आयपीएल चे सहावे पर्व सुरू व्हायला आता फक्त मोजून एक महीना उरलाय.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... संघमालक आणि स्टार खेळाडू नव्या जर्सीजचे फर्स्ट लूक साजरे करतायत...."कोरबो लोरबो जीतबो", "हल्ला-बोल" वगैरे आरोळ्या घुमू लागल्यात.... नव्या सनरायझर्स बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.... अश्यात भारतीय संघ ऑसीजविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्यामुळे लोकांना जरा जास्तीचा उत्साह आलाय...
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात.
हा धागा आयपीएल-६ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी 
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
तेंडल्या सुटलाय.....
तेंडल्या सुटलाय.....
<< तेंडल्या सुटलाय.....>>
<< तेंडल्या सुटलाय.....>> पोलार्ड पेटलाय ! मुंबई जिंकली !!
सुपर्ब खेळी..... पोलार्डने
सुपर्ब खेळी..... पोलार्डने एकहाती जिंकून दिली मॅच.... मुंबई पहील्या स्थानावर!
पॉलार्ड मधे संचारलेला
पॉलार्ड मधे संचारलेला गेल....8 सिक्स....2 फोर.....66 रन्स ... 23 बॉल्स मधे
पॉलार्ड मधे संचारलेला
पॉलार्ड मधे संचारलेला गेल....8 सिक्स....2 फोर.....66 रन्स ... 23 बॉल्स मधे..
शेवटची ओव्हर सॅमीला द्यायला
शेवटची ओव्हर सॅमीला द्यायला हवी होती.... कदाचित जरा रंगत आली असती मॅचमध्ये!
गेल, पोलार्ड, स्मिथ, कूपर,
गेल, पोलार्ड, स्मिथ, कूपर, नरैन..... या आयपीएलवर 'कॅलिप्सो' छाप उमटवतायत हें नि:संशय ! अर्थात, शिखर धवन, पुजारा, रहाणे, बिनी या नवोदितांचाही खेळ बहरतोय .कालच्या सामन्यात सनरायझर्सच्या के.व्ही.शर्माचा लेगस्पीनही 'प्रॉमिसींग' वाटला. मुंबईच्या विजयात सचिन, स्मिथ, कार्तिक व रोहित शर्मा यांची कामगिरी दुय्यम असली तरी खूपच महत्वाची होती.
दीर्घ मुदतीच्या स्पर्धेत कोणता संघ नेमक्या वेळीं ऐन फॉर्मात [peaking ] येतो याला निर्णायक महत्व असतं असं दिसून आलंय. मुंबई व राजस्थान या कसोटीला उतरताहेत पण अगदीं सुरवातीपासून वरचढ कामगिरी करणार्या चेन्नई व रॉयल्सच्या संघांच्या कामगिरीत मात्र आतां शिथीलता येतेय का, अशी पुसटशी शंका येऊं लागलीय. पण अंदाज बांधण्यापेक्षा ' आगे आगे होता है क्या' पहाणंच शहाणपणाचं - 'यह टी-२० हय भाय ' !
काल सुरवातीला मुंबै हरणार असच
काल सुरवातीला मुंबै हरणार असच वाटत होतं.
पण तेन्डल्याने मारलेली सिक्स पाहुन वाह!!!!!!!!!!!!!! अब आयेगा मजा...
पण पाल चुकचुकली पाठ दुखीची आणि वाटलं तसच लगेच तो बाहेर गेला.
मग पोलार्डने जे काहि केलं ते बघुन मी वेड्यासारखा हसत होतो.
)
समीकरणाची उलथापालथच (खरतर इथे एक वेगळा शब्द जास्त योग्य होइल
काल मज्जा आली मॅचला. मॅच
काल मज्जा आली मॅचला. मॅच रंगतदार होणारच हे माहीत होते पण सनराईजर्सने केलेला स्कोर बघुन आता काय असा प्रश्न पडला होता. सचिन मस्त रंगात आला होता आणी नेमके डाव्या हाताला दुखापत झाली. ३६ बॉल मधे साधारण ७९ रन्स म्हणजे अवघडच होते. त्यात पोलार्ड बरसला. धम्माल.
७००
७००
नाबाद.
नाबाद.
गेल काय... मिलर काय नी
गेल काय... मिलर काय नी पोलार्ड काय... ही मंडळी चेंडूच काय.. बॅट सुद्धा सिमापार धाडू शकतात.
काल तेंडूलकर अजून दोन षटके
काल तेंडूलकर अजून दोन षटके जरी क्रिझवर राहिला असता तर मॅच हारली असती. केवळ एक चांगला फोर आणि एक चांगला सिक्स. कालच्या मॅच मध्ये १०० च्या रनरेट वर मॅच जिंकता आली नसती. माझ्या दृष्टिने तरी त्या एक दोन शॉट आधी तो खूप चाचपडत होता. अपवाद एक समोर येऊन मारलेला फोर. नंतर तर तो लेगला चार घेऊ म्हणून त्याने मारलेले ३-४ शॉट फारच खराब होते. कनेक्शन जमत नव्हते. आणि सिक्स कोणाला मारला तर तो करन शर्माला त्यामुळे माझ्यासाठी त्याची कालची पूर्ण इनिंग फारच खराब होती. दिनेश कार्तिक आणि तो खेळत असताना १० ओव्हर्स नंतर आऊट व्हायचेच तर तेंडूलकरला आऊट होऊ दे असे मला वाटू लागले, जेणेकरून रोहित लवकर आला असता. तेंडूलकरलाही हे जाणवले असावे, रिटायर हर्ट होण्याचे मर्म काय सांगावे कदाचित झाकली मुठ असावे.
(आय नो दिस इज कमिंग फ्रॉम मी वगैरे वगैरे,)
सिक्स कोणाला मारला तर तो करन
सिक्स कोणाला मारला तर तो करन शर्माला >> नो मोर कमेंट्स
रिटायर हर्ट होण्याचे मर्म काय
रिटायर हर्ट होण्याचे मर्म काय सांगावे कदाचित झाकली मुठ असावे. >>> अगदीच प्लस वन म्हणवेना.
पण काल असच काहिस आतमध्ये वाटत होतं.
नंतर तर तो लेगला चार घेऊ म्हणून त्याने मारलेले ३-४ शॉट फारच खराब होते. कनेक्शन जमत नव्हते.>>> हे पाहुन तर जरा जास्तच...
पण प्लस वन बोलवेना राव...
त्याला चाचपडताना पाहुन त्रास होतो हे नक्की.
त्याला चाचपडताना पाहुन त्रास
त्याला चाचपडताना पाहुन त्रास होतो हे नक्की. >>>>> ह्याला मात्र +१.
पण सचिनने मारलेला सिक्स आपल्याला तरी आवडला
<< ही मंडळी चेंडूच काय.. बॅट
<< ही मंडळी चेंडूच काय.. बॅट सुद्धा सिमापार धाडू शकतात. >> वरील फोटो पाहून एक जुनी आठवण जागी झाली. १९५८-५९मधें भारत दौर्यावर आलेल्या वे. इंडीजची पहिली मॅच होती मुंबईत ब्रेबॉर्न स्टेडियमवर. भारताचा [ व मुंबईचा] मध्यमगती गोलंदाज गुलाम गार्ड गोलंदाजी करत होता 'ऑल टाईम ग्रेट' गॅरी सोबर्सला. भन्नाट वेगाच्या ऑसी व इंग्लीश गोलंदाजाना लिलया सीमापार करणार्या सोबर्सच्या हातातील बॅट गार्डचा एक मवाळ बाऊन्सर हूक करताना निसटली व तो झेलबाद झाला. इतरांचा सोडाच पण स्वतः गार्डचाही यावर विश्वास बसेना ! तशी कांहीही भरीव कामगिरी नांवांवर नसूनही गुलाम गार्ड केवळ या एका विकेटमुळें कित्येक वर्षं ओळखला जात असे !! [ मुंबई राज्याच्या विभाजनानंतर पोलीस खात्यातील मितभाषी व सज्जन असे हे गुलाम गार्ड गुजरातेत 'सुपरिटेंडंट ऑफ पोलीस ' या हुद्द्यावर असताना अहमदाबादच्या एका मैदानावर आम्हीं मित्र त्याना भेटलों होतो. हा विषय काढल्यावर त्यानी लाजून, हंसून - पण कांहीशी छाती पुढे काढूनही - तो विषय बदलला होता ].

<< (आय नो दिस इज कमिंग फ्रॉम मी वगैरे वगैरे,)>> ज्यावेळीं जें प्रामाणिकपणे जाणवतं तें मोकळेपणाने मांडणं हेंच तर या धाग्याचं आकर्षण आहे !
<< ... आणि सिक्स कोणाला मारला तर तो करन शर्माला >> खरंतर काल करन शर्माच छान गोलंदाजी करत होता, असं मला वाटलं; 'इकॉनॉमी रेट' स्टीन [५.७५]नंतर त्याचाच [७.३३]चांगला होता व मुंबईच्या तीन पैकीं दोन बळी त्याच्याच नांवावर आहेत.
<< रिटायर हर्ट होण्याचे मर्म काय सांगावे कदाचित झाकली मुठ असावे.>>' You too Kedar ? This is the unkindest cut of all ' !!!
मी स्वतः सचिन फॅन वगैरे नाही
मी स्वतः सचिन फॅन वगैरे नाही , इन फॅक्ट ज्यावेळी लोक त्याला देव म्हणून डोक्यावर घेऊन नाचायचे त्यावेळीही मला ते पटायच नाही . पण आता ज्या पद्धतीने लोक त्याला खाली खेचतायत तेही पटत नाही .
परवाची मुंबई पुणे मॅच पहायला गेलो होतो , अजूनही एकेक धाव रोखायला तो जीव तोडून प्रयत्न करत होता , हे पाहिलय मी.
इथे तरी बर आहे , पण ग्राऊंड मध्ये पब्लिक त्याच्याबद्दल असे काही कमेंट पास करत होती की खरच लाज वाटावी .
माझ्यामते तरी तो अजूनही अगदी वाईट खेळत नाहीये , पण प्रॉब्लेम असा आहे की लोकांच्या अपेक्षाच अती आहेत . त्याने आता झंझावाती खेळी करून एकाहाती विजय मिळवून देण कठीणच आहे , he just needs to play his role .
आता कालही तो रिटाय्रर हर्ट झाला त्यवेळी ५० बॉल ८५ ह्व्या होत्या which was reasonable . आता त्या २४ बॉल ६२ व्हाव्या आणी नण्तर १२ बॉल १२ व्हाव्या हे दोन्ही त्याच्या हातात नाहीये ना ?
Then again one can argue, these were the same people that made him GOD , they also have the right to belittle him if he doesn't perform as GOD
ज्यावेळीं जें प्रामाणिकपणे
ज्यावेळीं जें प्रामाणिकपणे जाणवतं तें मोकळेपणाने मांडणं >>> एक्झॅटली. म्हणूनच मांडले.
केदार,
सचिन माझ्यासाठी देखील देवाहून कमी नाही कारण मी क्रिकेट वेडा आहे. प्रश्न तो नाही. प्रश्न आहे फॉरमॅट अॅडाप्शनचा. राहूल द्रविडला पहिल्या आय पी एल नंतर वॉल असूनही लोकांनी शेण घातले होतेच. धोणीने वल्डकप जिंकला तरी तो माझ्यासाठी व इतर अनेकांसाठी टेस्ट कॅप्टन म्हणून गणितात बसत नाही. राहूल ने ह्या IPL मध्ये केलेल्या खेळी आणि सचिनच्या खेळी ( परत तुलना का? का तर दोघेही ग्रेट आहेत म्हणूनच ना? ) मध्ये प्रचंड तफावत दिसते. सचिन देखील एखाद मॅच मध्ये सचिन नसतो हे मान्य करण्याइतके मोठे मन (माझे) मात्र नक्कीच आहे.
आणि लोकांच्या शिव्या कोणालाच चुकत नाहीत. खुद्द वानखेडे वर "सचिन हाय हाय" हे केवळ ८ वर्षांपूर्वी घडलेले आहे.
काय सांगावे पुढच्या मॅच मध्ये सचिन ५० टाकेल. तेंव्हा मी देखील जयजयकारच करेन. ह्युर्यो असो की जय जयकार, हा त्या त्या मॅच साठीच असतो. पुढच्या मॅच मध्ये परत पाटी कोरी घेऊन बसायचे, कारण ... आपण सर्व क्रिकेट वेडे आहोत आणि आपल्या अपेक्षा ह्या नेहमी जास्तच असतात.
(बाय द वे काल शिखर धवण आऊट झाल्यावर खूप वाईट वाटले, त्याने MI ची गोलंदाजी फोडून काढून निदान १०० टाकावेत असे वाटत होते, आणि त्यानंतर मात्र MI ने सामना जिंकायलाच हवा, हे देखील वाटत होतेच)
पुण्याच्या टिमच नाव खडकी
पुण्याच्या टिमच नाव खडकी दापोडी वॉरिअर्स होणार आहे पुढच्या वर्षी
Dale steyn in the Sunriser's
Dale steyn in the Sunriser's bowling attack is like
James Bond on a mission with the team of CID...
<< Then again one can argue,
<< Then again one can argue, these were the same people that made him GOD , they also have the right to belittle him if he doesn't perform as GOD >> सचिनने देवत्व मागितलं नव्हतं व स्विकारलंही नव्हतं; क्रिकेटवरील आत्यंतिक प्रेमामुळे आजही तो स्वतःचा खेळ सुधारण्यासाठी अभ्यासपूर्वक प्रचंड मेहनत घेतो व संघाच्या कामगिरीत आपला सहभाग वाढवण्यासाठी मनःपूर्वक झटतो. त्याच्या प्रत्यक्ष कामगिरीवर मत व्यक्त करण्याचा अधिकार अर्थातच प्रत्येक क्रिकेटरसिकाला आहे पण " आम्ही त्याला देव केला म्हणून तो अधिकार आम्हाला आहे" , हें नाही पटत !
खडकी दापोडी वॉरिअर्स>>> Dale
खडकी दापोडी वॉरिअर्स>>>
Dale steyn in the Sunriser's bowling attack is like
James Bond on a mission with the team of CID.>>>
" आम्ही त्याला देव केला
" आम्ही त्याला देव केला म्हणून तो अधिकार आम्हाला आहे" , हें नाही पटत ! >> +१.
सचिन माझ्यासाठी देखील देवाहून कमी नाही कारण मी क्रिकेट वेडा आहे. प्रश्न तो नाही. प्रश्न आहे फॉरमॅट अॅडाप्शनचा >> सचिनने फॉरमॅट अॅडाप्शन नीट केलेले नाहिये असे तुला खरच वाटतेय का ? कि फक्त ह्या वेळच्या आयपील साठी बोलतोयस ?
<< ... आणि सिक्स कोणाला मारला तर तो करन शर्माला >> खरंतर काल करन शर्माच छान गोलंदाजी करत होता, असं मला वाटलं; 'इकॉनॉमी रेट' स्टीन [५.७५]नंतर त्याचाच [७.३३]चांगला होता व मुंबईच्या तीन पैकीं दोन बळी त्याच्याच नांवावर आहेत.>> कालच कशाला ? शेवटच्या दोन मॅचेस सोडल्या तर त्याने चांगली बॉलिंग केली आहे. He is unsung hero of that attack. पाचवा बॉलर हि कमकुवत लिंक जी बर्याच संघाची स्थिती आहे ती त्याची होत नाहिये. अर्थात बाकीचे चार चांगली गोलंदाजी करतात ह्याचा फायदाही होत असेल.
आरसीबी एकच विकेट गमावुन
आरसीबी एकच विकेट गमावुन सुध्दा इतकी का संथ खेळत होती............गेल सुध्दा आरामात खेळत आहे...आज चा सामना जर गमावला तर आरसीबी बाहेर होण्याचे चांसेस जास्त आहे...........
गेल सुध्दा आरामात खेळत
गेल सुध्दा आरामात खेळत आहे..>>>
शेवटी गोलंदाजांची तोडफोड केलीच त्याने!
हुर्रे
हुर्रे हुर्रे................................आरसीबी हारले........पंजाब जिंकले.............नाचो.................. लय भारी
.
.
शेवटी गिलख्रिस्ट ला सुर सापडला........
आता हैद्राबाद आणि कोलकत्याच्या आशा उंचावल्या
<< आरसीबी एकच विकेट गमावुन
<< आरसीबी एकच विकेट गमावुन सुध्दा इतकी का संथ खेळत होती............>> कां कुणास ठाउक पण माझाही तसाच ग्रह झाला; १९० ते २०० चा स्कोअर एक वेळ सहज शक्य वाटत होता . त्यामुळें, <<मुंबई व राजस्थान या कसोटीला उतरताहेत पण अगदीं सुरवातीपासून वरचढ कामगिरी करणार्या चेन्नई व रॉयल्सच्या संघांच्या कामगिरीत मात्र आतां शिथीलता येतेय का, अशी पुसटशी शंका येऊं लागलीय >> ही शंका दाट होऊं लागलीय ! रॉयल चॅलेंजर्सची एकच मॅच राहिलीय व ते १६ पाँईंटसवर आहेत. त्यानी कमाल १८ गुण मिळवले तरीही सनरायझर्स २० गुण मिळवून त्याना मागे टाकूं शकतात. किंवा, रॉयल चॅलेंजर्स , सनरायझर्स , केकेआर व कींग्ज इलेव्हन हे चारही संघ १६ गुणांवर येवून थबकण्याची मजेशीर स्थितीही येवूं शकते ! देखो आगे आगे होता है क्या !!!

प्रत्येक कर्णधार " आपण पॉईंटस टेबलकडे अजिबात न पहातां फक्त प्रत्येक मॅचवर लक्ष केंद्रीत करतोय ", असं छातीठोकपणे सांगतोय. लबाड लेकाचे !!!
You got to love RCB. They
You got to love RCB. They always take efforts to release tension in the tournaments. Last year they crumbled in last match reducing all ifs and buts. This year they crumbled in second last match to push Royals, CSK and MI in playoffs while making sure they are not at mercy of Sunrisers. Such a selfless act !!!
गिली ची गेलवर वरकडी!!
गिली ची गेलवर वरकडी!!
Pages