मराठी लोकांचे हिंदी....

Submitted by दक्षिणा on 20 November, 2009 - 03:06

जुन्या मायबोलीवर एक धमाल धागा होता, त्यातले काही अस्सल किस्से इथे संदर्भासाठी...
शिवाय त्याची ही लिंक
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/85214.html?1223306531 -
----------------------------------------------------------------------
बाई : ए लिंबं कशी दिली रे?
भाजीवाला : बहनजी २ रुपैय्ये का ५
बाई : इतना महाग काय को देता हय? वो कोपरे का भैय्या देड मे ५ देता हय.
भाजीवाला : बहनजी वो खराब माल बेचता है.
बाई : हां मेरे को शेंडी मत लगाओ, पिछली बार यहां से लिया था तो उसमे से २ किडा हुआ निकला था.
भाजीवाला : आज का माल अच्छा है बहनजी, चलो २ रुपैये का ७ लेलो,
बाई : हां, बराबर मोजा क्या?
------------------------------------------------------------------------
आमचे काका केबल वाल्याला तक्रार करतात
हमारे टिव्ही मे मुंगी मुंगी दिखता है...
------------------------------------------------------------------------
आमच्या समोरच्या फ्लॅटमधली बाई एकदा दुधवाल्याला म्हणाली "भैय्या हमारा एक लिटर
दूध तुम्हारे अंगपर है..."
-----------------------------------------------------------------------
घरमालक : सोनावनेजी आपका भाडा देनेका बाकी है.

सोनावने : अरे देता तो है ना, डुबवतंय काय? तुम्हारा डुबवके हमको क्या चैन मिलने वाला
हय? पण जरा तुम हमारी परिस्थिती हाय का नाय काय बघतंय का नाय? का नुसता उठसूठ
भाडा मागताय? हमारी परिस्थिती भी जरा बघो ना.......

घरमालक : लेकिन वो पिछले महिने का भी......

सोनावणे : अरे बाबा पिछले महिने हम वो पोळा सण के लिए गाव कू गया था ना...

घरमालक : पोळा???

सोनावणे : तुमको पोळा नै मालूम? उस दिन नही क्या वो बैल के शिंग को रंग लगाते है,
बैला के पाठिपर झूल टाकता है... तुम्हारे गाव मे नही होता है क्या...?

घरमालक : नही. इस महिने का तो देना ही पडेगा..

सोनावणे : ऐसा क्या? तो जरा अंदर आवो घर के. ये तुमने हमारे घर मे बांबु लगाया, कितना
बांबु लगाया, हमारा घर केवडा और तुम्हारा बांबु केवढा, अब हमारे घर में जब पावना लोग आता
है तो झोपनेकू जगा नही मिलती.. जगा नही मिलती तो कुछ पावना बांबु को टेकता है, वो बांबु को
टेकता है तो, उपर से माती गिरता है, हमारी मंडळी के कानानाकमें जाता है, वो तुम नीट करो पयले.

घरमालक: ???????
---------------------------------------------------------------------------
अजून शोधून लिहिन.... तो पर्यंत तुमचे लिहा...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमची आजी: (त्यावेळी GATT कराराच्या बातम्या तेजीत होत्या)

अरे गेटवाल्या तू गेट करार करके गया, दस दिन हो गये परत तोंड नही दाखव्या. मेरे नातूने तेरे दुकानपर हेलपाटे मारे फिरभी नही आया. गेट लगाता है तो लगा नही तो वो जगह वैसी मोकळी रखेंगे देख.

मराठी पुरोहित - हिंन्दी यजमान .. एक सं"वाद!

प्र'संगः- कुठल्याही होमहवनाच्या कार्यक्रमात येणारा बलीपूजनाचा. (भाताच्या वर कणकेचा दिवा ठेवलेला असतो..तो बली हो..नायतर वाटायचं... असो!)जो बली यजमानावरुन तीनदा दृष्ट काढल्या सारखा ओवाळून बाहेर नेऊन ठेवला जातो,तो हा विधी..परंपरेप्रमाणे हे काम (घर)गडी माणसाकडून होणे अपेक्षित असते...शहरात आंम्ही बिल्डींगच्या वॉचमन लोकांना बोलवायला सांगतो.. अता हिंन्दीची चिंधी'च हताशी असलेल्या मराठी (नवं)पुरोहिताची आणि हिंन्दी यजमानाची ,यात कशी म्याच रंगते ,ते पहा. Wink

बलीपूजा पूर्ण होऊन्,बली ओवाळायची वेळ आलेली आहे...आणि मग...पुढे............

पु:-वॉचमन चाहिय्ये
यः- क्यूं जी!?
पु:- बळी ओवाळना है।
यः- क्या करना है?
पु:- ओवाळना...
यः- ओ वाळना (???)
पु:- बळी का आपके उप्पर से आरती निकालना है।
यः- (काहिसा अंदाज येऊन..) मतलब्,आरती उतारना है..ऐसा क्या?
पु:- ह्हां!
यः- लेकिन वॉचमॅन क्यूं चाहिये?
पु:- ये बलीपूजा की द्येवता क्षेत्रपाल है
यः- फीर?
पु:- क्षेत्रपाल..मतलब वॉचमॅन ही हुवा ना? आज के हिसाब से?
यः- तो???
पु:- तो तो जो आपके क्षेत्र का पालन करता है,वही ये दृष्टी निकाल ने का काम भी करेंगा ना?
यः- क्या???????????? हमारी दृष्टी निकालेगा??? Sad
पु:- दृष्टी मतलब दृष्ट काढेगा , निकालेगा...
यः- (काहिच न कळल्यामुळे ...) लेकिन हमारी दृष्टी अच्छी है,ठीक एकदम।
पु:- (अता वाट्टेल ते करुन गाडी पुढे जायला हवी ..म्हणून) ये वो दृष्ट नही है,ये अंतरात्मा के अज्ञान की दृष्ट निकालते है।
यः- ओह! ऐसा भी होता है क्या ? बुलाओ रे उस वॉचमॅनचाचा को...

पुढे वॉचमॅन येऊन...रीतसर यजमानावरून बलीपूजेचा भाताच्या बळी'वर ठेवलेला कणकेचा दिवा..तीनदा ओवाळून काढून घेऊन जातो.. आणि मग यजमान जागा होऊन..पुरोहिताला

य:- अरे...पंडितजी , इसको तो नजर-उतारना केहेते है.
पु:- हां..हां..वही..वही केहेना चाते थे हम.
यः- ह्हा ह्हा ह्हा .. अब याद रहेगा ये.
पु:- चलो..अच्छा हुवा,आपकी "नजर" से ,हमे "दृष्टी" आ गयी... ह्ही ह्ही ह्ही ह्ही ह्ही ह्ही!
========================
=
to be continue..... Wink

माझ्या मैत्रिणीचा साधारण ३ वर्षाचा मुलगा मराठी - हिंदी ची चटपटीत भेळ करतो . जस - तू मला प्यार करू नको , मी माझी चप्पल पेहाणतो ई .

एकदा आम्ही गार्डनमध्ये गेलो होतो तेंव्हा दुसर्या मैत्रिणीचा मुलगा आगोदरच घसरगुंडीच्या शिडीवर चढून वर गेला , आणि वर उल्लेख केलेला जो होता त्याला त्या उंच शिडी वर चढता यात नव्हते . तर वरचा मुलगा कसा म्हणतो आंटी उसको कडेवर लो ना . Biggrin

हा धागा आज मिळाला खरच हसून हसून वाट लागली. एक असाच किस्सा आठवला.
माझ्या सासर्‍याच घराशेजारी मुस्लिम कुटुंब राहाते. त्यामूळे त्यांच्या हिंदीचा प्रभाव त्यांच्यावर आहे. एकदा माझी सासू पुण्यात आली अस्ता कपडे खरेदी साठि एका दुकानात गेली होती आणि तेथे तिला एक ड्रेस पसंत पडला म्ह्णून त्याची किंमत विचारण्यासाठी दुकानदाराक्डे गेली आणी म्हणाली "ए ड्रेस कत्ते को हे जी" दुकानदार (आश्चर्याने अवाक होवुन ) म्हणाला " भाभीजी ओ कुत्ते के लिए नही इन्सानो के लिए हे "

१)हमारे टिव्ही मे मुंगी मुंगी दिखता है...

२)ऐसा क्या? तो जरा अंदर आवो घर के. ये तुमने हमारे घर मे बांबु लगाया, कितना

बांबु लगाया, हमारा घर केवडा और तुम्हारा बांबु केवढा, अब हमारे घर में जब पावना लोग आता

है तो झोपनेकू जगा नही मिलती.. जगा नही मिलती तो कुछ पावना बांबु को टेकता है, वो बांबु को
टेकता है तो, उपर से माती गिरता है, हमारी मंडळी के कानानाकमें जाता है, वो तुम नीट करो पयले.
>>>>>भारीच लिहिलंय यार...
दोन्हीही मस्तच...अजून हसतीये ....

आज परत वाचलं , जाम हसु आलं
<< ये तुमने हमारे घर मे बांबु लगाया, कितना बांबु लगाया, हमारा घर केवडा और तुम्हारा बांबु केवढा, अब हमारे घर में जब पावना लोग आता
है तो झोपनेकू जगा नही मिलती.. जगा नही मिलती तो कुछ पावना बांबु को टेकता है, वो बांबु को टेकता है तो, उपर से माती गिरता है, हमारी मंडळी के कानानाकमें जाता है, वो तुम नीट करो पयले. >> happy0008.gif

<< आमच्या समोरच्या फ्लॅटमधली बाई एकदा दुधवाल्याला म्हणाली "भैय्या हमारा एक लिटर दूध तुम्हारे अंगपर है..." >>> हे जाम खतरनाक आहे . happy0002.gif

कॉफी मग मध्ये चण्याचे पाकिट उघडून ठेवले होते.
मैत्रिणीने चणे घेऊन ते मग च्या बाहेर टेकून ठेवले.
मी: ऐसे मत रख नही तो चना सांड जायेगा.
मैत्रिण (सिन्हा आहे) कहां है सांड? किधर जायेगा?

१) आजी दूधवाल्या भैयाला
भैया बर्तन घास्या फिर भी कल दूध नास्या.
ग्रामीण मुस्लिम बोली.
२) गफूर भागते भागते आया, धापकन पड्या , गाडगं बी फुट्या, कालवाण बी सांड्या.

Pages