सॅलड, कोशिंबिरी, रायते फॅन क्लब

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 9 February, 2011 - 07:29

येथे सॅलड/ सलाद, रायते, कोशिंबिरीच्या समस्त फॅन्सचे स्वागत आहे! Happy

आपल्या आवडत्या सॅलड्स, वेगवेगळ्या कोशिंबिरी, चवदार रायत्यांची रसभरीत वर्णने करायला ही जागा खास तुमच्यासाठी! आहारातील हा प्रकार आरोग्यासाठी चांगला आणि चव, रंग, स्वाद ह्यांचीही मेजवानीच!

तुमची आवडती, हमखास किंवा जरा हटके सॅलड्स, त्यांना वापरता ती ड्रेसिंग्ज, रायते-कोशिंबिरींची माहिती इथे शेअर करा. काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा. कोणकोणत्या भाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये इत्यादीचे कॉम्बिनेशन वापरून तुम्ही ते पदार्थ बनवता तेही सांगा.

सॅलडच्या माबोवरच्या काही पाकृ इथे आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यम्मी वाटतोय हा आंब्याच्या रायत्याचा प्रकार! यंदाच्या आंब्याच्या सीझनमध्ये अवश्य करण्यात येईल! Happy

पनीर चाहत्यांसाठी : भिजवून उकडलेले छोले / काबुली चणे, पातीचा कांदा, टोमॅटो व पनीरचे क्यूब्ज यांचे मस्त सॅलड तयार होते. त्याचे ड्रेसिंग म्हणजे लिंबाच्या रसात शेंदेलोण, पादेलोण, चाट मसाला, भाजलेल्या जिर्‍याची भरड पूड... आणि वरून भरपूर कोथिंबीर! पनीर मात्र शक्यतो ताजेच घ्यावे.
अजून ह्यात सिमला मिरची बारीक चिरून घालता येते. काहीजण ओले खोबरेही घालतात.

माझ्या आवडीचे ग्रीक सलाद लिहिले का मी इथे ? कधी कधी माझासाठी शाकाहारी म्हणून हा एकच पदार्थ असतो हॉटेलमधे !
यासाठी फेटा चीच लागते. हे फेटा चीज खूपच खारट असते. याचे कमी खारट व्हर्जन मिळते. हे चीज बकरीच्या दूधापासून करतात. त्याची चव वेगळीच असते.

तर या सलादसाठी, या चीजचे क्यूब, टोमॅटो, सलाद ग्रीन, काकडी, बेसिल, सिमला मिर्ची, काळे ऑलिव आणि थोडेसे क्रीम एवढेच लागते. मीठ लागतच नाही. हवी तर मिरपुड.
हे दिसतेही छान आणि लागतेही छान.

दिनेशदा, माझ्या ग्रीक सॅलॅड च्या रेसिपीप्रमाणे मी, तुम्ही लिहीलेल्या पदार्थांव्यतिरीक्त पातळ चिरलेला लाल कांदा, ऑलिव्ह ऑईल आणि थोडे बाल्सामिक व्हिनेगर घालते. क्रिम नाही घालत. मी ही शाकाहारी असल्यामुळे बाहेर गेले की मलाही हे सॅलॅड खायला आवडत Happy

हा इतका सुंदर धागा आज बघितला! मस्त आहेत सॅलडच्या आयडिया.

हे एक सोप्पं जर्मन सॅलड ... यात पालक सोडून बाकी सगळ्या पदार्थांना मी ऑप्शनल ठरवलंय Wink Happy

पालक चिरून घ्यायचा. त्यात थोडे आक्रोड भरड कुठून घालायचे (आक्रोड नसतील तर दाण्याचं कूट चालेल). एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल (मी असलं तर घालते, नाही तर त्याशिवाय.) आंबटपणासाठी थोडं व्हिनेगार घालायचं (किंवा लिंबू पिळायचं), मध घालायचा (किंवा साखर), चवीला मीठ घालायचं. सॅलड तयार!

एवढ्या सुंदर-सुंदर रेसिपीज बघितल्या अन एकदम जाणवलं की ह्यात एक तोंपासु पदार्थ नाहीचे!
तो म्हणजे, पेरुची कोशिंबीर

साहित्यः
अर्थातच पेरु, खूप पिकलेले नकोत, पण अगदी कच्चेही नकोत. २ चालतील.
घट्ट गोड दही, आणि थोडं सायीचं दही
साखर
डाळिंबाचे डाणे (हे घात करु शकतात Wink )
हवंच असेल तर चवीपुरतं मीठ

तर,
पेरु बारिक किसणीवर किसून घ्या, जेणेकरून त्यातल्या बिया दाताखाली येणार नाहीत!
त्यात हवी ती कन्सिस्टंसी येईल इतकं दही मिसळा, साखर सुद्धा चवीनुसारच घाला, गोडमिट्ट लागू नये म्हणून आवश्यकता वाटल्यास कणभर मीठ घाला..आणि वरुन मस्तपैकी डाळींबाचे दाणे घाला/ओता! Wink
थोडा वेळ फ्रिज मध्ये ठेऊन चिल्ड सर्व्ह करा/समाचार घ्या!

अतिशय सुरेख अशा पिस्ता रंगाच्या ह्या कोशिंबीरीत गुलाबी/रक्तवर्णी डाळींबदाणे अप्रतीम दिसतात आणि तितकेच भन्नाट लागतात!

करून बघितलीत तर रिव्ह्यु नक्की द्या!

ऑफिसच्या कॅफेटेरियात केलचं सॅलड मिळतं. केल कच्चा कधी खाल्ला नव्हता. पण भारी लागतं हे सॅलड.

बारीक चिरलेली केलची पानं, वॉलनट्स, पार्मेझान चीझ, काळी मिरी पावडर, मीठ. त्यात रँच पण घालतात थोडं असं माझा अंदाज आहे.

इथे आणखी एक रेसिपी सापडली केल सॅलडची : http://www.simplyrecipes.com/recipes/raw_kale_salad_with_balsamic_pine_n...

ऑफिसमध्येच मिळणारं मेक्सिकन सॅलड: टोमॅटो, ब्लॅक बीन्स, भाजलेल्या मक्याचे दाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, पातीचा कांदा आणि आमचं नशीब चागलं असेल त्या दिवशी अ‍ॅव्होकाडोच्या फोडी हे सगळं लिंबाचा रस लावून लेट्युसच्या बारीक चिरलेल्या पानांवर लेयर्स करुन देतात. सगळ्यात वर किसलेलं मेक्सिकन चीझ. ग्रिल्ड चिकन पण असतं. सोबत साल्सा, सावर क्रीम आणि चिप्स. मला सावर क्रीम आवडत नाही म्हणून मी ऑऑ, मीठ, मीरेपूड असं घालून घेते. हे पण भारी लागतं.

मिरची, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा हे सगळं बाsssरीक चिरलेलं असतं.

घरी केलं तर मी त्यावर चिमूटभर टॅको सिझनिंग भुरभुरते. चांगलं लागतं.

फ्रेंच इन्स्पायर्ड सॅलड

उकडलेले किंवा ओव्हन मधे रोस्ट केलेले बीट रूट, सोलून , पातळ चकत्या करून .
अरुगुला, किंवा स्प्रिंग मिक्स सॅलड धुऊन , निथळून.
शिजवलेले काबुली चणे ( कॅनमधले पण चालतील). मी कधी कधी एडामामे पण घालते.

दोन जणांच्या सॅलडसाठी ड्रेसिंग
१-२ अँचोव्ही फिले कुस्करून
एक लसूण पाकळी किसून
मीठ, मिरपूड,
लेमन ज्यूस एक टेबलस्पून
ऑऑ २-३ टेबलस्पून .

अँचोव्ही फिले एका बोलमधे घालून काट्याने अथवा चमच्याने नीट मॅश करून घ्यावा.
त्यात लसूण, मीठ मिसळून घ्यावे. लिंबाचा रस घालून मिसळून घ्यावे. शेवटी ऑ ऑ घालून परत नीट मिसळून घ्यावे. चवीपुरती मिरपूड घालावी.
सॅलडची पाने, बीट, चणे एकत्र मिसळून घ्यावे, त्यावर ड्रेसिंग ओतून नीट मिसळून घ्यावे.
असे सिमिलर अँचोव्ही ड्रेसिंग घालून( त्यात अँचोव्ही दुधात भिजवा वगैरे आहे ) पार्स्ली- बीट- काबुली चणे असे सॅलड फ्रांसमधे प्रसिद्ध आहे ( म्हणे ). मला पार्स्ली आवडत नाही. शिवाय अँचोव्ही दुधात भिजवणे वगैरे पण मला पटले नाही. म्हणून हे माझे बदल.

अरे वा! बर्‍याच दिवसांनी हा बाफ वर आला.

इंदौरला जिरावन पावडर विषयी बरेच ऐकले होते, तिथे चाट, सॅलड, रायता इत्यादींपासून ते अगदी फोडणीच्या पोह्यांपर्यंत बर्‍याच पदार्थांवर जिरावन पावडर शिंपडून खातात. त्याची रेसिपी तरला दलालच्या साईटवर मिळाली. आता घटक पदार्थ समजल्यावर इंदौरच्या नातलगांना तिथून जिरावन मसाला पाठवायला सांगितलाय. Happy

ते जीरावन आंबटगोड फळं-ज्युस, साबुदाणा खिचडी, गराडु, प्लेन बटाटा चिप्स, दही-ताक यावरही चांगलं लागतं.
पण तरला दलालची रेसिपी ऑथेंटिक वाटत नाहिये. गरम मसाल्याची चव नाही लागत जिरावनमध्ये..

मस्त धागा अकु! Happy
मला सगळा धागाच सेव्ह करायचाय.. सगळ्या रेस्पी लग्गेच पहाता येतील असा. क्या करुं?

निवडक १० मध्ये नोंदवलेस की लगेच लिंक मिळेल. Happy

नताशा, अजून चव घेतली नाहीये जीरावनची. थँक्स, तो मसाला मिळाला की तू दिलेल्या समस्त पदार्थांवर त्याचा प्रयोग करून पाहण्यात येईल! Happy

माझं आवडतं सॅलॅड

दोन कांदे एक टोमॅटो अर्धी कैरी थोडी कोथिंबीर एक हिरवी मिरची
यात थोडं लिंबू पिळून लाल तिखट मीठ टाका
थोडं पाणी सुटल्यावर यात इंडियन राईस क्रिस्पीज (चुरमुरे Wink ) भाजलेले डाळे आणि शेंगदाणे टाका.
मिसळा.
इंडीयन साल्सा विथ क्रिस्पी राईस सॅलॅड तयार!
काही लोक याला सुकी भेळ म्हणतात. Wink

यावर वरून कच्चे तेल टाकले तर कच्चा चिवडा म्हणतात.

बाकी सगळं तसंच ठेऊन दाण्यांऐवजी दाण्याचं कूट आणि क्रिस्पीज ऐवजी भाजलेल्या पापडाचा चुरा घातल्यास पापडाचा खुडा म्हणतात. Happy

आज ऑफिसमध्ये किन्वा आणि ब्लॅक बीन्स सॅलड होतं. शिजवलेला किन्वा, ब्लॅक बीन्स दोन्ही मिक्स करुन त्यात मीठ आणि लिंबाचा रस असावा फक्त. वरुन कांद्याची पात बारीक चिरुन. मी थोडं पेप्पर घालून घेतलं. चांगलं लागलं.

परवा कुठंतरी एक सॅलड रेसिपी वाचली. त्यात कांदा, टोमॅटो, गाजर, कोबी, काकडी इत्यादी पदार्थ बारीक चिरून / किसून त्यात मोड आलेले हिरवे मूग, चिरलेली कोथिंबीर, आमचूर पावडर, तिखट (आवडत असल्यास) यांबरोबर कैरीच्या लोणच्याचा खार मिसळायला सांगितला होता चक्क! Uhoh चव चांगलीच लागत असणार! हवं तर भाजलेला पापड / चिप्स/ तळलेला बटाट्याचा कीस घाला असेही सांगितले होते. मला वाटतं लोणच्याचा खार घालण्या ऐवजी हवं असेल तर तयार लोणचे मसालाही भुरभुरू शकतो.

सध्या आमच्याकडे पुदिना-रायत्याचा सपाटाच सुरू आहे. किती सोप्पं आणि कसलं चविष्ट रायतं आहे.

जितकी हवा तितकी पुदिन्याची पानं (स्वच्छ धुऊन), उगाच नावापुरती अर्धी हिरवी मिरची, मीठ आणि भाजलेल्या जिर्‍याची पावडर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायची. नीट वाटलं जात नसेल तर चमचाभर घट्ट दही त्यातच घालून बारीक वाटायची. जास्त दही मिक्सरमध्ये घालू नका ते पातळ जातं. मग हे वाटलेलं मिश्रण दह्यात घालून व्यवस्थित घोटून घ्यायचं. झालं.

पाहुण्यांवर इम्प्रेशन वगैरे मारायचं असेल, कॅलरी जास्त खाण्याची तयारी असेल किंवा एकदा चवीकरता म्हणून त्यात थोडं फ्रेश क्रीमही घालून बघा.

पुदिना-रायत्याचा >>>>> हे सगळे व्हेज-नॉन्व्हेज कबाब्,तंदुर, टिक्का ह्या प्रकारासोबत मस्त लागत...यम्म्म ..

मामी, गेल्या आठवड्यात एकांकडे पुदिना रायत्यात उगाच जरा किसलेली काकडी घालून काकडीची कोशिंबीर म्हणून पानात वाढली होती!! Proud चांगलं लागत होतं... त्यात जरा बुंदी, कोथिंबीर, जलजीरा पावडर किंवा चाट मसाला घातला तर आणखी वेगळी चव येईल असं वाटून गेलं.

हे असेच घरी असलेल्या पदार्थांपासुन बनवलेले एक सॅलेड. याचे वैशिष्ट म्हणजे यात इडली चे तुकडे तव्यावर परतून क्रुटॉन्स म्हणून वापरले आहेत. ड्रेसिंग सोया सॉस आणि मधाचे.

Salad.jpg

हे किन्वा सॅलड मी मागच्या आठवड्यात ट्राय केलं होतं इंटर्नेट वरून. सिंडी म्हणते तसं ब्लॅक बीन्स होत्या घरात पण घालायचा आळस केला. बाकी कॉर्न, ब्लॅक ऑलिव्हज, काकडी, ग्रेप टोमॅटो, कांद्याची पात, किंचित गार्लिक पावडर आणि लिंबू, मीठ, मिरी इतकच.

QuinoaSalad.jpg

दोन्ही सॅलड्सचे फोटू मस्त आहेत!

सध्या उन्हाळ्यात काही खायचे म्हटले की असे गारेगार सॅलडचे प्लॅटर समोर असावे असेच वाटते!

आईशप्पथ... सॅलड गुरु आहेत इथे.
मी एक साधीच कोशिंबीर करते - (कांद्याची कोवळी पात + लसणीची कोवळी पात(थोडी चवीला) + कोथिम्बीर ) - चिरून + दही, ठेचून मिरची, दाण्याचं कूट, मीठ, साखर(हवी तर) --> छान मिसळून ठेवायचं.
हे करून ठेवलेलं बघितलं तर लेक येताजाता खाऊन संपवतो.
म्हणून उरलं तर वाढायच्या वेळी चिरून बीट, आणि/किंवा मक्याचे उकडलेले दाणे. फार उत्साह असला तर तुपाची जिर्‍याची फोडणी. बीट आधी घातलं तर सगळच लालेलाल होतं.

अजून एक गंमत - (बेडेकर वगैरे कुणाचंही हिरव्या मिरचीचं लोणचं आणलेलं असतं. पावेक बाटली लोणचं मिक्सरमधून काढून बाटलीत भरून ठेवते फ्रीजमधे. )
बीटाची, काकडीची, बुंदी किंवा तत्सम दह्याची कोशिंबीर असेल तर त्यात झेपेल तितकं(च) घालायचं. मस्तं झणझणित चव येते... कसली ते सांगितल्याशिवाय कळत नाही Happy
पास्त्यात तर हमखास घालते मी.

दाद, लोणच्याची आयडिया मस्त!

माझी आई मिरचीचं लोणच आणि दही कालवून त्यात उकडलेला बटाटा कुस्करून झटपट रायतं करायची Happy

वॉव.. दाद.. लोणच्याची आयडिया भारीये..
नाहीतरी एव्हढ्या मोठ्या बाटल्यातली लोणची दोन जणात खाऊन स.न्पत नाहीत कधीच... ये आयडिया मस्तये.. Happy

Pages