फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपलं सध्याचं घर स्वतःच असेल आणि आपण त्या घरात बरीच वर्षे रहाणार असु तर अगदी वर्थ आहे एल्फा. म्हणजे ३ वर्ष जरी रहाणार असु तरी $४० महिन्याला असा हिशोब करायचा Wink

माझ्या कडे हे अशातलं हॅंडबॅग होल्डर आहे.

handbag holder.jpg

हा पुढ्च्या बाजुचा फोटो आहे. मागच्या बाजुलाही असेच कप्पे आहेत.

वॉव.. छानच बॅग होल्डर..
इथे मिळत असलेले अत्यंत उपयोगी असे काही ज्वेलरी होल्डर्स..

वॉच होल्डर

अंगठ्या होल्डर

मला देखील झोळ्या खुप आवडतात ,, पण माझ्या सासु बाइ मात्र का कोण जाणे मी झोळी घेतल्यावर नाराज असतात ,, त्यांना नाहि आव्डत...हे का अस घेतल आहे असे भाव त्यांच्या चेहरा वर असतात..
वर गंजी..खाली धोती पँट किंवा कुठलीहि लूज मटेरिअल अस्णारे हॅरम .... पायात अगदी फ्लॅट चप्पल .. किंवा कोल्हापुरी चप्पल ,, व गळ्यात चन्कि नेक पिस .. शक्य्तो अ‍ॅनटिक सिल्वर ...खांद्यात झोळी ... पायात सिल्वेर अ‍ॅन्क्लेट ... आणि मी तयार ... सर्वात आवडता पोशा़ख माझा हा ....केस थोडेसे अस्ताव्यस्त.. लूझ अंबाडा टाईप ..>>>>>>>>>>>>>> मी गौरी.......सेम पिंच.....फक्त हेरम मला माझा उंचीचे मीळत नाही...मग जीन्स आणि केस अस्ताव्यस्त मोकळे सोडायला मला भारी आवडतात...जस्ट फ्रॉम बेड लूक...... Happy

मुलिंनो मला एक सजेशन हवय....आता घरात एक लग्न आहे...मी काठापदराची लग्नात घेत्लेली साडी घालणार आहे...राणी कलर ची पैठणी किंवा मग दुसरी कुठलीतरी पण काठापदराचीच .... त्यावर मला सोन्याचे दागीने घालायचे नाही आहेत... मला एक आर्टिफिशिअल नेक्लेस आवडला आहे....तो कसा वाटतो ते सांगा...कारण नवरा अ‍ॅज युजुअल डिप्लोमॅटिक उत्तरं देतो आहे.....

22.jpeg

23.jpeg

खाली डॉट असलेला नको. लगेच इमिटेशन लक्षात येते. Happy
गळ्यालगतचा मस्त आहे पण त्याबरोबर किमान मंसू तरी लांब हवे. असे वाटते.
का प च्या साडीवर लग्नाबिग्नात लांब गळ्यातली आणि इतर सोशल इवेंत्सना गळ्यालगतची फक्त भारी वाटतात.

अनिश्का, पहिला छान वाटेल काठापदराच्या साडीवर. पण साती म्हणते तसे त्याबरोबर एखादा लांब दागिना पण घाला, छान वाटेल.

अनिश्का ते पहिलंवाल कोल्हापुरकडे खुप वापरतात..थोडासा लांब लक्ष्मीहार म्हणुन
अशी लफ्फेदार फॅशन अगदी माझ्या मावशीच्या लग्नातही होती

काही असो मला ते फारच आवडलं......मस्त दिसतं...हल्ली ट्रेन मधे मिळणार्‍या १०० रु च्या सेट्स पेक्शा तरी छानच.....

थोडासा लांब लक्ष्मीहार म्हणुन>>>>>. लांब लक्ष्मीहार मी पण पाहिला होता...पण हा गळ्यालगत चा आवडला...

नी.. अजुन एक सजेशन हवंय....... लग्न मे मधे आहे.... थंडीत तर सहसा घाम येत नाही....पण उन्हाळ्यात घामाने पुर्ण चेहरा काळा पडतो...एकतर माझी स्किन उन्हाळ्यात ऑयली होते.. घाम खुपच येतो ..अशा वेळेला कुठला मेकअप करावा म्हणजे घामाने चेहेर्यावर लावलेलं फौंडेशन वगैरे ओघळणार नाही...

अर्रे माझे ज्वेलरी होल्डर्स नाही आवडले??हे सर्व मी स्वतः वापरते ..टू प्रॅक्टीकल..
कुणाला हवे असतील तर आणीन नेक्स्ट टायमाला.. गिफ्ट हां... Happy

असा नेकपीस बनवून मिळेल का तिकडे?? कॉस्ट्यूम ज्वेलरी मधे ..
तो सेंटर चा वीणा शेप सोडल्यास मला भयंकर आवडलाय...

सेंटरच्या पेंडन्ट चा आकार निजामी ज्वेलरीच्या प्रुरुषांच्या पगडीत जो तुरा / ब्रुच असतो त्यावरून इन्स्पायर झालेला वाटतोय !
जोधा आकबर मधे ह्रितिक ची पगडी त्या टाइप ची आहे
http://www.google.com/search?q=jodha+akbar+hrithik+roshan&hl=en&tbo=u&tb...

वर्षुताई, मला आवडले तुझे होल्डर्स!! मस्तच आहेत. ते वॉच होल्डर आणि अंगठी होल्डर इथे मिळेल का??

ह्या डिझाईनर ब्लाऊजची फॅशन गेल्यावर्षी होती. मी हा डिझाईनर ब्लाऊज परवा कंप्लिट केला. पूर्ण कट वर्क डिझाईन आहे.
P31-01-13_21.56.jpg

Pages