फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला लिंक दे बरं. मी काल थोडी शोधाशोध केली पण मला कोणतीच चांगली लिंक नाही सापडली. (विपु पण केलिये तुला एक)

अविगा कानात नथ?? अ ओ, आता काय करायचं>>> त्याच डिझाईन अस मला वाटल कि, ते कानातच छान दिसेल.

.

अल्पना, आज घरुन देते लिंक संध्याकाळी. आत्ता ऑफिसातून जमणार नाही Happy अ‍ॅक्सेस नाही.
विपू पाहते.
अविगा, नथीचा फोटो तुम्ही कुठून घेतलात? मी कल पेठ्यांच्या साईटवर शोधले, पण मिळाले नाही. डिझाईन नंबर आहे का?

सुमेधा, पेटी मस्त आहे गं. पण दरवेळी उघडत कोण बसेल?
शिवाय आल्या गेल्याना सहज दिसायला हवी ना? Wink

अश्विनीमामी >>> अधिक्रुत सुरक्षा म्हणजे ट्रेन मधे येणार जाणार :(..... मंसु सोन्याचं घालेन पण सोन्याचा मोठा हार म्हणजे रिस्कच आहे....माझाकडे सोन्याचे दिसणारे खोटे मराठमोळे दागिने आहेत तेच घालेन...
अविगा>>>> ती नथ भयंकर सुंदर आहे नाकात छान दिसेलच पण कानातही...नथ तशी आपण रोज नहि घालत तेव्हा कानात घालयची आणि स्पेशल असेल तेव्ह नकात Happy ....लग्नाचा वाढदिवस येतो आहे जुन मधे आता पासुन भुण भुण चालु केली तर मे पर्यंत नवर्याचे कान मान हलतील होकरार्थी... Wink
दक्षु >>>>स्टँड अप्रतीम आहे कानातल्याचा........:)

पण नीधप म्हणते ते पण खरच आहे....आपल्याकडे धुळ बसुन बसुन ते कानातले खराब होतिल पण रोज बाकि गोष्टींबरोबर तो स्टँड पण साफ करत बसावा लागेल...

दक्षिणा, माझी पेटी तुमच्यासारख्या उत्साही कार्यकर्त्यांसाठी नाही गं. सटी-सहामासी सणावाराप्रमाणे मोत्याचे दागिने बदलणार्‍या माझ्यासारख्या थकेल्या काकवांसाठी बरी आहे आपली Happy पण तु हा स्टँड बनवून कुठून घेतलास? मस्त आहे.

अनिश्का डिपेंड्स तुमच्या घरी धूळ किती येते त्यावर अवलंबून आहे. तु हे स्टँड काचेच्या कपाटात ठेवू शकतेस.

ह्म्म....पण सुंदर आहे.......घर आता बदलायचे आहे....तिथे हे असलं बनवुन ग्यायला हवं.....मला लटकते कानातले जास्तं आवडतात....सकाळीच आज डब्यातला दुसरा जोड सापडत नव्हता.... तेव्हा ही आयडिया आवडली...वॉर्ड्ररोब मधे बनवता येइल असला स्टँड....माझ्या प्रोफेशन चा फायदा कधी होणार मला???? Wink

3.jpg

हे पण मला आवडलं ...माझ्या गावाला कोळणी असले सोन्याचे जड्जड कानातले घालतात......त्यांच्यासारखे कान खाली आले नाही म्हणजे मिळवली

मला पण सोन्यासारखे दिसणारे मंसु घ्यायचे आहे. लांब. साडीवर घालायला. जरा डिझायनर असलं तरी चालेल. पुण्यात कुठे मिळेल? स्वर्ग वगैरे नको.

मयुरी ती जी नथ आहे न तु दाखवलीस ती....ती कारवारी नथ वाटते आहे......माझा लग्नाच्या वेळेला वामन हरी पेठे दुकानातल्या मुलीने मला कारवारी नथ म्हणुन असला प्रकार दखवलेला..पण घरातल्यांनी नाकं मुरडली.....

मस्तच अनिष्का

माझ्या गावाला कोळणी असले सोन्याचे जड्जड कानातले घालतात......त्यांच्यासारखे कान खाली आले नाही म्हणजे मिळवली>>> आमच्याकडे पण Happy

हा आर्टीफिशियल अशाप्रकारतिल कानातले आता इतक्याच किंमतीत मिळतात.....ते छत्री सारखे दिसणारे झुमके पण ३००-४०० रु. ना मिळतात

29.jpeg30.jpg

माझ्या वहिनीने आणलेल्या या पेट्या घरायला बायांसाठी. तरी ७-८ वर्षे नक्कीच झाली असतील. तिला विचारते कुठून आणल्या ते आता आठवतेय का ते.

बाजुबंद मस्तय....

32.gif33.jpeg34.jpeg

Happy

कोणत्या पेटीबद्दल बोलताहेत सगळे? मला का दिसत नाहिये?

ते लोंबते कानातले मला फार आवडतात पण एका कानाचे बीळ मोठे झाले आहे त्यामुळे अजिबात घालता येत नाही.
रिंगासुध्दा घालता येत नाहीत Sad

मी शक्यतो सॅटिन, इटालियन क्रेप, प्रिंटेड साड्या घालते....पदर एका बाजुने सोडायचा, हाय हिल्स घालुन ,कानात कुठलेही ट्रेन मधे मिळणारे २० रु चे किंवा महागतले कानातले मिक्स मॅच करुन गळ्यात छोटं नेहेमिचं मंसु...हातात कडा , घड्याळ आणि असं बाजुबंद मला कम्फर्टेबल वाटतं... एक लग्न, साखरपुडा कार्य सोडलं तर बाकी सर्वांसाठी असच.....

मला पण सोन्यासारखे दिसणारे मंसु घ्यायचे आहे. लांब. साडीवर घालायला. जरा डिझायनर असलं तरी चालेल. पुण्यात कुठे मिळेल? स्वर्ग वगैरे नको.
>>
माधवी, 'सेनोरिटाज' मध्ये बघ. मस्त डिझाईन्स असतात आणि कळुनही येत नाहीत खोटं आहे ते.

बरं मुलींनो, खांद्याएवढ्या केसांसाठी काहीतरी २-३ हेअरस्टाईल सांगा मस्त. लग्नाला जायचंय घरच्या.

Pages