महिलांनि स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे?

Submitted by प्रिया७ on 18 December, 2012 - 11:06

गेले २ दिवस दिल्लीच्या रेपची माहिति वाचण्यात येत आहे. आजकाल बर्‍याच कारणाने महिलांना उशिरा पर्यंत घराबाहेर राहावे लागते. किंवा बाहेरगावी सुद्धा एकटे रहावे लागते. काहि सिंगल पेरेंट सुद्धा आहेत. अशा वेळी एकटे राहाणार्‍यानी घरि आणि घराबाहेर काय खबर्दारी घ्यावी? असा धागा असेल तर हा उडवुन टाकेन.

कवठीचाफा | 26 December, 2012 - 10:14
साडेतीन-चारवर्षे सेल्फ डिफेन्स अ‍ॅकेडमी नावाच्या संस्थेसोबत लहान काळाची शिबीरं झाली त्यात ज्या गोष्टींचे ट्रेनिंग दिले त्यातल्या महत्वाच्या गोष्टी. केवळ स्त्रियाच नाही पुरूषांनाही उपयोगी पडू शकतील अश्या.
१ ) कधीही समोरच्या व्यक्ती एकापेक्षा जास्त असतील तर प्रतिकारापेक्षा माघार घेणं उपयुक्त अर्थात याचा अर्थ थेट पळायला सुरूवात करणं असा नाही, यात तुम्ही दमाल आणि आयतेच हाती सापडाल.
२ ) सर्वात आधी परिस्थिती/वातावरणाचं बारकाईनं निरीक्षण करत रहायला हवं अनेकदा संभाव्य धोका लक्षात येतोच.
३ ) समोरच्या व्यक्तींमधल्या म्होरक्या किंवा लिडरकडे आधी लक्ष द्या, (काही सेकंदातच तो लक्षात येतो ) आपलं पहिलं लक्ष्य त्यालाच करा. आता कसं ? ते पुढे
४) पायात जर हिल्स असतील तर त्यांचा आघात गुडघ्याच्या बाजूच्या भागावर करा, लक्षात घ्या संवेदनशील भागावर हल्ला होणार या तयारीत समोरची व्यक्ती असते तीथे प्रहार वाया जाईल. गुडघ्याचा बाजूचा भाग हा देखील विक पॉइंटच असतो तिथला मार सहन होत तर नाहीच पण त्यानंतर काहीकाळ पायही टेकता येत नाही.
५ ) डोळे हा अतिमहत्वाचा भाग त्याला लक्ष्य करा
६ ) पेन, डोक्यातली क्लिप ही उपयुक्त हत्यारं आहेत त्यांचा वापर करा, यांच्यासाठी हाताचा कोपराजवळचा भाग, तळहाताचा मागचा भाग, कान, त्याच्या मागच्या सॉफ्ट टिश्युज यांना लक्ष्य करा
७ ) पाठीमागुन पकड घातल्यावर ताबडतोब हताश होऊ नका ( सामान्यपणे इथेच आपण गडबडतो ) पायाच्या टाचेचा आघात मागच्या व्यक्तीच्या पायाच्या नडगीवर करा आथवा हातातला पेन, पीन मागच्या व्यक्तीच्या कानाच्या आसपास मारा.
८ ) दातांचा वापर करा मात्र हात किंवा दंड यांच्या बाबत माणूस सहनशील असू शकतो, त्यांचा वापर कान आथवा मानेवर करा.
९ ) दगड हे उत्तम शस्त्र आहे, अंतर मिळालं तर हमखास वापर करा
१० ) हे सगळं करण्यासाठी, मनात बेडरता आणि क्रूरता येण्याची गरज आहे त्याचसोबत सवयही लागण्याची गरज आहे. शक्य झाल्यास कुणीतरी पार्टनर घेऊन नॉनफेटल प्रॅक्टीस करा.
११ ) प्रतिकार करायचाच आहे याची खूणगाठ बांधून शरीर शिथील ठेवण्याची सवय करून घ्या.

उदयन.. | 18 December, 2012 - 22:15
चोरटे स्पर्श, नको तिथे चिमटे यांकडे दुर्लक्ष करा. आठवड्यातून तीन वेळा तुम्ही कुर्ला दादर अश्या ठिकाणी एकटीच नेहमी मारामारी करत बसू शकत नाही. >>>>>>>>>> इथेच चुकतात तुम्ही......एक ब्लेड नाहीतर लहानसा धारधार चाकु ठेवा..... असे काही झाल्यास लगेच मारा.......तेही जोरात.... परत कुणाला हात लावणार नाही

सामोपचार | 18 December, 2012 - 22:17
उदयनजींना अनुमोदन.......हल्ली लहान नेलकटरसारखी अवजारे असतात ती जवळ ठेवावीत. पटकन काढून भोसकायला बरी पडतात.

स्मितू | 18 December, 2012 - 22:57
मी उदय च्या मताशी सहमत आहे.... ...ट्रेन मध्ये... बसमध्ये प्रवास करतांना महिलांना ,मुलींना आश्या बर्‍याच प्रसंगांना तोंड द्यावे लागते आश्या वेळेस मुलींनी.... आपल्या जवळच्या सेफ्टी पिन चा वापर करावा.... पुरुषाच्या घाणेरड्या हालचाली लक्षात आल्या की लगेच बारिक पिन टोचायची...बरोबर चुपचाप बसतो तो.... ब्लेड, चाकु हे हत्यार जरा जास्तच होते..
शक्य्तोवर रात्रीचा प्रवास एकटीने टाळावाच... खुपच अर्जंट असेल तर सोबत कोणाला तरी घ्यावे...

mansmi18 | 19 December, 2012 - 03:12
पेपर स्प्रे मधे पेपरच असायला हवा का? हौ अबाउट सल्फ्युरिक अ‍ॅसिड?
असे काही चाळे करणार्‍यावर महिलानी अ‍ॅसिड का टाकु नये? एक दोन लोकाना या अ‍ॅसिडचा प्रसाद मिळाला की पुढे अशी काही विकृत इच्छा असणारे पुरुष असे काही करण्याआधी शंभर वेळा विचार करतील.

swanand_ml | 19 December, 2012 - 16:42
मला तात्वीक चर्चेत रस नसल्याने फारसे प्रतीसाद न वाचता प्रतिसाद देत आहे तरी माफी असावी.
महिलांसाठी स्वसंरक्शणावर दोन शब्द लिहु इच्छीतो.
ज्याला जगायचे आहे त्याला झगडावे लागेलच.
महिलांनी शस्त्र बालगण्यावर येथे चर्चा झाली. मला स्वताला ह्या दोन गोष्टी आवडतातः
http://en.wikipedia.org/wiki/Karambit
http://en.wikipedia.org/wiki/Push_dagger
लपवीण्यासाठी सोपे, हाताळण्यासाठी सोपे व हिसकावून घेण्यास अवघड. इंटरनेट वर उपलब्ध.
केवळ शस्त्र आहे हे पुरेसे नसते. ते हाताळन्याची व वापरण्याची मानसीकता असणे गरजेचे असते. त्यासाठी प्रशीक्शण गरजेचे आहे.
बंगळुर वासी येथे जवु शकतातः
http://kravmagabangalore.in/
मुम्बई: http://www.kravmagaindia.in/locations/mumbai
दिल्ली: http://www.kravmagaindia.in/locations/delhi
वरील प्रशिक्शण केंद्रे शस्त्रप्रशिक्शणाची नसून संरक्शण प्रशिक्शण केन्द्रे आहेत ह्यची नोन्द घ्यावी.
बहुत काय लिहणे. आपण सुज्ञ असा.

दिनेशदा | 21 December, 2012 - 05:52
मीही जसे सुचेल तसे लिहित जातोच. एकटे घराबाहेर पडल्यावर, जर कुठल्याही असुरक्षित भागातून जात असू तर अगदी नियमित रित्या घरच्या व्यक्तीला किंवा सहकारी व्यक्तीला फोन करुन आपला खरा ठावठिकाणा कळवत राहणे हा एक उपाय सुचतो मला.
संध्याकाळच्या वेळी आपल्या परिसरातील कुठलाही भाग एकाकी राहणार नाही, याची काळजी. घरी असणार्‍या किंवा जेष्ठ व्यक्तीनी घेतली तरी चालेल. अशा भागात गटाने ऊभे राहून चर्चा करावी, जाग राखावी.
घरीच कंटाळत कण्हत राहण्यापेक्षा. बसस्टॉपवर / नाक्यावर जाऊन ऊभे राहिले तर काय वाईट ?
पुर्वी आमच्या कॉलनीत यायला अंधारा रस्ता होता. त्यावेळी एखाद्या व्यक्तीला उशीर होत असेल, तर घरची माणसे रस्त्यावर जाऊन थांबत असत. तसेच कुणी एकटा माणूस असेल, तर तो सोबत मिळेपर्यंत हायवेवरच थांबत असे.
ज्यांची कामाला जायची जागा निश्चित आहे त्यांनी यायच्या जायच्या वेळी गटाने आणि तेसुद्धा स्त्री आणि पुरुष अशा मिश्र गटाने शक्यतो प्रवास करावा. जर यायच्या जायच्या बस किंवा गाड्या ठराविक असतील, तर
सहप्रवाश्यांशी मैत्री करावी. एखादा सहप्रवासी नेहमीच्या वेळी दिसला नाही तर चौकशी करावी.

नीधप | 21 December, 2012 - 08:28
प्रतिकार करा हा उपाय व्यवहार्य नाही <<<
सतत शक्य नाही. हपिसला/ कॉलेजला जाताना, घरी परतताना... रोजचे रोज
एखाद्या दिवशी केला जातोच.
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.

Kiran.. | 21 December, 2012 - 08:50
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.
+
()महिला जागृतीसाठी अभियान निर्माण करणे : राज्य / राष्ट्रव्यापी अभियान आणि त्याच्या गाव/तालुका/जिल्हास्तरीय समित्या यातून कायमस्वरुपी जागृती घडवून आणणे. यात स्वयंसेवी संस्था / सरकारी संस्था / खाती यांचा समन्वय साधलेला असावा. कार्यकर्त्या निर्माण करून घराघरापर्यंत जागृतीचे अभियान न्यायला हवे.
* ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी परिसंवाद / वर्कशॉप्स राबविणे. माध्यमप्रतिनिधी / पोलीस / न्याययंत्रणा यांच्या प्रतिनिधींनाही सामान्यजनांबरोबर सहभागी करून घेतल्यास लोकांच्या अपेक्षा आणि प्रत्यक्षातल्या अडचणी याबद्दल देवाण घेवाण होऊ शकेल.
* महिलांविषयक गंभीर गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालयांची स्थापना व्हावी यासाठी पाठपुरावा करणे.

आहना | 21 December, 2012 - 08:46
१. पेपर स्प्रे बाळगणे>>> पेपर प्रे उपलब्ध नसल्यास पर्स मधे डिओड्रन्ट वापरा

उदय | 21 December, 2012 - 09:01
(अ) प्रसंगावधानता दाखवणे महत्वाचे आहे. १९९८, दिल्लीच्या DTC मधेच एका युवतीवर असाच प्रसंग आलेला होत, पाच लोकांशी सामना करत सुटका केली... पुढे कोर्टाने गुन्हेगारांना शिक्षाही दिल्यात.
थोडा कमी पणा आला तरी चालेल, पण 'पाच लोक' टवाळी करत आहेत, तर तेथे हुज्जत घालण्यापेक्षा सटकणे महत्वाचे. माघार घेण्यात कमीपणा कधिच नसतो...
युक्ती (थोडे डोक) आणि बळ असा समन्वय साधल्यास घटना कमी घडतील.
(ब) सर्वात महत्वाचे असे प्रसंग अगदीच अनोळखी लोकां कडुनच होतात हा गैरसमज काढुन टाकणे. बहुतेक प्रकारांत ओळखी किंवा नात्यामधिलच व्यक्ती असतात. वर अनेकांनी सुचवलेल्या उपायांत हा मुद्दा मला दिसला नाही म्हणुन लिहावेसे वाटले.
दर दिवशी जरी त्याच व्यक्तीसोबत प्रवास करत असाल किंवा कामा निमीत्त संपर्कात येत असलांत, तरी प्रत्येक क्षणी सतर्क राहुन "उद्देशांत काही बदल झालेला नाही आहे नां?" हे तपासायला हवे. दोन व्यक्ती एकाच ठिकाणि काम करत आहेत, कामा निमीत्त प्रवासाला सोबत जावे लागणार आहे... सावध आणि सतर्क रहाण्यात काहीच हरकत नाही.
(क) प्रसंगावधानता मधे गाड्यांना (मग ऑफिसची असेल किंवा सार्वजनिक वहान असेल) पारदर्षक काचा नसतील तर प्रवास करायला चक्क नकार द्यायचा. सार्वजनिक वहानांना कशासाठी हवेत टिंटेड काचा किंवा पडदे ?

प्रिया७ | 21 December, 2012 - 16:12
ब्राईट एलईडि फ्लॅश लाईट जो वेळ प्रसंगि कामी येतो सरळ डोळ्यात मारता येतो,सेफ्टि पिन,सेल फोन वर (९११) किंवा ईमर्जन्सि नंबर स्पीड डायल ला सेव्ह करुन ठेवणे, पेपर स्प्रे नसेल तर छोटि परफ्युम बाटलि सुद्धा वापरता येते, फेसबु़क वर कुठे जात असाल तर त्याची माहिति न टाकणे किंवा Laxmi (कसे लिहायचे मराठित) पुजन चे दागिन्यांसकट फोटो न टाकणे,कुठे एकटे असतांना कानात हेड्सेट घालुन ठेवु नये,गाडि चे रिमोट लॉक गाडिजवळ जावुनच उघडणे,गरज पडल्यास खोटे बोलणे,रात्रिच्या वेळि एकटे असाल तर कोणाला दया दाखवायच्या आधि/ मदत करायच्या आधि २-३ दा विचार करा .

मुंगेरीलाल | 23 December, 2012 - 00:51
एक साधा आणि परिणामकारक उपाय म्हणजे एक जोरदार, तीव्र आवाजाची शिट्टी (पर्समध्ये अथवा किचेन म्हणून) जवळ बाळगणे. कुठलाही गुन्हेगार (किंवा त्यांचा समूह) एका क्षणात दचकतो आणि तुम्हाला सुटका करून घेण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. शिवाय हे शस्त्र नसल्यामुळे जवळ ठेवण्याला कुठली परवानगीही लागत नाही आणि वापरायला कसलं कौशल्यही लागत नाही.

अश्विनीमामी | 23 December, 2012 - 03:12
एक गोष्ट मला लक्षात आली, मुली, स्त्रीया ऑफिसला जातात किंवा घरी उशीरा येतात. तर आपला हपीसचा मजला आणि ग्राउंड फ्लोअर, कँतिनचा फ्लोअर हेच सहसा माहीत असते. घरीही तेच. ग्रा. फ्लो आणि आपला मजला. व्यतिरिक्ग आपली बिल्डिंग कशी दिसते आपल्याला माहीत नसते. सवडीने, फुल प्रकाशाच्या दुपारी पूर्ण बिल्डिंग/ ऑफिस काँप्लेक्क्ष , खास करून पार्किंगची जागा ह्याची माहिती करून घ्यावी. नजर सरावलेली असावी. फोटो काढून जागांची माहिती करून घ्यावी. प्रत्येक जागी आडोसे, अंधार्‍या जागा, उंचावरून मुलीला फेकून देता येइल अश्या जागा विशेषतः पार्किंग मध्ये खूप आढळतील. त्या अवगत करून घ्याव्यात. मैत्रिणींना, घरच्यांना सांगावे बोलावे ह्याबाबत. बरेचदा पहाटे किंवा रात्री आपलीच बिल्डिंग अनोळखी भीती दायक जागा बनू शकते. अ‍ॅटॅकरला तेच हवे असते. तो तुमचा गैरफायदा घेण्यास पूर्ण समर्थ असतो. फोनवर इमर्जन्सी नंबर आधीच देऊन स्पीड डायल वर ठेवावा. आयत्यावेळी कोणाला फोन करावा असे व्हायला नको.
पोर्टेबल टेसर सारखे उपकरण पर्स मध्ये असावे. बॅटरी नक्की. मुली फ्लॅट मध्ये राहात असतील तर शक्य असल्यास एक कुत्रा नक्की पाळावा. हे मी विनोदाने आजिबात लिहीत नाही. त्यासारखे संरक्षण नाही.
पुरुषांना त्याची भीती नक्की वाट्ते.
बिनओळखीच्या पुरुष व स्त्रीयांशी आजिबात बोलू नये. लिफ्ट मध्ये खास करून.
वॉचमन ला पण आपल्या जाण्या येण्याच्या पॅटर्न ची माहीती फार देऊ नये. रिक्षा वाले टॅक्सीवाले कधे कधी फार बोलतात त्यांना उत्तेजन देऊ नये. इथे किती पटेल माहीत नाही पण शहरांमध्ये सर्विस इंडस्ट्री जसे वाहन चालक, वेटर, वॉचमन ऑफिसातील प्यून्स वगैरे बाहेरच्या राज्यातून आलेले एक्टे
पुरुष असतात. एकाच रूटीन कामात अडकलेले, जास्तीच्या तासांचे काम करून वैतागलेले असतात.
बायको गावी त्यामुळे ..... पण त्यांना आपली मानसिकता समजेल अश्या भ्रमात राहू नये. स्त्रीवाद वगैरे तर दूरची गोष्ट.

सुमेधाव्ही | 29 December, 2012 - 08:02

आमच्या ऑफिसमधे मध्यंतरी एसीपी पुणे यांचे भाषण झाले होते त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या खालीलप्रमाणे, (भाषण साधारणपणे हिंजवडी परिसरात काम करणार्‍या महिलांची सुरक्षा असा असल्यामुळे नयन पुजारी केसच्या संदर्भात होत्या पण त्या सगळ्यांनाच उपयोगी पडतील त्यामुळे आठवेल तसे लिहिते आहे.)

पुणे पोलीस, फोन नं फक्त १०० एवढाच नाहीये. १०० नं लक्षात रहाण्यासाठी उत्तम पण इथे काहीही+ सर्व कंप्लेंट्स येत असतात त्यामुळे हा नं दर वेळेस लागतोच असे नाही. त्यामुळे इतर नं पण माहीत हवेत. ते मोबाईलवर सेव्ह केलेलेही हवेत.
पोलीस कं रुम. १००, २६१२२०२, महिला/ बाल हेल्पलाईन - २६०५०१९१ क्राईम अ‍ॅलर्ट -२६११२२२.
हे नं दिवाळी किंवा कोणत्याही निमित्ताने शुभेच्छा संदेशाबरोबर एकमेकांना वारंवार समस करून पाठवले म्हणजे मग ते आपोआप सेव्ह होतात व सेव्हड रहातातही.
(वि.सु. पोलीसांशी बोलताना मराठी लोकांनी मराठीतच बोलावे, कारण पुण्यातले जवळपास सगळे पोलीस पुणे परिसरातले व मराठी बोलणारे आहेत. इंग्लीशला ते कधीकधी बिचकतात व मग संभाषण नीट होऊ शकत नाही.)
अनोळखी व्यक्तीकडे लिफ्ट मागु नये. सार्वजनीक वहान सगळ्यात सेफ.
काही जणींना कॅबमधून यावे लागते ती कॅब जरी कं ने पुरवली असेल तरी ती बाहेरील एजन्सीकडून आणलेली असते त्यामुळे सजग रहावेच लागते. कॅबमधे बसल्यावर "रोज"सगळ्यांना ऐकू जाईल अश्या आवाजात घरी एक फोन करायचा. त्या फोनमधे कॅबचा नं तुम्ही उच्चारुन अमुक अमुक कॅबमधून तुम्ही प्रवास करत आहात व आत्ताचे तुमचे लोकेशन सांगायचे व अजून कीती वेळ घरी पोचायला लागेल त्याचाही उल्लेख करायचा. (जर का मोबाईलमधे बॅलन्स नसेल, किंवा रेंज येत नसेल तरी हा फोन खोटा खोटा असायलाही हरकत नाही. तेवढे अ‍ॅक्टींग जमवायचे स्मित
"कायम" हो हो...कायम्...कधीही जोरात पळता येउ शकेल असेच बुट्/चपला/कपडे असावेत. म्हणजे उंच टाचांचे बुट वगैरे ऑफिसात किंवा ऑफिसच्या पार्टीजना जिथे तुम्ही एक्ट्या जाणार आहात तिथे नकोत.
आर्थिक व्यवहारांची, घरगुती भांडणे, भानगडींची चर्चा कॅबमधे नकोच. इथे रोज अ‍ॅलर्ट रहायला हवेच.
बरेचसे कॅब ड्रायव्हर हे युपी एमपी मधील खेड्यांमधून आलेले असतात जिथे बायका त्यांच्या दृष्टीसही फारश्या पडत नाहीत. त्यामुळे शहरातल्या कॉन्फिडन्ट, पैसे मिळवणार्‍या, स्वतःच्या मर्जीप्रमाणे खर्च करणार्‍या व स्वतंत्र विचारांच्या बायकांबद्दल त्यांना असुया वाटते. अनेकदा त्यांचा इगो दुखावल्यामुळे सुडापोटी पण बलात्कार केले जातात. त्यामुळे शक्यतो ह्या लोकांशी हुज्जत न घालणे, जेवढ्यास तेवढे बोलणे, जास्त माहीती शेअर होणार नाही हे पहाणे हे महत्वाचे. काही मुली कॅबमधे बसल्या की घरच्यांशी जे काही बोलतात त्यातून बरीच माहीती दुसर्‍याला मिळते आहे हे त्या विसरतात.
एटीएम मधे दर शुक्रवारी पैसे काढणे, एकाच एटीएम मधून पैसे काढणे असे करू नये...बदलत रहावे. थोड्क्यात म्ह़णजे प्रेडीक्टेबल राहू नये. बर्‍याच जणी जाता जाता २ मि. थांबायला सांगून एटीएम मधून पैसे काढतात.
एकटीदुकटी मुलगी/स्त्री रात्री कारमधून घरी परत जात असताना जर गाडी बंद पडली, तर आड रस्त्यावर असाल तर गाडीतून बाहेर पडण्यापेक्षा पोलीसांना फोन करावा. रात्री त्यांच्या मोबाईल व्हॅन्स हिंजवडी परिसरात गस्त घालतात. (त्यांचा सेल नं पण आहे) त्या दहा मिनिटात मदतीसाठी पोचू शकतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमची वाचा बसलेली दिसते आहे. आता तुमच्याकडून हे असले बायकी शेरे सुरू होणार. ज्याचा बुद्धी आणि शहाणपनाशी कसलाही संबंध नसणार. यात तसलेच सगळे सामील होणार. मग स्मायल्या आणि कुत्सित पोस्टस पडणार. येतं काय दुसरं ?

शेवटचं.

हे युक्तिवाद नाक्यावरच्या टोळक्याशी करा. सँडल वगैरे त्यांना दाखवा. कदाचित त्यांचं मतपरिवर्तन होईल. शुभेच्छा !

टोळक्याच्या नाक्यातल्यां पेक्षा हे हिंसक तालिबानी विचार करणारे काय वेगळे.. बसणारच सँडल असले विचार करणार्‍यांना.!
ग्रो अप !

दीपांजली,

>> टोळक्याच्या नाक्यातल्यां पेक्षा हे हिंसक तालिबानी विचार करणारे काय वेगळे

Rofl

'तालिबानी विचार' म्हणे! तालिबानी कधीच विचार वा चर्चा करीत नाहीत हे आपणांस ठाऊक नाही काय! पुरुषांनी आपल्या अपेक्षा स्पष्ट शब्दांत मांडल्या की ते लगेच तालिबानी झाले. हे काही माझ्या पचनी पडत नाही.

पण यावरतीही एक उपाय आहे. तो म्हणजे पुरुषांनी बाईकडे बाई म्हणून चक्क दुर्लक्ष करणे. बघा मग बायकांची कशी पंचाईत होते ते.

आ.न.,
-गा.पै.

इथं कुणी मदत करत नाही, छेडछाड रोखत नाही असे गळे काढू नयेत.>>> आँ? इथं कुणी असं म्हंटलय?
नीट लक्षात घ्या, सुरूवातीपासून सगळ्याजणी हेच सांगतायत की पुरूषांची 'बायकांना माणूस न समजण्याची' मनोवृत्ती बदलणं गरजेचं आहे. तुमची तशी मानसिकता नसेल तर तुम्ही स्वतःवर ओढवुन घेण्याची गरजच नाहीये.
आता तुमच्याकडून हे असले बायकी शेरे सुरू होणार. ज्याचा बुद्धी आणि शहाणपनाशी कसलाही संबंध नसणार.>>>>बायकी म्हणजे बुद्धी नसलेले आणि शहाणपणाशी संबंध नसलेले? ही मनोवृत्ती बदलल्याशिवाय बलात्कार कधीच थांबणार नाहीत.

पण यावरतीही एक उपाय आहे. तो म्हणजे पुरुषांनी बाईकडे बाई म्हणून चक्क दुर्लक्ष करणे. बघा मग बायकांची कशी पंचाईत होते ते.>>>>> गामा तुम्ही असं म्हणताय? असो. Uhoh खरच कराच असं. बायकांना सुखाचे दिवस दिसतील.

गामा तुम्ही असं म्हणताय? >. ते बहुतेक आयडीचा ड्रेस बदलायला विसरले Light 1

असो. असल्या लोकांकडे दुर्लक्ष करू या का सर्वांनीच???

आताच फेसबुकवर पाहिलेली ही पोस्ट :-

मराठमोळ्या तरुण-तरुणींनी बनवली अजब सैन्डल ...........

२ हजार रुपये किमतीची हाय व्होल्टेज शॉक देणारी लेडीज चप्पल

चिन्मय जाधव चा अजीब अविष्कार .........
=============== =============== =========
महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांचा मुकाबला करण्यासाठी ठाण्यातल्या ए.के. जोशी शाळेच्या चार विद्यार्थ्यांनी अनोखी शक्कल लढवलीय. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी महिलांसाठी खास सँडल बनवलीय.
या सँडलमध्ये हाय व्होल्टेज इलेक्ट्रीक शॉक देण्याची व्यवस्था आहे.
तसंच धोक्याची सूचना देण्यासाठी सायरन बसवलंय.
गुंडांची शेरबाजी पुरावा म्हणून रेकॉर्ड करण्यासाठी रेकॉर्डरही यात आहे.

आगामी काळात या सँडलमध्ये जीपीआरएसचाही समावेश करण्यात येणार आहे. ज्यामुळे अपहरण रोखता येऊ शकेल.

या हायटेक सँडलची किंमतफक्त 2000 रुपये असणार आहे.
सिध्दार्थ वाणी, शांभवी जोशी, चिन्मय मराठे, आणि चिन्मय जाधव यांनी ही खास सँडल तयार केलीय.

http://www.ibnlokmat.tv/showvideo.php?id=272962

Sandal.jpg

>> पण यावरतीही एक उपाय आहे. तो म्हणजे पुरुषांनी बाईकडे बाई म्हणून चक्क दुर्लक्ष करणे...>>

पुरुषाला स्त्रीकडे नैसगिकापणे बघावेसे वाटते याला फारसे अपवाद नसतील.
पण स्त्रीकडे बघतांना प्रत्येक वेळी प्रत्येकाची वाईट वासनाच जागृत असते असे कधीच नसते. स्त्रियांना त्यांच्या सिक्स्थ सेंसवरून हे समजते याबद्दल त्यांच्यामध्ये दुमत नसेल असे वाटते.
वासना कशाने जागवली जाते तेही सर्वांना ज्ञात असते. त्या ज्ञानाचा उपयोग करूनच तयार केलेली सिनेमांमधील दृश्ये, सिनेमांमधिल बहुसंख्य नाच, लावण्यांचे नाच, जाहिराती नेहमीच पहाण्यात येतात. घरोघर पोहोचलेल्या टीव्ही मधून सर्व लहानथोरांच्या नजरेस पडतात. रियालिटी शोंमधूनही ते तसले नाच प्रतिष्ठित झाले आहेत. त्या तसल्या जाहिराती, नाच वगैरे करून त्यावर अभिनेत्र्या, मॉडेल, लावणी-कलाकार अशा करियर होत आहेत. अशांच्या करियर भरभराटीस येतांना दिसतात त्या काय फक्त स्त्री प्रेक्षकांमुळे?
पुरुषांनी बाईकडे बाई म्हणून चक्क दुर्लक्ष केले तर अशा कित्येक कलाकारांच्या करियर्स समाप्त होतील.

@यशस्विनी

या हायटेक सँडलच्या निर्मिती बद्दल सिध्दार्थ वाणी, शांभवी जोशी, चिन्मय मराठे, आणि चिन्मय जाधव यांचे हार्दिक अभिनंदन.
सँडलप्रसाद मिळताच पशुवृत्तीच्या पुरुषांची मानसिकता बदलायचा हा ताबडतोब वापरात येऊ शकणारा उपाय हजार भाषणे आणि लेखांपेक्षा बहुमूल्य आहे.

<<<<<<या हायटेक सँडलच्या निर्मिती बद्दल सिध्दार्थ वाणी, शांभवी जोशी, चिन्मय मराठे, आणि चिन्मय जाधव यांचे हार्दिक अभिनंदन.
सँडलप्रसाद मिळताच पशुवृत्तीच्या पुरुषांची मानसिकता बदलायचा हा ताबडतोब वापरात येऊ शकणारा उपाय,

हजार भाषणे आणि लेखांपेक्षा बहुमूल्य आहे. >>>>>>>

+१००००००

अ‍ॅडमिन,

महिंद्र टेकची फाईट्ब्याक (FIGHTBACK) मोबाईल अॅप सर्व भारतीयांसाठी वापरांस उपलब्ध आहे.

ही सोय आनंद महिंद्रा यानी कुठल्याही शुल्काशिवाय (Free of Cost ) भारतीयांसाठीच फक्त उपलब्ध केलेली आहे,

ह्या विषयावर समाज जाग्रृती करण आवश्यक् आहे आणि त्यासाठी मायबोलिवर काही करता येईल का? जसे या FIGHTBACK मोबाईल अॅपची जाहीरात वैगेरे,

आम्ही वाट्टेल तसे कपडे घालून फिरलो म्हणून काय पुरुषांना अत्याचार करायला परवानगी मिळते काय हा युक्तिवाद फक्त जाहिराती, सिनेमे , फॅशन वर्ल्ड या क्ष्एत्रातून आणि त्यासंबंधी क्शेत्रातूनच केला जातो. सर्वसाधारण कुटुम्बातून नाही. त्यामुळे मध्यमवर्गीय यांचे म्हनणे बरोबरच आहे ....
हा युक्तिवाद बाकीचानी बिहारी ड्रायव्हर्स, रात्री फिरणारे दारुडे गुंड्,उपजिविकेसाठी अथवा गुन्ह्यांसाठी रात्रीच रिक्षा, कॅब्ज चालवणार्‍या फरारी सराईत गुंडांना ऐकवावा व त्यांचे उद्बोधन करावे...

एखादीला लो वेस्ट जीन घालण्यावरून टोकलं तर ती पुरूषप्रधान संस्कृती ! अशी जीन कि जीन्स घालणं हा तिचा हक्क. बरं मग तिच्याकडे कुणी पाहीलं तरी दोषी पुरूषच. ...... आणि ह्यानंतरची सगळी पोस्ट >>>>>

मध्यमवर्गीय, ह्यावर खूप बोलून झालंय पण तरी परत एकदा बोलते. तुम्हाला कळेल की नाही ते माहीत नाही पण रोमातून वाचणार्‍या एखाद्याला कळले तरी खूप झाले. प्रत्येकाच्या संस्कृतीच्या कल्पना वेगळ्या असतात हे अगदी मान्य आहे. कुणाला साडीच नेसावीशी वाटेल, कुणाला अंग झाकणारा ओढणीचा पंजाबीड्रेस, कुणाला स्लीवलेस तर कुणाला तंग कपडे. तुमच्या संस्कृतीच्या कल्पना त्या व्यक्तीशी जुळत नसतील तर जरुर पाडा कपाळाला आठ्या. मनातल्या मनात सडकून टीकाही करा. एखाद्याला कमी कपड्यातल्या स्त्रीला बघायची सवय नसल्याने मनात लगेच कामुक विचारही येऊ लागतील. येऊद्यात की. करा ना डोळे बंद करुन पाहिजे तितकं स्वप्नरंजन. आक्षेप त्या पुरुषाच्या मनात काय विचार यावे ह्याला नाहीये. आक्षेप हा आहे की एखादीने कमी कपडे घातले म्हणून तिच्या मर्जीविरुद्ध तिच्याकडे सहेतुक बघून वाईट कमेंट्स पास करण्याचा, तिचा पाठलाग करण्याचा किंवा तिच्या अंगाला हात लावण्याचा अधिकार पुरुषांना कुणी दिला ? तिच्या संस्कृतीवर टीका करताना 'जगा आणि जगू द्या' असं शिकवणारी तुमची संस्कृती कुठे गेली ?
कमी कपडे घालतेय, बिनलग्नाची कुठल्याशा मुलाबरोबर भटकतेय म्हणून करा बलात्कार असं म्हणायला ती तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये.
मुली कमी कपडे घालतात म्हणून त्यांच्यावर बलात्कार होतात ह्या हुकुमशाही, 'हम करे सो कायदा' मनोवॄत्तीचं समर्थन म्हणूनच कुठल्याही प्रकारे होऊ शकत नाही.

दुसरा मुद्दा म्हणजे संपूर्ण अंग झाकणारे कपडे घालणार्‍या मुलींना सुद्धा वाईट नजरांना, स्पर्शांना सामोरे जावे लागते. कारण परत हेच. ह्या मनोवृत्तीचं मूळ समोरचा काय कपडे घालतो त्याच्याशी संबंधित नाही नाही तर 'वाटेल तेव्हा आणि वाटेल ती बाई भोगणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.' ह्या विकृत वृत्तीत आहे.

पेहराव आणि 'सोशल कंडिशनिंग' ह्या मुद्द्यात तर जायलाच नको. ती शतकानुशतकं चालणारी स्लो प्रोसेस असते. तोपर्यंत प्रत्येक स्त्री ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे आणि तिच्या इच्छेविरुद्ध सेक्स तर सोडाच पण तिची छेडछाड करणं, स्पर्श करणं, हाताळू पाहाणं, बलात्कार हे गंभीर गुन्हे आहेत. 'consent matters' ह्याचं भान राहू द्या.

पुढच्यावेळी कमी कपड्यातल्या मुलीची छेड काढणार्‍या मुलाला बघाल ना तेव्हा त्याचं बखोट धरुन त्याला ऐकवा की ती एक मूर्ख आहे. कसे कपडे घालावे कळत नाही पण तुला तुझ्या घरच्यांनी काही अक्कल शिकवली की नाही ? हीच का आपली भारतीय संस्कृती ? पुरुषांच्याच तोंडून अशी वाक्यं येऊ लागली तर उपरती होऊ लागेल अशी आशा करुया.

पादुकानंद, तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे. ज्या पुरुषांना वरच्या पोस्टमधले विचार समजू शकत नाहीत अशांसाठीच कडक कायदे आणि कडक शिक्षा राबवल्या गेल्या पाहिजेत. निदान त्या शिक्षेच्या धाकाने का होईना गुन्हा करण्याआधी दहादा विचार करतील.

अरेरे सिंडरेला, अश्विनी के, स्वाती २, +१ / मोदक वैगेरे देताय. तुम्हीपण अतिरेकी स्त्रीवादी, पाश्चात्य विचाराच्या,,कॉन्वेंटात शिकलेल्या आगाऊ स्त्रीया आहात नै.

पुरुषांचे स्त्रियां कडे बघणे चांगल्या अथवा वाईट नजरेने हे कसे काय थांबवणार.
असा विचार इम्प्रक्टीकॅल आहे.

एखादी स्त्री चे हावभाव ज्याला जास्त बघण्या सारखे वाटते तो ते त्या भुमिके नि बघतो .

पण शारीरिक लागट अथवा शाब्दिक कौमेंट्स हे थांबवले पाहिजे .

मुळातच पुरुष हे जास्तीत जास्त वेळा कामुक विचार करण्यात आनंद घेत असतो. वयाच्या पंधरा सोळा वर्षांपासून ती सुरवात होते आणि ती वाढतच जाते.

फुल्या फुल्या च्या शिव्या ; non veg sms ; इंटरनेट पौर्न साईट हे सगळे त्याचीच उदाहरण आहेत.

मात्र जर जवळीक केली तर आपल्या ला शिक्षा होऊ शकेल हि भीतीच हे थांबवू शकते.

अगो संपूर्ण पोस्ट लाजवाब.
<<प्रत्येक स्त्री ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे आणि तिच्या इच्छेविरुद्ध सेक्स तर सोडाच पण तिची छेडछाड करणं, स्पर्श करणं, हाताळू पाहाणं, बलात्कार हे गंभीर गुन्हे आहेत. 'consent matters' ह्याचं भान राहू द्या.>> जबरदस्त अनुमोदन.

आता तरी त्यांनी गप्प बसावे ...

अगो +१००० >> दोन्ही पार्टनरची संमती महत्त्वाची ठरते. संमती मागणे आणि ती व्यवस्थित देणे उदा: क्वचित व्यक्ती प्रियकराबरोबर विवाहासाठी पळून जाते. विवाहास संमती असते पण विवाहपूर्व शरीरसंबंधास संमती नसेल तर ते स्पष्ट मांडले पाहिजे, वि.पू.स ठेवायचा असेल तर प्रियकरानेही ते स्पष्ट विचारले पाहिजे. कारण पुढे जर काही कायदेशीर गडबडी झाल्या की हा रेप होता का फसलेला विवाह ह्यामध्ये फरक फक्त व्यक्तीची संमती होती का ह्यावरून होतो.
पार्टी मध्ये इ इ ठिकाणी एखादी व्यक्ती 'फ्लर्ट' करीत असेल तरी त्याचा अर्थ ती व्यक्ती शरीरसंबंधास तयार आहे असा नसतो. व्यक्तीला स्पष्ट शब्दात ते विचारले गेले पाहिजे आणि त्या व्यक्तीनेही तितक्याच स्पष्ट शब्दात ते मान्य केले पाहिजे. परदेशात ह्याबद्दल कायदे आहेत. भारतातील कायदे काय आहेत मला माहित नाही.
तसेच संमती कशी मिळवली हाही मुद्दा येतोच - काही आमिष देऊन, काही धाक दपटशा दाखवून, दारू/ड्रग्स देऊन की स्वखुशीने. संमती देणारी व्यक्ती सज्ञान होती का हे ही तपासले जाते.
र.च्या क ने पुरुषांनी बाई कडे बघायचे सोडून पुरुषांनी पुरुषांकडेच बघायचे ठरवले तरी वरील सर्व नियम लागू होतात. (किंवा एखाद्या स्त्रीने पुरुषास 'रेप' करायचे ठरवल्यास - अधिक माहितीसाठी The girl with dragon tattoo बघावा) माझे मत आणि खरा मुद्दा : इथे स्त्री विरुद्ध पुरुष असे नसून बलात्कार पिडीत विरुद्ध बलात्कार करणारा असे आहे. हा लिंगभेदामुळे येणारा प्रश्न नसून मनोवृत्ती चा प्रश्न आहे.

मध्यमवर्गीय ,

महान संस्कती असलेल्या भारत देशात लाखो बायकांना , जे झाकायचे तेच उघडे टाकून लपत छपत उघड्यावर विधी करावे लागतात. त्या बाय्कांसाठी ह्या महान संस्कृतीतल्या लोकांना काहीच कसे करावे वाटत नाही ? तसेच पुरुषांचा आणि लाजेचा दूर दूरचाही संबंध या संस्कृतित नसल्याने , रस्त्यावरच्या भिकार्यापासून ते कारमधल्या पुरुषमाणसापर्यंत सगळे भर रस्त्यात मुततात. असे भर रस्त्यात मुतणारे असंख्य पुरुष आपण पाहिले असतीलच.
आणि या रस्त्यावर मुतणार्‍या पुरुषांची जर आपल्याला 'लाज' वाटत नाही तर बाय्कांच्या केवळ लो वेस्ट जीन्स ची लाज का वाटते याचे एकच कारण मला तरी दिसते.
पुरुषाने संपुर्ण 'निलर्ज्ज' बनावे असे ही संस्कृति शिकवते. तर बाईला 'माणुस' तर नाहीच पण जनावराचे ही स्थान नाही. काम , क्रोध , मोह ई मानवी भावना बाईला अमान्यच . पण 'नैसर्गिक विधी' , जी कोणत्याही प्राण्याची बेसिक गरज , तीही बाईला पुरी करणे महा कठीण या देशात.

>>माझे मत आणि खरा मुद्दा : इथे स्त्री विरुद्ध पुरुष असे नसून बलात्कार पिडीत विरुद्ध बलात्कार करणारा असे आहे. हा लिंगभेदामुळे येणारा प्रश्न नसून मनोवृत्ती चा प्रश्न आहे.>> +१

साती, माझे आख्खे कुटुंबच स्त्रीवादी, आगावू वगैरे आहे आणि मुलगा कॅथोलिक स्कुलचा विद्यार्थी Wink

On serious note for us 'human rights are women’s rights and women’s rights are human rights once and for all.'

केवळ वाद म्हणुन नाही, पण मला खरेच हताश व्हायला होते की शहरी स्त्रियांवर विशेषकरून 'कपड्यांची' बंधने घालणारे हे पुरुष आणि अशा बेताल संस्था, गावातल्या स्त्री च्या अवस्थेवर एक शब्द का काढत नाहीत ???? केवळ हाणामार्‍या करून आपली 'शक्ती' दाखवणे यव्यतिरीक्त यांना कोणते सकारात्मक काम करता येते ?

बायकांची अब्रू इतकीच महत्वाची असेल आणि त्यांनी पुर्ण कपड्यातच सगळीकडे वावरावे असे यांना खरेच वाटत असेल तर गावो गावी बंदिस्त स्वच्छतागृहे का नसावी या देशात ? बायकांना उघड्यावर बसण्याची नामुष्की का यावी??
खरे सांगायचे तर आम्ही निर्लज्ज , निकम्मे आहोत. निर्बुद्ध असून केवळ शारीरिक आणि सांखिक बळाच्या जोरावर दुर्बळ घटकाला पिडणे , त्रास देणे हेच करण्यात आम्हाला मज्जा वाटते.

अगो आणि डेलिया दोघींच्याही पोस्ट चांगल्या आणि अत्यंत संयमित भाषेत लिहिलेल्या आहेत. अगोच्या पोस्टमधला शेवटचा भाग महत्वाचा आहे. संस्कृतीरक्षक पुरुषांनी, कमी कपडे घातलेल्या मुली बघून त्रास, चीड वाटणार्‍या पुरुषांनी शेवटच्या पॅरातलं वर्तन नक्की आचरणात आणावं. त्याने फरक पडल्यास उत्तमच. तसेच अगोची पोस्ट वाचून संस्कृतीरक्षक मनोवृत्तीच्या पुरुषांना त्यावर थोडा विचार करावासा वाटला तरी पोस्ट लिहिण्याचं सार्थक झालं असं समजायला हरकत नसावी.

सिमंतिनी, चांगली पोस्ट

तसेच अगोची पोस्ट वाचून संस्कृतीरक्षक मनोवृत्तीच्या पुरुषांना त्यावर थोडा विचार करावासा वाटला तरी पोस्ट लिहिण्याचं सार्थक झालं असं समजायला हरकत नसावी. >>> एक्झाकटली! एकदा तरी पुरुषांनी पुरुषांना ऐकवा कि "तिला नाही अक्कल (!) पण तू धड वाग"... दुर्जनोकी सक्रियता से अधिक घातक सज्जनोकी निष्क्रियता होती है.

>>पुढच्यावेळी कमी कपड्यातल्या मुलीची छेड काढणार्‍या मुलाला बघाल ना तेव्हा त्याचं बखोट धरुन त्याला ऐकवा की ती एक मूर्ख आहे. कसे कपडे घालावे कळत नाही पण तुला तुझ्या घरच्यांनी काही अक्कल शिकवली की नाही ? हीच का आपली भारतीय संस्कृती ? पुरुषांच्याच तोंडून अशी वाक्यं येऊ लागली तर उपरती होऊ लागेल अशी आशा करुया>><<

+१०००
makmd,
मुलींनी हावभाव्/हातवारे केले की पुरुष तसाच रीस्पोन्स देतात असे जर तुम्ही म्हणताय तर तुम्हाला नाही वाटत तो पुरुषच किती 'वीक' आहे.. त्याला त्याच्यावर कंट्रोल नाही? आणि ज्या माणसाचा स्वतःवर कंट्रोल नाही त्याला दुसरा कसा काय जबाबदार? बर, ज्या मुली काहीही प्रोवोकिंग कपडे/हातवारे करत नाहीत , त्यांच्यावर सुद्धा होतातच ना अचकट्/विचकट कमेंट्स? मग पुन्हा हेच साबित की पुरुषाला (काही विकृत) त्याचीच मनोवृतीच जबाबदार आहे. बघा लक्षात येतेय का.

किती दिवस ती गळचेपी करणार की मुलीने कमी कपडे घातले त्यामुळे हा प्रॉबलेम होतो.... Sad

डेलिया, +१००० ह्या खालच्या पोस्टला... निर्लज्जपणे पुरुष आपला कार्यभाग उरकतात..
>>महान संस्कती असलेल्या भारत देशात लाखो बायकांना , जे झाकायचे तेच उघडे टाकून लपत छपत उघड्यावर विधी करावे लागतात. त्या बाय्कांसाठी ह्या महान संस्कृतीतल्या लोकांना काहीच कसे करावे वाटत नाही ? तसेच पुरुषांचा आणि लाजेचा दूर दूरचाही संबंध या संस्कृतित नसल्याने , रस्त्यावरच्या भिकार्यापासून ते कारमधल्या पुरुषमाणसापर्यंत सगळे भर रस्त्यात मुततात. असे भर रस्त्यात मुतणारे असंख्य पुरुष आपण पाहिले असतीलच.
आणि या रस्त्यावर मुतणार्‍या पुरुषांची जर आपल्याला 'लाज' वाटत नाही तर बाय्कांच्या केवळ लो वेस्ट जीन्स ची लाज का वाटते याचे एकच कारण मला तरी दिसते.
पुरुषाने संपुर्ण 'निलर्ज्ज' बनावे असे ही संस्कृति शिकवते. तर बाईला 'माणुस' तर नाहीच पण जनावराचे ही स्थान नाही. काम , क्रोध , मोह ई मानवी भावना बाईला अमान्यच . पण 'नैसर्गिक विधी' , जी कोणत्याही प्राण्याची बेसिक गरज , तीही बाईला पुरी करणे महा कठीण या देश>><<

काल इथल्या काही शेवटच्या पोस्टस वाचून डोक अगदी बधिर झालं होतं. आज त्यावर अगो, सिमंतिनी आणि इतर लोकंनी दिलेली संयमित उत्तरे पाहून त्यांच खरंच मनापासून कौतुक वाटलं. आणि आता एक आणखी आश्वासक सूर सापडला.

http://www.thehindu.com/arts/magazine/a-letter-to-young-men-who-proteste...

सायो,

संस्कृतीरक्षक पुरुषांनी, कमी कपडे घातलेल्या मुली बघून त्रास, चीड वाटणार्‍या पुरुषांनी शेवटच्या पॅरातलं वर्तन नक्की आचरणात आणावं.

मला व्यक्तिश: उत्तान कपड्यांतली बाई बघून चीडबीड येत नाही. थोडा विरस होतो. कारण कोणतरी (स्त्री वा पुरूष) कुठेतरी बायकांवर होणारे छेडछाडीसारखे अत्याचार थांबण्यासाठी कळकळीने प्रयत्न करीत असतो. त्याच्या प्रयत्नांना बाधा पोहोचते म्हणून.

स्त्रियांना त्रास द्यायचे प्रकार रोखण्यासाठी स्त्री आणि पुरूष दोघांनीही मिळून प्रयत्न केले पाहिजेत. जमतील तेव्हढ्या स्त्रीपुरुषांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत.

आ.न.,
-गा.पै.

श्रुती,

>> गामा तुम्ही असं म्हणताय? असो. आता काय करायचं खरच कराच असं. बायकांना सुखाचे दिवस दिसतील.

वेगळ्या शब्दांत सांगतो. बाईकडे बाई म्हणून दुर्लक्ष केलं तरी माणूस म्हणून लक्ष द्यायला हरकत नाही. बाई म्हणून दुर्लक्ष करणे म्हणजे नक्की काय ते नाथलीलामृतातल्या १२ व्या अध्यायात पाहायला मिळेल :

nathleelaamrut_adhyay12_01.JPG

वर दिलेली ८५ व्या श्लोकातली अंतर्बाह्यसमदृष्टी जर सर्व पुरुषांनी बाळगली तर बायकांशी संसार करणार कोण! संसारेच्छुक पुरुषांची संख्या बरीच खालावेल. एका पुरुषाला एकापेक्षा जास्त बायका कराव्या लागतील. मान्य आहे का तुम्हाला?

जर मान्य नसेल, तर उत्तान कपड्यांवर आक्षेप घेणार्‍या पुरुषांना तालिबानी म्हणून हिणवणं बंद करा. बस. एव्हढंच. आजून काही नाही.

आ.न.,
-गा.पै.

>>>मला व्यक्तिश: उत्तान कपड्यांतली बाई बघून चीडबीड येत नाही. थोडा विरस होतो. कारण कोणतरी (स्त्री वा पुरूष) कुठेतरी बायकांवर होणारे छेडछाडीसारखे अत्याचार थांबण्यासाठी कळकळीने प्रयत्न करीत असतो. त्याच्या प्रयत्नांना बाधा पोहोचते म्हणून.>> काहीही!!! वेगळ्या शब्दांत तुम्ही पुन्हा बोट बायकांचा ड्रेसकोड ह्यावरच ठेवताय.

गा. पै.
माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही अजुन. बाईचे तोकडे कपडे न आवडणार्‍या पुरुषांना त्यांच्याच बायका उघड्यावर विधी करायला जातात किन्वा जावे लागते , ते कसे चालते ????

अरे बापरे हा तर फारच गंभीर प्रश्नच होईल की नाथलीलामृतात म्हणल्याप्रमाणे दुर्लक्ष केले तर... पण चला बघूया तर जमतंय का नाथलीलामृतातील दुर्लक्ष करायला! शिवाय जर स्त्रिया जर अशा 'अंतर्बाह्यसमदृष्टी' ने पुरुषाला बघू लागल्या तर पुरुषांना ही संसारासाठी प्रश्न पडतील. इथे ती चर्चा नको, इथे स्त्री विरुद्ध पुरुष हे मत नाही..
मला आपल साध भोळ ह्या गाण्याप्रमाणे http://www.youtube.com/watch?v=OBzFTyUJHF4 'न देखे कोई तो शराफत ही उसकी' अस किरकोळ 'शरीफ' 'दुर्लक्ष' आधीच्या पोस्त मध्ये अभिप्रेत वाटल की ज्यामुळे स्त्रियांना आणि पुरुषांना सुरक्षित रस्त्यात फिरता येईल. तेवढ गाण्यात सांगितल्यासारख किरकोळ दुर्लक्ष जमल आणि दुसऱ्या पुरुषाला शिकवलं तरी आम्हा अज्ञ अल्पसंतुष्ट स्त्री-पुरुषांना मोक्षाचा आनंद मिळेल ... ३३ वर्षापूर्वीच गाणे, आजही नवीन वाटत - 'किरकोळ गाण्यातील' आणि 'नाथलीलामृतातील' दोन्ही 'दुर्लक्ष' नाही जमत, हे खर !

अगो, डेलिया, सिमन्तिनी, उत्तम लिहिलंय. तुमच्या पोस्ट वाचून काही अंशी तरी बदल घडेल अशी
आशा वाटत होती. पण गा. पै. यांचे प्रतिसाद वाचून घोर निराशा झाली!!! घडा पालथा असेल तर काय उपयोग???
आदीम काळापासून आजपर्यंत पशु-पक्षी आहे तसेच राहिले फक्त मानव जातीची उत्क्रांती झाली पण
अस्थिर मतीचे आणि षड विकार स्वाधीन नसणारे नर पशु शिक्षण, संस्कार मिळूनही तसेच राहिले
ही खरी शोकांतिका.

>>आशा वाटत होती. पण गा. पै. यांचे प्रतिसाद वाचून घोर निराशा झाली!!! घडा पालथा असेल तर काय उपयोग???>>
अनिताताई, फक्त तुमच्या माहितीसाठी- मायबोलीवर आधीपासूनच 'पालथा घडा क्लब' अस्तित्वात आहे आणि त्याचा उल्लेख 'पाघक्ल' असा केला जातो.
>>>अस्थिर मतीचे आणि षड विकार स्वाधीन नसणारे नर पशु शिक्षण, संस्कार मिळूनही तसेच राहिले>> बुरसटलेली मेंटॅलिटी. ह्या अशा मंडळींवर कुठचाही इला़ज होणे नाही.

इतक्या गंभीर विषयातही उत्तान कपड्याचे आंबटशौकीन तुणतुणे आलेच.

उत्तान कपडे आणी बलात्कार यांच्यात काहीही संबंध नाही.ज्या मुलींवर बलात्कार झाला त्या उत्तान कपडे घालून हिंडत होत्या कि काय? आणी सरकारने कायदा करून 'उत्तान' कपड्यावर बंदी आणली तर बलात्कार संपतील ? कैच्याकै !

पाकिस्तानी सैनिकांनी बांगलदेशात चार वर्षाच्या मुलीपासून सत्तरीतल्या म्हातारीपर्यंन्त कुणालाही सोडले नव्हते. त्या सार्‍या उत्तान कपड्यात होत्या कि काय?

किती ते नेहमीच कपड्यांना दोष देणे!
बरं, अंगभर कपडे घातलेल्या/ म्हातार्‍या बायका/ अगदी लहान मुली ह्यांच्यावर अत्याचार होतात, त्याचे काय कारण मग?

एखादीला लो वेस्ट जीन घालण्यावरून टोकलं तर ती पुरूषप्रधान संस्कृती ! अशी जीन कि जीन्स घालणं हा तिचा हक्क. बरं मग तिच्याकडे कुणी पाहीलं तरी दोषी पुरूषच. काय कारण आहे अशी जीन्स घालण्यामागे ? या प्रश्नाचं उत्तर हवंय.
----- मुलीने/ स्त्रीने कुठले कपडे घालायला हवे हे ठरवण्याचा अधिकार केवळ त्यांनाच आहे.
तुम्हाल रुचत नसेल तर चक्क त्यांच्या कडे बघणे टाळा....

जे अपेक्षित आहे ते नाही घडलं तर मुलांच्या पौरुषत्वाला नावे ठेवणे, अपेक्षित आहे ते घडलं तर नजरच वाईट. अशा मुलीची छेडछाड झाली तर मग इतरांनी मधे पडायचं असं इथं एक जण सांगतोय.
------ अशा मुलींचीच छेड काढली जाते ? छेड काढण्यासाठी मुलीचे कमी कपड्यांत असणे हेच कारण असते असे तुमचे मत असेल तर अभ्यास वाढवा...

आम्ही स्पष्ट सांगतो आम्ही मार खायचा आणि द्यायचा असेल तर मुलींनी पण पथ्यं पाळली पाहीजेत. कमी कपड्यातली मुलगी दिसली तर आमच्या कपाळावर आठी पडणारच आहे.
------ हे काही पटत नाही.

सभ्यपणे पेहराव केलेला असतानाही छेडछाड झाली तर मात्र आम्ही एकशे एक टक्के त्याचा प्रतिकार करू.
----- सभ्यतेच्या व्याख्या स्थळ, काळा, समाजा नुसार बदलतात. सभ्यता ठरवणार कशी? डोक्या केसांपासुन पासुन पायाच्या नखापर्यंत जाड अपारदर्शक बुरखा घालणारी सर्वात सभ्य स्त्री समजायची ? मला तर येथे चक्क तालिबान बांधवांची आठवण झाली.
नशिब मुलीचे कॉलेजांत जाणे, शिक्षण घेणे, चित्रपट पहाणे यावर आक्षेप व्यक्त नाही केलांत.

तिथे आम्ही आमच्या जिवाची पर्वा करणार नाही. आमच्याकडून या अपेक्षा करता, मग उगाच आव्हानात्मक कपडे घालून फिरणा-या परप्रांतीय पोरींच्या कानाखाली वाजवायचा अधिकारही आम्हाला हवा. हे नाहीच चालणार.
------ परप्रांतीय पोरी ? ? Sad Angry कुठल्या जगांत आहात?

मध्यमवर्गीय साहेब कोण आहेत त्यांचे विचार मासलेवाईक आहेत अगदी;०:)
मधे पडायचे की मध्यमवर्गीय पापभीरू (?) मनोवृत्त्तीला जागून नजर चोरून निघून जायचे (जसे ते दिल्लीतले लोक रस्त्यावर पडालेल्या या दोघांना पाहूनही नजर वळवून निघून गेले!) याबाबत असे फिक्स निकष वगैरे असतात हे नव्हते माहित! तरी पण कळले नाही , पोरगी परप्रांतीय असण्याचा काय संबंध ? Uhoh

Pages