फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही बिल्वदल टिक छान आहे.. मलाही बनवायची आहे, पण सो वर चां पॉ. एका कोल्हापुरच्या मैत्रिणीला सांगितलंय तिकडे मिळतेय का घेऊन ये म्हणून. आंजावर असाच एक सापडलेला फोटो खूपच आवडला म्हणून जतन करून ठेवलाय.

https://lh6.googleusercontent.com/-PFXVACuN9Rw/UWQ8JYZDAsI/AAAAAAAALuE/w...

यातले घुंगरू नसतील तर तितकीशी चांगली वाटणार नाही असं वाटतंय.

खूप छान आहे नेकलेस.
यातले घुंगरू नसतील >>> त्यांना घुंगरु नाही " घागर्‍या" म्हणतात.

मस्त कलंदर, फारच सुंदर आहे बिल्वल टिक.. नांव ही पहिल्यांदाच कळलं.. कोल्हापुर ला मिळतो का कु ठेही , ईझीली ????

बरेच ठिकाणी मिळते..

ही फोटोतली टिक गाडगीळांच्या फेसबुक पेजवरची आहे.. मी एकदा त्यांच्याकडे फेबुवरती चौकशी केली होती, तेव्हापोकळ-लाख भरलेल्या- टिकेला किमान ३० ग्रॅम्स लागतील असं कळालं होतं.. आताच्या बाजारभावाने आणि घडणावळ मिळून लाखभर सहजच लागावेत. म्हणून मग कोल्हापूरला खात्रीचे सोन्याचे पॉलिश दिलेले चांदीचे दागिने मिळतात म्हणून सध्या तिकडे चौकशी चालू केलीय मी.
३० ग्रॅमपेक्षा कमी सोन्यामध्ये होते की नाही याची काही कल्पना आहे का कुणाला इथे?

ह्या बीबीवर भरपुर चर्चा झालेल्या काळ्या नी सोनेरी अनारकलीसाठी मी काल कापड विकत घेतले. अर्बन हाटमध्ये भरलेल्या प्रदर्शनात अतिशय सुंदर कापड मिळाले, फक्त ३०० रु मीटर. Happy टसर सिल्क आणि त्यात थोडे कॉटन मिक्स असे कापड आहे.

मूळ ड्रेससारखा कमरेभोवती चुन्या असलेला ड्रेस शिवणार नाही कारण मला तो प्रकार कधीच सुट झाला नाही. त्या ऐवजी ए-लाईन शिवुन घेईन, बाकी हात, गळा सेम मुळ ड्रेससारखेच. उंची मात्र एवढी नको (परत तेच, मला कदाचित सुट होणार नाही)

ड्रेससाठी टेलरच्या सल्ल्याने ७.५ मीटर कापड घेतले (४५" पन्ना) आणि सोनेरी कापड ३ मी. ड्रेसमधुन चुन्नीही काढुन देईन असे आश्वासन टेलरने दिलेय. Happy चुन्नीवरच्या अ‍ॅप्लिकसाठी टेलरलाच साकडे घालेन, कुठुनतरी मिळव म्हणुन.

कापडासाठी तिनहजार दिलेत, शिवायला नक्कीच हजार जातील.

मुळ ड्रेस रु. ३५,००० चा होता पण प्युअर सिल्कचा होता. त्या तुलनेत हा चार हजाराचा ड्रेस कसा दिसेल ते इथे तुम्हालाही दिसेलच. Happy

इथे तुम्हालाही दिसेलच.
>>
ताई, डरेस शिवुन आणल्याबर्बर लगेच फोटु काढुन टाकायची किरपा करा मंग. Proud

सत्या पॉल चे तीन हजारचे वावचर्स मिळाले म्हणून गेले आणि एक शिफॉन साडी आणि एक क्लच असा पर्स हलकि करण्याचा उद्योग झाला. But I am not complaining Happy

मागच्या ३८ नंबर पानावर वर्षू नील ने जो फोटो टाकलाय hanging earing होल्डरचा तसा काल मिळाला पुण्यात एका mall मध्ये, पण छोटा size , १३०/- ला.

वॉव.. अनु३ , टाक तू ही होल्डर चे फोटो पटकन Happy

खूप दिवसात इथे बाजारांतून नुस्तंच भटकायला गेले नाहीये .. काय काय नवीन आलंय ते पाहायला जायला पाहिजेय... Wink

थंडी,पाऊस कमी झाला कि जाईनच ..

रिया,
मी easyday mall (अभिरूची), सिंहगड रोड मधून घेतला. माझा पण ड्रेस type नाहीये. फक्त तसे कप्पे आहेत.
ह्यात बांगड्या ठेवायची सोय नाही. मग मी earings बरोबर saree पिन्स, safety पिन्स, hair क्लिप्स वगैरे ठेवलं त्यात. bangle होल्डर वेगळा होता १५०/- ला.
DSC01542-001.jpg

मस्त आहे
लवकरच घेणे होईल Happy
आणि स्वस्त पण वाटतय...

लोक्स पीएनजी ने वारली डिझाईन्स मध्ये दागिने आणलेत
पाहीले का कोणी?
(मला नाही आवडले.. पण बर्‍याच जणांना आवडत होते )

वर सगळ्यांनी फोटो टाकलेत तसे माझ्याकडे आहेत वेगवेगळ्या साइझ चे पाउच स्टाइल हँगर वाले ईअर रिंग होल्डर , तुळशीबाग वाले आणि यु एस मधलेही काही .
वर्षु नी फोटो टाकलाय तसा स्सेम लिट्ल ब्लॅक ड्रेस शेप्ड पण आहे (बेड बाथ बियाँड मधून घेतलेला )पण समहाउ माझ्या कडे असलेल्या इअर रिंग्स साइझ -पॅटर्न्स ला अजिबात नाहीच जमत त्यातला एकही होल्डर :(.
उगीच गर्दी जमवली मी होल्डर्स ची !

फक्त वारली डिझाइन्स नाही दिसली मला. आदिवासी , नॉर्थ-इस्ट भागातल्या जमाती यांचे ट्रॅडिशनल दागिने सोन्यामध्ये आहेत.
मला डिझाइन्स आवडली त्यांची. पण सोन्यात घ्यायला नाही आवडणार. बरीच डिझाइन्स कॉपर किंवा चांदीमध्ये जास्त छान वाटली असती असं वाटलं मला.

मला डिझाइन्स आवडली त्यांची. पण सोन्यात घ्यायला नाही आवडणार. बरीच डिझाइन्स कॉपर किंवा चांदीमध्ये जास्त छान वाटली असती असं वाटलं मला.
>>>
अगदी अगदी!
हेच म्हणूनच मला नाही आवडली ती डिझाईन्स!

Pages