मराठी लोकांचे हिंदी....

Submitted by दक्षिणा on 20 November, 2009 - 03:06

जुन्या मायबोलीवर एक धमाल धागा होता, त्यातले काही अस्सल किस्से इथे संदर्भासाठी...
शिवाय त्याची ही लिंक
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/85214.html?1223306531 -
----------------------------------------------------------------------
बाई : ए लिंबं कशी दिली रे?
भाजीवाला : बहनजी २ रुपैय्ये का ५
बाई : इतना महाग काय को देता हय? वो कोपरे का भैय्या देड मे ५ देता हय.
भाजीवाला : बहनजी वो खराब माल बेचता है.
बाई : हां मेरे को शेंडी मत लगाओ, पिछली बार यहां से लिया था तो उसमे से २ किडा हुआ निकला था.
भाजीवाला : आज का माल अच्छा है बहनजी, चलो २ रुपैये का ७ लेलो,
बाई : हां, बराबर मोजा क्या?
------------------------------------------------------------------------
आमचे काका केबल वाल्याला तक्रार करतात
हमारे टिव्ही मे मुंगी मुंगी दिखता है...
------------------------------------------------------------------------
आमच्या समोरच्या फ्लॅटमधली बाई एकदा दुधवाल्याला म्हणाली "भैय्या हमारा एक लिटर
दूध तुम्हारे अंगपर है..."
-----------------------------------------------------------------------
घरमालक : सोनावनेजी आपका भाडा देनेका बाकी है.

सोनावने : अरे देता तो है ना, डुबवतंय काय? तुम्हारा डुबवके हमको क्या चैन मिलने वाला
हय? पण जरा तुम हमारी परिस्थिती हाय का नाय काय बघतंय का नाय? का नुसता उठसूठ
भाडा मागताय? हमारी परिस्थिती भी जरा बघो ना.......

घरमालक : लेकिन वो पिछले महिने का भी......

सोनावणे : अरे बाबा पिछले महिने हम वो पोळा सण के लिए गाव कू गया था ना...

घरमालक : पोळा???

सोनावणे : तुमको पोळा नै मालूम? उस दिन नही क्या वो बैल के शिंग को रंग लगाते है,
बैला के पाठिपर झूल टाकता है... तुम्हारे गाव मे नही होता है क्या...?

घरमालक : नही. इस महिने का तो देना ही पडेगा..

सोनावणे : ऐसा क्या? तो जरा अंदर आवो घर के. ये तुमने हमारे घर मे बांबु लगाया, कितना
बांबु लगाया, हमारा घर केवडा और तुम्हारा बांबु केवढा, अब हमारे घर में जब पावना लोग आता
है तो झोपनेकू जगा नही मिलती.. जगा नही मिलती तो कुछ पावना बांबु को टेकता है, वो बांबु को
टेकता है तो, उपर से माती गिरता है, हमारी मंडळी के कानानाकमें जाता है, वो तुम नीट करो पयले.

घरमालक: ???????
---------------------------------------------------------------------------
अजून शोधून लिहिन.... तो पर्यंत तुमचे लिहा...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी मराठी कलीग एका हिंदी भाषिक कलीग ला..
१) तु ऑफीसको इतनी अच्छी कार लेके आता है अब तुझे पगारवाढ मिलने से रही.
२) तु वो काम करके दे मुझे वो आज ही चेकना है.

टीममधल्या एकाने मुलाच्या बर्थडेला सर्वाना बोलावले होते. शाकाहारींसाठी पावभाजीचा बेत होता. मित्राची बायको चांगलीच सुगरण होती. अमेरिकेत मिळतात ते बर्गर बन्स पावभाजीसाठी चांगले नसतात म्हणून तिने पावसुद्धा घरीच ओव्हनमध्ये बेक केले होते आणि ते उत्कृष्ट झाले होते.
आमच्यातल्या एकाला ते पाव भारीच छान झाले आहेत असे सांगण्याची इच्छा झाली. तो वदला : "भाभीजी आप के पाव भारी हो गये है"

आमच्यातल्या एकाला ते पाव भारीच छान झाले आहेत असे सांगण्याची इच्छा झाली. तो वदला : "भाभीजी आप के पाव भारी हो गये है">>>>>> आईशप्पथ Proud त्याला खरा अर्थ माहित आहे का? Proud

"भाभीजी आप के पाव भारी हो गये है">>>>>> आईशप्पथ फिदीफिदी त्याला खरा अर्थ माहित आहे का? फिदीफिदी>>>> +१००००० Rofl

आ\\च्या ओफिस मधे एक मुअगा साउथच्या मुलाला म्हनला
:: अरे तुम्को पता है क्या अप्रिल के पाउस् को क्या बोलते है
: ऊस्को वळिव का पाऊस बोलते है

एक बाई रिक्षात बसून जाते. रिक्षावाला तिला एका ठिकाणी सोडतो. तेव्हाचा संवाद (एक समस) :
रिक्षावाला:मॅडम आगया आपका चौक.
बाई:अरे जरा आगे वो झाड के पास छोडो ना.
रिक्षावाला:मेरेको इधर से टर्न मारना है, भाभी
बाई: अरे मेल्या जरा पुढे छोडा तो तुम्हारा रिक्षा झिज जायेगा क्या? Proud

थोडेसे उलटे

माझी मैत्रीण मारवाडी आणि पहिलीपासून बारावी पर्यंत परदेशात वाढलेली त्यामुळे अर्थातच मराठीची बोंब. तिच्या तोंडची काही वाक्ये
माझा डोका दुखतो Proud
माझी कानं गार पडलीत Proud
मला मोद्कं (मोदकचे अनेकवच) आवडतात Proud

लेक सध्या हिंदी बोलन शिकूनच सोडणार मोडमधे आहे. १) वो चुकके दुसरी गल्लीमें गया २) अरे वो महत्वाका कागद हय Happy

vaibhavayare123... & बागुलबुवा !

हाथी कीचड में लोट रहा था |

आमचे एक मराठी मित्र बदली होउन दिल्लीला आले होते . . . . पावसाळा मे इदर एकदम सब लोग कुछ भी नहि पेहेन्ते ? ( त्यांना म्हणायचं होतं " बारिश के दिनोंमें लोग कोई रेनकोट या ऐसाहि कोई पहनावा क्युं नहि पहनते ? ).

तसंच . . . . जम्हाई ला जमाई ( जांभई ! ! ! ! ).

खाँसना . . . . खोकना.

हिचकी . . . . उचक्की.

खाना खाना . . . . खाणा खाणा.

बॉस चिल्लाता है . . . . बॉस जोरसे बोंबलता हय.

काल घरी जाताना भाजी खरेदी करुन झाल्यावर एका दुसर्‍या कामासाठी परस्पर जायचं असल्याने भाजीची पिशवी ओळ्खीच्या दुकानवालीकडे ठेवायला गेले. ती भाभी खुर्चीत बसुनच पिशवी घेत होती म्हणुन मी "भाभी खडी रहो. पिशवी जड है". तिला काहीच प्रॉब्लेम नव्हता पण मला मात्र ह्या धाग्याची आठवण आली. Happy

एकदा माझा मित्र म्हणाला होता......
" उस झाड पे एक कावळा बैठा था !"

मराठी लोकांच्या अशा प्रकारच्या हिंदीला गुलाबी हिंदी म्हणतात म्हणे ...खरं है का हो??

मागे अण्णा हजारेंचं एक स्टेटमेंट ऐकलं होतं..
" ये सरकार चालढकल क्यूं कर रही है?"

एकदा माझा मित्र म्हणाला होता......
" उस झाड पे एक कावळा बैठा था !"

मराठी लोकांच्या अशा प्रकारच्या हिंदीला गुलाबी हिंदी म्हणतात म्हणे ...खरं है का हो??

मागे अण्णा हजारेंचं एक स्टेटमेंट ऐकलं होतं..
" ये सरकार चालढकल क्यूं कर रही है?"

माझ्या लेकाला आंब्याला हिंदीत आम म्हणतात हे नवीनच कळले.
नंतर एकदा 'आपल्याकडे खूप आंबे आणि फणस आहेत' या वाक्याचं भाषांतर त्याने असे केले
'बहुत आम और फन है हमरे पास!'

साक्षी

एवढ्यातच उत्तरांचलच्या ट्रीपला गेलो होतो. सतत हिंदी बोलावे लागल्यामुळे बर्‍याच गमती जमती झाल्या.
नवरा आमच्या गाडीवाल्याला-" ये जो दगड है ना, इसका क्या युज करते है?" ...गाडीवाला, " अ‍ॅ...क्या चीज...? " परत एकदा तोच प्रश्न!....मी म्हटले, "पत्थर...पत्थर...." तेव्हा उलगडा झाला Happy

त्याला हल्लीच हे बदल झालेत का असे विचारायचे होते. नवरा म्हणतोय "हालातमेही हुवा है क्या ??" ( त्याला हालही में म्हणायचे होते) Lol

Pages