महिलांनि स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे?

Submitted by प्रिया७ on 18 December, 2012 - 11:06

गेले २ दिवस दिल्लीच्या रेपची माहिति वाचण्यात येत आहे. आजकाल बर्‍याच कारणाने महिलांना उशिरा पर्यंत घराबाहेर राहावे लागते. किंवा बाहेरगावी सुद्धा एकटे रहावे लागते. काहि सिंगल पेरेंट सुद्धा आहेत. अशा वेळी एकटे राहाणार्‍यानी घरि आणि घराबाहेर काय खबर्दारी घ्यावी? असा धागा असेल तर हा उडवुन टाकेन.

कवठीचाफा | 26 December, 2012 - 10:14
साडेतीन-चारवर्षे सेल्फ डिफेन्स अ‍ॅकेडमी नावाच्या संस्थेसोबत लहान काळाची शिबीरं झाली त्यात ज्या गोष्टींचे ट्रेनिंग दिले त्यातल्या महत्वाच्या गोष्टी. केवळ स्त्रियाच नाही पुरूषांनाही उपयोगी पडू शकतील अश्या.
१ ) कधीही समोरच्या व्यक्ती एकापेक्षा जास्त असतील तर प्रतिकारापेक्षा माघार घेणं उपयुक्त अर्थात याचा अर्थ थेट पळायला सुरूवात करणं असा नाही, यात तुम्ही दमाल आणि आयतेच हाती सापडाल.
२ ) सर्वात आधी परिस्थिती/वातावरणाचं बारकाईनं निरीक्षण करत रहायला हवं अनेकदा संभाव्य धोका लक्षात येतोच.
३ ) समोरच्या व्यक्तींमधल्या म्होरक्या किंवा लिडरकडे आधी लक्ष द्या, (काही सेकंदातच तो लक्षात येतो ) आपलं पहिलं लक्ष्य त्यालाच करा. आता कसं ? ते पुढे
४) पायात जर हिल्स असतील तर त्यांचा आघात गुडघ्याच्या बाजूच्या भागावर करा, लक्षात घ्या संवेदनशील भागावर हल्ला होणार या तयारीत समोरची व्यक्ती असते तीथे प्रहार वाया जाईल. गुडघ्याचा बाजूचा भाग हा देखील विक पॉइंटच असतो तिथला मार सहन होत तर नाहीच पण त्यानंतर काहीकाळ पायही टेकता येत नाही.
५ ) डोळे हा अतिमहत्वाचा भाग त्याला लक्ष्य करा
६ ) पेन, डोक्यातली क्लिप ही उपयुक्त हत्यारं आहेत त्यांचा वापर करा, यांच्यासाठी हाताचा कोपराजवळचा भाग, तळहाताचा मागचा भाग, कान, त्याच्या मागच्या सॉफ्ट टिश्युज यांना लक्ष्य करा
७ ) पाठीमागुन पकड घातल्यावर ताबडतोब हताश होऊ नका ( सामान्यपणे इथेच आपण गडबडतो ) पायाच्या टाचेचा आघात मागच्या व्यक्तीच्या पायाच्या नडगीवर करा आथवा हातातला पेन, पीन मागच्या व्यक्तीच्या कानाच्या आसपास मारा.
८ ) दातांचा वापर करा मात्र हात किंवा दंड यांच्या बाबत माणूस सहनशील असू शकतो, त्यांचा वापर कान आथवा मानेवर करा.
९ ) दगड हे उत्तम शस्त्र आहे, अंतर मिळालं तर हमखास वापर करा
१० ) हे सगळं करण्यासाठी, मनात बेडरता आणि क्रूरता येण्याची गरज आहे त्याचसोबत सवयही लागण्याची गरज आहे. शक्य झाल्यास कुणीतरी पार्टनर घेऊन नॉनफेटल प्रॅक्टीस करा.
११ ) प्रतिकार करायचाच आहे याची खूणगाठ बांधून शरीर शिथील ठेवण्याची सवय करून घ्या.

उदयन.. | 18 December, 2012 - 22:15
चोरटे स्पर्श, नको तिथे चिमटे यांकडे दुर्लक्ष करा. आठवड्यातून तीन वेळा तुम्ही कुर्ला दादर अश्या ठिकाणी एकटीच नेहमी मारामारी करत बसू शकत नाही. >>>>>>>>>> इथेच चुकतात तुम्ही......एक ब्लेड नाहीतर लहानसा धारधार चाकु ठेवा..... असे काही झाल्यास लगेच मारा.......तेही जोरात.... परत कुणाला हात लावणार नाही

सामोपचार | 18 December, 2012 - 22:17
उदयनजींना अनुमोदन.......हल्ली लहान नेलकटरसारखी अवजारे असतात ती जवळ ठेवावीत. पटकन काढून भोसकायला बरी पडतात.

स्मितू | 18 December, 2012 - 22:57
मी उदय च्या मताशी सहमत आहे.... ...ट्रेन मध्ये... बसमध्ये प्रवास करतांना महिलांना ,मुलींना आश्या बर्‍याच प्रसंगांना तोंड द्यावे लागते आश्या वेळेस मुलींनी.... आपल्या जवळच्या सेफ्टी पिन चा वापर करावा.... पुरुषाच्या घाणेरड्या हालचाली लक्षात आल्या की लगेच बारिक पिन टोचायची...बरोबर चुपचाप बसतो तो.... ब्लेड, चाकु हे हत्यार जरा जास्तच होते..
शक्य्तोवर रात्रीचा प्रवास एकटीने टाळावाच... खुपच अर्जंट असेल तर सोबत कोणाला तरी घ्यावे...

mansmi18 | 19 December, 2012 - 03:12
पेपर स्प्रे मधे पेपरच असायला हवा का? हौ अबाउट सल्फ्युरिक अ‍ॅसिड?
असे काही चाळे करणार्‍यावर महिलानी अ‍ॅसिड का टाकु नये? एक दोन लोकाना या अ‍ॅसिडचा प्रसाद मिळाला की पुढे अशी काही विकृत इच्छा असणारे पुरुष असे काही करण्याआधी शंभर वेळा विचार करतील.

swanand_ml | 19 December, 2012 - 16:42
मला तात्वीक चर्चेत रस नसल्याने फारसे प्रतीसाद न वाचता प्रतिसाद देत आहे तरी माफी असावी.
महिलांसाठी स्वसंरक्शणावर दोन शब्द लिहु इच्छीतो.
ज्याला जगायचे आहे त्याला झगडावे लागेलच.
महिलांनी शस्त्र बालगण्यावर येथे चर्चा झाली. मला स्वताला ह्या दोन गोष्टी आवडतातः
http://en.wikipedia.org/wiki/Karambit
http://en.wikipedia.org/wiki/Push_dagger
लपवीण्यासाठी सोपे, हाताळण्यासाठी सोपे व हिसकावून घेण्यास अवघड. इंटरनेट वर उपलब्ध.
केवळ शस्त्र आहे हे पुरेसे नसते. ते हाताळन्याची व वापरण्याची मानसीकता असणे गरजेचे असते. त्यासाठी प्रशीक्शण गरजेचे आहे.
बंगळुर वासी येथे जवु शकतातः
http://kravmagabangalore.in/
मुम्बई: http://www.kravmagaindia.in/locations/mumbai
दिल्ली: http://www.kravmagaindia.in/locations/delhi
वरील प्रशिक्शण केंद्रे शस्त्रप्रशिक्शणाची नसून संरक्शण प्रशिक्शण केन्द्रे आहेत ह्यची नोन्द घ्यावी.
बहुत काय लिहणे. आपण सुज्ञ असा.

दिनेशदा | 21 December, 2012 - 05:52
मीही जसे सुचेल तसे लिहित जातोच. एकटे घराबाहेर पडल्यावर, जर कुठल्याही असुरक्षित भागातून जात असू तर अगदी नियमित रित्या घरच्या व्यक्तीला किंवा सहकारी व्यक्तीला फोन करुन आपला खरा ठावठिकाणा कळवत राहणे हा एक उपाय सुचतो मला.
संध्याकाळच्या वेळी आपल्या परिसरातील कुठलाही भाग एकाकी राहणार नाही, याची काळजी. घरी असणार्‍या किंवा जेष्ठ व्यक्तीनी घेतली तरी चालेल. अशा भागात गटाने ऊभे राहून चर्चा करावी, जाग राखावी.
घरीच कंटाळत कण्हत राहण्यापेक्षा. बसस्टॉपवर / नाक्यावर जाऊन ऊभे राहिले तर काय वाईट ?
पुर्वी आमच्या कॉलनीत यायला अंधारा रस्ता होता. त्यावेळी एखाद्या व्यक्तीला उशीर होत असेल, तर घरची माणसे रस्त्यावर जाऊन थांबत असत. तसेच कुणी एकटा माणूस असेल, तर तो सोबत मिळेपर्यंत हायवेवरच थांबत असे.
ज्यांची कामाला जायची जागा निश्चित आहे त्यांनी यायच्या जायच्या वेळी गटाने आणि तेसुद्धा स्त्री आणि पुरुष अशा मिश्र गटाने शक्यतो प्रवास करावा. जर यायच्या जायच्या बस किंवा गाड्या ठराविक असतील, तर
सहप्रवाश्यांशी मैत्री करावी. एखादा सहप्रवासी नेहमीच्या वेळी दिसला नाही तर चौकशी करावी.

नीधप | 21 December, 2012 - 08:28
प्रतिकार करा हा उपाय व्यवहार्य नाही <<<
सतत शक्य नाही. हपिसला/ कॉलेजला जाताना, घरी परतताना... रोजचे रोज
एखाद्या दिवशी केला जातोच.
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.

Kiran.. | 21 December, 2012 - 08:50
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.
+
()महिला जागृतीसाठी अभियान निर्माण करणे : राज्य / राष्ट्रव्यापी अभियान आणि त्याच्या गाव/तालुका/जिल्हास्तरीय समित्या यातून कायमस्वरुपी जागृती घडवून आणणे. यात स्वयंसेवी संस्था / सरकारी संस्था / खाती यांचा समन्वय साधलेला असावा. कार्यकर्त्या निर्माण करून घराघरापर्यंत जागृतीचे अभियान न्यायला हवे.
* ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी परिसंवाद / वर्कशॉप्स राबविणे. माध्यमप्रतिनिधी / पोलीस / न्याययंत्रणा यांच्या प्रतिनिधींनाही सामान्यजनांबरोबर सहभागी करून घेतल्यास लोकांच्या अपेक्षा आणि प्रत्यक्षातल्या अडचणी याबद्दल देवाण घेवाण होऊ शकेल.
* महिलांविषयक गंभीर गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालयांची स्थापना व्हावी यासाठी पाठपुरावा करणे.

आहना | 21 December, 2012 - 08:46
१. पेपर स्प्रे बाळगणे>>> पेपर प्रे उपलब्ध नसल्यास पर्स मधे डिओड्रन्ट वापरा

उदय | 21 December, 2012 - 09:01
(अ) प्रसंगावधानता दाखवणे महत्वाचे आहे. १९९८, दिल्लीच्या DTC मधेच एका युवतीवर असाच प्रसंग आलेला होत, पाच लोकांशी सामना करत सुटका केली... पुढे कोर्टाने गुन्हेगारांना शिक्षाही दिल्यात.
थोडा कमी पणा आला तरी चालेल, पण 'पाच लोक' टवाळी करत आहेत, तर तेथे हुज्जत घालण्यापेक्षा सटकणे महत्वाचे. माघार घेण्यात कमीपणा कधिच नसतो...
युक्ती (थोडे डोक) आणि बळ असा समन्वय साधल्यास घटना कमी घडतील.
(ब) सर्वात महत्वाचे असे प्रसंग अगदीच अनोळखी लोकां कडुनच होतात हा गैरसमज काढुन टाकणे. बहुतेक प्रकारांत ओळखी किंवा नात्यामधिलच व्यक्ती असतात. वर अनेकांनी सुचवलेल्या उपायांत हा मुद्दा मला दिसला नाही म्हणुन लिहावेसे वाटले.
दर दिवशी जरी त्याच व्यक्तीसोबत प्रवास करत असाल किंवा कामा निमीत्त संपर्कात येत असलांत, तरी प्रत्येक क्षणी सतर्क राहुन "उद्देशांत काही बदल झालेला नाही आहे नां?" हे तपासायला हवे. दोन व्यक्ती एकाच ठिकाणि काम करत आहेत, कामा निमीत्त प्रवासाला सोबत जावे लागणार आहे... सावध आणि सतर्क रहाण्यात काहीच हरकत नाही.
(क) प्रसंगावधानता मधे गाड्यांना (मग ऑफिसची असेल किंवा सार्वजनिक वहान असेल) पारदर्षक काचा नसतील तर प्रवास करायला चक्क नकार द्यायचा. सार्वजनिक वहानांना कशासाठी हवेत टिंटेड काचा किंवा पडदे ?

प्रिया७ | 21 December, 2012 - 16:12
ब्राईट एलईडि फ्लॅश लाईट जो वेळ प्रसंगि कामी येतो सरळ डोळ्यात मारता येतो,सेफ्टि पिन,सेल फोन वर (९११) किंवा ईमर्जन्सि नंबर स्पीड डायल ला सेव्ह करुन ठेवणे, पेपर स्प्रे नसेल तर छोटि परफ्युम बाटलि सुद्धा वापरता येते, फेसबु़क वर कुठे जात असाल तर त्याची माहिति न टाकणे किंवा Laxmi (कसे लिहायचे मराठित) पुजन चे दागिन्यांसकट फोटो न टाकणे,कुठे एकटे असतांना कानात हेड्सेट घालुन ठेवु नये,गाडि चे रिमोट लॉक गाडिजवळ जावुनच उघडणे,गरज पडल्यास खोटे बोलणे,रात्रिच्या वेळि एकटे असाल तर कोणाला दया दाखवायच्या आधि/ मदत करायच्या आधि २-३ दा विचार करा .

मुंगेरीलाल | 23 December, 2012 - 00:51
एक साधा आणि परिणामकारक उपाय म्हणजे एक जोरदार, तीव्र आवाजाची शिट्टी (पर्समध्ये अथवा किचेन म्हणून) जवळ बाळगणे. कुठलाही गुन्हेगार (किंवा त्यांचा समूह) एका क्षणात दचकतो आणि तुम्हाला सुटका करून घेण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. शिवाय हे शस्त्र नसल्यामुळे जवळ ठेवण्याला कुठली परवानगीही लागत नाही आणि वापरायला कसलं कौशल्यही लागत नाही.

अश्विनीमामी | 23 December, 2012 - 03:12
एक गोष्ट मला लक्षात आली, मुली, स्त्रीया ऑफिसला जातात किंवा घरी उशीरा येतात. तर आपला हपीसचा मजला आणि ग्राउंड फ्लोअर, कँतिनचा फ्लोअर हेच सहसा माहीत असते. घरीही तेच. ग्रा. फ्लो आणि आपला मजला. व्यतिरिक्ग आपली बिल्डिंग कशी दिसते आपल्याला माहीत नसते. सवडीने, फुल प्रकाशाच्या दुपारी पूर्ण बिल्डिंग/ ऑफिस काँप्लेक्क्ष , खास करून पार्किंगची जागा ह्याची माहिती करून घ्यावी. नजर सरावलेली असावी. फोटो काढून जागांची माहिती करून घ्यावी. प्रत्येक जागी आडोसे, अंधार्‍या जागा, उंचावरून मुलीला फेकून देता येइल अश्या जागा विशेषतः पार्किंग मध्ये खूप आढळतील. त्या अवगत करून घ्याव्यात. मैत्रिणींना, घरच्यांना सांगावे बोलावे ह्याबाबत. बरेचदा पहाटे किंवा रात्री आपलीच बिल्डिंग अनोळखी भीती दायक जागा बनू शकते. अ‍ॅटॅकरला तेच हवे असते. तो तुमचा गैरफायदा घेण्यास पूर्ण समर्थ असतो. फोनवर इमर्जन्सी नंबर आधीच देऊन स्पीड डायल वर ठेवावा. आयत्यावेळी कोणाला फोन करावा असे व्हायला नको.
पोर्टेबल टेसर सारखे उपकरण पर्स मध्ये असावे. बॅटरी नक्की. मुली फ्लॅट मध्ये राहात असतील तर शक्य असल्यास एक कुत्रा नक्की पाळावा. हे मी विनोदाने आजिबात लिहीत नाही. त्यासारखे संरक्षण नाही.
पुरुषांना त्याची भीती नक्की वाट्ते.
बिनओळखीच्या पुरुष व स्त्रीयांशी आजिबात बोलू नये. लिफ्ट मध्ये खास करून.
वॉचमन ला पण आपल्या जाण्या येण्याच्या पॅटर्न ची माहीती फार देऊ नये. रिक्षा वाले टॅक्सीवाले कधे कधी फार बोलतात त्यांना उत्तेजन देऊ नये. इथे किती पटेल माहीत नाही पण शहरांमध्ये सर्विस इंडस्ट्री जसे वाहन चालक, वेटर, वॉचमन ऑफिसातील प्यून्स वगैरे बाहेरच्या राज्यातून आलेले एक्टे
पुरुष असतात. एकाच रूटीन कामात अडकलेले, जास्तीच्या तासांचे काम करून वैतागलेले असतात.
बायको गावी त्यामुळे ..... पण त्यांना आपली मानसिकता समजेल अश्या भ्रमात राहू नये. स्त्रीवाद वगैरे तर दूरची गोष्ट.

सुमेधाव्ही | 29 December, 2012 - 08:02

आमच्या ऑफिसमधे मध्यंतरी एसीपी पुणे यांचे भाषण झाले होते त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या खालीलप्रमाणे, (भाषण साधारणपणे हिंजवडी परिसरात काम करणार्‍या महिलांची सुरक्षा असा असल्यामुळे नयन पुजारी केसच्या संदर्भात होत्या पण त्या सगळ्यांनाच उपयोगी पडतील त्यामुळे आठवेल तसे लिहिते आहे.)

पुणे पोलीस, फोन नं फक्त १०० एवढाच नाहीये. १०० नं लक्षात रहाण्यासाठी उत्तम पण इथे काहीही+ सर्व कंप्लेंट्स येत असतात त्यामुळे हा नं दर वेळेस लागतोच असे नाही. त्यामुळे इतर नं पण माहीत हवेत. ते मोबाईलवर सेव्ह केलेलेही हवेत.
पोलीस कं रुम. १००, २६१२२०२, महिला/ बाल हेल्पलाईन - २६०५०१९१ क्राईम अ‍ॅलर्ट -२६११२२२.
हे नं दिवाळी किंवा कोणत्याही निमित्ताने शुभेच्छा संदेशाबरोबर एकमेकांना वारंवार समस करून पाठवले म्हणजे मग ते आपोआप सेव्ह होतात व सेव्हड रहातातही.
(वि.सु. पोलीसांशी बोलताना मराठी लोकांनी मराठीतच बोलावे, कारण पुण्यातले जवळपास सगळे पोलीस पुणे परिसरातले व मराठी बोलणारे आहेत. इंग्लीशला ते कधीकधी बिचकतात व मग संभाषण नीट होऊ शकत नाही.)
अनोळखी व्यक्तीकडे लिफ्ट मागु नये. सार्वजनीक वहान सगळ्यात सेफ.
काही जणींना कॅबमधून यावे लागते ती कॅब जरी कं ने पुरवली असेल तरी ती बाहेरील एजन्सीकडून आणलेली असते त्यामुळे सजग रहावेच लागते. कॅबमधे बसल्यावर "रोज"सगळ्यांना ऐकू जाईल अश्या आवाजात घरी एक फोन करायचा. त्या फोनमधे कॅबचा नं तुम्ही उच्चारुन अमुक अमुक कॅबमधून तुम्ही प्रवास करत आहात व आत्ताचे तुमचे लोकेशन सांगायचे व अजून कीती वेळ घरी पोचायला लागेल त्याचाही उल्लेख करायचा. (जर का मोबाईलमधे बॅलन्स नसेल, किंवा रेंज येत नसेल तरी हा फोन खोटा खोटा असायलाही हरकत नाही. तेवढे अ‍ॅक्टींग जमवायचे स्मित
"कायम" हो हो...कायम्...कधीही जोरात पळता येउ शकेल असेच बुट्/चपला/कपडे असावेत. म्हणजे उंच टाचांचे बुट वगैरे ऑफिसात किंवा ऑफिसच्या पार्टीजना जिथे तुम्ही एक्ट्या जाणार आहात तिथे नकोत.
आर्थिक व्यवहारांची, घरगुती भांडणे, भानगडींची चर्चा कॅबमधे नकोच. इथे रोज अ‍ॅलर्ट रहायला हवेच.
बरेचसे कॅब ड्रायव्हर हे युपी एमपी मधील खेड्यांमधून आलेले असतात जिथे बायका त्यांच्या दृष्टीसही फारश्या पडत नाहीत. त्यामुळे शहरातल्या कॉन्फिडन्ट, पैसे मिळवणार्‍या, स्वतःच्या मर्जीप्रमाणे खर्च करणार्‍या व स्वतंत्र विचारांच्या बायकांबद्दल त्यांना असुया वाटते. अनेकदा त्यांचा इगो दुखावल्यामुळे सुडापोटी पण बलात्कार केले जातात. त्यामुळे शक्यतो ह्या लोकांशी हुज्जत न घालणे, जेवढ्यास तेवढे बोलणे, जास्त माहीती शेअर होणार नाही हे पहाणे हे महत्वाचे. काही मुली कॅबमधे बसल्या की घरच्यांशी जे काही बोलतात त्यातून बरीच माहीती दुसर्‍याला मिळते आहे हे त्या विसरतात.
एटीएम मधे दर शुक्रवारी पैसे काढणे, एकाच एटीएम मधून पैसे काढणे असे करू नये...बदलत रहावे. थोड्क्यात म्ह़णजे प्रेडीक्टेबल राहू नये. बर्‍याच जणी जाता जाता २ मि. थांबायला सांगून एटीएम मधून पैसे काढतात.
एकटीदुकटी मुलगी/स्त्री रात्री कारमधून घरी परत जात असताना जर गाडी बंद पडली, तर आड रस्त्यावर असाल तर गाडीतून बाहेर पडण्यापेक्षा पोलीसांना फोन करावा. रात्री त्यांच्या मोबाईल व्हॅन्स हिंजवडी परिसरात गस्त घालतात. (त्यांचा सेल नं पण आहे) त्या दहा मिनिटात मदतीसाठी पोचू शकतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांच्या इतर समाज सेवे बद्दल आदर आहेच पण खरच त्यांनी हे विधान केलं असेल तर अत्यंत उथळ-बेजवबदार आणि काहीही लॉजिक नसलेलं आहे. >> त्या स्वत ३०-४० वर्षापूर्वी त्यांच्या वाईट काळात स्मशानात रात्री राहायच्या, कोण त्याचं काय चोरणार होत?.... खरच त्याचं विधान असेल तर स्वताच्या 'शिलाची' 'सेल्फ रीस्पेक्तला' जपत जपत भीती काढत काढलेले दिवस त्यांनी विसरावे, काय म्हणावे ह्याला??!! फाटक्या साडीतही मला इज्जत मिळावी ही तेव्हाची अपेक्षा आज विसरवी?!!

फक्त बायकांनीच काय ते करावे ह्याच्याच चर्चा चालल्यात काही दांभिक लोकांच्या... पुर्‍या करा आता त्या.

जर कोणी बायकांनाच उपाय सुचवत असेल तर समजावे त्याला ह्या "विकृती"स मान्यता आहे व बोलणेच थांबवावे. कारण जर झोपलेल्यालेचे सोंग घेणार्‍याला उठवणे कठिण तसेच आहे हे.
बाकी, स्त्रीच्या उत्तान कपड्याने असे होते./तसे होते लिहिणार्‍यांनी स्वतःला काबू कसे केले/करतात ते पण लिहा की मग उघड पणे.

का ते श्क्यच नाही ते ही सांगा. मग बघु (उत्तान कपडे घालणार्‍या) बायकांचे काय करायचे ते.

सिंधू ताई सकपाळ ह्याबद्दल आदर असला तरी....

माणूस कितीही शिकला/फिरला तरीही त्याची विचार धारणा सर्वच बाबतीत बदलतेच असे नाही हे दिसले.
शेवटी त्या स्वतः पारंपारीक मानसिकतेतून (स्त्रीची लाज हि कपड्यात असते वगैरे ) वाढल्या असल्याने हे त्यांचे वकत्व्य असेल बहुधा...
त्यांच्या मुलाखतीत सांगितल्या प्रमाणे, स्वतः एकेकाळी स्मशनात राहिल्या का तर असल्या पाशवी अत्याचारापासून बचाव म्हणून.. व आता त्याच अश्या... ? Sad

आज पुरुष बलात्कारास "मनोवृती" कारणीभूत असते कबूल करत नाही, तिथे पुर्वीच्या स्त्रीने मात्र स्वतःवर लादलेली बंधने कधीच कबूल केली होती .. आणि आताच्या स्त्रीया तो "माज" सहन करत नाही म्हणून हे दाम्भिक परत तीच कॅसेट वाजवायला बघतायत की स्त्रीच्या कपड्यात तिची लाज असते, तीच जर उघडी पडली तरच पुरुष असे करतो...
काही पुरुषांना भिती आहे त्यांची पुरुषी सत्तेची पॉवर कमी होत चाललीय म्हणून तो आता अशी खेळी खेळतोय. आपली दडपशाही कशी ना कशी तरी चालू ठेवायची हेच आहे.

(हे. मा. शे. पो.) वैताग आहे त्याच त्याच गोष्टी लिहिलेया वाचायच्या..

ख्रेच वैताग आहे. इथे माबोवर जाउदे पण नेते, भोंदू यातला कुणिच माइ का लाल काही म्हणत नाही की बलत्कारी माणुस हा नीच अधम पापी असतो म्हणून. :संतापः

घ्या अजून एक उपाय - सहशिक्षण बंद करा. काही दिवसांनी तालिबानी वृत्तीने शिक्षणच बंद करतील ही लोकं. असल्या विचारांची कीव कराविशी वाटते.
http://esakal.com/esakal/20130107/4742508538442710534.htm

त्या सगळ्या बापू, बुवा मंडळींबद्दल तर काय बोलायचे. यांच्या अशा मंत्र-तंत्राच्या उपायांवर विश्वास ठेवणार्‍यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे जावे.

धनश्री,
तालिबानीच आहेत ऑलरेडी हे विचार भारतातल्या अनेकांचे कित्येक पिढ्यां पासून.. वर हे लेबल दिलं कि कि राग येतो..

नंदिनी,

>> पहिली आणि सर्वात कठिण अपेक्षा स्त्रीला भोगवस्तू न समजता "माणूस" असल्याची वागणूक द्या.

अपेक्षा सांगितल्याबद्दल धन्यवाद! हे माणूस म्हणून वागवणे म्हणजे काय ते बघायला पाहिजे. कुणा अनोळखी पुरुषाच्या समोर बाई आली तर त्याला ती दिसणारंच. त्याला आपण काहीच करू शकत नाही. त्या बाईमुळे जी प्रतिमा त्याच्या मनात उभी राहते ती भोगवस्तूची नसावी.

बडोद्यात मराठा मुली मिनीस्कर्ट घालून सर्रास फिरतात (ऐकीव माहिती. साल १९९५). त्यांच्याकडे पाहून जरी भोगेच्छा बळावली तरी कोणी पुरूष छेडछाड करीत नाही. कारण त्याला माहीत असतं की जर पकडलो गेलो तर वाईट्ट प्रकारे धुतले जाऊ. बडोद्यातल्या मराठा लोकांचा लौकिक पाणीगेटवरील मुसलमानांना पाणी पाजणारे असा आहे. त्यांच्या मुलींच्या नादी कोणी लागत नाही. पुरुषाची मनोवृत्ती न बदलताही कार्यसिद्धी आपोआप होते. कारण करू घातलेल्या कृत्याचा परिणाम त्या पुरुषाच्या डोळ्यासमोर आगोदर उभा राहतो.

तरीपण आपण पुरुषांची मनोवृत्ती बदलायची चर्चा करूया. कारण ही दीर्घकालीन उपाययोजना आहे म्हणून. ही मनोवृत्ती आयुष्याबद्दलच्या दृष्टीकोनातून आलेली असते. मिळालेला पुरूषजन्म केवळ भोगासाठीच आहे हा समज मुळाशी आहे. आयुष्य निव्वळ मजा मारण्यासाठी नसून कर्तव्यपूर्तीसाठी आहे हे मनावर ठसलं पाहिजे.

यासाठी स्त्री बघितल्यावर डोळ्यासमोर त्याची आई किंवा बहीण यायला हवी. नुसती माणूस म्हणून तिला पहाणं फार अमूर्त (अ‍ॅब्स्ट्रॅक्ट) आहे. सगळ्यांना जमेलच असं नाही. सिनेमातली खोटी दृश्ये पाहून लोक चळतात, इथे तर खरीखुरी स्त्री आहे. त्यामुळे तिच्याकडे माता म्हणूनच बघितलं पाहिजे. मग तिने कुठली वस्त्रे परिधान केली आहेत याकडे लक्ष जाणार नाही.

हे मातृरूप आपल्याला कदाचित पसंत नसेल. पण त्याने समस्या हलकी होईल अशी आशा बाळगता येते.

बघा पटतंय का ते.

आ.न.,
-गा.पै.

गामा, आधी तुमची तालिबानी मनोवृत्ती बदला (निदान प्रयत्न करा) म्हणजे आम्ही काय म्हणतो आहोत ते कळेल. आणि हो, या वृत्तीला तालिबानी हेच नाव अगदी योग्य आहे. तुम्हाला ते आवडत नसेल तर मनोवृत्ती बदलणे हाच एक उपाय आहे.

बडोद्यातलं उदाहरण अत्यंत हास्यास्पद आहे. तुम्हाला तुमच्याच विधानातली विसंगती कळत नाहीये कारण ती तुम्हाला कळून घ्यायचीच नाहीये. कोण पुरुष रक्षण करतोय त्यामुळे कमी कपड्यातल्या बायका सुरक्षित आहेत हे सांगणे (सॉरी टू से, पण) शुद्ध मूर्खपणाचं आहे. बायकांचं रक्षण करण्याची वेळच येऊ नये इतकी पुरुषांची मनोवृत्ती बदलली जावी हे आमचं म्हणणं आहे. तुमच्या अपेक्षांप्रमाणे कपड्यांची निवड न करताही स्त्रिया सुखनैव, निर्भय वावराव्यात हीच एक अपेक्षा.

आता तुम्हाला 'स्त्रियांचे कपडे आणि त्यामुळे चाळवल्या जाणार्‍या बिचार्‍या पुरुषांच्या भावना' याव्यतिरीक्त कोणताही मुद्दा मांडण्याचा नसेल तर इथून कलटी मारली तरी चालेल. अगदी कंटाळा आला आहे.

गा.मा,
हे माणूस म्हणून वागवणे म्हणजे काय ते बघायला पाहिजे<<<< ते तुम्ही राहुद्यात... ते माणसाला कळण्यासारखं आहे.

आता तुम्हाला 'स्त्रियांचे कपडे आणि त्यामुळे चाळवल्या जाणार्‍या बिचार्‍या पुरुषांच्या भावना' याव्यतिरीक्त कोणताही मुद्दा मांडण्याचा नसेल तर इथून कलटी मारली तरी चालेल. अगदी कंटाळा आला आहे.
<<<< ++++१

उगाच भाबडेपणाचा, मदत करू ईच्छायचा आव आणू नका Angry

>>बायकांचं रक्षण करण्याची वेळच येऊ नये इतकी पुरुषांची मनोवृत्ती बदलली जावी हे आमचं म्हणणं आहे. तुमच्या अपेक्षांप्रमाणे कपड्यांची निवड न करताही स्त्रिया सुखनैव, निर्भय वावराव्यात हीच एक अपेक्षा.

ही अपेक्षा अगदी रास्त आहे, पण ती प्रत्यक्षात येणे तेवढेच कर्मकठिण आहे.

१. जेथे लोक कमी शिकलेले आणि कुसंस्कारित आहेत आणि वर त्यांना आजकालच्या जवळपास सेन्सॉर नसलेल्या माध्यमातुन (सिनेमे, इंटरनेट) गोष्टी अजुनच प्रभावित करत आहेत, तेथे प्रबोधन, मानसिकतेमधे बदल कसा करणार आणि त्याला किती काळ लागणार ?

२. जेथे लोक शिकलेले आहेत आणि तरी त्यांची मने कुसंस्कारित आहेत आणि वर त्यांना आजकालच्या जवळपास सेन्सॉर नसलेल्या माध्यमातुन (सिनेमे, इंटरनेट) गोष्टी अजुनच प्रभावित करत आहेत, तेथे प्रबोधन, मानसिकतेमधे बदल कसा करणार आणि त्याला किती काळ लागणार ?

दोन्ही मुद्दे जरी एकसारखे दिसत असले तरी ते वेगळे असुन त्यांची गंभीरता ही वेगवेगळी आहे.
पहिल्या प्रकारातल्या लोकांना निदान कायद्याच्या धाकाने कन्ट्रोल करता येऊ शकेल कदाचित,
पण दुसर्‍या प्रकारात शिक्षणाच्या, पैशाच्या मदतीने कायदाच वाकविण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

मुळात स्त्री पुरूष यांच्यात जे नैसर्गिक आकर्षण असते त्याला समाजाच्या नियमांनी कितीही बांध घातला तरी तो केव्हातरी तोडला जाणारच (दोन्ही बाजुंनी) हे कटू असले तरी सत्य आहे. अगदी देवांच्या कथा पाहिल्या तरी त्यातही हेच दिसून येईल. म्हणजे ते चांगले आहे असे म्हणणे नाही.

तात्काळ उपाय हवा असेल तर याआधी मी एके ठिकाणी लिहिले होते त्याप्रमाणे एक उपाय करता येऊ शकतो.
युवक आणि युवतींची गस्त पथके बनवावीत आणि त्यांना पोलिस मित्र प्रमाणे ठराविक अधिकार देण्यात यावेत. आणि एका ठराविक वयानंतर त्यांना काढून नविन लोक भरती करावेत. प्रत्येक विभागातल्या पथकांनी त्या त्या विभागावर करडी नजर ठेवावी. जमल्यास अशा पथकांना थोडेफार सैनिकी प्रशिक्षण पण देण्यात यावे.

दीर्घ काळाचा उपाय म्हणजे समाज प्रबोधन जे एका दुसर्‍या पिढीत होण्यासारखे नाही. पुर्वी जसे संत, समाजसुधारक होऊन गेले अशा प्रकारच्या लोकांचा मोठ्या प्रमाणावर समूहच अवतरावा लागेल.

पुर्वी जसे संत, समाजसुधारक होऊन गेले <<<
समाजसुधारकांचं ठिके. संतांचं राहूद्या..
समानतेचा पुरस्कार करणार्‍या बहुतेक संतांनी स्त्रियांना नरकाचे द्वार, मार्गातली/ गळ्यातली धोंड, पायातली वहाण, मारण्यास योग्य असेच म्हणले आहे.

अगदी देवांच्या कथा पाहिल्या तरी त्यातही हेच दिसून येईल. म्हणजे ते चांगले आहे असे म्हणणे नाही.
>>> देवांच्या कथा पुरुषांनी लिहिल्यात, भाऊ!

तुमच्या बाकीच्या मुद्द्यांकरता हा बाफ पुन्हा पहिल्यापासून वाचा. Happy

<< कोण पुरुष रक्षण करतोय त्यामुळे कमी कपड्यातल्या बायका सुरक्षित आहेत हे सांगणे (सॉरी टू से, पण) शुद्ध मूर्खपणाचं आहे. >>

म्हणजे पुरुष मदतीला नाही आले (बदडायला वगैरे) तरी बोंब. बडोद्यासारख्या उदाहरणांमधे मदतीला आले तरी या बोंब मारणार. म्हणूनच याला मी हास्यास्पद पोस्ट म्हणालो.

<<बायकांचं रक्षण करण्याची वेळच येऊ नये इतकी पुरुषांची मनोवृत्ती बदलली जावी हे आमचं म्हणणं आहे. >>

जे विकृतपणा करु धजावतात अशा सगळ्याच स्त्री आणि पुरुष दोन्ही यांची मनोवृत्ती बदलणे शक्य नाही. तेव्हा स्त्रीयांवर जो पर्यंत स्त्रीयांवर होणार्‍या अशा प्रकारच्या हल्ल्यांमधे लक्षणीय घट होत नाही तो पर्यंत (१) अशी विकृत मनोवृत्ती बदलण्याचा प्रयत्न करत रहाणे (striving towards perfection असे म्हणू वाटल्यास आपण) आणि (२) स्त्रीयांवर हल्ला झाल्यास त्यांच्या रक्षणासाठी धाऊन जाणे अशा दोन्ही गोष्टी सगळ्यांनाच कराव्या लागतील.

<<तुमच्या अपेक्षांप्रमाणे कपड्यांची निवड न करताही स्त्रिया सुखनैव, निर्भय वावराव्यात हीच एक अपेक्षा.>>

अपेक्षा नव्हे, हा हक्कच आहे स्त्रीयांचा. नव्हे समस्त मनुष्यजातीचा.

काल गोंदिया कि कुठल्या गावात छेडछाड करणा-याला जमावाने बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिलं. कालच्या मराठी बातम्यांमधे ही घटना दाखवली. त्या पोरांचे चेहरे इतके भेदरलेले होते कि आयुष्यात पुन्हा कुणाची छेड काढतील असं वाटत नाही. आधीच्या पोस्टपासून ही भूमिका माझी कायम आहे. त्याला मी(अशी भूमिका घेणारा) रस्त्यावर उतरतो कि नाही असे वैयक्तिक प्रश्न विचारण्यात अर्थ नाही. मुळात छेड करणा-याची भीड चेपलेली असते. आज छेड काढली तरी कुणी बोलत नाही यामुळे ती आणखी चेपते. नंतर नंतर आपल्याला लोक घाबरतात या भावनेने इगो कुरवाळला जातो. त्यातून अरेरावी सुरू होते. मग हात धरायलाही मागेपुढे पाहीले जात नाही. ही प्रगती कुठे जाईल हे सांगायला नकोच. वेळीच ही प्रवृत्ती ठेचली तर एक गंभीर गुन्हा रोखला जाऊ शकतो. म्हणतात ना लातों के भूत बातों से नही मानते.. आत्तापर्यंत यावर तात्विक चर्चा चालली होती. आता उदाहरण समोर आलंय. आणखीही अशाच प्रकारच्या बातम्या येताहेत.

मागच्या पोस्टमधे "प्रबोधनाने इथल्या लोकांचे मतपरिवर्तन होईल पण गुन्हेगारांचे काय " हा प्रश्न विचारण्यामागे हेच कारण होतं.

'एक प्रतिसादक'
अनुमोदन. साम (समाजप्रबोधन) आणि दंड (चोप देणे वगैरे आणि कायदेशीर शिक्षा दोन्ही यात येते) अशा दोन्ही प्रकारे या समस्येला सामोरे जाता येईल.

chaitrali | 29 December, 2012 - 20:57 नवीन

बलात्कार करणारे गुन्हेगार पकडले गेले तरी त्यांचा चेहरा समाजापासून लपविण्याची पद्धत आपल्याकडे आहे . त्यामुळे शिक्षा भोगून आल्यानंतरही अनेक गुन्हेगार समाजात उजळ माथ्याने वावरतात . यातून चुकीचा संदेश जाण्याचा धोका असतो . हे टाळण्यासाठी आणि गुन्हेगाराने केलेल्या कृत्याची त्याला लाज वाटावी , पश्चात्ताप वाटावा यासाठी यापुढे बलात्कारातील गुन्हेगाराची सर्व माहिती त्याच्या फोटोसह वेबसाइटवर टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे . (http://www.delhipolice.nic.in/).

रेफ- https://www.facebook.com/ayushyawar.bolu.kahi.vny.cmyk
<<<
अशी पोस्ट दु:खद घटनांच्या धाग्यावर आढळली. इथे हवी म्हणून इकडे कॉ.पे. केली आहे.
पाश्चात्य देशांत पेडोफाईल्सची अशी माहिती प्रसिद्ध केली जाते, असे ऐकून आहे.
सरकारने केलेले हे काम उत्तम आहे असे मी म्हणतो. सरकारचे व पोलिसांचे अभिनंदन.

<<राज | 19 December, 2012 - 12:58
1Vote up!चर्चा वाचली. हे माझे २ पैसे:

नगरपालिका/राज्य्/केंद्र सरकारला सेक्स ऑफेंडर्सचा डेटाबेस मेंटेन करायला भाग पाडा. अगदी बलात्कार ते इव्ह टिझींग करणार्‍या गुन्हेगारांची नोंद या डेटाबेस मध्ये ठेवा. हा गुन्हेगार ज्या-ज्या नविन परिसरात शिक्षण/नोकरी/धंदा यासाठी जाईल, त्या-त्या ठिकाणी त्याला त्याचा नविन पत्ता इ. कळवण्यास बंधनकारक करा. हा डेटाबेस, सरकारच्या वेबसाइटवर सतत अपटुडेट ठेवा. >>

हाउ कोइंसिडेंट्ल! Happy

यापुढे बलात्कारातील गुन्हेगाराची सर्व माहिती त्याच्या फोटोसह वेबसाइटवर टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे>>>> त्यासोबत अशा गुन्हेगाराच्या कपाळावर किंवा हातावर 'मेरा बाप चोर है' प्रमाणे 'बलात्कारी' म्हणुन परमनटं गोंदवले पाहिजे

सरकारने केलेले हे काम उत्तम आहे असे मी म्हणतो. सरकारचे व पोलिसांचे अभिनंदन. >>>>> जे आधीच करायला हवे होते. त्यात कसले अभिनंदन! लोक मेणबत्ती मोर्चा घेउन रस्त्यावर उतरले म्हणुन सरकारला तो निर्णय घ्यावा लागला. आणी प्रत्यक्षात कधी येते ते बघु यात! अशा घोषणा रोजच होतात.

२३ दिवस झाले. अजुन त्या मुलीच्या घरच्यांना जाहिर केलेली मदत दिली नाहि! असल्या फालतु सरकारला निषेधच केला पाहिजे.!

सरकारचे व पोलिसांचे अभिनंदन करणार्यांचा आयक्यु तपासुन त्यांना वेड्यांच्या इस्पितळात पाठवायची वेळ आली आहे.!

aashu29,

>> उगाच भाबडेपणाचा, मदत करू ईच्छायचा आव आणू नका

मी कशाला भाबडेपणाचा आव आणू! पुरुषांतल्या जनावराचा कसा बंदोबस्त करायचा असतो ते मला चांगलं ठाऊक आहे.

बायकांच्या कपड्याबद्दलचं माझं वाक्य पहा :
मग तिने (बाईने) कुठली वस्त्रे परिधान केली आहेत याकडे लक्ष जाणार नाही.

आ.न.,
-गा.पै.

वरती लोकांनी पोटतिडकीने प्रतिबंधात्मक उपाय सुचवले आहेत.
आपल्या देशात मेजॉरीटी लोक भोंदू/स्वतःच्या अकलेचा वापर न करणारे/मुर्दाड/माजोर्डे/उदासीन/स्वार्थी/असंस्कृत ह्या कॅटॅगरीतले आहेत.
आपण इकडे मारे चर्चा करु, आणि करण्यात काहीच गैर नाही, पण उपाय पोहोचणार कोणापर्यंत तर आपल्यापर्यंतच. आपण सगळे पांढरपेशे, बुद्धीजिवी लोक जे कोणाचा बलात्कार करायला जाणार नाही. आपण भले स्त्रीकडे एक माणूस म्हणून पहायला शिकू, नव्हे बरेचजण ते ऑलरेडी शिकलेले आहेत, आपण ते संस्कार आपल्या मुलांना देऊ, पण त्या मुर्दाड लोकांचे काय! ही चर्चा त्यांच्यापर्यंत कधी पोहोचणार नाही. पोचली तरी डोक्यात शिरणार नाही, कारण त्यांची बौद्धीक पातळीच तेवढी आहे. त्यांनी स्त्रीला भोग्यवस्तू सारखे पहायचे हे लहानपणापासून पाहिले आहे. त्यांची मुलेही तेच पाहणार. किती शोकांतीका आहे ही! प्रांतीय वादात अजिबात शिरायचे नाही आहे, पण उत्तरेत हे प्रमाण धोकादायकप्रमाणात अधिक आहे. ६-८ पिढ्या गेल्याशिवाय बदलणारच नाही. फक्त शिक्षणही हे बदलू शकत नाही. कमालीचा माज ह्या पुरुषांमध्ये भरला आहे, आणि वर नमूद केलेले उपाय कोणत्याच प्रकारे त्यांना बदलू शकणार नाही.

देशातली मध्यमवर्गीय पिढी बदलते आहे, बदलली आहे, पण किती नगण्य प्रमाण आहे त्यांचे.

पोलीस (काही अपवाद असतील), नेते, गुरु सगळेच भ्रष्टाचारी, आणि एकजात पैसे खाणारे. सामान्य माणूस मेला काय, जगला काय कोणाला फरक पडत नाही. किड्यामुंगीसारखे लोक जगतात आणि इतरांनाही तिच वागणूक देतात. देशप्रेम वगैरे तर फक्त नावाला उरले आहे देशात. सगळेच स्वत:चा मतलब साधणारे. गरिबाला माणसासारखे वागवले जात नाही, अश्या लोक कसे शिकणार की स्त्रीला माणसासारखे वागवावे.

गेल्या ६० वर्षात सध्या देश सर्वात लो पॉईंटला आहे. एकतर सगळे राजकीय पक्ष मिळून देशाला देशोधडीला लावत आहेत, आणि मुर्ख लोक हे कुठल्या नेत्याच्या, नाहीतर बाबाच्या नादी लागून त्याच्या घृणास्पद वक्तव्याला पाठींबा देत आहेत. मग वाटतं these people deserve it. भरडले जातात ते सुज्ञ, डोक्यानं विचार करणारे, परिस्थितीचा मनाला genuinely त्रास होणारे, त्याबद्दल काही तरी करायची इच्छा असणारे, पण काय करायचं हे न कळल्याने गोंधळून जाणारे लोक.

एक आहे. हा देश लवकर सुधारणार नाही. किंबहूना स्वार्थी राजकारणी, भ्रष्ट लोक, मुर्दाड लोक आणि भोंदू बनले जाणारे लोक जोपर्यंत ह्या देशात आहेत तोपर्यंत आपण जरी बेंबीच्या देठापासून ओरडून चांगले उपाय सुचवले तरी ते कधीच implement होणार नाहीत. असेच चालत राहणार आपण मरेपर्यंत ...

फार negative वाटलं तर माफ करा. पण गेल्या काही दिवसात, महिन्यात, वर्षात जे काही घडतय त्यामुळे मन मेलय, आणि त्यातून हा प्रामाणिक उद्रेक.

खालील मजकूर मला ढकलपत्रातून आला. उपयुक्त वाटतोय म्हणून पोस्ट करीत आहे. पूर्ण भाषांतर करून टंकायला खरच वेळ नाही आणि तेवढी मराठी टंकायची सवयही नाही. त्यामुळे इंग्रजीमध्ये पेस्ट करण्याबद्दल क्षमस्व. ती मुलाखत किती खरी आणि खोटी आहे याचा सोर्स मी शोधू शकलो नाही त्यामुळे त्यातील निष्कर्षांशी मी व्यक्तिश: सहमत आहे असे नाही तरी पण त्यातील इतर काही उपाय हे अगदी सहज पाळण्याजोगे वाटले म्हणून शेअर करीत आहे. जर इंग्रजीमुळे हि पोस्ट अस्थानी वाटत असेल तर कृपया तसे सांगावे म्हणजे मी ती उडवीन. कोणी त्यातील उपयुक्त उपाय भाषांतरित करून मूळ धाग्यामध्ये डकवेल तरी चालेल.

It seems that a lot of attackers use some tactic to get away with violence. Not many
people know how to take care of themselves when faced with such a
situation. Everyone should read this especially each n every girl in this world.

THOUGHT THIS WAS GOOD INFO TO PASS ALONG...
FYI - Through a rapist's eyes! A group of rapists and date rapists in
prison were interviewed on what they look for in a potential victim
and here are some interesting facts:

1] The first thing men look for in a potential victim is hairstyle.
They are most likely to go after a woman with a ponytail, bun! , braid
or other hairstyle that can easily be grabbed. They are also likely to
go after a woman with long hair. Women with short hair are not common
targets.

2] The second thing men look for is clothing. They will look for women
who's clothing is easy to remove quickly. Many of them carry scissors
around to cut clothing.

3] They also look for women using their cell phone, searching through
their purse or doing other activities while walking because they are
off guard and can be easily overpowered.

4] The number one place women are abducted from / attacked at is
grocery store parking lots.

5] Number two is office parking lots/garages.

6] Number three is public restrooms.

7] The thing about these men is that they are looking to grab a woman
and quickly move her to a second location where they don't have to
worry about getting caught.

8] If you put up any kind of a fight at all, they get discouraged
because it only takes a minute or two for them to realize that going
after you isn't worth it because it will be time-consuming.

9] These men said they would not pick on women who have umbrellas,or
other similar objects that can be used from a distance, in their
hands.

10] Keys are not a deterrent because you have to get really close to
the attacker to use them as a weapon. So, the idea is to convince
these guys you're not worth it.

POINTS THAT WE SHOULD REMEMBER:

1] If someone is following behind you on a street or in a garage or
with you in an elevator or stairwell, look them in the face and ask
them a question, like what time is it, or make general small talk:
can't believe it is so cold out here, we're in for a bad winter. Now
that you've seen their faces and could identify them in a line- up,
you lose appeal as a target.

2] If someone is coming toward you, hold out your hands in front of
you and yell Stop or Stay back! Most of the rapists this man talked to
said they'd leave a woman alone if she yelled or showed that she would
not be afraid to fight back. Again, they are looking for an EASY
target.

3] If you carry pepper spray (this instructor was a huge advocate of
it and carries it with him wherever he goes,) yelling I HAVE PEPPER
SPRAY and holding it out will be a deterrent.

4] If someone grabs you, you can't beat them with strength but you can
do it by outsmarting them. If you are grabbed around the waist from
behind, pinch the attacker either under the arm between the elbow and
armpit or in the upper inner thigh - HARD. One woman in a class this
guy taught told him she used the underarm pinch on a guy who was
trying to date rape her and was so upset she broke through the skin
and tore out muscle strands the guy needed stitches. Try pinching
yourself in those places as hard as you can stand it; it really hurts.

5] After the initial hit, always go for the groin. I know from a
particularly unfortunate experience that if you slap a guy's parts it
is extremely painful. You might think that you'll anger the guy and
make him want to hurt you more, but the thing these rapists told our
instructor is that they want a woman who will not cause him a lot of
trouble. Start causing trouble, and he's out of there.

6] When the guy puts his hands up to you, grab his first two fingers
and bend them back as far as possible with as much pressure pushing
down on them as possible. The instructor did it to me without using
much pressure, and I ended up on my knees and both knuckles cracked
audibly.

7] Of course the things we always hear still apply. Always be aware of
your surroundings, take someone with you if you can and if you see any
odd behavior, don't dismiss it, go with your instincts. You may feel
little silly at the time, but you'd feel much worse if the guy really
was trouble.

1. Tip from Tae Kwon Do: The elbow is the strongest point on your
body. If you are close enough to use it, do it.

2. Learned this from a tourist guide to New Orleans : if a robber asks
for your wallet and/or purse, DO NOT HAND IT TO HIM. Toss it away from
you.... chances are that he is more interested in your wallet and/or
purse than you and he will go for the wallet/purse. RUN LIKE MAD IN
THE OTHER DIRECTION!

3. If you are ever thrown into the trunk of a car: Kick out the back
tail lights and stick your arm out the hole and start waving like
crazy. The driver won't see you but everybody else will. This has
saved lives.

4. Women have a tendency to get into their cars after shopping,eating,
working, etc., and just sit
(doing their checkbook, or making a list, etc. DON'T DO THIS! The
predator will be watching you, and this is the perfect opportunity for
him to get in on the passenger side,put a gun to your head, and tell
you where to go. AS SOON AS YOU CLOSE the DOORS , LEAVE.

5. A few notes about getting into your car in a parking lot, or
parking garage:

a. Be aware: look around your car as someone may be
hiding at the passenger side , peek into your car, inside the
passenger side floor, and in the back seat. ( DO THIS TOO BEFORE
RIDING A TAXI CAB) .

b. If you! u are parked next to a big van, enter your car from the
passenger door. Most serial killers attack their victims by pulling
them into their vans while the women are attempting to get into their
cars.

c. Look at the car parked on the driver's side of your vehicle, and
the passenger side. If a male is sitting alone in the seat nearest
your car, you may want to walk back into the mall, or work, and get a
guard/policeman to walk you back out. IT IS ALWAYS BETTER TO BE SAFE
THAN SORRY. (And better paranoid than dead.)

6. ALWAYS take the elevator instead of the stairs. (Stairwells are
horrible places to be alone and the perfect crime spot).

7. If the predator has a gun and you are not under his control, ALWAYS
RUN! The predator will only hit you (a running target) 4 in 100 times;
And even then, it most likely WILL NOT be a vital organ. RUN!

8. As women, we are always trying to be sympathetic: STOP IT! It may
get you raped, or killed. Ted Bundy, the serial killer, was a
good-looking, well educated man, who ALWAYS played on the sympathies
of unsuspecting women. He walked with a cane, or a limp, and often
asked "for help" into his vehicle or with his vehicle, which is when
he abducted his next victim.

प्रत्येकाला आजूबाजूला घडणारे बदल लगेच पचनी पडतील असं नाही, प्रत्येकाकडे तेवढी मनाची तयारी असेलच असं नाही >>>>>>>>>>>> मामी तुमची दुसर्‍याच एका धाग्यावरची पोस्ट इथे डकवतेय त्याबद्दल क्षमस्व. पण हाच मुद्दा इथेही लागु होतो ना. स्त्री स्वातंत्र्य / व्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणुन आई, बहीण, मुलगी कसेही कपडे घालु लागली तर ते प्रत्येकाच्या पचनी पडेलच असं नाही. सगळ्यांची मनाची तयारी असेलच असं नाही. म्हणुन सरसकट ते तालिबानी, मागास विचारांचे ठरतात काय? इथे बरेच जण तरुण मुलीचा बाप, आई असतील. ते ही स्त्री स्वातंत्र्य / व्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणुन आपली मुलगी घरातुन बाहेर पडताना काय कपडे घालेते हे बघत नाहीत काय / बघणार नाहीत काय? की तिला तिचं स्वातंत्र्य आहे म्हणुन वाट्टेल तसा पोषाख करुन देतात / देतील??

ता.क.याचा बलात्काराच्या घटनेशी काही एक संबंध नाही हे स्पष्ट करतेय. फक्त मुलींच्या कपड्यांविषयीच मत आहे हे. पोषाखामुळे बलात्काराचं समर्थन होउच शकत नाही हे मलाही कळतं.

सध्या फेसबुकवर हि एक पोस्ट फिरते आहे..
क्र . ३, ४ आणि १३ काहीच्या काही न पटणारे आहे..

१. अनोळखी व्यक्ती बरोबर लिफ्ट घेऊ नका
२. सतत जरी पुरुषांमध्ये काम करावे लागत असेल तरी, आपला ड्रेस, आपले कपडे आपले पुरतेअंग झाक्ण्यासारखे असू द्या
३. ऑफिस मध्ये असताना काही महिला आळस देणे, डोक्यावर हात ठेऊन बसने, पाय पसरून बसने या गोष्टी करतात,
४. पुरुष सदस्यांना टाळी देणे, नॉनव्हेजजोक मध्ये सामील होणे, हसणे , हा एक प्रकारचा प्रतिसाद आहे.
५.मुख्य म्हणजे मोबाइल वर बोलताना महिलांना भान राहत नाही, गाडीत बसल्यानंतर त्या मोबाईल वर बोलण्यात गुंगून जातात, अशा वेळी त्यांचा गेरफायदा घेतला जातो.
६. आपली तब्येत ठणठनित असू द्या, आपल्या संरक्षणा जबाबदारी आपण घ्या, दोन हाथ करता आलेच पाहिजे.
७. ग्रुप मध्ये वावरताना आपल्याबरोबर आपले विश्वासू सहकारी घ्या.
८.रात्रीचा प्रवास मिंटीग असतील तर घरच्या व्यक्तींना कल्पना असू द्या.
९.केवळ मी बाई आहे म्हणून मिळणारी सहानुभूती टाळा.
१०.मी तुमच्या वडिलांसारखा आहे, भाऊ समजा, मित्र समजा, अशा व्यक्ती धोकादायकअसतात.
११.प्रवास करताना खाजगी गाड्या टाळा.
१२. आपल मुल सुरक्षित ठेवा, त्यालाकल्पना द्या, कोण तुझ्या शरीराला हात लावत आहे, मुलगा किवा मुलगी कोणीही सुरक्षित नाही,
१३.आपला नवरा, आपले वडील यांच्याशी आपल्या घरात होणारा विसंवाद बाहेर मांडू नका.
१४. खेड्यात तांड्यावर वाड्यावरराहणाऱ्या बायका, झोपताना शेतात काम करताना तिखटाची पुडी घेऊन फिरतात, कोणी आला तर झपकन तिखट तोंडावर मारून निसटतात.
१५.रात्री बेरात्री पुलाखाली, मित्राची वाट पाहत उभे राहणे टाळा, फिरायला गेले तरी गर्दीच्या ठिकाणी जा, एकांत मिळतो म्हणून गावाबाहेर जाणारी मुले यात सापडतात.
१६.दुर्देवाने येणारा असा प्रसंग आपण काळजी घेतल्याने टाळू शकता.

आपला नवरा, आपले वडील यांच्याशी आपल्या घरात होणारा विसंवाद बाहेर मांडू नका.

>> ह्याने नक्की काय साध्य होईल? सामाजिक शिष्टाचार म्हणून ठीक आहे. पण बलात्काराच्या संदर्भात १३ने काय साध्य होईल कळत नाहीये.

पियुपरी,
भंगार आहे Sad

आज इकडे वेबिनार आहे.. 'सेफ्टी रिस्क्स फेसिंग वुमेन ट्रॅवलिंग अँड वर्किंग इन इंडिया'.. गेल्या सहा महिन्यात हापिसच्या कामासाठी भारतात गेलेल्या स्त्रियांना बोलावले आहे. हा वेबिनार मोठ्या प्रमाणावर बर्‍याच कंपन्यातील स्त्रियांसाठी आहे.

Sad

एकीकडे हे सगळे होणारच होते ते समजते, पण एकीकडे वाईटही वाटते.

त्या माहितीच्या आधारे सहानुभूती दाखवून गैरफायदा घेणारे लोक असू शकतात म्हणुन.

>> तसं तर माझी प्रिय मांजर मेली म्हणून मी दु:खी आहे हे कळल्यावर सहानुभूती दाखवायच्या बहाण्याने कोणी जवळ येणार नाही कश्यावरून?

एकीकडे हे सगळे होणारच होते ते समजते, पण एकीकडे वाईटही वाटते.

>> नक्की कश्याबद्दल वाईट वाटतेय? भारताचे नाव खराब होण्यासंबंधी बोलते आहेस का रैना?

>>तसं तर माझी प्रिय मांजर मेली म्हणून मी दु:खी आहे हे कळल्यावर सहानुभूती दाखवायच्या बहाण्याने कोणी जवळ येणार नाही कश्यावरून? Lol

नरेंद्र मोदिंना पंतप्रधान करा. कांग्रेसच्य गुंडांची आणी चमच्यांची पुन्हा गड्बड करायची हिम्मत होणार नाहि. सर्व देश आणी महिला सुरक्षित होण्याचा हा एकमेव मार्ग आहे!

वाचलेल्या संशोधनावर आधारित माहितीनुसार, सुरक्षेसाठी गर्दीमधे किंवा कुठेही मदत मागायची गरज पडली तर "कोणीतरी मदत करा असे न सांगता" प्रत्येक व्यक्तीस उद्देशून काय करायचे ते सांगा. उदा.
- अहो निळा शर्ट घातलेले काका तुम्ही पोलिसाना फोन करा.
- तु लाल पंजाबी वेष घातलेली, तु बघतेस काय मागून एक लाथ मार त्याला.
- तू, हो तूच निळा टी-शर्ट घातलेला - मित्रांबरोबर ह्याला फोडून काढ.

गर्दीमधे असे नेमके दर्शवून सांगितले की नैतिक जबाबदारीची त्रयस्थाना जाणीव होते व ते मदत करण्याची शक्यता वाढते. नाहीतर सगळे आहेत तर मी कशाला असे सगळेच विचार करण्याची शक्यता जास्त असते व त्यामुळे मदत मिळत नाही किंवा मिळण्यास उशीर होतो.

अर्थात असे सर्व विचार करून सांगणेही दिव्यच..
पण असे मदत करू इछ्छिणा-यांनीही लक्षात ठेवावे व करावे.

दिल्लीतल्या गुडीया केसमधे "त्या" तरुणाने गुन्हा करण्यापूर्वी अश्लील फिल्म पाहिली होती हे तपासात उघड झालं. नको त्या वयात अशा फिल्म्स सहजी उपलब्ध होणं, त्यामुळं होणारे अनर्थ याबाबतीत कुणीच काही करू शकत नाही का ?
( कृपया अमेरिकन / युरोपियन समाजाचे दाखले देउ नका. आपल्या समाजात पुरेशा खुलेपणाअभावी जे गैरसमज पसरतात त्याआ खतपाणी घालणा-या या प्रकारांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. परदेशात देखील मुलगा वयात आल्यावर त्याच्यावर लक्ष ठेवणा-या आया असतातच. मुलाचे वयात येणे हा प्रकार गंभीरपणे न घेणे, त्याला मार्गदर्शन न मिळणे यातून वयानुसार पडणा-या प्रश्नांची उत्तरं बाहेर मिळवण्यातून चुकीची माहिती तर मिळत नाही ना याबद्दल आपण उदासीन आहोत. प्रत्यक्ष गुन्हा करणं हे वेगवेगळ्या प्रकृतीवर ठरतं हे मान्य करूनही गुन्हा करण्याला प्रोत्साहन मिळेल अशी चुकीची माहिती, फिल्म्स उपलब्ध असणं या विषयावर कुणीच का बोलत नाही ?).

मी हा बाफ शोधत होते .....
सध्या थोपुवर एक छान लिंक फिरतेय...तुम्ही गाडीत, लिफ्टमध्ये, रस्त्यावर, ऑफिसात एकटे असतान घ्यावयाची खबरदारी ......
मी मला जमेल तेंव्हा टाकेनच!
पण त्या आधी कोणाला जमलं तर ती माहीती इथे टाका...
उपयुक्त आहे!

Pages