मला भेटलेल्या प्रसिद्ध व्यक्ती.

Submitted by सिंथेटीक जिनिअस on 28 January, 2012 - 03:46

प्रसिद्ध व्यक्तींना भेटण्याची ,त्यांच्याशी बोलण्याची ईच्छा आपल्यापैकी प्रत्येकालाच असते. आपण कधीतरी प्रसिद्ध व्यक्तींना भेटला असणारच. त्या भेटींविषयी, प्रसंगांविषयी हा धागा उघडला आहे .असे प्रसंग,त्या व्यक्तीशी झालेला संवाद या विषयी या धाग्यावर लिहावे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शालेय जीवनात माझ्या शाळेने सुप्रसिद्ध व्यक्ती वार्षिक स्नेह संमेलनास बोलवून अशी संधी प्रथम उपलब्ध करून दिली.त्या त्या वर्षी प्रमुख पाहुण्याशी बोलताही आले.अर्थात तेंव्हा सुप्रसिद्ध म्हणजे काय हेच कळण्याचे वय नव्हते.पण माझ्या शाळेने सर्वश्री गं. बा. सरदार, अॅडमिरल आवटी, इंदिरा संत, शांता शेळके यांना भेटण्याची संधी दिली.
शाळेत बारीक अंगकाठी मुळे इच्छा नसूनही पहिल्या बाकावर बसावे लागे. एकदा त्यातून बाहेर पडायचेच म्हणून तालीम सुरु करायचे ठरवले मग गावातील तालमीत जावून व्यायाम करायचे ठरवले.एक दिवस तालमीत हिय्या करून प्रवेश केला. आणि तेथील भरलेल्या / भारलेल्या वातावरणात दबून उभा होतो तेंव्हा एक भारदस्त व्यक्तिमत्व जवळ आले आणि त्यांनी विचारले " बाळ काय हवे ?" तर मी बाणेदारपणे सांगितले मला तालीम सुरु करायची आहे. तर त्यांनी उद्या पहाटे पाच वाजता ये असे सांगितले. मी गजर लावून उठलो आणि तालीम बरोबर पाच वाजता गाठली.
काल ज्यांनी उद्या ये असे सांगितले होते ते स्वतः सामोरे आले आणि माझी तालीम सुरु झाली. पुढे जेमतेम सहा महिने ती नियमित चालली. आणि या काळात मला समजावून घेणारे ते व्यक्तिमत्व म्हणजे हिंदकेसरी गणपतराव आंदळकर होय.
१९७७ साली आणीबाणी नंतर भारलेल्या वातावरणात जेंव्हा लोकसभा निवडणुका होत्या तेंव्हा माजी पंतप्रधान चंद्रशेखर झंजावाती प्रचार सभेवर असताना त्यांनी पक्षाच्या निधीसाठी शक्य असेल ती मदत करा असे आवाहन केले. निधी त्याची गरज व पैसा याची माहिती नसणारे बाल वय होते. घट्ट मुठीतून निधीची रक्कम हातात धरून स्टेजवर गेलो आणि त्यांनी मलाही देणगी द्यायची आहे असे म्हणत हात पुढे केला,त्यावर त्यांनी अत्यंत आदबीने " आपकी तरफसे दियी गयी छोटीशी रक्कम भी हमारे पक्षके लीये बहुमोल हैं|" असे म्हणत हातातील रक्कम ( दहा पैसे ) स्वीकारली आणि मनपूर्वक हस्तोलंदन केले.
यानंतर पुण्यात आगमन आणि नोकरी व्यवसायाचे निमित्ताने अनेक राजकीय, नामवंत लोक या ना त्या कारणाने भेट गेले. पण बरेचदा ते संबंध व्यवसायिक असल्याने त्यात भेटीचा ओलवा होताच असे ठामपणे म्हणता येत नाही.
माझी आई थोडी कमी शिकलेली होती.पण स्वाभिमानी होती.वडिलांच्या अकाली निधनानंतर स्वतः नोकरी करून तिने घर चालवले.तिने तिची प्रथमची नोकरी कशी मिळवली त्याची एक आठवण या निमित्ताने सांगतो. वडिलांचे निधनानंतर स्वतः नोकरी करून तिने घर चालवले.तिने तिची प्रथमची नोकरी कशी मिळवली त्याची एक आठवण या निमित्ताने सांगतो.
वडिलांचे निधनानंतर आईने महिला उद्योग लिमिटेड या किर्लोस्कर समूहातील कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला होता. पण पुरेसे वजन नाही या वैद्यकीय कारणास्तव अंतिम यादीत नाव नसल्याचे सांगण्यात आले. त्यावर आईने दुसऱ्यादिवशी थेट लकाकी येथे धडक मारली आणि सौ.यमुताई किर्लोस्कर यांची भेट मागितली.त्याकाळी किर्लोस्कर कुटुंबीय अचानक पूर्व परवानगी शिवाय येणाऱ्या लोकांसाठी सकाळचा एक तास राखुन ठेवत असत,त्यामुळे भेट मिळाली.तेंव्हा आईने त्यांना," काल माझी महिला उद्योग लिमिटेड येथे मुलाखत झाली पण त्यांनी मला नापास केले आहे " असे सांगितले.
तेंव्हा सौ यमुताई यांनी कारण विचारले, तेंव्हा अपुरे वजन (अशक्तपणा ) या कारणासाठी कामावर घेता येत नाही याची माहिती आईने त्यांना दिली.तेंव्हा त्या म्हणाल्या वैदकीय कारण असेल तर मी कशी काय मदत करू? तेंव्हा आई त्यांना इतकेच म्हणाली " ज्या बाईचा नवरा जावून दोन आठवडे झालेत त्या बाईने टुक टुकीत असावे आपणास वाटते का ? " असा प्रतिप्रश्न केला. त्यावर प्रभावित होत त्यांनी पुढील तीन /चार महिन्यात आवश्यक वजन वाढवण्याचे अटीवर आईस विशेष बाब म्हणून कामावर घेतले. हि आमच्या आईची प्रसिद्ध व्यक्ती बरोबरची भेट. माझ्या कायमची लक्षात राहिली.
एकदा माझ्या पुतण्या भर दुपारी धापा टाकत आला घरात त्याची आजी (एकटीच ) होती.त्याचा लालेलाल चेहरा आणि धपापता उर पाहून ती थोडीशी घाबरली आणि विचारले," अरे ओंकार काय झाले? "
तर माझा पुतण्या वय वर्षे अकरा म्हणाला," अग आजी मी आत्ता 'माधुरी दीक्षित' ला आपल्या जिन्यात पहिले." पण त्यावर आई त्यास दरवाजा उघडून डोकावण्याचे कष्ट न घेता म्हणाली,"उन्हातून आले कि चक्कर येते कधीकधी थोडे गार पाणी पी आणि जावून झोप." त्यावर माझा पुतण्या आजीस काहीच न बोलता झोपला,पण संध्याकाळ पर्यंत माधुरी येवून गेल्याची बातमी मात्र गल्लीभर झालेली होती.
तर अश्या आहेत आमच्या कुटुंबियांच्या प्रसिद्ध व्यक्तींच्या भेटीगाठी.

iblis,
kasale copycat ahat. Swatala bhetanyabaddal kadhich bolun zalay... Ata kahitari navin bola. Wink

nidhapa tai

aho, copycat te astil. hum jahan khade hote hai, line wahan se shuru hoti hai.
he celebrity status me 1992 chya december mahinyat milawle ahe. tashi mazya diary madhe nond pan ahe. atta scanner chalat nahiye nahitar scan karun dakhawli asti ithe Wink

=))

1992 chya december mahinyat milawle ahe. tashi mazya diary madhe nond pan ahe.>>>>डीटीतात्या जन्मल्यापासुनच डायरि लिवायची सवय आहे का तुम्हाला Lol Lol

मोठया बहिणी आनंद निकेतन वरोड़ा इथे शिकत असल्याने बाबा आमटे यांना बरेचदा बघितले आहे .
शेतकी महाविद्यालयात (पुणे) एकदा भाजी घ्यायला गेले असताना संजय दत्त ला बघितले .नन्तर समजले
ते मुन्नाभाई चे शूटिंग होते. घराशेजारी असलेल्या वाटीकेत संध्याकाळी आम्ही मैत्रिणी जमायचो
तेंव्हा अनिल अवचट , उमा कुलकर्णी विरूपाक्ष कुलकर्णी गप्पा मारताना दिसायचे . सकाळी याच
वाटीकेत रवि परांजपे (चित्रकार) दिसायचे .तीथेच एकदा प्रतिमा कुलकर्णी आल्या होत्या . वीसा च्या
कामासाठी पुणे इथे अमेरिकन counsolute मधे गेले असता ओळखीचे चेहेरे दिसले . नंतर लक्षात
आले त्यात विनय पाठक होते. पुण्यात मागील वर्षी गेलो असताना तीथे स्वीट होम च्या खालचे
होटल (अभिजित बरोबर ?) तीथे संजय मोने अणि बरेच कलाकार मिसाल पाव खाताना दिसले .असे
अनेक प्रसिद्द व्यक्तिना बघितले पण प्रत्यक्ष बोलण्याची संधी कधी घेतली नाही , म्हणजे काय
बोलायाचे ते कधी सूचलेच नाही. काही कुप्रसिद्ध व्यक्तिना नाइलाजाने बघायची अणि बोलायची
संधी मिळाली .मी १० वीला असताना आमच्याकड़े दरोडा पडला होता . ८ सशस्त्र दरोडेखोर
आमच्या ( आई मी अणि भाऊ) यांच्या टाळक्याशी उभे होते . या प्रसंगाबद्दल सविस्तार
लिहणार आहे

l

आमच्या प्रोजेक्टच्या संदर्भाने सिंधुदुर्गात ग्रामविकासाचं खूप महत्वाचं काम करणारे डॉ. प्रसाद देवधर (भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान) यांच्याशी ५-६ वर्षांपूर्वी भेट झाली. तेव्हापासून डॉ. प्रसाद आणि डॉ. हर्षदा (त्यांची पत्नी) या दोघांशीही खूप चांगली मैत्रीही झालेली आहे. एवढ्या वर्षांमधे जेव्हा जेव्हा प्रसाद भेटलाय तेव्हा तेव्हा काहीतरी नवीन विचार, नवीन मुद्दा मिळाल्याशिवाय राह्यला नाहीये मग भेट भले अगदी १०-१५ मिनिटांची का असेना. भगीरथवरच्या माहितीपटाचे काम करत असल्याने खूप शिकायला मिळतेच आहे.
तसेच गोव्यातले केरीचे पर्यावरणासंदर्भात काम करणारे राजेंद्र केरकर. त्यांचं पर्यावरण संदर्भातलं काम, ज्ञान हे मोठं आहेच पण त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या घरात एका वेळेला किमान ४-५ तरी विद्यार्थी रहायला असतात. गरीब घरातल्या विद्यार्थ्यांना आपल्या घरी ठेवून घेऊन त्यांच्या शिक्षणाची वाट सुकर करून देणे हे काम कायम चालू असते. असे शिकून आता स्वतःच्या पायावर उभे राह्यलेले बरेच जण आहेत. त्या सगळ्या मुलांना भेटलं की अशीच सगळी मुलं घडली तर किती बरं होईल असं वाटतं.
या लोकांशी ओळख-संपर्क आणि आता मैत्री झालेली असली तरी या लोकांकडून दर वेळेला नवीन काहीतरी शिकणे हा मस्त अनुभव असतो.

नुकतीच हिवरे बाजारला भेट दिली होती. मा. पोपटराव पवारांशी भेट झाली.
भारी व्यक्तीमत्व. काय उत्साह, काय व्हिजन... आणि हिवरे बाजारचं काम पण महत्वाचं आहेच.
काही निमित्ताने हिवरे बाजारशी संपर्क येत रहाणार आहे. शिकायला मिळेल बरंच काही. Happy

मी उसगावात ज्या प्रोफेसरमुळे गेले तो डॉ. फार्ली रिचमंड हा यूजीए च्या आधी दुसर्‍या एका युनिव्हर्सिटीत प्रोफेसर होता. तेव्हा तिथे एक भारतीय मुलगा अभिनयात मास्टर्स करायला गेलेला होता. जो त्यानंतर भारतात परतला. गेल्या ६-७ वर्षात प्रसिद्ध नट बनला.
फार्लीने तेव्हा अनेकदा त्याचे नाव मला सांगितले होते पण तेव्हा तो प्रसिद्ध नसल्याने मला माहित नव्हता. Happy
मग एकदा फार्ली भारतभेटीवर येणार होता तेव्हा या नटाचा मला इमेल आला. फार्लीसाठी गेटटुगेदर ठरवायचं होतं. त्या दरम्यान आम्ही इमेलवर भरपूर गप्पा मारल्या. पण नेमकं त्या गटगला मी जाऊ शकले नाही.
मग हे नेहमीचंच झालं दरवेळेस फार्लीची भारतभेट असली की आमच्या इमेल गप्पा होतात. आणि काही ना काही कारणाने आमचं भेटणं राहून जातं. ह्या दरम्यान आता तो बराच प्रसिद्ध पण झालाय. त्यात तो माझ्या आवडत्या नटांमधे जाऊन बसलाय.
मधे एकदा पृथ्वीला एक नाटक बघायला गेले होते. त्यात तो होता. नाटक अप्रतिम, त्याचा अभिनय अप्रतिम. पण उजमेखून त्याला जाऊन भेटणं आणि मीच ती फार्लीची विद्यार्थिनी नीरजा असं सांगणं हे काय माझ्याच्याने झालं नाही. आम्ही एकाच क्षेत्रात आहोत. तो प्रसिद्ध तर मी नोबडी त्यामुळे असं सांगत जाऊन भेटणं हे उगाच लोंबायला गेल्यासारखं होईल असं वाटलं.
अजूनही फार्ली या संदर्भाने इमेल/ फेबुवर गप्पा होतात. अजूनही प्रत्यक्ष भेट झालेली नाही.
कधीतरी समोर येऊच कामानिमित्ताने किंवा फार्लीनिमित्ताने तेव्हा होईल भेट. Happy
मग सांगेन हा इथे. Happy

>>> कधीतरी समोर येऊच कामानिमित्ताने किंवा फार्लीनिमित्ताने तेव्हा होईल भेट.
मग सांगेन हा इथे. <<<

ok

मला सर्वात पहिल्यांदा भेटलेली प्रसिध्द व्यक्ती म्हणजे None other than श्री. अमिताभ बच्चन. लहानपणी शाळेत असताना आई-वडीलांसोबत दक्षिण भारताच्या सहलीला गेलो होतो तेव्हा, अमिताभ चामुंडा टेकडी पायथ्याशी असणार्‍या कोण्या-एका(शंकराच्या) देवळात सपत्नीक दर्शनासाठी आलेला होता. 'कूली' चित्रपटाच्या सेट्वर झालेल्या अपघाताच्या वेळी (जयाने) केलेला नवस फेडण्यासाठी हे दोघे आले होते असे बोलले जात होते. आम्ही देवळात असतानाच ते दोघे आले आणि मग दरवाजा बंद करून घेण्यात आला. आत असलेल्या बहुतेक सर्व लोकांशी त्याने हस्तांदोलन केले. शाल पांघरलेल्या अमिताभने जयाच्या खांद्यावरुन हात टाकलेला असल्याने मला ती (कोणीतरी दाखवे / सांगेपर्यंत) दिसलीच / ती पण आल्ये हे कळलेच नाही असेही आठवते. ट्रीप मधल्या काही लोकांना हा लाभ न मिळाल्यामुळे त्यांच्या समोर आम्ही व्यवस्थित भाव खाऊन घेतला अगदी ट्रीप संपेपर्यंत!

अशा रीतीने सुरुवातीलाच अमिताभ बच्चनशी हात मिळवल्यामुळे हिन्दी चित्रपट सृष्टीमधले बाकी कोणी अस्मादिकांच्या (खिज का काय म्हणतात त्या) गणती मधे नाहीत. Happy

सचिन तेंडुलकर आणि लिएंडर पेस एकत्र याबद्द्ल नंतर ...

नसरुद्दीन शहा एकदा कणकवलीत आले होते. नाट्य महोत्स्वाच्या निमीत्ताने..
मुलाखतीच्या निमीत्ताने खुप बोललो..
पण खुप थिटं वाटल त्यांच्यासमोर..
अभिनयसम्राट आपल्यातलाच एक होवुन जातो..
..........
स्त्रीयांनी मर्यादेत राहीले तर कोणी मर्यादा ओलांडणार नाही...
सिन्धुदुर्गात अलीकडेच आलेल्या सिन्धुताइ सकपाळांनी अशी प्रतीक्रीया दिली होती...

गेल्या आठवड्यात मला नागपुरला प्रसिद्ध लेखिका, सौ. आशा बगे भेटल्या. त्यांच्या व्याह्यांच्याच घरी मी होतो.
माझा एक लेख वाचून त्यांना मला भेटायची फार ईच्छा होती ( हे लिहितानाही मला ओशाळल्यागत होतेय. ) मी आल्यावर आपल्याला फोन करावा, मी लगेच येते असा निरोपच त्यांनी ठेवला होता.
त्या दारात आल्यावर मी त्यांना वाकून नमस्कार केला आणि दुसर्‍याच क्षणी आम्ही जूनी ओळख असल्यागत गप्पा मारू लागलो. एक जेष्ठ आणि श्रेष्ठ लेखिका असल्याचे दडपण तर त्यांनी अजिबातच जाणवू दिले नाही.
माझ्यासोबत आणखीही एक नाट्यलेखिका होती. तिने लिहिलेली काही नाटके सध्या परदेशात होत आहेत. पण तिचे विषय भारतीय नाटकात अजूनतरी आलेले नाहीत. तिच्याशीही त्यांनी त्या विषयावर दिलखुलास चर्चा केली. त्यांच्या कथेतील काही भाग आवडला नाही असे (तिने) सांगितले तर त्याबद्दलही त्या अगदी मोकळेपणी ऐकून घेत होत्या.
मी अजून त्यांच्या बोलण्याने आलेली भारलेली अवस्था अनुभवतोय.

दिनेशदा Happy आशा बगे हे नाव नक्कीच माहितीये पण त्यांची पुस्तक पटकन आठवत नाहीयेत . लेखक अनिल बर्वे ( डोंगर म्हातारा झाला/ थांक्यू मिस्टर ग्लाड /अकरा कोटी ग्यालन पाणी/ हमिदाबाईची कोठी / पुत्र कामेष्टी ) नाटक /कादंबर्यांचे लेखक माझ्या मोठ्या बहिणीचे सख्खे मोठे दीर. तिच लग्न झाल्यावर त्यांनी मला एकदा त्यांच्या नाटकावर सिनेमा काढणार होते म्हणून एका हिंदी डिरेक्टर ला भेटायला गेले तेव्हा घरी येउन उत्साहाने शुटींग दाखवतो म्हणून घेऊन गेले होते . मज्जा आली होती. फुलवा खामकर आणि राही बर्वे त्यांचीच मुल . शरद तळवळकर माझ्या नवर्याचे सखे मावसोबा आणि माधव वाटवे सख्खे मामा . माझे वडील वकील होते. प्रभाकर पणशीकर त्यांचे क्लायन्ट . तेच अनिल बर्वेनची केस घेऊन आले होते . विक्रम गोखालेना पण प्रभाकर पणशीकर यांनीच वडिलांच नाव सुचवलं. विक्रम गोखले केस च्या निमित्ताने सारखेच येत होते. वर्षा उसगावकर तिच्या सुरवातीच्या काळात " अनिल बर्वे " न कडेच राहत होती तिला पण अनिल यांच्या घरी बरेचदा भेटले आहे. तिचा ब्रम्हचारी नाटक बघायला गेलो होतो . एकदा विक्रम च ब्यारीस्टर नाटक बघायला गेलो होतो तेह्व्हा विजयाबाईंशी सासर्यांनी ओळख करून दिली दोन तीनदा " तेव्हा त्या सासर्यांना म्हणाल्या माधव ( वाटवे ) ची भाचेसून न ? माहितीये मला . किती वेळा ओळख करून देशील. विक्रम गोखले हसायला लागले. ते पण म्हणाले मला पण माहितीये तुमची सून. लग्नाच्या आधीपासूनच ओळखतो मी तिला Happy लाला देशमुख माझ्या वडिलांच्या मावस बहिणीचा मुलगा. माझा मावस आत्ते भाऊ . आणखीन बरीच आहेत सध्या इतकीच ")

बॉलिवुड सेलेब्रिटीज दिसण्याच्या बाबतीत माझं लक जोरदार आहे. स्वतःहून प्रयत्न न करता दिसलेले काही स्टार्सः
आमिरखान, इम्रानखान अन जेनेलिया (जाने तू..प्रिमिअर. मला माहीत नव्ह्तं प्रिमिअर आहे म्हणून)
झहीरखान, अन्नु मलिक, दलेर मेहेंदी, सोनु निगम, केके (गायक), लता मंगेशकर, राज ठाकरे, नाना पाटेकर, हेमामालिनी, दिनो मोरिआ वगैरे. हे सगळे एकतर हॉटेलमध्ये दिसले नायतर मॉलमध्ये..
अन्नु मलिक तर अगदी आमच्याकडे बघत होता की आता आम्ही ऑटोग्राफ मागू पण आम्हाला कळलंच नाही तेव्हा की हा अन्नु मलिक आहे Lol (हे हॉटेलच्या लॉबीमध्ये) कळलंही अस्तं तरी काय? Wink
माझं नशिबच असं..भेटायचंय रहमानला तर दिसतो अन्नु मलिक, भेटायचंय धोनीला तर दिसतो झहीरखान, भेटायचंय ह्रतिकला तर दिसतोय दिनोमोरिआ Lol दिनोमोरिआ छान दिसायचा हं पण Happy

नीळू भाऊ , शरद तळवळकर, मारुती चितमपल्ली यांना भेटण्याचा अन एकण्याचा योग आला .....
बाकी शिने श्टार आहेत पण पाहिलेले ..... Happy

बशीर बद्र; बशर नवाझ; मुमताझ राशिद याना भेटता आले.सुरेश भट, आनंद बक्शी याना भेटता आले नाही याचा (अत्यंत) खेद होतो.

पंडित रविशंकर -तोक्यो एअर्पोर्ट, शिवकुमार शर्मा, पु ल. देशपांडे- शेजारच्या घरी ( अंध्रुटकर काका- नाशिक), पं भीमसेनजी - आजोळी, पं मल्लिकार्जुनजी, आजोळी, श्री लार्सन ( लारसन टुब्रोचे ) परवानूस्/ऑफिसात, श्री डी सी आनंद- चेअरमन आनंद ग्रूप, श्री आनंद महेंद्र, श्री पवन गोएंका ( ऑफिसात्),सौ अश्विनी भिडे,श्री झुबिन मेहता- झुरिकमध्ये,हरिप्रसाद चौरसिया- अ‍ॅमस्ट्रडॅम एअरपोर्ट्,श्री अतुल किर्लोस्कर, श्री लाला श्रीराम, श्री सतिश कौरा -सी एम डी -सॅमटेल ग्रूप्,श्री तेलंग- टाटा मोटर्स, श्री रुसी मोदी -जमशेदपूर

कालिजात अस्तानी शशी कपूर यास्नी बलिवलं चीप ग्येष्ट म्हून. ग्याद्रिंगासाटी.
ममईथून पुन्यात इमानाने येनार आन जानार. आन हाटेल एक दिवस बुकायला लावलं. ब्लू डायमण्ड. आमी अक्खा खर्च क्येलेला.
म्हाराज आलं. चीप ग्येष्टगिरि केली आन ग्येलं. आम्ही जिम्खाना म्यानेजिंग कमिटिवालं. मंग तर सायेबाची भ्येट झालीच. ह्ये भेटलेलं पर्सिद्द व्यक्ती.
मंग त्ये गेल्यानंतर हाटेलीचं बिल द्याया गेलू तं हाटेल वालं म्ह्न्त्यात, ३०० रुपयं आजून द्या.
म्हंगलं कसाचं?
'सायबानी झब्बा पायजमा लाण्ड्रीत धुवाया दिल्ता. त्याचं बिल हाय.'
वर्गणी काढाया लागली हुती.
त्या फुडं ह्येमा माल्नी काकू आन मंग नाना पाटेकर दादा आल्ते. यास्नी कायच न्हाई तरास दिल्हा. पन शशी कपूर म्हंजी लै लक्षात. धुनी धुतल्यात त्यांची आमच्या पैक्यानं.

बर्‍याच वर्षांपूर्वी जुहूला एका शाळेत शिकवत होते. एका वर्षी अ‍ॅन्युअल फंकशनला डायरेक्टर रवी टंडन यांना सपत्नीक( रवीना टंडन चे आईवडिल), चीफ गेस्ट्स म्हनून बोलावले होते. शाळेचं फंक्शन म्हणून टंडन बाई अतिशय साध्या , सुती साडीबिडीत आल्या होत्या आणी फिल्लमी लोकं येणार म्हणून आम्ही टीचर्स , जर्रा भपकेबाज साड्या आणी बर्‍यापैकी मेकप, दागिने अशी तयारी करून गेलेलो.. इतका काँट्रास्ट दिसला ना.. नंतर जी हहपुवा झाली टीचर्स रूम मधे !!!!

Pages