आयपीएल-६ (२०१३)

Submitted by स्वरुप on 4 March, 2013 - 12:07

आयपीएल चे सहावे पर्व सुरू व्हायला आता फक्त मोजून एक महीना उरलाय.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... संघमालक आणि स्टार खेळाडू नव्या जर्सीजचे फर्स्ट लूक साजरे करतायत...."कोरबो लोरबो जीतबो", "हल्ला-बोल" वगैरे आरोळ्या घुमू लागल्यात.... नव्या सनरायझर्स बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.... अश्यात भारतीय संघ ऑसीजविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्यामुळे लोकांना जरा जास्तीचा उत्साह आलाय...
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात.

हा धागा आयपीएल-६ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी Happy

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्याच्या ......... # ............. स्वतः पण बाहेर गेले दुसर्यांना पण घेउन गेले.....:(
संपुर्ण स्पर्धेत तर घाण केलीच ......जाताना पण घाण करुनच गेले......

yusuf pathan ne football khelun dakhun dil ki to majalelya khanachya team madhe ahe.....
Well done pune.....

. स्वतः पण बाहेर गेले दुसर्यांना पण घेउन गेले.....अरेरे
संपुर्ण स्पर्धेत तर घाण केलीच ......जाताना पण घाण करुनच गेले...... >> काहितरीच. KKR ला PWI विरुद्ध जिंकता आले नाहि हे KKR साठी shameful आहे, PWI साठी नाही. It's not charity so you can not expect teams to sacrifice matches so other teams can advance.

असामी, अनुमोदन!
मला आनंद झाला पुणे जिंकले म्हणुन, आणि तो कोणाबरोबरही जिंकले असते तरी झालाच असता.

द्रवीडला चक्क ढापला..... थर्डक्लास अंपयरींग... श्या!
द्रवीडची रिएक्शन बघून तोही माणूस आहे यावर विश्वास बसतोय

२८ वर चार.... राजस्थानची हालत खराब पण बिन्नी-वॉटसन मागच्या मॅचसारखी मॅच खेचून आणतील अशी आशा आहे!

पोलार्ड डोक्यात जातोय आणि त्याला राजस्थानच्या डगआउट समोर उभा करणारा रोहित शर्मा सुद्धा!
कुठे हमखास मॅचविनर आणि तरीही विनम्र ख्रिस गेल आणि कुठे एका मोठ्या खेळीचे यश डोक्यात गेलेला त्याचा हा कुरापतखोर देशबांधव पोलार्ड Angry

Mumbai Rocks....
Marathi manus Talapla....
Aditya Tare Half century...

पुणे जिंदाबाद.. Happy
लै भारी...
त्यानी भल्याभल्याना हरवलंय ह्या सिजन मध्ये.
एकही मारा लेकीन सॉलिड मारा...

केकेआर बावळट आहेत...
पुण्याविरुद्ध हरतात म्हणजे काय..
ते ही अशा गोल्डन चान्सला..
शेमफुल...

संपुर्ण स्पर्धेत तर घाण केलीच ......जाताना पण घाण करुनच गेले.>>> अजिबातच पटलं नाही.
मुद्द्दाम हरावं की काय??? बट व्हाय????

कुठे हमखास मॅचविनर आणि तरीही विनम्र ख्रिस गेल आणि कुठे एका मोठ्या खेळीचे यश डोक्यात गेलेला त्याचा हा कुरापतखोर देशबांधव पोलार्ड राग >>
पोलार्ड ची काय चूक आहे त्यात ? जर वॅटसन ने मॅक्सवेलला सेंड ऑफ दिलेला चालतो , तर त्याला दिला तर काय बिघडल ?
He plays his own game and he enjoys it , that's all !
If Aussies do it , it's tactics , if others it's a violations of spirit of cricket , हेच खर Wink

<< पोलार्ड डोक्यात जातोय >> खरंय. कालच्या पोलार्डच्या आगाऊपणाबद्दल वाचलं तें खरं असेल- असावंच-,तर त्याला जाहीरपणे समज देणं अत्यावश्यक. खेळाच्या ओघात झालेलं जें कांहीसं क्षम्य आहे तेंच असं जाणून बुजून केलेलं मात्र अक्षम्य आहे. मीं जर संघाच्या व्यवस्थापनाचा भाग असतो [ हंसू नका !], तर त्याला एक-दोन सामने तरी शिक्षा म्हणून बाहेर बसवण्याचाच आग्रह धरला असता !

कालच्या पोलार्डच्या आगाऊपणाबद्दल वाचलं तें खरं असेल- असावंच-,तर त्याला जाहीरपणे समज देणं अत्यावश्यक. खेळाच्या ओघात झालेलं जें कांहीसं क्षम्य आहे तेंच असं जाणून बुजून केलेलं मात्र अक्षम्य आहे. मीं जर संघाच्या व्यवस्थापनाचा भाग असतो [ हंसू नका !], तर त्याला एक-दोन सामने तरी शिक्षा म्हणून बाहेर बसवण्याचाच आग्रह धरला असता ! >> भाऊ , Problem is that it's against Watson , who has a history for this . We don't know what he had done to provoke this , right ?

<< We don't know what he had done to provoke this , right ?>> If there was, in fact, any provocation done privately, the retaliation also should have been similar; the public show of retaliation [ if it were so] in this manner cannot be justified , particularly in a sport event in which sportsmen of all castes & creeds from different countries are participating. I believe, we should not apply different standards for Australians and W.Indians or for anyone else in such matters.

KKR ला PWI विरुद्ध जिंकता आले नाहि हे KKR साठी shameful आहे, PWI साठी नाही. It's not charity so you can not expect teams to sacrifice matches so other teams can advance. >>> +1

तसेही कोलकत्ता एक गंभीर आणि नारायण सोडला तर बकवास टीम आहे. त्यांची निवड (दर मॅचवेळी) चुकली त्याचे फळ त्यांना भोगावे लागले.

' स्पॉट फिक्सींग '!!! चला, शेवटीं मीठाचा खडा पडलाच 'आयपीएल-२०१३'च्या दुधांत !!!! Sad

चला, शेवटीं मीठाचा खडा पडलाच 'आयपीएल-२०१३'च्या दुधांत !!!! >>>>

संपूर्ण दुधाचीच शुद्धता तपासायला हवी!

थिंक ऑफ इट पुण्याने १७० अनेकदा क्रॉस केले आहेत. पुणे वाईट टीम नाही. ओपनर्सनी अर्ध्यापेक्षा जास्त वेळा सॉलिड स्टार्ट दिला होता. पण डिंडा सारखे बॉलर पुण्यात असल्यामुळे पुण्याची नौका पार झाली नाही. भूवी सोबत आणखी एक चांगला बॉलर असता (खरे तर दोन) तर हीच टीम खूप वेगळी दिसली असती. शिवाय पार्नेलला त्यांनी संधी आता आता दिली आहे. तो आधी खेळला असता तर फरक दिसला असता. डिंडा अगदीच वाईट नाही हे खरे पण त्याचे बॅडलक खूप खराब आहे. Happy

तरे ! MI नी तरे ला प्ले ऑफ मध्ये (रादर इथून पुढच्या सर्व मॅचेस मध्ये) घ्यावे का? तुमचे मत काय आहे?

डिंडा अगदीच वाईट नाही हे खरे पण त्याचे बॅडलक खूप खराब आहे. स्मित >> +१
त्याच्या ४ ओव्हर सुरूवातीलाच संपवायला हव्या होत्या

मी देखील आधींच म्हटल्याप्रमाणे खरंच<< पुण्याच्या अपयशाची इतकी नियमितता बुचकळ्यात टाकणारी आहे. प्रेरणादायी नेतृत्वाचा अभाव ?>> कीं युवराज निष्प्रभ झाल्यामुळें ? शेवटच्या स्थानाचा मानकरी ठरण्याइतपत पुणे संघ वाईट नाही, हें खरंच.

आणखी एक ऑब्झर्वेशन
राहूल द्रविडने फॉकनरला नं ३ वर नेहमी प्रमोट करू नये. आता इथून पुढे

१. अजिंक्य २ द्रविड ३. संजू सॅमसन ४. वॉटसन ५. बिन्नी ६. हॉज ७. याज्ञीक ८ फॉकनर

असेच यावे. तो दरवेळी इतक्यांदा क्रम बदलतोय की एक दोन मॅच मध्ये (मुंबई सहीत) विनाकारण हारावे लागले. तसेही फॉकनरची बॅट तळपायची असेल तर ती ७ नं ला ही तळपेलच.

-------

श्री ला फक्त श्रीच त्याच्यापासून वाचवू शकतो असे धोणीने एकदा म्हणलेले. ते फारच खरे आहे.

शेवटच्या स्थानाचा मानकरी ठरण्याइतपत पुणे संघ वाईट नाही, हें खरंच.>>>

+१

परंतु, खुप प्रयोग केले ह्या संघाने! कर्णधार किती बदलले!

डिंडा अगदीच वाईट नाही हे खरे पण त्याचे बॅडलक खूप खराब आहे. >> Lol

केदार, हे वाक्य विनोद बाफवर जास्त शोभून दिसेल Happy वाईट? मी तर म्हणतो दिंडा हा बोलरच नाहिये. नुस्ता विकेट्सच्या दिशेने बॉल टाकणे म्हणजे बोलिंग नव्हे हे त्याला कोणितरी सांगायला पाहिजे Happy
निदान भूवीकडं बघून तर शिकावं काहितरी Happy

मी तर म्हणतो दिंडा हा बोलरच नाहि >>> अरे काही लोकांच्या मते तो पनवती आहे. KKR ने काढला तर शेवटून पहिल्या स्थानावरून एकदम पहिल्या स्थानावर. आता त्याची गच्छंती निश्चित आहे. डोन्ट बी सरप्राईज्ड २०१४ ला पुणे एकदम विजेते झाले तर. Lol

>>मी तर म्हणतो दिंडा हा बोलरच नाह>>..

'बॉलर' एकच आहे- स्टेन.
जाऊदे.. Happy
सचिन 'बसल्यावर' मुंबई चा विजय हे चांगलं लक्षण आहे.. 'तरे' तारी त्याला कोण मारी Happy

अरे काही लोकांच्या मते तो पनवती आहे >> Lol

आता त्याची गच्छंती निश्चित आहे >> सहाराश्रींना त्याच्याबद्द्ल (बंगाली असल्यानं? Wink ) विशेष प्रेम आहे बहुतेक नाहितर तो प्रत्येक मॅच नसता खेळला. त्यामुळे काही सांगता येत नाही Happy

Pages