फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहाहा सुंदर आहेत सगळ्या पैठण्या.. मोकिमी यू लक्कीश.. Happy
मलाही पारंपारिक दागिने आणी साड्या खूप आवडतात.. म्हणून नेहमी काहीतरी ट्रेडिशनल साडी घेऊन जाते ...
Wink न्हाय म्हणायला चालू फ्याशनातली एक लेस ची झट्टक साडी घेतलीये.. लाईट गोल्ड वर वर्क आहे जरीचं.. फारशी टिकावू वाटत नाहीये पण..
नी<<>> अर्र.. ते धुळीचं काही लक्षात राहिलं नाही.. यस्स.. मुंबई ला रस्त्यावरची धूळ , ट्रॅफिकमुळे सारखी घरात येते.
अमा. ऐसे कायकू बोल्ती.. आणीन ना तुझ्याकरता.. पाठवीन कि तुला.. सिरिअसली सांग किती ईअरिंग ठेवायचेत?? त्याप्रमाणे आणीन.. Happy डू लेट मी नो
आरती.. बाप्रे , किचकट असेल ना हे ?? पण खूप सुंदर आहे..
मयुरी.. मला पण आयडिया लागत नाहीये अ‍ॅक्चुल घालून कशी दिसेल ते.. या आकाराची नथ पहिल्यांदाच पाहिली..

अनिष्काच्या पैठण्यांच्यातली ब्लू आवडली.

अमा, अधिकृत सिक्युरिटी म्हणजे काय? नवरा? घरच्या लग्नाकार्यांमधे जनरली कार्यालयात पोचताना आणि तिथून निघताना एवढाच नवर्‍याशी संपर्क होतो की.. Happy

अगं तसं नाही. ते होल्डर दडवायला कप्पा लागणार त्याशिवाय काय खरं नाही.. नाहीतर धूलीवंदन Happy

ए माझ्याकडे नाहीये धूळ....मला पण ते कानातले ठेवायचं आवडलंय...
फक्त मला माझ्या पिलुपासून कुठेतरी दडवून ठेवायला लागेल Wink

मोठी नाहीये का ती नथ फार? Uhoh
पण सुंदर आहे Happy

वॅलेंटाईन डे ला ऑफिसच्या टीमसोबत एका पब मध्ये जाणाच्या प्लॅन आहे
वन पिस घालणार नाही आहोत कारण मागे एकदा पार्टीच्या वेळेला नाचताच नव्हतं आल मन भरून
जिन्स टॉप हेच फिक्स केलय पण.........
मला अजिबात सुचत नाहीये की कसला टॉप असायला हवा..
घरातून निघताना ते आईला ऑड वाटायला नको आणि पबमध्ये गेल्यावर तिकडेही ऑड वाटायला नको अस काय घालता येईल?
मदत करा प्लिज

वेल्व्हेट फॅशनमध्ये असल्यास तसा आणि थंडी असेल तर हाय नेकचा पण छान वाटेल. त्या मटेरियलला जी तुकतुकी असते त्याने पबमधल्या लाइट्सवर ते ऑड दिसणार नाही असा माझा एक अंदाज...अदरवाइज देशात कधी पबमध्ये गेलोच नव्हतो आणि परदेशातही क्वचितच गेलोय..पण त्यावेळी इतर मुलींना व्हेल्वेट्मध्ये पाहिल्याचं आठवतंय...
एंजॉय Wink

मरुन रंगाची पैठणी फारच आवडली.
मोकिमी, सुरेख आहेत साड्या तुझ्या. बालुचेरी हा सिल्कमधलाच आहे का प्रकार? मला नाव माहीत नव्हते.
नथ कानातच अधिक छान दिसेल ह्यासाठी अविगाला अनुमोदन. Happy

शैलजा, बालुचरी साडी सिल्कपासूनच बनते. साडीवर मेनली रामायण-महाभारत थीम चे मोटिफ विणलेले असतात. बंगाल च्या ट्रेडिशनल साड्यांमधे 'बालुचरी' चा नंबर बराच वरचा लागतो..
बाकी जाणकार लोक्स सांगतीलच तुला डीटेल मधे..

सध्या इथे खेस कॉटन च्या साड्यांची जबरदस्त फॅशन येतेय. शांतिनिकेतनमधे दर शनिवारी एक हॅण्डिक्राफ्ट आणि हॅण्डलूम मटेरिअल्सचा हाट असतो आणि कलकत्त्यातल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीयांतल्या अनेक फॅशन्स तिथे प्रेडिक्ट करता येतात. सध्या तो हाट खेस साड्यांनी भरून वाहतोय. बेसिक ऑफव्हाईटवर ब्लॉक प्रिंट्स किंवा पेंटेड किंवा मग पूर्ण साडी डाय मारून. फॅब्रिक थोडंसं सतरंजीसारखं असतं (मला नीट सांगता येत नाहीये..) म्हणजे कॉटनवर मधे मधे उभ्या स्ट्राईप्समधे सतरंजी/दरीवर उठावाच्या, धाग्यांच्या गुंडाळी केल्यासारखे पॅटर्न असतात. मला फार आवडलंय. पण नेटवर खेस म्हणून पारंपरिक जे प्रकार दिसताहेत त्यापेक्षा वेगळ्या आहेत दिसायला.

दोन आठवड्यांपूर्वी गेले होते आणि कालपण गेले होते तिथे. फार कष्टाने मोह आवरला घेण्याचा. पण एखादीतरी घेइनच पुढच्या ट्रिपमधे. घेतली की फोटो टाकेन

म्हणजे कॉटनवर मधे मधे उभ्या स्ट्राईप्समधे सतरंजी/दरीवर उठावाच्या, धाग्यांच्या गुंडाळी केल्यासारखे पॅटर्न असतात. <<
हे जनरली उरलेल्या कापडांच्या चिंध्यांमधून असतं. नागपुरातल्या खादी ग्रामोद्योग का कुटीर उद्योग मधून मी आणल्या होत्या अश्या. मस्त असतात.

वर्षा सध्या आईचे ५० मुलीचे ४० अशी फिगर आहे कानातल्यांची. सर्व डब्यात बंद करून ठेवले आहेत. तितकेच गळ्यातले आणि बांगड्या सटर फटर आहे. त्या हिशेबाने एक नैतर दोन लागतील.
I loooooove earrings. Happy हे मराठीत नीट लिहीता येइना.

खेस साडी मत्त्त दिसतेय. नवा प्रकार! फेसबुक वर एक तंपुरी सिल्क पेज आहे जरूर बघा. मस्त साड्या पण ६००० मंजे जरा महागच आहेत.

रिया व्ही डे ला रेड टॉप शोभून दिसेल. घरून निघताना जॅकेट घाला. स्पेगेटी नैतर बोट नेक. पर्ल्स लावलेला अशा छान दिसेल. रेड व्हाइट पोलका डॉट पण मस्त दिसेल. अगदी लाल भडक नको असेल तर लाइट पिंक आनि व्हाइट. एखादीच मस्त बँगल घालता येइल.

ओके वर्षूताई, इथे पुन्हा येईपरेंत वरदा आणि तुझी पोस्ट आलीच. आता वरदा, नीरजा कोणीतरी फोटो टाका. Happy

माझ्या एकही बालुचरी साडी नाही! Sad Proud खेस कॉटन - वाचूनच आवडला आहे प्रकार.

मला नेटवर बघून नाही कळालं खेस कॉटनचं फॅब्रिक नक्की कसं दिसेल ते. आधी बघितला असता मेसेज तर आज दिल्ली हाटमध्ये हा प्रकार मिळतोय का हे शोधलं तरी असतं.

कॉटन साड्यांमधे बंगाली कांथा वर्क,थ्रेडवर्क शिवाय , राजस्थान मधील बागडू प्रिंट ची साडी माझी फेवरेट आहे. मोस्टली अर्थ कलर्स मधल्या फार आवडतात.रंगांकरता वेजीटेबल डाईज वापरतात त्यामुळे एकार्थी हे कापड इको फ्रेंडली ही असते.. Happy
बागडू प्रिंट चे काही नमुने

ही असली साडी, मोठी बिंदी, सिल्व्हर नाहीतर चक्क टेराकोटा ज्वेलरी शांतिनिकेतन पर्स. हाय
ग्रेट लुक. आज करून बघते.

अमा.. अप सो अर्ली??? आहाहा टेराकोटा ज्वेलरी.... लव इट.. कुठे मिळते गं भारतात???

वर्षूताई, हे वरचं बागडू प्रिंट कुठल्या फोटोमध्ये आहे तशी फोटोंखाली नावं दे ना.

काल मी खेस प्रिंट गूगल केलं तेह्वा जे दिसलं त्याचा पोत बर्‍यापैकी जाडा भरडा वाटतो आहे, असाच असतो का वरदा? पुन्हा काल एका ठिकाणी कॉटन कापडावए व्हेज डाय वापरुन केलेले डिझाईन पाहिले पण किंम्मत फार वाटली ३५०/ पर मीटर आणि पुढे. इतकी असते किंम्मत?

माझ्याकडे कानातल्याचा असा होल्डर आहे, मी बनवून घेतला.
आणि सेम असाच बँगल स्टँड पण, फक्त इथे कानातली अडकवायला पट्टी आहे तिथे बार्स आहेत तीन.

wrought-iron-Earring-Stand.JPG

शैलजा, हॅण्डलूम कॉटन तेही पारंपरिक मागांवर बनवलेलं आणि पारंपरिक पद्धतीने रंगवलेलं असेल तर ३५०/मीटर ही भयंकर किंमत नाही Happy

खेस हा शब्द बेसिकली कपड्यांवरून घ्यायची जी मोठी जाड शाल टाइप पण कॉटनची चादर असते त्यासाठी वापरतात. त्यामुळे ते कॉटन थोडे जाडे असणार हे अर्थातच.

नी.. यस्स.. सिंधी लोकं अंगावर पांघरायच्या जाड्या चादरीला 'खेस' म्हणतात.. त्यामुळे हा शब्द ऐकला होता..पण खेस च्या साड्या हा प्रकार नव्हता ऐकला कधी..

दक्षु.. रॉट आयर्न चा खास बनवून घेतलास स्टँड?? वॉव.. खूबसूरत है!!!!

टेराकोटा ज्वेलरी कलकत्त्याला मिळेल.दिल्लीमध्ये पण बहूतेक पश्चिम बंगालच्या हँडलुम वैगरेच्या दुकानात मिळत असणार. पूर्वी अहमदाबदला एका प्रदर्शनामध्ये बंगालच्या स्टॉलवरून खूपशी टेराकोटा ज्वेलरी खरेदी केली होती.

येस्स वर्षू, अंगावर पांघरायच्या खेसी माहितियेत मलापण. पण त्या तर जवळपास दरी /सतरंजीसारख्या असतात जाडीला. पण हे कॉटन तितकं जाडं/भरडं तर असू नाही ना शकणार.

कॉटन तेही पारंपरिक मागांवर बनवलेलं -हे माहित नाहीये मला की असं आहे का ते. विचारेन. मात्र अतिशय सुरेख पोत आहे कापडाचा. सुखद किंचितसं खरखरीत. घेणारे मी आणि पन्नाही मोठा आहे. Happy
नीरजा, वर्षूतै धन्यवाद.

अल्पना, बरेच दिवसांनी दिसलीस! Happy

तितकं जाडंभरडं नाही गं पण खेस सारी म्हणल्यावर काही प्रमाणात जाडेभरडे पणा येणार हे उघड आहे. असं म्हणत होते. Happy

Pages