Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40
पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वत्सला, ही सगळी स्ट्रीट फूड
वत्सला, ही सगळी स्ट्रीट फूड थीम आहे , मग ह्याबरोबर तवा पुलाव मस्त वाटेल. किंवा फ्राईड राईस.
रिसोटोला मॅच होईल असे हवे तर
रिसोटोला मॅच होईल असे हवे तर इटालियन सॅलड करावे, insalata caprese करू शकता किंवा सीझर सॅलड .
मंजूडी लोकसंख्या ऐकून टीम ने
मंजूडी लोकसंख्या ऐकून टीम ने बेत कॅन्सल केला
रिसोटो बरोबर पास्ता मिंट
रिसोटो बरोबर पास्ता मिंट सालाड पण मस्त लागते. मॅकरोनी आणि पायनापल बिट्स/ अॅपलचे चौकोनी तुकडे इत्यादी. मी हे पिज्झा हट मध्ये खाउन मग घरी बनविले होते त्यामुळे तिथे रेशिपी मिळेलच. ब्रुशेटा आणि मिन्स्ट्रोन सूप पण मस्त लागेल. तिरामिसू डेझर्ट बनवा.
मेधा, अ.मा. धन्यवाद. रेसोटो
मेधा, अ.मा. धन्यवाद. रेसोटो बरोबर पास्ता सलाडच करायचे अस ठरवलय... तिरामिसू करणार आहे.
वडा पाव सोबत आणखी खायला
वडा पाव सोबत आणखी खायला करायचं तर काय करावं.
एकदम सोप्पं हव संध्याकाळी एक कुटूंब येतंय
सोप्पं....वडा पाव तिखट अथवा
सोप्पं....वडा पाव तिखट अथवा चमचमीत असेल तर त्या सोबत दही भात ( मस्त चरचरित तुपाची फोडणि विथ कडिपत्ता) आणि तळलेले पापड
अथवा काकडिची दह्यातली कोशींबीर, आणि मसालेभात अथवा पुलाव
Aabhar Rimjhim...mi ek Paneer
Aabhar Rimjhim...mi ek Paneer starter pan kartey Karan gharat Paneer aahe
कुणालातरी उपयोगी पडेल म्हणुन
कुणालातरी उपयोगी पडेल म्हणुन w/e ला ४ फॅमिलीसाठी अगदी झटपट केलेला बेत लिहिते.
आंब्याच पन्हं (अॅपल सॉस वापरुन)
स्वीट कॉर्न सुप
पाव भाजी
शेव दही बटाटा पुरी
रवा इडली (इंस्टंट मिक्स (घरी केलेले पुर्वी) वापरुन)
एव्हरेस्ट मसाला वापरुन व्हेज बिर्याणी (मस्त झालेली)
दुधीचा हलवा
मलई कुल्फी
एक्स्ट्रा अॅपेटायझर असावेत म्हणुन मांचुरिअयन विकत आणलेल.
मेनू दिसताना खुप दिसतोय पण साधारण ४/५ तास लागले करायला.
सगळ्यांना प्रचंड आवडला.
क्या बात है, सीमा! जमलेला बेत
क्या बात है, सीमा! जमलेला बेत दिस्तोय. शेअर केल्याबद्दल थांकु.
ते इंस्टंट मिक्स कसं केलंस? आणि इडल्यांबरोबर काय होतं?
कुल्फी, हलवा आधी करून ठेवता येइल. मस्त!
अगदी झटपट केलेला बेत - साधारण
अगदी झटपट केलेला बेत - साधारण ४/५ तास लागले करायला.
सीमा, एक लहान बाळ आणि एक मोठी लेक दोघांना सांभाळून एवढं सगळं केलंस.. धन्य आहे तुझी.
सीमा जबरी मेन्यू.
सीमा जबरी मेन्यू.
मेन्यू वाचून बाप रे! झालं
मेन्यू वाचून बाप रे! झालं ..
>> आंब्याच पन्हं (अॅपल सॉस वापरुन)
आंब्याचं पन्हं केलं की सफरचंदाचं?
मेन्यू वाचून बाप रे! झालं
मेन्यू वाचून बाप रे! झालं ..
>> बाप रे मला पण झालं सशल पण मी ते दाखवलं नाही
बायांनो , दुधी हलवा , मलई
बायांनो , दुधी हलवा , मलई कुल्फी दोन दिवस अगोदर केलेली. (कुल्फी मुलीसाठी केलेली. तीच पाहुण्यांना दिली.)
एव्हरेस्टचा मसाला वापरुन बिर्याणी १० मिनिटात होते. करुन बघा.
फक्त पावभाजीला वेळ लागतो. पण (अलिकडे) सगळ साहित्य कुकर मध्ये घालून तीन शिट्ट्या काढते. बाहेर काढुन बटर, मसाला वगैरे घालते. पावभाजी तयार.
खरच झटपट बेत आहे.
माझ्या मुलाचा ३ रा वाढदिवस
माझ्या मुलाचा ३ रा वाढदिवस बागेत करायचा विचार चालु आहे तर काय बनवू सुचत नाहिये म्हणजे न्यायला सोपे, काही सान्डायला नको , पोटही भरले पाहिजे, ग्रिलवर गरम कसे करायचे आणि व्हेज पाहिजे, त्यात दहि वडा ,भेळ समोसा, पावभाजीप्,पिझ्झा , छोले पुरी नको कारण इतर दोन ठिकणी झाले आहे. मुले साधरण ३-५ वयाची आहेत. साधरण एकुण ४० लोकासाठी करायचे आहे. सोबत काही मैत्रिणीचि मदत घेईन म्हणते आहे कारण इथे काही विशेष इडियन रेस्टारट नाहीत ,कहि तरि starter, lunch आणि desert हवय. कॄपया मदत करा.
वीना पत्की, गार्डन थीम आहे
वीना पत्की, गार्डन थीम आहे म्हणून स्टार्टरसाठी पाणीपुरीचा विचार करा (हे तुम्हाला न्यायला/ द्यायला कितपत सोपे पडेल माहिती नाही.) किंवा कॉईन साईज इडल्या आणि चटणी/ ढोकळा/ कसल्यातरी तिखट वड्या इत्यादी.
लंच म्हणजे वन डिश मील टाईप काही न्यायचंय का?
डेझर्ट - फ्रेश फ्रूट्स कस्टर्ड.
पुरण पोळी आणि कटाच्या आमटी
पुरण पोळी आणि कटाच्या आमटी बरोबर इतर मेनु सुचवा.पुलाव्/मसाले भातपण करण्याचा बेत आहे.
पुरण पोळी आणि कटाच्या आमटी
पुरण पोळी आणि कटाच्या आमटी बरोबर इतर मेनु सुचवा.पुलाव्/मसाले भातपण करण्याचा बेत आहे.
अबोली मसालेभात करत असाल तर
अबोली मसालेभात करत असाल तर मठ्ठा ठेवा जोडीला.. बाकी नेहेमीचे यशस्वी कलाकार उकडलेल्या बटाट्याची भाजी, मटकी उसळ, काकडीची कोशिंबीर्,आंब्याचं लोणचं, ओल्या नारळाची चटणी,वरण भात, कुर्ड्या किंवा भजी तळून.
वीना घरून ग्रिडल घेऊन जाणार
वीना घरून ग्रिडल घेऊन जाणार आहात का ? घरून ग्रिडल नेणार असाल तर दाबेली चांगला ऑप्शन आहे. घरून दाबेली तयार करूनच न्यायची. आयत्या वेळी ग्रिडल वर थोडी शेकायची. किंवा छोले टिक्की नेता येईल. छोले नको असतील तर नुसती आलू टिक्की (ही पण आयत्या वेळी ग्रिडल वर थोडी शेकता येईल.) त्यावर हिरवी आणी गोड चटणी , कांदा, जिरेपूड्,तिखट, चाट मसाला घालून पण छान लागते., ढोकळा किंवा पापडी चाट, तवा पुलाव , दह्यातलं रायतं, डिझर्ट्ला केक... मुलांसाठी ह्या सगळ्या डिशेस माईल्ड करता येतील किंवा चालत असेल तर पिझ्झा. वेगवेगळी मेलन्स कट करून ठेवता येतील. क्रॅकर्स आणी चीजची प्लॅटर ठेवता येईल,
आप्पे न्या तिखट आप्पे, गोड
आप्पे न्या
तिखट आप्पे, गोड आप्पे, आयत्या पिठाचे आप्पे....
तिखट आप्प्यांबरोबर चटण्या, गोड आप्प्यांबरोबर आईस्क्रिम/ चॉक सॉस/ स्ट्रॉबेरी सॉस...
धन्यवाद prady
धन्यवाद prady
१८ मोठ्या लोकांसाठी (२५ ते ६५
१८ मोठ्या लोकांसाठी (२५ ते ६५ वयोगट) केळवणीसाठी मेनु सुचवा. पारंपारिक मेनु नको आहे.
साक्षी.
टोमॅटो सूप, छोले-भटुरे / पुरी
टोमॅटो सूप, छोले-भटुरे / पुरी - मिक्स व्हेज, तवा पुलाव, बुंदी रायता, कैरीची चटणी, सुरळी वडी / शेव-दही-बटाटा-पुरी, सॅलड, आईसक्रीम.
धन्यवाद अरुंधती! छान आहे
धन्यवाद अरुंधती! छान आहे मेनु! थोडा बदल करून
टोमॅटो सूप, पुरी - मिक्स व्हेज, तवा पुलाव, दही वडे, कैरीची चटणी, शेव-दही-बटाटा-पुरी, सॅलड, मायबोली फेम. आंब्याचा शिरा
बरा वाटतोय का?
साक्षी.
छान होईल मेनू.
छान होईल मेनू.
२४ पुरण पोळ्यांना किती कप डाळ
२४ पुरण पोळ्यांना किती कप डाळ घ्यावी लागेल?पटकन सांगा प्लीज.
एक अबोली, असं सांगंणं कठिण
एक अबोली, असं सांगंणं कठिण आहे. माझं माप म्हणजे, एक आमटीची वाटी दाळीचे पुरण दोघांना आरामात पुरते. पोळीचा साईझ काहिहि असु दे. सोबत मसाले भात, कढी आणि कोशिंबीर, पापड हे असताना हे माप बरोबर होतं.
सीमाने दिलेला मेनु मी कल्पनेत
सीमाने दिलेला मेनु मी कल्पनेत सुद्धा करु शकत नाही. दोन पदार्थांमध्ये मासाहेब गारद होतात
Pages