला, तुला बोहोरपट्टी माहित आहे का, सराफवाजाराजवळ? तिथे बोहोरी लोकांची दुकाने आहेत जिथे लोखंडी वस्तु मिळतात तिथे तुला बीडाचे आप्पेपात्र मिळेल.

स्टीलचा पोळपाट मी पण गेले कित्येक वर्ष वापरते. पोळ्याला त्रास नाही. खाली काही न घेता पण लाटायची सवय झाली आहे. पण पराठे करताना कधीकधी चिकटते. दगडांवर पण होते का तसे?

निवेदिता, आजच सकाळी निनाद परत आला! आणि त्याने बोहोरपट्टीतूनच आप्पेपात्र आणले. आधी भांडीबाजारात त्याला त्या लोकांनी सांगितले होते की निर्लेपचेच येते आता. बीडाचे मिळत नाही म्हणे!
बोहोरपटीतून आणलेले आप्पेपात्र माझ्यासाठी सरप्राईज होते!

बरं आता त्या आप्पेपात्रात आप्पे करण्यापूर्वी त्याला सीझन कसे करायचे? कसे वापारायचे?

Pages