निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.
निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय
ससा सुंदर फुल आहे. हे घ्या.
ससा सुंदर फुल आहे.
हे घ्या.

जागू, झाडाला चप्पल बांध.. नजर
जागू, झाडाला चप्पल बांध.. नजर लागेल.
ससा.. मस्त फोटो !
दिनेशदा पुर्वी आमच्या पपईला
दिनेशदा पुर्वी आमच्या पपईला नेहमी चप्पल लावलेली असायची. लिंबाला पण लिंब येत नव्हती म्हणून लावायचे.
आणि पडवळाचे तर काय वेगळेच. पडवळ मुद्दाम दारासमोर लावले जायचे नजर लागावी म्हणून नजर लागली की जास्त येतात असे म्हणतात.
गॉश.. जास्त पडवळं यावी
गॉश.. जास्त पडवळं यावी म्हणून..
कुछ भी ना....
कैर्या यम यम... माझी आठवण काढून खा तिखट मीठ लावून ..
स-सा .. सुंदर रंग आहे फुलाचा ..
आज माझी पण हजेरी. ही पहा
आज माझी पण हजेरी.

ही पहा माझ्या बाल्कनी मधली फुले.
आहाहा कुची खुप सुंदर फुले
आहाहा कुची खुप सुंदर फुले आहेत.
शोभा कुठे गडप झालेय??
दिनेशदा तुम्ही मागे पामच्या फळांबद्दल बोलला होतात. आमच्या पामला ही फळे आता धरली आहेत. ती सुपारी एवढी होतात. हिच का ती?

हो जागू, हिच फळे ती. कुचि,
हो जागू, हिच फळे ती.
कुचि, तजेलदार फुलांवरुन, झाडांची किती काळजी घेतली जातेय ते जाणवतेय.
आभरी आहे मी निसर्गाच्या
आभरी आहे
मी निसर्गाच्या गप्पा चे सगळे भाग वाचते नेहमी. जागु आणी दिनेशदा, तुमची खुप मोठी फॅन आहे मी. 
मला वाटलं कुठे तरी उत्तर असेल
मला वाटलं कुठे तरी उत्तर असेल पण नाहीच...

साअंगा ना कोणीतरी शाकंलीच्या प्रश्नाचं उत्तर..
झुरळांचा आणि डासांचा खरचच काय उपयोग असतो निसर्गाला?
ती झुरळं किमान मेल्यावर थोडुसं खत तरी बनत असतील पण डासांचा काय उपयोग?
का असतात ते
नामशेष का होत नाहीते?
तिकडे सुर्य एवढा मोठा दिसतो
तिकडे सुर्य एवढा मोठा दिसतो काय?? अर्थात फोटोत कदाचित दिसत असेल पण मला खालच्या स्कायलाईनच्या अंदाजावरुन सुर्य खुप मोठा वाटला.
रिया डास नाशक डासांमुळे बनवले
रिया डास नाशक डासांमुळे बनवले जात त्यामुळे व्यापार, रोजगार मिळतो.
हल्ली डासांच्या बॅटही निघाल्या आहेत. हे संशोधन केवळ डासांमुळे शक्य झाले. म्हणजे अजुन व्यापार वाढला आहे.
कुचि
(झाडावर चढले)
ही माहेरची लिलीबाय.

हल्ली डासांच्या बॅटही
हल्ली डासांच्या बॅटही निघाल्या आहेत. हे संशोधन केवळ डासांमुळे शक्य झाले. म्हणजे अजुन व्यापार वाढला आहे>>
हे बाकी बरोबरे. 
रिया अगं, डेंग्यु पण होतो ना त्यांच्यामुळे, कसाब म्हणुनच गेला कि (असे म्हणयचे ना, कि तो खरे तर फाशी नाही डेंग्युने मेला :डोमा:) असो.
डास हे बेडकाचे आणि झुरळं हे
डास हे बेडकाचे आणि झुरळं हे पालींचे खाद्य आहे बहुतेक.
कुची पहिली एन्ट्री मस्त! छा
कुची पहिली एन्ट्री मस्त! छा आहे बाग तुझी.
जागू माहेरची बाय मस्त.
कामानिमित्त राळेगण सिद्धीला
कामानिमित्त राळेगण सिद्धीला जाण्याचा योग आला. तर थोडं माणसांचा वावर बराच कमी असलेल्या ठिकाणी हे
काळवीट आणि हरीण दिसले. आधी रिलॅक्स होते. मग चाहूल लागल्यावर नर उठून आमच्याकडे पहात उभा राहिला. मी जशी पुढे जात राहिले तसे ते निघून गेले.
काळविट मस्तच, जागू लिलीबाय पण
काळविट मस्तच, जागू लिलीबाय पण छान
साधना, फोटोत मोठा दिसतोय
साधना, फोटोत मोठा दिसतोय नाहीतर आपल्याकडे दिसतो तेवढाच दिसतो.
डासांची अंडी / कोष हे दुसर्या माशांचे अन्न आहेच. नर डास हे रक्त पित नाहीत आणि ते चतुरांसारख्या इतर किटकांचे अन्न आहेत. माणसांची संख्या बेसुमार वाढल्याने, त्यांना जास्त रक्त उपलब्ध झालेत. शिवाय सांडपाण्याची डबकी करुन आपण त्यांच्या वाढीला प्रोत्साहन देतोय. मलेरियाच्या जिवाणूंचे ते वाहक असल्याने,
त्यांच्यासाठी ते आवश्यक आहेतच.
सध्या एवढी माहिती आहे, अजून काही निसर्गाची गुपितं असतीलही..
माणसाचा निसर्गाला काय उपयोग आहे, ते मात्र गूढ आहे
(No subject)
मानुषी, या काळवीटावर जणू मादी
मानुषी,
या काळवीटावर जणू मादी आणि पिल्लांची जबाबदारी असते. त्यामूळे धोका भासला तरी ते पळून जात नाहीत.
आणि असे पळून जाणे कुटूंबप्रमुखाला शोभतही नाही. नाही का ? हे मत माडगूळकरांचे आहे.
स_सा, हे हा आहे कि ही ?
स_सा, हे हा आहे कि ही ? आपल्याकडे विवाहमंडळ आहे म्हंटलं !
जागू, मोना डास हे पालींच आणी
जागू, मोना

डास हे पालींच आणी डासांची अंडी हे माश्यांचं अन्न आहे हे पहिल्यांदाच कळालं
बर अजुन एक
ही माहीती प्रचंड अपुरी आहे याची पुर्ण जाणिव आहे तरी हा प्रश्न विचारतेय .......
मागच्या महीन्यात मी निगडीतल्या दुर्गा टेकडीवर एक अतिशय देखणा पक्षी पाहिला...
पांढरा शुभ्र, प्रचंड चपळ, आकाराने तस मोठाच होता...
त्याची शेपुट आपल्या हाताएवढी लांबलच्क होती आणि डोक्यावर एक मस्त पांढरा तुरा होता...
बाकी शरीर कावळ्या एवढं असेल आकाराने... चांगला कॅमेरा जवळ नसल्याने फोटो काढता आला नाही.
कोणी काही माहीती देऊ शकेल का?
कुची मस्त फुलं जागू मस्त आहे
कुची मस्त फुलं
जागू मस्त आहे लिली, पाम तेल असतं तेच हे पाम का?
मानुषी जबरीच आहेत फोटो, नशीबवान आहात असे पहायला मिळाले.
स_सा, हा मस्त आहेत फोटॊ
कोणी काही माहीती देऊ शकेल
कोणी काही माहीती देऊ शकेल का?<<< हा स्वर्गीय नर्तक
asian paradise flycatcher male
http://www.arkive.org/asian-paradise-flycatcher/terpsiphone-paradisi/ima...
स_सा, हे हा आहे कि ही ?
स_सा, हे हा आहे कि ही ? आपल्याकडे विवाहमंडळ आहे म्हंटलं !
वाईट बातमी ही आहे की आमच्या एसच्या मुळ मालकिणबाई आणि आमच्या एसचा आताचा डॉक्टर यांनी फारच आग्रह केल्याने एसचे ऑपरेशन करावे लागले. आता लग्न जरी केले तरी आमच्या वंशाला दिवा किंवा पणती मिळण्याची आशा मालवली
बाहेरच्या बोक्यांपासुन त्याला वाचवण्यासाठी हे करावे लागले. नाहीतर तो बाहेर जात राहिला असता आणि इतरांबरोबरच्या भांडणात जखमी होत राहिला असता.
जो_एस, ते पाम वेगळं. साधारण
जो_एस, ते पाम वेगळं. साधारण खजूराच्या पानासारखी पण जास्त मोठी आणि हिरवी पाने असतात. त्याला भलामोठा घड लागतो आणि त्यात लाल केशरी रंगाची, साधारण फणसाच्या बियांच्या आकाराची फळे लागतात.
त्या फळांच्या सालीतच खुप तेल असते.
वावावा.. काय फुलं ,काय काय
वावावा.. काय फुलं ,काय काय माहिती..
This is my interview link
This is my interview link with CRI. Click red volume equalizer on top of the text.
http://hindi.cri.cn/901/2013/04/11/1s132968.htm
लिंक उघडली नाही तर मेल आय डी
लिंक उघडली नाही तर मेल आय डी कळवणे.. मेल मधे ओपन होईल
वर्षू - "पढा-लिखा अनपढ" ही
वर्षू - "पढा-लिखा अनपढ" ही टर्मिनॉलॉजी भारीचे ......
खूपच मजा आली ही मुलाखत ऐकताना ......
तुझे बोलणे एकदम सॉफ्ट आहे हां ......
दिनेशदा ही माहिती नवीन आहे.
दिनेशदा ही माहिती नवीन आहे.
वर्षू नील अभिनंदन
आहेत तोवर पाहून घ्या
http://www.maayboli.com/node/42491
हे पहा
Pages