मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

dineshvs aani i_am_sam Thanks me te pustak vachtoy, kata yeto angavar vachtana. aata movie pan pahato.

दादा कोंडके चं "एकटा जीव" कुणी वाचलं असेल तर सांगा

<<<<<दादा कोंडके चं "एकटा जीव" कुणी वाचलं असेल तर सांगा>>>>>..........
मी वाचलयं ते पुस्तक. अगदी खिळवुन ठेवणारं पुस्तक आहे. आपल्याला वाटत कि एवढा विनोदी,आनंदि, अष्ट्पैलु अभिनेता नेहमी माणसांच्या गराड्यात असेल,
पण वस्तुस्थीती तशी नाहिये. तो माणुस किती एकाकी होता, हे पुस्तक वाचल्यावर समजत. एकटा जीव मधले वाक्ये......
"हे इश्वरा, जर पुणर्जन्म असेल तर पुढच्या जन्मी मला ऐश्वर्य, किर्ती, सन्मान यापैकि काही नाही दिलं तरी चालेल पण माझी म्हणता येतील अशी चार माणसं तरी मला दे"

----------------------------------------------------------------------------------
की हे शब्दरत्नाचे सागर ! की हे मुक्तांचे मुक्त सरोवर !

मी "नाच गं घुमा" आणि "भोगले जे दु:ख त्याला" वाचले. लेखिका अनुक्रमे माधवी देसाई व आशा अपराद आहेत.
एकदा तरी अवश्य वाचावे.

>>दादा कोंडके चं "एकटा जीव" कुणी वाचलं असेल तर सांगा>> वाचलं आहे हे पुस्तक. चांगलं आहे. जरुर वाचा.

sarsenapati

Thanks, thodi mahit milalyamule interest vadhla. "ekta jeev" nakkich vachin

'प्रुथ्वीवर माणूस उपराच' कोणी वाचलय का?

सुरभी- वाचलंय. तसं एकदा(च) वाचायला ठीक आहे.पटेलच असं नाही.
बहुधा आर्काइव्ज मध्ये चर्चा होती त्यावर.

हो का? शोधते.. धन्यवाद.

'आंधळ्याच्या गायी' चांगलेच पुस्तक आहे >> चांगले आहे पण कथा वाचुन झाल्यावर फा$$$$$$$$र उदास वाटते.
>> अनुमोदन!
अगदि उदास फील येउन जातो पुस्तक वाचल्यावर!

"माचीवरला बुधा" काल परत वाचलं. पुस्तक अतिशय सुंदर आहे. कितीही वेळा वाचलं तरी परत परत वाचावसं वाटतं. पावसाळ्याच्या दिवसात तर जास्तच!
___________________________
"शापादपि शरादपि"

'नॉट विदाऊट माय डॉटर' वरचं पुस्तक पिक्चरपेक्षा कित्तीतरी पटीने चांगलंय. पुस्तक वाचून त्यावरचा पिक्चर बघण्याची उत्सुकता वाटते पण न बघितलेलाच चांगला.

तसच उदास मला कविता महाजनांच 'भिन्न' वाचून वाटलं .

एच आय वी पॉजिटीव्ह/संसर्ग झालेली नायिका अन अजून त्याच संदर्भात काम करणार्‍यांची सगळी मनस्थिती लेखिकेने खूप चांगल्या रितीने दाखवली आहे. त्यातले काही काही पॅरा तर अगदी अंगावर येतात . मला आवडलं हे पुस्तक.

लेनिना , प्रतिक्षा कमल , रचिता बर्वे ह्यांची ओळख होत जाते जसं जसं आपण ते पुस्तक वाचत जातो तसं तसं ...

-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....

सध्या श्रीमान योगी वाचतो आहे....

मी पण आणलंय 'एकटा जीव...' आता वाचायला मजा येईल. आजच सुरू करते. Happy

मी ग्रंथालयात चौकशी केली, तर त्यांनी सांगितलं की दादा कोंडकेंचं आत्मचरित्र म्हणजे 'सोंगाड्या'! 'एकटा जीव...' त्यांच्याकडे नाही म्हणून की काय कोण जाणे! Uhoh
कोणी दोन्ही पुस्तकं वाचली आहेत का?
-------------------------------------------
Prioritize. It hurts (others) but helps (you).

सोंगाड्या वाचलेले नाही.. पण एकटा जीव वाच्ले आहे.. आणि तेच त्यांचे आत्मचरित्र आहे... अस प्रस्तावनेत तरी लीहीले आहे..
पुस्तक मस्त आहे पण
मी एव्हढ्यात राम नगरी वाचले राम नगरकरांचे मस्त आहे

'सोंगाड्या' आणि 'एकटा जीव' ही दोन्ही दादा कोंडके यांची आत्मचरित्रं आहेत. ही दोन्ही पुस्तकं इतरांनीच लिहिली आहेत. यावरून त्या दोन्ही 'शब्दांकनकारांमध्ये' वादही झाला होता. या दोन्ही पुस्तकांतील अनेक घटना कपोलकल्पित आहेत. विशेषत: आशा भोसले, लता मंगेशकर, भालजी पेढारकर यांचाबद्दल लिहिलेला तपशील तद्दन खोटा आहे, हे वाचतानाही लक्षात येतं.
या खोटेपणावर 'एका सोंगाड्याची बतावणी' हे पुस्तक श्री. इसाक मुजावर यांनी लिहिलं आहे.

'नॉट विदाऊट माय डॉटर' वरचं पुस्तक पिक्चरपेक्षा कित्तीतरी पटीने चांगलंय. >>> मला तो पिक्चर ही आवडला होता, म्हणजे पुस्तक आणखी चांगले असणार. तेवढा 'शक्ती द पॉवर' हे पुस्तक किंवा ओरिजिनल पिक्चर बघितल्यावर लगेच पाहू नका Happy

एकटा जीव वाचले आहे, ते खुद्द दादा कोंडके यांनी लिहिलेले नाही. लेखिकेशी दादा कोंडके यांनी गप्पा मारल्या आहेत, त्या लेखिकेने शब्दबद्ध केल्या आहेत.

दादा कोंडके काहीसे विकृतच होते. दुसर्‍यांचे चारित्र्यहनन करण्यात एकदम निष्णात. काय वाटेल ते सांगितले आहे त्यानी त्यांच्या शब्दांकन काराना. रत्नमाला, उषा चव्हाण, जयवन्त कुलकर्णी, लता, आशा, अशोक सराफ, वसन्त सबनीस, निळू फुले, राम नगरकर, व्ही. शांताराम ,बालपणातील दुकान मालक, विजय कोंडके, त्यांचा भाऊ यांचे चारित्र्यहनन तर मला आता पटकन आठवतेय. अजून तर फार चिखलफेक आहे. मनुष्यस्वभावाचा विचित्र नमुना म्हणून त्यांची पुस्तके वाचायला हरकत नाही Happy

'इश्काचा जहरी प्याला' वाचले.
मीनाकुमारी आणि कमाल अमरोहींवर आहे. चांगले आहे. पुस्तकात दोघांच्या नातेसंबंधाचे खरे चित्रण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कुठेही लिखाणाला gossiping चे स्वरुप येत नाही. अशा legends बद्दल सामान्य माणसाला नेहेमीच वाचायची उत्सुकता असते नी मसालेदार गोष्टींच जास्त समोर येतात. हे पुस्तक वाचताना मात्र अशा गोष्टींना महत्त्व न देता लेखिकेने तटस्थपणे लिहिल्याचे जाणवते.
-----------------------------------------------------------
इथे प्रत्येक फ्लॅटचे दार बंद नी प्रत्येक जण घरात बसून आहे,
शेजार्‍याची बेल वाजल्यावर मात्र आयहोल मधून पाहण्याचा छंद आहे!
-----------------------------------------------------------

दळवींचं "सारे प्रवासी घडीचे" वाचलय का कुणी? अतिशय उदास आणि अतिशय विनोदी यांचं अफलातून मिश्रण यात आहे.
_______________________________
"शापादपि शरादपि"

शास्त्रींच्या कृपेनी हेच पुस्तक वाचते आहे. शेवटच्या प्रकरणावर आहे. मग लिहीते.

पर्वा टाकलेले पोस्ट इथे परत संदर्भासाठी...

मनोविकासने भारतीय लेखिका अशी मालिका केली आहे. इतर भारतीय भाषांमधील लेखिकांच्या कथांचा मराठी मधे अनुवाद असे स्वरूप आहे या मालिकेचे. अनुवादक वेगवेगळे आहेत. संपादन कविता महाजनांचे आहे. कन्नड, मल्याळी आणि अजून एक भाषा असे तीन आत्ता पुण्यातल्या पाथफायंडर मधे उपलब्ध आहेत.
त्यातलं मल्याळी मी घेतलंय. त्याचे तपशील खाली देतेय.
लेखन अप्रतिम आहे. थरकाप होतो वाचताना इतकं 'प्रामाणिक' आहे. भाषांतरही खूप सहज आहे. दुसर्‍या भाषेतलं हे आहे असं न वाटावं इतपत सहज. संग्रही ठेवण्यासारखं पुस्तक आहे.

'पूल नसलेली नदी'
लेखिका - मानसी (मल्याळी)
मराठी अनुवाद - प्रफुल्ल शिलेदार
संपादन - कविता महाजन
मनोविकास प्रकाशन

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

या वरच्या पुस्तकाबरोबरच इतर काही पुस्तकं घेतलीयेत.
पिकासो - माधुरी पुरंदरे.
गंगाजल (कथा) - इरावती कर्वे
ही महत्वाची.
वाचून झालं की अजून सांगेनच.

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

सध्या शोभा बोंद्रेंचे मस्त कलंदर वाचत आहे. छान व्यक्तीचित्रण केली आहेत त्यांनी.

आजच व्यंकटेश माडगूळकरांचं 'करूणाष्टक' वाचून संपवलं. खूपच आवडलं.
पुस्तक हातातून खाली ठेववंत नाही. प्रत्येकाने जरूर वाचावं असं कोणत्याही वयोगटाला भावेल असं.
माझ्या शब्दात मला पुस्तकाबद्दल फार नाही सांगता येणार कारण वाचून मी अक्षरश: मूक नि:शब्द झालेय.
ही एक कुटुंबकहाणी आणि त्यात असणारी एकूण आठ माणसं यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना आणि त्या सर्वांची साक्षिदार आई. या सर्व व्यक्तीरूपी समस्या म्हणजे जणू ८ कोडीच; (म्हणून पुस्तकाचं नाव करूणाष्टक) ती तिने जवळून पाहीली आणि आपल्या परिने सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला.

पुस्तकाचा शेवट मनाला रूखरूख तर लावून जातोच, पण डोळ्यातून पाणी ही काढतो.

कविता महाजनांची 'ब्र' वाचली. छान आहे.
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------

Pages