निसर्गाच्या गप्पा (भाग-१३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 March, 2013 - 12:06

निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्‍या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.

निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुंडीत आले बटाटे? मस्तच! Happy एक दिड फुटाच्या कुंडीत होतात का? शाळेत शिकल्याप्रमाणे बटाट्याचा डोळाच लावायचा ना?

दा,.........:स्मित: तो जो सगळ्यात मोठ्ठा दिस्तोय ना तो जेम्तेम १ इंच लांबी-रुंदीचा आहे!! बाकीचे मिमि मधलेत.:फिदी:

होय अश्विनी, आपल्या नेहमीच्या कुंडीत आलेत. मी खरंतर गंमत म्हणून लावले होते. पण या पेक्षा जास्त मोठे नाही झाले ते. आणि बटाट्याला कोंब आलेले होते तेच कापून लावले. जेवढे कोंब (डोळे) लावले तेवढेच आले बटाटे.

जेवढे कोंब (डोळे) लावले तेवढेच आले बटाटे.>>> शांकली, असं कसं? बटाटे तर क्लस्टर मधे येतात नं? म्हणजे एका डोळ्याचं एक झाड आणि त्याच्या मुळाशी अनेक बटाटे?

वा शांकली बाळं छानच आहेत.

हे सुबाभुळ चे झाड. ह्याचा पाला दिसायला चिंचेसारखा असतो. लांब शेंगा येतात. शेंगांतील बिया चॉकलेटी रंगाच्या कलिंगडाच्या बियांच्या आकाराएवढ्या असतात. ह्या बिया पाण्यात टाकून फुगवून त्यांची माळ बनवतात असे लहानपणी ऐकले आहे.

ह्याला चेंडूफळ सारखे पण आकाराने लिंबाएवढे फुल येते. फुलाला मंद सुगंध असतो. ह्याचा पाला गायी-,म्हशींना दिल्याने दुधाचे प्रमाण वाढते.

वॉव कुंडीतले बाळ बटाटे मस्तच..

इकडे मागचे दोन तीन आठवडे पांढर्^या चेरींना फुलं येऊन गेली. तेव्हा बाहेर जाणं झालं नाही. आता लालना येताहेत..
एक झलक...
फोनमधला फोटो आहे...पण थोडि कल्पना येईल..नंतर जमलं तर आणखी फोटो टाकेन.

Cherry1.jpg

शांकली,कुंडीतले बाळबटाटे किती क्यूट दिस्ताहेत.. छान आहे प्रयोग
जागु,सुबाभुळाबद्दल छानै माहिती..
वेके.. एव्हढा लाँग शॉट घेतलायेस.. फुलं काय झाड ही नीट दिसत नाहीये Light 1 Wink
आता छानसे फोटू टाक लौकर लौकर... Happy

मस्त फुले आहेत ती.
माझ्याकडे होती आधी. कमी पाण्यातच छान वाढतात. पाणी जास्त झाले तर त्यांची वीण सैल पडते.

आता आमच्याकडे मस्त पाऊस पडतोय. जसजसा सूर्य वरती सरकतोय, तसतसा सूर्यास्त जास्तच रंगतदार होत चाललात. माझ्या बेडरूमच्या खिडकीतून मस्त नजारा दिसतो. ( टिपलेत काही सूर्यास्त ! )

इथे आल्यापासून म्हणजे एकंदर आफिकेतच उत्तरायण आणि दक्षिणायन फारच छान जाणवते. सूर्यास्ताच्या जागांमधे फार फरक पडतो. शाळकरी मूलांना मुद्दाम या तारखांना ( २२ मार्च, २२ जून, २२ सप्टेंबर आणि २२ डिसेंबर ) सूर्यास्त व सूर्योदय दाखवावेत.
भारतातही ते असतेच, फक्त आपल्याला वेळ नसतो !

शुगोल, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, बटाटे क्लस्टरमधेच येतात. ते जे अगदी पिटुकले दोन बटाटे आहेत ना ते त्यातल्या एका मोठ्या बटाट्याबरोबरच होते. पण हा बहुधा कुंडीत लावल्याचा परिणाम असावा. दिनेशदा म्हणतात तसंच असणार. आणखी एक असंच; मी लसूण पाकळ्या खोचल्या होत्या कुंडीत; त्यांनाही फक्त २-३ च लसूण जोडलेले दिसले. त्यामुळे हा कुंडीत लावण्याचाच परिणाम दिसतोय. पण इतरांकडेही (मानुषी किंवा जागू इ. कडे असंच झालंय का ते बघायला पाहिजे.
जागू, तू दिलेली लिंक मस्त आहे. डॉ.गंधे छानच लिहितात. वास्तुरंग खूपच वाचनीय अस्तो नै!!. उमेश वाघेलाही खूप छान लिहितात.

कुतूहल- डॉ. काव्‍‌र्हर यांची मोलवृद्धी शेती
Value-added agriculture by Dr george washington carver

- अरुण डिके (इंदूर) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
Published: Monday, April 8, 2013

शेतकरी शेतात राबतो, पण आपल्या शेतमालाची किंमत तो कधीच ठरवू शकत नाही. शेतीसाठी ज्या निविष्ठा तो खरेदी करतो, त्यांच्या किमतीवरदेखील त्याचं नियंत्रण नाही. यामुळे बऱ्याचदा पिकाचा उत्पादनखर्च बाजारात ठरलेल्या त्याच्या विक्री-किमतीपेक्षा जास्त होतो. म्हणजे शेती करून शेतकऱ्याला नफा मिळण्याऐवजी तोटाच होतो.
जॉर्ज वॉशिंग्टन काव्‍‌र्हर या आफ्रिकी वंशाच्या अमेरिकन शास्त्रज्ञाने यावर उपाय म्हणून मोलवृद्धी (व्हॅल्यू अ‍ॅडिशन) हा प्रकार शोधून काढला. पिकाची विक्री करण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करून विविध अन्नपदार्थ बनवले आणि ते विकले, तर त्यातून जास्त नफा मिळतो, हे या मोलवृद्धीचे तत्त्व. अमेरिकेतील अलाबामा येथील आफ्रिकीवंशीयांच्या वस्तीतील शेतकऱ्यांना त्यांनी शेंगदाण्यापासून दूध, दही, चीज, क्रीम, कँडी, रंग, पॉलिश असे जवळपास ३०० पदार्थ बनविण्याची पद्धत आणि त्यातून पिकांची मोलवृद्धी शिकवली.
इंदूर येथील आमच्या रंगवासा जैविक ग्राम संस्थेत आम्ही काव्‍‌र्हरने शिकविलेले अनेक प्रयोग केले. घरात वापरतो त्या मिक्सरमध्ये भाजलेले खारे दाणे घातले व त्यापासून पीनट बटर तयार केले. इंदूरच्या बाजारात अमेरिकेतील पीनट बटर ५०० रु. किलोने विकले जाते. इंदूरमध्ये शेंगदाण्याचा भाव ८० ते १०० रुपये किलो इतका आहे. म्हणजे, पीनट बटर घरच्याघरी बनवून शेतकऱ्यांनी विकले तर त्याला तीन ते चार पट फायदा मिळू शकेल. इंदूरच्या पब्लिक स्कूलमध्ये पीनट बटरला भरपूर मागणी आहे.
लाल अंबाडी हे पीकसुद्धा ....

पुर्ण लेख द्यायला हात शिवशिवत आहेत. पण तसे करता येत नाहीत म्हणुन लेखाची झलक.
नक्की वाचा.

रच्याकने - हे लेख महराष्टातील खानदानी नेते काका-पुतणे वाचत नाहित का? धरण व पाण्याबद्दल फालतु कमेंट करण्यापेक्षा शेतकर्‍यांना असे काही सांगुन हुरुप का देत नाहित हे लोक?

इंदूर येथील आमच्या रंगवासा जैविक ग्राम संस्थेत आम्ही काव्‍‌र्हरने शिकविलेले अनेक प्रयोग केले. >>>>> वा, काव्हरकडून स्फूर्ती घेऊन तुम्ही प्रत्यक्ष काम सुरु केलेही ??? या सर्व कामाविषयी/ प्रयोगाविषयी इथे काही लिहिणार का ?? खूप उत्सुक झालो आहे हे सर्व समजून घ्यायला ....

शशांक - संपादित मेसेज परत पहाणार का? अहो तो लोकसत्ते मधे आलेला लेख आहे.
मी एवढी महान नाही. कार्व्हरचा 'क' जरी अंगी आला तरी खुप झाले. कडक सॅल्युट त्या व्यक्तीमत्वाला.

मोनालिप छानच आहे लिंक.. तुझा मेसेज वाचून उत्सुकता लागली होती..
त्या काका पुतण्याच काय सांगतेस.. किती अविचारी... बापरे.. जौ दे.. इथे त्यावर काय बोलू.. Angry

मोनाली तू म्हणतेस ते खरच कार्व्हरची चा क जरी आला तरी पुष्कळ.

वरच्या लिस्ट मध्ये एक होता कार्व्हर हे पुस्तक लिहायचे राहीले. अजुन काही असतील कोणाची नावे असतील तर प्लिज मला विपुत टाका कारण काहीवेळेला मी मोबाईल वरुन वाचते आणि अपडेत करायचे राहतात.

एक होता कार्व्हर हे पुस्तक जेंव्हा हातात घेतले तेंव्हा पूर्ण वाचेपर्यंत सोडावेसे वाटत नव्हते. वाचताना इतका उत्साह वाढला होता की एकही क्षण वाया न घालवता सतत झाडा-पाना-मातीसोबत कार्यरत रहाव अस वाटत होत.

वीणा गवाणकरांच्या एक होता कार्वर मधे अशी अनेक उत्पादने येतात.

----

परवा शांकलीने टाकलेल्या पुत्रंजीवीच्या फुलांबद्दल मी म्हणालो होतो, कधी कधी छोट्या फुलांत आपल्या नजरेला जाणवणार नाही असे सौंदर्य असते, माझ्या कॅमेराने मला हे दाखवले. ( हे झाड तसे साधेच. केवळ लाल पानांच्या शोभेसाठी लावतात. )

हा तूरा पण आपल्या नेहमीच्या बघण्यातला. पण या चक्क कळ्या आहेत.

आणि असे गवताचे तूरे बघितले कि मला, तिसरी मंझिल मधले, ओ मेरे सोना रे सोना, हे गाणे आठवते.
रच्याकने हे गाने सुदानमधेही लोकप्रिय आहे आणि त्यांची काही गाणी या सुरावटीवर आहेत.

दा - वरील सर्व फोटो मस्तच आणि -
<<<असे गवताचे तूरे बघितले कि मला, तिसरी मंझिल मधले, ओ मेरे सोना रे सोना, हे गाणे आठवते.
रच्याकने हे गाने सुदानमधेही लोकप्रिय आहे आणि त्यांची काही गाणी या सुरावटीवर आहेत. >>> हे अग्दी खासच....

अरुण दातेंच्या, या जन्मावर.. मधे इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे.. अशी ओळ येते.
काल आमच्या कॉलनीत भटकताना, तेच गाणे आठवले. आपल्याकडे वैशाखाचा ताप चढायला लागला कि पिंपळाच्या अंगात येते. त्या तापाला वेडावण्यासाठीच जणू तो कोवळ्या तांबूस पालवीने नटतो. आणि मग त्याला
स्वस्थ कसे ते बसवतच नाही. वारा असो वा नसो त्याची सळसळ सुरुच असते. या तांबूस रंगाने याची फुलाची उणीव तर भरुन निघतेच पण उन्हाळ्यात मनालाही गारवा मिळतो.

इथे तर सध्या शिशिराची चाहूल लागतेय. पुढच्या महिन्यात बाओबाबची पण पानगळ होईल, मग पिंपळाला हे अवेळी पिसे का लागले असेल. आकाशाच्या काळ्या पडद्यावर त्याचे नर्तन सुरुच असते..

वारा असो वा नसो त्याची सळसळ सुरुच असते. >>>> अग्दी अग्दी खरंए.... मला माझे लहानपण आठवतंय - पुण्यातील अगदी मध्यवस्तीतील फुले मंडईपासून ३००-४०० मीटरवर गजबजलेल्या शिवाजी रोडवर आमचे एक नातेवाईक रहात (१९६६-७० चा काळ). तेथल्याच त्या रस्त्यावरील पिंपळाची सळसळ ऐकत माझे तास न तास गेलेत - अजिब्बात वहानांची (स्वयंचलित दुचाकी वा चारचाकी ) गर्दी नसलेला शिवाजी रोड हे आताच्या मंडळींना एक आश्चर्यच वाटेल ..... या पिंपळाची अखंड सळसळ ऐकूनच त्याला "चलदल" असे अतिशय सुयोग्य नाव दिलेले आहे.... (डॉ डहाणूकरांनी याचा उल्लेख केलाय)

पाऊस जेव्हा जस्ट सुरु होताना कसा आवाज होतो - थेंब जमीनीवर पडल्याचा- अगदी तस्साच आवाज या सळसळीचा होतो.....
पिंपळ पानाची पिपाणीही मस्तच वाजते...

त्या पानांचा रुंद आकार आणि लांब देठ हे कारण असावे का ? सळसळ या शब्दासोबत नेहमी पिंपळच आठवतो.
आंबा, साग वगैरे पानांची देठे अगदीच तोकडी असल्याने क्वचितच वार्‍याशिवाय सळसळतात.

पिंपळाच्या पानाशी निगडीत अशी एक खास आठवण आहे. मला लहानपणी ३ वर्षांचा होईपर्यंत, "र" चा उच्चार येत नव्हता. आईने कुणीतरी सांगितले म्हणून, पिंपळाच्या पानाची पत्रावळ करून मला गरम तूपभात भरवला होता.. आणि आठवडाभरातच मी "र" उच्चारू लागलो.

हापूस हा कलमी आंबा आहे असे एकाने सांगितले. म्हणजे नक्की काय ? (मला वाटत होते की हापूस ची कोय पेरली की हापूस आंब्याचं झाड येतं).

नुकताच वेळास दौरा झाला. रायगड जिल्ह्यात जांभळे अतोनात लगडलीयत आणि पिकून तयार आहेत. इकडे मुंबईतही यंदा जांभळे कधीचीच पिकून तयार आहेत. जांभळे लवकर पिकली तर पाऊस लवकर येतो हा लोकसमज यंदाही खरा ठरो. दुष्काळ सरो. बळीराजा तरो.

Pages