महिलांनि स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे?

Submitted by प्रिया७ on 18 December, 2012 - 11:06

गेले २ दिवस दिल्लीच्या रेपची माहिति वाचण्यात येत आहे. आजकाल बर्‍याच कारणाने महिलांना उशिरा पर्यंत घराबाहेर राहावे लागते. किंवा बाहेरगावी सुद्धा एकटे रहावे लागते. काहि सिंगल पेरेंट सुद्धा आहेत. अशा वेळी एकटे राहाणार्‍यानी घरि आणि घराबाहेर काय खबर्दारी घ्यावी? असा धागा असेल तर हा उडवुन टाकेन.

कवठीचाफा | 26 December, 2012 - 10:14
साडेतीन-चारवर्षे सेल्फ डिफेन्स अ‍ॅकेडमी नावाच्या संस्थेसोबत लहान काळाची शिबीरं झाली त्यात ज्या गोष्टींचे ट्रेनिंग दिले त्यातल्या महत्वाच्या गोष्टी. केवळ स्त्रियाच नाही पुरूषांनाही उपयोगी पडू शकतील अश्या.
१ ) कधीही समोरच्या व्यक्ती एकापेक्षा जास्त असतील तर प्रतिकारापेक्षा माघार घेणं उपयुक्त अर्थात याचा अर्थ थेट पळायला सुरूवात करणं असा नाही, यात तुम्ही दमाल आणि आयतेच हाती सापडाल.
२ ) सर्वात आधी परिस्थिती/वातावरणाचं बारकाईनं निरीक्षण करत रहायला हवं अनेकदा संभाव्य धोका लक्षात येतोच.
३ ) समोरच्या व्यक्तींमधल्या म्होरक्या किंवा लिडरकडे आधी लक्ष द्या, (काही सेकंदातच तो लक्षात येतो ) आपलं पहिलं लक्ष्य त्यालाच करा. आता कसं ? ते पुढे
४) पायात जर हिल्स असतील तर त्यांचा आघात गुडघ्याच्या बाजूच्या भागावर करा, लक्षात घ्या संवेदनशील भागावर हल्ला होणार या तयारीत समोरची व्यक्ती असते तीथे प्रहार वाया जाईल. गुडघ्याचा बाजूचा भाग हा देखील विक पॉइंटच असतो तिथला मार सहन होत तर नाहीच पण त्यानंतर काहीकाळ पायही टेकता येत नाही.
५ ) डोळे हा अतिमहत्वाचा भाग त्याला लक्ष्य करा
६ ) पेन, डोक्यातली क्लिप ही उपयुक्त हत्यारं आहेत त्यांचा वापर करा, यांच्यासाठी हाताचा कोपराजवळचा भाग, तळहाताचा मागचा भाग, कान, त्याच्या मागच्या सॉफ्ट टिश्युज यांना लक्ष्य करा
७ ) पाठीमागुन पकड घातल्यावर ताबडतोब हताश होऊ नका ( सामान्यपणे इथेच आपण गडबडतो ) पायाच्या टाचेचा आघात मागच्या व्यक्तीच्या पायाच्या नडगीवर करा आथवा हातातला पेन, पीन मागच्या व्यक्तीच्या कानाच्या आसपास मारा.
८ ) दातांचा वापर करा मात्र हात किंवा दंड यांच्या बाबत माणूस सहनशील असू शकतो, त्यांचा वापर कान आथवा मानेवर करा.
९ ) दगड हे उत्तम शस्त्र आहे, अंतर मिळालं तर हमखास वापर करा
१० ) हे सगळं करण्यासाठी, मनात बेडरता आणि क्रूरता येण्याची गरज आहे त्याचसोबत सवयही लागण्याची गरज आहे. शक्य झाल्यास कुणीतरी पार्टनर घेऊन नॉनफेटल प्रॅक्टीस करा.
११ ) प्रतिकार करायचाच आहे याची खूणगाठ बांधून शरीर शिथील ठेवण्याची सवय करून घ्या.

उदयन.. | 18 December, 2012 - 22:15
चोरटे स्पर्श, नको तिथे चिमटे यांकडे दुर्लक्ष करा. आठवड्यातून तीन वेळा तुम्ही कुर्ला दादर अश्या ठिकाणी एकटीच नेहमी मारामारी करत बसू शकत नाही. >>>>>>>>>> इथेच चुकतात तुम्ही......एक ब्लेड नाहीतर लहानसा धारधार चाकु ठेवा..... असे काही झाल्यास लगेच मारा.......तेही जोरात.... परत कुणाला हात लावणार नाही

सामोपचार | 18 December, 2012 - 22:17
उदयनजींना अनुमोदन.......हल्ली लहान नेलकटरसारखी अवजारे असतात ती जवळ ठेवावीत. पटकन काढून भोसकायला बरी पडतात.

स्मितू | 18 December, 2012 - 22:57
मी उदय च्या मताशी सहमत आहे.... ...ट्रेन मध्ये... बसमध्ये प्रवास करतांना महिलांना ,मुलींना आश्या बर्‍याच प्रसंगांना तोंड द्यावे लागते आश्या वेळेस मुलींनी.... आपल्या जवळच्या सेफ्टी पिन चा वापर करावा.... पुरुषाच्या घाणेरड्या हालचाली लक्षात आल्या की लगेच बारिक पिन टोचायची...बरोबर चुपचाप बसतो तो.... ब्लेड, चाकु हे हत्यार जरा जास्तच होते..
शक्य्तोवर रात्रीचा प्रवास एकटीने टाळावाच... खुपच अर्जंट असेल तर सोबत कोणाला तरी घ्यावे...

mansmi18 | 19 December, 2012 - 03:12
पेपर स्प्रे मधे पेपरच असायला हवा का? हौ अबाउट सल्फ्युरिक अ‍ॅसिड?
असे काही चाळे करणार्‍यावर महिलानी अ‍ॅसिड का टाकु नये? एक दोन लोकाना या अ‍ॅसिडचा प्रसाद मिळाला की पुढे अशी काही विकृत इच्छा असणारे पुरुष असे काही करण्याआधी शंभर वेळा विचार करतील.

swanand_ml | 19 December, 2012 - 16:42
मला तात्वीक चर्चेत रस नसल्याने फारसे प्रतीसाद न वाचता प्रतिसाद देत आहे तरी माफी असावी.
महिलांसाठी स्वसंरक्शणावर दोन शब्द लिहु इच्छीतो.
ज्याला जगायचे आहे त्याला झगडावे लागेलच.
महिलांनी शस्त्र बालगण्यावर येथे चर्चा झाली. मला स्वताला ह्या दोन गोष्टी आवडतातः
http://en.wikipedia.org/wiki/Karambit
http://en.wikipedia.org/wiki/Push_dagger
लपवीण्यासाठी सोपे, हाताळण्यासाठी सोपे व हिसकावून घेण्यास अवघड. इंटरनेट वर उपलब्ध.
केवळ शस्त्र आहे हे पुरेसे नसते. ते हाताळन्याची व वापरण्याची मानसीकता असणे गरजेचे असते. त्यासाठी प्रशीक्शण गरजेचे आहे.
बंगळुर वासी येथे जवु शकतातः
http://kravmagabangalore.in/
मुम्बई: http://www.kravmagaindia.in/locations/mumbai
दिल्ली: http://www.kravmagaindia.in/locations/delhi
वरील प्रशिक्शण केंद्रे शस्त्रप्रशिक्शणाची नसून संरक्शण प्रशिक्शण केन्द्रे आहेत ह्यची नोन्द घ्यावी.
बहुत काय लिहणे. आपण सुज्ञ असा.

दिनेशदा | 21 December, 2012 - 05:52
मीही जसे सुचेल तसे लिहित जातोच. एकटे घराबाहेर पडल्यावर, जर कुठल्याही असुरक्षित भागातून जात असू तर अगदी नियमित रित्या घरच्या व्यक्तीला किंवा सहकारी व्यक्तीला फोन करुन आपला खरा ठावठिकाणा कळवत राहणे हा एक उपाय सुचतो मला.
संध्याकाळच्या वेळी आपल्या परिसरातील कुठलाही भाग एकाकी राहणार नाही, याची काळजी. घरी असणार्‍या किंवा जेष्ठ व्यक्तीनी घेतली तरी चालेल. अशा भागात गटाने ऊभे राहून चर्चा करावी, जाग राखावी.
घरीच कंटाळत कण्हत राहण्यापेक्षा. बसस्टॉपवर / नाक्यावर जाऊन ऊभे राहिले तर काय वाईट ?
पुर्वी आमच्या कॉलनीत यायला अंधारा रस्ता होता. त्यावेळी एखाद्या व्यक्तीला उशीर होत असेल, तर घरची माणसे रस्त्यावर जाऊन थांबत असत. तसेच कुणी एकटा माणूस असेल, तर तो सोबत मिळेपर्यंत हायवेवरच थांबत असे.
ज्यांची कामाला जायची जागा निश्चित आहे त्यांनी यायच्या जायच्या वेळी गटाने आणि तेसुद्धा स्त्री आणि पुरुष अशा मिश्र गटाने शक्यतो प्रवास करावा. जर यायच्या जायच्या बस किंवा गाड्या ठराविक असतील, तर
सहप्रवाश्यांशी मैत्री करावी. एखादा सहप्रवासी नेहमीच्या वेळी दिसला नाही तर चौकशी करावी.

नीधप | 21 December, 2012 - 08:28
प्रतिकार करा हा उपाय व्यवहार्य नाही <<<
सतत शक्य नाही. हपिसला/ कॉलेजला जाताना, घरी परतताना... रोजचे रोज
एखाद्या दिवशी केला जातोच.
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.

Kiran.. | 21 December, 2012 - 08:50
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.
+
()महिला जागृतीसाठी अभियान निर्माण करणे : राज्य / राष्ट्रव्यापी अभियान आणि त्याच्या गाव/तालुका/जिल्हास्तरीय समित्या यातून कायमस्वरुपी जागृती घडवून आणणे. यात स्वयंसेवी संस्था / सरकारी संस्था / खाती यांचा समन्वय साधलेला असावा. कार्यकर्त्या निर्माण करून घराघरापर्यंत जागृतीचे अभियान न्यायला हवे.
* ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी परिसंवाद / वर्कशॉप्स राबविणे. माध्यमप्रतिनिधी / पोलीस / न्याययंत्रणा यांच्या प्रतिनिधींनाही सामान्यजनांबरोबर सहभागी करून घेतल्यास लोकांच्या अपेक्षा आणि प्रत्यक्षातल्या अडचणी याबद्दल देवाण घेवाण होऊ शकेल.
* महिलांविषयक गंभीर गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालयांची स्थापना व्हावी यासाठी पाठपुरावा करणे.

आहना | 21 December, 2012 - 08:46
१. पेपर स्प्रे बाळगणे>>> पेपर प्रे उपलब्ध नसल्यास पर्स मधे डिओड्रन्ट वापरा

उदय | 21 December, 2012 - 09:01
(अ) प्रसंगावधानता दाखवणे महत्वाचे आहे. १९९८, दिल्लीच्या DTC मधेच एका युवतीवर असाच प्रसंग आलेला होत, पाच लोकांशी सामना करत सुटका केली... पुढे कोर्टाने गुन्हेगारांना शिक्षाही दिल्यात.
थोडा कमी पणा आला तरी चालेल, पण 'पाच लोक' टवाळी करत आहेत, तर तेथे हुज्जत घालण्यापेक्षा सटकणे महत्वाचे. माघार घेण्यात कमीपणा कधिच नसतो...
युक्ती (थोडे डोक) आणि बळ असा समन्वय साधल्यास घटना कमी घडतील.
(ब) सर्वात महत्वाचे असे प्रसंग अगदीच अनोळखी लोकां कडुनच होतात हा गैरसमज काढुन टाकणे. बहुतेक प्रकारांत ओळखी किंवा नात्यामधिलच व्यक्ती असतात. वर अनेकांनी सुचवलेल्या उपायांत हा मुद्दा मला दिसला नाही म्हणुन लिहावेसे वाटले.
दर दिवशी जरी त्याच व्यक्तीसोबत प्रवास करत असाल किंवा कामा निमीत्त संपर्कात येत असलांत, तरी प्रत्येक क्षणी सतर्क राहुन "उद्देशांत काही बदल झालेला नाही आहे नां?" हे तपासायला हवे. दोन व्यक्ती एकाच ठिकाणि काम करत आहेत, कामा निमीत्त प्रवासाला सोबत जावे लागणार आहे... सावध आणि सतर्क रहाण्यात काहीच हरकत नाही.
(क) प्रसंगावधानता मधे गाड्यांना (मग ऑफिसची असेल किंवा सार्वजनिक वहान असेल) पारदर्षक काचा नसतील तर प्रवास करायला चक्क नकार द्यायचा. सार्वजनिक वहानांना कशासाठी हवेत टिंटेड काचा किंवा पडदे ?

प्रिया७ | 21 December, 2012 - 16:12
ब्राईट एलईडि फ्लॅश लाईट जो वेळ प्रसंगि कामी येतो सरळ डोळ्यात मारता येतो,सेफ्टि पिन,सेल फोन वर (९११) किंवा ईमर्जन्सि नंबर स्पीड डायल ला सेव्ह करुन ठेवणे, पेपर स्प्रे नसेल तर छोटि परफ्युम बाटलि सुद्धा वापरता येते, फेसबु़क वर कुठे जात असाल तर त्याची माहिति न टाकणे किंवा Laxmi (कसे लिहायचे मराठित) पुजन चे दागिन्यांसकट फोटो न टाकणे,कुठे एकटे असतांना कानात हेड्सेट घालुन ठेवु नये,गाडि चे रिमोट लॉक गाडिजवळ जावुनच उघडणे,गरज पडल्यास खोटे बोलणे,रात्रिच्या वेळि एकटे असाल तर कोणाला दया दाखवायच्या आधि/ मदत करायच्या आधि २-३ दा विचार करा .

मुंगेरीलाल | 23 December, 2012 - 00:51
एक साधा आणि परिणामकारक उपाय म्हणजे एक जोरदार, तीव्र आवाजाची शिट्टी (पर्समध्ये अथवा किचेन म्हणून) जवळ बाळगणे. कुठलाही गुन्हेगार (किंवा त्यांचा समूह) एका क्षणात दचकतो आणि तुम्हाला सुटका करून घेण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. शिवाय हे शस्त्र नसल्यामुळे जवळ ठेवण्याला कुठली परवानगीही लागत नाही आणि वापरायला कसलं कौशल्यही लागत नाही.

अश्विनीमामी | 23 December, 2012 - 03:12
एक गोष्ट मला लक्षात आली, मुली, स्त्रीया ऑफिसला जातात किंवा घरी उशीरा येतात. तर आपला हपीसचा मजला आणि ग्राउंड फ्लोअर, कँतिनचा फ्लोअर हेच सहसा माहीत असते. घरीही तेच. ग्रा. फ्लो आणि आपला मजला. व्यतिरिक्ग आपली बिल्डिंग कशी दिसते आपल्याला माहीत नसते. सवडीने, फुल प्रकाशाच्या दुपारी पूर्ण बिल्डिंग/ ऑफिस काँप्लेक्क्ष , खास करून पार्किंगची जागा ह्याची माहिती करून घ्यावी. नजर सरावलेली असावी. फोटो काढून जागांची माहिती करून घ्यावी. प्रत्येक जागी आडोसे, अंधार्‍या जागा, उंचावरून मुलीला फेकून देता येइल अश्या जागा विशेषतः पार्किंग मध्ये खूप आढळतील. त्या अवगत करून घ्याव्यात. मैत्रिणींना, घरच्यांना सांगावे बोलावे ह्याबाबत. बरेचदा पहाटे किंवा रात्री आपलीच बिल्डिंग अनोळखी भीती दायक जागा बनू शकते. अ‍ॅटॅकरला तेच हवे असते. तो तुमचा गैरफायदा घेण्यास पूर्ण समर्थ असतो. फोनवर इमर्जन्सी नंबर आधीच देऊन स्पीड डायल वर ठेवावा. आयत्यावेळी कोणाला फोन करावा असे व्हायला नको.
पोर्टेबल टेसर सारखे उपकरण पर्स मध्ये असावे. बॅटरी नक्की. मुली फ्लॅट मध्ये राहात असतील तर शक्य असल्यास एक कुत्रा नक्की पाळावा. हे मी विनोदाने आजिबात लिहीत नाही. त्यासारखे संरक्षण नाही.
पुरुषांना त्याची भीती नक्की वाट्ते.
बिनओळखीच्या पुरुष व स्त्रीयांशी आजिबात बोलू नये. लिफ्ट मध्ये खास करून.
वॉचमन ला पण आपल्या जाण्या येण्याच्या पॅटर्न ची माहीती फार देऊ नये. रिक्षा वाले टॅक्सीवाले कधे कधी फार बोलतात त्यांना उत्तेजन देऊ नये. इथे किती पटेल माहीत नाही पण शहरांमध्ये सर्विस इंडस्ट्री जसे वाहन चालक, वेटर, वॉचमन ऑफिसातील प्यून्स वगैरे बाहेरच्या राज्यातून आलेले एक्टे
पुरुष असतात. एकाच रूटीन कामात अडकलेले, जास्तीच्या तासांचे काम करून वैतागलेले असतात.
बायको गावी त्यामुळे ..... पण त्यांना आपली मानसिकता समजेल अश्या भ्रमात राहू नये. स्त्रीवाद वगैरे तर दूरची गोष्ट.

सुमेधाव्ही | 29 December, 2012 - 08:02

आमच्या ऑफिसमधे मध्यंतरी एसीपी पुणे यांचे भाषण झाले होते त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या खालीलप्रमाणे, (भाषण साधारणपणे हिंजवडी परिसरात काम करणार्‍या महिलांची सुरक्षा असा असल्यामुळे नयन पुजारी केसच्या संदर्भात होत्या पण त्या सगळ्यांनाच उपयोगी पडतील त्यामुळे आठवेल तसे लिहिते आहे.)

पुणे पोलीस, फोन नं फक्त १०० एवढाच नाहीये. १०० नं लक्षात रहाण्यासाठी उत्तम पण इथे काहीही+ सर्व कंप्लेंट्स येत असतात त्यामुळे हा नं दर वेळेस लागतोच असे नाही. त्यामुळे इतर नं पण माहीत हवेत. ते मोबाईलवर सेव्ह केलेलेही हवेत.
पोलीस कं रुम. १००, २६१२२०२, महिला/ बाल हेल्पलाईन - २६०५०१९१ क्राईम अ‍ॅलर्ट -२६११२२२.
हे नं दिवाळी किंवा कोणत्याही निमित्ताने शुभेच्छा संदेशाबरोबर एकमेकांना वारंवार समस करून पाठवले म्हणजे मग ते आपोआप सेव्ह होतात व सेव्हड रहातातही.
(वि.सु. पोलीसांशी बोलताना मराठी लोकांनी मराठीतच बोलावे, कारण पुण्यातले जवळपास सगळे पोलीस पुणे परिसरातले व मराठी बोलणारे आहेत. इंग्लीशला ते कधीकधी बिचकतात व मग संभाषण नीट होऊ शकत नाही.)
अनोळखी व्यक्तीकडे लिफ्ट मागु नये. सार्वजनीक वहान सगळ्यात सेफ.
काही जणींना कॅबमधून यावे लागते ती कॅब जरी कं ने पुरवली असेल तरी ती बाहेरील एजन्सीकडून आणलेली असते त्यामुळे सजग रहावेच लागते. कॅबमधे बसल्यावर "रोज"सगळ्यांना ऐकू जाईल अश्या आवाजात घरी एक फोन करायचा. त्या फोनमधे कॅबचा नं तुम्ही उच्चारुन अमुक अमुक कॅबमधून तुम्ही प्रवास करत आहात व आत्ताचे तुमचे लोकेशन सांगायचे व अजून कीती वेळ घरी पोचायला लागेल त्याचाही उल्लेख करायचा. (जर का मोबाईलमधे बॅलन्स नसेल, किंवा रेंज येत नसेल तरी हा फोन खोटा खोटा असायलाही हरकत नाही. तेवढे अ‍ॅक्टींग जमवायचे स्मित
"कायम" हो हो...कायम्...कधीही जोरात पळता येउ शकेल असेच बुट्/चपला/कपडे असावेत. म्हणजे उंच टाचांचे बुट वगैरे ऑफिसात किंवा ऑफिसच्या पार्टीजना जिथे तुम्ही एक्ट्या जाणार आहात तिथे नकोत.
आर्थिक व्यवहारांची, घरगुती भांडणे, भानगडींची चर्चा कॅबमधे नकोच. इथे रोज अ‍ॅलर्ट रहायला हवेच.
बरेचसे कॅब ड्रायव्हर हे युपी एमपी मधील खेड्यांमधून आलेले असतात जिथे बायका त्यांच्या दृष्टीसही फारश्या पडत नाहीत. त्यामुळे शहरातल्या कॉन्फिडन्ट, पैसे मिळवणार्‍या, स्वतःच्या मर्जीप्रमाणे खर्च करणार्‍या व स्वतंत्र विचारांच्या बायकांबद्दल त्यांना असुया वाटते. अनेकदा त्यांचा इगो दुखावल्यामुळे सुडापोटी पण बलात्कार केले जातात. त्यामुळे शक्यतो ह्या लोकांशी हुज्जत न घालणे, जेवढ्यास तेवढे बोलणे, जास्त माहीती शेअर होणार नाही हे पहाणे हे महत्वाचे. काही मुली कॅबमधे बसल्या की घरच्यांशी जे काही बोलतात त्यातून बरीच माहीती दुसर्‍याला मिळते आहे हे त्या विसरतात.
एटीएम मधे दर शुक्रवारी पैसे काढणे, एकाच एटीएम मधून पैसे काढणे असे करू नये...बदलत रहावे. थोड्क्यात म्ह़णजे प्रेडीक्टेबल राहू नये. बर्‍याच जणी जाता जाता २ मि. थांबायला सांगून एटीएम मधून पैसे काढतात.
एकटीदुकटी मुलगी/स्त्री रात्री कारमधून घरी परत जात असताना जर गाडी बंद पडली, तर आड रस्त्यावर असाल तर गाडीतून बाहेर पडण्यापेक्षा पोलीसांना फोन करावा. रात्री त्यांच्या मोबाईल व्हॅन्स हिंजवडी परिसरात गस्त घालतात. (त्यांचा सेल नं पण आहे) त्या दहा मिनिटात मदतीसाठी पोचू शकतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

अमानत/ निर्भया हिची तब्येत अजूनच खालावली आहे <<
तिचं नाव कसं काय डिक्लेअर केलंय? आपल्याकडे बलात्कारीत व्यक्ती जिवंत असेल तर तिचे नाव जाहीर करायला प्रसारमाध्यमांना बंदी आहे ना?
की हे तात्पुरते वापरले जाणारे नाव आहे?

.

तिचे नाव जरी माहीत असते तरी मी इथे लिहीले नसते. <<
याचा इथे काय संबंध? मी याबाबतीत काहीही म्हणलेले नाही.

सर्व स्त्रीयांनी आपापल्या घरातल्या अयोग्य मानसिकतेला बदलण्याचा प्रयत्न करावा. दुर्बलांवर होणारे अत्याचार शिक्षण, विचार, शक्ती आणि कायद्याने थांबवता येतात हे या देशाने सिध्द केले आहे. कोणत्याही एका गोष्टीने हे घडू शकत नाही. आपण मुलगा पोलीस व्हावा यासाठी खूप धडपड करू, त्याला काजू बदाम खायला घालून हट्टा कट्टा बनवू पण सदैव न्यायाच्या नैतिकतेच्या बाजूनेच उभा राहण्याचा संस्कार देण्याची गरज लक्षात घेत नाही. अन्याय करणारा या देशातल्या कुठल्यातरी गावात जन्मलेला, आईचा मुलगा, बहिणीचा भाऊ, बायकोचा नवरा आहे. अर्थात यापैकी कुणिही त्याला अन्याय कर असे शिकवले नाही. पण त्याच्या हातून तसे घडणारच नाही यासाठी करायचे प्रयत्न राहून गेले. या प्रश्नाचे उत्तर आपल्याच घरातून सुरू होते. संस्कृतीने दिलेले निर्बंधही नकोत आणि रस्ता सोडून चालताना काटा रुतला की या देशात रस्ते सुरक्षीत राहिलेच नाहीत अशी ओरड करणे गैर आहे. निर्बंध म्हणजे मला व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला वगैरे म्हणायचे नाही. मुक्त असणे आणि स्वैर असणे यातला फरक निर्देशीत करायचा आहे. मोठ्यांचा आदर, त्यांच्याशी संवाद, घरातले वातावरण, शैक्षणिक आर्थिक सुबत्ता याने हे प्रश्न नक्की सुटतील.

कवठी चाफा धन्यवाद ! खूप छान पोष्ट......हे सर्व करता येण्यासाठी मानसिक धैर्य आवश्यक.ते असेल तर पहिल्या फट्क्यातच समोरचा गारद होतो.या लोकांकडे शारिरीक ताकद असली तरी moral strength नसते. मानसिक जोर त्यांना समोरच्या माणसाच्या दुर्बल मानसिकतेतून मिळते.समोरचा हिंमतवाला आहे हे लक्षात आल्यावर (हे काम नुसते डोळेही करतात कधीकधी) त्या माणसाचा दम बराच कमी होतो. बलात्कारच नव्हे तर चोर-गुंडावरही ही मात्रा लागू पडते बरेचवेळेला.

सदसदविवेकबुद्धी ला खतपाणी घालणे, व्हॅल्यूज बिल्ड करणं हे काजू बदाम खाऊ घालून हट्ट कट्ट करण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं.

थोडा अवांतर होईल....पण माझ्या आजीचा एक अनुभव आहे या संर्दभात.....

जक्कल-सुतारांनी पुण्यात चांगलीच दहशत बसवली होती. रात्री दहा वाजता आजी (वाड्यातल्या) घरात एकटीच होती.आजोबा- संघाचे शारिरीक प्रमुख- कुठ्ल्याशा बैठ्कीला गेलेले. एक माणूस घरात आला (दाराला कडी नव्हती), आजोबांची चौकशी करू लागला. चांगला धट्टाकट्टा होता. हातात काठी.आजोबा घरात नाहीत सांगितले तरी ते येतील तोवर थांबतो म्हणाला आणि बसला की. आजीने धुण्याची काठी हातात घेतली आणि त्याच्यावर थेट उगारली.........चालता होतोस का हाणू ...........तो माणुस घाबरून धुम पळाला. (नंतर कळले कि तो बाहेर गावचा स्वयंसेवक होता). तो नंतर आला तरी आजीला घाबरून असायचा.

यातली गंमत बाजूला ठेवली तरी मानसिक बळाचे महत्त्व लक्षात येईल.

अमानत/ निर्भया हिची तब्येत अजूनच खालावली आहे <<
तिचं नाव कसं काय डिक्लेअर केलंय? आपल्याकडे बलात्कारीत व्यक्ती जिवंत असेल तर तिचे नाव जाहीर करायला प्रसारमाध्यमांना बंदी आहे ना?
की हे तात्पुरते वापरले जाणारे नाव आहे?
------- तिचे खरे नांव अजुन जाहिर झालेले नाही. अमानत नांव तात्पुरते आहे.

धन्यवाद. तेवढेच हवे होते.
तिचे खरे नाव जोवर ती जिवंत आहे आणि आयुष्यात पुढे जाण्याची शक्यता आहे तोवर जाहिर करायला कायद्याने बंदी आहे. खटला संपल्यावरही बहुतेक.

योकु | 27 December, 2012 - 12:29 नवीन
<<
go back to (my) first post on this thread. (page1 post1)

अमानतला सिंगापुरला हलवण्यात आले. प्रकृती नाजुक आहे...

http://www.ndtv.com/video/player/news/amanat-in-extremely-critical-condi...

Intestine (छोटे/ मोठे ??) Transplant शक्य आहे ? माझ्या एकण्यात असे नाही आले.

उदय <<< Intestine (छोटे/ मोठे ??) Transplant शक्य आहे ? माझ्या एकण्यात असे नाही आले.
>>>
आतापर्यंत जगभरात फक्त ३ लोकांचे इंटेस्टाईन ट्रान्स्प्लांट केलेय (म्हणे). पण या मुलीबाबत करता येईल का ही अजुनही शंकाच आहे कारण पोटातले बरेच महत्वाचे अवयव फाटले आहेत. त्यांना सांभाळुन तिच्या इतक्या नाजुक अवस्थेत हे कसे करता येणार आहे कोण जाणे Sad

आतापर्यंत जगभरात फक्त ३ लोकांचे इंटेस्टाईन ट्रान्स्प्लांट केलेय (म्हणे). >> त्यात रिस्क सुद्धा असते बरीच. फॉरेन पार्ट शरिरात बसवणं, आणि शरिराने तो अ‍ॅक्सेप्ट करणं याला बराच वेळ लागतो. माझ्या मैत्रिणीच्या बहिणीचं लार्ज इंटेस्टाईन थोडं काढलेलं आहे, तेव्हा काढलेल्या भागाच्या जागी दुसरं आर्टिफिशियल बसवण्याचा विचार सुरू होता पण बॉडी तो पार्ट कितपत अ‍ॅक्सेप्ट करेल याची शंका वाटत होती. बरं केला तर उत्तम, पण नाही केला तर परत ओपन लॅप्रोटॉमी.. Sad अतिशय वेदनादायक ठरते.

त्या दुर्दैवी मुलीच्या निधनाची बातमी वाचली. Sad

अतिशय वाईट झाले.

----------------

परवा सकाळीच मुर्खर्जीने तारे तोडलेले एकून वाटले किती थंड भावनेच लोकं भरलीत.... Sad

@झंपी | 29 December, 2012 - 13:00 नवीन
त्या दुर्दैवी मुलीच्या निधनाची बातमी वाचली.
अतिशय वाईट झाले<<

तुमच्याप्रमाणेच मलाही वाईट वाटले.

आपल्या सगळ्यांप्रमाणेच माजी महामहीम प्रतिभा पाटील, सोनिया गांधि, सुषमा स्वराज, मीराकुमार, शीला दिक्षित आणि तमाम राजकारण्यांना [मूर्खजींसकट] आता अतीव दु:ख झाल्याचे त्यांनि सांगितलेले आहे. ज्यांच्यावर बलात्काराचे आरोप आहेत असेही या दु:खाविष्कारात सामील असनारच.
जेव्हा अनेक बलात्कारी-खूनींना न्यायव्यवस्थेने कायम केलेली फाशीची शिक्षा राष्त्रपतींकडून दयाबुद्धीने कमी केली गेली तेव्हां याच सगळ्यांना दु:खावेग इतका अनावर झाला असावा कि त्यांचे तोंडून एक विरोधी शब्दही फुटल्याचे ऐकलेले नाही.

आणि आपण सर्वही तारे तोडणार्‍या मुखर्जींपेक्षा काय कमी थंड भावनेचे आहोत?

आमच्या ऑफिसमधे मध्यंतरी एसीपी पुणे यांचे भाषण झाले होते त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या खालीलप्रमाणे, (भाषण साधारणपणे हिंजवडी परिसरात काम करणार्‍या महिलांची सुरक्षा असा असल्यामुळे नयन पुजारी केसच्या संदर्भात होत्या पण त्या सगळ्यांनाच उपयोगी पडतील त्यामुळे आठवेल तसे लिहिते आहे.)

पुणे पोलीस, फोन नं फक्त १०० एवढाच नाहीये. १०० नं लक्षात रहाण्यासाठी उत्तम पण इथे काहीही+ सर्व कंप्लेंट्स येत असतात त्यामुळे हा नं दर वेळेस लागतोच असे नाही. त्यामुळे इतर नं पण माहीत हवेत. ते मोबाईलवर सेव्ह केलेलेही हवेत.

पोलीस कं रुम. १००, २६१२२०२, महिला/ बाल हेल्पलाईन - २६०५०१९१ क्राईम अ‍ॅलर्ट -२६११२२२.
हे नं दिवाळी किंवा कोणत्याही निमित्ताने शुभेच्छा संदेशाबरोबर एकमेकांना वारंवार समस करून पाठवले म्हणजे मग ते आपोआप सेव्ह होतात व सेव्हड रहातातही.
(वि.सु. पोलीसांशी बोलताना मराठी लोकांनी मराठीतच बोलावे, कारण पुण्यातले जवळपास सगळे पोलीस पुणे परिसरातले व मराठी बोलणारे आहेत. इंग्लीशला ते कधीकधी बिचकतात व मग संभाषण नीट होऊ शकत नाही.)

अनोळखी व्यक्तीकडे लिफ्ट मागु नये. सार्वजनीक वहान सगळ्यात सेफ.
काही जणींना कॅबमधून यावे लागते ती कॅब जरी कं ने पुरवली असेल तरी ती बाहेरील एजन्सीकडून आणलेली असते त्यामुळे सजग रहावेच लागते. कॅबमधे बसल्यावर "रोज"सगळ्यांना ऐकू जाईल अश्या आवाजात घरी एक फोन करायचा. त्या फोनमधे कॅबचा नं तुम्ही उच्चारुन अमुक अमुक कॅबमधून तुम्ही प्रवास करत आहात व आत्ताचे तुमचे लोकेशन सांगायचे व अजून कीती वेळ घरी पोचायला लागेल त्याचाही उल्लेख करायचा. (जर का मोबाईलमधे बॅलन्स नसेल, किंवा रेंज येत नसेल तरी हा फोन खोटा खोटा असायलाही हरकत नाही. तेवढे अ‍ॅक्टींग जमवायचे Happy

"कायम" हो हो...कायम्...कधीही जोरात पळता येउ शकेल असेच बुट्/चपला/कपडे असावेत. म्हणजे उंच टाचांचे बुट वगैरे ऑफिसात किंवा ऑफिसच्या पार्टीजना जिथे तुम्ही एक्ट्या जाणार आहात तिथे नकोत.

आर्थिक व्यवहारांची, घरगुती भांडणे, भानगडींची चर्चा कॅबमधे नकोच. इथे रोज अ‍ॅलर्ट रहायला हवेच.

बरेचसे कॅब ड्रायव्हर हे युपी एमपी मधील खेड्यांमधून आलेले असतात जिथे बायका त्यांच्या दृष्टीसही फारश्या पडत नाहीत. त्यामुळे शहरातल्या कॉन्फिडन्ट, पैसे मिळवणार्‍या, स्वतःच्या मर्जीप्रमाणे खर्च करणार्‍या व स्वतंत्र विचारांच्या बायकांबद्दल त्यांना असुया वाटते. अनेकदा त्यांचा इगो दुखावल्यामुळे सुडापोटी पण बलात्कार केले जातात. त्यामुळे शक्यतो ह्या लोकांशी हुज्जत न घालणे, जेवढ्यास तेवढे बोलणे, जास्त माहीती शेअर होणार नाही हे पहाणे हे महत्वाचे. काही मुली कॅबमधे बसल्या की घरच्यांशी जे काही बोलतात त्यातून बरीच माहीती दुसर्‍याला मिळते आहे हे त्या विसरतात.

एटीएम मधे दर शुक्रवारी पैसे काढणे, एकाच एटीएम मधून पैसे काढणे असे करू नये...बदलत रहावे. थोड्क्यात म्ह़णजे प्रेडीक्टेबल राहू नये. बर्‍याच जणी जाता जाता २ मि. थांबायला सांगून एटीएम मधून पैसे काढतात.

एकटीदुकटी मुलगी/स्त्री रात्री कारमधून घरी परत जात असताना जर गाडी बंद पडली, तर आड रस्त्यावर असाल तर गाडीतून बाहेर पडण्यापेक्षा पोलीसांना फोन करावा. रात्री त्यांच्या मोबाईल व्हॅन्स हिंजवडी परिसरात गस्त घालतात. (त्यांचा सेल नं पण आहे) त्या दहा मिनिटात मदतीसाठी पोचू शकतात.

आत्ता एवढेच आठवते आहे. अजून आठवले की लिहीन.

ती दुर्दैवी मुलगी मृत्यूमुखी पडल्यामुळे त्या नराधमांवर आता बलात्कार आणि खून असा दुहेरी आरोप लागेल ना....
ती जिवंत असतानाच त्यांना शिक्षा मिळाली असती तर थोडे समाधान वाटले असते. आता किमान तिच्या घरच्यांच्या समाधानासाठी सरकारने लवकर पावले उचलावीत.
नाही तर आहेच येरे माझ्या मागल्या...
अनुज बिडवे प्रकरण जसे विसरले गेले तसेच वर्षाभरात अजून एखादी घटना घडली की हे पण विसरले जाईल. पुन्हा निदर्शने होतील, कँडल मार्च निघतील, फेसबुकवर, माबोवर लोक निषेधाच्या पोस्ट टाकतील, पुन्हा एकदा हे सर्व बदलण्यासाठी काय केले पाहिजे यावर ताव भरुन चर्चा होतील...पुढची दुर्दैवी घटना घडेपर्यंत Sad Sad Sad

सुमेधाव्ही | 29 December, 2012 - 11:02 नवीन >>>>>>> +१ अतिशय चांगल्या सुचना! मोबाइलची सुचना अतिशय उपयुक्त आहे.

शक्यतो कंपनीच्या बसने प्रवास करावा सोय असल्यास!

पोलिस कंट्रोल रुम चे नंबर शोर्ट कि देउन पटकन डायल करता येतील असे सेव करावेत. जरी बोलता आले नाहि तरी नंबर डायल झाला तरी बराच उपयोग होउ शकतो.

प्रत्येक कंपनीतुन, सोसायटिमधुन फायर ड्रिल सारखे आता अशा प्रसंगात कसे वागावे याचे प्रशिक्षण आवश्यक आहे - मुलांना आणी मुलिंनाहि.

या मुलीच्या बळीने चटका लागला. या बाफवर सगळेच पुरूष असे नसतात म्हणताना स्त्री ला आज जी भीती वाटते आहे तिचा विचार माझ्याकडून झालेला नव्हता याबद्दल समस्त स्त्रीजातीची मी क्षमा मागतो. ती मुलगी जगेल असा विश्वास वाटत होता. फोल ठरला. तिच्या कुटुंबियांवर काय आभाळ कोसळले असेल, गेल्या तेरा दिवसात कुठल्या मानसिक संघर्षाला तोंड द्यावे लागले असेल याची कल्पना करवत नाही.

या माझ्या बहिणीला साश्रू नयनांनी श्रद्धांजली.

>>बरेचसे कॅब ड्रायव्हर हे युपी एमपी मधील खेड्यांमधून आलेले असतात जिथे बायका त्यांच्या दृष्टीसही फारश्या पडत नाहीत. त्यामुळे शहरातल्या कॉन्फिडन्ट, पैसे मिळवणार्‍या, स्वतःच्या मर्जीप्रमाणे खर्च करणार्‍या व स्वतंत्र विचारांच्या बायकांबद्दल त्यांना असुया वाटते. अनेकदा त्यांचा इगो दुखावल्यामुळे सुडापोटी पण बलात्कार केले जातात. त्यामुळे शक्यतो ह्या लोकांशी हुज्जत न घालणे, जेवढ्यास तेवढे बोलणे, जास्त माहीती शेअर होणार नाही हे पहाणे हे महत्वाचे. काही मुली कॅबमधे बसल्या की घरच्यांशी जे काही बोलतात त्यातून बरीच माहीती दुसर्‍याला मिळते आहे हे त्या विसरतात.>><<<

+१

अगदी खरे, बरेचसे ड्रायवर युपी, एम्पी, हरयाणा वगैरेचे असतात. बायकांपासून दूर वगैर.. त्यांच्याशी कमी बोलणेच उत्तम. कामानिमित्ताने मला टॅक्सी घ्यायला लागायचे मुंबईत असताना, हे ड्रायवर मुद्दम्हून विषय सुरु करायचे.. क्या मॅडम इतना देर तक काम करते हो.. घर पे चलता है क्या वगैरे. ह्यांना शिकवण्यात काहीच अर्थ नाही. एक दिवस माझी मैत्रीण हुज्जत घालायला लागली की युपीत कसे बायकांना वागवतात ते चुकीचे आहे तर ड्रायवर भडकला.. की औरतोंको बाहर चोड दिया है आजकल तो बच्चों का नुकसान होत है, आप क्या समजोगो.(अशी मतं काय मायबोलीवर पन मांडतात काही जणं... ) तेव्हा त्यांना शिकवणे म्हणजे वेळ बरबाद व संकटाला आमंत्रण.
पन ह्या घटनेनंतर, टॅक्सी घेणे जरा भितीदायक वाटते, असे विचार आले,
१)ते म्हणजे रात्री रस्त्यात जर का त्यांनी टॅक्सी थाम्बवून आणखी दोन चार आत बसवले ड्रायवरचे मित्र तर? किम्वा टॅक्सी आड रस्त्यावर अचानक बंद पडली तर?
भले टॅक्सी कंपनीला जीपीस द्वारे माहिती असते कुठली टेक्सी कुठे आहे ते पण वाईट घटना घडून गेली तर काय करणार? गुन्हेगाराचे काय जाते?

बर्‍याच जणींना (मैत्रीणींना सांगून झालेय की शक्यतो रात्रीचा टॅक्सीचा प्रवास टाळावा. सध्या तरी उगीच रिस्क नको. असे ठरवलेय.. अजून मानसिकतेत बदल व्हायला वेळ जाईल. तोवर स्वतःला जपणे हेच उत्तम. नसेल शक्य तर सार्वजनिक वाहन नाहितर खाजगी बस ज्यात बर्यापैकी बायका आत असतील तरच.. दादर ते पुणे (कोहिनूर बसेस.. वगैरे असे ))

मटाइतका भिकार, टुकार पेपर अस्तित्वात नसावा. 'तिच्या'वर कडेकोट बंदोबस्तात अंत्यसंस्कार.
प्रत्येक वेळी 'ती', 'तिच्यावर' असं अवतरण चिन्ह कशाला? त्याचा अर्थ कळतो का? अवतरण चिन्ह कोणत्या वेळी वापरावं, कोणत्या वेळी नाही याला काही नियम आहेत असा विचार तरी मनात येतो का?

सुमेधा, अत्यंत योग्य पोस्ट.
झंपी, असे अनुभव आहेत. यावर मी परत प्रियदर्शिनी टॅक्सी सर्व्हिस वापरून पहा सांगणार होते पण आपण टॅक्सी बोलावणं ते टॅक्सी येणं यामधे रस्त्यावर थांबण्यात जो वेळ जाणारे त्याचे काय हा मुद्दा येतोच आहे मनात.

प्रत्येक कंपनीतुन, सोसायटिमधुन फायर ड्रिल सारखे आता अशा प्रसंगात कसे वागावे याचे प्रशिक्षण आवश्यक आहे - मुलांना आणि मुलिंनाहि. << +१००

शाळेतून बिनकामाचे ,निरूपयोगी विषय वगळून मुलींना कराटे सारखे प्रशिक्षण सुरू करायला पाहिजे. झालेच तर अता चाकू सुर्‍या वापरायला , चालवायला शिकवले पाहिजे असे वाटते.

सुमेधा , उत्तम पोस्ट.
झंपी +१

हे असलं काही होताना पाहिलं की वाटतं, समानता वैगेरे गेली तेल लावत अगोदर स्वतःला जपूया. जान सलामत तर पुढे समानतेची कथा!

इतके दिवस मला वाटत होते की मुलींना 'शील म्हणजे काचेची अब्रू' इ विचारांपासून दुर ठेवले तर बलात्कारानंतर होणार्या मेंटल टॉर्चरपासून त्याना वाचविता येईल पण इथे तर मुली फक्त मुलगी असणे या एका कारणापायी आयुष्याला मुकतायत.
हेल्पलेस वाटतंय अगदी.

@सुमेधाव्ही
फार चांगल्या सूचना.

@साती
हेल्पलेस वाटतंय अगदी.<<

अहो तुम्हीच निराश होऊन कसे चालेल?

१०-१५ % मते देखील प्रचंड परिणाम घडवून आणतात. महिलां मतदात्यांचे प्रमाण तर ५०% आहे. त्या शक्तीचा वापर करण्याचाही सर्व भगिनींनी विचार करावा. देशभर कसल्या ना कसल्या निवडणूका सतत चालू असतात. पिरॅमिडच्या तळातल्या चिर्‍यांवर तर वरील सर्व डोलारा उभा असतो . तेव्हां प्रत्येक ठिकाणी [सुसंगत असो वा नसो] हा मुद्दा महत्वाचा करा. चिर्‍यांनाच या प्रश्नाची धग लागायला लागली कि वरच्यांंपर्यंत ती पोचेलच. त्याशिवाय शासनकर्त्यांना जाग यायची नाही.

ही fb वरची पोस्ट मराठीमध्ये भाषांतर करत न बसता आहे तशीच share करतीये.

Tech Mahindra had long back developed an application called FightBack which was being used only by the staff members of Mahindra Group.

After the gang-rape of a woman in New Delhi; Anand Mahindra has now thrown open this smart phone application for public use, beyond Mahindra employees.

The FightBack application tracks a user's location and sends SOS messages to selected contacts in case of an emergency.

This application is now available for download on the company website for free & IS ONLY FOR INDIAN MOBILE NUMBERS.

The FightBack app allows the user to press on a panic button whenever he/she feels unsafe.

It tracks the location using GPS and alerts chosen contacts about the location map and is available on Android and Blackberry.

www.fightbackmobile.com

Steps - How to download the application

1 - Register yourself or login through Faceback with Post click.
2 - After the successful Login in the portal, Click to Download.
3 - Enter the mobile number on which you want to deploy for the Fight Back application.
4 - Select your handset on which you would like to download the application from the device list.
5 - Click on Download button, and you will receive the link to download via SMS.
6 - By clicking on the downloadable link within the received SMS your application will start downloading.

Do spread this to create awareness.
FB
www.fightbackmobile.com
FightBack, the women's safety application, sends SOS alerts from your phone. FightBack uses GPS, SMS, location maps, GPRS ,email and your Facebook account to inform your loved ones in case you are in danger. Join us and help make our streets safer for women.

मोहन जोशी, पुणे.

didnt test the app.

but sounds excellent idea. thank you very much for sharing chaitrali.

शाळेतून बिनकामाचे ,निरूपयोगी विषय वगळून मुलींना कराटे सारखे प्रशिक्षण सुरू करायला पाहिजे. झालेच तर अता चाकू सुर्‍या वापरायला , चालवायला शिकवले पाहिजे असे वाटते.
------ निव्वळ कराटे शिववुन प्रश्न मिटणार नाही. कराटे चा वापर कुठे करावा आणि कोणत्या परिस्थितीत करावा हे पण शिकवण्याचा भाग असावा. मी शक्ती सोबत युक्ती वापरणे याला प्राधान्य देइल.

शाळेमधे शिकवतांना विशेषत: मुलांना समान हक्कांबद्दल शिक्षण द्यावे. (स्त्री हे अत्यंत आदराचे स्थान आहे त्यांना माता/ भगिनी माना हे शिकवू नकाच पण) स्त्री देखिल एक मानव आहे, आणि त्यांना तुमच्या एव्हढाच समान अधिकार आहेत हे ठसवा. स्त्रियांचे शरिर हे खेळण्याची किंवा उपभोग्य वस्तू नाही आहे आणि तेथे अतिक्रमण करणे यांत कुठलाही पुरुषार्थ नाही आहे हे मुलांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न व्हायला हवेत.

तसेच प्रशिक्षण मुलींनाही मिळायला हवे. तुम्ही तुमच्या समान हक्कांबद्दल जागरुक असायलाच हवे. स्वयंपाक, घर, गृहस्थी, मुलांना जन्म देणे - वाढवणे हेच तुमचे कार्य नाही आहे. क्वचित प्रसंगी दुय्यम भुमिका स्विकारायला हरकत नसावी पण स्त्री आहे म्हणुन नव्हे. तुम्हाला जगायचे असेल तर जवळपासच्या लोकांना (परिचित तसेच अपरिचित) ओळखण्याचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे.

हिंदी चित्रपट आणि TV मालिका यांचा कितपत प्रभावी वापर करता येइल हे पण बघायला हवे

बाईच्या जातीने पडतं घ्यावं, पायातली वहाण, पति परमेश्वर, स्त्रियांवरून असलेल्या शिव्या, महिला स्पेशल लोकल्सना घाणेरडे प्रतिशब्द वापरणं अश्या टाइप्सचे सगळे उदगार हे डिस्क्रिमिनेटरी आणि म्हणून क्रिमिनल ऑफेन्स म्हणून मानले जायला हवेत.

इथे बर्‍याच जणांनी सुरक्षिततेचे मुद्दे लिहिलेले आहेत. माझापण एक मुद्दा:

सध्याच्या कामाच्या जगामधे आपण कायम सुरक्षित वेळेलाच आणि सुरक्षित ठिकाणीच असू असे नाही. अशावेळेला काय करायचे त्याची मनातल्या मनात एकदा प्रॅक्टीस करून ठेवत जा. त्यासाठी परिस्थितीचा अंदाज घ्या.

त्याचबरोबर सिक्स्थ सेन्स डेव्हलप करा. त्यासाठी समोरच्याची देहबोली, नजर, आपापसांतील संभाषण यांसंदर्भात अ‍ॅलर्ट रहा. हे एका दिवसात शक्य नाही. अगदी टीनेजपासून या इन्स्टिंक्टला तयार करत रहा. बर्‍याचदा मुली (अर्थात मुलेदेखील) कानामधे हेडफोन घालून गाणी ऐकत वगैरे बसतात. त्याऐवजी आजूबाजूच्या परिस्थितीचे निरीक्षण करा. धोक्याची सूचना कुठे मिळते का ते बघत रहा. जर का धोका आधीच ओळखता आला तर अर्धी लढाई जिंकली जाईल.

दुसरी गोष्ट म्हणजे पळण्याची तयारी. पळता येऊ शकेल का? याचा आधी विचार करा. गडबड गर्दीच्या ठिकाणी पळून जाता येत असेल तर ताबडतोब ते करा. अंतराचा अंदाज घ्या. त्यासाठी कुठेही धोका आहे असे वाटले तर पायामधे पळण्यालायक शूज नसतील तर पायातले आधी काढून फेका. पळून कुठेही जाता येत नसेल तर उगाच पळून दमू नका. त्याऐवजी जोरजोरात ओरडा (म्हणजे किंचाळू नका!!) करत रहा. पर्समधे एखादे चाकूसारखे हत्यार असू द्यात. (शक्य असल्यास स्विस आर्मी नाईफ) गरज पडली तर असले हत्यार वापरण्यास मागे पुढे पाहू नका.

अवांतर: हे सर्व असले काही वाचले ऐकले की मी असले धाडस केले होते यावर आता विश्वास बसत नाही.

पर्समधे एखादे चाकूसारखे हत्यार असू द्यात. (शक्य असल्यास स्विस आर्मी नाईफ) गरज पडली तर असले हत्यार वापरण्यास मागे पुढे पाहू नका. <<<
हल्ली बर्‍याच ठिकाणी (मॉल्स, ऑडिटोरियम्स) सिक्युरिटी चेकमधे हे काढून घेतले जाते.

नीधप, रात्री वगैरे फिरताना मी माझ्या पर्समधे छोटा चाकू कायम ठेवते. (अगदी फळं कापायला वापरतात त्यातला. स्वसरंक्षणाव्यतीरीक्त त्याचे इतरही बरेच उपयोग करता येऊ शकतात!!) मॉल अथवा दिवसाढवळ्या वगैरे जाताना अर्थात हा चाकू नेला जात नाही. रात्री फिरताना-प्रवासामधे मात्र आवश्यक.

स्विस नाईफ कामावरती होते तेव्हा ठेवायचे. सध्या त्याची आवश्यकता भासत नाही. एकटीने प्रवास करताना मात्र बॅगमधे ठेवलेले असते. पण ज्यांना नोकरी अथवा इतर कामाच्या निमित्ताने रात्री फिरणे गरजेचे आहे त्यांनी मात्र असे हत्यार ठेवायला हवे.

दिल्लीतील १६-१२-१२च्या भयानक घटनेनंतर त्या दुर्दैवी तरुणीच्या मृत्युपर्यंत दिल्लीत आणि भारतातील सर्व भागात झालेल्या निदर्शने ददपण्याचा सरकारी प्रयत्न अयशस्वि झाला नि सरकारकडून आश्वासनांचा महापूर येऊ लागला. मृत्युनंतर नेहमीप्रमाणे नेत्यांकडून दु:खाविष्कार झाला. आता थोड्याच दिवसांनी सारे कसे शांत शांत होईल. माझ्यासारख्यांनी कांही स्मरण देण्याचा प्रयत्न केला तर त्याचे तुणतुणे वाजू लागले असे म्हणून टिंगल केली जाईल. पुन्हा असेच कांहीतरी घडले कि टिंगल करणारेच त्यांनाच कशी काळजी लागून राहिली आहे याचे प्रदर्शन मांडतील.
पण सदासर्वकाळ उपयोगी पडतील अशा कांही अत्यंत मार्गदर्शक बाबी अनेकांनी या धाग्यावर नोंदवून ठेवल्या आहेत.
जवळजवळ सहाशे प्रतिसादांपैकि या महत्वाच्या विषयाला धरून आलेले प्रतिसाद शोधणे खूप वेळखाऊ भासले म्हणून हे संकलन देतो आहे.

[१]कवठीचाफा | 26 December, 2012 - 10:14
साडेतीन-चारवर्षे सेल्फ डिफेन्स अ‍ॅकेडमी नावाच्या संस्थेसोबत लहान काळाची शिबीरं झाली त्यात ज्या गोष्टींचे ट्रेनिंग दिले त्यातल्या महत्वाच्या गोष्टी. केवळ स्त्रियाच नाही पुरूषांनाही उपयोगी पडू शकतील अश्या. { मुळ धाग्यावर वाचाव्यात}
[२]एक ब्लेड नाहीतर लहानसा धारधार चाकु, नेलकटर, सेफ्टी पिन जवळ ठेवा. पुरुषाच्या घाणेरड्या हालचाली लक्षात आल्या की लगेच लगेच जोरकसपणे वापरा असे अनेकांनी सुचवले आहे.
[३]स्मितू | 18 December, 2012 - 22:57
शक्य्तोवर रात्रीचा प्रवास एकटीने टाळावाच... खुपच अर्जंट असेल तर सोबत कोणाला तरी घ्यावे...
[४]swanand_ml | 19 December, 2012 - 16:42
ज्याला जगायचे आहे त्याला झगडावे लागेलच.
महिलांनी शस्त्र बालगण्यावर येथे चर्चा झाली.
http://en.wikipedia.org/wiki/Karambit
http://en.wikipedia.org/wiki/Push_dagger
लपवीण्यासाठी सोपे, हाताळण्यासाठी सोपे व हिसकावून घेण्यास अवघड. इंटरनेट वर उपलब्ध.
केवळ शस्त्र आहे हे पुरेसे नसते. ते हाताळन्याची व वापरण्याची मानसीकता असणे गरजेचे असते. त्यासाठी प्रशीक्शण गरजेचे आहे.
बंगळुर वासी येथे जवु शकतातः
http://kravmagabangalore.in/
मुम्बई: http://www.kravmagaindia.in/locations/mumbai
दिल्ली: http://www.kravmagaindia.in/locations/delhi
वरील प्रशिक्शण केंद्रे शस्त्रप्रशिक्शणाची नसून संरक्शण प्रशिक्शण केन्द्रे आहेत ह्यची नोन्द घ्यावी.
[५]दिनेशदा | 21 December, 2012 - 05:52
एकटे घराबाहेर पडल्यावर, जर कुठल्याही असुरक्षित भागातून जात असू तर अगदी नियमित रित्या घरच्या व्यक्तीला किंवा सहकारी व्यक्तीला फोन करुन आपला खरा ठावठिकाणा कळवत राहणे हा एक उपाय सुचतो मला.
[६]नीधप | 21 December, 2012 - 08:28
सुरक्षिततेसाठी पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
[७]आहना | 21 December, 2012 - 08:46
पेपर स्प्रे उपलब्ध नसल्यास पर्स मधे डिओड्रन्ट वापरा
[८]उदय | 21 December, 2012 - 09:01
प्रसंगावधानता दाखवणे महत्वाचे आहे. {धाग्यावर जाऊन मूळ मजकूर वाचणे योग्य हॊईल}
[९]प्रिया७ | 21 December, 2012 - 16:12
ब्राईट एलईडि फ्लॅश लाईट जो वेळ प्रसंगि कामी येतो सरळ डोळ्यात मारता येतो. पेपर स्प्रे नसेल तर छोटि परफ्युम बाटलि सुद्धा वापरता येतेकुठे एकटे असतांना कानात हेड्सेट घालुन ठेवु नये. गाडि चे रिमोट लॉक गाडिजवळ जावुनच उघडणे,गरज पडल्यास खोटे बोलणे,रात्रिच्या वेळि एकटे असाल तर कोणाला दया दाखवायच्या आधि/ मदत करायच्या आधि २-३ दा विचार करा .
[१०]मुंगेरीलाल | 23 December, 2012 - 00:51
एक साधा आणि परिणामकारक उपाय म्हणजे एक जोरदार, तीव्र आवाजाची शिट्टी (पर्समध्ये अथवा किचेन म्हणून) जवळ बाळगणे. कुठलाही गुन्हेगार (किंवा त्यांचा समूह) एका क्षणात दचकतो आणि तुम्हाला सुटका करून घेण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. शिवाय हे शस्त्र नसल्यामुळे जवळ ठेवण्याला कुठली परवानगीही लागत नाही आणि वापरायला कसलं कौशल्यही लागत नाही.
[११]अशोक. | 19 December, 2012 - 08:00
दिल्ली डीसीपी छाया शर्मा यानी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीवरून असे म्हणता येईल की, दिल्लीसारख्या सुरक्षिततेच्या पार बोर्‍या वाजलेल्या शहरात मुलींनी/स्त्रियांनी रात्रीच्या सिनेमाचा सोस टाळावा.
जे संशयीत आरोपी पकडले गेले आहेत ते अशा स्कूल बसेसमधील कर्मचारी आहेत ही आणखीन् एक धक्कादायक बातमी. म्हणजे दिल्लीतीलच नव्हे तर देशात ज्या ज्या ठिकाणी खाजगी कंत्राटदारांच्या स्कूल बसमधून मुलेमुली शाळाकॉलेजला येजा करतात त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो.
ज्या शाळेत आपली मुलगी जाते अन् तिथे जाण्यासाठी तिला स्कूल बसचा उपयोग करावा लागत असेल तर जागरूक पालक या नात्याने स्कूल मॅनेजमेन्टकडे बससाठी नियुक्त करण्यात आलेल्या स्टाफची इत्थंभूत माहिती सर्व पालकांकडे गेली पाहिजे असा आग्रह धरणे.....
{दिल्ली हे स्त्रियांसाठी तर सुरक्षित नाहीच पण एकूणच असुरक्षित शहर असल्याचे मत अनेकांनी स्व-अनुभवाने नोंदवले आहे.}
[१२]अश्विनीमामी | 23 December, 2012 - 03:12 {संपूर्ण पोस्ट मुळातून वाचनीय}
.............एक गोष्ट मला लक्षात आली, मुली, स्त्रीया ऑफिसला जातात किंवा घरी उशीरा येतात. ................ इथे किती पटेल माहीत नाही पण शहरांमध्ये सर्विस इंडस्ट्री जसे वाहन चालक, वेटर, वॉचमन ऑफिसातील प्यून्स वगैरे बाहेरच्या राज्यातून आलेले एक्टे पुरुष असतात. एकाच रूटीन कामात अडकलेले, जास्तीच्या तासांचे काम करून वैतागलेले असतात. बायको गावी त्यामुळे .....
पण त्यांना आपली मानसिकता समजेल अश्या भ्रमात राहू नये. स्त्रीवाद वगैरे तर दूरची गोष्ट.
[१३]सुमेधाव्ही | 29 December, 2012 - 08:02
आमच्या ऑफिसमधे मध्यंतरी एसीपी पुणे यांचे भाषण झाले होते त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या खालीलप्रमाणे, (त्या सगळ्यांनाच उपयोगी पडतील त्यामुळे आठवेल तसे लिहिते आहे.)
{मुळ पोस्ट्च वाचणे चांगले}
[१४]प्रमोद देव | 21 December, 2012 - 18:36
ज्यांना आपली सुरक्षितता महत्त्वाची वाटते त्यांनी समाजात वावरतांना किमान काही गोष्टींचे कसोशीने पालन करायलाच हवे....आपले पालक जे काही सांगतात....ते काळजीपोटी सांगत असतात हे पक्के ध्यानात घ्यावे....त्या काळजीला बंधन वगैरे संबोधून ते झुगारण्याचा उगाच प्रयत्न करू नये....
एखादी व्यक्ती स्वत: कितीही पुढारलेल्या आचार-विचारांची असली तरी त्या व्यक्तीला ...त्यांच्या दृष्टीने बुरसटलेल्या समाजात नाईलाजाने का होईना जेव्हा वावरायचं असतं...तेव्हा आपल्या स्वातंत्र्याच्या कल्पनांना वेळीच आवर घालणे योग्य..नाहीतर अपघात हा होणारच....
[१५]वरदा | 21 December, 2012 - 22:43
स्वतःकडे तिखटाची पूड ठेवा
[१६]उदय | 26 December, 2012 - 22:35
पॅनिक बटन असणारे (दाबल्यावर जोरांत आवाज करणारे.... आणि करतच रहाणारे) मनगटावर किंवा खांद्याला लावायचे आणि सहजरित्या हनुवटिने (हात बंदिस्त असतील तर) दाबता येणारे.
[१७]chaitrali | 30 December, 2012 - 15:40
Tech Mahindra had long back developed an application called FightBack which was being used only by the staff members of Mahindra Group.
After the gang-rape of a woman in New Delhi; Anand Mahindra has now thrown open this smart phone application for public use, beyond Mahindra employees.
The FightBack application tracks a user's location and sends SOS messages to selected contacts in case of an emergency.
This application is now available for download on the company website for free & IS ONLY FOR INDIAN MOBILE NUMBERS.[मूळ पोस्ट वाचणे फार फार उपयुक्त ठरेल]
[१८]नंदिनी | 1 January, 2013 - 08:36
सध्याच्या कामाच्या जगामधे आपण कायम सुरक्षित वेळेलाच आणि सुरक्षित ठिकाणीच असू असे नाही. अशावेळेला काय करायचे त्याची मनातल्या मनात एकदा प्रॅक्टीस करून ठेवत जा. त्यासाठी परिस्थितीचा अंदाज घ्या.
त्याचबरोबर सिक्स्थ सेन्स डेव्हलप करा. त्यासाठी समोरच्याची देहबोली, नजर, आपापसांतील संभाषण यांसंदर्भात अ‍ॅलर्ट रहा. हे एका दिवसात शक्य नाही. अगदी टीनेजपासून या इन्स्टिंक्टला तयार करत रहा. बर्‍याचदा मुली (अर्थात मुलेदेखील) कानामधे हेडफोन घालून गाणी ऐकत वगैरे बसतात. त्याऐवजी आजूबाजूच्या परिस्थितीचे निरीक्षण करा. धोक्याची सूचना कुठे मिळते का ते बघत रहा. जर का धोका आधीच ओळखता आला तर अर्धी लढाई जिंकली जाईल.
दुसरी गोष्ट म्हणजे पळण्याची तयारी. पळता येऊ शकेल का? याचा आधी विचार करा. गडबड गर्दीच्या ठिकाणी पळून जाता येत असेल तर ताबडतोब ते करा. अंतराचा अंदाज घ्या. त्यासाठी कुठेही धोका आहे असे वाटले तर पायामधे पळण्यालायक शूज नसतील तर पायातले आधी काढून फेका. पळून कुठेही जाता येत नसेल तर उगाच पळून दमू नका. त्याऐवजी जोरजोरात ओरडा (म्हणजे किंचाळू नका!!) करत रहा. पर्समधे एखादे चाकूसारखे हत्यार असू द्यात. (शक्य असल्यास स्विस आर्मी नाईफ) गरज पडली तर असले हत्यार वापरण्यास मागे पुढे पाहू नका.

महिलांनि स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे? >> का म्हणून त्यानी स्वतःला सुरक्षित ठेवावे? अन महिला काय २४ कॅरेटचं सोनं आहेत की कोहिनूरच्या हि-या(रा?) आहेत म्हणून त्याना सुरेक्षेची गरज आहे. घातलं त्याना संदुकात अन केलं बंद... लावले बाहेर चार शिपायी अन म्हटलं... "राह ग बाई सुरक्षित!"

महिलानी स्वतःला सुरक्षित ठेवणे किंवा आम्ही त्याना सुरक्षा देऊ/पुरवू असा विचार जो पर्यंत आहे तो पर्यंत महिलाना धोका आहे. हा विचार ज्या दिवशी गेला तो दिवस खरा भाग्याचा!

म्हणजे काय?
वरच्या विचाराला 'त्यांना हवं तस जगण्याचं स्वातंत्र्य आहे' या एवढ्याश्या विचारानी रेप्लेस करायचं आहे. बास! झालं काम.

हो!, पण हा एवढुसा विचार रुजवायला लागणारी कसरत मात्र प्रचंड असेल. काहिही असो, ती सुरुवात झाली की एक दिवस तो रुजलेला असेल. अन माझ्या मते याची सुरुवात महिलानीच कारावी. ती अशी.

१) ज्याना ज्याना मुलं आहेत त्यानी आपल्या मुलाना लहानपणा पासूनच आईचा, बहिणीचा व ईतर सर्व स्त्रियांचा आदर करणे शिकवावे.

२) स्त्रीवर अत्याचार होत असल्यास त्याच्या विरोधात आवाज उठविण्याचा बाळकडु लहान वयातच द्यावा.

३) स्त्री सुद्धा माणूस आहे हे ठासून ठासून इतकं रुजवा की पुढच्या पिढिची पार मानसिकताच बदलेली असेल.

४) स्त्री ही उपभोग्य नाही, ती अबला नाही हे रुजवावं. त्याच बरोबर घरातलं करते म्हणून उत्पादकीय नाही असा समज होता कामा नये याची काळजी घ्यावी.
५) बाबा हा पोरांचा सुरुवातीचा रोलमोडेल असतो, म्हणून पोराना समजू लागलं की बाबाला स्त्रियां बद्दल वर्तन बदलायला भाग पाडा, याचा दूरागामी परिणाम पोरांवर होईल. थोडक्यात बापाला वेसन घाला.

६) स्त्रिवर रुबाब झोडणे म्हणजे मर्दानगी नसून तिच्याशी सौजन्याने वागणे यात मर्दानगी आहे हा गूण नेटानी आपल्या पोरात रुजवावा.

बर हे सगळं लाँगटर्म इन्व्हेस्टमेंट आहे. एक दोन पिढ्या जाव्या लागतील. बघा आपण काय करु शकतो ते. म्हणजे पुढचे बलात्कार टाळणे हे आपल्याच हातात आहे. किमान ८०% तर आहेच आहे.

मी माझां स्वतःचा एक अनूभव सांगतो,

आम्ही शाळेत असताना (दहावीच्या वर्षाला) एक सुंदरशा मॅडम आम्हाला शिकवायला होत्या. त्या नुकतच बी. एड. करुन आमच्या शाळेत लागल्या होत्या. म्हणजे वयानी २५च्या आतच. आम्ही असू १६-१७ चे. या मॅडम एका बाबतीत बेफिकीर होत्या ते म्हणजे त्यांच्या ख्यांद्यावर 'ब्रा' ची पट्टी आली तरी त्याना कळायचं नाही. मग काय आम्ही पोरं काही काही गप्पा हाणायचो. माझ्या शेजारी एक मुलगा बसायचा. त्याची आई त्याला स्त्रीयांचा आदर करण्या बाबत सारखं सांगायची. जेंव्हा त्याला कळले की आम्ही बाईची ब्रा बघुन चकाट्या पिटतो तेंव्हा त्या मुलाने आमच्यापुढे आईची कॅसेट वाजवली अन आम्ही सुधरलो.
म्हणजे बघा, कुठलीतरी बाई तीच्या मुलाला स्त्रिचा आदर करण्याचे धडे देते अन त्याच्या संपर्कात येणारे आम्ही सुद्धा बदलतो. आदर करायला शिकतो. किती महत्वचं असतं मुलांवर संस्कार करण बघा. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलावर जे संस्कार करता ते त्याच्या संपर्कात येणा-या एखाद्या झोपडपट्टितील मुलाला धडा देऊन जाऊ शकतात. संस्काराचा आवाका एवढा असेल हे रुजवताना आपल्याही ध्यानी मनी नसते.

Pages