आयपीएल चे सहावे पर्व सुरू व्हायला आता फक्त मोजून एक महीना उरलाय.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... संघमालक आणि स्टार खेळाडू नव्या जर्सीजचे फर्स्ट लूक साजरे करतायत...."कोरबो लोरबो जीतबो", "हल्ला-बोल" वगैरे आरोळ्या घुमू लागल्यात.... नव्या सनरायझर्स बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.... अश्यात भारतीय संघ ऑसीजविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्यामुळे लोकांना जरा जास्तीचा उत्साह आलाय...
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात.
हा धागा आयपीएल-६ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी 
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
<< सनरायझर्स विरुद्ध ते याचं
<< सनरायझर्स विरुद्ध ते याचं उट्टं काढतील असा अंदाज वर्तवायला हरकत नाही. >> अंदाज खरा ठरला ! चेन्नई - २२३ !आतांपर्यंतचा सर्वाधिक स्कोअर !! रैनाचं शतक १ धांवेने हुकलं. हसी नेहमीप्रमाणे धडाकेबाज ६५.
राजस्थान दुसर्या
राजस्थान दुसर्या स्थानावर.... हुर्रे
आज चंडीला-गिलख्रिस्ट प्रकरणात द्रवीडने केलेला संयमी हस्तक्षेप आणि कॅलीस अंपायरशी वाद घालत असताना गंभीरने घेतलेली बघ्याची भुमिका.... कर्णधार कसा असावा आणि कसा असू नये याची एकाच दिवसात दिसलेली दोन उदाहरणे !
कॅलीससारखा खेळाडूही इतका अॅग्रेसीव्ह होउ शकतो?..... हा गंभीर्-बिसला-शहारुखच्या संगतीचा परीणाम म्हणावा का?
<< कॅलीससारखा खेळाडूही इतका
<< कॅलीससारखा खेळाडूही इतका अॅग्रेसीव्ह होउ शकतो?...>> Totally uncalled for show of temper ! मग तो कॅलीस असो कीं आणखी कोणी !
आज रहाणे व १८ वर्षीय सॅमसन यानी अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन केलं; द्रविडही मनापासून दाद देत होता.
आज चंडीला-गिलख्रिस्ट प्रकरणात
आज चंडीला-गिलख्रिस्ट प्रकरणात द्रवीडने केलेला संयमी हस्तक्षेप >> That appeal was disgusting at the best. I don't think there was ever any choice left for Dravid than to withdraw appeal really. द्रवीद अतिशय संयमी खेळाडू आहे हे मान्य असले तरी इथे त्याला अजून काहि करता आले असते असे मला तरी वाटत नाही.
सॅमसन मस्त खेळतोय, फक्त मला त्याला सवाई मानसिंगच्या बाहेर खेळलेले बघायला आवडेल before getting carried away.
>>सॅमसन मस्त खेळतोय, फक्त मला
>>सॅमसन मस्त खेळतोय, फक्त मला त्याला सवाई मानसिंगच्या बाहेर खेळलेले बघायला आवडेल before getting carried away.>>
आजची मॅच मोहाली ला होती. अर्थात हे मात्र खरंय की इतक्यात काही भाष्य करणं खूप घाईचं ठरेल. एक चांगला खेळाडू develop होताना बघणं सुद्धा आनंददायी असतं (२४ वर्षांपूर्वी असं पाहिलं होतं) .. नाहीतर उगाचच एखादा विजय भारद्वाज पाहून वाईट वाटतं.
हो आजची मॅच मोहालीला होती, पण
हो आजची मॅच मोहालीला होती, पण त्याने आज पर्यंत फक्त ७-८ first class नि २० एक T-20 खेळल्या आहेत तेंव्हा थोडा धीर धरायला हवा असे म्हणतोय. IPL मधे येण्याआधी रणजी मधे २ centuries होत्या बहुधा. Let's give him some time to mature.
<<....before getting carried
<<....before getting carried away.>> अगदीं खरंय. पण रमीझ राजा म्हणाला तसं - द्रविडने विश्वास टाकल्यावर इतक्या आत्मविश्वासाने खेळून त्या विश्वासाला पात्र ठरून दाखवणं हें १८ वर्षीय खेळाडूसाठी कौतुकास्पद; अनुभवाने 'सिलेक्शन ऑफ शॉट्स', तंत्र सुधारेलच पण या मुलाकडे अत्यावश्यक तो स्वतःवरचा विश्वास आहे, हें महत्वाचं.
दुसरी वैशिष्ठ्यपूर्ण बाब म्हणजे संजू सॅमसन केरळचा आहे . केरळ, काश्मीर अशा राज्यातले खेळाडूही आतां पुढे येताहेत, हेंही क्रिकेटसाठी चांगलंच. शिवाय, यष्टीरक्षक- फलंदाज असल्याने त्याची उपयुक्तताही अधिक आहे.
पुण्याच्या अपयशाची इतकी नियमितता बुचकळ्यात टाकणारी आहे. प्रेरणादायी नेतृत्वाचा अभाव ?
नो गेल स्टॉर्म इन दिल्ली
नो गेल स्टॉर्म इन दिल्ली
पुजाराही गेला.... आता सगळी मदार एबी आणि कोहलीवर!
गेल नाही पण कोहली बरसला....
गेल नाही पण कोहली बरसला.... ९९ धावा!
स्लॉग ओव्हर्समध्ये फारच फालतू बॉलिंग केली दिल्लीने.... बंगलोरला आता चांगला स्कोप आहे!
स्लॉग ओव्हर्समध्ये फारच फालतू
स्लॉग ओव्हर्समध्ये फारच फालतू बॉलिंग केली दिल्लीने>>>>>>
शेवटच्या ६,४ षटकात ९४ धावा!
पुण्याच्या अपयशाची इतकी
पुण्याच्या अपयशाची इतकी नियमितता बुचकळ्यात टाकणारी आहे. प्रेरणादायी नेतृत्वाचा अभाव ? >> माझे असे ठाम मत आहे कि अकरामधले सात खेळाडू भारतीय असल्यामूळे, हे सात खेळाडू कसे खेळतात ह्यावर consistency अवलंबून असते. ह्या angle ने विचार करून बघा काय वाटते ते
वाईट वाटते. त्यातल्या त्यात
वाईट वाटते. त्यातल्या त्यात समाधान त्यात कुणि मह्राष्ट्रीय नाहीत.
पण मग सी एस के, आर, आर, मधे सुद्धा ७ भारतीय आहेत, ते कसे जिंकतात?
नि द्रवीड, सेहवाग, गंभीर, तेंडूलकर, रैना, कोहली, धोणी असूनहि शेंदरी टोपी हसी नि गेल मधेच का रहाते?
आता द्रवीड व धोणी कर्णधार असलेले संघ काम वरच्या थरात हे काय कमी आहे?
घाबरू नका. भारतात खूप ढेरभर लोक पडले आहेत. वेस्त ईंडीज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, द. अफ्रिका या सगळ्या देशात मिळून नसतील इतके लोक भारतात आहेत. नि आता तर पैसे पण आहेत पुरेसे. तरुण लोक अनेक. मला तर भारत क्रिकेटच काय, अगदी सर्व म्हणजे सर्व क्षेत्रात लवकरच जगात पहिला होईल अशी दुर्दम्य आशा आहे.
आज TGIF लवकर सुरू झाले का
आज TGIF लवकर सुरू झाले का झक्की ?
jokes apart, मी काय लिहिलय जरा एकदा क्रुपया वाचाल का ? ७ खेळाडूंमूळेच जिंकतात असे म्हटलय का ? सी एस के, आर, आर, मधले भारतीय काय करत आहेत बघितलत का ? तेच तुमच्या लाडक्या PWI मधले ?
असू दे. मला क्रिकेटमधले
असू दे. मला क्रिकेटमधले जास्त कळत नाही. पण मी बाकी काय लिहीले आहे ते खरे आहे.
PWI माझे मुळीच लाडके नाहीत.
नि TGIF अजून सुरु केले नाही. ते सुरु झाल्यावर कर्नाटकात कुणीतरी का हरले, परब्रह्म म्हणजे काय, गझल, टीपापा अशा ठिकाणी लिहायचे असते.
PWI माझे मुळीच लाडके नाहीत.
PWI माझे मुळीच लाडके नाहीत. >> झक्की तुम्ही कितीही नकार दिलात तरी समस्त मायबोली तुमचे आवडते शहर नि संघ जाणते
अदभुत डिव्हिलिअर्स
अदभुत डिव्हिलिअर्स
TGIF >>>> ?????
TGIF >>>> ?????
मरत मरत का असेना कोलकता
मरत मरत का असेना कोलकता जिंकले ............:)
.
.आता बंगलोर अडचनीत सापडले ...काल जर पंजाब जिंकली असती तर हैद्राबाद ला प्रोब्लेम झाला असता...पण आता बंगलॉर अडचणीत आहे त्यांचे २ सामने त्यांच्या मैदानावर आहे... चेन्नई मुंबई विरुध्द हारली पण लगेच खडबडुन जागे झाले आणि बाद फेरीत प्रवेश केला ....आज राजस्थान जिंकले तर चेन्नई आणि राजस्थान बादफेरीत प्रवेश करतील आणि जर हैद्राबाद आणि बंगलोर आपापले सामने गमवत गेले तर कोलकत्याला संधी
राजस्थानने चेन्नईला १४१वर
राजस्थानने चेन्नईला १४१वर रोखले ! केव्होन कूपरने 'चेन्ज ऑफ पेस'च्या तंत्रावर मिळवलेलं प्रभुत्व व द्रविड त्याचा करत असलेला नेमका वापर खरंच वाखाणण्याजोगाच ! एकंदरीतच द्रविडने राजस्थानला एका वेगळ्याच उंचीवर नेलंय हें निश्चित !!
वाट्टो, वाट्टो, वाट्टो. फारच
वाट्टो, वाट्टो, वाट्टो.
फारच प्रेक्षणीय सामना. विशेषतः वॉटसन नि बिन्नी ची झंझावाती फलंदाजी.
मला राजस्थान रॉयलच जिंकायला हवे होते. ते जिंकले. रवीवारची सकाळ सार्थकी लागली. आता दोनेक तास सुखाने वामकुक्षी!

>> एकंदरीतच द्रविडने
>> एकंदरीतच द्रविडने राजस्थानला एका वेगळ्याच उंचीवर नेलंय हें निश्चित !!>> त्रिवार अनुमोदन!!
रविवार सार्थकी लागला. मस्त जेऊन दुपारची झोप काढायला मोकळा..
आयपीएलमधली पहिली मॅच ज्यांत
आयपीएलमधली पहिली मॅच ज्यांत एका संघाने [ चेन्नई] एकही षटकार मारला नाही !
आयपीएलमधली पहिली मॅच ज्यांत
आयपीएलमधली पहिली मॅच ज्यांत एका संघाने [ चेन्नई] एकही षटकार मारला नाही !
This, of course, does not reflect adversely upon ability, skills or greatness of Chennai batsmen. Rather, this is an example of good T20 bowling and fielding performance of RR team.
In T20, getting wickets is not as important as restricting the opponents to a smaller total. After Chennai's 1st wicket, barring, Bravo's knock, RR did that very well. Chennai bowling and fielding could not manage that.
A good T20 match.
झक्कीजी, पूर्णपणे सहमत. वॉटसन
झक्कीजी, पूर्णपणे सहमत. वॉटसन व कूपर यानी टी-२०साठी गोलंदाजीचा एक इफेक्टीव्ह फॉर्म्युलाच काल सादर केला.<< A good T20 match.>> +१
भाऊ, सहमत .. ह्या यादीत
भाऊ, सहमत .. ह्या यादीत बिन्नी चं नाव समाविष्ट करता येईल. आणी अर्थातच, द्रविड च्या नेतृत्वाच्या उल्लेखाशिवाय ही यादी पूर्ण होउच शकत नाही.
आज मुंबईच्या विजयासाठी
आज मुंबईच्या विजयासाठी मुंबईकरांइतकीच आरसीबीवाले पण प्रार्थना करत असतील
RCB बाहेर हवी ... मज्जा
RCB बाहेर हवी ... मज्जा येईल... आज हैद्राबाद जिंकली तर कोलकता बाहेर
असाही बंगलोरात पाऊस पडतोय...
असाही बंगलोरात पाऊस पडतोय... त्यांची एखाददुसरी होम मॅच वॉशआउट व्हायची शक्यता आहे!
पंजाब बरोबर ची आहे...ती झाली
पंजाब बरोबर ची आहे...ती झाली वॉशऑउट... तर नंतर चेन्नई बरोबर आहे.. आणि 1ला नंबर मिळवण्यासाठी काहीही करून चेन्नई जिंकणारच
आज मुंबई पाहूं काय करामत
आज मुंबई पाहूं काय करामत करते. सनरायझर्स - १७८.
सचिन ,कार्तिक किल्ला लढवताहेत .
Pages