Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगळ्याच धर्मांमधे प्रतीकांना,
सगळ्याच धर्मांमधे प्रतीकांना, प्रतीकचिन्हांना महत्व असतं.
त्यांच्याकडे त्यावर रहस्यकथा पाडतात एवढंच
मुळात हा धर्म एकेश्वरवादी, एकतत्ववादी आहे. कुठल्याही धर्मात हे स्वरूप गाठताना अनेक धार्मिक तत्वांना, नॅरेशन्सना, पंथांना, देवतास्वरूपांना कमी लेखलं जातं, त्यांचं अस्तित्व शक्य तेवढं अदृश्य करायचा प्रयत्न झालेला असतो (नाहीसं करता आलं नाही तरी). कारण शेवटी 'एक'च सत्य. देव. धार्मिक ग्रंथ. धर्मतत्व. देवतास्वरूप. हे सगळं एकच असतं.
या बरोब्बर उलटा आपला हिंदू धर्म. आपण तसे अनेकेश्वर-अनेकतत्ववादी. आपल्याकडे सगळ्यांना उतरंडीत का होईना सामावून घेतले जाते. लपवालपवी फारशी नाही. ऐतिहासिक प्रेषित नाहीत तेव्हा धर्माची रहस्यं नाहीत
शिवाय देवदेवतांविषयी/धर्माविषयी/धार्मिक संस्थांविषयी स्तुती सोडून काही लिहिता येतं का आपल्या समाजात?
शिवाय
शिवाय देवदेवतांविषयी/धर्माविषयी/धार्मिक संस्थांविषयी स्तुती सोडून काही लिहिता येतं का आपल्या समाजात?
<<< ते तर आहेच. पण स्तुती म्हणून तरी काही धड लिहावं की. इंग्रजीमधूनच नाही पण प्रादेशिक भाषांमधून असे लेखन फार कमी दिसते...
आपल्याकडे रहस्यकथा लिखाण कधी
आपल्याकडे रहस्यकथा लिखाण कधी गंभीरपणे घेतलं जातं? ते लिहिणारे हे फुटकळ लेखक...
लोककथांमधे फार इंटरेस्टिंग
लोककथांमधे फार इंटरेस्टिंग असतं गं आपल्याकडे.
बराचसा सिंबॉलिझम आणि मग जोडीला भक्तीतून येणारा रोमँटिसिझम + लोककथांच्यातला रांगडेपणा, थेटपणा आणि काही प्रमाणात निरागसताही.
आपल्याकडे अभ्यास करून लिखाण
आपल्याकडे अभ्यास करून लिखाण करायचं असतं का?
'डोंगरी ते दुबई' वाचून
'डोंगरी ते दुबई' वाचून संपवलं. 'Rise and Fall of Mumbai Gangsters' चा ईतिहास मांडलेला आहे.
मध्यमवर्गीय मानसिकतेला पूर्णपणे समांतर असे माफियांचे रुथलेस जग खुपशा प्रत्ययकारीपणे समोर येते. काही वर्णने अंगावर काटा आणतात. ग्लोरिफिकेशन टाळ्ण्याचा प्रयत्न केला आहे(विशेषतः हाजी मस्तान, दाऊदचे) , पण ते होतेच कारण लेखकाला त्यांची बाजूही मांडायची आहे.
का, कशासाठी हे सूड्चक्र असे प्रश्न माझ्या मध्यमवर्गीय मनाला पड्तात आणि निरुत्तर रहातात.
काही प्रसंग जरा जास्तच विस्ताराने येतात उदा. काही खूनांचे प्रसंग; तर काही गुंडाळून टाकल्यासारखे वाट्तात. उदा. बॉलिवुड, संजय दत्त , शिवसेना वगैरे.
मंजुडी ओके. मागे राजा
मंजुडी ओके. मागे राजा गोसावींच्या मुलीने एका दिवाळी अंकामधे लेख लिहिला होता तो त्यामानाने खूपच मॅच्युअर्डली लिहिला होता. मला वाटतं काही वेळा मधले शब्दांकनकारही आत्मचरित्रांचा तोल बिघडवण्यास, प्रकाशकांच्या आग्रहावरुन ते सनसनाटी होईल अशी मांडणी करण्याकरता कारणीभूत होत असावेत.
लोककथंमधले संकेत, रहस्ये >>> मी मध्यंतरी अशा विषयावर अरुण हेबळेकरांनी लिहिलेली एक मस्त कादंबरी वाचली होती. आठवत नाहीये नाव.
बर. मला चेटुक पंथाविषयी गंभीरपणे शोध घेऊन काही कोणी भारतीय लेखकाने लिहिलं आहे का एखादं पुस्तक (मराठी/इंग्रजी) त्याबद्दल माहिती हवी आहे. आपल्या खेडोपाडी या चेटूकविद्येविषयी किती-कसे गैरसमज आहेत, स्त्रियांच्या हत्या यामुळे कशा सर्रास होतात यावर समीर मराठे नावाच्या पत्रकाराने काही महिन्यांपूर्वी लोकमतमधे एक लेखमाला लिहिली होती, ती सोडून इतर काही पुस्तकरुपात पाहीले नाहीये. इप्सिता रॉय-चौधुरींचे पुस्तक सध्या उपलब्ध नाहीये. वरदा, तुझ्या संशोधनात याबद्दल काही आहे का?
लोककथांमधल्या संकेतांवरचे मी
लोककथांमधल्या संकेतांवरचे मी वाचलेले एक अफलातून पुस्तक म्हणजे विश्वनाथ खैरे लिखित 'भारतीय मिथ्यांचा मागोवा'.
शर्मिला, मी नुकतंच 'कार्लसनची
शर्मिला, मी नुकतंच 'कार्लसनची जलपरी आणि विलक्षण गूढकथा' हे विजय देवधर अनुवादीत पुस्तक वाचून संपवलं आहे. भारतातल्या दोन-तीन अनुभवांविषयी कथा आहेत, बाकी बहुतकरून आफ्रिकेतील चेटूक, करणी, जू-जू इत्यादींविषयी कथा आहेत. मस्त आहे ते पुस्तक.
आगाऊ, कोणाचे प्रकाशन आहे हे?
आगाऊ, कोणाचे प्रकाशन आहे हे? हे आवडेल वाचायला असे वाटते आहे.
पण ते फिक्शन असणार ना मंजुडी.
पण ते फिक्शन असणार ना मंजुडी. मला संशोधन करुन लिहिलेलं नॉन-फिक्शन पुस्तक हवं आहे. परदेशी बरिच आहेत, पण भारतीय लेखकांची मला माहिती नाहीत.
शर्मिला, माझ्या संशोधनात याचा
शर्मिला, माझ्या संशोधनात याचा संबंध अजिबातच येत नाही. आणि मला मराठीत या विषयावर लिहिलेली अभ्यासू पुस्तकं माहित नाहीत.
अध्यात्माशी संबंधित पुस्तकं लिहिणारे एकजण फडके म्हणून आहेत. मला आत्ता नक्की इनिशिअल्स आठवत नाहीत. त्यांनी असे काही किस्से लिहिलेत काही पण ते चेटुक कसं अस्तित्वात अस्तं वगैरे टाईपचेच आहेत.
बाकी हा विषय तसा धाडसी असल्याने लोक तिकडे फिरकले नसतील - खरंतर अॅन्थ्रॉपॉलॉजिस्ट वगैरेंनी कामं करायला हरकत नाहीये.
तरीही मी जरा शोधाशोध करून सांगेनच..
लोककथासंकेतांवरची अद्वितीय (फिक्शन) साहित्यरचना म्हणजे नागमंडल आणि हयवदन
शर्मिला, ती मी नव्हे. अगावा,
शर्मिला, ती मी नव्हे.
अगावा, पुस्तकाविषयी अजून लिही जरा प्लीज. प्रकाशक कोण आहेत. पुस्तक कुठे मिळेल इत्यादि. कोकणातल्या जारणमारणावर लिहिलेले एक पुस्तक वाचलं होतं पण ते अगदीच एस्टी स्टँडवर मिळणार्या पुस्तकांचीच थोडीफार सुधारित आवृत्ती असलेलं होतं.
मध्यंतरी एका फारिनरने संकलित केलेले (नाव विसरले) भारतीय लोककथांचे एक पुस्तक वाचले होते. बर्याचशा लोककथा सुंदर होत्याच पण साध्यासरळ होत्या. रहस्यमयी वगैरे नव्हत्या. पण मलातरी त्या वाचायला आवडल्या.
राशा हे शरद वर्देंचे पुस्तक
राशा हे शरद वर्देंचे पुस्तक आहे त्यांच्या सोविएत युनिअनमधल्या अनुभवांवर आधारीत. लेखक एका बहुराष्ट्रीय कंपनीत उच्चपदस्थ असताना त्यांच्या सोविएत व इतर अनेक राष्ट्रांत कामासाठी फेर्या व्हायच्या. हहने वाहत्या बाफवर ह्याचा उल्लेख केला होता. पुस्तक अजिबातच म्हणजे अजिबातच जड नाहिये. फार ग्रेटही नाहिये.
ओके, टण्या. माझा पास मग
ओके, टण्या. माझा पास मग राशाला (जड नाही म्हणून नव्हे
)
शरद वर्दे?? अरे वा!!
शरद वर्दे?? अरे वा!! अमेरिकेनंतर रशियाला पोचले... सही आहे. वाचायलाच पाहिजे.
हो शर्मिला, सत्यकथा आहेत त्या (म्हणे!).
लोककथासंकेतांवरची अद्वितीय
लोककथासंकेतांवरची अद्वितीय (फिक्शन) साहित्यरचना म्हणजे नागमंडल आणि हयवदन <<<
येस्स..
लोककथासंकेतांवरची अद्वितीय
लोककथासंकेतांवरची अद्वितीय (फिक्शन) साहित्यरचना म्हणजे नागमंडल आणि हयवदन <<< अजून एक 'चेलुवी'
अजून एक 'चेलुवी'<<< म्हणजे
अजून एक 'चेलुवी'<<<
म्हणजे परत कर्नाडच
अजून एक 'चेलुवी' >> नंदिनी,
अजून एक 'चेलुवी' >>
नंदिनी, नीधप
या पुस्तकावार एक सिनेमा आहे का? त्यामधे नायिका चाफ्याचं झाड होत असते??
हो सोनाली कुलकर्णीची (१)
हो सोनाली कुलकर्णीची (१) पहिली फिल्म.
माधवी. हो. चाफ्याचं नव्हे तर
माधवी. हो. चाफ्याचं नव्हे तर सुगंधी फुलांचं झाड. पण हे पुस्तक आहे की नाही माहित नाही. कानडी लोककथा मात्र आहे. माझ्या आईची एक मावशी होती, ती असल्या गोष्टी अगदी मस्त रंगवून सांगायची.
भारतीय मिथ्यांचा मागोवा -
भारतीय मिथ्यांचा मागोवा - विश्वनाथ खैरे- संमत प्रकाशन (सिंध हाउसिंग सोसायटी, औंध, पुणे), वितरक मौज
हनुमान, वातापीची गोष्ट अशी उदाहरणे घेऊन त्यातील प्रतिमा कशा निर्माण झाल्या असाव्यात, मिथक म्हणजे काय, ते निसर्गातील घटना आणि माणसाचे निरिक्षण यातून कशा फुलतात याचा विचार केला आहे. एका लेखात तर त्यांनी स्वतःच एक मिथ्यकथा रचून त्याचे आधुनिक काळाशी नाते कसे जोडले जाते हे दाखवले आहे.
हा... थॅन्क्स नीधप, नंदिनी!
हा... थॅन्क्स नीधप, नंदिनी!
मी हा सिनेमा लहानपणी डिडीवर लागला होता तेव्हा पाहिला होता. पण नाव लक्षात नव्हते. फार आवडला होता. त्याचा एन्ड जरा ट्रॅजिक आहे ना..
बादवे, सोनाली म्हणजे सोनाली कुलकर्णी का?
धन्यवाद. पॉप्युलर नाही का?
धन्यवाद. पॉप्युलर नाही का? आता बघायला लागेल कुठे मिळेल ते.
सॉरी माहिती चुकली. भारतीय
सॉरी माहिती चुकली. भारतीय मिथ्यांचा मागोवा, संमत प्रकाशन (सिंध हाउसिंग सोसायटी, औंध, पुणे), वितरक मौज.
रा.चिं.ढेर्यांची पुस्तके
रा.चिं.ढेर्यांची पुस्तके नाही का बसणार ह्या क्रायटेरियात. मला वाटते त्यांनी दत्त, खंडोबा वगैरे देवतांच्या उदय-वाढ ह्यावर पुस्तके लिहिलेली आहेत.
हो ते खैर्यांनी स्वतःच
हो ते खैर्यांनी स्वतःच काढलंय. संमत प्रकाशन (त्यांचा संमत - संस्कृत मराठी तमिळ - सिद्धांत)
पण खैरे बरेच वेळा बर्याच गोष्टी टोकाला नेतात असं वाटतं.
नाही नाही टण्या - ढेरे
नाही नाही टण्या - ढेरे मध्ययुगीन दख्खनमधील दैवतेतिहास आणि आनुषंगिक विषयावर काम करतात.
रा.चिं.ढेर्यांची पुस्तके
रा.चिं.ढेर्यांची पुस्तके नाही का बसणा >> नंदिनीचा मूळ प्रश्न बहुधा christian आणी pagan (knights of Templar वगैरे पण धरा ह्यातच) ह्या crossover मधल्या symbols वर आधारित fictional गोष्टींबद्दल आहे असे मला वाटले. त्याचे उत्तर माझ्या मते तरी नाही असे असावे. ह्याच category मधल्या लेखकांची १-२ हिंदू mythology बद्दल जी पुस्तके वाचलेली ती एव्हढी बुद्दू होती कि .....
Pages