निसर्गाच्या गप्पा (भाग-१३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 March, 2013 - 12:06

निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्‍या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.

निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानुषी गोडु फोटोज...
सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा... (जिप्स्या गुढी चा फोटो जरूर टाकणे.. Happy )
कौतुक आणी अभिनंदन करण्याबद्दल धन्स मित्रांनो
काल दुपारी झोपेत असताना बीजिंग हून फोन आला माझ्या मोबाईल वर आला.. बीजिंग मधे हिंदी रेडियो स्टेशन सुरु झालंय.. तिथे एक भारतीय मुलगीच व्यवस्था बघते. तिला चीन मधे राहणार्‍या इंडिअन्स ना गाठून इंटर्व्यूज
घ्यायचे आहेत. क्वांग चौ मधे मी ओल्ड टायमर असल्याने इथल्या काँसुलेट ने माझा नंबर दिला तिला.
तिने या ११,१२ वर्षातले कडू,गोड, गमतीदार अनुभव, भाषा, प्रथा, जेवण, सोशल लाईफ, कल्चर, इंटरअ‍ॅक्टिंग विथ लोकल्स, मेडिकल हेल्प, समाजात होणारे बदल अश्या आणी इतर अनेक विषयांवर प्रश्न विचारले. एक अर्धा तास चालली मुलाखत. तिला ऑडियो क्लिप ची लिंक पाठवायला सांगितले आहे.. ती मला मिळाल्यावर इथे शेअर करीनच.. Happy

वर्षू, लवकरात लवकर मुलाखत टाकणे.... नाहीतर.................
|
|
|
आम्हाला खास मुलाखतीबद्दल मुलाखत घ्यावी लागेल !

वर्षूतै हार्दिक अभिनंदन!!!............हे खास तुझ्यासाठी आमच्या बागेतून......:स्मित:

IMG_2609.JPG

आमच्या रस्त्यावर एक गंमत आहे. दोन बाजूंना समोरासमोर करंज आहेत. आमच्या बाजूचा आहे तो निळा-जांभळा आहे आणि समोरचा गुलाबी!! ...........खरंतर करंजाचा फुलोरा पानांच्या पिसार्‍यात पटकन कळत नाही. आणि याला नवी पालवी आणि मोहोर एकदमच येतात. नजरेत भरते ती तेलमाखली तजेलदार कोवळी पालवी!!

IMG_2625.JPG

आणि हा कुंडीतला पुदीना..........

IMG_2618.JPG

जागु आणी शांकली...................... धन्स्स्स्स्स्स्स........... सुंदर सुंदर फुलं , खास तुमच्या बागेतली............ वॉव.. मी सो लक्की Happy
दिनेश दा.. Happy

वर्षू ताई आणि आम्ही लकी आहोत की तुझ्यासारखी मैत्रीण आम्हाला मिळालेय. Happy

हे खरवतीचे झाड. ह्याची पाने छोटी असतात. ह्या झाडाचा उपयोग फळ्या वगैरे करण्यासाठी पण करतात. ह्या झाडाच्या खोडालाच सुरंगीप्रमाणे पण कमी प्रमाणात फुले येतात.

ह्या फोटोत खरवतीच्या झाडावर करंज्याची पाने आहेत. ब

ही खरवतीची पाने.

वॉव.. जागु , तुझ्याकडून नित्य नवीन नावं कळत असतात..
शांकली पुदिना मस्त आहे फ्रेश ग्रीन.... आणी करंजा किती गोड रंगाचा आहे.. वॉव..

करंजाचा सडा पडलेला असतो, तो किती देखणा दिसत असेल !

सध्या आमच्याकडे रोज संध्याकाळी अशी चित्रकला रंगते.

इथे पण क्रेपची फुले दिसतात.

सध्या आमच्या कॉलनीत एका भल्या मोठ्या बागेचे काम चालू आहे.
सुंदर रचना आहे. मग तिथले फोटो टाकतो.

जवळ जवळ २० दिवसांनी आले. आता कुठे सगळे वाचून - पाहून झाले. नेहमीप्रमाणेच सगळे वाचनीय, बघणीय आणि लक्षात ठेवण्यासारखे.....

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!!!

ताडाच्या झाडाला लागलेल्या ताडगोळ्याच्या पेंडी. ह्याच्या काही आठवणी लिहायच्या आहेत. सवड मिळाल्यावर लिहीते.

वर्षुताई, मुलाखत ऐकण्याची उत्सुकता आहे गं. लवकर टाक.

(रात्र संपायच्या आत) नववर्षाच्या शुभेच्छा!!!


(स्थळ : अपरडेक, लोणावळा)

आभाळा चे रंग कसले सुर्रेख आहेत, तासन्तास पाहातच बसावसं वाटत असेल ना ,दिनेश दा...
क्रेप च्या कळ्यांना चिमटीत दाबून अवेळी फुलवण्याचा कार्यक्रम केलाय लहानपणी Uhoh
मुंबई ला पहिल्यांदा ताडगोळे खाल्ले होते तेंव्हा वेडच लावलं होतं त्यांच्या आगळ्या चवीनं
मामी,जागु सुंदर शुभेच्छा..
मामे.. अगं, मलाच अजून नाही पाठवलीये तिने लिंक.. मला मिळाल्यावर लग्गेच टाकीन गो!!! Happy

सध्या इथे थंडी आणी पावसाचा जोर्र सुरुये.. एप्रिल मध्यावर आहे तरी स्वेटर, हीटर मधून बाहेर पडता येत नाहीये..

सचिन / स्_सा - तू दिलेली साईट अतिशय मस्त आहे - आता वरवर पाहिली, हळूहळू सर्व काही वाचेनच...

इथे सर्वांकरता ही साईट दिल्याबद्दल मनापासून धन्स...

मामी, ते अपरडेक लोणवळाअ का लिहिलेस गं??.... मी इतकी सुंदर रांगोळी घालण्याची कल्पना तुझ्या डोक्यात आल्याबद्दल मनातल्या मनात तुझ्या सुपिक डोक्याचा हेवा करत होते ना.......

जागु, मस्त आहे तुझी गुढी. आमच्या गावीही अशीच पाटावर गुढी उभारतात.

जागू - तू वरती जे खरवतीचे झाड म्हणते आहेस ते हेच आहे का ??

<<< Common name: Hairy Fig, devil fig, opposite-leaved fig-tree, rough-leaved fig • Hindi: Marathi: बोकेडा bokeda, बोखाडा bokhada, बोखेडा bokheda, धेड उंबर dhed umbar, काळा उंबर kala umbar, करवती karavati • i
Botanical name: Ficus hispida Family: Moraceae (Mulberry family)
Synonyms: Ficus oppositifolia, Ficus compressa, Covellia hispida >>>>
- http://flowersofindia.net/ यामधून साभार.

बाकी गुगलून काही मिळत नाहीये, तुझ्याकडे इतर काही माहिती असल्यास देणे - खरवतीची...

वा काय सुरेख फोटो आहेत सगळ्यांचे.

्शांकली मस्त फुलं

जागू हे नवीनच झाड कळलं आज, आणि ताड पण मस्त, गुढी पण छान आहे आता थोड्याच दिसतात पुण्यात

दा सुंदर फोटो आणि क्रेप फुलं

मामी रचना छान आहे फुलांची

माझ्या पण शुभेच्छा सर्वाना, या ४ ओळी

गुढी पाडवा घेउन आला
वर्ष नवे हे आपले
सुखात जावो पुर्ण होऊनी
स्वप्न मनी जे जपले

gok.jpg

मामी, ते अपरडेक लोणवळाअ का लिहिलेस गं??.... मी इतकी सुंदर रांगोळी घालण्याची कल्पना तुझ्या डोक्यात आल्याबद्दल मनातल्या मनात तुझ्या सुपिक डोक्याचा हेवा करत होते ना.......

>>>>>> साधना, तेवढं वाचू नकोस की गं. Proud

दा, करंजाच्या फुलांचा सडा पडतो, पण फुलं खूप चिन्नी मिन्नी असल्यामुळे आणि कोमेजून खाली पडल्यामुळे खूप असा अ‍ॅट्रॅक्टिव्ह नाही दिसत. पेल्टोफोरमचा खूप सुंदर दिसतो. आत्ताच आमच्या नव्या मनीच्या पिल्लाला डॉ. कडे नेऊन आणलं. त्यांच्या क्लिनिकच्या लेनमधे बहावा, नीलमोहोर (झकारांदा), गुलमोहोर आणि पेल्टोफोरम हारीनं फुलले होते. काय दृष्य दिसत होतं ते!! सह्ही!! मनावर कोरलं गेल्यासारखं झालं. आणि एक दयाळ त्याच्या शेपटीचा पंखा करून त्याच्या विशिष्ट आवाजात दुसर्‍या दयाळाशी भांडत होता (भांडतच असावा, कारण त्याचा आविर्भाव तसाच होता.)

आकाशातली चित्रकला अप्रतिम!! आणि क्रेपची फुलं तिकडेपण आहेत हे बघून बरं वाटलं. किती नाजूक आणि देखणी असतात ती!! ही झुडुप तामण (गुळमेंदी) असावी. पानं छोटी आहेत.

मामी आणि जो_एस, तुम्ही दिलेल्या रांगोळ्या फार सुंदर आहेत!! कल्पकतेला सलाम!!

जागू, ताडगोळे घरचे का? फोटो सही आलाय!

शांकलीचा फ्रेश फ्रेश पुदिना, जागूचे ताडगोळे ,सर्वांच्या रांगोळ्या, शुभेच्छा मस्त!दिनेशदांच्या किलांबीचें कलर्फुल आकाशही.
मला सध्या दोन गोष्टी कराव्याश्या वाटताहेत.
१)खराटे करण्याची कला शिकावीसं वाटतंय! २) बंब पेटवून गरम पाणी घेण्याची हवा नाहीये. पण मग चूल पेटवून स्वयंपाक करावासा वाटतोय!......................काय म्हणता निगकर्स?
इतक्या झावळ्या पडताहेत. परवा तर एक प्रचंड मोठी झावळी गराजवर पडून अ‍ॅस्बेस्टॉस शीटचा तुकडा पडला.
त्या उरापोटावरून(मी नाही....हे काम शरद करतो.) उचलून नुस्त्याच फेकून द्यायच्या जिवावर येतं.
तसं तर काही झावळ्या हपिसातला एक स्टाफ घरी नेतो. त्याने आमच्या हपिसातच एक धारदार कोयता ठेवला आहे. झावळीचे बरोबर जळणयुक्त भाग काढून स्कूटरवरून घरी नेतो. चुलीवर अंघोळीचे पाणी तापवत असावेत.
नॅचरल रिसोर्सेस खूप वाया घालवतोय असं एक फीलिंग आलंय!

फुलांच्या रांगोळ्या सुरेखच.

मानुषी, झावळ्यातून हिर वेगळे काढायला एक धारदार साधन वापरतात आणि सुर्र्कन हिर वेगळा होतो. ते हत्यार वापरायचा सराव हवा नाहीतर अंगठ्याला इजा होते. पण एकेक हिर काढणे तसे कठीण नाही. अंगठ्याचे नख मात्र मजबूत पाहिजे. नाहीतर साधा चाकू वापरायचा. हिराचा झाडू घट्ट विणून जरा तिरकस बांधावा लागतो नाहीतर झाडताना सगळे हिर बाहेर पडतात.
हिराचा आणखी एक उपयोग करण्यासारखा आहे. उन्हाळ्यात कलिंगड वगैरे खाताना फोडी उचलण्यासाठी !
कोकणात त्याच्या झापा विणतात. ती कला मात्र नीट बघितल्याशिवाय जमणार नाही. इको फ्रेंडली असे छप्पर तर होतेच पण न्हाणीसाठी आडोसा, तसेच मातीच्या भिंतीवर पावसाची झड लागू नये म्हणूनही त्या वापरतात.
मालवणातले नाटकाचे थिएटर, या झापांनीच बंदीस्त केले होते.

साठवून ठेवायची सोय असेल तर पावसाळ्यात ते बंबासाठी वापरता येईल.

हिरांचा अगदी कोवळा भाग असतो त्याचा जुडगा करुन, डोश्यासाठी तव्यावर तेल लावण्यासाठी वापरता येतो. या हिरांचा घट्ट जुडगा करुन केरळमधे मशाली सारखा वापरत असत. हलवला नाही तर तो विझल्यासारखा होतो पण धुमसत राहतो नंतर परत झटकला कि पेटतो. तिथल्या कथकली नाचातही चुडते म्हणून हीर वापरतात. केरळ हि नावानेच नारळाची जमीन. तिथे या झाडाचा हरप्रकारे उपयोग होतो. करवंटीपासून केलेली आणि वर सोन्याची कलाकुसर असलेली अंगठी मी बघितलीय.

हो शांकली, गुलमेंदी असेल. अजून झाडे लहानच आहेत. मला गलीव्हर झाल्यासारखे वाटतेय, कारण पिंपळासकट सगळी झाडे उंचीला माझ्याच एवढी आहेत. आमच्या कॉलनीतच निलगिरीची वेगळी जात लावलीय. तिच्या पानांचा वास आपल्या निलगिरीसारखा नसून चक्क ओडोमॉस सारखा आहे. न्यू झीलंडला मी भडक केशरी आणि भडक गुलाबी फुले आलेली निलगिरी बघितली होती. हिला कुठल्या रंगाची फुले येतील, त्याचा विचार करतोय.

Pages