आयपीएल चे सहावे पर्व सुरू व्हायला आता फक्त मोजून एक महीना उरलाय.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... संघमालक आणि स्टार खेळाडू नव्या जर्सीजचे फर्स्ट लूक साजरे करतायत...."कोरबो लोरबो जीतबो", "हल्ला-बोल" वगैरे आरोळ्या घुमू लागल्यात.... नव्या सनरायझर्स बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.... अश्यात भारतीय संघ ऑसीजविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्यामुळे लोकांना जरा जास्तीचा उत्साह आलाय...
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात.
हा धागा आयपीएल-६ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी 
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
आत्तां आमच्या वाण्याकडचा माल
आत्तां आमच्या वाण्याकडचा माल देणारा पोरगा म्हणाला, "सचिनने लिंबू फिरवलं ! >>
मस्तपैकी ढेंकर देत आतां रहाणे
मस्तपैकी ढेंकर देत आतां रहाणे 'जांवयांच्या पंक्ती'तून उठलाय ! नाबाद ६१- ४१ चेंडूत !!
(No subject)
चला, राजस्थानचे १४ गुण झाले !
चला, राजस्थानचे १४ गुण झाले ! द्रविडच्या चेहर्यावरचं हंसूं बघून बरं वाटलं. पुण्याने शेवटच्या चेंडूपर्यंत राजस्थानला झुंझवलं, हेंही कौतुकास्पद !!.
पोलार्डच्या "सुटलेल्या Catch
पोलार्डच्या "सुटलेल्या Catch - Hattrick" मागील एक थियरी:
हस्सीला संत्र्याची टोपी मिळवून देणे"
राजस्थान रॉयल्स अभिनंदन
राजस्थान रॉयल्स अभिनंदन
आव्हानात्मक धावसंख्येचा एक अतिशय नियंत्रित आणि सुनियोजित पाठलाग.... द्रवीड, रहाणे, सॅमसन, बिन्नी सगळेच मस्त खेळले!
संघातील विकेटकीपरच्या जागेसाठी आपला प्रतिस्पर्धी असलेल्या सॅमसनच्या शॉट्सना दिशांत याग्निक ज्या पद्धतीने चीअर करत होता ते बघूनच राजस्थान संघाच्या हेल्दी संघभावनेची कल्पना येते
आता बंगलोर, मुंबई, राजस्थान आणि हैद्राबाद असे चार संघ १४ गुणांवर..... What a Tournament
<< हस्सीला संत्र्याची टोपी
<< हस्सीला संत्र्याची टोपी मिळवून देणे">> स्वतःचं नाक फोडून घेवून व स्वतःची क्षेत्ररक्षणातली प्रतिमा सोलून काढून ?

पुणे........................
पुणे........................ रे ...............पुणे..................इतकी चांगली धावसंख्या नोंदवली आणि अशोक डिंडा सारखा जावई नसुन सुध्दा हारले .............:(
<< पुणे...इतकी चांगली
<< पुणे...इतकी चांगली धावसंख्या नोंदवली ....सुध्दा हारले .............>> निदान राजस्थानला उगीचच तंगडी घालून तोंडघशीं पाडल्याची नकारात्मक प्रतिमा तरी स्वतःसाठी नाही छापून घेतली या आयपीएलमधे !!!
What a match ! what an
What a match ! what an innings by David Miller - 101 in 38 balls !!!
किंग्ज इलेव्हन आज झपाटल्यासारखे खेळले; १८०वरचा स्कोअर पार केला. विराट कोहलीने नेमका नको त्यावेळीं मीलरचा सोपा झेल सोडला. पण आजचा दिवसच मीलरचा होता !!!!सतीशनेही उत्तम साथ दिली [१८चेंडूत २८]. किंग्ज इलेव्हनच्या आशा जिवंत . अभिनंदन.
कालची मिलरची खेळी गाईलएव्हढीच
कालची मिलरची खेळी गाईलएव्हढीच भारी होती राव. Under the pressure of high run-chase which effectively began only after 10th over, monumental inning with hardly any slogging. straight V was utilized to the fullest.
संपुर्ण मॅच फिरवली त्याने
संपुर्ण मॅच फिरवली त्याने
राजस्थानची फलंदाजी नेमक्या
राजस्थानची फलंदाजी नेमक्या वेळीं बहरते आहे. आज द्रविड -५४, रहाणे -५० !
रहाणे जांवयांच्या पंक्तीतून उठून यजमानच होतोय !
[ कालचा मिलरचा चांगला 'जज' केलेला झेल कोहलीने सोडला- ज्यामुळे सामना त्यांच्या हातातून गेला असंच म्हणतां येईल - तो कुणीं पाहिला का ? हाताचा पंजा उलटा धरून झेल घेण्याची ही पद्धत मला तरी कधींच आवडली नाही. पूर्वीची पद्धत इतकी छान असून ह्या नव्या पद्धतिचं हल्लीं कां आकर्षण वाटतं तें कळत नाही ! ]
हाताचा पंजा उलटा धरून झेल
हाताचा पंजा उलटा धरून झेल घेण्याची ही पद्धत >>>>>>>>> ही पध्दत आता जेव्हा सामने प्रकाशझोत मधे खेळले जातात तेव्हा आली...... हात पसरुन वर घेउन जायचा आनि त्याने प्रकाश अडवायचा ...आहि बोटांच्या फटीमधुन तो बॉल बघायचा अशी ही पध्दत आहे..याच्या मुळे प्रखर प्रकाशझोत हा डोळ्यांवर येत नाही आणि बॉल सहज पकडला जातो

.
.
हे जाँटीने एका मुलाखतीत सांगितलेले.....आमचा आदर्श होता
हाताचा पंजा उलटा धरून झेल
हाताचा पंजा उलटा धरून झेल घेण्याची ही पद्धत मला तरी कधींच आवडली नाही. पूर्वीची पद्धत इतकी छान असून ह्या नव्या पद्धतिचं हल्लीं कां आकर्षण वाटतं तें कळत नाही ! ] >> मला हि हि पद्धत जास्त सोपी वाटते. ह्यात तुम्ही SLR camera सारखे डोके हातांच्या पाठी ठेवून बॉलची trajectory बघत असल्यामूळे ball judge करणे अधिक सोपे जाते. outfield वर fielding करताना जास्त सोपे पडते असा माझा अनुभव. बहुधा हि Australian method of catching म्हणून धरली जातात. उदयन म्हणतो तसा त्याचा उगम day light सामन्यांमधे असू शकेल.
असाम्या तुला day night
असाम्या तुला day night म्हणायचंय का???
काल मिलर जबराट खेळला.. चॅम्पियन्स मध्ये आपली आणि सा. आफ्रिकेची मॅच झालीच तर विनय कुमार बॉलिंग करायचे धाडसच करणार नाही...
day night रे
day night रे
आज RR - DD सामन्यामधे, MI -
आज RR - DD सामन्यामधे, MI - PWI सामन्यापेक्षा जास्तं मराठी खेळाडू होते. (यादव, आगरकर, जाधव, रहाणे आणि तांबे)
वेल प्लेड द्रविड आणि राजस्थान. professional performance!! द्रविड चं कौतुक, त्याच्याविषयी वाटणारा आदर केवळ वाढतच जातो सामन्यागणिक. सध्याचा त्याचा आणि सचिन चा फॉर्म बघता असं वाटतं की सचिन रिटायर झालाय आणि द्रविड अजून खेळतोय. (आज सचिन ने मस्तं सुरूवात केलीये. तो फोर्म मधे आला तर दूधात साखर)
भाउ, आपकी बरसोंकी तमन्ना पुरी
भाउ,
आपकी बरसोंकी तमन्ना पुरी हो रही है.... तेंडूलकर चक्क तेंडल्यासारखा खेळतोय
जरा कौतुक करायचा अवकाश.....
जरा कौतुक करायचा अवकाश..... झाला आउट.... पण मस्त खेळला!
<< सारखे डोके हातांच्या पाठी
<< सारखे डोके हातांच्या पाठी ठेवून बॉलची trajectory बघत असल्यामूळे ball judge करणे अधिक सोपे जाते. outfield वर fielding करताना जास्त सोपे पडते असा माझा अनुभव >> पण शेवटच्या क्षणीं चेंडू व डोळे यामधे हाताचा पंजा येतच असावा ना; आणि तो क्षण तर झेल 'टिपण्यात'ला सगळ्यांत महत्वाचा असं मला वाटतं. कालच्या कोहलीच्या सुटलेल्या झेलचा 'क्लोज-अप' पाहिल्यावरही मला हेंच वाटलं. फक्त स्लीपमधे उंचावरून जाणारे झेल घ्यायला ऑसी पद्धत चांगली असावी कारण तिथं झेल मुख्यतः 'रिफ्लेक्सीस' वरच अवलंबून असतो. अर्थात, प्रत्येकाला कोणती पद्धत सोईची वाटते हें व्यक्तीनिष्ठ असेलही.
<< आपकी बरसोंकी तमन्ना पुरी हो रही है.... तेंडूलकर चक्क तेंडल्यासारखा खेळतोय >> ये तो शुरवात है; आगे आगे देखो होता है क्या !!!
केकेआर - ९०-७ ! शुभरात्री.
केकेआर - ९०-७ !
शुभरात्री.
पण शेवटच्या क्षणीं चेंडू व
पण शेवटच्या क्षणीं चेंडू व डोळे यामधे हाताचा पंजा येतच असावा ना; >> तसे होउ नये कारण तुम्ही थोडे बाजूला होत असता. मला वाटतय स्लिपमधले कॅचेस पकडायची मुख्य खुबी म्हणजे बॉलर कडे किम्वा बॉलकडे न बघता फक्त बॅटकडे बघत राहणे. त्यामूळे थोडा अधिक reaction time मिळतो. हे कोणाच्या interview मधे सांगितलेले ते आठवत नाहि पण बात एकदम सोळा आणे सही आहे.
<< स्लिपमधले कॅचेस पकडायची
<< स्लिपमधले कॅचेस पकडायची मुख्य खुबी म्हणजे बॉलर कडे किम्वा बॉलकडे न बघता फक्त बॅटकडे बघत राहणे. >> मला वाटतं सगळ्याच 'क्लोज-इन' क्षेत्ररक्षणाला [ सिली मिडऑन, मिडऑफ इ.इ.] हें लागू होतं. अर्थात ह्या सर्वच पोझिशन्सवर क्षेत्ररक्षणासाठी तेज नजर व 'शार्प रिफ्लेक्सेस' अत्यावश्यकच.
काल 'मॅन ऑफ द मॅच' किताब मिळाल्यावर सचिनला विचारलं गेलं कीं त्याच्याकडून मुंबई संघातील सहकार्यानां खूप शिकायला मिळत असावं, हा मोठाच फायदा नाही का ? सचिन हंसून म्हणाला, ' ही एकतर्फी वहातूक कधीच नसते; आय हॅव लर्न्ट अ लॉट फ्रॉम धीज गायीज ! आपले अनुभव व ज्ञान इतरांबरोबर 'शेअर' करत रहाणं व त्यानुसार स्वत:च्या व इतरांच्या खेळात सुधारणा होणं, हें महत्वाचं !'. सचिनची ही 'मिडीयासाठी' घोटून ठेवलेली पोपटपंची वाटली नाही तर तो त्याचा खराखुरा 'अॅटीट्यूड' वाटला !! सोबर्स, गावसकर, कपील देव, वासिम अक्रम, द्रविड, इ.इ. 'ग्रेट' खेळाडूंचाही प्रकर्षाने जाणवणारा हाच 'अॅटीट्यूड' होता/आहे.
आणि, दिनेश कार्तिक पाँटींगबद्दल काय म्हणतो पहा - "Some of the things that he [ पाँटींग] says in team meetings and some of the points he brings to the fore are really hair-raising. He is the key reason for us to be so positive and motivated." !
मला ह्या वेळी मुंबई जिंकणार
मला ह्या वेळी मुंबई जिंकणार आसच वाटतय
गेल्या वेळेच्या पहिल्या ३ क्रमांकांना (चेन्नई , बँगलोर, कोलकत्ता) दोन्-दोनदा हरवलय सोपी गोष्ट नाही ती
भाऊ काका : पंटर हा खेळणारा
भाऊ काका : पंटर हा खेळणारा मेंटर आहे वाटत
<< पंटर हा खेळणारा मेंटर आहे
<< पंटर हा खेळणारा मेंटर आहे वाटत >> न खेळणारा ?
खेळायला घेऊन सुद्धा न खेळणारा
खेळायला घेऊन सुद्धा न खेळणारा
आजचे अंदाज?
आजचे अंदाज?
<< आजचे अंदाज?>>ह्या वर्षीं
<< आजचे अंदाज?>>ह्या वर्षीं मुंबईविरुद्ध चेन्नईचा झालेला खेळ अपवादात्मक - अपघाती म्हणूं हवं तर- होता व सनरायझर्स विरुद्ध ते याचं उट्टं काढतील असा अंदाज वर्तवायला हरकत नाही. पण तसं झालं नाहीं तर चेन्नईच्या फॉर्मला आयत्या वेळीं उतरती कळा लागलीय अशी शंका घ्यायला वाव आहे.
[" We were mentally not in that game ", असं धोनी मुंबईविरुद्धच्या सामन्याबद्दल म्हणाला होता; मुलाखतीत अशीं कांही गोंडस पण अर्थशून्य वाक्यं फेंकण्याची हल्लीं स्टाईलच निघाली असावी ! :डोमा:]
Pages