गेले २ दिवस दिल्लीच्या रेपची माहिति वाचण्यात येत आहे. आजकाल बर्याच कारणाने महिलांना उशिरा पर्यंत घराबाहेर राहावे लागते. किंवा बाहेरगावी सुद्धा एकटे रहावे लागते. काहि सिंगल पेरेंट सुद्धा आहेत. अशा वेळी एकटे राहाणार्यानी घरि आणि घराबाहेर काय खबर्दारी घ्यावी? असा धागा असेल तर हा उडवुन टाकेन.
कवठीचाफा | 26 December, 2012 - 10:14
साडेतीन-चारवर्षे सेल्फ डिफेन्स अॅकेडमी नावाच्या संस्थेसोबत लहान काळाची शिबीरं झाली त्यात ज्या गोष्टींचे ट्रेनिंग दिले त्यातल्या महत्वाच्या गोष्टी. केवळ स्त्रियाच नाही पुरूषांनाही उपयोगी पडू शकतील अश्या.
१ ) कधीही समोरच्या व्यक्ती एकापेक्षा जास्त असतील तर प्रतिकारापेक्षा माघार घेणं उपयुक्त अर्थात याचा अर्थ थेट पळायला सुरूवात करणं असा नाही, यात तुम्ही दमाल आणि आयतेच हाती सापडाल.
२ ) सर्वात आधी परिस्थिती/वातावरणाचं बारकाईनं निरीक्षण करत रहायला हवं अनेकदा संभाव्य धोका लक्षात येतोच.
३ ) समोरच्या व्यक्तींमधल्या म्होरक्या किंवा लिडरकडे आधी लक्ष द्या, (काही सेकंदातच तो लक्षात येतो ) आपलं पहिलं लक्ष्य त्यालाच करा. आता कसं ? ते पुढे
४) पायात जर हिल्स असतील तर त्यांचा आघात गुडघ्याच्या बाजूच्या भागावर करा, लक्षात घ्या संवेदनशील भागावर हल्ला होणार या तयारीत समोरची व्यक्ती असते तीथे प्रहार वाया जाईल. गुडघ्याचा बाजूचा भाग हा देखील विक पॉइंटच असतो तिथला मार सहन होत तर नाहीच पण त्यानंतर काहीकाळ पायही टेकता येत नाही.
५ ) डोळे हा अतिमहत्वाचा भाग त्याला लक्ष्य करा
६ ) पेन, डोक्यातली क्लिप ही उपयुक्त हत्यारं आहेत त्यांचा वापर करा, यांच्यासाठी हाताचा कोपराजवळचा भाग, तळहाताचा मागचा भाग, कान, त्याच्या मागच्या सॉफ्ट टिश्युज यांना लक्ष्य करा
७ ) पाठीमागुन पकड घातल्यावर ताबडतोब हताश होऊ नका ( सामान्यपणे इथेच आपण गडबडतो ) पायाच्या टाचेचा आघात मागच्या व्यक्तीच्या पायाच्या नडगीवर करा आथवा हातातला पेन, पीन मागच्या व्यक्तीच्या कानाच्या आसपास मारा.
८ ) दातांचा वापर करा मात्र हात किंवा दंड यांच्या बाबत माणूस सहनशील असू शकतो, त्यांचा वापर कान आथवा मानेवर करा.
९ ) दगड हे उत्तम शस्त्र आहे, अंतर मिळालं तर हमखास वापर करा
१० ) हे सगळं करण्यासाठी, मनात बेडरता आणि क्रूरता येण्याची गरज आहे त्याचसोबत सवयही लागण्याची गरज आहे. शक्य झाल्यास कुणीतरी पार्टनर घेऊन नॉनफेटल प्रॅक्टीस करा.
११ ) प्रतिकार करायचाच आहे याची खूणगाठ बांधून शरीर शिथील ठेवण्याची सवय करून घ्या.
उदयन.. | 18 December, 2012 - 22:15
चोरटे स्पर्श, नको तिथे चिमटे यांकडे दुर्लक्ष करा. आठवड्यातून तीन वेळा तुम्ही कुर्ला दादर अश्या ठिकाणी एकटीच नेहमी मारामारी करत बसू शकत नाही. >>>>>>>>>> इथेच चुकतात तुम्ही......एक ब्लेड नाहीतर लहानसा धारधार चाकु ठेवा..... असे काही झाल्यास लगेच मारा.......तेही जोरात.... परत कुणाला हात लावणार नाही
सामोपचार | 18 December, 2012 - 22:17
उदयनजींना अनुमोदन.......हल्ली लहान नेलकटरसारखी अवजारे असतात ती जवळ ठेवावीत. पटकन काढून भोसकायला बरी पडतात.
स्मितू | 18 December, 2012 - 22:57
मी उदय च्या मताशी सहमत आहे.... ...ट्रेन मध्ये... बसमध्ये प्रवास करतांना महिलांना ,मुलींना आश्या बर्याच प्रसंगांना तोंड द्यावे लागते आश्या वेळेस मुलींनी.... आपल्या जवळच्या सेफ्टी पिन चा वापर करावा.... पुरुषाच्या घाणेरड्या हालचाली लक्षात आल्या की लगेच बारिक पिन टोचायची...बरोबर चुपचाप बसतो तो.... ब्लेड, चाकु हे हत्यार जरा जास्तच होते..
शक्य्तोवर रात्रीचा प्रवास एकटीने टाळावाच... खुपच अर्जंट असेल तर सोबत कोणाला तरी घ्यावे...
mansmi18 | 19 December, 2012 - 03:12
पेपर स्प्रे मधे पेपरच असायला हवा का? हौ अबाउट सल्फ्युरिक अॅसिड?
असे काही चाळे करणार्यावर महिलानी अॅसिड का टाकु नये? एक दोन लोकाना या अॅसिडचा प्रसाद मिळाला की पुढे अशी काही विकृत इच्छा असणारे पुरुष असे काही करण्याआधी शंभर वेळा विचार करतील.
swanand_ml | 19 December, 2012 - 16:42
मला तात्वीक चर्चेत रस नसल्याने फारसे प्रतीसाद न वाचता प्रतिसाद देत आहे तरी माफी असावी.
महिलांसाठी स्वसंरक्शणावर दोन शब्द लिहु इच्छीतो.
ज्याला जगायचे आहे त्याला झगडावे लागेलच.
महिलांनी शस्त्र बालगण्यावर येथे चर्चा झाली. मला स्वताला ह्या दोन गोष्टी आवडतातः
http://en.wikipedia.org/wiki/Karambit
http://en.wikipedia.org/wiki/Push_dagger
लपवीण्यासाठी सोपे, हाताळण्यासाठी सोपे व हिसकावून घेण्यास अवघड. इंटरनेट वर उपलब्ध.
केवळ शस्त्र आहे हे पुरेसे नसते. ते हाताळन्याची व वापरण्याची मानसीकता असणे गरजेचे असते. त्यासाठी प्रशीक्शण गरजेचे आहे.
बंगळुर वासी येथे जवु शकतातः
http://kravmagabangalore.in/
मुम्बई: http://www.kravmagaindia.in/locations/mumbai
दिल्ली: http://www.kravmagaindia.in/locations/delhi
वरील प्रशिक्शण केंद्रे शस्त्रप्रशिक्शणाची नसून संरक्शण प्रशिक्शण केन्द्रे आहेत ह्यची नोन्द घ्यावी.
बहुत काय लिहणे. आपण सुज्ञ असा.
दिनेशदा | 21 December, 2012 - 05:52
मीही जसे सुचेल तसे लिहित जातोच. एकटे घराबाहेर पडल्यावर, जर कुठल्याही असुरक्षित भागातून जात असू तर अगदी नियमित रित्या घरच्या व्यक्तीला किंवा सहकारी व्यक्तीला फोन करुन आपला खरा ठावठिकाणा कळवत राहणे हा एक उपाय सुचतो मला.
संध्याकाळच्या वेळी आपल्या परिसरातील कुठलाही भाग एकाकी राहणार नाही, याची काळजी. घरी असणार्या किंवा जेष्ठ व्यक्तीनी घेतली तरी चालेल. अशा भागात गटाने ऊभे राहून चर्चा करावी, जाग राखावी.
घरीच कंटाळत कण्हत राहण्यापेक्षा. बसस्टॉपवर / नाक्यावर जाऊन ऊभे राहिले तर काय वाईट ?
पुर्वी आमच्या कॉलनीत यायला अंधारा रस्ता होता. त्यावेळी एखाद्या व्यक्तीला उशीर होत असेल, तर घरची माणसे रस्त्यावर जाऊन थांबत असत. तसेच कुणी एकटा माणूस असेल, तर तो सोबत मिळेपर्यंत हायवेवरच थांबत असे.
ज्यांची कामाला जायची जागा निश्चित आहे त्यांनी यायच्या जायच्या वेळी गटाने आणि तेसुद्धा स्त्री आणि पुरुष अशा मिश्र गटाने शक्यतो प्रवास करावा. जर यायच्या जायच्या बस किंवा गाड्या ठराविक असतील, तर
सहप्रवाश्यांशी मैत्री करावी. एखादा सहप्रवासी नेहमीच्या वेळी दिसला नाही तर चौकशी करावी.
नीधप | 21 December, 2012 - 08:28
प्रतिकार करा हा उपाय व्यवहार्य नाही <<<
सतत शक्य नाही. हपिसला/ कॉलेजला जाताना, घरी परतताना... रोजचे रोज
एखाद्या दिवशी केला जातोच.
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.
Kiran.. | 21 December, 2012 - 08:50
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.
+
()महिला जागृतीसाठी अभियान निर्माण करणे : राज्य / राष्ट्रव्यापी अभियान आणि त्याच्या गाव/तालुका/जिल्हास्तरीय समित्या यातून कायमस्वरुपी जागृती घडवून आणणे. यात स्वयंसेवी संस्था / सरकारी संस्था / खाती यांचा समन्वय साधलेला असावा. कार्यकर्त्या निर्माण करून घराघरापर्यंत जागृतीचे अभियान न्यायला हवे.
* ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी परिसंवाद / वर्कशॉप्स राबविणे. माध्यमप्रतिनिधी / पोलीस / न्याययंत्रणा यांच्या प्रतिनिधींनाही सामान्यजनांबरोबर सहभागी करून घेतल्यास लोकांच्या अपेक्षा आणि प्रत्यक्षातल्या अडचणी याबद्दल देवाण घेवाण होऊ शकेल.
* महिलांविषयक गंभीर गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालयांची स्थापना व्हावी यासाठी पाठपुरावा करणे.
आहना | 21 December, 2012 - 08:46
१. पेपर स्प्रे बाळगणे>>> पेपर प्रे उपलब्ध नसल्यास पर्स मधे डिओड्रन्ट वापरा
उदय | 21 December, 2012 - 09:01
(अ) प्रसंगावधानता दाखवणे महत्वाचे आहे. १९९८, दिल्लीच्या DTC मधेच एका युवतीवर असाच प्रसंग आलेला होत, पाच लोकांशी सामना करत सुटका केली... पुढे कोर्टाने गुन्हेगारांना शिक्षाही दिल्यात.
थोडा कमी पणा आला तरी चालेल, पण 'पाच लोक' टवाळी करत आहेत, तर तेथे हुज्जत घालण्यापेक्षा सटकणे महत्वाचे. माघार घेण्यात कमीपणा कधिच नसतो...
युक्ती (थोडे डोक) आणि बळ असा समन्वय साधल्यास घटना कमी घडतील.
(ब) सर्वात महत्वाचे असे प्रसंग अगदीच अनोळखी लोकां कडुनच होतात हा गैरसमज काढुन टाकणे. बहुतेक प्रकारांत ओळखी किंवा नात्यामधिलच व्यक्ती असतात. वर अनेकांनी सुचवलेल्या उपायांत हा मुद्दा मला दिसला नाही म्हणुन लिहावेसे वाटले.
दर दिवशी जरी त्याच व्यक्तीसोबत प्रवास करत असाल किंवा कामा निमीत्त संपर्कात येत असलांत, तरी प्रत्येक क्षणी सतर्क राहुन "उद्देशांत काही बदल झालेला नाही आहे नां?" हे तपासायला हवे. दोन व्यक्ती एकाच ठिकाणि काम करत आहेत, कामा निमीत्त प्रवासाला सोबत जावे लागणार आहे... सावध आणि सतर्क रहाण्यात काहीच हरकत नाही.
(क) प्रसंगावधानता मधे गाड्यांना (मग ऑफिसची असेल किंवा सार्वजनिक वहान असेल) पारदर्षक काचा नसतील तर प्रवास करायला चक्क नकार द्यायचा. सार्वजनिक वहानांना कशासाठी हवेत टिंटेड काचा किंवा पडदे ?
प्रिया७ | 21 December, 2012 - 16:12
ब्राईट एलईडि फ्लॅश लाईट जो वेळ प्रसंगि कामी येतो सरळ डोळ्यात मारता येतो,सेफ्टि पिन,सेल फोन वर (९११) किंवा ईमर्जन्सि नंबर स्पीड डायल ला सेव्ह करुन ठेवणे, पेपर स्प्रे नसेल तर छोटि परफ्युम बाटलि सुद्धा वापरता येते, फेसबु़क वर कुठे जात असाल तर त्याची माहिति न टाकणे किंवा Laxmi (कसे लिहायचे मराठित) पुजन चे दागिन्यांसकट फोटो न टाकणे,कुठे एकटे असतांना कानात हेड्सेट घालुन ठेवु नये,गाडि चे रिमोट लॉक गाडिजवळ जावुनच उघडणे,गरज पडल्यास खोटे बोलणे,रात्रिच्या वेळि एकटे असाल तर कोणाला दया दाखवायच्या आधि/ मदत करायच्या आधि २-३ दा विचार करा .
मुंगेरीलाल | 23 December, 2012 - 00:51
एक साधा आणि परिणामकारक उपाय म्हणजे एक जोरदार, तीव्र आवाजाची शिट्टी (पर्समध्ये अथवा किचेन म्हणून) जवळ बाळगणे. कुठलाही गुन्हेगार (किंवा त्यांचा समूह) एका क्षणात दचकतो आणि तुम्हाला सुटका करून घेण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. शिवाय हे शस्त्र नसल्यामुळे जवळ ठेवण्याला कुठली परवानगीही लागत नाही आणि वापरायला कसलं कौशल्यही लागत नाही.
अश्विनीमामी | 23 December, 2012 - 03:12
एक गोष्ट मला लक्षात आली, मुली, स्त्रीया ऑफिसला जातात किंवा घरी उशीरा येतात. तर आपला हपीसचा मजला आणि ग्राउंड फ्लोअर, कँतिनचा फ्लोअर हेच सहसा माहीत असते. घरीही तेच. ग्रा. फ्लो आणि आपला मजला. व्यतिरिक्ग आपली बिल्डिंग कशी दिसते आपल्याला माहीत नसते. सवडीने, फुल प्रकाशाच्या दुपारी पूर्ण बिल्डिंग/ ऑफिस काँप्लेक्क्ष , खास करून पार्किंगची जागा ह्याची माहिती करून घ्यावी. नजर सरावलेली असावी. फोटो काढून जागांची माहिती करून घ्यावी. प्रत्येक जागी आडोसे, अंधार्या जागा, उंचावरून मुलीला फेकून देता येइल अश्या जागा विशेषतः पार्किंग मध्ये खूप आढळतील. त्या अवगत करून घ्याव्यात. मैत्रिणींना, घरच्यांना सांगावे बोलावे ह्याबाबत. बरेचदा पहाटे किंवा रात्री आपलीच बिल्डिंग अनोळखी भीती दायक जागा बनू शकते. अॅटॅकरला तेच हवे असते. तो तुमचा गैरफायदा घेण्यास पूर्ण समर्थ असतो. फोनवर इमर्जन्सी नंबर आधीच देऊन स्पीड डायल वर ठेवावा. आयत्यावेळी कोणाला फोन करावा असे व्हायला नको.
पोर्टेबल टेसर सारखे उपकरण पर्स मध्ये असावे. बॅटरी नक्की. मुली फ्लॅट मध्ये राहात असतील तर शक्य असल्यास एक कुत्रा नक्की पाळावा. हे मी विनोदाने आजिबात लिहीत नाही. त्यासारखे संरक्षण नाही.
पुरुषांना त्याची भीती नक्की वाट्ते.
बिनओळखीच्या पुरुष व स्त्रीयांशी आजिबात बोलू नये. लिफ्ट मध्ये खास करून.
वॉचमन ला पण आपल्या जाण्या येण्याच्या पॅटर्न ची माहीती फार देऊ नये. रिक्षा वाले टॅक्सीवाले कधे कधी फार बोलतात त्यांना उत्तेजन देऊ नये. इथे किती पटेल माहीत नाही पण शहरांमध्ये सर्विस इंडस्ट्री जसे वाहन चालक, वेटर, वॉचमन ऑफिसातील प्यून्स वगैरे बाहेरच्या राज्यातून आलेले एक्टे
पुरुष असतात. एकाच रूटीन कामात अडकलेले, जास्तीच्या तासांचे काम करून वैतागलेले असतात.
बायको गावी त्यामुळे ..... पण त्यांना आपली मानसिकता समजेल अश्या भ्रमात राहू नये. स्त्रीवाद वगैरे तर दूरची गोष्ट.
सुमेधाव्ही | 29 December, 2012 - 08:02
आमच्या ऑफिसमधे मध्यंतरी एसीपी पुणे यांचे भाषण झाले होते त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या खालीलप्रमाणे, (भाषण साधारणपणे हिंजवडी परिसरात काम करणार्या महिलांची सुरक्षा असा असल्यामुळे नयन पुजारी केसच्या संदर्भात होत्या पण त्या सगळ्यांनाच उपयोगी पडतील त्यामुळे आठवेल तसे लिहिते आहे.)
पुणे पोलीस, फोन नं फक्त १०० एवढाच नाहीये. १०० नं लक्षात रहाण्यासाठी उत्तम पण इथे काहीही+ सर्व कंप्लेंट्स येत असतात त्यामुळे हा नं दर वेळेस लागतोच असे नाही. त्यामुळे इतर नं पण माहीत हवेत. ते मोबाईलवर सेव्ह केलेलेही हवेत.
पोलीस कं रुम. १००, २६१२२०२, महिला/ बाल हेल्पलाईन - २६०५०१९१ क्राईम अॅलर्ट -२६११२२२.
हे नं दिवाळी किंवा कोणत्याही निमित्ताने शुभेच्छा संदेशाबरोबर एकमेकांना वारंवार समस करून पाठवले म्हणजे मग ते आपोआप सेव्ह होतात व सेव्हड रहातातही.
(वि.सु. पोलीसांशी बोलताना मराठी लोकांनी मराठीतच बोलावे, कारण पुण्यातले जवळपास सगळे पोलीस पुणे परिसरातले व मराठी बोलणारे आहेत. इंग्लीशला ते कधीकधी बिचकतात व मग संभाषण नीट होऊ शकत नाही.)
अनोळखी व्यक्तीकडे लिफ्ट मागु नये. सार्वजनीक वहान सगळ्यात सेफ.
काही जणींना कॅबमधून यावे लागते ती कॅब जरी कं ने पुरवली असेल तरी ती बाहेरील एजन्सीकडून आणलेली असते त्यामुळे सजग रहावेच लागते. कॅबमधे बसल्यावर "रोज"सगळ्यांना ऐकू जाईल अश्या आवाजात घरी एक फोन करायचा. त्या फोनमधे कॅबचा नं तुम्ही उच्चारुन अमुक अमुक कॅबमधून तुम्ही प्रवास करत आहात व आत्ताचे तुमचे लोकेशन सांगायचे व अजून कीती वेळ घरी पोचायला लागेल त्याचाही उल्लेख करायचा. (जर का मोबाईलमधे बॅलन्स नसेल, किंवा रेंज येत नसेल तरी हा फोन खोटा खोटा असायलाही हरकत नाही. तेवढे अॅक्टींग जमवायचे स्मित
"कायम" हो हो...कायम्...कधीही जोरात पळता येउ शकेल असेच बुट्/चपला/कपडे असावेत. म्हणजे उंच टाचांचे बुट वगैरे ऑफिसात किंवा ऑफिसच्या पार्टीजना जिथे तुम्ही एक्ट्या जाणार आहात तिथे नकोत.
आर्थिक व्यवहारांची, घरगुती भांडणे, भानगडींची चर्चा कॅबमधे नकोच. इथे रोज अॅलर्ट रहायला हवेच.
बरेचसे कॅब ड्रायव्हर हे युपी एमपी मधील खेड्यांमधून आलेले असतात जिथे बायका त्यांच्या दृष्टीसही फारश्या पडत नाहीत. त्यामुळे शहरातल्या कॉन्फिडन्ट, पैसे मिळवणार्या, स्वतःच्या मर्जीप्रमाणे खर्च करणार्या व स्वतंत्र विचारांच्या बायकांबद्दल त्यांना असुया वाटते. अनेकदा त्यांचा इगो दुखावल्यामुळे सुडापोटी पण बलात्कार केले जातात. त्यामुळे शक्यतो ह्या लोकांशी हुज्जत न घालणे, जेवढ्यास तेवढे बोलणे, जास्त माहीती शेअर होणार नाही हे पहाणे हे महत्वाचे. काही मुली कॅबमधे बसल्या की घरच्यांशी जे काही बोलतात त्यातून बरीच माहीती दुसर्याला मिळते आहे हे त्या विसरतात.
एटीएम मधे दर शुक्रवारी पैसे काढणे, एकाच एटीएम मधून पैसे काढणे असे करू नये...बदलत रहावे. थोड्क्यात म्ह़णजे प्रेडीक्टेबल राहू नये. बर्याच जणी जाता जाता २ मि. थांबायला सांगून एटीएम मधून पैसे काढतात.
एकटीदुकटी मुलगी/स्त्री रात्री कारमधून घरी परत जात असताना जर गाडी बंद पडली, तर आड रस्त्यावर असाल तर गाडीतून बाहेर पडण्यापेक्षा पोलीसांना फोन करावा. रात्री त्यांच्या मोबाईल व्हॅन्स हिंजवडी परिसरात गस्त घालतात. (त्यांचा सेल नं पण आहे) त्या दहा मिनिटात मदतीसाठी पोचू शकतात.
एम. पोस्ट आवडली.
एम. पोस्ट आवडली.
लोकप्रभातला एक लेख - मी तरी
लोकप्रभातला एक लेख - मी तरी याच्याशी सहमत - http://www.lokprabha.com/20130104/matitartha.htm
लोकप्रभातला एक लेख - मी तरी
लोकप्रभातला एक लेख - मी तरी याच्याशी सहमत - http://www.lokprabha.com/20130104/matitartha.htm >>> चांगला लेख आहे.
एम., >> त्या मुलाने
एम.,
>> त्या मुलाने आमच्यापुढे आईची कॅसेट वाजवली अन आम्ही सुधरलो.
मुद्दा पटला. बाईने कितीही उत्तान कपडे घातलेले असले तरी तिच्याकडे मादी म्हणून बघू नये. चुकून अनावृत्त झालेल्या स्त्रीची तर बातच दूर!
आ.न.,
-गा.पै.
हा एवढा सोपा उपाय असतांना इतर
हा एवढा सोपा उपाय असतांना इतर उपायांची गरजच काय म्हणा!
थोपुवरून साभार!
***
"आज देशामध्ये बलात्कार व बलात्कारीयांचे प्रमाण खूपच वाढल्यासारखे दिसत आहे. आपल्या देशात अशा नराधमांना शिक्षा करण्यासाठी कडक कायदे नसल्याची ओरड तर सर्वत्र होत आहे. सरकार देखील याबाबत ठोस निर्णय घेण्यात कचरत आहे असे दिसत आहे. सामान्य माणूस आपली सकाळी घराबाहेर पडलेली मुलगी संध्याकाळी सुखरूप घरी येईल कि नाही या विवंचनेत दिवस काढतो आहे. मात्र परमेश्वराचे नियम खूपच कडक असून बलात्कार करणाऱ्यांना शिक्षा हि नक्कीच आहे.
दिनांक ३ जानेवारी रोजी आपल्या परमपूज्य सद्गुरूंनी श्रीहारीगुरुग्राम येथे सर्व स्त्रियांना भयमुक्त केले. एवढेच नाही तर, एका गोष्टीची खात्री बाळगायला सांगितली कि यापुढे कोणीच माझ्या मुलींकडे वाकडया नजरेने पाहू शकणार नाही .
परमपुज्य बापूंनी खालील पंचसुत्री सांगितली,
०१. कोणावरही बलात्कार झालेला असेल व त्या व्यक्तीने १०८ वेळा अनिरुद्ध चलिसा ११ दिवस म्हंटली तर बलात्कार करणारी व्यक्ती नपुंसक होईल व तसे झाल्याचे सर्वांना लगेच कळेल .
०२. जी व्यक्ती रोज पाच वेळा श्रीअनिरुद्ध गुरूक्षेत्रम मंत्र म्हणेल त्या व्यक्तीवर कोणी कुठ्ल्याचप्रकारे जबरदस्ती करू शकणार नाही.
०३. ज्या व्यक्तीला स्वतःवर बलात्कार होईल अशी सतत भीती वाटते त्या व्यक्तीने श्री मातृवात्सल्य उपनिषदातल्या, श्रीशिवगंगागौरीच्या महात्म्याचे दोन अध्याय वाचाल्यासं त्या व्यक्तीचे भय व भयाचे कारण कायमचे नाहीसे होईल.
०४. ज्या व्यक्तीस लिहिता वाचता येत नसेल अशा व्यक्तीने पूर्ण विश्वासाने व प्रेमाने फक्त अनिरुद्ध अनिरुद्ध म्हंटले तर सर्व वाचन स्वतः सद्गुरु करतील व त्याचा संपूर्ण फायदा त्या व्यक्तीस मिळेल.
०५. अहिल्या संघाच्या बल गटास व श्रीचंडिका आर्मीच्या गटास स्वतः परमपुज्य बापू असे टेक्निक शिकवणार कि ज्याने बलात्कार करणारा लागलीच कायमचा नपुंसक होईल.
परमपुज्य सद्गुरूंनी सर्वांना सांगितले कि आत्माविश्वासाने भयमुक्त जीवन जगा व त्या परमात्म्यावर मनापासून प्रेम करत संपूर्ण सुखमय जीवनाचा आनंद लुटा.
आपण खरोखरच फार सुदैवी आहोत की आपल्याला बापुंसारखा बाप, नंदाईसारखी आई आणि सुचीतदादासारखा मामा सातत्याने आपले सर्व वाईट गोष्टींपासून रक्षण करावयास ढालीसारखे आपल्या सर्वबाजुनी उभे आहेत.
श्री राम आणि हरि ओम "
****
तेव्हा मातांनो आणि भगिनींनो निर्धास्त व्हा!
आर यू सिरीयस????
आर यू सिरीयस????
काय भारी उपाय आहेत. बलात्कार
@प्रमोद देव हे थोपुवर आलेले
@प्रमोद देव
हे थोपुवर आलेले गांभीर्याने आहे कि उपहासात्मक आहे?
सायो +१०००
सायो +१०००
भयाण आहे ती वरची पोस्ट...
भयाण आहे ती वरची पोस्ट...
थोपुवर आणि इतरही असलं फिरत
थोपुवर आणि इतरही असलं फिरत असतं सिरीयसली.
इथे उपहासाने टाकलं असावं अशी आशा आहे.
देवा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
देवा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
अरे देवा..... इतके दिवस कुठे
अरे देवा.....
इतके दिवस कुठे होते हे...इतका दंगा सुरु असताना....
आता मला वाटतं सगळ्या चॅनेलवरून बापूंचे व्याख्यान सतत दाखवायला हवे...आख्या समाजातून बलात्कारी नाहीसेच होतील....
@प्रमोद देव बापुंसारख्या
@प्रमोद देव
बापुंसारख्या सत्पुरुषाविषयी माहिती दिल्याबद्द्ल धन्यवाद!
आता माता भगिनींना त्यांनी बलात्कारापासून भयमुक्त होण्याचे मंत्र दिले आहेतच तेव्हा त्या भयमुक्त होतीलच.
भाववाढ, चोर्या, बेकारी, अपघात, जीवघेणे आजार अशा अनेक गोष्टींच्या संभाव्यतेने आम्ही भयग्रस्त आहोत. त्यासाठी त्यांचेकडे मंत्रोपचार असतीलच. मला आता त्यांचा पत्ता मिळवावाच लागेल. तो मिलाला की टाकतोच इथे!
तमाम माबोकरांना सम्पूर्ण भयमुक्त होता येईल.
बापूंच्या पावरविषयी हलकट
बापूंच्या पावरविषयी हलकट कॉमेंट करणार्यांच्या जिभा झडून जाव्यात (किंवा कीबोर्ड जळून जावेत किंवा बोटे झडून जावीत) म्हणून मी आयएमए तर्फे (बापू गोल्ड मेड्यालिस्ट एमडि डोक्टर आहेत म्हणे) जप अॅरेंज करायचा प्रयत्न कर्णारे!
(बिन्डोक) इब्लिस
(बिन्डोक मोड
(बिन्डोक मोड ऑफ)
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र,
भास्करा,
आहे की मन्त्र
>>
भય *** ** ................!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!<<
इस्रू नका हो भौ, जप करा
प्रमोद देव, तुम्ही कॉपी
प्रमोद देव, तुम्ही कॉपी पेस्ट केलेला मजकूर फक्त बापुंवर श्रद्धा असलेल्या स्त्रियांसाठी आहे. बाकीच्यांचा त्याच्याशी काही संबंध नाही आणि बापुंनीही हे इतर कुणासाठीही सांगितलेले नाही. फेसबूक अश्या अनेक गोष्टी आपल्याला न पटणार्या वाचनात येतात व त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो तसे इतरांनी करावे. या उप्पर आपली मर्जी. धन्यवाद.
लोक कसे विचार करतात/कोणते
लोक कसे विचार करतात/कोणते उपाय सुचवतात/कशावर विश्वास ठेवतात वगैरे बाबतीतला मनोरंजक वाटलेला हा मजकूर मुद्दाम इथे दिलाय....माझा असल्या उपायांवर काडीचाही विश्वास नाही....ज्यांचा विश्वास असेल त्यांच्या बाबत काही न बोललेलेच बरे.
ज्यांचा विश्वास असेल
ज्यांचा विश्वास असेल त्यांच्या बाबत काही न बोललेलेच बरे.>> उत्तम! यात मीही आले कारण माझी बापुंवर अढळ श्रद्धा आहे.
हे असले भंपक मजकूर जर खुलेआम
हे असले भंपक मजकूर जर खुलेआम फिरणार असतील तर याबद्दल केवळ श्रद्धा असलेल्यांपुरते आहे इतरांसाठी नाही याला काही अर्थ नाही.
कुठली स्तोत्रे म्हणून बलात्कार टाळले जातात असला भयंकर चुकीचा प्रचार केला जात असेल तर तो प्रचार करणारा, विश्वास ठेवणारा सगळेच निषेधार्ह आहे.
म्हणून तर वर म्हटलं "या उप्पर
म्हणून तर वर म्हटलं "या उप्पर आपली मर्जी".
श्रद्धा असणं गैर नाही. पण वर
श्रद्धा असणं गैर नाही. पण वर सुचवलेले उपाय प्रचंड हास्यास्पद आहेत आणि श्रद्धेशी खेळणं , त्यांचा बाजार मांडणं आहे.
दुर्दैवाने बापू भक्तगणांपैकी कुणावर अशी वेळ आल्यास तिने जरुर करुन पहावेत उपाय. मनात श्रद्धा आहे म्हणजे त्याचं फळ तिला मिळेलच.
आमची कणभर श्रद्धा नाही. आणि
आमची कणभर श्रद्धा नाही. आणि स्तोत्रे म्हणून कुणी बलात्कारापासून वाचू शकेल हे संभवत नाही. मग ते स्तोत्र कोणतेही असो. यावर माझी अढळ श्रद्धा आहे.
असल्या पत्रकांचा प्रसार होणे हे समाजविघातक आहे यावरही माझी अढळ श्रद्धा आहे.
नी, सहमत.
नी, सहमत.
ती पोस्टच उडवून टाका ना..
ती पोस्टच उडवून टाका ना.. आताच्या वातावरणात आणि झी टीव्हीवर त्या मुलाची मुलाखत पाहील्यानंतर ती अतिशय भयानक वाटतेय. या मुलाने समाजाच्या अलिप्त राहण्यावर कोरडे ओढलेत. अर्धा पाऊण तास अनेक गाड्या तिथून गेल्या, कुणीही मदत केली नाही. मी दहा बारा दिवसांपूर्वीच समाजातलं क्षात्रतेज लोपलं आहे अशा अर्थाची पोस्ट लिहीली होती. पोलीस स्टेशनची पायरी न चढणे, साक्ष द्यायला न येणे,घटना घडत असताना बघ्याची भूमिका घेणे हे खरेतर दंडनीय अपराध मानले जायला हवेत. यातलेच काही जण मेणबत्ती मोर्चातही सामील झाले असतील.. कोडग्यांची समाजात कमी नाही.
यातूनच महिलांनाच तुमच तुम्ही संरक्षण करा हे सांगण्याची पाळी आलेली आहे. हे दुर्दैव आपल्या पुरूष असण्याचं आहे.
नीधप यांना पाप लागणारे
नीधप यांना पाप लागणारे
काय इब्लिस.. नवीन सांगा की
काय इब्लिस.. नवीन सांगा की राव काहीतरी.
पण जगद्गुरू बापू जगातून ही
पण जगद्गुरू बापू जगातून ही अशी कीड नाहीशीच का करून टाकत नाहीत मंत्रबलाने? त्यात विश्वास असणारे नसणारे अशी विभागणी का?
अरेरे मग १% ला चाळणी कशी
अरेरे मग १% ला चाळणी कशी लावणार हो ताई?
या मुलाने समाजाच्या अलिप्त
या मुलाने समाजाच्या अलिप्त राहण्यावर कोरडे ओढलेत. अर्धा पाऊण तास अनेक गाड्या तिथून गेल्या, कुणीही मदत केली नाही. मी दहा बारा दिवसांपूर्वीच समाजातलं क्षात्रतेज लोपलं आहे अशा अर्थाची पोस्ट लिहीली होती. पोलीस स्टेशनची पायरी न चढणे, साक्ष द्यायला न येणे,घटना घडत असताना बघ्याची भूमिका घेणे हे खरेतर दंडनीय अपराध मानले जायला हवेत. यातलेच काही जण मेणबत्ती मोर्चातही सामील झाले असतील.. कोडग्यांची समाजात कमी नाही. <<
मान्य.
सहमत.
पण.
तुम्ही एक चार/दोन चाकी गाडीचे मालक आहात. रस्त्यावरून चालला आहात. सकृतदर्शनी अपघातग्रस्त कुणी रस्त्यावर पडलेले दिसत आहेत. तुम्ही स्वतः थांबून त्यांना उचलून हॉस्पिटलात नेणार/नेता/नेले का? या प्रश्नाचे उत्तर आधी मनात नीट ठरवा.
१. हे अपघाताचे नाटक करून रस्त्यावर मला थांबवून लूटमार करणारे लोक दिसतात. पळा.
२. दारू पिऊन गाड्या चालवतात. यांच्यासाठी हीच शिक्षा बरी.
३. गाडीत घालून नेले तर गाडी अपहोल्स्ट्री धुवायचा खर्च कोण देणार? - हे मनात येतेच
४. कोणत्या हॉस्पिटलात नेऊ? तिथे अॅडव्हान्स कोण भरेल? मी? हेही येते.
५. सरकारी इस्पितळात पोलीस/डॉक्टर नाव गांव विचारतात. नंतर साक्षी द्यायला कोर्टात फेर्या मारत कोण जाईल?
६.
.
.
.
अहो अॅम्ब्युलन्सवालेही पळून जातात बाजूने. सामान्य लोक सोडा. एका गाडीचे मागचे सीट केवळ धुता येत नाही म्हणून नवे बसवले आहे मी. अन हो. दारूडेच होते. खर्च गेला उडत, अकाऊंटला पुण्य जमा झाले असेल असे म्हणून सोडून द्यावे लागते.
महोदय,
इन्टर्नशिप करीत असताना, चौकात एका आजोबांना धडक मारून एक रिक्षावाला पळून गेला. त्या आजोबांना उचलून आमच्याच सरकारी हॉस्पिटलच्या एका नर्सच्या पतींनी सरकारी हॉस्पिटलात दाखल केले. त्या आजोबांचे नातेवाईक व पोलीस यांनी मिळून त्या भल्या माणसाला, तुम्हीच या म्हातार्याला धडक मारलीत म्हणून त्यांचा जो काही छळ केला तो मी पाहिला आहे. बिचार्या सिस्टरांना सायकिअॅट्रिस्टची ट्रीटमेंट घ्यावी लागली. चांगुलपणाचा मोबदला म्हणून.
असो.
(मेणबत्ती मोर्चात सामील न झालेला) इब्लिस.
>> त्या व्यक्तीचे भय व भयाचे
>> त्या व्यक्तीचे भय व भयाचे कारण कायमचे नाहीसे होईल.
बाप रे! म्हणजे काय?
असो. कोणाची श्रद्धा दुखावायचा हेतू नाही. अश्विनी, क्षमस्व, पण हे खरंच चीड आणणारं आहे.
इब्लिस
१% चं काय नी? स्वाती, प्वाईंट
१% चं काय नी?
स्वाती, प्वाईंट आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. बापू आपल्या अलौकिक शक्तीने, मंत्र तंत्राने त्या पाच आरोपींना कायमचे नपुंसक करतील का? केस कोर्टात गेल्यावर जजना कठोर निर्णय घ्यायला लावून त्याची अंमलबजावणी करायला भाग पाडतील का?
नवीन सांगा की राव काहीतरी.<<
नवीन सांगा की राव काहीतरी.<<
(नवीन माहीती देण्यास उत्सुक) इब्लिस
हे राम!! (आज आणखी काय नवीन...
हे राम!! (आज आणखी काय नवीन... काल ईंग्रजी शाळा..)
कोणाच्या श्रद्धेचा अपमान करण्याचा हेतु मुळीच नाही.
पण वरील मजकूर (प्रमोद देव ह्यांची पोस्ट) वाचून उलट वाटले भाविकांच्या श्रद्धेचा फायदा घेवून 'अंधश्रद्धा' पसरवणे वाटतो. स्त्रीयांनी सतत भिती बाळगत जगत आता अश्या प्रकारे मार्ग शोधायचे असे पसरवले जातेय हे दिसतेय. कारण सरकार ** आहे.
आधीच काय कमी भिती आहेत का जगात?...
एकंदर लोकांना भावनिक रित्या गुंतवत ठेवायचे व त्यांचे मार्गच बंद करायचे परीस्तिथीशी झगडा करण्याचे तसेच हे वाटतेय.
देवाची पूजा व वाचन विरोध नाही पण मनुष्याला (आणखी)कमकूवत बनवायला कमी साधने आहेत काय?
मग असा एखादा मंत्र का नाही जो प्रत्येक माणसाने म्हटल्याने त्याच्या सर्व वाईट विचारांचा नाश होइल? सर्वांनी म्हटल्यावर जगातील अश्या वाईट शक्तींचा नाश होइल?
ते होतं ना कुठेतरी की १% च
ते होतं ना कुठेतरी की १% च वाचणार वगैरे...
ईब्लीस त्या लोकांमधे मी
ईब्लीस
त्या लोकांमधे मी स्वतःलाही धरतो. तुमची पोस्ट संपूर्णपणे पटण्यासारखी नाही. जबाबदारी टाळण्यासाठी अनेक कारणं उपलब्ध असू शकतात. त्या मुलीच्या आणि मुलाच्या अंगावर बस घालण्याचा प्रयत्न केला गेला. कुणी नग्न शरीरावर कापडाचा तुकडाही टाकला नाही, पाऊण तासात पोलिसांच्या तीन व्हॅन्स तिथे आल्या. त्या वेळेत त्यांनी घटना कुणाच्या हद्दीत येते यावर काथ्याकूट केला. पण मदत मिळवून देण्यासाठी तातडीची हालचाल केली नाही. रस्त्याने येणारे जाणारेही काहीही न करता जात होते.
इथे वैयक्तिक अनुभव लिहीणे योग्य नाही असं वाटतं. अन्यथ अपघातग्रस्त व्यक्तींना रुग्ण्यालयात पोचवून नातेवाईकांना फोन करून व्यवस्था लावून दिल्याच्या घटना नमूद करता आल्या असत्या. ते खरंच टाळायचं आहे. आपला तो विषय नाही.
मदत न करण्याचे सर्वात मोठे
मदत न करण्याचे सर्वात मोठे कारण पोलिसांचे भय आणी कट़कटीत सापडणे हे आहे.
मिरा बोरवणकर कमिशनर असताना त्यांच्याशी बोलताना एकदा म्हणाल्या की सामान्य माणसे पोलिसांकडे येत नाहित त्यांनी पुढे आले पाहिजे. त्यांना जेव्हा विचारले कि पोलिस स्टेशन सामान्य माणसांसाठी येण्यासारखे आहे का याच्यावर मात्र त्यांच्याकडे उत्तर नव्हते!
(मेणबत्ती मोर्चात सामील न झालेला) इब्लिस.>>>>> नुसते माबोवर पोस्टी टाकणारे रस्त्यावर उतरणार्यांबद्द्ल भंपक लिहिताना पाहुन वाइट वाटते. आधी स्वतः दुसरा उपाय सुचवा, तो करुन दाखवा मग मेणबत्ती मोर्चावर टिका करा!
स्वाती, खरंतर मला इथल्या
स्वाती, खरंतर मला इथल्या टिकेचा काहिच फरक पडत नाही. फेसबुकावर कालच्या प्रवचनाचा थोडासाच भाग दिला गेला असल्याने अशी भावना होते आहे. पुर्ण प्रवचन मी स्वतः हजर राहून ऐकले आहे. आणि खरंच, ज्यांची रामावर श्रद्धा असते ते रक्षणासाठी रामरक्षा म्हणतात, हनुमंतावर असणारे मारुती स्तोत्र म्हणतात. पण ते उपाय काम करणार ज्यांची श्रद्धा असेल त्यांच्याच साठी. बाकीच्यांसाठी रामरक्षा किंवा कुठलंही संस्कृत स्तोत्र हे फक्त जिभेला वळण लावण्यापुरतंच. आम्ही हे सर्व म्हणतोच पण मी स्वतः अनेकवेळा त्यांच्यातल्या सद्गुरुतत्वाचा बियाँड डाउट अनुभव घेतलेला असल्यामुळे त्यांच्या शब्दावर माझा पुर्ण विश्वास आहे. मी ओपनली सांगते की मी आज जी खंबीरपणे उभी आहे ती केवळ त्यांच्याचमुळे. नाहीतर आज मी नसतेच.
पुरुषांसाठीचे बलविद्येचे आणि अहिल्यासंघातर्फे चालवले जाणारे स्त्रियांसाठीचे 'बल'चे वर्ग यात स्वसंरक्षणाचे अगदी घामटा काढून प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण घेतलेल्या काही व्यक्ती मायबोलीवर कार्यरत आहेत.
असो, मला वादात पडायचं नाही कारण माझी श्रद्धा माझ्याजवळ. फक्त मी तिथे होते त्यामुळे काही गोष्टी स्पष्ट कराव्याश्या वाटल्या इतकंच. असो... no more comments from my side.
चार पाच टाळकी येता जाता
चार पाच टाळकी येता जाता नाक्यावर प्रत्येक मुलीची छेड काढत असतात. येणारे जानारे किमान हजारेक लोक माना खाली घालून ते सहन करत असतात. या प्रत्येक घटनेत पोलीसांना तरी कसा दोष द्यायचा ? त्या वस्तीतल्या शंभरेक नाही किमान पंधरा जणांनी एकत्र येऊन या टाळक्यांना फोडून काढणे अगदीच अशक्य आहे का ?
आज उस्मानाबादेतल्या एका कॉलेजातल्या मुलींनी नेहमीच होणा-या छेडछाडीला कंटाळून कॉलेजला न जाण्याचा सामूहिक निर्णय घेतला आहे असं स्टार माझा वर सांगण्यात आलं. हे या घटनेच्या निमित्ताने झालेल्या जागरूकीचं फळ आहे. एरव्ही या मुली सहन करत गेल्याच असत्या. याचं पुढचं पाऊल म्हणून इतर मुलांनी एकत्र येऊन या टोळक्याला अद्दल घडवायला हवी.
फार पूर्वी 'गंगाजल' नावाचा
फार पूर्वी 'गंगाजल' नावाचा चित्रपट आला होता....
त्या वस्तीतल्या शंभरेक नाही
त्या वस्तीतल्या शंभरेक नाही किमान पंधरा जणांनी एकत्र येऊन या टाळक्यांना फोडून काढणे अगदीच अशक्य आहे का ? >>> +१ हे घडू शकते. माझ्या लग्नापुर्वी मी स्टेशनवरुन घरापर्यंत चालत येत असे. आणि एक दिवस एक माणूस मला फॉलो करतो आहे हे लक्षात आल्यावर मी पुढे चार पाच दिवस वॉच ठेवून कन्फर्म केलं. नंतर सहाव्या दिवशी माझ्या घराच्या आधीच्या नाक्यापर्यंत आल्यावर तिथल्या एका वडापाव की कसल्याश्या गाडीपाशी आल्यावर एकदम पलटी मारुन त्या माणसावर कडाडले. तेव्हा त्या गाडीवर हजर असलेल्या ७-८ जणांनी त्याला धू धू धुवत जवळच असलेल्या सरकारी हॉस्पिटलच्या समोरच्या रस्त्यापर्यंत नेला. नंतर अजूनही लोक्स जॉइन झाले. मी त्या सगळ्या जणांबरोबर जात राहिले. मी एकटी मुलगी असले तरी माझ्यासाठी त्या माणसाला अद्दल घडवायला निघालेल्या त्या अनोळखी पुरुषांना टाकून कृतघ्नासारखं निघून जाणं मला पटलं नाही. नंतर त्या माणसाने माझी माफी मागितली. मी त्या अनोळखी पुरुषांचे आभार मानून घरी निघून आले. तो माणून नंतर मला दिसलाच नाही.
अश्विनीताई तुमचे अभिनंदन.
अश्विनीताई
असो.
तुमचे अभिनंदन. सुरुवातीलाच टाकायची ना ही पोस्ट.
तुमची पोस्ट संपूर्णपणे
तुमची पोस्ट संपूर्णपणे पटण्यासारखी नाही.
<<
सखेद, पण मान्य. मी सामान्यांच्या नाईलाजाबद्दल बोलत होतो साहेब.
>>. त्या मुलीच्या आणि मुलाच्या अंगावर बस घालण्याचा प्रयत्न केला गेला. कुणी नग्न शरीरावर कापडाचा तुकडाही टाकला नाही, <<
याच बाफवरची पहिली पोस्ट पहा. मला खरेच लाज वाटली हो..
>>पाऊण तासात पोलिसांच्या तीन व्हॅन्स तिथे आल्या. त्या वेळेत त्यांनी घटना कुणाच्या हद्दीत येते यावर काथ्याकूट केला. पण मदत मिळवून देण्यासाठी तातडीची हालचाल केली नाही.<<
हे खरे भयावह आहे..
इट्स देअर ब्लडी जॉब. अमेरिकेत 'इट्स माय जॉब' या तीन शब्दांची किंमत काय असते हे अमेरिकेत स्थायिक झालेल्या मायबोलीकरांनी सांगावे. आय हेट पीपल व्हू डोंट डू देअर जॉब.
>> रस्त्याने येणारे जाणारेही काहीही न करता जात होते.<<
जबाबदारी टाळण्यासाठी अनेक कारणं उपलब्ध असू शकतात... तुम्हीच म्हटलात.
- तरूण पोरीचा बाप )इब्लिस(
भारतीय | 4 January, 2013 -
भारतीय | 4 January, 2013 - 23:57
<<
फाटा ~डोळे मिचकवा~
जबाबदारी टाळण्यासाठी अनेक
जबाबदारी टाळण्यासाठी अनेक कारणं उपलब्ध असू शकतात... तुम्हीच म्हटलात.>>
विपर्यास होतोय अर्थाचा. जबाबदारी टाळायचीच म्हटली तर अनेक कारणं (सांगण्यासाठी) उपलब्ध होऊ शकतात. असो. गुड नाईट !
अश्विनी के, मी सहसा
अश्विनी के, मी सहसा प्रतिसादाला + करुन काउंट वाढवत नाहि, परंतु तुमच्या वरील प्रतिसादाला + आवर्जुन दिला आहे; निव्वळ तुम्ही दाखवलेल्या धाडसामुळे.
परत अशी वेळ कोणावरहि येउ नये, पण दुर्दैवाने आलीच तर जप्-जाप्य न करता वर दाखवलेला धाडसीपणाच सगळ्या महिला अंगीकारतील अशी आशा करतो.
इथे वैयक्तिक अनुभव लिहीणे
इथे वैयक्तिक अनुभव लिहीणे योग्य नाही असं वाटतं. अन्यथ अपघातग्रस्त व्यक्तींना रुग्ण्यालयात पोचवून नातेवाईकांना फोन करून व्यवस्था लावून दिल्याच्या घटना नमूद करता आल्या असत्या. ते खरंच टाळायचं आहे. आपला तो विषय नाही.
<<
Hindsight is always six by six
शुभ रात्री.
तत्वज्ञान सांगणे अन आचरणे हे वेगळे असते, हे प्रत्येकाने आपल्या मनात ठरवायचे आहे. इतकाच बोध इथे घेतला तरी पुरे.
इब्लीस दुर्दैवी पोस्ट. तुम्ही
इब्लीस
दुर्दैवी पोस्ट. तुम्ही वैयक्तिक का होत चालला आहात समजत नाही. मी तुमच्या वैयक्तिक अनुभवांची चौकशी केलेली नाही. तरीही तुम्हाला हवी असल्यास अशा घटनांची जंत्री तुमच्या विपूत देतो. याबाबत फोनवर बोलून तुमची खात्रीही पटवून देऊ शकतो.
इथे लिहीणे म्हणजे टिमकी वाजवण्यासारखे होईल हे आपल्या लक्षात आले असेल असे वाटले होते. असो. शक्य असल्यास आपला नंबर मेल मधून कळवणे. बोलूयात.
सर, माझ्या लिहिण्याचा अर्थ /
सर,
माझ्या लिहिण्याचा अर्थ / रोख तसा नव्हता. वेगळा अर्थ कदाचित माझ्या लक्षात आलेला नसावा. चुकले असेल तर माफ करा
धन्यवाद.
राज, धन्यवाद शहाणपणाने
राज, धन्यवाद
शहाणपणाने केलेलं धाडस हवंच हवं. कधी कधी युक्ती धाडसापेक्षा महत्वाची ठरु शकते. मी एकटीने आसपास जास्त माणसं नसताना त्या माणसाशी दोन हात करायचे ठरवले असते तर तो माझा मुर्खपणा ठरला असता कारण ६ दिवस मी त्याच्या सगळ्या हालचाली टिपत होते. म्हणून मी वडापाव गाडीच्या जवळ पोहोचल्यावर त्याच्या कानठळ्या बसतील एवढ्या तारस्वरात सगळा संताप बाहेर काढला. पलटी मारतानाही तो माणून माझ्या एक दिड हाताच्या अंतरावर मागे मागे आहे हे पाहूनच मारली. म्हणजे पळून जायच्या प्रयत्न केला असता तर मला मागच्याबाजूने त्याची कॉलर किंवा शर्टचा मिळेल तो भाग हाताने गच्च पकडून त्याला अटकाव करता आला असता. एका क्षणात तिथल्या लोकांना काय घडतंय ते लक्षात आलं आणि सगळं निपटलं गेलं. पण एकटी असताना दोन हात करायची वेळ आलीच असती तर मी ते निकराने केलेही असते पण मनात देवाचा धावाही केला असता यश दे म्हणून किंवा मदत पाठव म्हणून.
स्वकर्तृत्वाबरोबर मला भगवंताची साथही आवश्यक वाटते. मात्र स्वतः हातपाय हलवले नाहीत तर भगवंतही साथ देणार नाही.
Pages