महिलांनि स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे?

Submitted by प्रिया७ on 18 December, 2012 - 11:06

गेले २ दिवस दिल्लीच्या रेपची माहिति वाचण्यात येत आहे. आजकाल बर्‍याच कारणाने महिलांना उशिरा पर्यंत घराबाहेर राहावे लागते. किंवा बाहेरगावी सुद्धा एकटे रहावे लागते. काहि सिंगल पेरेंट सुद्धा आहेत. अशा वेळी एकटे राहाणार्‍यानी घरि आणि घराबाहेर काय खबर्दारी घ्यावी? असा धागा असेल तर हा उडवुन टाकेन.

कवठीचाफा | 26 December, 2012 - 10:14
साडेतीन-चारवर्षे सेल्फ डिफेन्स अ‍ॅकेडमी नावाच्या संस्थेसोबत लहान काळाची शिबीरं झाली त्यात ज्या गोष्टींचे ट्रेनिंग दिले त्यातल्या महत्वाच्या गोष्टी. केवळ स्त्रियाच नाही पुरूषांनाही उपयोगी पडू शकतील अश्या.
१ ) कधीही समोरच्या व्यक्ती एकापेक्षा जास्त असतील तर प्रतिकारापेक्षा माघार घेणं उपयुक्त अर्थात याचा अर्थ थेट पळायला सुरूवात करणं असा नाही, यात तुम्ही दमाल आणि आयतेच हाती सापडाल.
२ ) सर्वात आधी परिस्थिती/वातावरणाचं बारकाईनं निरीक्षण करत रहायला हवं अनेकदा संभाव्य धोका लक्षात येतोच.
३ ) समोरच्या व्यक्तींमधल्या म्होरक्या किंवा लिडरकडे आधी लक्ष द्या, (काही सेकंदातच तो लक्षात येतो ) आपलं पहिलं लक्ष्य त्यालाच करा. आता कसं ? ते पुढे
४) पायात जर हिल्स असतील तर त्यांचा आघात गुडघ्याच्या बाजूच्या भागावर करा, लक्षात घ्या संवेदनशील भागावर हल्ला होणार या तयारीत समोरची व्यक्ती असते तीथे प्रहार वाया जाईल. गुडघ्याचा बाजूचा भाग हा देखील विक पॉइंटच असतो तिथला मार सहन होत तर नाहीच पण त्यानंतर काहीकाळ पायही टेकता येत नाही.
५ ) डोळे हा अतिमहत्वाचा भाग त्याला लक्ष्य करा
६ ) पेन, डोक्यातली क्लिप ही उपयुक्त हत्यारं आहेत त्यांचा वापर करा, यांच्यासाठी हाताचा कोपराजवळचा भाग, तळहाताचा मागचा भाग, कान, त्याच्या मागच्या सॉफ्ट टिश्युज यांना लक्ष्य करा
७ ) पाठीमागुन पकड घातल्यावर ताबडतोब हताश होऊ नका ( सामान्यपणे इथेच आपण गडबडतो ) पायाच्या टाचेचा आघात मागच्या व्यक्तीच्या पायाच्या नडगीवर करा आथवा हातातला पेन, पीन मागच्या व्यक्तीच्या कानाच्या आसपास मारा.
८ ) दातांचा वापर करा मात्र हात किंवा दंड यांच्या बाबत माणूस सहनशील असू शकतो, त्यांचा वापर कान आथवा मानेवर करा.
९ ) दगड हे उत्तम शस्त्र आहे, अंतर मिळालं तर हमखास वापर करा
१० ) हे सगळं करण्यासाठी, मनात बेडरता आणि क्रूरता येण्याची गरज आहे त्याचसोबत सवयही लागण्याची गरज आहे. शक्य झाल्यास कुणीतरी पार्टनर घेऊन नॉनफेटल प्रॅक्टीस करा.
११ ) प्रतिकार करायचाच आहे याची खूणगाठ बांधून शरीर शिथील ठेवण्याची सवय करून घ्या.

उदयन.. | 18 December, 2012 - 22:15
चोरटे स्पर्श, नको तिथे चिमटे यांकडे दुर्लक्ष करा. आठवड्यातून तीन वेळा तुम्ही कुर्ला दादर अश्या ठिकाणी एकटीच नेहमी मारामारी करत बसू शकत नाही. >>>>>>>>>> इथेच चुकतात तुम्ही......एक ब्लेड नाहीतर लहानसा धारधार चाकु ठेवा..... असे काही झाल्यास लगेच मारा.......तेही जोरात.... परत कुणाला हात लावणार नाही

सामोपचार | 18 December, 2012 - 22:17
उदयनजींना अनुमोदन.......हल्ली लहान नेलकटरसारखी अवजारे असतात ती जवळ ठेवावीत. पटकन काढून भोसकायला बरी पडतात.

स्मितू | 18 December, 2012 - 22:57
मी उदय च्या मताशी सहमत आहे.... ...ट्रेन मध्ये... बसमध्ये प्रवास करतांना महिलांना ,मुलींना आश्या बर्‍याच प्रसंगांना तोंड द्यावे लागते आश्या वेळेस मुलींनी.... आपल्या जवळच्या सेफ्टी पिन चा वापर करावा.... पुरुषाच्या घाणेरड्या हालचाली लक्षात आल्या की लगेच बारिक पिन टोचायची...बरोबर चुपचाप बसतो तो.... ब्लेड, चाकु हे हत्यार जरा जास्तच होते..
शक्य्तोवर रात्रीचा प्रवास एकटीने टाळावाच... खुपच अर्जंट असेल तर सोबत कोणाला तरी घ्यावे...

mansmi18 | 19 December, 2012 - 03:12
पेपर स्प्रे मधे पेपरच असायला हवा का? हौ अबाउट सल्फ्युरिक अ‍ॅसिड?
असे काही चाळे करणार्‍यावर महिलानी अ‍ॅसिड का टाकु नये? एक दोन लोकाना या अ‍ॅसिडचा प्रसाद मिळाला की पुढे अशी काही विकृत इच्छा असणारे पुरुष असे काही करण्याआधी शंभर वेळा विचार करतील.

swanand_ml | 19 December, 2012 - 16:42
मला तात्वीक चर्चेत रस नसल्याने फारसे प्रतीसाद न वाचता प्रतिसाद देत आहे तरी माफी असावी.
महिलांसाठी स्वसंरक्शणावर दोन शब्द लिहु इच्छीतो.
ज्याला जगायचे आहे त्याला झगडावे लागेलच.
महिलांनी शस्त्र बालगण्यावर येथे चर्चा झाली. मला स्वताला ह्या दोन गोष्टी आवडतातः
http://en.wikipedia.org/wiki/Karambit
http://en.wikipedia.org/wiki/Push_dagger
लपवीण्यासाठी सोपे, हाताळण्यासाठी सोपे व हिसकावून घेण्यास अवघड. इंटरनेट वर उपलब्ध.
केवळ शस्त्र आहे हे पुरेसे नसते. ते हाताळन्याची व वापरण्याची मानसीकता असणे गरजेचे असते. त्यासाठी प्रशीक्शण गरजेचे आहे.
बंगळुर वासी येथे जवु शकतातः
http://kravmagabangalore.in/
मुम्बई: http://www.kravmagaindia.in/locations/mumbai
दिल्ली: http://www.kravmagaindia.in/locations/delhi
वरील प्रशिक्शण केंद्रे शस्त्रप्रशिक्शणाची नसून संरक्शण प्रशिक्शण केन्द्रे आहेत ह्यची नोन्द घ्यावी.
बहुत काय लिहणे. आपण सुज्ञ असा.

दिनेशदा | 21 December, 2012 - 05:52
मीही जसे सुचेल तसे लिहित जातोच. एकटे घराबाहेर पडल्यावर, जर कुठल्याही असुरक्षित भागातून जात असू तर अगदी नियमित रित्या घरच्या व्यक्तीला किंवा सहकारी व्यक्तीला फोन करुन आपला खरा ठावठिकाणा कळवत राहणे हा एक उपाय सुचतो मला.
संध्याकाळच्या वेळी आपल्या परिसरातील कुठलाही भाग एकाकी राहणार नाही, याची काळजी. घरी असणार्‍या किंवा जेष्ठ व्यक्तीनी घेतली तरी चालेल. अशा भागात गटाने ऊभे राहून चर्चा करावी, जाग राखावी.
घरीच कंटाळत कण्हत राहण्यापेक्षा. बसस्टॉपवर / नाक्यावर जाऊन ऊभे राहिले तर काय वाईट ?
पुर्वी आमच्या कॉलनीत यायला अंधारा रस्ता होता. त्यावेळी एखाद्या व्यक्तीला उशीर होत असेल, तर घरची माणसे रस्त्यावर जाऊन थांबत असत. तसेच कुणी एकटा माणूस असेल, तर तो सोबत मिळेपर्यंत हायवेवरच थांबत असे.
ज्यांची कामाला जायची जागा निश्चित आहे त्यांनी यायच्या जायच्या वेळी गटाने आणि तेसुद्धा स्त्री आणि पुरुष अशा मिश्र गटाने शक्यतो प्रवास करावा. जर यायच्या जायच्या बस किंवा गाड्या ठराविक असतील, तर
सहप्रवाश्यांशी मैत्री करावी. एखादा सहप्रवासी नेहमीच्या वेळी दिसला नाही तर चौकशी करावी.

नीधप | 21 December, 2012 - 08:28
प्रतिकार करा हा उपाय व्यवहार्य नाही <<<
सतत शक्य नाही. हपिसला/ कॉलेजला जाताना, घरी परतताना... रोजचे रोज
एखाद्या दिवशी केला जातोच.
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.

Kiran.. | 21 December, 2012 - 08:50
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.
+
()महिला जागृतीसाठी अभियान निर्माण करणे : राज्य / राष्ट्रव्यापी अभियान आणि त्याच्या गाव/तालुका/जिल्हास्तरीय समित्या यातून कायमस्वरुपी जागृती घडवून आणणे. यात स्वयंसेवी संस्था / सरकारी संस्था / खाती यांचा समन्वय साधलेला असावा. कार्यकर्त्या निर्माण करून घराघरापर्यंत जागृतीचे अभियान न्यायला हवे.
* ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी परिसंवाद / वर्कशॉप्स राबविणे. माध्यमप्रतिनिधी / पोलीस / न्याययंत्रणा यांच्या प्रतिनिधींनाही सामान्यजनांबरोबर सहभागी करून घेतल्यास लोकांच्या अपेक्षा आणि प्रत्यक्षातल्या अडचणी याबद्दल देवाण घेवाण होऊ शकेल.
* महिलांविषयक गंभीर गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालयांची स्थापना व्हावी यासाठी पाठपुरावा करणे.

आहना | 21 December, 2012 - 08:46
१. पेपर स्प्रे बाळगणे>>> पेपर प्रे उपलब्ध नसल्यास पर्स मधे डिओड्रन्ट वापरा

उदय | 21 December, 2012 - 09:01
(अ) प्रसंगावधानता दाखवणे महत्वाचे आहे. १९९८, दिल्लीच्या DTC मधेच एका युवतीवर असाच प्रसंग आलेला होत, पाच लोकांशी सामना करत सुटका केली... पुढे कोर्टाने गुन्हेगारांना शिक्षाही दिल्यात.
थोडा कमी पणा आला तरी चालेल, पण 'पाच लोक' टवाळी करत आहेत, तर तेथे हुज्जत घालण्यापेक्षा सटकणे महत्वाचे. माघार घेण्यात कमीपणा कधिच नसतो...
युक्ती (थोडे डोक) आणि बळ असा समन्वय साधल्यास घटना कमी घडतील.
(ब) सर्वात महत्वाचे असे प्रसंग अगदीच अनोळखी लोकां कडुनच होतात हा गैरसमज काढुन टाकणे. बहुतेक प्रकारांत ओळखी किंवा नात्यामधिलच व्यक्ती असतात. वर अनेकांनी सुचवलेल्या उपायांत हा मुद्दा मला दिसला नाही म्हणुन लिहावेसे वाटले.
दर दिवशी जरी त्याच व्यक्तीसोबत प्रवास करत असाल किंवा कामा निमीत्त संपर्कात येत असलांत, तरी प्रत्येक क्षणी सतर्क राहुन "उद्देशांत काही बदल झालेला नाही आहे नां?" हे तपासायला हवे. दोन व्यक्ती एकाच ठिकाणि काम करत आहेत, कामा निमीत्त प्रवासाला सोबत जावे लागणार आहे... सावध आणि सतर्क रहाण्यात काहीच हरकत नाही.
(क) प्रसंगावधानता मधे गाड्यांना (मग ऑफिसची असेल किंवा सार्वजनिक वहान असेल) पारदर्षक काचा नसतील तर प्रवास करायला चक्क नकार द्यायचा. सार्वजनिक वहानांना कशासाठी हवेत टिंटेड काचा किंवा पडदे ?

प्रिया७ | 21 December, 2012 - 16:12
ब्राईट एलईडि फ्लॅश लाईट जो वेळ प्रसंगि कामी येतो सरळ डोळ्यात मारता येतो,सेफ्टि पिन,सेल फोन वर (९११) किंवा ईमर्जन्सि नंबर स्पीड डायल ला सेव्ह करुन ठेवणे, पेपर स्प्रे नसेल तर छोटि परफ्युम बाटलि सुद्धा वापरता येते, फेसबु़क वर कुठे जात असाल तर त्याची माहिति न टाकणे किंवा Laxmi (कसे लिहायचे मराठित) पुजन चे दागिन्यांसकट फोटो न टाकणे,कुठे एकटे असतांना कानात हेड्सेट घालुन ठेवु नये,गाडि चे रिमोट लॉक गाडिजवळ जावुनच उघडणे,गरज पडल्यास खोटे बोलणे,रात्रिच्या वेळि एकटे असाल तर कोणाला दया दाखवायच्या आधि/ मदत करायच्या आधि २-३ दा विचार करा .

मुंगेरीलाल | 23 December, 2012 - 00:51
एक साधा आणि परिणामकारक उपाय म्हणजे एक जोरदार, तीव्र आवाजाची शिट्टी (पर्समध्ये अथवा किचेन म्हणून) जवळ बाळगणे. कुठलाही गुन्हेगार (किंवा त्यांचा समूह) एका क्षणात दचकतो आणि तुम्हाला सुटका करून घेण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. शिवाय हे शस्त्र नसल्यामुळे जवळ ठेवण्याला कुठली परवानगीही लागत नाही आणि वापरायला कसलं कौशल्यही लागत नाही.

अश्विनीमामी | 23 December, 2012 - 03:12
एक गोष्ट मला लक्षात आली, मुली, स्त्रीया ऑफिसला जातात किंवा घरी उशीरा येतात. तर आपला हपीसचा मजला आणि ग्राउंड फ्लोअर, कँतिनचा फ्लोअर हेच सहसा माहीत असते. घरीही तेच. ग्रा. फ्लो आणि आपला मजला. व्यतिरिक्ग आपली बिल्डिंग कशी दिसते आपल्याला माहीत नसते. सवडीने, फुल प्रकाशाच्या दुपारी पूर्ण बिल्डिंग/ ऑफिस काँप्लेक्क्ष , खास करून पार्किंगची जागा ह्याची माहिती करून घ्यावी. नजर सरावलेली असावी. फोटो काढून जागांची माहिती करून घ्यावी. प्रत्येक जागी आडोसे, अंधार्‍या जागा, उंचावरून मुलीला फेकून देता येइल अश्या जागा विशेषतः पार्किंग मध्ये खूप आढळतील. त्या अवगत करून घ्याव्यात. मैत्रिणींना, घरच्यांना सांगावे बोलावे ह्याबाबत. बरेचदा पहाटे किंवा रात्री आपलीच बिल्डिंग अनोळखी भीती दायक जागा बनू शकते. अ‍ॅटॅकरला तेच हवे असते. तो तुमचा गैरफायदा घेण्यास पूर्ण समर्थ असतो. फोनवर इमर्जन्सी नंबर आधीच देऊन स्पीड डायल वर ठेवावा. आयत्यावेळी कोणाला फोन करावा असे व्हायला नको.
पोर्टेबल टेसर सारखे उपकरण पर्स मध्ये असावे. बॅटरी नक्की. मुली फ्लॅट मध्ये राहात असतील तर शक्य असल्यास एक कुत्रा नक्की पाळावा. हे मी विनोदाने आजिबात लिहीत नाही. त्यासारखे संरक्षण नाही.
पुरुषांना त्याची भीती नक्की वाट्ते.
बिनओळखीच्या पुरुष व स्त्रीयांशी आजिबात बोलू नये. लिफ्ट मध्ये खास करून.
वॉचमन ला पण आपल्या जाण्या येण्याच्या पॅटर्न ची माहीती फार देऊ नये. रिक्षा वाले टॅक्सीवाले कधे कधी फार बोलतात त्यांना उत्तेजन देऊ नये. इथे किती पटेल माहीत नाही पण शहरांमध्ये सर्विस इंडस्ट्री जसे वाहन चालक, वेटर, वॉचमन ऑफिसातील प्यून्स वगैरे बाहेरच्या राज्यातून आलेले एक्टे
पुरुष असतात. एकाच रूटीन कामात अडकलेले, जास्तीच्या तासांचे काम करून वैतागलेले असतात.
बायको गावी त्यामुळे ..... पण त्यांना आपली मानसिकता समजेल अश्या भ्रमात राहू नये. स्त्रीवाद वगैरे तर दूरची गोष्ट.

सुमेधाव्ही | 29 December, 2012 - 08:02

आमच्या ऑफिसमधे मध्यंतरी एसीपी पुणे यांचे भाषण झाले होते त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या खालीलप्रमाणे, (भाषण साधारणपणे हिंजवडी परिसरात काम करणार्‍या महिलांची सुरक्षा असा असल्यामुळे नयन पुजारी केसच्या संदर्भात होत्या पण त्या सगळ्यांनाच उपयोगी पडतील त्यामुळे आठवेल तसे लिहिते आहे.)

पुणे पोलीस, फोन नं फक्त १०० एवढाच नाहीये. १०० नं लक्षात रहाण्यासाठी उत्तम पण इथे काहीही+ सर्व कंप्लेंट्स येत असतात त्यामुळे हा नं दर वेळेस लागतोच असे नाही. त्यामुळे इतर नं पण माहीत हवेत. ते मोबाईलवर सेव्ह केलेलेही हवेत.
पोलीस कं रुम. १००, २६१२२०२, महिला/ बाल हेल्पलाईन - २६०५०१९१ क्राईम अ‍ॅलर्ट -२६११२२२.
हे नं दिवाळी किंवा कोणत्याही निमित्ताने शुभेच्छा संदेशाबरोबर एकमेकांना वारंवार समस करून पाठवले म्हणजे मग ते आपोआप सेव्ह होतात व सेव्हड रहातातही.
(वि.सु. पोलीसांशी बोलताना मराठी लोकांनी मराठीतच बोलावे, कारण पुण्यातले जवळपास सगळे पोलीस पुणे परिसरातले व मराठी बोलणारे आहेत. इंग्लीशला ते कधीकधी बिचकतात व मग संभाषण नीट होऊ शकत नाही.)
अनोळखी व्यक्तीकडे लिफ्ट मागु नये. सार्वजनीक वहान सगळ्यात सेफ.
काही जणींना कॅबमधून यावे लागते ती कॅब जरी कं ने पुरवली असेल तरी ती बाहेरील एजन्सीकडून आणलेली असते त्यामुळे सजग रहावेच लागते. कॅबमधे बसल्यावर "रोज"सगळ्यांना ऐकू जाईल अश्या आवाजात घरी एक फोन करायचा. त्या फोनमधे कॅबचा नं तुम्ही उच्चारुन अमुक अमुक कॅबमधून तुम्ही प्रवास करत आहात व आत्ताचे तुमचे लोकेशन सांगायचे व अजून कीती वेळ घरी पोचायला लागेल त्याचाही उल्लेख करायचा. (जर का मोबाईलमधे बॅलन्स नसेल, किंवा रेंज येत नसेल तरी हा फोन खोटा खोटा असायलाही हरकत नाही. तेवढे अ‍ॅक्टींग जमवायचे स्मित
"कायम" हो हो...कायम्...कधीही जोरात पळता येउ शकेल असेच बुट्/चपला/कपडे असावेत. म्हणजे उंच टाचांचे बुट वगैरे ऑफिसात किंवा ऑफिसच्या पार्टीजना जिथे तुम्ही एक्ट्या जाणार आहात तिथे नकोत.
आर्थिक व्यवहारांची, घरगुती भांडणे, भानगडींची चर्चा कॅबमधे नकोच. इथे रोज अ‍ॅलर्ट रहायला हवेच.
बरेचसे कॅब ड्रायव्हर हे युपी एमपी मधील खेड्यांमधून आलेले असतात जिथे बायका त्यांच्या दृष्टीसही फारश्या पडत नाहीत. त्यामुळे शहरातल्या कॉन्फिडन्ट, पैसे मिळवणार्‍या, स्वतःच्या मर्जीप्रमाणे खर्च करणार्‍या व स्वतंत्र विचारांच्या बायकांबद्दल त्यांना असुया वाटते. अनेकदा त्यांचा इगो दुखावल्यामुळे सुडापोटी पण बलात्कार केले जातात. त्यामुळे शक्यतो ह्या लोकांशी हुज्जत न घालणे, जेवढ्यास तेवढे बोलणे, जास्त माहीती शेअर होणार नाही हे पहाणे हे महत्वाचे. काही मुली कॅबमधे बसल्या की घरच्यांशी जे काही बोलतात त्यातून बरीच माहीती दुसर्‍याला मिळते आहे हे त्या विसरतात.
एटीएम मधे दर शुक्रवारी पैसे काढणे, एकाच एटीएम मधून पैसे काढणे असे करू नये...बदलत रहावे. थोड्क्यात म्ह़णजे प्रेडीक्टेबल राहू नये. बर्‍याच जणी जाता जाता २ मि. थांबायला सांगून एटीएम मधून पैसे काढतात.
एकटीदुकटी मुलगी/स्त्री रात्री कारमधून घरी परत जात असताना जर गाडी बंद पडली, तर आड रस्त्यावर असाल तर गाडीतून बाहेर पडण्यापेक्षा पोलीसांना फोन करावा. रात्री त्यांच्या मोबाईल व्हॅन्स हिंजवडी परिसरात गस्त घालतात. (त्यांचा सेल नं पण आहे) त्या दहा मिनिटात मदतीसाठी पोचू शकतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Dear Leaders, A simple test: If any measure you suggest to prevent rape, has anything that a woman has to do, you've probably got it wrong.
ट्विटरवरून

हि न्युज वाचा
http://timesofindia.indiatimes.com/india/He-raped-killed-6-yr-old-got-of...
मुलिंच्या कमी कपड्यांचे ज्यांना problem आहेत त्यांनी मला सांगा या बातमी मधल्या ६ वर्षाच्या मुलिने बिचारिने काय कमी कपडे घातले म्हणुन तिच्यावर अत्याचार झाले का? ५-६ वर्षाची मुलगि बिचारी -तिने नसतिलही घातले कपडे तरि ६ वर्षाच्या मुलीकडे बघुनहि लोकांना काहि करायची इच्छा होते म्हणजे नक्किच काहितरि problem आहे त्यांच्या mentality मधे.
अजुन एक
http://timesofindia.indiatimes.com/india/I-want-chemical-castration-for-...
वाचा माणसाने स्वतःच्या मुलिवर रेप केला. आता हि मुलगी घरात कमि कपडे घालुन बसलि म्हणुन तिच्या स्वतःच्या बापाला तिच्याकडे बघुन रेप करायची इच्छा झालि असेल का?
हि पुण्याचि न्युज वाचा -
http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Pune-rape-victims-husband-t...
या मधे ६५ वर्षाच्या बाईला मारुन २५ वर्षाच्या प्रेग्नंट बाईवर रेप करुन त्यांना मारले.
अजुन एक -
http://www.ndtv.com/article/india/four-minor-girls-raped-in-west-bengal-...
खरोखर कमी कपड्यांची कारणे देणे बंद करा. Grow up -mentally!!! नसेल जमत तर एखाद्या गुरुला पकडुन मंत्र घ्या आणि तो जपत जा कमी कपड्यातली मुलगि दिसली कि.

अरे वा, इथे बरेच तारे तोडलेले दिसताहेत.

बाईकडे बाई म्हणून न बघितल्याने बायकांची फारच कुचंबणा होईल असं वाटणार्‍यांचा निषेध!

बायका काही तुमच्या कृपाकटाक्षावर जगत नाहीयेत हे जरा कृपया लक्षात घेणार का? बाईकडे बाई म्हणून बघूच नका, माणुस म्हणून बघा हे अनेकवेळा सांगूनही डोक्यात शिरत नाहीये का? जर विचारांवरचा वर्षानुवर्षे चढलेला पुरुषी मनोवृत्तीचा गंज खरवडता आला तरच ही नविन विचारधारा तुमच्या लक्षात येईल. मग लहान मुलगी दिसली तर तिच्याबद्दल ममत्वच वाटेल, वृद्ध स्त्रीबद्दल आदरच वाटेल आणि इतर स्त्रिया या निव्वळ माणुस आहेत आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची सक्ती करण्याचा आपल्याला अधिकार नाही हे ही उमजेल.

पण इथले ऐकूण विचार बघता भविष्य फार उज्ज्वल आहे असं दिसत नाही.

दोन व्यक्तींमधील नैसर्गिक शारिरीक आकर्षण आणि वासनेचे प्रकट स्वरूप या दोन अगदी वेगळ्या वृत्ती आहेत.

स्त्री-पुरुषांना (किंबहुना पुरुष-पुरुष अथवा स्त्री-स्त्री यांना) एकमेकांच्या शरीराची ओढ असणे अगदी नैसर्गिक आहे.

असे आकर्षण असलेल्या व्यक्तींनी (कायद्याने संमत केलेल्या वयानंतर) परस्पर संमतीने एकत्र येणे हा कायद्याचा मार्ग. याव्यतिरीक्त इतर कोणत्याही मार्गाने आपल्या वासनेकरता इतर कोणास बळी जाण्यास भाग पाडणे हे कोणत्याही परीस्थितीत, कोणत्याही जाती-धर्म-प्रांताच्या व्यक्तीबाबतीत, कोणत्याही प्रकारचे कपडे घातलेल्या अथवा न घातलेल्या व्यक्तीच्या बाबतीत केव्हाही चुकीचे वर्तन ठरते, कायदाबाह्य ठरते आणि त्यामुळेच दंडनीय ठरते.

मामी | 7 January, 2013 - 10:00 नवीन<<<

उत्तम भाष्य

धन्यवाद

एका समाजसेविका/समुपदेशिकेकडून ऐकलेला किस्सा:

पुण्यातलेच एक मध्यमवर्गीय कुटुंब. मुलीच्या तेराव्या वर्षापासून तिचा सख्खा बाप तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. आता ती सतरा-अठरा वर्षांची आहे. तिने एकदा हा प्रकार तिच्या भावाच्या कानावर घातला. तो काही करणार इतक्यात दुर्दैवाने त्याला अपघात होऊन तो त्यात गंभीर जखमी झाला. बापाने मुलीला सांगितलं, तुझ्या भावाच्या उपचारांसाठी पैसे खर्च करायला हवे असतील तर तुला माझ्याबरोबर झोपावेच लागेल. तिने आईला सांगितलं तर आई म्हणते भावाचा जीव वाचवायला तू झोप वडिलांबरोबर.

आता यात कमी कपडे वगैरेंचा संबंध कुठे आला कुणी सांगेल का? जिथे मुलगी स्वतःच्या घरी सुरक्षित नाही, तिथे बाहेर कितीही कपडे घालून वावरली तरी...........जौद्या Sad

भ्रमर | 7 January, 2013 - 10:15 नवीन
0
Vote up!
सर्वात सोपा उपाय.

http://www.youtube.com/watch?v=kO04G6gLUEc&feature=youtu.be <<<

या लिंकवर ३.४० मिनिटांनीचे वाक्य ऐका व टाळ्याही ऐका.

भाषेबद्दल माफी असावी, पण या बापूंना लाथा घालायला हव्या आहेत आणि त्या अनुयायांवर लाठीहल्ला करायला हवा आहे.

अक्कल कुठे कचरापेटीत टाकून येतात हे लोक!

दिल्लीत घडलेल्या घटनेने लाखो भक्तांचे पित्त खवळले, त्यांना राग आला, त्यांच्या मुठी वळल्या.... या सर्व गोष्टीं बापूंना दिसतात. अपघात ग्रस्त स्त्री तुमची भक्त नव्हती हा भाग सोडा... पण लाखो भक्तांसाठी करा ना त्या नराधमांना शिक्षा... असा साधा सोपा प्रश्न भक्तांना पडत नाही.

वर दिलेली ८५ व्या श्लोकातली अंतर्बाह्यसमदृष्टी जर सर्व पुरुषांनी बाळगली तर बायकांशी संसार करणार कोण! संसारेच्छुक पुरुषांची संख्या बरीच खालावेल. एका पुरुषाला एकापेक्षा जास्त बायका कराव्या लागतील. मान्य आहे का तुम्हाला? >>>>> तुम्हाला खरच वाटतं का मनापासून की सगळे नाहीतरी अगदी जास्तीत जास्त पुरूषांना हे करणं शक्य होईल? असं असतं तर आतापर्यंत या सगळ्या पुरूषांनी संन्यास घेतला असता की नाही? इतकं सगळं करण्याची सुद्धा गरज नाहीये खरंतर फक्त बायकां कडे एक माणूस म्हणुन बघितलं की झालं. दुसरं असं की "अंतर्बाह्यसमदृष्टी सर्व पुरुषांनी बाळगली" नसतांना सुद्धा याच काळात एकापेक्षा जास्त बायका करतायत की. त्याविरूद्ध कायदा ही आहे. तो मुद्दा वेगळाच, पण मला तरी त्यामुळे (त्याबायका सोडल्या तर इतर) बायकांची पंचाईत वगैरे झाल्यासारखी दिसत नाही.

यापुढचं तुमच्या वाक्याचा उल्लेख केलेला असला तरी जनरल लिहीलय. तुम्हालाच असं नाहीये. ज्यांना ज्यांना ते वाटतय त्या सगळ्यांसाठी आहे.

जर मान्य नसेल, तर उत्तान कपड्यांवर आक्षेप घेणार्‍या पुरुषांना तालिबानी म्हणून हिणवणं बंद करा. बस. एव्हढंच. आजून काही नाही. >>>>> अहो आता कितीदा आणखी कसं सांगायचं हे? तालीबानी म्हणजे कुठलाही सारासार विचार न करता मला बरोबर वाटतय तोच कायदा असं म्हणणारे आणि सगळ्यांनी तसाच विचार करावा, तसच वागावं नाहीतर एक्स्ट्रीम शिक्षा असं वागणारे.
उत्तान कपडे हे अतिशय सापेक्ष आहे. कुणाला टाईट टॉप उत्तान वाटेल कुणाला नौवारी साडी कुणाला जीन्स तर कुणाला स्कर्ट. आता हे फायनल कसं ठरवणार? पूर्ण काळा बुरखा पण अत्तिशय टाईट फिटींग असं घातलं तर मुख्य उद्देशाचे बारा वाजलेच नां? हे एक झालं.
दुसरं : आज सो कॉल्ड उत्तान कपड्यांवर आक्षेप घेतला जातोय ऊद्या मोबाईल फोनवर आक्षेप येईल मग बाहेर पडण्यावर येईल मग आणखी काही. काळ सोकावतच जाईल नां.
तिसरं: आज भारतात जनरली किती बायका सो कॉल्ड उत्तान कपडे वापरतात? प्लीजच भारतात म्हणतेय मी तेव्हा आमच्या परसातली शकु आणि मागच्या गल्लीतली बकु इतकाच डाटाबेस धरायचा नाहीये. माझ्या अंदाजानी
जास्तीत जास्त मुली,बायका जीन्स्/ट्राउझर्/पँट सोबत शर्ट्/टी शर्ट्/टॉप/कुर्ती किंवा पंजाबी ड्रेस वापरतात.
त्याखालोखाल पंजाबी ड्रेस किंवा साडी वापरतात.
नंतर स्कर्ट (युनिफॉर्म किंवा जनरल) वापरणार्‍या आणि मग उरलेल्या रीव्हीलिंग कपडे वापरणार्‍या. आता तेवढ्यानी पण प्रोब्लेम होत असेल तर कमाल आहे.

डेलिया,

>> गा. पै.
>> माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही अजुन. बाईचे तोकडे कपडे न आवडणार्‍या पुरुषांना त्यांच्याच बायका
>> उघड्यावर विधी करायला जातात किन्वा जावे लागते , ते कसे चालते ????

अहो, आता काय सांगायचं! बायका उघड्यावर जातात कारण काही पर्याय नसतो म्हणून. ती एक तडजोड आहे. पाश्चात्य देशांसारखी विधी करायची सोय दुर्दैवाने भारतात जागोजागी नसते. ही गंभीर त्रुटी आहे. हिचं मूळ मूर्खासारख्या नगरसंरचनेत (आणि भ्रष्ट कारभारात) आहे.

उघड्यावर विधीस बसलेल्या स्त्रीकडे आंबटशौकीनपणे पाहणे ही मात्र विकृती आहे. त्याबद्दल दुमत नसावे. पण हा सगळ्या पुरूषमंडळींचा कट आहे, हे म्हणणे अमान्य.

आ.न.,
-गा.पै.

हे सगळे भोंदू बाबा बुवा बापू आपापल्या पोळ्या भाजून घेतायत. >> ह्या आसाराम साहेबांचा तो सुद्धा उद्देश नाहीए. उगा आपले काहीतरी बोलायचे म्हणून बोलत आहे. काय बावळट आणि अतार्कीक विधान आहे....

आसाराम बापूंनी आपले ज्ञान पाजळले वाटतं. त्या नराधमांना भाउ, दादा म्हणायचे होते... Sad

(बापू वगैरे काय झाले म्हणून त्यांचे विचार व वृती नेहमीच बरोबर असतील असे नाही. )
आता प्रसिद्धी मिळवायची तर अशी विधानं करणारच.

चला, हेडरम्धे उपाय अपडेट करा. असले बलात्कारी पुरूष दिसले की ताबडतोब त्यांच्या पाया पडा आणि "ओवाळिते भाऊराया" म्हणत त्यांची विनवणी करा.

बापूंचे उपाय वाचल्यानंतर याहून अचाट उपाय कुणी सुचवेल असं वाटलं नव्हतं. आसारामबापूंनी ते करून दाखवलं.

सिमन्तिनी,

>> अस किरकोळ 'शरीफ' 'दुर्लक्ष' आधीच्या पोस्त मध्ये अभिप्रेत वाटल

तसं असेल तर त्या किरकोळ दुर्लक्षावर प्रतिसाद बघा काय आलेत ते.

१. श्रुती बघा (उपरोधाने) म्हणताहेत की बायकांना सुखाचे दिवस येतील.
२. नंदिनी (आणि ५ अनुमोदक) बघा म्हणताहेत, की गामाकडेच दुर्लक्ष करा म्हणून.

आता आपण श्रुती आणि नंदिनी (अधिक ५ अनुमोदक) यांनी आपापसांत ठरवा की 'किरकोळ दुर्लक्ष' हवंय की 'तीव्र दुर्लक्ष' हवंय की 'गाम्याकडेच दुर्लक्ष' करायचं ते.

आ.न.,
-गा.पै.

लवकरात लवकर या बापू वगैरे लोकांना, मा. भागवतांना व त्यांच्या अनुयायांना हा देश चालवायला द्या. सगळे कसे कल्याण होईल, व परचक्र आले आहे वगैरे सांगून, अथवा गोमातेची महती सांगून पुन्हा एकदा सगळ्या महिला कशा सुरक्षीऽत होऊन जातील. हाकानाका

मला व्यक्तिश: उत्तान कपड्यांतली बाई बघून चीडबीड येत नाही. थोडा विरस होतो.<<<<
बाईने कितीही उत्तान कपडे घातलेले असले तरी तिच्याकडे मादी म्हणून बघू नये. चुकून अनावृत्त झालेल्या स्त्रीची तर बातच दूर!<<<<
पुरुषांनी बाईकडे बाई म्हणून चक्क दुर्लक्ष करणे. बघा मग बायकांची कशी पंचाईत होते ते<<<<<

अररेरे किती उथळ, परस्पर विरोधी आणि भंपक विचार!! खूप शिव्या येतायत तोंडात खरंतर! Sad
कीव पण येतेय तुमची ...

vijaykulkarni,

>> उत्तान कपडे आणी बलात्कार यांच्यात काहीही संबंध नाही.

मान्य! पण बलात्कार टाळण्यासाठी जी दीर्घकालीन उपाययोजना करावी लागणार आहे त्याच्याशी उत्तान कपड्यांचा संबंध येतो. उत्तान कपडे घातलेली बाई समोर आल्यास काय करावे हे पुरुषांना माहीत असलेच पाहिजे.

आ.न.,
-गा.पै.

उत्तान कपडे घातलेली बाई समोर आल्यास काय करावे हे पुरुषांना माहीत असलेच पाहिजे.>> बरोब्बर..

मग त्यावर बायकांनी उत्तान कपडे घालूच नयेत असा फतवा काढण्याऐवजी, पुरूषांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे, बरोबर?? मग आता ही "मानसिकता" बदलण्यासाठी काय करता येऊ शकेल यावर चर्चा करा. बाईने कपडे काय घालायचे आणि काय नाही यावर खूप बोलून झालय.

भरपूर प्रबोधन झाले आहे. ज्यांना समजू शकते त्यांच्यासाठी कमी कपड्याचा मुद्दा निकालात निघाला आहे. फक्त हे ज्यांच्या कडून धोका आहे त्यांना कसे समजणार हा प्रश्न आहे. समजून घेण्याची इच्छा असणा-यांसाठी बरेच विचार खरवडून नवे कलम करता आलेत. पण ज्यांच्यासाठी "विचार" हीच गोष्ट कोसो दूर आहे त्यांचं काय हा प्रश्न आहे.

१. श्रुती बघा (उपरोधाने) म्हणताहेत की बायकांना सुखाचे दिवस येतील.>>>>> उपरोधाने? बापरे! कुठे दिसला तुम्हाला उपरोध? अहो सरळ स्पष्ट लिहीलय की बाईकडे पुरूषांनी बाई म्हणुन बघितलं नाही तर बायकांना चांगले दिवस दिसतील. तुम्हीच सांगा कामाच्या, शाळा-कॉलेजच्या घाईत असतांना रस्त्यानी जर चावट, खवचट कॉमेंटसचा सामना न करता शांत मनानी जाता येणार असेल, वाईट्ट नजरा, चोरटे स्पर्श, घाणेरडे इशारे हे सगळं टळणार असेल तर सुखाचे दिवस दिसतील की नाही. नंतरच्या माझ्या प्रतिक्रियेतही लिहीलय.
असो. हेच मुद्दे पुन्हा पुन्हा वेगळ्या शब्दांत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं एक्सप्लेन करणं मला यापेक्षा जास्त शक्य नाही. माझं म्हणणं तितक्या स्पष्ट मला मांडता आलं नसावं पण यापेक्षा जास्त मला ते जमणारही नाही तेव्हा इथेच थांबतेय.

मामी,

>> दोन व्यक्तींमधील नैसर्गिक शारिरीक आकर्षण आणि वासनेचे प्रकट स्वरूप या दोन अगदी वेगळ्या वृत्ती आहेत.

हे तुम्हाला आम्हाला कळतं हो. पण जो (पुरूष) वासनेने बरबटलेला आहे, त्याला हे कसं कळावं? तो वासनेने बरबटून जाऊ नये हा एकमेव मार्ग उपलब्ध आहे ना? मग त्या मार्गावरून चालायला नको का?

हा वेळखाऊ मार्ग आहे, पण अपरिहार्य आहे. त्यामुळे पुरूषजातीला या मार्गावर चाल(व)ण्यासाठी अनेकांची मदत लागेल. तुम्ही म्हणता ते ममत्व, आदर वगैरे जे म्हणता ते उत्पन्न होण्यासाठी आमच्या आयाबहिणींकडून योग्य पेहेरावाची मदत मागितली, तर त्यात तालिबानी ते काय?

बायकांनी पुरुषांना आकर्षित करणे हा गुन्हा नाही. पण ते जे कौशल्य आहे त्यात उत्तान वेषाचा समावेश होत नाही. आपला वेष उत्तान आहे की नाही हे प्रत्येक बाईला कळतं. असा वेष घालून बायका उघड्यावर वावरल्या तर पुरुषांपेक्षा जनावरे आकर्षित होण्याचा संभव अधिक. मग या प्रकाराला पुरुषी मनोवृत्ती म्हणा किंवा आजून काही.

आपला प्रतिसाद अपेक्षित आहे.

आ.न.,
-गा.पै.

नंदिनी,

>> मग आता ही "मानसिकता" बदलण्यासाठी काय करता येऊ शकेल यावर चर्चा करा.

जरूर चर्चा करूया. ही मनोवृत्ती एका रात्रीत बदलणार नाहीये.

चर्चेस सुरुवात करण्यापूर्वी एक काम करूया. बायकांना पुरुषांपासून नक्की काय हवं असतं याची एक यादी बनवूया. ही यादी पुढे बलात्कारी मनोवृत्ती बदलण्यास मार्गदर्शक ठरेल अशी आशा आहे. हे पटतंय का?

आ.न.,
-गा.पै.

श्रुती,

>> उपरोधाने? बापरे! कुठे दिसला तुम्हाला उपरोध? अहो सरळ स्पष्ट लिहीलय की बाईकडे पुरूषांनी बाई
>> म्हणुन बघितलं नाही तर बायकांना चांगले दिवस दिसतील.

मला वाटलं की उपरोध होता. गैरसमजुतीबद्दल क्षमस्व.

आ.न.,
-गा.पै.

बायकांना पुरुषांपासून नक्की काय हवं असतं याची एक यादी बनवूया.>> पहिली आणि सर्वात कठिण अपेक्षा
स्त्रीला भोगवस्तू न समजता "माणूस" असल्याची वागणूक द्या. आता ही मागणी पुरी करन्यासाठी मानसिकतेमधे काय काय बदल केले जावेत ते तुम्ही सांगा!!!

गा.पै. ,
तुमचे प्रतिसाद वाचून, तुम्ही काही कळत नसल्याचा आव आणून फक्त उचकवण्यासाठी बसला आहात हे स्पष्ट दिसत आहे! आणि मदत वगैरे करण्याचा आव आणताय तो प्रचंड खटकतो आहे!
साधारण अकरा वर्षांपूर्वी पुणे शहरात आमच्या ओळखीच्या पासष्ट वर्षांच्या नऊवारीतल्या आजींवर
रिक्षा आडबाजूच्या झोपडपट्टीत नेऊन बलात्कार झाला. ही घटना अर्थात बाहेर आली नाही. अशाच अनेक घटनांचा इथे उल्लेख होतो आहे. तरी पण तुम्ही एकच दळण दळत बसला आहात.
मला वाटतं, मैत्रिणींनो चर्चा खूप झाली. आता खूप सजग राहणे आणि वेळप्रसंगी प्रतिकार करण्यासाठी
शस्त्र बाळगणे आणि ते वापरणे हेच अवलंबावे!!

स्त्रियांवरील अन्यायाबद्दल अनेकदा चर्चा होतात. त्या व्हायला पाहिजेतच. पण पुरुषाची कामेच्छा, त्याच्या कामपूर्तीतील अडथळे आणि त्यातून त्याची होणारी लैंगिक आणि मानसिक कोंडी हा विषय कधी चर्चेच्या ऐरणीवर येत नाही
या विषयावर मंगला सामंत यांचा लोकसत्तामधील लैंगिकतेचे शमन कि दमन? हा लेख एक वैज्ञानिक दृष्टीकोन व सामाजिक दृष्टीकोन सांगणारा आहे त्यातील मुद्यांवर चर्चा होताना दिसत नाही. मानसशास्त्रीय पैलू या लेखात चांगले मांडले आहेत बघा.

मैत्रिणींनो चर्चा खूप झाली. आता खूप सजग राहणे आणि वेळप्रसंगी प्रतिकार करण्यासाठी
शस्त्र बाळगणे आणि ते वापरणे हेच अवलंबावे!! >>>> +१

पण पुरुषाची कामेच्छा, त्याच्या कामपूर्तीतील अडथळे आणि त्यातून त्याची होणारी लैंगिक आणि मानसिक कोंडी हा विषय कधी चर्चेच्या ऐरणीवर येत नाही
>> यातून काय म्हणायचेय? या विषयावर चर्चा होत नसल्याने किंवा पुरुषांच्या या सगळ्या इच्छा पुर्ण न झाल्याने स्त्रियांवरील अन्याय समर्थनीय ठरतो का?
किती वेळा अन किती लोकांना तेच ते, तेच ते समजावून सांगावे लागणार आहे? very sad and disgusting scenario Sad ज्या लोकांना No means No हा साधा विचार कळत नाहिये ते आपल्या अजुबाजुलाही वावरत असणार या विचाराने अजुनच भिती वाटायला लागली आहे.

अनिताताई,

>> तुमचे प्रतिसाद वाचून, तुम्ही काही कळत नसल्याचा आव आणून फक्त उचकवण्यासाठी बसला आहात हे
>> स्पष्ट दिसत आहे! आणि मदत वगैरे करण्याचा आव आणताय तो प्रचंड खटकतो आहे!

अगदी बरोबर! मी उचकावायला बसलो आहे. पण माझ्या उचकावण्याने जे उचकावले जाणार नाहीत अश्यांशी चर्चा करेन म्हणतो! Proud

विनोदाचा भाग सोडला तर, पुरुषातलं जनावर म्हणजे काय हे मला चांगल्यापैकी ठाऊक आहे. माझ्यावर अतिप्रसंग झाला नसला तरीही. या जनावराचा बंदोबस्त कसा करायचा हेही चांगलं ठाऊक आहे. इथे पहा बडोद्यात काय परिस्थिती आहे ती. बडोद्यात जनावरांचा बंदोबस्त का होतोय याचं नेमकं कारण मला माहीत नाही. पण बर्‍यापैकी अचूक अंदाज मात्र लावता येतो. माझं विवेचन त्रुटीपूर्ण असणार आहे हे मला कळतंय.

अर्थात पुरूष म्हणजे केवळ जनावर नाही. त्याहूनही अधिक काहीतरी आहे. ते 'अधिक काहीतरी' म्हणजे नक्की काय ते कळण्यासाठी (म्हणजे जाणीव होण्यासाठी) देवाचं नाम आसमंतात भिनावं लागतं. वासनात्मक विचारांचा प्रतिकार करणं फार अवघड आहे. त्यासाठी जाणीवस्वरूपी ज्ञानाचा प्रसार व्हावा (किंवा करावा) लागतो.

हा उपाय जर मी थेट सुचवला असता तर मला सरळ बुवाबापूंच्या रांगेत नेऊन बसवलं असतं इथल्या लोकांनी. त्यामुळे एकेकांच्या मर्यादा स्पष्ट करीत मला चर्चा केली पाहिजे. मधल्या काळात माझ्यावर जे काही आरोप होतील ते मला सहन करायला हवेत.

आ.न.,
-गा.पै.

पण जो (पुरूष) वासनेने बरबटलेला आहे, त्याला हे कसं कळावं? तो वासनेने बरबटून जाऊ नये हा एकमेव मार्ग उपलब्ध आहे ना? >>> म्हणजे दोष त्याच्यात आहे हे तरी मान्य केलेत मग उपचारही त्याच्यावरच करायला हवे की नको ?
( डायबेटिक लोकांची माफी मागून ) एक उदाहरण देते. डायबेटीस झालेल्या लोकांना गोड खाता येत नाही आणि डायबेटिस हा बर्‍यापैकी कॉमन रोग आहे. मग त्यांना गोड खाता येत नाही म्हणून गोड पदार्थ जगातून बाद करा असा फतवा काढतो का आपण ? जगाचं सोडा त्यांच्या घरातली मंडळी सुद्धा गोड खाणं सोडत नाहीत आणि त्यात काही गैरही नाही. आपण आजारावर औषधोपचार करतो, गोड खायचा मोह झालाच तर तर तो कसा आवरावा हे शिकवतो, शुगरफ्री रेसिपीज शोधून काढतो. ( ही उपमा आंबटशौकीनांच्या हातात कोलीतच आहे ह्याची कल्पना आहे पण अशी विकृत मनोवृत्ती हा एक रोगच आहे आणि तो ज्यांना जडला आहे त्यांच्यासाठी दुर्दैवाने बायका ह्या भोग्यवस्तू. त्यामुळे अशा विचारसरणीच्या लोकांना त्यांच्याच शब्दांत सांगणे गैर वाटत नाही. )

अंगभर कपडे / बुरखा घालणार्‍या, लहान मुली / वृद्ध स्त्रिया ह्यांच्यावर बलात्कार का होतात ह्याचे उत्तर तर तुम्ही अजून दिलेच नाहीये !

मुलींच्या वेशभूषेवर चर्चा करुन साप समजून भुई धोपटण्याचा प्रकार तुमच्यासारखी मंडळी करतात त्यामुळे तुम्ही स्वतः असे गुन्हे केले नाहीत तरी ते करणार्‍यांना मॉरल सपोर्ट पुरवत असता हीच शोकांतिका आहे.
सिमन्तिनीने लिहिले आहे तसे हा स्त्री विरुद्ध पुरुष ह्यापेक्षा शोषण करणारा विरुद्ध शोषण केले जाणे हा मुद्दा आहे. दुसर्‍या व्यक्तीची इच्छा लक्षात घेण्याचा मुद्दा आहे. म्हणूनच इथे कपडे कसे घालावेत ह्याची चर्चा अप्रस्तुत आहे. तुमच्या प्रोफाईलवर लावलेले उत्तान चित्र बघा. कदाचित त्या चित्राकडे पाहून उपरती होईल की कपड्यांवर काही अवलंबून नसते.

असो. अनिताताई, सिंडी + १. ह्या विषयावरचे हे शेवटचे पोस्ट.

प्रकाश घाटपांडे, लोकसत्तातल्या त्या लेखाबद्दल तुम्ही मायबोलीवर नवीन धागा काढा. लैंगिक वासना मनात जागृत झाल्यास त्याचे वैध मार्गाने शमन कसे करावे ? इथे बरीच डॉक्टर मंडळी आहेत ती सुरक्षित आणि निरुपद्रवी मार्ग कुठले ह्यावर सविस्तर मार्गदर्शन करतील.
समाजव्यवस्था बदलेल तेव्हा बदलेल पण तोपर्यंत पुरुषांना / शोषण करणार्‍यांना हे शिक्षण देण्याची नितांत गरज आहे.

प्रकाश घाटपांडे, लोकसत्तातल्या त्या लेखाबद्दल>>>>> बलात्कार हा लैंगिक वासनेच्या पूर्तीपेक्षा हिंसकतेशी निगडीत आहे. ऊर्मी अनावर झाल्या म्हणुन कुणालातरी तिच्या/त्याच्या संमतीशिवाय ओरबाडण्याची आणि आयुष्यातून उठवण्याची गरज नसते.

प्लिज! बलात्काराचं, विनयभंगाचं कुठल्याही कारणाने, कुठल्याही परिस्थितीत समर्थन होऊ शकत नाही.

२ ते ८० अश्या कोणत्याही वयाच्या स्त्रीवर अतिप्रसंग ओढवु शकतो व हि वेळ तिच्यावर घरची अथवा बाहेरची कोणीही व्यक्ती वेळकाळेचे बंधन न पाळता आणु शकते. स्त्रीस्वातंत्र्य वगैरे तर खुप दुरच्या गोष्टी आहेत इथे तर माणुस म्हणुन जगण्याचेदेखील स्वातंत्र्य नाही आहे. स्त्रीला जिथे जन्म घेण्यासाठीच जन्मदात्यांबरोबर लढावे लागते तिथे तिच्या पुढील सुरक्षित आयुष्याबद्दल अपेक्षा करणेच फोल ठरते. इथे कोणीही तुम्हाला सहज तुमचे हक्क देइल असे वाटत नाही. त्यावेळी एवढेच मनात येते की बायांनो लढा, लढा आणि फक्त लढा.... तुमच्यासाठी व तुमच्या पुढील पिढीतील लेकीसुनांसाठी लढा. नवरात्रात नउ दिवस ज्या स्त्रीदेवतांची पुजा करता त्यांची ओटी भरतेवेळी एकच मागणे मागा हे आई, तुझ्यातील शारदेप्रमाने उत्तम बुद्धी दे, विचार दे, लक्ष्मीप्रमाने स्वत:च्या जीवावर दुसरयांनाही देता येइल इतका पैसा मिळवायची ऐपत दे, दुर्गेप्रमाने अन्याय करणारया राक्षसांचा बिमोड करण्याचे कौशल्य दे. हाच जोगवा मागते आई जगदंबे तुझ्यापुढे.......

नवरात्रात नउ दिवस ज्या स्त्रीदेवतांची पुजा करता त्यांची ओटी भरतेवेळी एकच मागणे मागा हे आई, तुझ्यातील शारदेप्रमाने उत्तम बुद्धी दे, विचार दे, लक्ष्मीप्रमाने स्वत:च्या जीवावर दुसरयांनाही देता येइल इतका पैसा मिळवायची ऐपत दे, दुर्गेप्रमाने अन्याय करणारया राक्षसांचा बिमोड करण्याचे कौशल्य दे. हाच जोगवा मागते आई जगदंबे तुझ्यापुढे.......>>> +१

सगळ्याच सेलेब्रिटीजना सगळ्याच विषयांतलं सगळंच कळतं असा काहीतरी चमत्कारीक गैरसमज लोकांचाच नाही तर त्यांचा स्वत:चाही झालेला दिसतो. सिंधूताईंच्या कार्याबद्दल पूर्ण आदर असला तरी असल्या जाहीर विधानांची चीड येते. आणि सरसंघचालकही या बुवा आणि बापूंच्या लायनीत का आता?!

<<समाजव्यवस्था बदलेल तेव्हा बदलेल पण तोपर्यंत पुरुषांना / शोषण करणार्‍यांना हे शिक्षण देण्याची नितांत गरज आहे.>> अगदी सहमत आहे.
पुरोगामी चळवळींमधे बर्‍याचदा मुद्द्यांवर चर्चा करताना असे होते कि दहा मुद्द्यांपैकी तुम्हाला ८ मुद्दे पटताहेत व २ मुद्द्यांवर मतभिन्नता आहेत तर ८ मुद्द्यांवर सहमतीने काम करण्याऐवजी २ मुद्द्यांवर लोक भांडत बसतात. ज्या अर्थी तुम्हाला माझे हे दोन मुद्दे पटले नाहीत त्या अर्थी ८ मुद्दे तुम्हाला खर्‍या अर्थाने पटलेच नाही अथवा ज्या कारणा साठी आम्हाला त पटले आहेत त्या कारणासाठी तुम्हाला ते पटलेले नाहीत सबव तुमची चूल वेगळी आमची वेगळी. अनेक स्त्री वादी चळवळींमधे असे गट पडतात. खरतर एकूणच पुरोगामी चळवळींमधे ही स्थिती आहे.
बलात्कार्‍यांना फाशी द्या, त्यांचे लिंग कापा, भर चौकात चाबकाचे फटके मारा इ शिक्षांचे समर्थन न करणार्‍या लोकांना ते बलत्काराचे समर्थनच करतात अशी भूमिका घेणारे काही लोक असतात. तुम्ही 'आमच्या'त नसाल तर तुम्ही 'त्यांच्या'त आहात अशी कृष्णधवल दृष्टीने पहाण्याने एखाद्या प्रश्नाचे सर्व पैलू त्यांच्या लक्षात येत नाहीत.

सिंधुताईंनी खरोखर हे म्हटल्याचे वाचले आहे का कुठे कि कोणितरि फेबुवर टाकलेलि पोस्ट वाचुन लगेच लोक कॉमेंट्स देत आहेत त्यांच्यावर.
आसाराम बापुंची न्युज टाईम्स वर तरी वाचली
बर्‍याचदा पाहिले आहे कोणि काहि अफवा पसरवली तर ती खरी आहे कि खोटि आहे हे जाणुन न घेता लोक त्यावर कॉमेंट्स देत असतात.

अगो,

>> मुलींच्या वेशभूषेवर चर्चा करुन साप समजून भुई धोपटण्याचा प्रकार तुमच्यासारखी मंडळी करतात
>> त्यामुळे तुम्ही स्वतः असे गुन्हे केले नाहीत तरी ते करणार्‍यांना मॉरल सपोर्ट पुरवत असता हीच
>> शोकांतिका आहे.

मी गुन्हेगारांना आजिबात नैतिक आधार पुरवत नाहीये. बाई कसेही कपडे घातलेले असले वा नसले तरी तिच्याकडे मादी म्हणून बघू नये असंच माझं म्हणणं आहे. तरीही कोणी अतिप्रसंग केलाच तर त्याला कडक शिक्षा व्हावी हेही नमूद करू इच्छितो.

मला उत्तान कपडे घालण्यामागील फोलपणा दाखवून द्यायचा आहे. आपले कपडे उत्तान आहेत की नाहीत हे प्रत्येक स्त्रीला माहीत असतं. उत्तान काय आणि सुशील काय हे बायकांनी ठरवायचं आहे. पुरुषांनी नाही.

आ.न.,
-गा.पै.

त्या बापूची कोण एक समर्थक आहे निलीमा दुबे...ती हीरीरीने बापूचा बचाव करतीये...आणि बाई एकदा बोलत सुटल्या की कुणालाही ऐकत नाहीयेत...अगदी अर्णब पासून सगळ्यांनी तिच्यापुढे हात टेकलेत....
त्या बाईचे म्हणणे की तिने जर मंत्र जपला असता तर तिला काहीतरी चांगल्या कल्पना सुचल्या असत्या...

देवा रे...ही लोकं कॉमन सेन्स कुठे विकून येतात देव जाणे....

सगळे प्रकरण आणि सो कॉल्ड बुवा, समाज सुधारक, संत, राजकारणी वगैरेंची विधानं हे सगळं अगदी अर्तक्य आणि अचाट च्या पलिकडे गेले आहे! जो तो स्वतःची पोळी भाजून घेत आहे! संतापजनक आहे हे.

सिंधु ताईंचं /त्यांचय नावाने फिरणारं विधान पाहिलय फेबु वर !
त्यांच्या इतर समाज सेवे बद्दल आदर आहेच पण खरच त्यांनी हे विधान केलं असेल तर अत्यंत उथळ-बेजवबदार आणि काहीही लॉजिक नसलेलं आहे.
संपूर्ण शरीर झाकणारे कपडे म्हणयायेत ताई तर फोटो देताना साडी सारखा पोषाख घातलेला फोटो का निवडलाय ताईंचा ?
आणि हे काय, फक्त डोक्यावरून पदर ? मग पूर्णच चेहराही कव्हर केला नाही ते बुरख्या सारखा?
या सगळ्या नेतयंछे, समाज सेवकांचं आणि इतर लोकांचे तारे तोडणं, सगळा निष्कर्श बुरखा कनक्लुजन वर येउन थांबला तर नवल नाही.

उत्तान काय आणि सुशील काय हे बायकांनी ठरवायचं आहे. >>>> पण आम्हाला नाही ठरवायचं आहे असं काही. तेव्हा आता तुम्ही आणि इतरांनी ह्या विषयावर बोलणं बंद करा.

वर कुणी तरी म्हंटल्याप्रमाणे शोषण करणार्‍यांचा आजार कसा बरा करावा ह्यावर बोला.

Pages