निसर्गाच्या गप्पा (भाग-१३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 March, 2013 - 12:06

निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्‍या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.

निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निसर्गाच्या गप्पा वाचायला खुप मजा येतीये. मी अजुन सगळी पाने वाचली नाहित पण जसं जमेल तसं वाचीन. माहिती शेअर केल्याबद्दल थन्क्स!

माणसाचा निसर्गाला काय उपयोग आहे, ते मात्र गूढ आहे>>>>>>>>>>>> अगदी सेंट पर्सेंट सहमत. माणसाचा खरंच काहीच उपयोग नसावा...........

स_सा, जागू, कुची सर्वांची फुलं आणि फोटो मस्त. दिनेशदा, आकाशातली उधळण मस्तच आहे.

स_सा, ती मनी सेम टू सेम आमच्या मनी सारखी आहे. त्यामुळे क्षणभर मी फसले.......:स्मित :

मनी सेम टू सेम आमच्या मनी सारखी आहे. <<< तुझीच असेल बघ, आमच्या इथे फक्त ३-४ वेळा हप्ता वसूली साठी येत होती, त्याची परतफेड म्हणून हे पिल्लू आणून ठेवले आहे

वर्षू, इथे ओपन नाही होत आहे लिंक... mp3 करायला हवीय.

जागू, मस्त आहे गुलाब.

स_सा, यंदा कर्तव्य आहे का ? ( मनीला ! )

माझ्याकडे अनेक वर्षांपासून पहिल्या पानावरील प्रचित दाखवलेला ओवा आहे. त्याला कधीही फूल वा फळ आलेले नाही. पान खाल्ले तर ओव्याची चव लागते. भजी केली तर कुरकुरीत होतात पण ओव्याच्या स्वादाचा मागमूसही नसतो. याला पानओवा म्हणतात असे इथेच वाचले होते. तसेच खर्‍या ओवाच्या प्रचि लिंकही दिली होती. ती का डिलीट झाली ते कळले नाही.
खरा ओवा कसा लावतात? ओवा पेरला तर तो रुजून येतो का?

भास्कर, ओवा पेरला तर रुजायला हवा. तो धणे, जिरे, कोथिंबीर, शेपू या वर्गातला असल्याने त्याचे झाड तसेच असते. गाजराला येतात तशीच फुले येतात. पाने साधारण शेपूच्या पानासारखीच असतात.

मामी, यात पांढरा, पिवळा आणि साधारण केशरी असे तीन रंग असतात. वरच्या फोटोतल्या चाफ्याची पाने जास्त हिरवी आणि मोठी असतात. पण एकंदर अवतार सोनचाफ्याचाच. पण याचे झाड किंचीत पसरट आणि दाट पर्णसंभाराचे असते. दादरला रानडे रोडवर कधी कधी असतो विकायला. ( सिग्नलपाशी फुलवाला असतो त्याच्याकडे. )

कवठी चाफा मात्र वेगळा.

जागू, ह्या पानाच्या कुटुंबात सामिल करुन घेतल्या बद्दल आभार.
दिनेशदा, ओवा पेरला तर रुजायला हवा..............पाने साधारण शेपूच्या पानासारखीच असतात<<
मग ज्या ओव्याच्या पानाची भजी बनवतो तो कोणता?

शांकली,
सुमंगल, ते रोप कदाचित बाल्समचंही असू शकेल बरं का. (बाल्सम आपल्या तेरड्याच्या कुळातलंच आहे.)
>> त्याला पांढरी फुले येतात का? आणि ते बाहेर ठेवतात का?

मागची सगळी पाने,गप्पा वाचुन काढल्या, मस्त वाटलं...
जागु,
सगळे फोटो छान, करवंदीच झाड प्रथमच पाहिलं..
दिनेशदा,
ऑर्किडचा फोटो लवकरच टाकतो..(खुप दिवस झाले ना !)

सुमंगल,
तुमच स्वागत आहे,आम्हाला छान छान माहितीही मिळेल

स_सा, यंदा कर्तव्य आहे का << ती मनी आमची केवळ आश्रीत आहे तिचे पिल्लू मात्र घरात चांगले मिसळले आहे

काल टेरेस वर कबूतर पकडत असताना ती चौथ्या मजल्यावरून खाली पडली, मागचा पाय दुखावलाय Sad
त्यामुळे पिल्लावर तिची चिडचिड चालू झालीये.

काल टेरेस वर कबूतर पकडत असताना ती चौथ्या मजल्यावरून खाली पडली, मागचा पाय दुखावलाय >>>> अरेरे - पण मांजरे जेव्हा उंचावरुन पडतात तेव्हा त्यांच्या कानातील केस ते सेन्स करतात - यामुळे त्यांच्या पडण्याची पोझिशन ते पडता पडता बदलून पाय जमिनीवर टेकतील असे होतात, पडताना या पोझिशनमुळे त्यांना त्यांच्या शरीराचा थोडासा पॅराशूटसारखा उपयोगही होतो व त्यामुळे त्यांना दुखापतही फार होत नाही (अर्थातच हे सगळे फ्रॅक्शन ऑफ सेकंद्समधे होते) - मागे डिस्कव्हरी का अशाच कुठल्या चॅनेलवर एक झाडावर (सुमारे ४०-५० फूट उंच) चढलेले मांजर (४ का ८ दिवस तिथेच होते बिचारे) खाली उतरताना (अर्थातच उडी मारुन) ही सर्व माहिती सांगत होते... एवढ्या उंचीवरुन पडूनही हे मांजर वाचले हे वेगळे सांगायला नकोच (इतक्या दिवस खाणे -पिणे नसल्यामुळे डिहाड्रेशन मात्र खूप झाले होते बिचार्‍याचे)
कॅट्स हॅव नाईन लाईव्हज म्हणतात ते खोटे नाही ..... Wink Happy

सुमंगल, बाल्सममधे पांढरा रंग बहुधा नाहीये. किंवा असला तर मी नाही बघितलेला. पण अगदी फिक्कट गुलाबी रंगाची फुलं एकदम बघितलं तर पांढर्‍या सारखी दिसतात. आणि हे कोवळ्या उन्हात पण बाहेरच ठेवतात. कडक ऊन त्याला सहन नाही होत. पण अबोलीचं मात्र असं नाही. तिला ऊन चालतं. निळी अबोली असते पण पांढरी अबोली असते की नाही ते माहीत नाही. त्यामुळे ते रोप नक्की कशाचं आहे ते फुलं आल्यावरच समजेल. Happy

सुमंगल ते ओव्यासारखेच वास असलेले वेगळे झाड आहे. त्यालाही तुरे येतात आणि बारीक बियाही धरतात.
झाडात असे एकमेकांच्या सुगंधाची कॉपी करायची पद्धत आहे.

कदंबाच्या पानाला आयोडीनचा वास येतो. पांढरी जांभळी फुले येणार्‍या लसूणवेलीच्या पानांना लसणाचा वास येतो, तमालपत्राच्या पानात थोडा दालचिनीचा वास येतो, पुदीन्यात तर सफरचंदाची वास येणारी एक जात आहे.

रोज ऑफिसला येता जाता मला २५ किमीचा प्रवास करावा लागतो. आजूबाजूला भरपूर झाडे आहेत पण त्या वेगात नीट निरीक्षण करता येत नाही.
आज गाडी जरा स्लो झाल्यावर मलाही इथे करवंदाची जाळी दिसली., केनयातही असत. इथली करवंदे कच्ची असतानाच लाल असतात.
केनयात आणि युगांडा, टांझानियात तर फणस आणि जांभळेही भरपूर येतात आणि नवल म्हणजे त्या देशांच्या स्वाहिली भाषेतही त्यांना तिच नावे आहेत. ( बहुतेक भारतीयांनीच नेली असावीत. ) इथे नाही दिसली. ( मी भारतातून बिया आणाव्यात काय ? )

नि.गच्या गप्पा अगदि जोरात चालू आहेत.
शोभा ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ............... शोभा कुठे गायब झाली ? Wink

वर्षू, माझा मेल आय-डी पाठवते. मला लिंक पाठवून दे.

Pages