समलिंगी संबंध - एक धोका

Submitted by manojprabhakar999 on 28 July, 2009 - 02:16

भारतात हल्ली पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करण्याचे फॅड वाढत चालले आहे. परंतू फक्त वाईट गोष्टींचेच अनुकरण जास्त होतेय. यातलाच एक प्रकार म्हणजे समलिंगी संबंध. तस पहायला गेलं तर ही एक विकृतीच आहे. विकृती म्हणजे जी प्रकृती नाही ते. प्रकृती म्हणजे नैसर्गिक.
न्यायालयाने या संबंधाना परवानगी दिली ती न्यायदानाच्या कक्षेत राहून.. त्यात त्यांनी काही चूक केली नाही. परंतू समाज, नितीमत्ता, सामाजिक बंधन ह्यांचा विचार केला गेला तर हे सर्वस्व चुकीचे ठरू शकेल. सामाजिक बंधने काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून घातली गेली आहेत.
खर तर अशा विकृतपणामुळे संपुर्ण समाज बिघडू शकतो. हे सर्वनाशाला कारणीभूत ठरू शकते. निसर्गचक्र थांबू शकते. प्रजनन ही क्रियाच अशाने कुंठीत होऊन जाईल. जे निसर्गाविरुद्ध आहे. सायन्सच्या भाषेत बोलायचं झालं तर नर आणि मादी यांच्या संबंधाचा यात मागमुसच नाही.
समलिंगी संबंधामुळे पुढे काय दुष्परिणाम होतील हे लक्षात घेतले नाहीत असं मला वाटतयं. असल्या संबंधामुळे एचाअयवी/एड्स सारखे रोग किंवा इतरही रोग फेलावत जाण्याची शक्यताच जास्त. असले रोग किती झपाटयाने फेलावतील याचा विचारच करवत नाही. अशिक्षित व्यक्ती शिक्षणमंत्री झाल्यावर शिक्षणव्यवस्थेचा जसा बोजवारा उडेल तसाच प्रकार इथे घडू शकतो.
ह्या अशा विकृत चाळ्यांना तरूण जास्त बळी पडत असल्याचे दिसून येते. रेव्ह पार्टीजमधून अशा विकृतींना उधाण येते.
ड्रग्स, दारुचा अतिरेक ह्या गोष्टी तरूणांमध्ये आढळून येतात. त्याही दोन स्तरांवर. एक ते ज्यांच्याकडे पैसा नाही आणि दुसरे ते ज्यांच्याकडे नको तेवढा पैसा आहे. ते सहज अशा विकृतींना बळी पडतात. मध्यमवर्गीय सहसा अशा गोष्टींकडे वळत नाहीत कारण ते समाजाला .... मनाला घावरतात.
न्यायालयाच्या न्यायदानाचा आदर आपण करायलाच हवा. या गोष्टी थांबू शकतात जर समाजाने मनावर घेतलं तर. पण जो मनाला घाबरतो तो हे मनावर घेणार नाही आणि जो मनाला घाबरत नाही तो समाजाला काय विचारणार ?
न्यायालयाच्या निर्णयाने अशा लोकांनी मुखवटे घालून व चेहरे रंगवून आनंद व्यक्त केला आहे. समाजासमोर ते ताठ मानेने येत नाहीत. अस का ? यांचा ताठ मानेने जगण्याचा अधिकार कोणी हिरावून घेतलाय.
कदाचित त्यांच्या दृष्टीकोनातून हे बरोबर असेल ही, पण सर्वांगिण विचार करता हे चुकीचे आहे.
खरतरं हा लेखप्रपंच मुर्खपणाचा ठरू शकतो. कारण विकृतीना बळी पडणारे यातून बाहेर पडत नाहीत आणि समाजाला त्यांच्याकडे पहायला वेळ नाही. ’आम्हाला काय करायचे आहे ? ’ ही वृत्ती झाली आहे. कदाचित मीही तेच म्हणेन. कारण मीदेखील या समाजाच भाग आहे.

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

साती, चिनुक्सच्या पोस्टीत उत्तर आहे. तेव्ढं शहाणपण सगळ्यात असतं. ह्याउपर आता समलिंगी संबंध पहिल्या ईतके टॅबू राहिले नसल्यामुळे आता येतात त्या पेक्षा भरपूर जास्त लोकं क्लोजेटच्या बाहेर येताना आढळले असते.

उदात्तीकरण करतंय कोण? माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की आपल्याला आवडत नाही, पटत नाही, आजूबाजूला बघायची सवय नाही म्हणून लगेच त्यावर अ‍ॅबनॉर्मल, विकृत अशी लेबलं लावायची गरज नाही.त्यातूनही एखाद्या/दीला समलिंगी संबंधात रस असेल तर तुम्ही/आम्ही कोण थांबवणारे?

अगो सक्ती नाही हे कळण्याइतके इथले विरोधक मूर्ख नाहीत. Happy विरोध एखादी गोष्ट लिगलाईज केल्यावर आणि पब्लिसिटी केल्यावर चुकीच्या गोष्टीही नॉर्मल समजल्या जातील याकरिता आहे. कृपया माझ्या पोस्ट परत एकदा वाच म्हणजे कळेल.

>>पौंगंडावस्थेतल्य समलिंगी आकर्षणानंतर नॅचरली भिन्नलिंगी आकर्षण सुरू होतं.
आता जर सगळिकडे समलिंगी संबंध नॅचरल असल्याचे ढोल असेच पिटले गेले तर ती बिचारी व्यक्ती या अवस्थेतून बाहेर येईल की तोच वे ऑफ लाईफ मानून त्यात अधिकाधिक गुरफटत जाईल?>>

असं काही कुणी सांगून वगैरे होत नाही. जे काही खरे सेक्शुअल ओरीएंटेशन असते तिकडे ती व्यक्ती वळतेच. मुळात ढोल पिटण्याची गरज काय? मुलांना सेक्स एजुकेशनमधे सोप्या शब्दात योग्य वयात याबाबत समजावून सांगितले असेल तर उलट जे काही वाटत आहे ते सामान्य आहे हे समजल्याने होणारी फरफट टळते. बहुसंख्य लोकं भिन्नलिंगी मात्र काही लोकं समलिंगी तर काही उभयलिंगी संबंध ठेवतात आणि हे जे काही आहे ते सामान्य आहे असे समजावले की काही गोंधळ उडत नाही उलट पौगंडावस्थेत होणारे शोषण टाळता येते.

शहाणपण काय? तसा ओढा नसताना त्या प्रकारचे संबंध जन्मभर ठेवणं (आणि उलट) ह्यूमनली शक्य आहे का?!

साती, इब्लिस,

तुम्हांला भेटली नाहीत, तरी तशी अनेक मुलंमुली आहेत. सामाजिक दबावामुळे ही मुलं समोर येत नाहीत, आणि लग्न करून मोकळी होतात. नाझ फाउंडेशन, हमसफर ट्रस्टसारख्या संस्था त्यांच्यासाठी काम करतात. सुप्रीम कोर्टात सध्या चालू असलेल्या खटल्यात जगभरातल्या शास्त्रज्ञांचं संशोधन पुरावे म्हणून कोर्टानं दाखल करून घेतले आहेत. अगदी शेजारच्या नेपाळमध्येही समलैंगिकांना सामान्य नागरिकांचे पूर्ण अधिकार आहेत. तिथे समलैंगिकता कायदेशीर आहे. आणि नव्या घटनेनुसार समलिंगी विवाहही कायद्याला मान्य असतील.

असो. वर दिलेल्या लिंका तुम्ही वाचल्या असतील तर हेही वाचा - http://www.medicalnewstoday.com/articles/111843.php

किंवा साती,
कदाचित आपल्या पहाण्यातली उदाहरणे सामाजिक दबावामुळे आपण वेगळेपणाने पहात असू?
इथे सातासमुद्रापलिकडिल वेगळ्या कल्चरमधे रहाणारे मायबोलीकरही सहभागी होताहेत, त्यांचा चष्मा वापरून मीही विषय समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.
तरीही *स्वतः सर्व पायर्‍यांतून जाऊनही* नॅचरल गे मला भेटलेले नाहीत हा मुद्दा आहेच Sad

चिनुक्स,
फक्त मेल होमोसेक्सुलिटीच का? फिमेल्स मधे नाहिये का?

.

महेश,
फॉर अ चेंज मायबोलीवरचा एक बाफ पॉझिटिव्ह चर्चा घेऊन पेटलेला आहे.
उणी दुणी निघत नाहीयेत. कृपया स्वतःस आटोक्यात ठेवा ही विनंती.

साती, इब्लिस
नॅचरली गे मुलं/मुली असतात की. माझ्या मुलाच्याच शाळेत सपोर्ट ग्रुप चालण्याइतकी आहेत. सुरवातीला स्वतःतले हे वेगळेपण जाणवते तेव्हा जी काही घालमेल होते ती ज्याची त्यालाच माहीत. Sad

>>सुरवातीला स्वतःतले हे वेगळेपण जाणवते तेव्हा जी काही घालमेल होते ती ज्याची त्यालाच माहीत.
बघा म्हणजे नैसर्गिक नाहीये हे, जर असते तर घालमेल झाली नसती ना.

स्वाती२
वर मी दिलेल्या लिंकांतला मूळ मुद्दाच तो आहे, की शाळेतल्या मुलांची ती फक्त एक नैसर्गिक 'फेज' आहे. पौगंडावस्थेतील सर्वच मुला मुलिंना समलिंगी आकर्षण जाणवते. सुमारे १२ ते १६ वर्षे असा तो कालावधी आहे.

या कालावधीत जर तुम्ही हीच संकल्पना रीइन्फोर्स केलित तर ती मनात फिक्स बसू शकते.

आय वुड से, लीव्ह देम अलोन. लेट देम ग्रो अप अँड देन चूज.

घालमेल होते कारण आजूबाजूला असलेल्यांपेक्षा हे वेगळं असतं. यंदाचा 'माहेर'चा दिवाळी अंकातला चित्रा पालेकरांचा लेख कृपया वाचा.

बघा म्हणजे नैसर्गिक नाहीये हे, जर असते तर घालमेल झाली नसती ना.
<<
असं नाहिये महेशजी.
नुसत्या हेटेरोसेक्सुअल सेक्सुअ‍ॅलिटीच्या जाणिवेनेही घालमेल होतेच.

चिनूक्स चित्राचा लेख मी पण वाचलाय.आणि वरच्या संस्थांची नावे आणि कार्ये पण!

इब्लिस , चष्मा कुणाचाही असो, जोपर्यंत डोळे माझे स्वतःचे आहेत तोपर्यंत मी ही गोष्ट लिगलाईज व्हावी , नॅचरल समजली जावी असे मानणार नाही. Happy
(तसं म्हटलं तर मलेरियाही नॅचरलच की . त्या बिचार्या प्लाजमोडियमला पण निसर्गाने बनवलंय आणि त्याच्या वाढीसाठी मानवाचं रक्त लागणार याची योजनाहि निसर्गानेच केलीय. कशाला हवंय इरॅडिकेशन , उसको भी जीने दो. Wink )

अवांतर

स्वाती, चिनुक्स
साती,इब्लिस असा एकत्र उल्लेख लागोपाठ दोन पोष्टींत झाल्याने जणू दोघे एकच व्यक्ति आहोत असे ध्वनित होइल Wink

/अवांतर

>> बघा म्हणजे नैसर्गिक नाहीये हे, जर असते तर घालमेल झाली नसती ना.
तुम्ही नैसर्गिक आणि सर्वसाधारण (कॉमन) यात गफलत करताहात.

चष्मा कुणाचाही असो, जोपर्यंत डोळे माझे स्वतःचे आहेत तोपर्यंत..
<<

चाळीशीनंतर चष्म्याशिवाय बागबान मधल्या बच्चन सारखी गत होते माणसाची Sad

वाचनमात्र चष्मिष्ट Wink इब्लिस

>> साती,इब्लिस असा एकत्र उल्लेख लागोपाठ दोन पोष्टींत झाल्याने जणू दोघे एकच व्यक्ति आहोत असे ध्वनित होइल
मग त्याचं कोणाला वाईट वाटेल? Proud

सॉरी, अगदीच राहवलं नाही. चर्चा चालू द्या. Happy

मला वाटते भरपूर सर्मिसळ चालली आहे मुद्द्यांची!

१. जैविक दृष्टिने समलिंग समागम. नैसर्गीकच वा अनैसर्गिक. व समलैगकतेचे वेगवेगळे प्रकार (असले तर)
२. कुटुंब व्यवस्था जी समाजाने तयार केली व वेळोवेळी बदलली आहे त्याचे स्वरूप व त्यात समलैंगकतेचे स्थान.
३. वाढते समलींगी सम्बंध व ह्याचा समाजावरील होणारा परिणाम
४. कायद्याच्या दृष्टीने दोन मानवातील लैंगीक संबंध. हे संबंध काय्द्याने रेगुलेट करण योग्य की अयोग्य.

हे सगळे मुद्दे जरी एकमेकात गुंतले असले तरी त्यंचा वेगवेगळा विचार होणे आवश्यक वाटते.

सुस्वागतम पेशवे!

पुढे सांगाल तर बरे वाटेल. इथले वीर खणाखणी करून जरा दमलेत असे दिसते आहे.

कायद्याच्या बद्दल बोलायचं तर याला 'अनैसर्गिक संभोग' म्हणून पनिशेबल ऑफेन्सचे कलम, परस्परसंमतीतील समलिंगी संभोगासंदर्भातून काढून टाकले तितके पुरे असे मला वाटते. पीपल शुड बी फ्री टू एक्स्प्लोअर लाईफ विदाऊट एनिबडी फोर्सिंग 'मोरालिटी' ओन देम, या तत्वा मुळे.

पुढे मग समलिंगी विवाह अन समाजव्यवस्थेबद्दल बोलता येईल.

Pages