नावात काय आहे?

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25

खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?

olakhu%20anande%20-%20new.jpg

पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे मी खूप मिस केले....
सगळ्यांचे अभिनंदन .
पुढ्चे चित्र येवू दे...मजा येतेय...

संयोजन टीममधील जी व्यक्ती [वा ज्या व्यक्ती] पुस्तकांसाठी 'चित्रे' गोळा करीत आहे, तिच्यावर इथल्या सदस्यांनी आपापल्या मेंदूचा भुगा केल्याबद्दल केस करावी असे सुचवावे वाटते.

अशोक पाटील

संयोजन टीममधील जी व्यक्ती [वा ज्या व्यक्ती] पुस्तकांसाठी 'चित्रे' गोळा करीत आहे, तिच्यावर इथल्या सदस्यांनी आपापल्या मेंदूचा भुगा केल्याबद्दल केस करावी असे सुचवावे वाटते. Happy

एक तर भूका लागल्यात, आणि हे कसं वळ्खायचं....गप जेऊन आलेलं बरं....>>>>>>>>> आम्हाला तर भरल्या पोटीबी वळख्ता येइना Happy

तो स्ट्यु चा फोटो आहे मामी. आणि ते कोट ऑफ आर्म्स वरून स्ट्युवर्ट नावाशी सम्बन्ध लावला मी.. पण अनुवादीत काही नाही म्हणतात. मग काय असेल काय की!

Pages