नावात काय आहे?

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25

खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?

olakhu%20anande%20-%20new.jpg

पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

दुसरे चित्र बॉतिचेल्लीचे बर्थ ऑफ व्हीनस. मायबोलीत व्हीनस म्हणजे शुक्र. पहिल्यातल्या भावनेवर विचार करतेय.
तिसरा काही तारा तुटणे वगैरे आहे का?

श्रद्धा - दुसर्‍याचे व्हीनस हे बरोबर. तिला पाहिल्यावर काय भावना निर्माण होते? Happy
पहिलं चित्र जे दर्शवत आहे, त्याचं वर्णन करताना काय म्हणतो ते सांगा.
शब्दशः अर्थ घ्या.. चित्रं सोपी आहेत.

भयंकर सुंदर मराठी भाषा - द दि पुंडे हे आहे का?
पहिले चित्र (होलोकास्टचे) पाहून भयंकर ही भावना मनात येते. व्हीनस ही सौंदर्याशी निगडित आहे. मायबोली लोगो मराठी भाषा सुचवतो आणि माझ्या आठवणीप्रमाणे त्या पुस्तकाचे नाव मुपृवर तोडून लिहिलेले आहे.

श्रद्धा....

तुम्ही दिलेले "भयंकर सुंदर मराठी भाषा - द दि पुंडे..." हे कोड्याचे उत्तर असो वा नसो....पण चित्रमालिकेवरून तुम्हाला हे [च] पुस्तक सुचावे याचे विशेष कौतुक एक सदस्य या नात्याने मी करणे कर्तव्य समजतो. पुस्तकाचे मुखपृष्ठ मी पाहिलेले आहे आणि शीर्षक तुटक अक्षरांनी बेअर्थाचे मुद्दाम केल्याचे जाणवतेही. कोड्यातील चित्रेही तोडूनच दिल्याने तुमचे उत्तर बरोबरच असले पाहिजे.

[या 'चित्र-पुस्तक कोडे' बाबत तुमचे शिष्यत्व पत्करावे असे वाटत असणार इथल्या कित्येक सदस्यांना.....त्यात मीदेखील आहेच.]

अशोक पाटील

चांदणी कशाला टाकली होती?
बादरायण+बादरायण........+nबादरायण. असा संबंध जोडत
आहात.

हेलबॉय, तुम्ही हे पान पाहिल्यास ती चांदणी का होती याचे उत्तर मिळेल. मलाही पहिल्यांदा तो तारा हे वेगळे चित्र वाटले होते पण ती एकाखाली एक एकच गोष्ट दाखवणारी चित्रे आहेत, हे होलोकास्टचे पान पाहिल्यावर समजले.

संयोजक, धन्यवाद. हाय कॅलरी बक्षीस आहे हो! Happy पुढच्यावेळी मॅक कॉस्मेटिक्स चालतील. पुढचं कोडं कधी? Proud

अरे लोकहो, लाजवू नका. त्यात काही विशेष नाही. Happy कोडी, क्लूलेस, वगैरे भयंकर आवडीचे प्रकार आहेत एवढंच.

श्रद्धा,
<<[या 'चित्र-पुस्तक कोडे' बाबत तुमचे शिष्यत्व पत्करावे असे वाटत असणार इथल्या कित्येक सदस्यांना.....त्यात मीदेखील आहेच.]>> + १

आत बाहेर - प्रमोद मुनघाटे

तळ्यात मळ्यात - वृंदा दिवाण

Proud डोक्यात बरच काही फिरत रहातं हो संयोजक

कविन - मला पण 'साद देती हिमशिखरे' आठवले होते पण हे जी के प्रधानांच्याच इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद आहे.

Pages