आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा रंगारंग कार्यक्रम या धाग्यावर पुढे सुरू राहू द्या.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
काही रंजक आकडेवारी :
१. भाग पहिला : http://www.maayboli.com/node/25569
या कोड्यांचा पहिला भाग ६ मे २०११ ला सुरू केला. या पहिल्याच भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ६ मे ते ७ जुन अशा एका महिन्यात तब्बल ७५ पानं प्रतिसाद (२००० पेक्षा जास्त) दिले गेले. या भागात कोड्यांना नंबर नव्हते पण कोडी नक्कीच २०० च्या वर असणार. आता हा धागा बंद करण्यात आला आहे (म्हणजे यावर प्रतिसाद देता येणार नाहीत).
२. भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/26366
७ जुन २०११ ला काढलेल्या दुसर्या धाग्यापासून कोड्यांना क्रमांक देण्यास सुरुवात झाली. २००२ प्रतिसाद आणि २०९ कोडी (एकूण ६७ पानं) झाल्यावर ११ ऑक्टोबरला दुसरा भागही संपला. त्यातलं २०९ क्रमांकाचं माधवनं विचारलेलं कोडं त्या भागावर अनुत्तरीत राहिल्यानं त्यानं ते पुन्हा तिसर्या भागात विचारलं आहे.
३. भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/29961
१८ ऑक्टोबर २०११ला सुरू केलेला हा भाग ८ जुन २०१२ ला संपला. शंभर कोडी झाली की तो भाग झोपवायचा यावर एकमत झाल्याने या भागात १०० कोडी (एकूण ३६ पानं भरली). या धाग्यामध्ये भागाचा क्रमांक आणि मग कोड्यांचा क्रमांक असे नंबर देण्यास सुरवात झाली.
या भागातच आपल्या जिप्सीनं चित्रकोड्यांचा नविन प्रकार आणला. तो अर्थातच प्रचंड लोकप्रिय झाला आहे.
४. भाग चौथा : http://www.maayboli.com/node/35529
७ जुन २०१२ ते १४ मार्च २०१३ (एकूण ३१ पानं). मंडळींचा उत्साह काहीसा आटल्यामुळे या भागातली कोडी पूर्ण व्हायला जवळजवळ एक वर्ष लागलं. पण तरीही एकदा का दोघातिघांनी पुढाकार घेतला की वर आलेला हा धागा सुरू राहतो.
आता हा पाचवा भाग आहे. नेहमीचे आणि ताज्या दमाचे खेळाडू येऊन लवकरच इथेही १०० कोड्यांचं टारगेट पूर्ण करतील हे मला ठाऊक आहे .....
हे धागे यशस्वी करणार्या सर्व खेळाडूंना धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा.
भरत, नाही.
भरत, नाही.
श्रद्धा : सपनो के घर के छत पे
श्रद्धा :
सपनो के घर के छत पे है तारे
टोफीयोके दिवारो पे लटके वो बारे
(डॅडी ) ????
श्रद्धा, उत्तर सांगुनच टाक.
श्रद्धा, उत्तर सांगुनच टाक.

आणि जे काही बक्षीस ठरवल असशील ते स्वतःलाच दे
सपनो के घर के छत पे है तारे
सपनो के घर के छत पे है तारे <<<< हे कसं असेल? असो.
०५/२९:
'दो दूनी चार' सिनेम्यातले मि. दुग्गल आणि त्यांची मुलगी पायल यांचं भांडण चालू होतं. पायलला मैत्रिणीचं पाहून कॉल सेंटर जॉइन करून कमावतं व्हावं, असं वाटत होतं. त्याउलट मि. दुग्गलांना कॉल सेंटर अजिबातच पटत नव्हतं. रात्रीबेरात्रीच्या शिफ्ट असलेली जीवनशैली, काही कॉलसेंटरांच्या ड्रायव्हरांनी केलेले गुन्हे, वगैरे बाबींमुळे त्यांना त्या गोष्टीची चीडच होती. एकदा या नोकरीच्या मोहात अडकली की पायल एमबीए वगैरे उच्चशिक्षण घेणार नाही, तिचं करीयर भरकटेल, वगैरे चिंताही त्यांना वाटत होती. पण पायल हटून बसली होती. झटपट इंटरव्ह्यू नि लगेच ऑफर लेटर आणि भलाभक्कम पगार हे सगळं तिला खुणावत होतं. शेवटी एका रात्री गाडी काढून बापलेक निघाले. एका कॉलसेंटरापाशी आले. शिफ्ट सुरू व्हायची होती, त्यामुळे ठिकठिकाणी जमून तरुण मुलामुलींचे घोळके मजेत खातपीत होते, हास्यविनोद करत होते. 'पहा, किती मजा चालली आहे ती. तुम्ही उगीचच विरोध करताय' पायल म्हणाली. तिला आपला मुद्दा समजावायला मि. दुग्गलांनी कोणतं गाणं म्हटलं असेल?
गाण्याचे क्लू.
१. गाणं जुनं नाही.
२. एखाद्याला कॉलसेंटर आवडत नसेल आणि आपल्या मुलीला त्यातले तोटे दाखवून ते जॉइन करायला परावृत्त करायचं असेल तर एखाददुसरा शब्द वगळता हे गाणं फिट बसतं.
३. कॉलसेंटरांतली नाईट शिफ्ट, कुठल्याही क्षेत्रात शिक्षण घेतलेल्याला तिथे नोकरी मिळणं वगैरे बाबींचा विचार करून बघा.
उत्तरः
रातमें ही जागते है ये गुनाहों के घर
इनकी राहें खोले बाहें जोभी आए इधर
ये है गुमराहों का रास्ता
मुस्कानें झूठी है...
श्रद्धा, हे गाणं नाही ऐकलंय.
श्रद्धा, हे गाणं नाही ऐकलंय.
ओह्ह , आत्ताच्या नवीन
ओह्ह :-(, आत्ताच्या नवीन 'तलाश'मधलंच आहे.
०५/३५: कौरवांच्या सभेत
०५/३५:
कौरवांच्या सभेत दु:शासनाने द्रौपदीचं वस्त्रहरण करायचा प्रयत्न केला तेव्हा कृष्णाने तिची विटंबना तर थांबवलीच पण कडक शब्दांत दु:शासनाची निर्भत्सनाही केली. ह्यावर दु:शासन त्याला उद्देशून काय हिन्दी गाणं म्हणाला असेल?
क्लू - गाणं जुनं नाही.
वि.सू. - कोणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नाही. दिवे घ्या.
०५/३५: कॅरॅक्टर ढीला है..
०५/३५:
कॅरॅक्टर ढीला है.. (रेडी) का?
हम तो भई जैसे है वैसे रहेंगे
हम तो भई जैसे है वैसे रहेंगे (वीर्-झारा) ?
एकविसाव्या शतकातली गाणी!
एकविसाव्या शतकातली गाणी!
०५/०३६ मुंबईच्या अमिताचे
०५/०३६ मुंबईच्या अमिताचे नुकतेच पुण्याच्या शामबरोबर लग्न झाले. तिला तिच्या सासुबाई - मेघमालाबाई थोड्या खाष्ट, तर धाकटी नणंद सौदामिनी भोचक वाटली होती. पण शाम नोकरीनिमित्ताने बंगलोरला असल्याने या दोघींशिवाय तिचा राजाराणीचा संसार सुरू झाला. पण आठच दिवसांनी एका भर दुपारी या दोघी बंगलोरला दत्त म्हणून हजर झाल्या. हे शामला ऑफिसात फोन करून कळवताना अमिताने कोणते गाणे म्हटले असेल?
०५/३७: तो तरुण दरवाजाची बेल
०५/३७:
तो तरुण दरवाजाची बेल वाजवणार एव्हढ्यात त्याला मागून कोणीतरी खेचलं. 'काय रे, कोणत्या पक्षाचा प्रचार करायला चालला आहेस?' एका मिशीवाल्या माणसाने त्याला दरडावून विचारलं.
तरुण चपापला आणि त्याने पक्षाचं नाव सांगितलं.
'असं होय? पण आजपासून, नाही आत्तापासूनच मी सांगतो त्याच पक्षाचा प्रचार करायचा.' मिशीवाल्याने गुरकावलं.
'अहो पण? असं कसं? मला ह्या पक्षाची धोरणं, भूमिका सगळं पटतंय. मी भाड्याचा तट्टू नाहिये'
'धोरणं? भूमिका? घाला ते सगळं चुलीत आणि आंघोळीचं पाणी तापवा. हे बघितलं का माझ्या हातात काय आहे ते? खेळण्यातलं नाहिये. खर्रखुर्र आहे.' मिशीवाल्याने पिस्तूल काढताच तरूणाला घाम फुटला. पक्षाची धोरणं, भूमिका सगळं त्यात वाहून गेलं.
'बरं मग तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा. तसं करू' तो कसाबसा बोलला.
'हे घ्या आमच्या पक्षाचं नाव आणि ही माहिती. ह्याचा प्रचार करायचा' मिशीवाल्याने त्याच्या हातात एक बाड दिलं.
तरुणाने एका घराची बेल वाजवली. एका वयस्कर बाईने दरवाजा उघडला. तरुणाने हातातलं पत्रक पुढे केलं. आणि मिशीवाल्याच्या पक्षाचं गुणगान सुरु केलं.
थोडा वेळ ऐकून ती बाई म्हणाली 'असं आहे का? चांगला पक्ष दिसतोय तुमचा. एव्हढा उन्हातान्हाचा फिरतोयस बाबा. तुम्हालाच मत देऊ हो आम्ही'
तरुण चमकला. जीवाच्या भीतीने आपण आपल्या पक्षाशी प्रतारणा करतोय हे त्याला जाणवलं. तो डोळ्यांनी खाणाखुणा करून बाईला मिशीवाल्याबद्दल सांगून सावध करायचा प्रयत्न करू लागला. पण बाईला काही कळेना. 'बरं वाटत नाहिये का तुला? पाणी देऊ का?' असं ती विचारायला लागल्यावर मिशीवाल्याला संशय येईल ह्या भीतीने तो तिथून निघाला.
त्या बाईचा नवरा बाजारातून घरी आल्यावर तिने त्याला काय सांगितलं असेल?
०५/०३६ कोइ मतवाला आया मोरे
०५/०३६ कोइ मतवाला आया मोरे द्वारे
अँखियों से कर गया अजब इशारे
श्रध्दा
श्रध्दा बरोबर!
०५/३५:
कौरवांच्या सभेत दु:शासनाने द्रौपदीचं वस्त्रहरण करायचा प्रयत्न केला तेव्हा कृष्णाने तिची विटंबना तर थांबवलीच पण कडक शब्दांत दु:शासनाची निर्भत्सनाही केली. ह्यावर दु:शासन त्याला उद्देशून काय हिन्दी गाणं म्हणाला असेल?
क्लू - गाणं जुनं नाही.
उत्तरः
कुडियोंका नशा प्यारे नशा सबसे नशीला है
जिसे देखो यहा वो हुस्नकी बारीशमे गिला है
इशकके नामपे करते सभी अब रासलीला है
मै करू तो साला कॅरेक्टर ढीला है
वि.सू. - कोणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नाही. दिवे घ्या.
भरत बरोबर ०५/३७: तो तरुण
भरत बरोबर
०५/३७:
तो तरुण दरवाजाची बेल वाजवणार एव्हढ्यात त्याला मागून कोणीतरी खेचलं. 'काय रे, कोणत्या पक्षाचा प्रचार करायला चालला आहेस?' एका मिशीवाल्या माणसाने त्याला दरडावून विचारलं.
तरुण चपापला आणि त्याने पक्षाचं नाव सांगितलं.
'असं होय? पण आजपासून, नाही आत्तापासूनच मी सांगतो त्याच पक्षाचा प्रचार करायचा.' मिशीवाल्याने गुरकावलं.
'अहो पण? असं कसं? मला ह्या पक्षाची धोरणं, भूमिका सगळं पटतंय. मी भाड्याचा तट्टू नाहिये'
'धोरणं? भूमिका? घाला ते सगळं चुलीत आणि आंघोळीचं पाणी तापवा. हे बघितलं का माझ्या हातात काय आहे ते? खेळण्यातलं नाहिये. खर्रखुर्र आहे.' मिशीवाल्याने पिस्तूल काढताच तरूणाला घाम फुटला. पक्षाची धोरणं, भूमिका सगळं त्यात वाहून गेलं.
'बरं मग तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा. तसं करू' तो कसाबसा बोलला.
'हे घ्या आमच्या पक्षाचं नाव आणि ही माहिती. ह्याचा प्रचार करायचा' मिशीवाल्याने त्याच्या हातात एक बाड दिलं.
तरुणाने एका घराची बेल वाजवली. एका वयस्कर बाईने दरवाजा उघडला. तरुणाने हातातलं पत्रक पुढे केलं. आणि मिशीवाल्याच्या पक्षाचं गुणगान सुरु केलं.
थोडा वेळ ऐकून ती बाई म्हणाली 'असं आहे का? चांगला पक्ष दिसतोय तुमचा. एव्हढा उन्हातान्हाचा फिरतोयस बाबा. तुम्हालाच मत देऊ हो आम्ही'
तरुण चमकला. जीवाच्या भीतीने आपण आपल्या पक्षाशी प्रतारणा करतोय हे त्याला जाणवलं. तो डोळ्यांनी खाणाखुणा करून बाईला मिशीवाल्याबद्दल सांगून सावध करायचा प्रयत्न करू लागला. पण बाईला काही कळेना. 'बरं वाटत नाहिये का तुला? पाणी देऊ का?' असं ती विचारायला लागल्यावर मिशीवाल्याला संशय येईल ह्या भीतीने तो तिथून निघाला.
त्या बाईचा नवरा बाजारातून घरी आल्यावर तिने त्याला काय सांगितलं असेल?
उत्तरः
कोइ मतवाला आया मोरे द्वारे
अँखियों से कर गया अजब इशारे
०५/३६: घर आजा घिर आये बदरा
०५/३६:
घर आजा घिर आये बदरा सांवरिया
जियरा मोरा धक धक रे चमके बिजुरिया
श्रद्धा , बरोबर. ०५/०३६
श्रद्धा , बरोबर.
०५/०३६ मुंबईच्या अमिताचे नुकतेच पुण्याच्या शामबरोबर लग्न झाले. तिला तिच्या सासुबाई - मेघमालाबाई थोड्या खाष्ट, तर धाकटी नणंद सौदामिनी भोचक वाटली होती. पण शाम नोकरीनिमित्ताने बंगलोरला असल्याने या दोघींशिवाय तिचा राजाराणीचा संसार सुरू झाला. पण आठच दिवसांनी एका भर दुपारी या दोघी बंगलोरला दत्त म्हणून हजर झाल्या. हे शामला ऑफिसात फोन करून कळवताना अमिताने कोणते गाणे म्हटले असेल?
घर आजा घिर आए बदरा साँवरिया
मोरा जिया धक धक रे चमके बिजुरिया
०५/०३८ : सदाभाऊंच्या हृदयाची
०५/०३८ : सदाभाऊंच्या हृदयाची झडप निकामी झाल्याने ती बदलून कृत्रिम झडप बसवण्यात आली. जिवावरचं ऑपरेशन म्हणून सदाभाऊ आणि त्यांचे जिवलग सगळेच चिंताग्रस्त होते. पण ऑपरेशन नीट पार पडलं. ऑपरेशननंतर ती काढून टाकलेली झडप कोणतं गाणं म्हणेल?
मिल जाये इस तरहा दो लेहेरे
मिल जाये इस तरहा
दो लेहेरे जिस तरहा
फिर हो ना जुदा.....
०५/३८: अब तेरे दिलमें हम आ
०५/३८:
अब तेरे दिलमें हम आ गये
तेरे दिलमें रहेंगे...
तुझे अपना कहेंगे..
(माधुरीच्या बहुधा मोहब्बत सिनेम्यातलं गाणं.)
कोड्यात सुधारणा केली आहे.
कोड्यात सुधारणा केली आहे.
लंबी जुदाई चार दिनो का प्यार
लंबी जुदाई चार दिनो का
प्यार ओ रब्बा
बडी लंबी जुदाई
भरत क्लू?
भरत क्लू?
१) श्रद्धा, बरोबर वाटेने
१) श्रद्धा, बरोबर वाटेने जाताय. (तुम्ही दिलेल्या गाण्यात माधुरीसोबत अक्षयकुमार आहे. मोहब्बत मध्ये अक्षय खन्ना होता.) पण ही झडप आलेली नाही तर.....
२) एका क्लासिक सिनेमातलं क्लासिक गाणं. हिंदीत क्वचित दिसलेली तरीही गाजलेली अभिनेत्री यात दुहेरी भूमिकेत.
०५/०३८: रहते थे कभी जीनके
०५/०३८:
रहते थे कभी जीनके दिलमे
हम जान से भी प्यारोंकी तरहा ?
ते उत्तर आधीच्या कोड्याला
ते उत्तर आधीच्या कोड्याला अनुसरून दिलं होतं.
आता बहुधा माधव यांचं उत्तर बरोबर असावं.
माधव, बरोबर ०५/०३८ :
माधव, बरोबर
०५/०३८ : सदाभाऊंच्या हृदयाची झडप निकामी झाल्याने ती बदलून कृत्रिम झडप बसवण्यात आली. जिवावरचं ऑपरेशन म्हणून सदाभाऊ आणि त्यांचे जिवलग सगळेच चिंताग्रस्त होते. पण ऑपरेशन नीट पार पडलं. ऑपरेशननंतर ती काढून टाकलेली झडप कोणतं गाणं म्हणेल?
रहते थे कभी जिनके दिल में हम जानसे भी प्यारों की तरह
बैठे हैं उन्ही के कूंचें में हम आज गुनहगारों की तरह
चित्रपट : ममता . सुचित्रा सेन दुहेरी भूमिकेत.
धम्माल चाललीय सध्या कामात
धम्माल चाललीय
सध्या कामात व्यस्त असल्याने कमी येण होतं इथे. 
०५/३९

सोप्प्य
पुर्वा सुहानी आयी रे पुर्वा
पुर्वा सुहानी आयी रे पुर्वा
०५/०३९: क्या मौसम आया है पूरब
०५/०३९:
क्या मौसम आया है
पूरब से मस्तानी पुरवाई (पूर्वा + आई) चली
खूशबू से मेहकी है फुलोंकी गली
Pages