फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून शिवला नाही आहे. फक्त डिझाईन कंप्लीट झाल आहे.
फ्रंन्ट नेकची डिझाईन बघा.
P31-01-13_21.54[1].jpg

आणि हाताची डिझाईन
P31-01-13_21.55[1].jpg

तुरा गळ्यात बोर वाटतोय पण.
शिरपेच पण म्हणतात त्याला. Happy

वर्षूताई, होल्डर आहे छान पण देशात त्यावरची धूळ कशी साफ करणार? इथे थोडीच घरं बंद असतात?
हे असे होल्डर्स बंद कपाटात ठेवता येतील किंवा त्यासाठी बंद कप्पा वेगळा करता येईल असे बघायला हवे.
मला त्यादृष्टीने कानातल्यांसाठी ते मेटलचे फाइल ड्रॉवर्स असतात साधारण पाउण इंच उंचीचे ते बरे वाटतात.
गळ्यातल्यांसाठी आरशाच्या मागे साधारण दीड-दोन इंच खोलीचा कप्पा ज्यात हुक्स लावलेले असतील असे बरे पडतात.

नी.. अजुन एक सजेशन हवंय....... लग्न मे मधे आहे.... थंडीत तर सहसा घाम येत नाही....पण उन्हाळ्यात घामाने पुर्ण चेहरा काळा पडतो...एकतर माझी स्किन उन्हाळ्यात ऑयली होते.. घाम खुपच येतो ..अशा वेळेला कुठला मेकअप करावा म्हणजे घामाने चेहेर्यावर लावलेलं फौंडेशन वगैरे ओघळणार नाही...

Sad ओके

24.jpeg26.jpeg27.jpeg28.jpeg

अरे बापरे!!!! बायका लै लिहायला लागल्या!!! जिव्हाळ्याचा विषय ना !!! आज खुप दिवसांनी आले इथे...फारच प्रगती केलीत ... वर्षु तै होल्डर्स झक्कास... मला तो कानातल्यांचा भारी आवडला... पण नी म्हणते तसं इकडे धुळ बसुन खराब होइल.... पेरु मला हँडबॅग स्टँड फार म्हणजे फारच आवडला.... मी नक्की बघ्न इथे... नाही तर मे मधे यु.एस ला येणार आहे तेंव्हा तिकडे बघेन.... कुठल्या सुपर मार्केट मधे मिळतो? वॉल मार्ट ला मिळतो का?

अनिश्का...

माझ्या कडे सेम हार आहे, फक्त मोती लावलेला... इमिटेशन नाहिये.... खुप सुरेख दिसतो.... वरच्या साड्याही खासच... मला जांभळी आवडली.... माझ्या कडे पिस्ता आणि नेव्ही ब्लु अशा दोन पैठण्या आहेत....

वर्षूताई, होल्डर आहे छान पण देशात त्यावरची धूळ कशी साफ करणार? इथे थोडीच घरं बंद असतात?

माझ्याही मनात हाच विचार आला... इथे दिवसभर खिडक्या दारे बंद करुन ठेवली तरी संध्याकाळी इंचभर धुळ सगळीकडे दिसते.. मुंबईत धुळीचा त्रास खुप वाढलाय. Sad

माझ्या कडे खालच्या सारख्या दोन बालुचेरी साड्या आहेत. पैकी जे पिवळं आहे ते मी वधुवस्त्र म्हणुन लग्नात १६ वर्षां पुर्वी नेसले होते. आजहे ती साडी जशी च्या तशी आहे.... दुसरी पण सेम माझ्या कडे आहे.... एका विणकराने गिफ्ट दिली होती.... फारच एलीगंट साडी....

100_1227.jpgbalucheri.jpg

अनिश्का, मस्त साडया आहेत सगळ्या
मोकीमी पिवळी छानच आहे.
साधना, मी क्लास लावला आहे खाटला वर्कचा आणि हे माझ पहिल डिझाईन असाईनमेंट होत. Happy

एका विणकराने गिफ्ट दिली होती.... फारच एलीगंट साडी....>>>>>>>. मला पण सांग ग त्या विणकराचा पत्ता....मला पण गिफ्ट देतो का बघते Wink

मोकिमी,दोन्ही साडया आवडल्या.
मी अनिश्का, जांभळी साडी आवडली.

धन्स....

मला पण गिफ्ट देतो का बघते >>>>

मग तुला त्याचं कस्टम्स चं काम सुरळीत पणे करुन द्यायला लागेल !!!! हा हा हा .....

Uhoh

मोकिमी दोन्ही मस्त आहेत साड्या. माझा टाइप दुसरा. विणकर तशी एक बनवून देइल का?
वर्शू आम्हाला ज्वेलरी होल्डर हवे आहे. १००० कानातली जमविण्याचा माझा पण आहे ते कुठे ठेवणार?
तू कुरीअर केलेस तरी आम्ही घेऊ. तुला पैशे पाठवू.

अनिश्का, तुम्ही पारंपारिक साडी नेसणार असाल व बरोबर अधिकृत सिक्युरिटी असेल तर सोन्याचे दागिने जरूर घाला. अश्या प्रसंगी छान दिसतात. तुम्ही बारीक आहात तर एखादी वाकी, उजव्या दंडावर नक्की घाला. तुमच्या हारांपैकी पहिला छान आहे. कानात वेल पण सुरेख दिसतील. माय पॉइंट इज, पारंपारिक करायचे तर १००% करा. अर्धवट नको. मागे मी मेकपचे पण लिहीले होते योडी साठी. ते वाचून घ्या.

Pages