आयपीएल चे सहावे पर्व सुरू व्हायला आता फक्त मोजून एक महीना उरलाय.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... संघमालक आणि स्टार खेळाडू नव्या जर्सीजचे फर्स्ट लूक साजरे करतायत...."कोरबो लोरबो जीतबो", "हल्ला-बोल" वगैरे आरोळ्या घुमू लागल्यात.... नव्या सनरायझर्स बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.... अश्यात भारतीय संघ ऑसीजविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्यामुळे लोकांना जरा जास्तीचा उत्साह आलाय...
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात.
हा धागा आयपीएल-६ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी 
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
अंडरवर्ल्ड ची यंत्रणा,
अंडरवर्ल्ड ची यंत्रणा, सट्टेबाज, संघान्चे मालक, अनेक खेळाडू, आणि कोण कोण तिकडे अमाप कमाऊन तुमचे पैसे आणि वेळ घालवताहेत. किशोरवयीन मुलांपासून करोडो लोकांना कांही अधिक चांगल्या पद्धतीने वेळ सत्कारणी लावण्यापासून रोखतायेत.
एवढे तुम्हाला बनवले जातेय तरी असल्या फालतू गोष्टींवर कसली चर्चा करताय?
रामराम.
.
.
बाबानो बस करा आयपीएल . ह्या
बाबानो बस करा आयपीएल . ह्या साऱ्या म्याचेस फिक्स दिसतायत हे जे संघ विकत घेतलेले आहेत ते सारे उद्योगपती आहेत ते काहीही करून स्वताच्या फायदा बघणार. त्यांना खेळाप्रती काही घेणे देणे नाही.खेळाडू हे कठपुतली बाहुल्या वाटतायत त्यांच्या दोऱ्या दुबई नाहीतर पाकिस्तानहून दाऊदची टोळी हलवतेय आणि आम्ही मुर्खा सारख्या टाळ्या वाजवतोय. कोंबड्यांच्या झुंजी लावल्यासारख्या खेळाडूंच्या झुंजी लावतात. देशासाठी खेळणारे आपले प्लेयर गुलामान्सारखे लिलावात विकले जातात. सचिन, द्रविड सारख्या खेळाडूनीही पैशासाठी त्यांच्या रांगेत उभे राहावे हे त्यांना आणि त्यांना मानणाऱ्या क्रिकेट प्रेमी साठी लांच्छनास्पद आहे.
श्रीसंथ ला म्याच फिक्सिंग
श्रीसंथ ला म्याच फिक्सिंग केल्याबद्दल अटक झाली.
देशाकडून खेळतांना अशाच कारणाकरता अझरुद्दिनला टीमम्धून बाहेर ठेवले होते पण खासदार म्हणून संसदेत घेतले. आता श्रीसंथला संसदेत जायची संधि मिळेल असे दिसते. संजूबाबामागे जसे बॉलिवुड आक्रोश करीत उभे आहे तसे क्रिकेट जगत आणि क्रिकेट प्रेमी यांना शोक अनावर होणार.
If there was, in fact, any
If there was, in fact, any provocation done privately, the retaliation also should have been similar; the public show of retaliation [ if it were so] in this manner cannot be justified , particularly in a sport event in which sportsmen of all castes & creeds from different countries are participating. I believe, we should not apply different standards for Australians and W.Indians or for anyone else in such matters. >> +१ पण भाऊ सुरूवात मॅक्सवेलला दिलेल्या सेंड ऑफ ने झाली होती तेंव्हा ह्यावर अधिक न बोलणेच योग्य ठरेल. पोलार्ड जो असे usually वागत नाहि तो असे वागला तेही वॅटसन बरोबर जो अशा प्रकरणात आधिही अडकला आहे ह्यात बरेच काहि आहे.
भुवनेशकुमार हा एकमेव बॉलर
भुवनेशकुमार हा एकमेव बॉलर भरवश्याचा आहे पुण्याकडे. बाकी सगळे मटका.

गेलच्या झंझावातासमोत एकटाच काय तो टिकला
शेवटच्या स्थानाचा मानकरी ठरण्याइतपत पुणे संघ वाईट नाही, हें खरंच.>>> अगदी अगदी. म्हणुनच वाईट वाटतं प्रत्येकवेळी हरल्यावर.
सचिन, द्रविड सारख्या
सचिन, द्रविड सारख्या खेळाडूनीही पैशासाठी त्यांच्या रांगेत उभे राहावे हे त्यांना आणि त्यांना मानणाऱ्या क्रिकेट प्रेमी साठी लांच्छनास्पद आहे.
अहो पण, त्या दोघांना तसे वाटत नसेल. त्यांचे खेळावर अति प्रेम आहे, नि म्हणून ते खेळतात. पैशासाठीच नाही. क्रिकेटप्रेमींना तर काहीच लांछनास्पद नसते. खेळावरचे प्रेम खेळाडूवर कधी जाऊन बसते हे समजतच नाही. कवितेतले प्रेमी जसे प्रेयसी साठी जीव द्यायला तयार असतात, सिनेनटांचे चहाते जसे त्यांच्यासाठी जीव टाकायला तयार असतात, तसेच तेहि.
असे मी कुठेतरी वाचले.
<< क्रिकेटप्रेमींना तर काहीच
<< क्रिकेटप्रेमींना तर काहीच लांछनास्पद नसते.>> आपल्याकडील प्रतिभेची प्रामाणिकपणे, अपार मेहनतीने जोपासना करून आणि कायद्याच्या व नैतिकतेच्या मर्यादा संभाळून त्याचा ' मार्केट व्हॅल्यू'नुसार मोबदला मिळवणं, हें जर इतर सर्व व्यावसायिकांच्या बाबतींत औचित्यपूर्ण व कौतुकास्पद ठरतं, तर सचिन, द्रविड, लक्ष्मण इत्यादींच्या बाबतींतच मात्र तें उपहासात्मक कां ठरावं, हें खरंच मला पडलेलं कोडंच आहे. काडीचीही गुणवत्ता नसलेले अगणित लोक केवळ बेकायदेशीर व अनैतिक धंदे करून करोडोपति झालेले आसपास दिसत असताना क्रिडाक्षेत्रांत निखळ गुणवत्तेने, प्रचंड स्पर्धात्मक वातावरणात, अविरत मेहनत व चिकाटी दाखवून प्रामाणिकपणे पैसे कमावणार्या या निवडक खेळाडूंवरच तोंडसुख घ्यायला आपण कां उत्सुक व तत्पर असतों ? सवंग मसाला सिनेमांचे हिरो कोट्यावधी कमावतात, लोक त्यांच्यासाठी वेडे होतात त्यापेक्षां मैदानी खेळातल्या या खर्याखुर्या हिरोना आयकॉन बनवणं हें समाजहिताचंच नाही का ? कांहीं खेळाडू गैरवर्तन करतात म्हणून खेळ बघणंच "लांच्छनास्पद " होतं ? तसंच असेल तर शिक्षणक्षेत्रातल्या कुठल्याशा भ्रष्टाचारामुळें शाळा-कॉलेजांत शिकणंही ' लांच्छनास्पद'च म्हणायचं का ? कीं आपण अजूनही खेळ व खिलाडूवृत्ती याची बाराखडीही गिरवायची बाकी आहे ?
जे झाल ते वाईट झाल....
जे झाल ते वाईट झाल.... खासकरुन द्रवीडच्या टीममधले खेळाडू असे वागले याचे जरा जास्तच वाईट वाटतेय.... या सगळ्यातुन संघाला सावरण्यासाठी द्रवीड-पॅडी अॅप्टॉनना खुप प्रयन्त करावे लागतील... कदाचित ही प्रतिकूल परीस्थिती त्यांना अधिक चांगली कामगिरी करायला प्रवृत्त करेल!
पण मजा म्हणजे टीव्हीवरच्या टॉक शॉ मध्ये मात्र सगळे नग तोंडाला येईल ते बोलतायत... यंत्रणा, बीसीसीआय, संघमालक, कर्णधार्, संघसहकारी या सगळ्यांवर कोणतेही पुरावे नसताना बेछूट आरोप करत सुटलेत
निखिल वागळेंच्या शो मध्ये एक प्रभुती तर म्हणतायत की संघमालक मुद्दाम आपल्या संघात अंकीत सारखे २-४ गरीब खेळाडू घेतात आणि मग त्यांच्याकडून आपल्याला पाहिजे ते करुन घेतात.... थोडक्यात त्यांना फिक्स करुन स्वता सट्टा खेळतात.... काय एकेक विनोदी बोलतात लोक आणि ते सुद्धा कुठल्याही पुराव्याशिवाय!
दुपारपासून आयपीएल बंद करा म्हणणार्यांचा एक फार सुळसुळाट झालाय... घरात ढेकूण झालेत तर पेस्ट कंट्रोल कराल का घर विकून टाकाल... काहीही!
@झक्की | 16 May, 2013 -
@झक्की | 16 May, 2013 - 16:14नवीन
क्रिकेटप्रेमींना तर काहीच लांछनास्पद नसते. <<
थोडी भर टाकतो
नेते, नटनट्या, बुवा व. क्रिकेटप्रेमींना तर काहीच लांछनास्पद नसते.
>>>>पोलार्ड ची काय चूक आहे
>>>>पोलार्ड ची काय चूक आहे त्यात ? जर वॅटसन ने मॅक्सवेलला सेंड ऑफ दिलेला चालतो , तर त्याला दिला तर काय बिघडल
केदार, पोलार्डची चूक ही की त्याला कुठ थांबावे हे कळले नाही.... वॉटसन डगआउट मध्ये जाऊन बसलेला असताना परत बाऊंड्रीवरुन त्याला टोमणे मारणे याला कुरापतच म्हणतात... वॉटसनने त्याच्या तोंडी न लागता ड्रेसिंग रुममध्ये जाउन बसणे पसंत केले हे मात्र चांगले झाले..... एकूण या सगळ्यात पोलार्डने स्वताचीच प्रतिमा मलीन करुन घेतली!
वॉटसन डगआउट मध्ये जाऊन बसलेला
वॉटसन डगआउट मध्ये जाऊन बसलेला असताना परत बाऊंड्रीवरुन त्याला टोमणे मारणे याला कुरापतच म्हणतात... वॉटसनने त्याच्या तोंडी न लागता ड्रेसिंग रुममध्ये जाउन बसणे पसंत केले हे मात्र चांगले झाले.. >> ह्याला म्हणतात 'सौ चुहे खाके बिल्ली चली हाज को"
आपल्याकडील प्रतिभेची प्रामाणिकपणे, अपार मेहनतीने जोपासना करून आणि कायद्याच्या व नैतिकतेच्या मर्यादा संभाळून त्याचा ' मार्केट व्हॅल्यू'नुसार मोबदला मिळवणं, हें जर इतर सर्व व्यावसायिकांच्या बाबतींत औचित्यपूर्ण व कौतुकास्पद ठरतं, तर सचिन, द्रविड, लक्ष्मण इत्यादींच्या बाबतींतच मात्र तें उपहासात्मक कां ठरावं, हें खरंच मला पडलेलं कोडंच आहे >> +1 भाऊ, माझ्या मनातली गोष्ट बोललात. आपण खेळ बघतो म्हणजे we own players हा attitude फारच बोकाळलाय.
कदाचित ही प्रतिकूल परीस्थिती
कदाचित ही प्रतिकूल परीस्थिती त्यांना अधिक चांगली कामगिरी करायला प्रवृत्त करेल! >> कय माहित, पण चंडिला नि playoff मधे slow wickets वर खुप उपयुक्त ठरले असते. त्यांचा substitute कोण येणार देव जाणे ?
भाऊ, तुमच्या मताला अनुमोदन.
भाऊ, तुमच्या मताला अनुमोदन. जसं नॉन-व्हेज खाणारे, जरी कधी न खाणार्यांना टोचत नसले, तरी न खाणारे (काहीजण / बरेचजण), खाणार्यांना जरा निमित्त सापडलं की टोमणे मारतात, तसं क्रिकेट च्या चाहत्यांना येन-केन कारणाने टोचणार्यांची संख्या कमी नाही. क्रिकेट चाहत्यांसाठी ह्या घटना काही फार सुखद नसतात. पण म्हणून खेळ म्हणून तो आवडतोच. त्यातून खेळाडूंना मिळणारे पैसे हा एक दखरा कोपरा सुद्धा असतो. ह्यात मला इथल्या कुणावरच टीका करायची नाहीये. भाऊंच्या प्रतिक्रियेवरून जाग्या झालेल्या काही इतर आठवणींवरून मी हे लिहीलय.
मैदानाबाहेर च्या खेळाडूंवर / प्रेक्षकांवर मैदानातून वार करणं (पोलार्ड) हे योग्य नाही वाटत.
तांबे, हरमीत सिंग हे भारतीय, हॉग, बद्री हे परदेशी फिरकीपटू अजूनही राजस्थान कडे आहेत. मनेरिया, बेबी हे फिरकी अष्टपैलू खेळाडू देखील आहेत. मु़ख्य मुद्दा ह्या सगळ्यातून सावरून खेळाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी राजस्थान कडे खूप कमी वेळ आहे.
This spot Fixing scandal has
This spot Fixing scandal has given all IPL haters a chance to bash . The media has gone to levels of "CALL IPL OFF"
The funniest thing is politicians calling for this
Yes , there was spot fixing , no defending it , Ban them for life , but where it doesn't happen ? How can whole IPL be bad because of this ? What about Cronje and Azhar then ? Or Amir or Danish ? It's just about person's integrity , where there is a Shree , there is a Dravid . It's as simple as that . It's just entertainment anyway , enjoy it .
If you want to really watch cricket , ENG - NZ IS UNDERWAY , WATCH BOULT SWINGING RED CHERRY !!
दोन - तीन खेळाडूंनी केलेल्या
दोन - तीन खेळाडूंनी केलेल्या भ्रष्टाचार मुळे जर संपुर्ण आयपीएल बंद करण्याची मागणी होत असेल... सर्व राजकीय पक्श बंद करा... संसद बरखास्त करून..आर्मीकडे देश द्या...
भाऊ +१
भाऊ +१
आयपीएल हा खेळ नाही सट्टाबाजार
आयपीएल हा खेळ नाही सट्टाबाजार झाला आहे. आपण आयपीएल मध्ये पाक खेळाडूना घेतले नाही तेव्हा बरे वाटले होते पण आता तर असे तथ्य समोर येतात कि ह्या खेळावर पकिस्तन्मधुनच नियंत्रण होत आहे. पाकिस्तानने वेगळ्या रीतीने ह्या खेळत शिरकाव करून घेतला आहे. ह्या खेळाडूंना आयपीएल मधून इतका पैसा मिळतोय तरी ते भ्रष्टाचार करतायत. एक ओवर टाकायला ६० लाख देतात म्हणजे काय. आणि एक दोन खेळाडूना घेऊन फिक्सिंग करणे शक्य असेल का ह्यात बरेच खेळाडू सामील असले पाहिजे.'पकडला तो चोर सुटला तो संन्याशी' ह्या न्यायाने सर्व चालले आहे. आयपीएल हा खरच खेळ आहे का लुटूपुटुची लढाई याचीच शंका येतेय..
शिक्षणक्षेत्रातल्या कुठल्याशा
शिक्षणक्षेत्रातल्या कुठल्याशा भ्रष्टाचारामुळें शाळा-कॉलेजांत शिकणंही ' लांच्छनास्पद'च म्हणायचं का
असे करायचे नसते हो. माझा तसा उद्देश नव्हता.
मला काय वाटते ते लिहितो.
उगाच लांछनास्पद वगैरे टोकाचे शब्द वापरून लोक चिथवू बघतात. आपण जे करतो ते बरोबर असे आपल्याला वाटत असेल तर इतर कुणि त्याला लांछनास्पद म्हणो अथवा काही म्हणो, मी त्याचे समर्थन करण्याची आवश्यकता आहे असे समजत नाही.
हे आहे हे असे आहे. Deal with it or die! असे म्हणावे नि आपण आपल्याला योग्य वाटेल ते करत रहावे.
क्रिकेट या खेळातली गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण बघायला मजा येते. काही लोक हा आनंद बरेचदा देतात म्हणून ते माझे आवडते. मी बघणार. तुम्हाला लाछनास्पद वाटत असेल तर बसा बोंबलत. जे कुणि गैरवर्तन करतात असे म्हणतात त्यांना हाकलून दिले तर बरेच, दुसरे येतील त्यांच्या जागी. आपण खेळ बघावा.
ललित मोदीशी एकमत होईल असे
ललित मोदीशी एकमत होईल असे वाटले नवह्ते पण खरच बेटींग लीगल करून टाका, ना रहेगा बास न नजेगी बासुरी
ह्या सर्व प्रकाराचा एक मोठ्ठा दोष BCCI वर जातो. आयपील चे एकंदर स्वरुप बघता mature नसलेले खेळाडू, प्रचंद पैसा, अनैतिक उद्योगांमधे गुंतलेले shady characters, quick glamour एव्हढे स्फोटक रसायन एकत्र आहे म्हटल्यावर ६ सीजन्स झाल्यावरही anti corruption measures असू नयेत ? जे domestic anti-corruption and security wing म्हणून आहे ते फक्त तोंड देखले आहे नि त्या unit ने ह्या प्रकारामधे किंवा गेल्या वर्षीच्या स्टींग operation मधे फक्त प्रकार जाहिर झाल्यावर जे काहि करायचे ते केले आहे. domestic level वर counselling वगैरे प्रकार फार दूरचे.
BCCI has strongest opposition to ICC's anti-corruption and security unit (ACSU) which is not really surprising when you consider modus operandi of BCCI in general. For that matter N. Srinivasan's comment about being shocked by blue bolt from sky are hilarious though, coming from the man who has conflicting roles of being BCCI president and owner of the participating team, where playoff games are alays played in home ground of the same team, same team gets preferential treatment during IPL auction and 'suitable' umpires are chosen in playoffs. Ahem ! this is not fixing really !
असं छातीठोकपणे सांगतोय. लबाड
असं छातीठोकपणे सांगतोय. लबाड लेकाचे !!!
>>>
भाऊ खरे तर तुम्ही लब्बाड लेकाचे !! असे म्हणायला हवें होतें
>>पण चंडिला नि playoff मधे
>>पण चंडिला नि playoff मधे slow wickets वर खुप उपयुक्त ठरले असते. त्यांचा substitute कोण येणार देव जाणे ?
कदाचित त्यानिमित्ताने द्रवीडची ऑफस्पिन गोलंदाजी बघायला मिळेल
राजस्थानची हैद्राबादविरुद्ध चांगली सुरुवात
डोळे फाडफाडून आयपीएल
डोळे फाडफाडून आयपीएल पहाणार्यांच्या डोळ्यात चांगलीच तिखटाची पूड टाकण्यात आली आहे
त्यांचा substitute कोण येणार
त्यांचा substitute कोण येणार देव जाणे >> आहे की. तांबे त्याने दोन तीन मॅच खेळल्या आहेत..
त्यांचा substitute कोण येणार
त्यांचा substitute कोण येणार देव जाणे >> आहे की. तांबे त्याने दोन तीन मॅच खेळल्या आहेत.. >> no offense meant, पण चंडिला नि चव्हाण ची strength त्यांची accuracy आहे/होती. तांबे तेव्हढा nagging वाटत नाहित. हॉगचे up down फार असते ह्याबाबतीमधे. suffocation by spin हा प्रकार जो RR करत असे तो ह्यांच्याबरोबर जमेल का असा प्रश्न जास्त योग्य ठरला असता. नाहितर faulkner, cooper, watson ह्यांच्यावर खरी भिस्त राहील. बद्रीला आत येण्यासाठी बसवणार कोणाला असा प्रश्न पडतो.
<< तांबे तेव्हढा nagging वाटत
<< तांबे तेव्हढा nagging वाटत नाहित.>> पण आज बरी गोलंदाजी करतोय.
अरे पण असामी, असे बघ की पूर्ण
अरे पण असामी, असे बघ की पूर्ण RR मध्ये एक दोनच मॅच विनर आहे. ती पूर्ण टीम व्यक्ती नाही तर टीम म्हणून कार्यरत असल्यामुळे त्यांना अंकित / चव्हाण आणि श्री गेल्यामुळे काही फरक पडणार नाही असे मला वाटते. चंडीला चांगली बोलिंग करायचा हे मान्य, पण तरीही त्याने एकहाती मॅच जिंकल्या नाहीत.
केदार मी तेच तर म्हणतोय कि,
केदार मी तेच तर म्हणतोय कि, त्यांचे balling function प्रत्येकाने आपापले काम नीट करणे, जसे spinners नी run rate control, faulkner, watson in wicket taking capacity असे चालतेय. ह्या चक्रामधले दोन आरे निघाले तर नवीन येणारे त्यात बरोबर बसले नाहित तर कसे होईल.
भाऊ sunrisers मधे धवन वग़ळता बॅटींग मधे सगळा आनंद आहे त्यामूळे ह्या मॅचवर काहि धरू नका.
अवघड केलीय मॅच राजस्थानने
अवघड केलीय मॅच राजस्थानने
खेळपट्टीने रंग दाखवले
खेळपट्टीने रंग दाखवले
अरे इथे समोर डेल स्टेन असणार
अरे इथे समोर डेल स्टेन असणार आहे.... लास्ट ओव्हर पर्यंत मॅच नेण्यात काही अर्थ नाही!
Pages