पुस्तक माहिती आहे का ?

Submitted by तृप्ती आवटी on 26 June, 2008 - 14:57

मी एक दुसर्‍या महौद्धातील एका कथेवर पुस्तक वाचले होते. सहसा काही चांगले वाचले कि पुस्तकाचे, लेखकाचे नाव, प्रकाशन संस्था लिहुन ठेवण्याची सवय आहे. परंतु नेमकी ह्या पुस्तकाची माहिती माझ्या वहित नाही. मी वाचले ते नासिकच्या ग्रंथालयातुन आणुन. ती कॉपी इतकी जुनी होती कि पान उलटताना तुकडे पडत होते.
.
पुस्तकाबद्दल- गोष्ट आहे दोन मेसेंजर रायडर्सची. दुसर्‍या महायुद्धा दरम्यान हे दोघे वरिष्ठांच्या जाचाला कंटाळुन आपाल्या बाइक्सवर पळ काढतात. जवळ थोडी फार सामग्री असते. पळुन जाउन शत्रु राष्ट्राच्या हद्दीत पोहोचायचे असते. हेतु हा कि पकडले गेल्यास युद्धकैदी म्हणुन राहवे लागेल पण जीव वाचेल. मायभुमीत अर्थातच देशद्रोही म्हणुन जीवे मारतील. त्यांना वाटेत आलेली संकटे आणि शेवटी त्यातला एकच आपले उद्दीष्ट गाठण्यात यशस्वी होतो ह्याची ही गोष्ट आहे.
.
तेव्हा मला हे पुस्तक खुपच आवडले होते. अगदी खिळवुन ठेवते. तर तुम्ही कोणि हे वाचले असल्यास किंवा काहि माहिती असल्यास कृपया इथे पोस्टा. धन्यवाद !!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@dongaryatri - मला दोन भाषांतरं आठवतायत. एक लहान मुलांसाठी संक्षिप्त -त्याचे तपशील मात्र आठवत नाहीत. आणि मूळ पुस्तकाचं दोन खंडात केलेलं भाषांतर - दा. न. शिखरे यांचं

वाचकहो,

प्रेम सहगल (की सैगल?) या भारतीय सेनाधिकार्‍याने (बहुधा निवृत्तीनंतर) १९६२ च्या भारतचीन युद्धाबद्दल एक पुस्तक लिहिलं होतं. मूळ पुस्तक बहुतेक इंग्रजीत आहे. मी १९८७ साली त्याचा मराठी अनुवाद वाचला होता. बहुतेक ८०च्या दशकात मूळ पुस्तक प्रकाशित झालं असावं.

ज्या मित्राकडून हे पुस्तक घेऊन वाचलं होतं त्यालाही त्याचा पत्ता लागत नाहीये. मात्र पुस्तकातल्या 'फॉरवर्ड पॉलिसी' सारख्या काही संज्ञा त्याला आठवताहेत. मी प्रकाशक टिपून घ्यायला विसरलो. Sad पुस्तकाचं नावही आठवत नाही.

कुणाला मूळ पुस्तक व/वा मराठी अनुवादाबद्दल माहिती आहे का?

धन्यवाद!

आ.न.,
-गा.पै.

प्रेम सहगल (की सैगल?) या भारतीय सेनाधिकार्‍याने (बहुधा निवृत्तीनंतर) १९६२ च्या भारतचीन युद्धाबद्दल एक पुस्तक लिहिलं होतं. मूळ पुस्तक बहुतेक इंग्रजीत आहे. मी १९८७ साली त्याचा मराठी अनुवाद वाचला होता. बहुतेक ८०च्या दशकात मूळ पुस्तक प्रकाशित झालं असावं.

ज्या मित्राकडून हे पुस्तक घेऊन वाचलं होतं त्यालाही त्याचा पत्ता लागत नाहीये. मात्र पुस्तकातल्या 'फॉरवर्ड पॉलिसी' सारख्या काही संज्ञा त्याला आठवताहेत. मी प्रकाशक टिपून घ्यायला विसरलो. पुस्तकाचं नावही आठवत नाही.

>>>>

तुम्हाला हिमालयन ब्लंडर्स म्हणायचे आहे का? ते पुस्तक निवृत्त ब्रिगेडिअर जॉन पी. दळवी यांनी लिहिले आहे. ते आघाडीवरील कमांडिंग ऑफिसर होते (म्हणजे आघाडीवरील सर्वोच्च लष्करी अधिकारी).

हिन्दि रसिदी टिकट हे अमृता प्रीतम यांनीच लिहिले आहे. तीसेक वर्षापूर्वी मी तेवाचले होते. आता हिन्द पॉकेट बुकची २००८ ची आवृत्ती दिसतेय्.पूर्वीचा प्रकाशक माहीत नाही.

टण्या,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद! पण ते पुस्तक दळवींचे नाही. सेहगल हे लेखकाचं आडनाव निश्चितपणे आठवतं. नाव प्रेम आहे याची जवळजवळ खात्री आहे, परंतु कदाचित चूक असू शकते.

आ.न.,
-गा.पै.

नमस्कार मला इंडिया बद्द्ल माहिति देणारे खुप छान पुस्तक सांगु शकेल का प्लिज ..
पण पुस्तक ईन्लिश मध्ये पाहिजे..

discovery of india ek nav milal pan i need some more good suggession . please.

अबोल....

"इंडिया" या विषयावर लिखाण करणारे सध्याच्या पिढीतील 'डॉ.रामचंद्र गुहा' हे नाव फार भारदस्त मानले जाते. त्यांनी लिहिलेली :

1. INDIA AFTER GANDHI
2. MAKING OF MODERN INDIA

ही दोन पुस्तके तुम्ही जरूर आपल्या संग्रही असली पाहिजेत असे माना. जवळपास हजार पानांची ही पुस्तके म्हणजे भारताविषयी खोलवर माहिती देणारे संदर्भ ग्रंथच मानले जावेत.

"फ्लिपकार्ट" वरूनही तुम्ही ही पुस्तके खरेदी करू शकाल.

अशोक पाटील

धन्यवाद अशोक पाटील

हे पुस्तक मला माझ्या ईग्लिश बॉस ला द्यायचे आहे.
she is very interested to know about India our interesting places and the culture of india . so i want one book which having all these information. tumhee var dileli books asich ahet ka ?

"....tumhee var dileli books asich ahet ka ?....

~ त्याहीपेक्षा अधिक आहे असेच म्हणावे लागेल. जरूर मागवा.

मला योगासने आणि प्राणायाम ह्या विषयावर चांगले मराठी पुस्तक घ्यायचे आहे.
कोणाला चांगल्या पुस्तकाची माहिती असल्यास इथे लिहिणार का?

कॅम्लिन कंपनीच्या दांडेकरांचे 'उंटावरचा प्रवास' किंवा असेच काहीसे नाव असलेले एक पुस्तक (आत्मकथा?) आहे. कुणाकडे त्याबद्दल अधिक माहिती आहे का? (नाव, प्रकाशक इ.)

अघोर वाडा नामक कुठल पुस्तक आहे का ??? मला नक्की आठ्वत नाही पण
लहानपणी वाचल होत.२ जोडपी एका वाड्यात अडकतात. प्रयत्न करुन पन बाहेरचा रस्ता सापडत नाही त्यांना..एक जोडप्याला त्या अघोरी शक्तीने जवळ जवळ संपवलेले असते.बायकोला झपाटलेले असते आनि नवरा ,त्याचे शरीर जखमी झालेले असते. .आन दुसरे बाहेर पडायचा प्रयत्न करत असताना एक स्वामी त्यांना सोडवतात.आनि त्या अघोरी शकतीला संपवतात.
ह्या वाडा मालकाला मुल होत नसत म्हणुन तो राक्षसी शक्तीचा वापर करुन मुलाला जन्माला घालतो.पण तेच मुल पुढे सगळ्यांना आई-वडीला सहित मारुन टाकते.

ह्या आशयाच कुणी कुठल पुस्तक वाचल असेन तर लेखक आनि पुस्तकांच नाव प्लीज सांगा Happy

वर्षा,
'उंटावरचा प्रवास' असं या पुस्तकाचं नाव आहे. लेखक - दि. प. दांडेकर. माझ्या समजूतीप्रमाणे हे पुस्तक त्यांनीच प्रकाशित केलं होतं. ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयात तुला हे पुस्तक मिळेल.

'ओ गॉड' या सिनेमा सारखं एक पुस्तक मराठीत पण होतं. पुस्तकाचं नाव, लेखक आठवत नाहीत. कथा साधारण अशी होती की- एका गडगंज श्रीमंत आपली संपत्ती देवाच्या नावे करतो. देव येऊन समाजाचा उद्धार करेल असा त्याचा ठाम विश्वास असतो. त्याप्रमाणे खरंच एक माणूस येतो आणि ती संपत्ती क्लेम करतो. पुढे मग तो अशा काही स्टेप्स घेतो की भारताची अर्थव्यवस्था सुधारते आणि देश महासत्ता बनतो वगैरे..
अशाच धर्तीवर अक्षयकुमारचा सिनेमा आला होता.

लेखकाचं नाव माधव असावं असं वाटतय. पण बाकी काहीच आठवत नाहीये. कोणाला माहित असेल तर प्लीज सांगा.

'ओ गॉड' या सिनेमा सारखं एक पुस्तक मराठीत पण होतं. पुस्तकाचं नाव, लेखक आठवत नाहीत. कथा साधारण अशी होती की- एका गडगंज श्रीमंत आपली संपत्ती देवाच्या नावे करतो. देव येऊन समाजाचा उद्धार करेल असा त्याचा ठाम विश्वास असतो. त्याप्रमाणे खरंच एक माणूस येतो आणि ती संपत्ती क्लेम करतो. पुढे मग तो अशा काही स्टेप्स घेतो की भारताची अर्थव्यवस्था सुधारते आणि देश महासत्ता बनतो वगैरे..
अशाच धर्तीवर अक्षयकुमारचा सिनेमा आला होता.

लेखकाचं नाव माधव असावं असं वाटतय. पण बाकी काहीच आठवत नाहीये. कोणाला माहित असेल तर प्लीज सांगा. >>> लेखक - माधव चव्हाण. ग्रंथाली प्रकाशनचं पुस्तक आहे.

मझ्या ६ वर्षाच्या मुलीसाठी मासिक लावायचे आहे. काहि नावे सुचवाल का?
माझ्यासाठी लहानपणी MISHA , Soviate Russia वगैरे मासिके यायची.
काही पुस्तकेहि सुचवाल का? तीला स्वतआ वाचता येतील अशी- मराठी,हिंदी,इंग्रजी.
याबद्द्ल आधिच चर्चा झाली असेल तर लिंक द्याल का?
धन्यवाद.

आशा कर्देळेच भारतातल्या ब्रिटीश राजवटीतल्या ब्रिटीश स्त्रिया यावर एक पुस्तक होत
नाव आठवत नाहीये आता
कोनाला माहीत आहे का

आशा कर्देळेच भारतातल्या ब्रिटीश राजवटीतल्या ब्रिटीश स्त्रिया यावर एक पुस्तक होत
नाव आठवत नाहीये आता <<< विदेश?

जयु... मनोरमा प्रकाशन चे magicpot बघा... ६ म्हणजे जरा मोठी आहे..पण तरी सुरुवात करायला मस्त आहे..

मी लहानपणी एक पुस्तक वाचलं होतं. बहुधा अनुवादित असावं. एका गावात एक चित्रकार येतो. त्याला एक ठराविक फूल हवं असतं आणि त्यासाठी तो बक्षिस जाहीर करतो. त्या गावातील एक गरीब मुलगा ते फूल शोधुन काढतो. 'चित्राप्रिया' कां असंच काहिसं नांव होतं. कुणाला आठवलं तर कृपया विपुत टाकाल काय??

सकाळमधे "मनस्विनी लता रविंद्र" चे अधून मधून लेख येतात. मला ते खूप आवडतात.

तिची काही पुस्तके पण आहेत का?

Pages