..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ५)

Submitted by मामी on 14 March, 2013 - 05:41

आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा रंगारंग कार्यक्रम या धाग्यावर पुढे सुरू राहू द्या.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529

काही रंजक आकडेवारी :
१. भाग पहिला : http://www.maayboli.com/node/25569
या कोड्यांचा पहिला भाग ६ मे २०११ ला सुरू केला. या पहिल्याच भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ६ मे ते ७ जुन अशा एका महिन्यात तब्बल ७५ पानं प्रतिसाद (२००० पेक्षा जास्त) दिले गेले. या भागात कोड्यांना नंबर नव्हते पण कोडी नक्कीच २०० च्या वर असणार. आता हा धागा बंद करण्यात आला आहे (म्हणजे यावर प्रतिसाद देता येणार नाहीत).

२. भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/26366
७ जुन २०११ ला काढलेल्या दुसर्‍या धाग्यापासून कोड्यांना क्रमांक देण्यास सुरुवात झाली. २००२ प्रतिसाद आणि २०९ कोडी (एकूण ६७ पानं) झाल्यावर ११ ऑक्टोबरला दुसरा भागही संपला. त्यातलं २०९ क्रमांकाचं माधवनं विचारलेलं कोडं त्या भागावर अनुत्तरीत राहिल्यानं त्यानं ते पुन्हा तिसर्‍या भागात विचारलं आहे.

३. भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/29961
१८ ऑक्टोबर २०११ला सुरू केलेला हा भाग ८ जुन २०१२ ला संपला. शंभर कोडी झाली की तो भाग झोपवायचा यावर एकमत झाल्याने या भागात १०० कोडी (एकूण ३६ पानं भरली). या धाग्यामध्ये भागाचा क्रमांक आणि मग कोड्यांचा क्रमांक असे नंबर देण्यास सुरवात झाली.

या भागातच आपल्या जिप्सीनं चित्रकोड्यांचा नविन प्रकार आणला. तो अर्थातच प्रचंड लोकप्रिय झाला आहे.

४. भाग चौथा : http://www.maayboli.com/node/35529
७ जुन २०१२ ते १४ मार्च २०१३ (एकूण ३१ पानं). मंडळींचा उत्साह काहीसा आटल्यामुळे या भागातली कोडी पूर्ण व्हायला जवळजवळ एक वर्ष लागलं. पण तरीही एकदा का दोघातिघांनी पुढाकार घेतला की वर आलेला हा धागा सुरू राहतो.

आता हा पाचवा भाग आहे. नेहमीचे आणि ताज्या दमाचे खेळाडू येऊन लवकरच इथेही १०० कोड्यांचं टारगेट पूर्ण करतील हे मला ठाऊक आहे ..... Happy

हे धागे यशस्वी करणार्‍या सर्व खेळाडूंना धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

...

ढोली ढोल बजाना
ताल से ताल मिलाना

पुरवा सुहानी आयी रे
रीतुओकी रानी आयी रे
मेरे रुके नही पाव नाच उठा सारा गाव

०५/४० :

"आज आपको बताना ही पडेगा की आपके इतने सारे बच्चों मे आपका सबसे प्यारा कौन है|", जहाँआरा आज ऐकतच नव्हती. आज या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचाच असा तिनं पणच केला होता. त्याला कारणही तसंच होतं. प्रचंड इस्टेटीचा मालक असलेला तिचा मियाँ आता आयुष्याची शेवटची घटका मोजत होता. त्याच्या चार बायका आणि पंधरा मुलं यांच्यात आता त्याची संपत्ती वाटली जाणार होती. मुख्य म्हणजे त्याच्या तीन कंपन्यांचा ताबा कोणाकडे जाणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती. त्यानं मृत्युपत्र केलं होतंच पण 'आतली बातमी' कोणालाच अजून माहित नव्हती. तो मेल्यानंतरच ते मृत्युपत्र वाचलं जाणार होतं.

जहाँआरा त्याची सगळ्यात लाडकी आणि सगळ्यात लहान बायको. तिला दोनच मुलं - जहाँगिर आणि जहाँपनाह. आपली दोन मुलंच आपल्या नवर्‍याची सगळ्यात लाडकी अवलाद असून त्यांच्याकडेच त्या कंपन्यांचा ताबा येईल - निदान यावा - असं जहाँआराला वाटणं साहजिकच होतं. म्हणूनच ती आज त्याच्या पायाशी बसून आर्जव करत होती.

एरवी आपल्या लाडक्या बेगमेचं मन कधीही न मोडणारा मियाँ मात्र या बाबतीत अगदी ठाम होता. व्यवहार तो व्यवहार. आपल्या पंधरा मुलामुलींच्यातून आपल्या तीन कंपन्या उत्तम रितीने पुढे चालवू शकतील अशी तीन मुलं त्यानं आधीच हेरून ठेवली होती आणि त्यांनाच या तीन कंपन्यांचा ताबा मिळणार होता. लाडक्या पत्नीच्या आग्रहास्तव त्याने शेवटी ही 'आतली बातमी' जहाँआराला दिलीच.

कोणतं गाणं म्हणून????

भरत, केदार सह्हिए Happy
तुम्हा दोघांना दोन प्लेट भरून केशर जिलेबी आणि थंडगार केशर लस्सी. Happy

०५/३९ :

पुरवा सुहानी आयी रे
रीतुओकी रानी आयी रे
मेरे रुके नही पाव नाच उठा सारा गाव
प्रीत पे जवानी छायी रे

०५/४० :

क्ल्यु -
१. जहाँआराची दोन मुलं सोडल्यास म्हातारपणामुळे नाव लक्षात न राहिल्याने तो माणूस आपल्या मुलांना क्रमांकानं ओळखायचा. Wink
२. गाण्याच्या सुरवातीलाच त्याच्या लाडक्या तीन मुलांचे क्रमांक येतात. Wink Proud आणि इथेच ट्विस्ट आहे.
३. जुनं काळ्यापांढर्‍या रंगातल्या सिनेमातलं गाणं आहे. सिनेमा मोडीत गेला असणार बहुधा पण गाणं मात्र अजरामर आहे.
४. पडद्यावर मात्र वाईट्ट परिस्थिती आहे. समजा, भारत भुषणमध्ये भरपूर पाणी घालून अगदी पुळकवणी बनवला तर काय होईल? असा एक नायक. आणि तसंच पाणी घालून पुळकवणी बनवलेली योगिता बालीसदृश नायिका.

मामी, क्लू वाचण्याआधी गाण्यात 'ये जहा, वो जहा' असे काहीसे शब्द असावेत असा संशय आल्याने गुगललं. तर गुगलमहाराजांनी 'सजना मै सदा तेरे साथ हू, ये जहा हो या वो जहा' हे गाणं दिलं. पण दिलेल्या क्लू मध्ये बसत नाही हे

>>भारत भुषणमध्ये भरपूर पाणी घालून अगदी पुळकवणी बनवला तर काय होईल? असा एक नायक

हे अशक्य आहे कारण भाभु म्हणजे अल्टिमेट पुळकवणी Proud

क्लू वाचण्याआधी गाण्यात 'ये जहा, वो जहा' असे काहीसे शब्द असावेत असा संशय आल्याने गुगललं. >> जहा तर आहेच गाण्यात. दोन्-दोन आहेत. Wink Proud

०५/४० :

एक तेरा साथ हमको दो जहां से प्यारा है
तू है तो हर सहारा है

पडद्यावर मात्र वाईट्ट परिस्थिती आहे.>>>>अगदी अगदी Happy माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक. पण फक्त ऐकायलाच आवडतं. Happy
गाणं नितांत सुंदर आहे (ऐकायला). Happy

जिप्सी, .... जियो! तुला एक बर्फाचा रंगित गोळा. Happy

०५/४० :

"आज आपको बताना ही पडेगा की आपके इतने सारे बच्चों मे आपका सबसे प्यारा कौन है|", जहाँआरा आज ऐकतच नव्हती. आज या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचाच असा तिनं पणच केला होता. त्याला कारणही तसंच होतं. प्रचंड इस्टेटीचा मालक असलेला तिचा मियाँ आता आयुष्याची शेवटची घटका मोजत होता. त्याच्या चार बायका आणि पंधरा मुलं यांच्यात आता त्याची संपत्ती वाटली जाणार होती. मुख्य म्हणजे त्याच्या तीन कंपन्यांचा ताबा कोणाकडे जाणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती. त्यानं मृत्युपत्र केलं होतंच पण 'आतली बातमी' कोणालाच अजून माहित नव्हती. तो मेल्यानंतरच ते मृत्युपत्र वाचलं जाणार होतं.

जहाँआरा त्याची सगळ्यात लाडकी आणि सगळ्यात लहान बायको. तिला दोनच मुलं - जहाँगिर आणि जहाँपनाह. आपली दोन मुलंच आपल्या नवर्‍याची सगळ्यात लाडकी अवलाद असून त्यांच्याकडेच त्या कंपन्यांचा ताबा येईल - निदान यावा - असं जहाँआराला वाटणं साहजिकच होतं. म्हणूनच ती आज त्याच्या पायाशी बसून आर्जव करत होती.

एरवी आपल्या लाडक्या बेगमेचं मन कधीही न मोडणारा मियाँ मात्र या बाबतीत अगदी ठाम होता. व्यवहार तो व्यवहार. आपल्या पंधरा मुलामुलींच्यातून आपल्या तीन कंपन्या उत्तम रितीने पुढे चालवू शकतील अशी तीन मुलं त्यानं आधीच हेरून ठेवली होती आणि त्यांनाच या तीन कंपन्यांचा ताबा मिळणार होता. लाडक्या पत्नीच्या आग्रहास्तव त्याने शेवटी ही 'आतली बातमी' जहाँआराला दिलीच.

कोणतं गाणं म्हणून????

उत्तरः
१, १३, ७ हमको दो जहाँ से प्यारा है

सिनेमा: वापस, गायक-गायिका: रफी, लता. नायक-नायिका (हे राम!): अलका आणि अजय सहानी (म्हणे. बरं असू द्यात.)

मामी Proud

सिनेमा: वापस>>>>मामी, चित्रपट छान आहे. Happy

रच्याकने, हे एक गाण आणि "जनम जनम का साथ है तुम्हारा हमारा" हि दोन गाणी माझ्याकडे असलेल्या लता/रफीच्या कॅसेट मध्ये लागोपाठ वाजायची. Happy दोन्ही आवडती गाणी. Happy

त्याच्यात अजुन एक गाणं होतं "तेरे संग जीना तेरे संग मरना, रब रूठे या जग छूटे हमको क्या करना"
चित्रपटः नाच उठे संसार
पडद्यावरः शशी कपूर आणि हेमा मालिनी Happy

हो काय? मी कधी नावंही ऐकलं नव्हतं. कौटुंबिक जिव्हाळ्याचा असेल असं वाटतंय त्या सात्विक नायक नायिकेला पाहून.

मामी, बर्‍याच दिवसानी आलो इथे. मस्त वाटलं.

तूला जहाँ आरा आठवतोय ? माला सिन्हा आणि भारत भूषण होते ? मदनमोहननी एकसे एक गाणी दिली होती.

मै तेरी नजर का सुरूर हूँ ( तलत ) किसीकी याद मे ( रफी ) हाले दिल यू उन्हे ( लता ) ए सनम आज ये कसम ( लता तलत ) शुक्रिया है हुजूर ( रफी सुमन ) वो चुप रहे ( लता ) जब जब उन्हे भुलाया ( लता आशा ) .. तलतची आणखी एक दोन आहेत.. अगदी संग्रही ठेवावीत अशी गाणी आहेत सर्व.

०५/४२
मयेकरांना थंडगार मॅंगोमिल्कशेक Happy

०५/०४२ छुपनेवाले सामने आ छुप छुप के मेरा जी न जला
सूरज से किरण बादल से पवन कब तलक छुपेगी ये तो बता

०५/४२

इतिहास संशोधक राजवाड्यांना पक्की खबर होती कि सुरींदर कौर यांच्याकडे पानिपत युद्धाच्या काळातला एक अस्सल दस्तावेज आहे. सुरींदर कौर यांचे पूर्वज मराठी होते हे त्यांना माहीत होते आणि त्याचा त्यांना अभिमानही होता. पण पानिपतातील पराभवामूळे ते तिथे राहिले याची खंतही होती. त्यामूळे त्यांनी तो रेशमी लखोटा कधीच कुणाला दाखवला नव्हता.

राजवाड्यांना तो हवाच होता कारण त्यामूळे त्यांचे संशोधन पुर्णत्वाला गेले असते.

आता नावावर जाऊ नका, राजवाडे आणि सुरींदर दोघेही तरुण होते. त्यामूळे राजवाड्यांनी आपला चार्म वापरायचे ठरवले. आधी बरीच फोनाफोनी / डेटींग / चॅटींग करुन त्यांनी सुरींदर कडून वचन मिळवलेच.
कुणालाही न कळवता, एकांतात, रात्री उशीरा एखाद्या बागेत भेटलास तर तो दस्तावेज देईन.. असे सुरींदर ने सांगितले.. तर ते कुठल्या गाण्यात ?

मामीसाठी फारसे कठीण नाही Happy

०५/४२ क्लू - १

या चित्रपटाच्या नायकाने आपल्या प्रत्यक्ष पत्नीबरोबर आणि नायिकेने आपल्या प्रत्यक्ष पतिसोबत, चित्रपट केले आहेत. त्यांच्या काळातले असे क्वचितच अभिनेते आणि अभिनेत्री असतील, कि ज्यांनी या दोघांसोबत चित्रपट केले नसतील.

क्लू - २

या चित्रपटातील बहुतेक सर्व गाणी लोकप्रिय झाली होती. आजही आहेत.

Pages