महिलांनि स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे?

Submitted by प्रिया७ on 18 December, 2012 - 11:06

गेले २ दिवस दिल्लीच्या रेपची माहिति वाचण्यात येत आहे. आजकाल बर्‍याच कारणाने महिलांना उशिरा पर्यंत घराबाहेर राहावे लागते. किंवा बाहेरगावी सुद्धा एकटे रहावे लागते. काहि सिंगल पेरेंट सुद्धा आहेत. अशा वेळी एकटे राहाणार्‍यानी घरि आणि घराबाहेर काय खबर्दारी घ्यावी? असा धागा असेल तर हा उडवुन टाकेन.

कवठीचाफा | 26 December, 2012 - 10:14
साडेतीन-चारवर्षे सेल्फ डिफेन्स अ‍ॅकेडमी नावाच्या संस्थेसोबत लहान काळाची शिबीरं झाली त्यात ज्या गोष्टींचे ट्रेनिंग दिले त्यातल्या महत्वाच्या गोष्टी. केवळ स्त्रियाच नाही पुरूषांनाही उपयोगी पडू शकतील अश्या.
१ ) कधीही समोरच्या व्यक्ती एकापेक्षा जास्त असतील तर प्रतिकारापेक्षा माघार घेणं उपयुक्त अर्थात याचा अर्थ थेट पळायला सुरूवात करणं असा नाही, यात तुम्ही दमाल आणि आयतेच हाती सापडाल.
२ ) सर्वात आधी परिस्थिती/वातावरणाचं बारकाईनं निरीक्षण करत रहायला हवं अनेकदा संभाव्य धोका लक्षात येतोच.
३ ) समोरच्या व्यक्तींमधल्या म्होरक्या किंवा लिडरकडे आधी लक्ष द्या, (काही सेकंदातच तो लक्षात येतो ) आपलं पहिलं लक्ष्य त्यालाच करा. आता कसं ? ते पुढे
४) पायात जर हिल्स असतील तर त्यांचा आघात गुडघ्याच्या बाजूच्या भागावर करा, लक्षात घ्या संवेदनशील भागावर हल्ला होणार या तयारीत समोरची व्यक्ती असते तीथे प्रहार वाया जाईल. गुडघ्याचा बाजूचा भाग हा देखील विक पॉइंटच असतो तिथला मार सहन होत तर नाहीच पण त्यानंतर काहीकाळ पायही टेकता येत नाही.
५ ) डोळे हा अतिमहत्वाचा भाग त्याला लक्ष्य करा
६ ) पेन, डोक्यातली क्लिप ही उपयुक्त हत्यारं आहेत त्यांचा वापर करा, यांच्यासाठी हाताचा कोपराजवळचा भाग, तळहाताचा मागचा भाग, कान, त्याच्या मागच्या सॉफ्ट टिश्युज यांना लक्ष्य करा
७ ) पाठीमागुन पकड घातल्यावर ताबडतोब हताश होऊ नका ( सामान्यपणे इथेच आपण गडबडतो ) पायाच्या टाचेचा आघात मागच्या व्यक्तीच्या पायाच्या नडगीवर करा आथवा हातातला पेन, पीन मागच्या व्यक्तीच्या कानाच्या आसपास मारा.
८ ) दातांचा वापर करा मात्र हात किंवा दंड यांच्या बाबत माणूस सहनशील असू शकतो, त्यांचा वापर कान आथवा मानेवर करा.
९ ) दगड हे उत्तम शस्त्र आहे, अंतर मिळालं तर हमखास वापर करा
१० ) हे सगळं करण्यासाठी, मनात बेडरता आणि क्रूरता येण्याची गरज आहे त्याचसोबत सवयही लागण्याची गरज आहे. शक्य झाल्यास कुणीतरी पार्टनर घेऊन नॉनफेटल प्रॅक्टीस करा.
११ ) प्रतिकार करायचाच आहे याची खूणगाठ बांधून शरीर शिथील ठेवण्याची सवय करून घ्या.

उदयन.. | 18 December, 2012 - 22:15
चोरटे स्पर्श, नको तिथे चिमटे यांकडे दुर्लक्ष करा. आठवड्यातून तीन वेळा तुम्ही कुर्ला दादर अश्या ठिकाणी एकटीच नेहमी मारामारी करत बसू शकत नाही. >>>>>>>>>> इथेच चुकतात तुम्ही......एक ब्लेड नाहीतर लहानसा धारधार चाकु ठेवा..... असे काही झाल्यास लगेच मारा.......तेही जोरात.... परत कुणाला हात लावणार नाही

सामोपचार | 18 December, 2012 - 22:17
उदयनजींना अनुमोदन.......हल्ली लहान नेलकटरसारखी अवजारे असतात ती जवळ ठेवावीत. पटकन काढून भोसकायला बरी पडतात.

स्मितू | 18 December, 2012 - 22:57
मी उदय च्या मताशी सहमत आहे.... ...ट्रेन मध्ये... बसमध्ये प्रवास करतांना महिलांना ,मुलींना आश्या बर्‍याच प्रसंगांना तोंड द्यावे लागते आश्या वेळेस मुलींनी.... आपल्या जवळच्या सेफ्टी पिन चा वापर करावा.... पुरुषाच्या घाणेरड्या हालचाली लक्षात आल्या की लगेच बारिक पिन टोचायची...बरोबर चुपचाप बसतो तो.... ब्लेड, चाकु हे हत्यार जरा जास्तच होते..
शक्य्तोवर रात्रीचा प्रवास एकटीने टाळावाच... खुपच अर्जंट असेल तर सोबत कोणाला तरी घ्यावे...

mansmi18 | 19 December, 2012 - 03:12
पेपर स्प्रे मधे पेपरच असायला हवा का? हौ अबाउट सल्फ्युरिक अ‍ॅसिड?
असे काही चाळे करणार्‍यावर महिलानी अ‍ॅसिड का टाकु नये? एक दोन लोकाना या अ‍ॅसिडचा प्रसाद मिळाला की पुढे अशी काही विकृत इच्छा असणारे पुरुष असे काही करण्याआधी शंभर वेळा विचार करतील.

swanand_ml | 19 December, 2012 - 16:42
मला तात्वीक चर्चेत रस नसल्याने फारसे प्रतीसाद न वाचता प्रतिसाद देत आहे तरी माफी असावी.
महिलांसाठी स्वसंरक्शणावर दोन शब्द लिहु इच्छीतो.
ज्याला जगायचे आहे त्याला झगडावे लागेलच.
महिलांनी शस्त्र बालगण्यावर येथे चर्चा झाली. मला स्वताला ह्या दोन गोष्टी आवडतातः
http://en.wikipedia.org/wiki/Karambit
http://en.wikipedia.org/wiki/Push_dagger
लपवीण्यासाठी सोपे, हाताळण्यासाठी सोपे व हिसकावून घेण्यास अवघड. इंटरनेट वर उपलब्ध.
केवळ शस्त्र आहे हे पुरेसे नसते. ते हाताळन्याची व वापरण्याची मानसीकता असणे गरजेचे असते. त्यासाठी प्रशीक्शण गरजेचे आहे.
बंगळुर वासी येथे जवु शकतातः
http://kravmagabangalore.in/
मुम्बई: http://www.kravmagaindia.in/locations/mumbai
दिल्ली: http://www.kravmagaindia.in/locations/delhi
वरील प्रशिक्शण केंद्रे शस्त्रप्रशिक्शणाची नसून संरक्शण प्रशिक्शण केन्द्रे आहेत ह्यची नोन्द घ्यावी.
बहुत काय लिहणे. आपण सुज्ञ असा.

दिनेशदा | 21 December, 2012 - 05:52
मीही जसे सुचेल तसे लिहित जातोच. एकटे घराबाहेर पडल्यावर, जर कुठल्याही असुरक्षित भागातून जात असू तर अगदी नियमित रित्या घरच्या व्यक्तीला किंवा सहकारी व्यक्तीला फोन करुन आपला खरा ठावठिकाणा कळवत राहणे हा एक उपाय सुचतो मला.
संध्याकाळच्या वेळी आपल्या परिसरातील कुठलाही भाग एकाकी राहणार नाही, याची काळजी. घरी असणार्‍या किंवा जेष्ठ व्यक्तीनी घेतली तरी चालेल. अशा भागात गटाने ऊभे राहून चर्चा करावी, जाग राखावी.
घरीच कंटाळत कण्हत राहण्यापेक्षा. बसस्टॉपवर / नाक्यावर जाऊन ऊभे राहिले तर काय वाईट ?
पुर्वी आमच्या कॉलनीत यायला अंधारा रस्ता होता. त्यावेळी एखाद्या व्यक्तीला उशीर होत असेल, तर घरची माणसे रस्त्यावर जाऊन थांबत असत. तसेच कुणी एकटा माणूस असेल, तर तो सोबत मिळेपर्यंत हायवेवरच थांबत असे.
ज्यांची कामाला जायची जागा निश्चित आहे त्यांनी यायच्या जायच्या वेळी गटाने आणि तेसुद्धा स्त्री आणि पुरुष अशा मिश्र गटाने शक्यतो प्रवास करावा. जर यायच्या जायच्या बस किंवा गाड्या ठराविक असतील, तर
सहप्रवाश्यांशी मैत्री करावी. एखादा सहप्रवासी नेहमीच्या वेळी दिसला नाही तर चौकशी करावी.

नीधप | 21 December, 2012 - 08:28
प्रतिकार करा हा उपाय व्यवहार्य नाही <<<
सतत शक्य नाही. हपिसला/ कॉलेजला जाताना, घरी परतताना... रोजचे रोज
एखाद्या दिवशी केला जातोच.
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.

Kiran.. | 21 December, 2012 - 08:50
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.
+
()महिला जागृतीसाठी अभियान निर्माण करणे : राज्य / राष्ट्रव्यापी अभियान आणि त्याच्या गाव/तालुका/जिल्हास्तरीय समित्या यातून कायमस्वरुपी जागृती घडवून आणणे. यात स्वयंसेवी संस्था / सरकारी संस्था / खाती यांचा समन्वय साधलेला असावा. कार्यकर्त्या निर्माण करून घराघरापर्यंत जागृतीचे अभियान न्यायला हवे.
* ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी परिसंवाद / वर्कशॉप्स राबविणे. माध्यमप्रतिनिधी / पोलीस / न्याययंत्रणा यांच्या प्रतिनिधींनाही सामान्यजनांबरोबर सहभागी करून घेतल्यास लोकांच्या अपेक्षा आणि प्रत्यक्षातल्या अडचणी याबद्दल देवाण घेवाण होऊ शकेल.
* महिलांविषयक गंभीर गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालयांची स्थापना व्हावी यासाठी पाठपुरावा करणे.

आहना | 21 December, 2012 - 08:46
१. पेपर स्प्रे बाळगणे>>> पेपर प्रे उपलब्ध नसल्यास पर्स मधे डिओड्रन्ट वापरा

उदय | 21 December, 2012 - 09:01
(अ) प्रसंगावधानता दाखवणे महत्वाचे आहे. १९९८, दिल्लीच्या DTC मधेच एका युवतीवर असाच प्रसंग आलेला होत, पाच लोकांशी सामना करत सुटका केली... पुढे कोर्टाने गुन्हेगारांना शिक्षाही दिल्यात.
थोडा कमी पणा आला तरी चालेल, पण 'पाच लोक' टवाळी करत आहेत, तर तेथे हुज्जत घालण्यापेक्षा सटकणे महत्वाचे. माघार घेण्यात कमीपणा कधिच नसतो...
युक्ती (थोडे डोक) आणि बळ असा समन्वय साधल्यास घटना कमी घडतील.
(ब) सर्वात महत्वाचे असे प्रसंग अगदीच अनोळखी लोकां कडुनच होतात हा गैरसमज काढुन टाकणे. बहुतेक प्रकारांत ओळखी किंवा नात्यामधिलच व्यक्ती असतात. वर अनेकांनी सुचवलेल्या उपायांत हा मुद्दा मला दिसला नाही म्हणुन लिहावेसे वाटले.
दर दिवशी जरी त्याच व्यक्तीसोबत प्रवास करत असाल किंवा कामा निमीत्त संपर्कात येत असलांत, तरी प्रत्येक क्षणी सतर्क राहुन "उद्देशांत काही बदल झालेला नाही आहे नां?" हे तपासायला हवे. दोन व्यक्ती एकाच ठिकाणि काम करत आहेत, कामा निमीत्त प्रवासाला सोबत जावे लागणार आहे... सावध आणि सतर्क रहाण्यात काहीच हरकत नाही.
(क) प्रसंगावधानता मधे गाड्यांना (मग ऑफिसची असेल किंवा सार्वजनिक वहान असेल) पारदर्षक काचा नसतील तर प्रवास करायला चक्क नकार द्यायचा. सार्वजनिक वहानांना कशासाठी हवेत टिंटेड काचा किंवा पडदे ?

प्रिया७ | 21 December, 2012 - 16:12
ब्राईट एलईडि फ्लॅश लाईट जो वेळ प्रसंगि कामी येतो सरळ डोळ्यात मारता येतो,सेफ्टि पिन,सेल फोन वर (९११) किंवा ईमर्जन्सि नंबर स्पीड डायल ला सेव्ह करुन ठेवणे, पेपर स्प्रे नसेल तर छोटि परफ्युम बाटलि सुद्धा वापरता येते, फेसबु़क वर कुठे जात असाल तर त्याची माहिति न टाकणे किंवा Laxmi (कसे लिहायचे मराठित) पुजन चे दागिन्यांसकट फोटो न टाकणे,कुठे एकटे असतांना कानात हेड्सेट घालुन ठेवु नये,गाडि चे रिमोट लॉक गाडिजवळ जावुनच उघडणे,गरज पडल्यास खोटे बोलणे,रात्रिच्या वेळि एकटे असाल तर कोणाला दया दाखवायच्या आधि/ मदत करायच्या आधि २-३ दा विचार करा .

मुंगेरीलाल | 23 December, 2012 - 00:51
एक साधा आणि परिणामकारक उपाय म्हणजे एक जोरदार, तीव्र आवाजाची शिट्टी (पर्समध्ये अथवा किचेन म्हणून) जवळ बाळगणे. कुठलाही गुन्हेगार (किंवा त्यांचा समूह) एका क्षणात दचकतो आणि तुम्हाला सुटका करून घेण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. शिवाय हे शस्त्र नसल्यामुळे जवळ ठेवण्याला कुठली परवानगीही लागत नाही आणि वापरायला कसलं कौशल्यही लागत नाही.

अश्विनीमामी | 23 December, 2012 - 03:12
एक गोष्ट मला लक्षात आली, मुली, स्त्रीया ऑफिसला जातात किंवा घरी उशीरा येतात. तर आपला हपीसचा मजला आणि ग्राउंड फ्लोअर, कँतिनचा फ्लोअर हेच सहसा माहीत असते. घरीही तेच. ग्रा. फ्लो आणि आपला मजला. व्यतिरिक्ग आपली बिल्डिंग कशी दिसते आपल्याला माहीत नसते. सवडीने, फुल प्रकाशाच्या दुपारी पूर्ण बिल्डिंग/ ऑफिस काँप्लेक्क्ष , खास करून पार्किंगची जागा ह्याची माहिती करून घ्यावी. नजर सरावलेली असावी. फोटो काढून जागांची माहिती करून घ्यावी. प्रत्येक जागी आडोसे, अंधार्‍या जागा, उंचावरून मुलीला फेकून देता येइल अश्या जागा विशेषतः पार्किंग मध्ये खूप आढळतील. त्या अवगत करून घ्याव्यात. मैत्रिणींना, घरच्यांना सांगावे बोलावे ह्याबाबत. बरेचदा पहाटे किंवा रात्री आपलीच बिल्डिंग अनोळखी भीती दायक जागा बनू शकते. अ‍ॅटॅकरला तेच हवे असते. तो तुमचा गैरफायदा घेण्यास पूर्ण समर्थ असतो. फोनवर इमर्जन्सी नंबर आधीच देऊन स्पीड डायल वर ठेवावा. आयत्यावेळी कोणाला फोन करावा असे व्हायला नको.
पोर्टेबल टेसर सारखे उपकरण पर्स मध्ये असावे. बॅटरी नक्की. मुली फ्लॅट मध्ये राहात असतील तर शक्य असल्यास एक कुत्रा नक्की पाळावा. हे मी विनोदाने आजिबात लिहीत नाही. त्यासारखे संरक्षण नाही.
पुरुषांना त्याची भीती नक्की वाट्ते.
बिनओळखीच्या पुरुष व स्त्रीयांशी आजिबात बोलू नये. लिफ्ट मध्ये खास करून.
वॉचमन ला पण आपल्या जाण्या येण्याच्या पॅटर्न ची माहीती फार देऊ नये. रिक्षा वाले टॅक्सीवाले कधे कधी फार बोलतात त्यांना उत्तेजन देऊ नये. इथे किती पटेल माहीत नाही पण शहरांमध्ये सर्विस इंडस्ट्री जसे वाहन चालक, वेटर, वॉचमन ऑफिसातील प्यून्स वगैरे बाहेरच्या राज्यातून आलेले एक्टे
पुरुष असतात. एकाच रूटीन कामात अडकलेले, जास्तीच्या तासांचे काम करून वैतागलेले असतात.
बायको गावी त्यामुळे ..... पण त्यांना आपली मानसिकता समजेल अश्या भ्रमात राहू नये. स्त्रीवाद वगैरे तर दूरची गोष्ट.

सुमेधाव्ही | 29 December, 2012 - 08:02

आमच्या ऑफिसमधे मध्यंतरी एसीपी पुणे यांचे भाषण झाले होते त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या खालीलप्रमाणे, (भाषण साधारणपणे हिंजवडी परिसरात काम करणार्‍या महिलांची सुरक्षा असा असल्यामुळे नयन पुजारी केसच्या संदर्भात होत्या पण त्या सगळ्यांनाच उपयोगी पडतील त्यामुळे आठवेल तसे लिहिते आहे.)

पुणे पोलीस, फोन नं फक्त १०० एवढाच नाहीये. १०० नं लक्षात रहाण्यासाठी उत्तम पण इथे काहीही+ सर्व कंप्लेंट्स येत असतात त्यामुळे हा नं दर वेळेस लागतोच असे नाही. त्यामुळे इतर नं पण माहीत हवेत. ते मोबाईलवर सेव्ह केलेलेही हवेत.
पोलीस कं रुम. १००, २६१२२०२, महिला/ बाल हेल्पलाईन - २६०५०१९१ क्राईम अ‍ॅलर्ट -२६११२२२.
हे नं दिवाळी किंवा कोणत्याही निमित्ताने शुभेच्छा संदेशाबरोबर एकमेकांना वारंवार समस करून पाठवले म्हणजे मग ते आपोआप सेव्ह होतात व सेव्हड रहातातही.
(वि.सु. पोलीसांशी बोलताना मराठी लोकांनी मराठीतच बोलावे, कारण पुण्यातले जवळपास सगळे पोलीस पुणे परिसरातले व मराठी बोलणारे आहेत. इंग्लीशला ते कधीकधी बिचकतात व मग संभाषण नीट होऊ शकत नाही.)
अनोळखी व्यक्तीकडे लिफ्ट मागु नये. सार्वजनीक वहान सगळ्यात सेफ.
काही जणींना कॅबमधून यावे लागते ती कॅब जरी कं ने पुरवली असेल तरी ती बाहेरील एजन्सीकडून आणलेली असते त्यामुळे सजग रहावेच लागते. कॅबमधे बसल्यावर "रोज"सगळ्यांना ऐकू जाईल अश्या आवाजात घरी एक फोन करायचा. त्या फोनमधे कॅबचा नं तुम्ही उच्चारुन अमुक अमुक कॅबमधून तुम्ही प्रवास करत आहात व आत्ताचे तुमचे लोकेशन सांगायचे व अजून कीती वेळ घरी पोचायला लागेल त्याचाही उल्लेख करायचा. (जर का मोबाईलमधे बॅलन्स नसेल, किंवा रेंज येत नसेल तरी हा फोन खोटा खोटा असायलाही हरकत नाही. तेवढे अ‍ॅक्टींग जमवायचे स्मित
"कायम" हो हो...कायम्...कधीही जोरात पळता येउ शकेल असेच बुट्/चपला/कपडे असावेत. म्हणजे उंच टाचांचे बुट वगैरे ऑफिसात किंवा ऑफिसच्या पार्टीजना जिथे तुम्ही एक्ट्या जाणार आहात तिथे नकोत.
आर्थिक व्यवहारांची, घरगुती भांडणे, भानगडींची चर्चा कॅबमधे नकोच. इथे रोज अ‍ॅलर्ट रहायला हवेच.
बरेचसे कॅब ड्रायव्हर हे युपी एमपी मधील खेड्यांमधून आलेले असतात जिथे बायका त्यांच्या दृष्टीसही फारश्या पडत नाहीत. त्यामुळे शहरातल्या कॉन्फिडन्ट, पैसे मिळवणार्‍या, स्वतःच्या मर्जीप्रमाणे खर्च करणार्‍या व स्वतंत्र विचारांच्या बायकांबद्दल त्यांना असुया वाटते. अनेकदा त्यांचा इगो दुखावल्यामुळे सुडापोटी पण बलात्कार केले जातात. त्यामुळे शक्यतो ह्या लोकांशी हुज्जत न घालणे, जेवढ्यास तेवढे बोलणे, जास्त माहीती शेअर होणार नाही हे पहाणे हे महत्वाचे. काही मुली कॅबमधे बसल्या की घरच्यांशी जे काही बोलतात त्यातून बरीच माहीती दुसर्‍याला मिळते आहे हे त्या विसरतात.
एटीएम मधे दर शुक्रवारी पैसे काढणे, एकाच एटीएम मधून पैसे काढणे असे करू नये...बदलत रहावे. थोड्क्यात म्ह़णजे प्रेडीक्टेबल राहू नये. बर्‍याच जणी जाता जाता २ मि. थांबायला सांगून एटीएम मधून पैसे काढतात.
एकटीदुकटी मुलगी/स्त्री रात्री कारमधून घरी परत जात असताना जर गाडी बंद पडली, तर आड रस्त्यावर असाल तर गाडीतून बाहेर पडण्यापेक्षा पोलीसांना फोन करावा. रात्री त्यांच्या मोबाईल व्हॅन्स हिंजवडी परिसरात गस्त घालतात. (त्यांचा सेल नं पण आहे) त्या दहा मिनिटात मदतीसाठी पोचू शकतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>इब्लीस

दुर्दैवी पोस्ट. तुम्ही वैयक्तिक का होत चालला आहात समजत नाही.<<<

प्रॉबेबली बिकॉज ही इज डूईंग हिज जॉब! ही हेट्स पीपल हू डोन्ट डू देअर जॉब्ज! Proud Light 1

स्वकर्तृत्वाबरोबर मला भगवंताची साथही आवश्यक वाटते. मात्र स्वतः हातपाय हलवले नाहीत तर भगवंतही साथ देणार नाही.
<<

ताई,

फक्त एक मानसिक आधार म्हणून भगवंत ओके आहेत. अनेक बोके भगवंतावर विसंबून रहायला शिकवतात, अन शिंक्यावरचं लोणी खात तुम्हा आम्हाला अधू बनवतात. त्या घटनेत तुम्ही स्वत: उलट बोललात. तिथे 'धावा' नाही केला. पैज लावून सांगतो त्या वेळी ते बापू तुम्हाला ठाऊकही नव्हते

(ता.क. माझी ऐपत फक्त साडेतीन रुपये इतकी पैज लावण्याची आहे. हरलो असेल तर सांगा, पैसे अकाऊंटला जमा करतो)

मला तेव्हा बापु माहित नव्हते पण माझा जन्म पुर्णपणे आस्तिकांच्या घरात झाला असल्याने सद्गुरुतत्व काय असतं ते नक्कीच माहित होतं. आणि त्यावर नितांत विश्वासही होता. हे संकट काहीच नाही इतक्या गोष्टी मी बापु माहित झाल्यावर न डगमगता पार केल्या आहेत (ज्या एरव्ही मला संपवून गेल्या असत्या) आणि हे मला ओळखणारे नास्तिकही कदाचित सांगू शकतील की मी त्यांच्यामुळेच उभी आहे. असो.. यापेक्षा पर्सनल गोष्टी मला बोलायच्या नाहीत त्यामुळे आपण हा विषय थांबवूया Happy

ही हेट्स पीपल हू डोन्ट डू देअर जॉब्ज!

मे बी ! तुम्ही कुठे कमी पडलात हे कदाचित त्यांना माहीत असेल. Sad मला नाही माहीत. इतरांचंही नाही. धन्यवाद.

हुश्श!
साडेतीन रुपये वाचले :घाम पुसणारा बाहुला:

तुमच्याविरोधी विषय कधीच नव्हता ताई. बापूंबद्दल म्हणणे आहे. वेगळ्या कॉण्टेक्स्ट मधे ओळख आहे Happy

विषय थांबलेला. )इब्लिस(

छेड छाडीचा ट्रेंड अमिताभ बच्चन च्या चित्रपटांपासुनच सुरु झाला ...

अजुनही चित्रपटांमधेच हे बदलण्याची ताकद आहे.

@ सुयोग

दुर्दैवाने चांगल्या गोष्टींचं अनुकरण होत नाही. वाईट गोष्टी चटकन आत्मसात केल्या जातात. हिंदी सिनेमात हिरो करतो तशी शेरेबाजी केली कि मुली पटतील या बिनडोक विचाराने छेडछाड करणारे असू शकतात. तसंच आपलं कुणी वाकडं करू शकत नाही हा इगो कुरवाळण्यात सुख मानणारे गुंड प्रवृत्तीचे लोकही त्या मानसिकतेतून छेडछाड करत असतात.

प्रमोद देव,

त्यापेक्षा बापू सगळ्या बलात्करांच्या मानसिकतेत परीवर्तन घडवण्याचा प्रयत्न का करत नाहीत ? .
आणि बापूंच्या दारी अशी पार्सिलिटी का बरे? की जी स्त्री त्यांचा जप करेल , त्यांच्यावर विश्वास ठेवेल तिलाच ते वाचवतील ? एखादीला बापू माहितही नसतील पण जर ते देवस्वरूप असतील तर त्यांनी जे त्यांचे भक्त नाहीत त्यांनाही मदत केली पाहिजे.

एखादीला बापू माहितही नसतील पण जर ते देवस्वरूप असतील तर त्यांनी जे त्यांचे भक्त नाहीत त्यांनाही मदत केली पाहिजे.>>> + १ डेलिया, हे फक्त उपासनांसाठी वेगळेपण आहे आणि ते देखिल रामरक्षा, गुरुचरित्र १४वा अध्याय, हनुमान चलिसा, मारुती स्तोत्र वगैरे गोष्टीबरोबर अ‍ॅडिशनल आहे.. ज्यांची त्यांच्यावर श्रद्धा नाही त्यांनी बापुंनी सांगितलेल्या उपासना करणे हे बापुंनाही अपेक्षित नाहिये. कुठल्याही धर्मातली व्यक्ती असली तरी त्यांना काही फरक पडत नाही. ज्यांना बापु माहित नाहीत त्यांच्यासाठी अध्यात्मिक बळ पुरवणार्‍या पुर्वापार चालत आलेल्या गोष्टी आहेतच की! आणि त्याही ज्याच्या त्याच्या भगवंतावरच्या श्रद्धेच्या प्रमाणात बळ पुरवतात, भर टाकत राहतातच, सहाय्य पुरवत राहतातच. ही पुर्वापार चालत आलेली साधना ऋग्वेदांमधुन किंवा पुढे होऊन गेलेल्या अधिकारी व्यक्तींनी सिद्ध केलेली असल्याने तिच्यात ते पुरवायची ताकद असतेच. सिद्ध करणार्‍याची ताकद आणि भगवंताच्या त्या रुपाचं फंक्शन असं काँबिनेशन असतं ते. ज्यांना साई माहित नाहीत पण स्वामी समर्थ माहित आहेत ते श्रद्धेने इतर गोष्टींबरोबर स्वामींचे नाव घेणारच पण त्याचा अर्थ असा होत नाही की त्यांच्यासाठी स्वामीच धावले आणि साई मख्खपणे द्वारकामाईत बसून राहिले. कारण जो साई तेच स्वामी आहेत. जो येशू, जो अल्लाह तोच राम आहे.

इव्हन, नास्तिकालाही त्याच्या आचार विचारांच्या शुद्धतेप्रमाणे हे बळ मिळत असतं... त्याने मानलं न मानलं तरी.

आता हे बास करुया नाहीतर इथे "स्त्रियांवरील अत्याचार" हा विषय बाजूला पडून वेगळेच रण सुरु होईल Happy

डेलिया, अहो मी फक्त 'आड'नावाचा देव आहे आणि मी पूर्णपणे नास्तिक आहे....जिथे देवावर माझा विश्वास नाही तिथे बाबा,बापू,महाराज वगैरे लोकांवर मी कसा विश्वास ठेवेन? त्यामुळे त्यांनी सुचवलेले हे असले उपाय मी कधीच कुणाला गंभीरपणे सूचवू शकत नाही हे आता आपल्या लक्षात आलंच असेल...नसेल तर अगदी स्पष्टपणे सांगतो की...मी ते इथे उपहासात्मक दृष्टीकोनातून लोकांच्या नजरेस आणून दिलं होतं.

काही लोकांकडून प्रत्येक गोष्टीचं कसं भांडवल केलं जातं त्याचा हा एक नमुना म्हणूनच ह्याकडे पाहावे इतकीच विनंती....खरोखरच ह्या तथाकथित अध्यात्म्यांकडे काही दिव्यशक्ती असत्या तर जगात इतका दूराचार कधीच माजला नसता..जिथे साक्षात देव(आस्तिकांच्या मते असतो म्हणून) हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहतोय/घडवतोय तिथे मर्त्य मानव काय करू शकणार? तरीही देवाचा हवाला देऊन काही भोंदू लोक सर्वसामान्यांना झुलवतात,गुंगवतात आणि सामान्यजनही त्यात सहजपणाने गुरफटला जातो...हे खरंच दूर्दैवी आहे.
असो, हा विषय खूप मोठा आहे आणि इथल्या विषयाशी संबंधितही नाहीये..तेव्हा इथेच थांबतो.

फाटा ~डोळे मिचकवा~ >>>>>> तुमच्यासारख्या निर्लज्जांकडुन हिच अपेक्षा आहे, स्वतः काडिचा प्रयत्न करणार नाहि दुसर्याला नावे ठेवण्यात पुढे.! तुम्च्यासारख्यांनी भारताची वाट लावली आहे.

पिडित मुलीचा मित्र जेव्हा हौस्पिटल मध्ये होता तेव्हा त्याला कोणी एक चादर देखील दिली नाहि. (IMA शेपुट घालुन दडुन बसले आहे आता) आता यात तर कोणतीहि कारणे देता येणार नाहित. पण डौक्टर आणी रुग्णालये याविषयी चांगले बोलण्यासारखे राहिलेले नाहि. निर्लज्ज ते निर्लज्जच! कधी सुधारणार नाहित! आमीरखानने तरी चांगली लाज काढली होती!

पण डौक्टर आणी रुग्णालये याविषयी चांगले बोलण्यासारखे राहिलेले नाहि. निर्लज्ज ते निर्लज्जच! कधी सुधारणार नाहित! >>> भारतीय, उडदामाजी काळे गोरे असणारच. काही डॉक्टर्स चुकीचं वागत असले म्हणून सगळ्यांना आपण वाईट म्हणू शकत नाही...म्हणू नये. डॉक्टर्सच कित्येकवेळा जीवदान देतात. मोठाल्या दुर्घटना होतात तेव्हा मोठ्या प्रमाणावर डॉक्टर्स नसतील तर काय होईल याचा नुसता विचार करुन पहा.

http://www.youtube.com/watch?v=kO04G6gLUEc&feature=youtu.be
काल जे वाचलंत त्याहीपेक्षा भारी आहे हे....हे पाहा आणि ऐका.
आता काय म्हणायचं?
एकजण बोलतोय आणि अनेकजण टाळ्या वाजवताहेत..
दुनिया झुकती है,झुकानेवाला चाहिये....हेच खरं.!
ह्यात दोष लोकांचाच आहे..सांगणारा काहीही सांगेल..पण लोक विश्वास कसे ठेवतात हेच समजत नाही.

सोहेलाची मुलाखत / लेख वाचला. धन्यवाद सिंडरेला.
जोवर स्त्रियांचे शोषण चालू आहे, त्यांना कमी - तुच्छ - हीन म्हणून लेखणे चालू आहे - त्यांच्याकडे उपभोगाची / मालकीची वस्तू म्हणून पाहणे चालू आहे - त्यांना माणूस / पशू पेक्षा हीन वागणूक देणे चालू आहे - त्यांच्या संदर्भातील कोणत्याही गुन्ह्याचे खापर त्यांच्याच माथी फोडणे चालू आहे तोवर बलात्कार होतच राहणार हे टळटळीत सत्य आहे. कधी दिल्लीतल्या एका अनोळखी मुलीवर तर कधी गल्लीतल्या ओळखीच्या मुलीवर. घराबाहेर पडण्यासाठीही स्त्रियांना काय काय दिव्ये सहन करावी लागतात, पार करावी लागतात... आणि घराबाहेर पडल्यावर त्यांचे शाब्दिक, शारीरिक लचके तोडले जातात - कुठवर चालणार हे सगळं?

सॉरी , प्रमोद देव मला वाटले तुम्ही तो प्रतिसाद सीरियसली लिहिला आहेत.
व्हीडिओ पाहिला. अशक्य आहे.

मला वाटते हे सगळे त्यांनी जाऊन आश्रमशाळात सांगावे, लगेच टेस्ट होऊ शकते.

कृपया गैरसमज नसावा. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.

207819_466536626717384_485946017_n.jpg

आज फेबुवर हे चित्र पाहिले. आणि जाणवले- कितीतरी वेळा बाईला गर्दीच्या ठिकाणी चालतांना आपल्या अंगाला काटे असते तर किती बरं झालं असतं असं वाटतं. ती भावनाच या चित्रातून दिसते (मलातरी).

तिन दिवसांनी या धाग्यावर आलो आहे. कृपया कृपया वाट नका लावू रे... या विषयावरही शिकलेले, सुविचारी मंडळी गंभिर होणार नसतील तर कधी? Sad

काल जे वाचलंत त्याहीपेक्षा भारी आहे हे....हे पाहा आणि ऐका.
आता काय म्हणायचं?
----- कुठल्याही भोंदू बाबावर विश्वास ठेवू नका. लोकां मधे अंधश्रद्धा पसरवणर्‍या या भोंदू बाबाला वेळ पडल्यास सरकारने त्वरित कायद्याच्या आधाराने आवर घालावा. Angry

काही भव्य दिव्यता असती तर मुंबई- बांद्रा- परळ मधे एकही बाँब फुटला नसता, कसाब प्रवृत्तींच्या हल्ल्यापासुन निरपराधी मुंबईकर वाचवले असते... असे काही झाले नाही कारण.

फाटा.>> निर्लज्ज ते निर्लज्जच! कधी सुधारणार नाहित!

कुठल्याही भोंदू बाबावर विश्वास ठेवू नका. लोकां मधे अंधश्रद्धा पसरवणर्‍या या भोंदू बाबाला वेळ पडल्यास सरकारने त्वरित कायद्याच्या आधाराने आवर घालावा +१

सगळेच्या सगळे पावरबाज बाबा, बापू, महाराज इत्यादी सगळ्या दुष्टांना किंवा दुष्ट प्रवृत्तीला एकदाचे नष्टच का नाही करून टाकत?
जप बिप करत बसा, विश्वास ठेवा असली मांडवली कशाला?
युट्यूबचा व्हिडिओ कमालीच्या पलिकडे संतापजनक आहे.
श्रद्धास्थाने दुखवायची नाहीत इत्यादी ठिके पण भोंदूपणाची लिमिट असते.

युट्यूबचा व्हिडिओ कमालीच्या पलिकडे संतापजनक आहे.
श्रद्धास्थाने दुखवायची नाहीत इत्यादी ठिके पण भोंदूपणाची लिमिट असते.
<<<
कहर आहे खरच !!
धन्य ते टाळ्या वाजवणारे..

खूप दिवसांपासून एकामागून एक धागे निघतायत. दिल्लीच्या घटनेमुळं सगळ्यांचीच सहानुभूती आहे. पण या निमित्ताने काहींनी अक्षरशः आपले दिवे पाजळलेत. काहींच्या प्रतिक्रिया वाचून तर पुरूषांबद्दलचा अमानुष तिरस्कार दिसून येतो. पुरुषांचे काही प्रॉब्लेमच नाहीत का ? काहीही होऊ द्या यांचं आपलं पुरुषांवर ठपका ठेवणं सुरूच आहे. हे असह्य होतंय. संयमाचा कडेलोट होतोय याचा विचार होईल का ? एखादीला लो वेस्ट जीन घालण्यावरून टोकलं तर ती पुरूषप्रधान संस्कृती ! अशी जीन कि जीन्स घालणं हा तिचा हक्क. बरं मग तिच्याकडे कुणी पाहीलं तरी दोषी पुरूषच. काय कारण आहे अशी जीन्स घालण्यामागे ? या प्रश्नाचं उत्तर हवंय. जे अपेक्षित आहे ते नाही घडलं तर मुलांच्या पौरुषत्वाला नावे ठेवणे, अपेक्षित आहे ते घडलं तर नजरच वाईट. अशा मुलीची छेडछाड झाली तर मग इतरांनी मधे पडायचं असं इथं एक जण सांगतोय. स्वतः किती छेडछाड रोखली ?
आम्ही स्पष्ट सांगतो आम्ही मार खायचा आणि द्यायचा असेल तर मुलींनी पण पथ्यं पाळली पाहीजेत. कमी कपड्यातली मुलगी दिसली तर आमच्या कपाळावर आठी पडणारच आहे. तिचा तो हक्क आहे ना ? मग तो हक्क बजावत बसा. आमचा जीव आमच्यावर अवलंबून असणा-या पोरीबाळी/लेकी सुनांसाठी अतिशय महत्वाचा आहे. सभ्यपणे पेहराव केलेला असतानाही छेडछाड झाली तर मात्र आम्ही एकशे एक टक्के त्याचा प्रतिकार करू. तिथे आम्ही आमच्या जिवाची पर्वा करणार नाही. आमच्याकडून या अपेक्षा करता, मग उगाच आव्हानात्मक कपडे घालून फिरणा-या परप्रांतीय पोरींच्या कानाखाली वाजवायचा अधिकारही आम्हाला हवा. हे नाहीच चालणार.

त्या एक बाई आपलं मत लिहीतात तर त्यांच्यावर सगळे तूटून पडतात. या सगळ्यात बहुमत पाहून लिहीणा-यांचा आणि स्वतःचं मत नसणा-यांचा संताप येतो. त्यापेक्षा या बायका परवडल्या. इथं यांची मेजॉरिटी असल्यानं एकमेकींना +१ देणं, आपल्याला न आवडणा-या मताचा कंपुशाही करून संमाचार घेणं, अपमान करणं यामुळं कुणी सभ्य पुरूष इथं लिहीत नाही. याचा अर्थ या मताच्या लोकांचा विजय झाला असा काढतात. बायकोच्या आईने दिवसातून पंचवीस पंचवीस फोन करणं यांना खटकत नाही. सासूने काही विचारल्याची तक्रार मात्र डोळ्यात खुपते. मुलाने बायकोच्या ताब्यातला बैल व्हावं असाच यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे. जे कुणी यांना +१ देत असतील ते प्रत्यक्षात तसे वागत असतील का ? असल्या दांभिक +१ मुळे यांना चेव येतो.

मग उगाच आव्हानात्मक कपडे घालून फिरणा-या परप्रांतीय पोरींच्या कानाखाली वाजवायचा अधिकारही आम्हाला हवा. हे नाहीच चालणार.
<<< कशासाठी कानाखाली वाजवणार म्हणॅ तुम्ही तिच्या ?
हे असले हिंसक विचार करणार्‍यांना स्वतःला सँडल खायची गरज आहे !

स्वतः कमी कपडे घालायचा अधिकार आहे म्हणून वाद घालायचे. हल्ली घालतातही. आणि गुन्हे घडले कि आम्ही जबाबदार ? हा कुठला न्याय ? आणि का म्हणून आम्ही यांच्यासाठी रस्त्यावर उतरायचं ? उत्तर द्या.

ही सँडल छेडछाड करणा-यांना का नाही वाजवत ?
<<< ड्रेसकोड वरून कानाखाली वाजवायची इच्छा व्यक्त करणारे हिंसक लोक हे छेड छाड करणार्‍यां पैकीच !

तुम्हाला प्रश्न तरी कळालाय का ? इथं जे उपदेशाचे डोस तमाम पुरूषांना देण्यात गुंग आहेत कि छेडछाड करणा-यांची धुलाई करा त्यांना हा प्रश्न आहे. छेडछाड ओढवून घेईल असे कपडे घालून फिरणा-यांसाठी आम्ही कुणाशी वैर घेणार नाही. तुमचे स्वातंत्र्य तुम्हाला लखलाभ. आम्हाला गृहीत धरू नका. आणि आम्हाला जबाबदार धरायचं असेल, कुठल्याही घटनेसाठी आम्हाला इथं झोडपण्यात येत असेल तर ज्यामुळे छेडछाडीला आमंत्रणच मिळतेय असे कपडे घातल्याबद्दल आम्हालाही कानाखाली वाजवायचा अधिकार असायला हवा तर आम्ही अशा टोळक्यांशी वैर घेऊ.

तर्कशुद्ध उत्तर द्या. उगाच ड्रेसकोड आणि फिड मधे आणू नका.

सगळे पुरूष वाईट असतात, बलात्कारी असतात असे दिवे लावणा-यांनी पुरूषांशी संबंध ठेवू नयेत. सर्व प्रकारे पुरूषांना बहिष्कृत करावे. काहीच्या काही स्टेटमेंट झालीत इथं गेला महिनाभर अस्वस्थतेत गेलाय या आरोपांमुळं.

तर्कशुद्ध उत्तर द्या. उगाच ड्रेसकोड आणि फिड मधे आणू नका.
<<
आं ?
ते तुम्हीच लिहिलय ते टिपिकल सो कॉल्ड प्रवोकिंग(!) ड्रेस कपडे-लो वेस्ट जीन्स आणि कमी कपडे घालणर्‍या परप्रांतीय मुली आणि त्यांना कानाखाली वाजवायची इच्छा इ..इ.
रस्त्यावर उतरा नाही तर नका उतरु.. त्याने काही फरक पडत नाही मुळात मेंटॅलिटी अशी असेल तर..

ते आमचं आम्ही ठरवू कुणासाठी उतरायचं ते. असल्या परप्रांतीय पोरींमुळं आमच्या पोरीबाळींना त्रास होत असेल तर का नाही जाब विचारायचा ? बिबवेवाडीत एका बिल्डींगमधे रात्रभर या पोरींचे पुरूषमित्र धिंगाणा घालत होते. नको ती पाकिटं सकाळी सापडायही. महिलांना लाजल्यासारखं व्ह्यायचं म्हणून विचारायला गेलं तर या पोरींनी कॉलेजातल्या मित्रांना सांगितलं. परप्रांतियांचा जमाव येऊन त्यांनी मारहाण केली. पोलीसांनी कारवाई केली तर आकसाने कारवाई करतात म्हणून गळे काढले.

आमच्या त्रासाच्या वेळॉ कुठे असता हो तुम्ही ? का ना वाजवायचं ? तुमची मेन्टॅलिटी चांगली आहे ना ? या घटनेचं काय उत्तर आहे ? कि त्या पोरींचा शनिवारवाड्यावर सत्कार करावा ?

मुली स्वतःच्या अंगावर हवे ते कपडे घालून फिरतात ना तुम्हाला घालायला कंपलसरी करत नाहीत. तिचं शरीर तिचा निर्णय. तुम्ही कोण? तुमचा संबंध काय?

चला जाऊ द्या. तुमची ती छापील उत्तरंच मिळणार. नाहीतर अशा घटनेच्या वेळी मिठाची गुळणीच धरून बसणार तुम्ही लोक. यांच्या या धिंगाण्यामुळं आमची मुलं बिघडायला नकोत हे मात्र एकशीक टक्के ! तुम्ही काहीही म्हणा. पर्वा नाही करत.

तिचं शरीर तिचा निर्णय. तुम्ही कोण? तुमचा संबंध काय?

आम्हीही तेच सांगतोय. उद्या काही घडलं तर आम्ही कोण आमचा संबंध काय हे नीट लक्षात ठेवा. इथं कुणी मदत करत नाही, छेडछाड रोखत नाही असे गळे काढू नयेत.

Pages