उकडलेल्या आवळ्यांचं लोणचं - मोहरी फेसून

Submitted by स्वाती_आंबोळे on 3 January, 2013 - 11:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आवळे
लाल मोहरी
लाल तिखट
मीठ
हिंग
हळद
साखर
लिंबूरस

क्रमवार पाककृती: 

१. आवळे अगदी थोडं पाणी घालून उकडून घ्यायचे.
(मी फ्रोझन वापरले म्हणून कुकरात एक शिट्टी काढली. ताजे घेतले तर दोन काढाव्या लागतील कदाचित.)
२. उकडलेल्या आवळ्यांतल्या बिया काढून टाकायच्या. त्यांच्या फोडी हातानेच सुट्या होतात.
३. आवळ्यांना सुटलेलं पाणी निथळून घ्यायचं.
४. त्याच पाण्यात लाल मोहरी फेसून घ्यायची. (म्हणजे मोहरी आधी मिक्सरमधे कोरडी दळून मग त्यात हे पाणी घालून पुन्हा एकदा फिरवायची/घुसळायची.)
५. तेल तापवून त्याला कढ आणायचा. गॅस बंद करून त्यात हिंग, हळद आणि लाल तिखट घालायचं.
६. आवळ्यांच्या फोडींत मीठ आणि आवडीनुसार साखर आणि लिंबूरस घालायचा. (आवळ्यांचा तुरट-आंबटपणा असतोच, त्यामुळे लिंबूरस नंतर चव बघून त्यानुसार घालावा.)
७. फोडणी जरा थंड झाली की आवळे आणि फेसलेली मोहरी एकत्र करून त्यावर ओतायची. मिश्रण नीट कालवून घ्यायचं.
८. बाटलीत भरून फ्रीजमधे ठेवायचं.
९. आवडत्या व्यक्तींना आधी कल्पना देऊन आणि फेसलेल्या मोहरीची रसभरीत वर्णनं करून पानात लोणचं वाढायचं.
नावडत्या व्यक्तींना आणि अन्य बेसावध बकर्‍यांना आधी अशी कल्पना द्यायची नाही. ते लोणच्याची चव घेत असतांना आपण पाणी किंवा कोणताही द्रव पदार्थ प्यायला सुरुवात करायची नाही.

वाढणी/प्रमाण: 
घरात असतील तितके नग.
अधिक टिपा: 

पाककृतीत प्रमाणं लिहिलेली नाहीत. सगळे जिन्नस आपल्या अंदाजाने आणि आवडीनुसार घ्यायचे.
अंदाज चुकला तर आवडच तशी आहे असं ठासून सांगायचं.
आवड इतरांशी जुळली नाही तर त्या इतरांकडे एक तुच्छ कटाक्ष टाकायचा. त्यावरून कोणी नाराज झालं तर दादचं नाव सांगायचं.
१० मिनिटं हा आवळे उकडून झाल्यानंतर लागणारा वेळ आहे. त्यावरून पाककृती लिहिणारीच्या अंदाज आणि आवडीबद्दल आडाखे बांधू नयेत.
लालऐवजी काळी मोहरी चालेल का वगैरे प्रश्न विचारू नयेत. आपले प्रयोग आपण करावेत आणि आपली आपण फळं भोगावीत.
यात आवडत असेल तर आलं किसून घालू शकता. पण आपले प्रयोग...इ. इ.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अधिक टिपा भारी आहेत Proud
मोहरी फेसण्याकरता पाणी घालायचं आहे त्यामुळे लोणचं लवकर खराब वगैरे होत नाही ना?

धन्यवाद स्वाती.
मागच्या आठवड्यातले आवळे किसून सुपारी करुन संपवले. आता या पाककृतीला धन्य करण्यात येईल Proud यात आलं अन ओली हळद घालून बघते. अन अनुभव इथे लिहिते.

मी खरे तर इथे कुठे आवळे मिळणार म्हणून क्लिक करणार नव्हते पण राहवले नाही. फ्रोजन आवळे वाचल्यावर आनंदाने मनातल्या मनात उडीच मारली. Happy

बाई, मला लाल मोहरी काही मिळाली नाहीच. तेव्हा घरात आहे तीच काळी मोहरी दळणार. चवीत फरक पडेल का त्याने?

सायो, काही फरक पडत नाही. फेस काळी मोहरी. तीही तितकीच चढते. Proud

आवळ्यांचं सबस्टीट्यूट टोमॅटिलोज होऊ शकेल का स्वाती? Proud

आवडत्या व्यक्तींना आधी कल्पना देऊन आणि फेसलेल्या मोहरीची रसभरीत वर्णनं करून पानात लोणचं वाढायचं.
नावडत्या व्यक्तींना आणि अन्य बेसावध बकर्‍यांना आधी अशी कल्पना द्यायची नाही. ते लोणच्याची चव घेत असतांना आपण पाणी किंवा कोणताही द्रव पदार्थ प्यायला सुरुवात करायची नाही. >>> भारी स्टेप आहे आहे Lol

<<आवड इतरांशी जुळली नाही तर या वेळी अंदाज चुकला म्हणायचं>>.. आपण आपलं काही चुकलं असं म्हणायचंच नाही मुळी.
तुमची आवड वेग्ळीच दिसतेय हं... (धडाम!) Proud
"माझा स्वयंपाक खाणार्‍याच्या नशिबासारखा" असं छान फळकुटावर छान कोरून घे आणि लावून टाक स्वयंपाकघरात... इति माझ्या सासूबाई. माझा आदर्श आहेत त्या (सद्गदीत झालेली बाहुली)

आणि आज कळलं त्या लाल मोहर्‍यांचं काय करायचं ते.

सायो, हवाबंद बरणीत/ झाकण घट्टं असलेल्या बरणीत ठेवलं तर बाहेर १५-२० दिवस तरी टिकतच टिकतं (हा अनुभव आहे.)

Lol
रेसिपी भारी आणि टिपा फारच भारी.
>>तुमची आवड वेग्ळीच दिसतेय हं... Lol
>> "माझा स्वयंपाक खाणार्‍याच्या नशिबासारखा" Rofl

स्वाती, तुझ्या उकडलेल्या आवळ्याच्या मोहरी(लाल) फेसून मध्ये आवळ्याच्या नी लाल मोहरीच्या रिप्लेसमेंट शोधून झाल्या असतील तर नविन पा कृ ऐक. Happy
उकडण्याला तळण्याने रिप्लेस कर. आवळे लहान कढईत थोड्या तेलात चांगले तळून घ्यायचे. मग आवळे थंड करून बारीक तुकडे करायचे . बाकि सगळं जवळपास सेम. फोडणीला हेच उरलेलं तेल.
भन्नाट लागतं.

धन्यवाद, साती.

अवांतर :
आवळ्याच्या लोणच्याच्या आणखी दोन पाककृती इथे आणि इथे आहेत.

सिमंतिनी, तुम्ही म्हणता तशी मिरच्यांची रेसिपी इथे आहे.

रेसीपी वाचली तेंव्हा, फ्रीझर मध्ये आवळे आहेत ते आठवलं आणि मग ......
amlapickle.jpg
मी,घरचीच काळी मोहरी वापरली. आजीबात कडसर झालं नैय्ये. फार भारी झालयं. फोडणी गार होईपर्यंत सुद्धा दम निघाला नाही Proud

नावडत्या व्यक्तींना आणि अन्य बेसावध बकर्‍यांना आधी अशी कल्पना द्यायची नाही. ते लोणच्याची चव घेत असतांना आपण पाणी किंवा कोणताही द्रव पदार्थ प्यायला सुरुवात करायची नाही. >>>>> हे मस्तए...... लोणचं खायला केव्हा मिळेल ते माहित नाही - पण हे फारच आवडलं.........
झकास.......

Pages